Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल | Suvichar Status
दृष्टिकोन बदला जीवन बदलेल
जर आपण नाटक बघायला गेलो तर….. पुढची सीट मागतो
आणि जर सिनेमा पाहायला गेलो तर मागची सीट मागतो.
मित्रांनो तुमचे जगातले स्थान असेच सापेक्ष असते.
ते अविचल कधीच नसते.
साबण बनविण्या करीता तेल हा अत्यंत आवश्यक घटक असतो
आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो हा विरोधाभास आहे.
या जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात…..
एक तर वेडी माणसे आणि दुसरे म्हणजे लहान मुले.
चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की
लहान मुलांसारखे त्याच्या भरपूर आनंद घ्या…
जगण्याच्या आनंद घ्या…. आयुष्य खूप सुंदर आहे…
फक्त तसे जगायला हवे.
काचेला पारा लावला की आरसा तयार होतो.
परंतु लोकांना आरसा दाखविला की त्यांचा
पारा चढतो.
आरसा तोच असतो….! फक्त त्यात हसत पाहिले की
आपण आनंदी दिसतो आणि रडत पाहिले की
आपण दुःखी दिसतो.
तसेच…. जीवनही तेच असते. फक्त त्याच्याकडे
आपला पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला आनंदी
अथवा दुःखी बनवतो. म्हणून दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
दृष्टिकोन बदला जीवन बदलेल
Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल
Good Thoughts In Marathi On Life | छान विचार
Suvichar
खरे सौंदर्य हे व्यक्तीच्या डोळ्यात असते
आणि बोलके डोळे हे तर सौंदर्याचे खरे
अलंकार असतात.
धुक्यात एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते की….
जर आयुष्यात रस्ता दिसत नसेल तर
दुरचे पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते.
फक्त एक एक पाऊल टाकत चला…
रस्ता आपोआपच मोकळा होत जाईल.
शांतता आणि हास्य ही दोन
सामर्थ्यवान साधने आहेत.
हसणे हे बऱ्याच समस्यांचे
निराकरण करण्याच्या मार्ग आहे
आणि शांतता बऱ्याच समस्या
टाळण्याचा मार्ग आहे.
जिथे इतरांना समजावून घेणे
कठीण असते…. तेव्हा स्वतःच
समजून जाणे चांगले असते.
भेटलेली माणसे
चांगली असोत किंवा वाईट
अनुभव मात्र नक्की देऊन जातात.
तुलना करायचीच असेल ना
तर तुमच्या कालच्या आणि आजच्या
दिवसा सोबत करा. ती तुम्हाला
नक्कीच पुढे नेईल आणि यशस्वी बनवेल.
नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण….
अजूनही काही प्रश्न आहेत….
ज्यांची उत्तरे गुगल वर सापडत नाही.
विश्वास ठेवा देवाची योजना सर्वोत्तम असते
कधीकधी प्रसंग कठीण असतात….
तेव्हा शांतपणे परमेश्वर तुमच्यासाठी
काहीतरी करत असतो.
स्वतःला कधी कुणा पेक्षा कमी समजू नका
आणि कुणा पेक्षा श्रेष्ठ ही समजू नका.
कारण स्वतःला कमी समजल्याने
आत्मविश्वास कमी होतो आणि
श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो.
Suvichar status In Marathi || Marathi Suvichar
आयुष्याला संजीवनी देणारे स्टेटस || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
Sunder Vichar | दृष्टिकोन बदला जीवन बदलेल | Suvichar Status
मी आहे ना….!
Everything Is Fine
आपल्या जीवनात आलेली माणसे
ही काही उगाच आलेली नसतात….
प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते.
कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.
नाहीतर एकशे तीस करोड लोकसंख्येच्या देशात
नेमक्या याच माणसा सोबत आपली ओळख का होते….?
याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही…..
जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी…..
आपल्याला जगण्यासाठी ज्या प्राणवायूची
गरज असते ना… तो प्राणवायू म्हणजेच ही
आपली माणसे…..
रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो…. पण
आपलेपणाच्या नात्यात तसे नसते…..
Its Mutual Relation….
मन जुडले की आपलेपणाचे नाते तयार होते……
जे बंध खूप स्ट्रोंग असतात ते कोणाच्याही
सांगण्याने अथवा विपरीत परिस्थितीत
कधी तुटत नाहीत….
आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असतांना
मित्राची किंवा मैत्रिणीची मी आहे ना एवढे शब्द
संजीवनी सारखे काम करतात.
अगदी प्रत्यक्ष नाही परंतु अप्रत्यक्ष सोबत असणे
खूप सकारात्मक ऊर्जा देणारे असते.
पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे आहे हो
नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण…..
Keep In Touch….
Most Motivational Sunder Vichar | मी आहे ना..! Everything Is Fine
Good Thoughts In Marathi
125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी