Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो | नवरा बायको स्टेटस

1
2509
नवरा तो नवराच असतो - good thoughts in marathi - marathi suvichar with images - vb - marathi suvichar - sunder vichar - chhan vichar marathi
नवरा तो नवराच असतो - good thoughts in marathi

Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो |
नवरा बायको स्टेटस

नवरा तो नवराच असतो - good thoughts in marathi - marathi suvichar with images - vb - marathi suvichar - sunder vichar - chhan vichar marathi - नवरा बायको सुविचार - नवरा कविता
नवरा असतो म्हणून जीवन झकास वाटते, नाहीतर त्याच्या शिवाय श्रुंगार ही भकास वाटते 

 

तो रागवला कितीही तरी प्रेमाने शेवटी जवळ तोच घेतो… 
रागाने कधी बाहेर गेलाही तरी…
त्याचे घराकडे पाय आपोआपच वळतात… 
आपल्या मनातील भाव डोळ्यातूनच त्याला कळतात… 
जरी दुःखी असला कितीही तरी, सारे पचवून घेतो…  
आपल्या शिवाय तिला कोण आहे, असे म्हणून एक गजरा घेऊन येतो …
नवरा तो नवराच असतो…!
का करतेस काळजी…  आहे ना मी…  म्हणून किती धीर देतो. 
अडचणी सगळ्या आपल्या मनात ठेऊन
बायको कडे हासऱ्या नजरेने बघतो…!
नवरा तो नवराच असतो…!
जसी छत असते आपल्या घरावर… 
तसेच डोक्यावर आपल्या नव-याचे झाकण असते. 
त्यांच्या या झाकण रुपी सावलीत आपण पुर्णतः सुरक्षित असतो.
चटके ऊन्हाचे स्वतः खातो… पण सावली आपल्या डोक्यावर देतो…
नवरा तो नवराच असतो…
आपण चार दागिने घालून म्हणतो… 
मान माझी पण, मंगळ सुत्र तुझ्या नावाचे…. 
कपाळ माझे पण टिकली तुझ्या नावाची…
परंतू नवरा कधी तरी म्हणतो का की…
परिश्रम माझे पण, पगार तुझा…
शरीर माझे पण, माझे जीवन तुझे…
जन्म माझा,आईच्या उदरात, पडलो मी तुझ्या पदरात…
तूच जिवन संगिनी म्हणून जीवनाचे मंजुळ मानत असतो…
शेवटी नवरा तो नवराच असतो…

Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो |
नवरा बायको स्टेटस

ही संसाराची गाडी दोन चाकांवर चालते
त्यासाठी दोघांनाही प्रमाणशीर सांभाळावा लागतो…
जरी एक चाक डगमगले तरी…
एका चाकावर रथ चालविणे फार कठीण होते…
जसे बायको शिवाय घराला घरपण राहत नाही…
तसेच नव-या शिवाय बायको ही पूर्ण नाही…

नवरा घराचा कळस आहे आणि कुटुंबाची सावली आहे…
दुःखाचे चटके नवरा खातो… आम्हाला मात्र सावलीत ठेवतो…
नवरा तो नवराच असतो…

या जीवनातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण… 
नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही….
म्हणून एकमेकांना आपुलकीची हाक द्या…
एकमेकांना प्रेमाची साथ द्या… 
हे जिवन क्षणभंगूर आहे…
म्हणून जगण्याचा भरपूर आनंद घ्या…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here