नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये
मी एक pouranik katha तुम्हाला सांगणार आहे.
या कथेत प्रभू श्री राम यांना नारद मुनींचा शाप
कसा भोगावा लागला आणि श्री हरी विष्णू यांनी
नारद मुनीच्या शापाचा कसा मान ठेवला हे माहीत
करूया. जय श्री राम
नारद मुनींच्या शापामुळेच..
श्री रामाला वनवास भोगावा लागला
नारद मुनी हे भगवान विष्णूंचे
परमभक्त म्हणुन ओळखले
जातात. चालता बोलता सतत
“नारायण नारायण” जप
करणारे नारद मुनी यांना
देवर्षी सुद्धा म्हटले जाते.
नारद मुनी एकदा तपश्चर्येला
बसले. त्यांनी अनेक वर्ष कठोर
तप केले. आणि कोणी तपाला
बसला रे बसला कि नेहमीप्रमाणे
देवराज इंद्राला भीती वाटू लागली.
कोणीही तप केले कि इंद्राला तप
करणारा वर मागतांना मोठी शक्ती
मागून स्वर्गातली आपली सत्ता
हिरावून घेईल असे वाटायचे. मग
तो ते तप भंग करून… पूर्ण होऊ
नये म्हणून प्रयत्न करायचे.
मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi
या वेळी इंद्राने कामदेवाला
नारदाचे तप भंग करायला
पाठवले. कामदेवाने अनेक
प्रयत्न केले… नारदाजवळ सुंदर
स्त्रीला पाठवले. पण नारदाने
आपली तपश्चर्या भंग होऊ दिली
नाही. आपले लक्ष विचलित न
होऊ देता तपावरच केंद्रित केले.
शेवटी कामदेवाने हार मानली
आणि नारदासमोर हात जोडले.
तो म्हणाला ” हे मुनीवर तुम्ही
धन्य आहात. माझ्या कुठल्याही
प्रयत्नाला तुम्ही यश लाभु दिले
नाहीत. आपल्या ध्यानात इतके
मग्न मी आजवर केवळ
महादेवांनाच पाहिले आहे. की
ज्यांचे ध्यान कोणीही भंग करू
शकत नाही. नारद हे ऐकून
प्रसन्न झाले. आणि स्वतः बद्दल
त्यांना अभिमान वाटला. त्यांनी
कामदेवाला उत्तर दिले…..
कामदेवा… आता तुमच्या
लक्षात आलेच असेल कि
एवढी एकाग्रता असलेले काही
एकटे महादेवच नाहीत. जाऊन
सांगा तुमच्या देवराज इंद्रांना….
की नारदाचे तप कोणीही भंग
करू शकत नाही. देवर्षी
असल्यामुळे त्यांना मनात येईल
त्या ठिकाणी प्रकट होणाची
सिद्धी प्राप्त होती. महादेवासारखी
पातळी गाठल्या बद्दल त्यांना लगेच
महादेवांसमोर जाऊनच सांगावे
वाटले.
pouranik katha |
श्री रामाला नारद मुनींचा शाप |
Raam Katha
ते ताबडतोड कैलासावर जावून
महादेवांना भेटले. आनंदाने त्यांनी
घडलेली घटना महादेवांना सांगितली.
महादेवांना नारदाला थोडा गर्व
झाल्याचे लक्षात आले. पण त्यांनी तसे
काही न दाखवता नारदाचे अभिनंदन
केले. “वाह देवर्षी… खूप छान. तुम्ही
कमाल केलीत.” ” धन्यवाद प्रभू, आता
मला कधी एकदा माझ्या प्रभू विष्णूंना
हे सांगतोय असे झालेय” ” त्यांना सर्व
समजलेच असेल. तुम्ही जाऊन
सांगण्याची आवश्यकता नाही.” असे
महादेवाने त्यांना सांगितले.
महादेवाचे म्हणणे नारदाला समजले
नाही. आपण भक्तीची एवढी परिसीमा
गाठली असतांना आपल्याच प्रभूंना का
सांगू नये असे त्यांना वाटले. त्यांना
अपेक्षा होती कि हा वृत्तांत ऐकून
भगवान विष्णू तर अत्यंत प्रसन्न होतील.
ते तिथून तडक वैकुंठात गेले. आणि
अभिमानाने विष्णूदेवा समोर ही त्या
घटनेबद्दल सांगितले.
महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णूंना
त्रिकालदर्शी असल्यामुळे सर्व काही
माहीतच होते. आणि आता नारद बढाई
मारण्यासाठी आपल्यासमोर आले
आहेत हे ही त्यांना समजले. त्यांनी
एक स्मित हास्य केले आणि नारदांना
सांगितले…. “वाह मुनिवर….! या पुढे
ही असेच सावध राहा.”
नारद मुनींना हवी तेवढी प्रतिक्रिया न
मिळाल्यामुळे ते थोडे नाराज झाले.
भगवंतांना नमस्कार करून ते निघाले.
त्यांचा जगात सर्वत्र संचार असे. ते
फिरता फिरता एका राज्यात गेले.
तिथल्या राजकन्या श्रीमतीचे स्वयंवर
होऊ घातले होते. राजाने नारदाला
आदराने बोलावले. पाहुणचार केला.
राजपरिवारातल्या सर्वांनी नारदाचा
आशीर्वाद घेतला.
श्रीमती अत्यंत सुंदर होती. तिला
पाहुन नारदाला साक्षात देवी
लक्ष्मी पाहिल्याचा भास झाला.
नारदाला तिच्या स्वयंवराबद्दल
ऐकुन त्यात भाग घेऊन तिच्याशी
लग्न करण्याची इच्छा झाली. पण
त्यांना वाटायला लागले कि देवी
लक्ष्मी सारखी सुंदर असणारी
राजकन्या आपला वरही
नारायणा इतकाच सुंदर निवडेल.
ते पुन्हा वैकुंठात गेले आणि त्यांनी
भगवंतांना आपल्यास हरिरूप
देण्याची विनंती केली. हरी
म्हणजेच विष्णु. भगवंतांनी
तथास्तु म्हटले. नारद स्वयंवरात
पोहोचले. त्यांच्याकडे पाहुन
सर्व जण गालातल्या गालात
हसत होते. नारदांना आश्चर्य
वाटले पण त्यांनी दुर्लक्ष केले.
स्वयंवर सुरु झाले. राजकन्या
सर्व हातात हार घेऊन एक एक
इच्छुकाकडे बघत सभेतुन फिरत
होती. नारदाकडे आल्यावर तिला
एकदम हसु आले, आणि ती
तशीच पुढे गेली. आता मात्र
नारदाला काही कळेना. साक्षात
भगवंता कडून हरी रूप मिळूनही
आपले हसू व्हावे याचे त्यांना वाईट
वाटले. त्यांनी जवळ एका जलपत्रात
स्वतःचे रूप पाहिले… आणि ते
चमकले. त्यांचे रूप माकडाचे
दिसत होते. हरी या शब्दाचा एक
अर्थ माकड असाही होतो.
भगवंतांनी त्यांना हरीरूप
मागितल्यावर सर्वकाही
माहित असूनही त्या शब्दाचा
हा अर्थ काढुन माकडाचे रूप
देऊन भर सभेत आपला
अपमान केल्याबद्दल त्यांना राग
आला. तेवढ्यात सभागृहातुन
जल्लोषाचा आवाज झाला. त्यांचे
तिकडे लक्ष गेले. श्रीमतीने ज्याच्या
गळ्यात माळ घातली ते स्वतः
भगवान विष्णूच होते. आपली
अशी फसवणुक पाहुन नारद
अत्यंत संतापले.
त्यांनी साक्षात भगवंताला शाप
दिला. “प्रभु, तुमचे तप करता करता
मी प्रत्यक्ष कामदेव समोर येऊनही
त्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही.
pouranik katha |
श्री रामाला नारद मुनींचा शाप |
Raam Katha
मी नेहमी तुमचे नाव घेत राहतो.
तरीही तुम्ही माझी एक इच्छा
पूर्ण करण्याऐवजी माझा असा
अपमान केलात. माझ्या मनात
भरलेल्या स्त्रीशी स्वतःच लग्न
केलेत. माझा तुम्हाला शाप आहे
कि एक दिवस तुम्हाला तुमच्या
पत्नीचा विरह सहन करावा लागेल
आणि ज्या प्राण्याचे रूप देऊन
तुम्ही माझा अपमान केलात….
त्या माकडालाच मदत मागावी
लागेल आणि त्याशिवाय तुमचे
कार्य पुर्ण होणार नाही. ” ते हे
बोलत असतानांच आजूबाजूचा
राजमहाल, सर्व लोक गायब झाले.
