Home Blog Page 23

नाती कशी जपावी, नात्यांवर सुंदर विचार | Relationship Thought

2
नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life
नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life

आयुष्यातील नात्यांवर सुंदर विचार | Relationship Thoughts Marathi

पोट कसेही भरता येऊ शकते. पण… काळीज भरायला
माणसाजवळ माणुस असावा लागतो…!

नाती….! भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली अगदी लहान रेषा
एखाद्या वेळी शांत बसून जीवनात येऊन गेलेल्या आणि विसरलेल्या नात्यांचा
मनातून विचार केला तर लक्षात येते की… भरपूर लोकं… ज्यांच्यामुळे आपले
मन दुखले म्हणून आपण ज्यांना आपल्या जीवनातून कमी केले होते,
पण… ते अनेकदा समर्थनीय नव्हतेच…!

त्याने आपल्या भावना दुखावल्या असे म्हणत… आपण आपल्या अहंकाराला
विनाकारणच सांभाळत बसलो आणि आपल्या जीवनातील सोन्यासारखी
माणसे आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली.

त्यांचा एखादा न आवडलेला व्यवहार… हा आपण जणू काही जन्म-मरणाचा
प्रश्न बनवून दिला. आणि या अहंकाराने नात्याचा केव्हा बळी घेतला हे
कळलेच नाही.

शेवटी नाजूक नात्यांना अहंकाराची नाही, तर प्रेमाची… आपुलकीच्या
ओलाव्याचीच गरज असते.

जीवनात आपण जसे जसे शहाणे होत जातो तसे तसे आपल्या लक्षात येते की…
भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली अगदी लहान रेषा योग्य वेळी
जाणूनच आपण वागायला हवे होते…!

भावना हि क्षमा करणारी असते पण अहंकार मात्र एका घावात दोन तुकडे
करून मोकळा होतो. आपण खूप वेळा भावना दुखावल्या म्हणत नात्यात
दुरावा निर्माण करतो. पण वास्तविकत आपला अहंकार दुखावलेला असतो.

जसे एखादी आनंदाची बातमी असेल आणि त्याने जर का ती आपल्याला
उशिरा दिली तरीही आपल्याला दुःख होतोच आणि या दुःखा पायी आपण
साधे त्यांचे अभिनंदनही करत नाही आणि हे जीवनात खुपदा घडतेच…!

जीवन जगणे म्हणजे फक्त श्वास घेणे आणि सोडणे नसते…
तर त्या जगण्यालाही स्वतःचे असे वेगळे रूप आणि अस्तित्व असते….

नाती….! भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली अगदी लहान रेषा 

कुणाचेच कुणावाचून काहीच अडत नाही…. हे जरी खरे असले तरीही
जीवनात आलेली चांगली लोकं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुर जातात
तेव्हा मात्र जर ती लोकं आपल्या जीवनात असली असती तर
आपले जगणे आणखीनच सुंदर आणि अर्थपूर्ण झाले असते…
असे मात्र आपल्याला नक्कीच वाटून जाते…!

ह्या क्षणभंगुर जीवनाचे लाड पुरवतांना आपल्या जगण्याची पातळी आपण
सांभाळायला हवी आणि म्हणूनच हे जगणे सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या
चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणे आणि अहंकारामुळे त्यांना
न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावे असे मनापासून वाटते…!

खुपदा तर आपण समोरील व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ आपण आपल्या मतानुसार
काढुन घेतो… पण तसा विचार समोरच्याचा नसतोच… तो सहज आपले म्हणून
वागत असतो… परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आपल्या जीवनातून
सहजच काढून टाकतो…

आणि गंमत म्हणजे आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही…
म्हणून…… कुणाची कितीही मोठी चुक असली तरी ती जीवनापेक्षा… नात्यापेक्षा मोठी
तर निश्चितच नाही …! बघा पटतंय… का…?

नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life
नाती-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life

नाती आणि बर्फाचे गोळे
एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणे सोपे….
पण टिकवणे खूप
अवघड असते.
दोघांना वाचण्यासाठी
फक्त एकच उपाय…
कायम शीतलता ठेवा.

चला पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी

0
चला पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी
चला पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी

चला, पुन्हा जुना खेळ खेळू | टाईम प्लीज | Sunder Vichar मराठी

चला… पुन्हा जुना खेळ खेळू… 

काही म्हणा… परंतु लहानपणीच्या खेळांमधला
जो टाईम प्लीज नावाचा प्रकार होता ना…
तो म्हणजे आपल्याला खूपच आवडायचा.

वरवर पळवाट म्हणून वापरले जाणारे हे तंत्र…
वेळ आली तर… आपल्या आवडत्यावर
राज्य आले की… त्याला मदत करणारी
एक आधार तंत्र पण व्हायची…!

जर धावता धावता दम लागला तर पाठीवर
धप्पा पडायच्या आत… टाईम प्लीज…!

किती सहज आणि सोपा रस्ता होता ना, निसटून जाण्यासाठी…!
ते पण समोरच्याच्या डोळ्यासमोर… परंतु तरीही खेळातून
कधी आपण वगळले गेलो नाही…!
( आणि गंमत म्हणजे टाईम प्लीज म्हणतांना थुंकी लावून
पालथ्या तळव्यावर म्हणावे लागायचे… परंतु
आज पर्यंत त्यामागचे तर्क काही कळले नाही…! )

एकंदरीत खेळ किंवा वेळ कोणतीही असो
टाईम प्लीज ला कोणीही कधी अडवले नाही…!

चला पुन्हा जुना खेळ खेळू

आता हळू हळू मोठे झालो… खेळ बदलले आणि वेळ ही…
वेळेची कधीही पर्वा ना करणारे खेळ… आज पैशाच्या
आणि वेळेच्या मागे धावण्याचे झाले आहेत…!
आणि टाईम प्लीज ची ओळख देणारी
मात्रा आज मात्र हरवून बसलो.

धावायचे किती… थांबायचे कुठे आता हे सगळे
आता आपल्या हातात राहीलेले नाही…!
असे जीव जडलेले खेळ मागे पडून
ते जीवघेणे कधी झाले हे ही कळलेच नाही.

चला पुन्हा जुना खेळ खेळू

शरीर…. मन… आत्मा… सगळीकडे तीच धावाधाव.
शरीराचा मनाशी… मनाचा शरीराशी आणि त्यात
भर म्हणून आत्मा तर मग आहेच…!
यांचा नुसताच लागोपाठ लपंडाव सुरू आहे…!

अंधार आता अंधार वाटत नाही…! उजेडात काही दिसत नाही…
आणि वाट्याला येते ते फक्त पडणेच…!

कधी जमिनीवर पडतो तर कधी पडल्या जातो…!
आणि अगदी थकल्या भागल्या आवाजात म्हणावेसे वाटते…
टाईम प्लीज…! टाईम प्लीज…!

पण ते आज शक्य नसते… आणि आता ते कधीच शक्य नसते…!
खरोकर शक्य नसते…? मन पुन्हा पुन्हा विचारते…
खरोकर शक्य नसते…?

चला पुन्हा जुना खेळ खेळू

मित्रा….
आपल्या कामातून थोडा वेळ काढून जरा स्वतः कडे बघूया…
कुठे आलो आहोत आपण…? नक्की काय करत आहो आपण…?
जे आपल्याला हवे आहे… ते करत आहो की…
फक्त… आपली गरज भागवत आहेत जगण्याची…!
चला… पुन्हा जुना खेळ खेळू…
टाइम प्लीज…. एकदा म्हणून तर बघू…!

बुद्धिमान राजा | हिंदी प्रेरणादायक कहानी | Hindi Story | कथा

0
बुद्धिमान-राजा-हिंदी-प्रेरणादायक-कहानी-hindi-motivational-story-सुंदर विचार
बुद्धिमान-राजा-हिंदी-प्रेरणादायक-कहानी-hindi-motivational-story-सुंदर विचार

बुद्धिमान राजा | हिंदी-प्रेरणादायक कहानी | Hindi Story | कथा

एक राज्य का यह नियम था की… वहा की प्रजा एक वर्ष के बाद अपने
राजा को बदल लेते थे.
जिस दिन राजा का एक वर्ष पूर्ण हो रहा हो उस दिन
उस राज्य की राजधानी वाले शहर में जो भी व्यक्ति सबसे पहले आता था…
उसे ही वहां की प्रजा नया राजा घोषित कर देती थी…!

जो व्यक्ति एक साल तक राजा रहा है, उसे उसी राज्य के घने जंगल के
बिच में छोड़ दिया जाता था. जहाँ पर कई सारे खूंखार जानवर थे.
वह व्यक्ति किसी प्रकार खूंखार जानवरों से बच भी गया तो….
भूक प्यास से उसका मरना तय था…!
इस तरह से तो ना जाने कितने ही राजा ऐसे ही एक साल तक
राज करने के बाद जंगल में जाकर मर गए थे.

इसी नियम नुसार एक बार शहर में एक युवा किसी दूसरे राज्य से आया.
वह युवा इस राज्य के नियम से बिलकुल ही अंजान था. प्रजा ने आगे बढ़ कर
उसे शुभकामनाएं दीं और उसे बताया कि… आपको इस राज्य का नया राजा
राजा बनाने का विचार यहां की प्रजा द्वारा लिया गया है.

नए राजा को बड़े ही शान और के साथ राजमहल में ले जाया गया.
वह युवा आश्चर्यचकित भी था और प्रसन्न भी. सिंहासन पर बैठते ही
युवक ने पूछा कि अभी वह राजा कहाँ है…?
जो मुझसे पहले इस राज्य के राजा थे…!

बुद्धिमान राजा | हिंदी-प्रेरणादायक कहानी

राज दरबार के दरबारियों ने युवक को अपने राज्य का नियम बताया कि
किस प्रकार से पुराने राजा को जंगल में छोड़ कर ही नए राजा का चुनाव
किया जाता है.

राज्य के नियम को सुनकर तो युवक थोड़ी देर के लिए परेशान हुआ…
परन्तु कुछ देर सोचने के बाद उसने कहा की…
आप लोग मुझे वह स्थान दिखावो… जहां पर तुम लोग
एक वर्ष के बाद अपने राजा को छोड़कर आते हो.

दरबारियों ने अपने साथ कुछ सिपाहियों को साथ में लिया और
नए राजा को वह स्थान दिखाने के लिए जंगल में ले गए. नए राजा ने
अच्छी तरह उस स्थान को और आस पास की जगह को देखा और वापस
अपने राजमहल में आ गया.

नए राजा ने अपना सबसे पहला आदेश जारी किया कि… मेरे राजमहल से
जंगल तक एक अच्छी सड़क बनाई जाए. और जंगल के मध्यभाग में एक सुंदर
राजमहल बनाया जाए. और उस राजमहल में सभी तरह की सुविधा उपलब्ध हो.
राजमहल के बाहर में सुंदर बगीचा बनाया जाए.
राजा के आदेश का पालन किया गया. कुछ ही महीनों के अंदर जंगल में सड़क
और एक राजमहल बनकर तैयार हो गया.

एक वर्ष पूरा होते ही, राजा ने दरबारियों से कहा कि… तुम लोग अपने राज्य के
नियम का पालन करो और मुझे वहां छोड़ आओ… जहां एक वर्ष पूरा होने पर
राजाओ को छोड़ आते हो.

इस पर दरबारियों ने जवाब में कहा की, महाराज… अब से यह नियम
बंद हो गया है…! क्योंकि, अब हमारे राज्य को एक अच्छा बुद्धिमान
राजा मिल गया है.

बुद्धिमान राजा | हिंदी-प्रेरणादायक कहानी

वहां तो हम उन बेवक़ूफ राजाओं को छोड़कर आते थे, जो एक वर्ष की राज शाही के
आनंद में बाक़ी के जीवन को भूल जाते. राजमहल के जीवन के बाद के जीवन के लिए
कोई व्यवस्था नहीं करते थे. जबकि उन्हें भी पता था कि उनको एक वर्ष के बाद यह
सब छोड़ना हि पड़ेगा.

परंतु महाराज… आपने अपने बुद्धि का इस्तेमाल करके और आगे की व्यवस्था
कर ली है… इस राज्य को ऐसे ही बुद्धिमान राजा की तलाश थी.

जीवन का चक्र भी ऐसा ही है. जो आया है… उसे यह ज्ञात है कि उसे भी एक
दिन चले जाना है. जो सिर्फ इस लोक के वैभव में फंसे रहते हैं उनकी अवस्था
बाकी राजाओं के जैसी होती है.

जो इस लोक औऱ परलोक दोनों का विचार करते हैं… वो इस संकट से
निकल जाते हैं.

परलोक सुधारना है तो अच्छे कर्म करिए. अपने सारे कर्म प्रभु को समर्पित करें.
जमा-खाता रखिए और याद करते रहिए कि… आपके अच्छे कर्म ज्यादा जमा
हुए हैं या बुरे कर्म…! क्योंकि गति उसके अनुरूप ही होगी.

धन्यवाद

 

।। गृहस्थ गीता के अनमोल वचन ।। चार चीजों का जीवन में महत्व

0
गृहस्थ-गीता-के-अनमोल-वचन-सुंदर-विचार-ganesh-ganpathi-bhagwan
गृहस्थ-गीता-के-अनमोल-वचन-सुंदर-विचार-ganesh-ganpathi-bhagwan

।। गृहस्थ गीता के अनमोल वचन ।।
   चार चीजों का जीवन में महत्व

गृहस्थ गीता के अनमोल वचन

🔥 यह चार चीजें पहले कमजोर दिखती है…
लेकिन ध्यान ना देने पर… आगे बड़ी हो जाती है
और दुःख का कारण भी बनती है…
    अग्नि, रोग, ऋण और पाप…!

🙏 इन चार चीजो का नित्य सेवन करते रहना चाहिए…
     सत्संग, संतोष, दान और दया…!

🙏 इन चार अवस्थाओ में आदमी अक्सर बिगड़ जाता है…
     जवानी, धन, अधिकार और अविवेक…!

🙏 यह चार चीजे मानव को बड़े ही किस्मत से मिलते है…
ईश्वर को याद रखने का झुकाव… संतजनों की संगत…
    चरित्र में निर्मलता… और उदारता…!

🙏 यह चार गुण बहुत ही दुर्लभ है…
    धन में पवित्रता…. दान में विनय…. वीरता में दया…
    और अधिकार में निराभिमानता…!

🙏 इन चार चीजो पर भरोसा कभी मत करो…
    बगैर जीता हुआ मन… शत्रु का अपनापन….
    स्वार्थी व्यक्ति की चाटुकारिता….
    और बाजारू ज्योतिषियों की भविष्यवाणी…!

🙏 चार चीजो पर हमेशा विश्वास रखो…
    सत्य… पुरुषार्थ… स्वार्थहीन…. और मित्र…!

🙏 यह चार चीजे एक बार निकल गई तो
फिर वापस लौटकर नहीं आती…
   मुह से निकली हुई बात…. बाण से निकला तीर….
   बीत गई हुई उम्र… और मरा हुआ ज्ञान…!

🙏 इन चार बातों को हमेशा याद रखे…
    दूसरे के द्वारा अपने ऊपर किया गया उपकार….
    अपने द्वारा दूसरे पर किया गया अपकार… मृत्यु और भगवान…!

🙏 इन चार के संगत से हमेशा बचने की कोशिश करे…
    नास्तिक… अन्याय का धन…. परायी नारी और परनिन्दा…!

🙏इन चार चीजो पर इंसान का बस नहीं चलता…
   जीवन… मरण… यश… और अपयश…!

🙏 इन चार का परिचय चार अवस्थाओं में मिलता है…
    गरीबी में मित्र का…. दरिद्रता में पत्नी का… युद्ध में शूरवीर का….
    और बदनामी में भाई-बन्धुओं का…!

🙏 इन चार बातों में मानव का कल्याण है…
    वाणी के सयंम में… कम सोने में…. कम खाने में…. और
    एकांत के भगवत स्मरण में…!

🙏 शुद्ध साधना के लिए इन चार बातो का पालन आवश्यक है…
    भूख से कम खाना… लोक प्रतिष्ठा का त्याग….. गरीबी का स्वीकार….
    और प्रभु की इच्छा में ही संतोष…!

गृहस्थ गीता के अनमोल वचन

🙏 चार प्रकार के मनुष्य होते है…
(१) मक्खीचूस – ना ही खुद खाय और ना ही दुसरो को दे…!
(२) कंजूस – खुद तो खाय लेकिन दुसरो को ना दे…!
(३) उदार – खुद भी खाये और दूसरे को भी दे…!
(४) दाता – खुद ना खाए, परन्तु दूसरे को दे…!
अगर सभी लोग दाता नहीं बन सकते…
तो कम से कम उदार तो जरूर बनना ही चाहिए…!

🙏 मन के चार प्रकार है…
धर्म से विमुख मानव का मन मुर्दा है… पापी का मन रोगी है…..
लोभी और स्वार्थी का मन आलसी है… और
भजन साधना में तत्पर का मन स्वस्थ है…!
जय श्री राम

 

Nirjala Ekadashi | एकादशी | निर्जला एकादशी, व्रत, कथा, महत्व

2
Nirjala-ekadashi-निर्जला-एकादशी-व्रत-कथा-महत्व-विष्णु-भगवान-धर्म

Nirjala Ekadashi | एकादशी
निर्जला एकादशी, व्रत, कथा, महत्व

निर्जला एकादशी

हिन्दू धर्म में एकादशी व्रत का महत्व सिर्फ धार्मिक ही नहीं है बल्कि यह व्रत शारीरिक
और मानसिक स्वास्थ्य के लिए भी से भी काफी महत्त्वपूर्ण है.

एकादशी का व्रत बहुत महत्वपूर्ण स्थान रखता है. पूर्ण वर्ष में चौबीस एकादशियां होती हैं.
जिस वर्ष अधिकमास या मलमास होता है… उस वर्ष में दो एकादशी बढ़कर 26 एकादशी
हो जाती है. इन्हीं एकादशी में से एक ज्येष्ठ मास की शुक्ल पक्ष की एकादशी को
निर्जला एकादशी कहते है.

सभी एकादशियों में से यह एकादशी सर्वोत्तम मानी गई है.
इस व्रत में पानी पिना मना है, इसिलिये इसे निर्जला एकादशी कहते हैं.

निर्जला एकादशी व्रत की मान्यता है की, इस एकादशी का व्रत रखने से सभी एकादशियों
के व्रतों के फल की प्राप्ति सहज ही हो जाती है. यह व्रत स्त्री और पुरुष दोनों को ही करना
चाहिए. एकादशी का व्रत भगवान विष्णु की आराधना को समर्पित होता है. इस एकादशी
का व्रत करके श्रद्धा और सामर्थ्य के अनुसार दान करना चाहिए.

इस प्रकार जो इस पवित्र एकादशी का व्रत करता है, वह समस्त पापों से मुक्त हो जाता है.

एकादशी व्रत कथा

एक बार पांचो पांडव महर्षि व्यासजी के मुख से सभी एकादशी को निराहार रहने का नियम
सुन रहे थे. इसपर भीम ने बड़े ही विनम्र भाव से कहा की गुरुवर…! मै भूक बर्दास्त नहीं
करा सकता और भोजन भी मै अधिक मात्र में ही ग्रहण करता हु.
मुझसे किसी भी प्रकार व्रत नही किया जाता, दिन भर बड़ी तीव्र भूक बनी ही रहती है.
इसीलिए आप से विनती है की, आप कोई ऐसा उपाय या कोई व्रत बताएं जिसके करने
से ही सभी व्रत के फल मिल जाये.

महर्षि व्यास जी भलीभांति जानते थे कि भीमसेन के उदर में वृक नामक अग्नि है,
इसीलिए अधिक मात्रा में भोजन करने पर भी भीम की भूख शांत नहीं होती.
उस पर व्यासजी ने कहा की, भीम, तुमसे वर्षभर की सभी एकादशी तो नहीं हो सकती,
इसलिए तुम सिर्फ एक निर्जला एकादशी ही कर लो, इस एक एकादशी के व्रत से वर्षभर
की सभी एकादशी करने जैसा फल मिल जायेगा. और भीम ने ऐसा ही किया और उन्हें
स्वर्ग की प्राप्ति हुई.
इसलिए इस एकादशी को भीमसेनी एकादशी या पांडव एकादशी भी कहते है.

निर्जला एकादशी का महत्व

निर्जला यानि यह व्रत बिना पानी पिए और उपवास रखकर किया जाता है. इसलिए यह व्रत
कठिन तप और साधना के समान महत्त्व रखता है. वर्ष में सिर्फ निर्जला एकादशी का व्रत कर
लेने से अधिकमास की दो एकादशियों सहित वर्ष की सभी 25 एकादशी व्रत का फल मिलता
है. जहाँ वर्ष भर की दूसरी एकादशी के व्रत में कुछ खाने की सख्ती का महत्त्व है…
वहीं निर्जला एकादशी के दिन कुछ खाने के साथ साथ ही पानी की भी सख्ती बहुत ज़रूरी
है. इस व्रत में पानी नहीं पीते है यानि निर्जल रहकर व्रत का पालन किया जाता है. यह व्रत
मन को संयमित बनाता है और शरीर को नई ऊर्जा देता है. इस व्रत को महिला और पुरुष
दोनों ही कर सकते है.

व्रत विधान

१) इस दिन पवित्रीकरण के समय जल आचमन के अलावा अगले दिन सूर्योदय तक पानी
नहीं पिया जाता. इसलिए यह व्रत अत्यधिक श्रम साध्य होने के साथ−साथ कष्ट और
संयम साध्य भी है.

२) इस दिन निर्जल व्रत करते हुए श्री भगवान विष्णु की आराधना का विशेष महत्व है.
इस एकादशी का व्रत करके यथासंभव अन्न, वस्त्र, छतरी, जूता, पंखी तथा फल आदि का
दान करना चाहिए. इस दिन जल कलश का दान करने वालों को वर्ष भर की
एकादशियों का फल, लाभ प्राप्त हो जाता है.

३) कोशिश करे की दिनभर मौन रहे, बोलना आवश्यक हो तो कम और धीरे बोले.

४) ब्रह्मचर्य का पालन करें.

५) झूठ ना बोलें, गुस्सा और विवाद ना करें.

हरी ॐ
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi | Bodh Katha

4
मराठी बोधकथा संग्रह - Moral Story In Marathi Bodh Katha
मराठी बोधकथा संग्रह - Moral Story In Marathi Bodh Katha

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi
Bodh Katha

नानकजीचा आशीर्वाद

गुरुनानक जी एकदा चालता – चालता एका गावात गेले…
त्या गावातील गावकऱ्यांनी गुरुनानकजी यांना गावातून हाकलून दिले आणि
त्यांचा अपमानही केला…
एवढे वाईट करूनही नानकजींनी त्या गावकऱ्यांना आशीर्वाद दिला की…
आपल्या गावातील ही एकता सदैव अशीच कायम राहो…!

तिथून निघाल्यावर गुरुनानक जी पुढे रस्त्यात आलेल्या दुसऱ्या गावात गेले…
त्या गावातील गावकऱ्यांनी गुरुनानकजी यांचा खूप आदर सत्कार केला….
प्रत्येक गावकरीने आपुलकीने विचारपूस केली… तसेच गावात मुक्काम करण्याचा
आग्रही धरला…

नानक जी गावात थांबले आणि रात्रीला प्रवचन ही केला… जो पर्यंत नानक जी थांबले…
तो पर्यंत त्यांची गावकऱ्यांनी खूप सेवा केली… शेवटी गावातून निरोप घेतांना नानक जी
आशीर्वाद रूपाने म्हणाले…

तुमच्या गावाचा पूर्णपणे नाश होवो… तुमचं वाटोळे होवोत… तुमच्यात भांडणे होवोत….
आणि तुमची फुटाफूट होवो….

हे ऐकून नानाकजी चे सोबत असलेले शिष्य आश्चर्यचकित झाले आणि विचारायला लागले….
आपण हा कसा आशीर्वाद या इतक्या चांगल्या गावकऱ्यांना दिलात….?
नानक हसत म्हणाले…

तुम्ही प्रथम पहिले गावकरी आणि दुसरे गावकरी यांतला अंतर लक्षात आणा…
या दुसऱ्या गावातील प्रत्येक गावकरी हा एक सज्जन माणूस आहे.
या सगळ्यांचे एकाच गावात काय काम आहे….?

जर भांडण झाले… तुटातुट झाली… तर हे गावकरी दुसऱ्या गावात जातील.
असे झाल्याने… ते सगळेच गांव सुधरतील…! तसेच पहिल्या गावातील गावकरी हे
त्याच गावात जितका वेळ सोबत राहतील… ते चांगलेच आहे…!
गटाराचे पाणी एकाच ठिकाणी साठले तर चांगले… परंतु गंगे चे सगळीकडे
पसरायला पाहिजे….!

तात्पर्य :-
चांगल्याचा विस्तार होणे… हेच जगाला सुखी करण्याचे रहस्य आहे….!

मराठी बोधकथा संग्रह - Moral Story In Marathi - Bodh Katha
मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi – Bodh Katha

मराठी बोधकथा संग्रह – Moral Story In Marathi
Bodh Katha

जीवनात खूप त्रास असुनही अगदी
प्रामाणिक राहणे…
भरपूर संपत्ती असुनही अगदी साधे राहणे…
मोठे अधिकार असुनही अगदी नम्र राहणे…
खूप रागात असुनही अगदी शांत राहणे…
यालाच आयुष्याचे व्यवस्थापन म्हणतात.

विचार – मराठी बोधकथा

मित्रांनो…
माणसाच्या अंगी नम्रता ही असावीच.
त्याचप्रमाणें शब्दांना जपून
वापर करण्याची समज ही असावी…!
ज्याच्या अंगी या सगळ्यांचा मिलाप असतो,
त्याच्याच हातून मोठे कार्य घडतात.

थॉमस अल्वा एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला…
या महान शास्त्रज्ञाच्या आयुष्यातील ही घटना….

जेव्हा ग्रामोफोन या यंत्राचा शोध लावला.
यंत्राच्या तोंडातून पहिले शब्द बाहेर पडले.
त्या काळात तर तो एक मोठा चमत्कारच होता.

एका कार्यक्रमात कुणीतरी त्यांची ओळख करून देतांना म्हणाले…
हे थॉमस अल्वा एडिसन आहेत… या साहेबांनी बोलणारे यंत्र शोधून
काढले आहे.

यावर एडिसनने अगदी नम्रपणे सांगितले की… शब्द बोलणारे यंत्र तर
भगवंताने शोधून काढले आहे. मी जे यंत्र शोधून काढले आहे…
ते बोललेले शब्द थांबविण्याचे यंत्र आहे.

खूप सारे शोध लावलेल्या या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने वरील वाक्य काढले.
कारण… त्यांना शब्दांचे सामर्थ्य माहिती होते. ते जपून वापरले पाहिजेत.
हे त्यांना कळत होते आणि नम्रता तर त्याच्या नसानसांत होतीच.

तात्पर्य : बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून नम्रपणे बोलावे.

अतिथी धर्म – मराठी बोधकथा – Moral Story In Marathi

अतिथी धर्म – मराठी बोधकथा - Moral Story In Marathi
अतिथी धर्म – मराठी बोधकथा – Moral Story In Marathi

कमलाकर एका चोराचा पाठलाग करीत होता. तो चोर गावातील
लहान लहान गल्लीतून पळत होता आणि शेवटी पळता – पळता
कमलाकर ची नजर चुकवून तो त्या गावातील एका घरात घुसला…!

त्या गावात अतिथी धर्म पाळण्याची सुंदर प्रथा होती…! तो चोर
ज्या घरात घुसला त्या घरातील व्यक्ती ने त्या गावाच्या प्रथेप्रमाणे
आपला अतिथी धर्म पाळला.

त्याच्या घरात घुसलेल्या चोराला आतील खोलीत लपविले…!
इतक्यातच कमलाकर ही पाठलाग करता करता त्याच घरी आला…

कमलाकरने त्या व्यक्तीला चोराबद्दल सांगितले आणि विचारले की…
असा कुणी व्यक्ती इकडे आला होता का….? तुम्ही त्याला इकडे पहिले का…?
असे विचारले…

त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो व्यक्ती खोटे बोलला
आणि अश्या व्यक्तीला मी पाहिला नसल्याचे कमलाकर ला सांगितले.

परंतु… त्या व्यक्तीच्या मुलाने मात्र कमलाकरकडे बघून आतल्या खोलीकडे बोट
दाखविले… कमलाकर काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत जाऊन
त्या चोराला पकडले आणि तो त्या चोराला घेऊन गेला.

त्या कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलाचा खूप राग आला. कारण….
त्याच्या मुलाने त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळला
नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे अगदी बरोबर होते.

तात्पर्य :-
परिस्थितीनुसार सत्याचा अर्थ आणि महत्व बदलत राहते…!

चेतन आणि अवचेतन मन | Body mind spirit | Marathi Information

0
body-mind-spirit-marathi-information-vijay-bhagat-vb-good-thoughts
body-mind-spirit-marathi-information

अवचेतन मन – आपल्याला कुठलाही आजार
का होतो. तर त्याचे सहज सोपे उत्तर आहे.
तो आपण स्विकारल्यामुळे…!

पाण्यावर तरंगण्याची नैसर्गिक शक्ती मनुष्याच्या शरीरात आहे. तरीही माणसाचा पाण्यात बुडून
मृत्यू होतो. आता याला तुम्ही काय म्हणाल…? आपल्या मनाने अतिशय ठामपणे स्विकार केले आहे की…
मला पाण्यात पोहता येत नाही. तसेच दुसऱ्या कोणालाही पाण्यात पोहायला येत नाही हा लोकभ्रम आहे.

बघा हत्ती किती भारी असतो, तो ही तर पाण्यात पोहतोच ना…! कारण कि त्याला चांगल्या प्रकारे माहित
आहे की तो पाण्यावर तरंगणार…! त्याने असे काही ठरवलेले नाही की, मी पाण्यात पोहणार…
त्याला त्याचा ठामपणे विश्वास आहे.

एक सापाला बघा, सापाला हाथ-पाय नसतात… तरीही तो पाण्यात पोहतोच न…! म्हणजेच आपण
हात पाय लावल्यावरच पाण्यावर तरंगू किंवा पोहू शकतो.. मग हा ही तर गैरसमजच आहे.

आता बघा जो माणुस किंवा कोणताही प्राणी घ्या… जर त्याचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास काही वेळाने
त्याचे शरीर पाण्यावर तरंगायला लागतेच.

चेतन आणि अवचेतन मन 

अशाच प्रकारे आपल्या शरीरात सुद्धा एक प्रतिकारशक्ती आहे. जी आपल्याला कुठलाही आजार होवू
नये यासाठी सतत कार्यशील असते. या प्रतिकार शक्ती ला मनापासून ठामपणे मान्य करा. या शक्तीचा
वापर करा हेच खरे शरीरशास्त्र आहे.

जर का ही शक्ती तुमच्यात नसेल तर मेडीकल सायन्स काहीही करू शकत नाही. थोडा ताप आल्यावर,
सर्दी झाल्यावर, शिंक आल्यावर, किंवा कसलाही आजार झाल्यावर थोडेसे थांबा. या आजारावर
तुमच्यातील प्रतिकारशक्तीला काम करू द्या.

अशा छोट्या – मोठ्या आजारासाठी खूप औषध खाणे, एक प्रकारे आपल्या शरीरावर अत्याचार
करण्यासारखे आहे. तसाच हा एक लोकभ्रम ही आहे. शरीर शास्त्रात खरे विज्ञान म्हणजे नैसर्गिक
प्रतिकारशक्तीच आहे.

आपल्या शरीरातली अर्ध्यापेक्षा जास्त आजारांच्या मागे आपले अवचेतन मन असते. पण याची माहिती
खुपदा रोग्याला नसतेच. आपण डॉक्टरांकडे जातो, आणि उपचार घेतो, उपचार घेतल्यावर तात्पुरते
बरेही वाटते, पण काही दिवसांनी पुन्हा तेच दुखणे उफाळून येते, काय करावे आणि काय नाही..
ते समजत नाही.

काही लक्षणे आपले मन आणि शरीर यांना जोडणारी बघूया :-

एखाद्या गोष्टीची खूपच जास्त चिंता किंवा भिती वाटली की गळ्याला कोरड पडते.
कामाचा, परीक्षा किवा इतर कसलाही तणाव असेल तर पोटात गोळा येतो.
आपण काही क्षणासाठी अपघाताने बचावलो किंवा आपल्या समोर एखादा अपघात, एखादी
दुर्दैवी घटना पाहिल्यावर आपले हात पाय सुन्न झाल्यासारखे वाटतात. किंवा सुन्न होतात.

तसेच याउलट नेहमी हसत असणारी हसमुख व्यक्ती एखादे वेळीच आजारी पडते.

आता हे तर चांगल्या प्रकारे समजले आहे की आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही अज्ञात
मनाचे वर्चस्व किंवा प्रभाव आहेच. समजा हवा आली आणि धूर उडल्यावर लगेच, सेकंदा पेक्षाही
कमी वेळात आपल्या पापण्या मिटतात. आपले अवचेतन मन खूप शक्तीशाली आहे पण ते एखाद्या
सेनापतीसारखे… त्याच्यावर सत्ता चालते विचारांची…! जरी तो खूप शक्तिशाली असला तरी तो
एक प्रकारे ताबेदारच…! त्याचे काम फक्त दिलेला आदेश पाळणे एवढेच…!
आपले विचार म्हणजेच आपण जे काही बोलतो तेच आहेत.

1) डोकेदुखी :-

खूप स्त्री किंवा पुरुषांना रात्री डोक्यावर बाम लावल्या शिवाय झोप येत नाही.

काय कारण असेल…?

ह्या माणसाला पहिले की माझे डोकेच दुखते…!
या माणसाने माझे खूप डोके खाल्ले…!
ह्यांच्या समोर तर तुम्ही कितीही आपले डोके फोडा, काहीही फायदा होणार नाही…!

कळत – नकळत सतत असे बोलत राहिल्यास आपल्या अज्ञ मनात निरोप जातो की, आता माझ्या
डोक्याला दुखायचे आहे. आणि त्रीव डोकेदुखी (अर्धर्शिशी) चा त्रास सुरु होतो.

तसे डोके दुखीची इतरही काही कारणे आहेत, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक अप्रिय
घटना घडलेलीच असते. पण त्या घटनेला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा आठवण्याचा स्वभाव असेल
तर डोकेदुखी सुरु होते.
तेव्हा अश्या वाईट अनुभवांना विसरुन जाणेच चांगले.

कधी-कधी नकोसे वाटणारे काम, किंवा त्रासदायक कामाची जवाबदारी आपल्यावर येऊन पडते…
आणि डोके दुखायला लागते. आपण जेवढा कामाला पुढे ढकलतो तेवढा त्रास वाढतो… म्हणून
अशी कामे त्याचवेळी करून मोकळे व्हायचे.

2) ब्लडप्रेशर आणि हृदयविकार :-

एखादे व्यक्ती नेहमी – नेहमी अशी वाक्ये पुन्हा पुन्हा वापरत असेल की…

त्याला पहिले कि माझे रक्त खवळायाला लागते.
ह्या माणसासाठी मी आपल्या रक्ताचे पाणी केले… आणि हा माणुस बदललाय…!
माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते…!

कधी काळ अशी वाक्ये वापरली गेली तर काही हरकत नाही, पण… पुन्हा पुन्हा हेच बोलल्यास आणि
जर का हे आपल्या अवचेतन मनास गेल्यास याचा विसंगत परीणाम शरीराच्या रक्ताभिसरणावर नक्कीच
होतो.
डॉक्टरकडे गेल्यावर औषध – उपचाराने काहीकाळ बरेही वाटते, पण अवचेतन मन त्याचा पाठलाग करणे
काही सोडत नाही.

अशा प्रकारची वाक्ये सतत तणावात असणार्‍या व्यक्तीच्या सवयीचा भाग बनतात आणि लवकरच
त्याला ब्लडप्रेशर आणि मोठ्या स्वरुपाचे हृदयाचे विकार घेरण्यास सुरुवात करतात.

थोडक्यात सांगायचे तर नेहमी मानसिक तणाव, हताशा आणि निराशा अनुभव करणाऱ्याला हृदयाचे रोग
लवकरच होतात.

3) आतड्यांचे विकार :-

जो व्यक्ती स्वतःलाच दोषी समझून टाकुन बोलतो, स्वतःला खूप कमजोर समजतो, जीवनात कोणतेही
अपयश आल्याश स्वतःला हीन समझोतो… त्याला छोट्या आतड्यांच्या विकरांची समस्या निर्माण होते.

4) अपचन :-

अपचन च्या आजाराचा त्रास खूप लोकांना आहे. खरेतर मलविसर्जन ही नैसर्गिक आणि अतिसहज क्रिया
आहे, तरीपण काही लोकांना पोट साफ होण्यासाठी कृत्रिम उपायांचां, जसे की एखादे चुर्ण किंवा औषध
ह्यांची मदत घ्यावी लागते.

ह्याची ही खूप कारणे आहेत… हा एक उदाहरण बघूया…

 Marathi Information

खुपदा याचे एक कारण आपल्या लहानपणीच्या सवयीत सापडते. लहानपणात मस्ती किंवा
चूक केल्यास कडक शिस्तीच्या नादात, आई -वडलांनी मुलाला एखादी शिक्षा केलेली असते.

त्याचा राग त्याच्या मनात असतो, लहान मुले आई – वडीलांवर राग काढु शकत नाही.

आपल्या आई – वडिलाने सांगितलेली गोष्ट मनात नसतांनाही, मुलाला मान्य करावीच लागते.

याचा राग म्हणून ही क्रिया तो थांबवून ठेवतो.

यासाठी आई वडील तर त्याला जबर – जोराई करुच शकत नाहीत, हळुहळू तो मोठा होतो, शिस्तीचा
काळ ही संपतो पण आपल्या आतड्यांवरचे नैसर्गीक नियंत्रण तो बळ हरवून बसतो.

असे ही आढळून आले की, एखाद्याला आर्थिक संकट आले, तेव्हा त्याची पचनशक्ती कमजोर झालेली होती.
तसेच जे लोक खूप बारीक वृत्तीचे, म्हणजेच एक प्रकारे कंजूष प्रवूत्ती चे होते, त्या लोकांमध्ये
मुळव्याध्याची समस्या जास्त आढळली.

5) जठर आणि पित्ताशय :-

एखादी व्यक्ती लहान लहान गोष्टींवरही वेळोवेळी रागाला येते, चिडते, आणि लवकरच अस्वस्थ होते,
त्याचा परीणाम त्याच्या जठर आणि पित्ताशयावर होतो.

6) पाठदुखी :-

जेव्हा एखादा व्यक्ती जवाबदारीने वाकुन थकला असेल तेव्हा त्याला पाठदुखीचा त्रास सुरु होतो…
खूपच असह्य वेदना होतात, ह्यात मानेपर्यंतचे स्नायु आखडले जातात. त्यांच्यवरचा
ताण जाणवतो.
चेहरा मुळ स्थानी न राहता उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो…

आता मनात प्रश्न येतो… हे सगळे तर ठीक आहे पण, ह्यावर उपाय काय आहे…?

सध्या जी औषधे, उपचार सुरु आहे त्याला सुरूच राहू द्या. पण शरीरातून हे रोग समुळ करायचे
असतील तर स्वयं सुचन हाच ह्यावरचा एकमेव उपाय आहे.

जसे की डोकेदुखीचे उदाहरण घेऊया…
तंद्रावस्थेत जाऊन आपल्या अज्ञात मनाला सुचना द्या…

आता माझे डोके एकदम हलके हलके होत आहे…
आता ते अजून निवांत आणि हलके झाले आहे…
आता डोके दुखण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे…
आता माझ्या डोक्यात जमा झालेले अतिरीक्त रक्त शरीराच्या इतर भागात सुरळीतपणे पसरत आहे.
आता माझा हा डोकेदुखीचा त्रास बंद झालेला आहे, काही क्षणांमध्ये ही रुखरुख बंद होईल…!
आणि डोकेदुखी गायब…!

अशा प्रकारे प्रत्येक रोगासाठी अशा सुचना तयार करुन त्या अज्ञ मनापर्यत पोहचवुन रोगमुक्त होता येते.

चेतन आणि अवचेतन मन | Body mind spirit | Marathi Information

मित्रांनो… थोडक्यात असे समजा की… आपल्या भावनांचा पेच प्रसंग करुन जगू नका…
रोग बनून ते शरीराला आतून पोखरतील… म्हणून आपला राग व्यक्त करा आणि मोकळे होऊन जा…!

असाच मला एक कीर्तनात सांगितलेला एका संताचा दृष्टांत आठवत आहे. त्यांना ज्या क्षणी राग यायचा
त्याच क्षणी ते संत एक कागद घ्यायचे आणि त्यावर सविस्तर लिहून काढायचे, आपल्या मनातील संपुर्ण भाव
त्या कागदावर ओतून रिकामें होऊन त्या कागदाला तीन – चार दिवस तसेच टेबलवर ठेवायचे आणि नंतर
जाळून किंवा फाडून टाकायचे.

अशा प्रकारेही मनात झालेला गोंधळ बाहेर काढून टाकता येतो. याने रागाची भावना नाहीशी होत जाते
आणि मनाला हलके हलके वाटते.

माझ्या वाचनात आलेल्या सूचना आणि आपले काही अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे…
आशा आहे नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल.

तुम्हा सर्वांना तुमच्या निरोगी आणि ठणठणीत आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा…!

धन्यवाद…!

मराठी बोधकथा – भगवंताचा शोध – Marathi Kahani | Moral Story

0
सुंदर मराठी बोधकथा - भगवंताचा शोध - Marathi Kahani - marathi story - bodhkata
सुंदर मराठी बोधकथा - भगवंताचा शोध - Marathi Kahani - marathi story - bodhkata

मराठी बोधकथा – भगवंताचा शोध – Marathi Kahani | Moral Story

एक लहानसा मुलगा, त्याने असे ठरवले आहे की, आज त्याला भगवंता बरोबर जेवायचे आहे.
काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन तो भगवंताच्या शोध घेण्यासाठी
घराबाहेर पडला.
चालता चालता रस्त्याच्या बाजूला त्याला एक बाग दिसली. तो त्या बागेत गेला. त्या बागेत
काही लोक होती. कुणी  बसलेले होते तर कुणी हलके व्यायाम करीत होते.

मराठी बोधकथा

त्याला समोर बसलेले एक आजोबा दिसले आणि त्यांच्या बाजूला एक बाक रिकामे होते.
तो मुलगाही चालून चालून थकलेला होता… म्हणून थोडी विश्रांती घेण्यासाठी
त्या बाकावर जाऊन बसला.
ते जवळचे आजोबा सतत मुलाकडे बघत होते… मुलाचे लक्षही त्या आजोबा कडे गेल्यावर
मुलाला वाटले की या आजोबांना तहान लागलेली आहे आणि यांच्याकडे पाणी नाही आहे…
म्हणून त्याने जवळचे पाणी त्यांना दिले. ते पाणी प्याले आणि बाटली परत देतांना हसले…
इतके सुंदर हसणे तो पहिल्यांदाच बघत होता. नंतर त्याने त्यांना खाऊ दिला…
ते परत तसेच हसले…त्यांचे ते हास्य बघुन तो मोहुन गेला…

भगवंताचा शोध

तो उठला. दिवस सरत आला होता. आता त्याला घरी परतायचे होते.
तो तिथून निघाला. थोडे पुढे गेला… वळून पाहिले तर ते आजोबा गोड हसत होते…
तो धावत त्यांच्याकडे आला. त्यांना मिठी मारली. आजोबानेही लाडाने त्याला
कुशीत घेतले. घराच्या दिशेने तो निघाला. घरी पोचला.
आज तो खूपच खुश दिसत होता.
आईने विचारले तसा तो म्हणाला,
 देव कितीतरी थकला होता आई…!
भुकेला, तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता.

Marathi Kahani 

इकडे ते आजोबा घरी पोहोचले….
केवढे आनंदी…! केवढे तृप्त…! रोजचा शीण नव्हता.
एकटेपणाची बोच नव्हती.
त्यांच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते.
कुठे होतात बाबा दिवसभर…?
त्याने आपल्या वडिलांना विचारले. त्याचे बाबा दैवी तंद्रीतच होते…! म्हणाले….
मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव…! तरुण कसला….? बालकच…!
न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली…!
आजोबांच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता.
केवढा आनंद…! केवढी तृप्ती…! केवढे समाधान…!
ही लहानशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हाताऱ्या आजोबाचा
चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला.
Moral Story
सारे अध्यात्म एक छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचे मला जाणवले.
हजार धर्मग्रंथांचे सार एकाच  गोष्टीत…!
देव माणसाच्या मनात जेवठा असतो…
त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि
आपल्या चांगल्या कर्मातला देव सर्वान दिसत आसतो.

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

48
मराठी-सुविचार-स्टेटस-सुंदर-विचार-marathi-suvichar
मराठी-सुविचार-स्टेटस-सुंदर-विचार-marathi-suvichar

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील | Marathi Suvichar Status

नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये आपल्यासाठी Marathi Suvichar, good thoughts in marathi,
changle vichar marathi, marathi quotes, सुंदर विचार, suvichar images marathi,
Marathi thoughts, marathi suvichar status, marathi motivation,
marathi motivational thoughts, Inspirational Quotes In Marathi,
चांगले विचार , छान विचार मराठी , सुविचार फोटो , suvichar status, आणले आहेत.
हे मराठी सुविचार आपल्या जीवनात नक्कीच प्रेरणादायक ठरतील.

शांत मनाने वाचा आणि आपल्या मित्र,मैत्रीणीना, नातेवाईकांना Facebook, whatsapp,
अशा सोशल मिडियाद्वारे शेयर करायला विसरू नका.

Sunder Vichar Status | तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही | Marathi Suvichar | Sunder Vichar

तुम्ही वादळाला शांत करू शकत नाही….
प्रयत्न करणे व्यर्थ आहे.
तुम्ही स्वतःला शांत करा…
वादळ स्वतःहून निघून जाईल.

सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

जीवनात काहीतरी करण्याची
धमक असलेल्या माणसाला
कुणाच्या आशेवर बसण्याची
गरज नसते.

जीवनात-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
जीवनात-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

हसून पहावे…. रडून पहावे…..
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावे
आपण हजर नसतानांही आपले नाव
कोणीतरी काढावे.
प्रेम माणसावर करावे की
माणुसकीवर करावे…
पण प्रेम मनापासून करावे….!

हसून-पहावे-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
हसून-पहावे-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या
जे आपल्या पाठीमागे पण
आपल्याशी प्रामाणिक असतात.

आयुष्य-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
आयुष्य-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

जीवन जगायचे असेल
तर त्रास सहन करायला शिका.
मेल्यावर तर आगीच्या पण वेदना
होत नाहीत….!

जीवन-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
जीवन-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते
परंतु तो जे शोधतो ते कधीच भेटत नसते.
आणि ते शोधण्यातच त्याचे पूर्ण आयुष्य संपते
ते म्हणजे समाधान…!

समाधान-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
समाधान-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

वेळ मिळाल्यावर बोलणे
आणि वेळ काढून बोलणे
यात खूप फरक आहे…

वेळ-बोलणे-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
वेळ-बोलणे-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

माणुसकी बघितली तर दिसते….
दाखवली तर भेटते……
केली तर कळते…..
मानली तर मिळते….
आणि ओळखली तर
शेवटपर्यंत टिकते…

माणुसकी-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
माणुसकी-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb

कधीकधी वाटते की….
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मने आणि
अपुरी स्वप्नं यापेक्षा
तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरंच
खूप चांगला होता…..

अपुरा-गृहपाठ-सुंदर-विचार-स्टेटस-मराठी-सुविचार-good-thought-marathi
अपुरा-गृहपाठ-सुंदर-विचार-स्टेटस-मराठी-सुविचार-good-thought-marathi

झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपने सोडून देता…

स्वप्न-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
स्वप्न-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

इमानदारी आणि मेहनत
कधीच वाया जात नाही.
त्याचे फळ उशिरा का होईना
पण जरुरी भेटते…..!

इमानदारी-आणि-मेहनत-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
इमानदारी-आणि-मेहनत-सुंदर-विचार-sunder-vichar-status-marathi-suvichar

Sunder Vichar Status | देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्या सारखे दिले आहे | सुंदर विचार | मराठी सुविचार

देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्या सारखे दिले आहे.
फक्त एक अट घातली आहे की…
तो झिजेल तोच चमकेल.

आयुष्य-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
आयुष्य-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

संघर्ष करण्याची संधी
त्यांनाच मिळते….
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

संघर्ष-करण्याची-संधी-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
संघर्ष-करण्याची-संधी-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

रिकाम्या भांड्यावर झाकण आणि
चुकीच्या विचारांची पाठराखण
काही उपयोगाची नसते…

रिकाम्या-भांड्यावर-झाकण-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
रिकाम्या-भांड्यावर-झाकण-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नाही…
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजे
जिंकणे होय.

जिंकणे-म्हणजे-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
जिंकणे-म्हणजे-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

बोलताना जरा जपून बोलावे
कधी शब्द ही अर्थ बदलतात.
चालतांना जरा जपुन चालावे….
कधी रस्तेही घात करतात.
वाकतांना जरा जपुन वाकावे…..
कधी आपलेच खंजीर खुपसतात.
पाउल टाकतांना जरा जपुन टाकावे….
कधी फुलेही काटे बनतात.
मागतांना जरा जपुन मागावे….
कधी आपलेच भावं खातात.
आणि नाते जोडताना जपुन जोडावे…..
कधी नकळत धागेही तुटुन जातात.

बोलतांना-जरा-जपून-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
बोलतांना-जरा-जपून-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

आपल्यावर टीका करणाऱ्यांचा
नेहमी आदर करत जा. कारण
आपले दोष शोधण्यासाठी ते
जीवाचा खूप आटापिटा करत असतात.

आपल्यावर-टीका-करणाऱ्यांचा-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
आपल्यावर-टीका-करणाऱ्यांचा-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

काहीं नात्यात सुरुंग लावणारे
नातेवाईकच असतात…..
हे नाते उध्वस्त झाल्यावरच कळते.

नातेवाईक-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
नातेवाईक-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला
तरी त्रास करुन घ्यायचा की नाही….
हे आपल्या हातात असते.

कोणी-कितीही-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
कोणी-कितीही-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

माणूस किती आपला आहे आणि
किती आतला आहे याचे उत्तर फक्त
वेळे जवळ असते. कारण गरज संपली की…
विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे.

माणूस-गरज-संपली-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
माणूस-गरज-संपली-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

आपल्याला जीव लावणारे आपल्याला
मोठ्या नशिबाने मिळाले आहेत.
हे समजायला काहींना वेळही लागत नाही
आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही.

आपल्याला-जीव-लावणारे-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-vb
आपल्याला-जीव-लावणारे-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

सीता होऊन “मौनाचं” रामायण
सहन करता येते पण….
शब्दांचे “महाभारत” सोसायला
पाठीशी कृष्ण हवा असतो….!

सीता-होऊन-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार
सीता-होऊन-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार

मनाची स्वभावाची सुंदरता | Sunder Vichar | प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात | Suvichar Marathi

शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते…
तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते.
शरीराला वय असते… मनाला ते कधीच नसते…!

शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो.
शरीर तर निमित्तमात्र असते….

माणसाच्या स्वभावात गोडवा… शालीनता… प्रामाणिकपणा आणि विनयशीलता
असेल तर…. त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते.
म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढे
आपण नतमस्तक होतो. जीवनात अशी माणसे कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड
प्रेम करावे….

आपल्या आवडत्या माणसाचे आपल्या सोबत असणे…
ही जीवनातील सगळ्यात मोठी कमाई….
ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही.

आजकाल अशी माणसे भेटतात तरी कुठे….? आणि जर नशिबाने कधी
भेटली तर हळूवार जतन करून ठेवावीत…. कदाचित… पुन्हा भेटतील….
न भेटतील…?

प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात…
रंग नाही…. आकार नाही ही… ठिकाण नाही
तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाची असतात.

नाती-म्हणजे-काय-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-प्रामाणिक-नाती
नाती-म्हणजे-काय-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-प्रामाणिक-नाती

नाते म्हणजे काय…?
एक सुंदर उत्तर…..
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेत आहात याची जाणीव
म्हणजे नाते….!

