10 Signs Of Selfish People,
स्वार्थी लोकांची 10 लक्षणे
नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts मध्ये आपले स्वागत आहे.
मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात.
काही लोक तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात. अगदी कोणतीही
अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतात. असे लोक ज्यांच्या
आयुष्यात येतात त्यांचे जीवन ही खूप सुंदर असते.
मात्र बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असेही काही लोक येत असतात
कि जे केवळ स्वतःचा विचार करीत असतात. हे लोक स्वार्थी असतात….
मतलबी असतात…. मात्र आपण त्यांना ओळखण्यात कमी पडतो. आणि
मग हे असे लोक आपले आयुष्य उध्वस्त करतात…. रसहीन करून टाकतात
आपल्या आयुष्याला कोणताही महत्त्व शिल्लक ठेवत नाही.
मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की मतलबी लोकांपासून
दूर राहायला हवे. मात्र समोरची व्यक्ती मतलबी आहे की नाही
हे ओळखायचे तरी कसे…..? मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे.
आज मी आपल्याला अशी चिन्ह सांगणार आहोत की ज्यावरून तुम्ही संपूर्ण
समोरच्या व्यक्तीची पारख करू शकता. ती व्यक्ती खरोखर तुमच्यावर
निस्वार्थ प्रेम करते की मतलबी आहे हे तुम्हाला ओळखता येईल.
10 Signs Of Selfish People,
स्वार्थी लोकांची 10 लक्षणे
स्वार्थी लोकांची लक्षणे – पहिली गोष्ट
जी व्यक्ती बोलते एक आणि करते वेगळे, त्याच्या बोलण्यामध्ये आणि
कृतीमध्ये फरक असतो. अशी व्यक्ती ही स्वार्थी व्यक्ती असते.
ती तुम्हाला तोंडावरती हो म्हणते पण ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करण्याची
वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल अशा व्यक्तीवर
विश्वास ठेवू नका. ही व्यक्ती शंभर टक्के स्वार्थी आहे.
स्वार्थी लोकांची लक्षणे – नंबर दोन
ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीला गरज पडेल त्या त्या वेळी तुमच्या जवळ येईल
तुमच्याशी गोड गोड बोलू लागेल. थोडक्यात काय तर तुमचा वापर करणार
आहे. आणि जेव्हा त्याची गरज संपेल तेव्हा ते तुम्हाला बोलणार सुद्धा नाही.
तुमच्या जवळून सुद्धा जाणार नाही. लक्षात ठेवा अशी व्यक्ती सुद्धा मतलबी
व्यक्तीच आहे.
स्वार्थी लोकांची लक्षणे – नंबर तीन
ही व्यक्ती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वचन देईल, आश्वासने करेल. साथ
देण्याचा विश्वास देईल…..! मात्र कोणताही वचन, कोणतीही जे तुम्हाला
ज्याची सगळ्यात जास्त गरज असेल. तुम्ही काहीतरी अडचणीत येता,
प्रॉब्लेम मध्ये येता, तुम्हाला त्या व्यक्तीची सगळ्यात जास्त गरज असते….
तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाहीत. तुमच्या पासून लांब जातात.
गायब होतात. कारण त्यांना माहित असते, की तुम्ही अडचणीत आहात
आणि आता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करायची आहे
आणि या व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगतात त्या व्यक्ती तुमचीच काय….
इतर कुणाचीही मदत कधीच करत नाही. आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती
केवळ गरजेला तुमच्या जवळ येते तेव्हा त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवण्यात कोणताही
अर्थ नसतो.
10 Signs Of Selfish People
स्वार्थी लोकांची लक्षणे – सहावी गोष्ट
या व्यक्ती प्लॅन बनवतात, योजना बनवतात…. मात्र ऐनवेळी या योजना स्वतःच
कॅन्सल करतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतील की आपण आठवड्यामध्ये
या या ठिकाणी फिरायला जाऊ, असे असे काम करू, असा काहीतरी प्लॅन
बनवतात… मात्र ऐनवेळी स्वतःच तो प्लॅन कॅन्सल करून टाकतात.
अशा व्यक्तींपासून सावध रहा.
स्वार्थी लोकांची लक्षणे – सातवी गोष्ट
अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्याच्या दिखावा करत असतात.
त्या असे दाखवतात जणू काही मी सर्वांना खुश ठेवतो. अशा प्रकारचा
दिखावा करणाऱ्या व्यक्ती या स्वार्थी असतात.
स्वार्थी लोकांची लक्षणे – नंबर आठ
या व्यक्ती सतत लोकांचे ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यांना वाटते की प्रत्येक लोकांनी त्यांच्याकडे पहावे…. त्यांच्या विषयी बोलावे….
स्वतःकडे ध्यान आकर्षित…. लक्ष आकर्षित करायचा सातत्याने जर ते प्रयत्न
करत असतील तर अशा व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात. जर तुमच्या जीवनात
अशा व्यक्ती असतील, तर आजच त्यांच्यापासून तुम्ही दूर जायला हवे.
स्वार्थी लोकांची लक्षणे – नववी गोष्ट
ज्या व्यक्ती जे काही करतात फक्त स्वतःसाठीच करत असतील आणि त्यामध्ये
दुसऱ्याचा येत किंचितही विचार करत नसतील, तर समजून जा की या व्यक्ती
स्वार्थी आहेत. त्या दाखवतील असा की ते तुमचा विचार करीत आहेत. मात्र त्या
विचारांमध्ये केवळ त्यांचे स्वतःचे भले असते. त्यामध्ये तुमचे कोणतेही भले होणार
नसते. आणि म्हणून हे आपण जाणून घ्यायला हवे. आणि मित्रांनो शेवटची
दहावी गोष्ट फार महत्त्वाची आहे, की ह्या व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच
तुमच्याशी मित्रता करतात अथवा नाते जोडतात.
10 Signs Of Selfish People
ह्या दहा गोष्टी तुम्हाला सांगितल्या की यावरून तुम्ही मतलबी लोकांची, स्वार्थी लोकांची
ओळख करून घेऊ शकता. त्यांना ओळखू शकता.
मित्रांनो जर अश्या मतलबी व्यक्ती तुमच्या जीवनात येतील तर
या व्यक्ती तुमच्या संपूर्ण जीवनाचा विनाश करून टाकतील.
तुमच्या जीवनातला सगळा रस या व्यक्ती शोषून
घेतील. अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहणेच योग्य.
मित्रांनो post आवडला असेल… लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना पाठवा.
धन्यवाद
10 Signs Of Selfish People,
स्वार्थी लोकांची 10 लक्षणे
************************************
नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship | नाती
नमस्कार मित्रांनो,
माझ्या वाचनात आलेला एक चांगला मेसेज
तुमच्या सोबत शेयर करीत आहे.
कोणा चा आहे माहित नाही चांगला आहे
म्हणून शेयर करीत आहे.
चूक कबूल करणे हे अशक्तपणाचे लक्षण आहे का…?
एक नविन शिक्षक एका वर्गामध्ये वाचन करणे
का महत्वाचे असते, यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करत असतात.
हे सांगत असतांना ते चालता चालता एका विद्यार्थ्याजवळ
येऊन थांबले. आणि त्या विद्यार्थ्याला उभे राहण्यास सांगितले.
तो विद्यार्थी उभा राहताच त्याला पुस्तक दिले
आणि संपूर्ण वर्गाला ऐकू येईल असे वाचण्यास
सांगितले.
विद्यार्थी वाचायला सुरु करेल इतक्यात ते शिक्षक त्याला ओरडले
“अक्कल आहे का तुला, कळत नाही का….?
पुस्तक उजव्या हातात धरावे.” हे ऐकताच तो विद्यार्थी अस्वस्थ झाला.
त्याला खूप वाईट वाटले.
अचानक पूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांची खाली झुकलेली मान वर झाली
आणि एकटक नजरेने शिक्षकाकडे पाहू लागली.
शिक्षकाला कळले नाही काय झाले. विद्यार्थी नजरेतून शिक्षकांना
काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण शिक्षकाला वाटले
ते आपला अपमान करत आहेत म्हणून ते अजून रागावले….
वर्गात मोठ्याने ओरडले.
तेवढ्यात वाचनासाठी उभा झालेला विद्यार्थी
त्याच्या उजव्या हाताकडे पाहून गहिवरून गेला.
हे शिक्षकाने पाहिले.
ते लगेच त्या विद्यार्थ्याजवळ आले आणि त्याचा
उजवा हाथ धरला पण त्यांच्या हातात फक्त
उजव्या हाताचा कापड लागला.
त्यांना कळून चुकले होते…. त्याचा उजवा हात
नाही आहे. हे कळताच शिक्षकाला त्यांच्या
भावनांशी संघर्ष करावा लागला.
त्यांना कळेना काय करावे. त्यांच्याकडून चुक
झाली हे यांना कळले होते. विद्यार्थी एकही शब्द
न बोलता मान खाली घालून जागेवर उभा होता.
शिक्षक त्याच्या जवळ गेला, त्या विद्यार्थ्याला आलिंगन दिले
आणि म्हणाला “मला माफ कर, मला याबद्दल माहित नव्हते“
शिक्षकाने त्या विद्यार्थ्यांची माफी मागितली.
संपुर्ण वर्गाने हे दृश्य पहिले. अत्यंत रागीट आणि
न आवडता शिक्षक या एका प्रसंगात असा वागेल
यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता.
आपल्या हातून कळत नकळत चुका घडतात त्यावेळी
माफी मागण्यात काहीच हरकत नाही. माफी मागितले
म्हणून आपण अशक्त होता असे नाही, उलट माफी
मागितली याचा अर्थ तुमच्यात नम्रता, परिपक्वता
आणि धैर्य आहे.
काही लोकांना कमीपणा वाटतो पण हा कमीपणा नाही.
आपली कबुली हि मानवी संबंध जपण्याची गुरुकिल्ली आहे.
चूक कबूल करणे हे अशक्तपणाचे लक्षण आहे का…?
Good thoughts in marathi | Sunder Vichar,
मराठी प्रेरणादायक विचार | छान विचार मराठी
मानवी संबंध जपण्याची गुरूकिल्ली
Relationship Thoughts In Marathi | नाती टिकवण्यासाठी हे करा