नारद, भगवान विष्णू आणि देवी
लक्ष्मी आता वैकुंठात होती. आता
पर्यंतची सगळी माया होती. हे
नारदाच्या लक्षात आले.
भगवंत म्हणाले… “हे नारदा…
तुझ्या भक्तीचा मी नेहमीच आदर
करतो. आणि माझ्या मनात
तुझ्याविषयी प्रेमच आहे. तू केलेल्या
तपाचे कौतुकही आहे. पण कामदेवाने
थोडीशी स्तुती करताच तुझ्या मनात
अहंकार उत्पन्न झाला.
तुला हे चांगलेच माहित आहे
कि मी काय आणि महादेव
काय आम्ही त्रिकालदर्शी
आहोत. आम्हाला सर्व काही
समजते. पण याचा तुला तुझ्या
अहंकारामुळे विसर पडला.
आणि तु स्वतःला महादेवांशी
तुलना झाल्यामुळे त्यांच्या
बरोबरीचा समजुन त्यांच्यासमोर
आपली प्रशंसा करण्यासाठी
गेलास.
त्यांनी मोठ्या मनाने तुझे
कौतुक केले आणि मला
हे सर्व सांगण्याची गरज
नाही हे ही सांगितले.
तरीही तु माझ्यासमोर येऊन
स्वतःची कथा सांगितलीस.
मी सुद्धा तुला यापुढे
सावधान रहा असा इशारा दिला.
पण तिथुन निघाल्यावर तु मोहात
पडलासच. कामदेवाच्या पाशात
न अडकल्याचा अभिमान बाळगलास
पण आपले ब्रह्मचर्याचे व्रत विसरून
राजकुमारीच्या मोहात पडलास आणि
मला माझ्यासारखे रूप मागण्यास
आला. एरवी मी तुला मोठ्या आनंदाने
ते बहाल केले असते, पण मला तुझ्या
मोहासाठी तुझे सहाय्य्य करून तुझे
व्रत तोडायचे नव्हते.
हि सगळी माझीच माया होती.
मी तुझी परीक्षा पाहत होतो.
पण तु मोहात पडुन या परीक्षेत
अपयशी ठरलास. ” नारदाला
आता आपली चुक समजली
आणि आपण मोहाच्या रागाच्या
भरात आपल्याच प्रभुला शाप
देऊन बसलो याची जाणीव झाली.
Moral Story In Marathi – मराठी बोधकथा
त्याने लोटांगण घालत भगवंतांची
क्षमा मागितली. भगवंतांनी
नारदाला क्षमा केली आणि
स्वतःवर संयम ठेवण्यास सांगितले.
ते आपल्या भक्तांचा नेहमी मान
राखतात. शापाच्या रूपात का
असेना पण नारदाचे शब्द भगवंतांनी
खरे केले. राम अवतारात त्यांना
सीतेचा विरह सहन करावा लागला.
तिला शोधताना त्यांना हनुमान,
सुग्रीव, अंगद आणि समस्त
वानरसेनेची फार मदत झाली.
मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी
वाटली ते कॉमेंट करून नक्की
कळवा. आवडल्यास लाईक
करायला विसरू नका.
धन्यवाद
जय हरी विष्णू
सुंदर कथा | नारद मुनींनी श्री रामाला शाप का दिला |
pouranik katha | पौराणिक कथा मराठी | राम कथा
श्री रामचंद्रप्रभू अवतार समाप्ती कथा
#मराठीकथाकथन #मराठीमोटिवेशनलस्टोरीज #मराठीबोधकथा
#मराठीकथा #हृदयस्पर्शीकथा #मराठीगोष्टी #Marathimotivationalstories #Realstories #moralstories #hearttouchingstories #Marathistories #lessonablestories #emotionalstory #suvichar #marathikathasarita
Just wish to say your article is as surprising The clearness in your post is just cool and i could assume youre an expert on this subject Fine with your permission allow me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please keep up the enjoyable work
I was just as enthralled by your work as I was by yours! The visual display is polished, and the text content is of high quality. However, you appear to be concerned about presenting something the audience may believe is questionable. I believe that you will be able to correct this difficulty immediately.
Hey, I’m Jack. Your blog is a game-changer! The content is insightful, well-researched, and always relevant. Great job!