नाती-म्हणजे-काय-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-प्रामाणिक-नाती
नाती-म्हणजे-काय-sunder-vichar-status-सुंदर-विचार-मराठी-सुविचार-प्रामाणिक-नाती

 

जरी बुद्धी कितीही तीक्ष्ण असली
तरी ही नशिबा शिवाय जीवनात
जिंकता येत नाही. कारण….
जरी बिरबल हा कितीही बुद्धिवान असला
तरी पण तो राजा होऊ शकला नाही…!

बिरबल-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb-good-thoughts
बिरबल-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb-good-thoughts

नेहमी लहान लहान चुका
सुधारण्याचा प्रयत्न करा.
कारण माणसाला ठेच डोंगराने नाही
तर लहान दगडानेच लागते.

वेळ-आणि-शब्द-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-vb
वेळ-आणि-शब्द-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

काही लोकं
स्वतःच्या मनाने जगत असतात…
तर काही दुसऱ्यांच्या
मनाचा विचार करून जगत असतात.
आणि दुःख मात्र त्यांनाच मिळते
जे दुसऱ्याच्या मनाचा
विचार करून जगत असतात.

जर बोलायचे असेल तर
वेळ आणि शब्द दोन्ही लागत नाही.
फक्त मनापासून इच्छा लागते.

वेळ-आणि-शब्द-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-vb
वेळ-आणि-शब्द-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर
पोहोचता… तेव्हा लोकांना विसरता.
आणि जेव्हा तुम्ही उध्वस्त झालेले असता
तेव्हा लोकं तुम्हाला विसरतात.

यशाच्या-शिखरावर-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
यशाच्या-शिखरावर-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

असणे नसणे दोन्ही ठीक आहे.
परंतु असून नसणे हे खूप वाईट आहे.

पाणी धावत असते
म्हणून त्याला मार्ग सापडतो.
त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो
त्याला यशाचा मार्ग सापडतो….

फक्त गरज भासल्यास वर
आठवण काढणाऱ्या माणसावर
कधीही रागावू नका. कारण….
काही माणसे देवाची ही आठवण
तेव्हाच काढतात….. जेव्हा त्यांना
कोणताच पर्याय दिसत नसतो.

अपमान करणे स्वभावात असू शकते
सन्मान करणे संस्कारात असावे लागते.

अपमान-स्वभाव-संस्कार-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-vb
अपमान-स्वभाव-संस्कार-sunder-vichar-छान-विचार-मराठी-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

जेव्हा बाहेर वादळ असते
तेव्हा आपण शांत बसावे.
आणि जेव्हा बाहेर शांतता असते…
तेव्हा आपण आपले स्वतःचे वादळ
निर्माण करावे.

आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना
सारखे मागे वळून न पाहता….. भविष्यात
समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पहावे.
कदाचित याकरिताच परमेश्वराने डोळे
शरीरात मागे न देता पुढे दिले आहेत.

माणूस जेवढा आजाराने थकत नाही
त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो.
म्हणून हसत राहा… विचार सोडा..
आपण आहात तर जीवन आहे.
हीच संकल्पना म्हणी बाळगा.

Sunder Vichar Status | छान विचार | Marathi Suvichar

Sunder Vichar Status – Good Thoughts In Marathi – सुविचार मराठी

चुका स्वीकारल्या की….
कमी होतात आणि
लपवल्या की वाढतात…

चुका-स्वीकारल्या-की-कमी-होतात-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
चुका-स्वीकारल्या-की-कमी-होतात-sunder-vichar-status-marathi-suvichar

काही छोट्या छोट्या गोष्टी
खूप काही शिकवून जातात.
पण वेळ अशी गोष्ट आहे….
जी काही न बोलता
खूप काही तरी सांगून जाते.

वेळ-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
वेळ-sunder-vichar-status-marathi-suvichar

गाठ कशीही असली….
तरी सोडविता येते.
प्रश्न फक्त
आतल्या गाठीची
माणसे भेटल्यावर उभा राहतो.

माणसे-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
माणसे-sunder-vichar-status-marathi-suvichar

प्रत्येक माणसात देव असतो…
मग तुम्ही मंदिरात का जाता…?
खूप सुंदर उत्तर
वारा तर उन्हातही वाहतो
पण त्याच्या आनंद सावलीत
बसल्यावरच मिळतो. तसेच
देव सगळीकडे असतो. परंतु
त्याच्या आनंद मंदिरातच मिळतो.

प्रत्येक-माणसात-देव-असतो-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
प्रत्येक-माणसात-देव-असतो-sunder-vichar-status-marathi-suvichar

यशस्वी आयुष्याच्या प्रवास करतांना
काही गोष्टी सोडायच्या असतात….
भूतकाळाच्या पश्चाताप….
भविष्यकाळाची काळजी सोडली की….
वर्तमानातला आनंद…
कस्तुरी पेक्षा मौल्यवान असतो.

यशस्वी-आयुष्याचा-प्रवास-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
यशस्वी-आयुष्याचा-प्रवास-sunder-vichar-status-marathi-suvichar

जीवनाची लढाई ही
एकट्यानेच लढावी लागते.
लोक सल्ले देतात पण साथ नाही.
लोकांचे सल्ले जरूर घ्या… कारण
ते फुकट असतात परंतु निर्णय मात्र
स्वतःचे स्वतःच घ्या कारण ते
अमुल्य असतात.
प्रवास एकटयाने झाला तरी चालेल
पण वाट मात्र स्वतःचीच असली पाहिजे.

जीवनाची-लढाई-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
जीवनाची-लढाई-sunder-vichar-status-marathi-suvichar

लोकांचा आदर फक्त त्यांची संपत्ती सत्ता
आणि संपन्नतेसाठी नाही केला पाहिजे.
तर त्यांचा सन्मान, त्यांची उदारता….
सज्ञान आणि त्यांचे वागणे यावर
केला पाहिजे.

लोकांचा-आदर-sunder-vichar-status-marathi-suvichar-vb
लोकांचा-आदर-sunder-vichar-status-marathi-suvichar

स्वच्छ मन आणि माणुसकीचे निस्वार्थी धन
अंगी असले की, लोक प्रतिष्ठा आपोआप देतात.
त्यासाठी पद… पैसा… प्रसिद्धी… याची आवश्यकता
भासत नाही.

कधीकधी तुमची सटकली पाहिजे
नाहीतर तुमचे अस्तित्व दिसून येत नाही.

कधी-कधी-तुमची-सटकली-पाहिजे-सुंदर-विचार-स्टेटस-suvichar-marathi-image
कधी-कधी-तुमची-सटकली-पाहिजे-सुंदर-विचार-स्टेटस-suvichar-marathi-image

काही नाती असूनही दिसत नाही
आणि काही नाती दिसत नाही पण
नेहमी सोबत असतात.

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केव्हाही चांगले.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण
स्वतः सिद्ध करतो.

Sunder Vichar Status | छान विचार | Marathi Suvichar

बोधकथा मराठी – मदतीची साखळी – Marathi Bodhkatha

0
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीचीसाखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया

बोधकथा मराठी – मदतीची साखळी – Marathi Bodhkatha

हायवे वरून एक स्त्री आपल्या महागड्या कारने शहराकडे जात असते.
रस्त्यावर अचानकपणे तिची कार बंद पडते.

आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त
करण्याची काहीच माहिती नसते. ती आजूबाजूला मदत करण्यासाठी कुणी तरी आहे का
म्हणून पाहते… पण तिला कुणीही तिथे दिसत नाही.

ती स्त्री मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडी चालक गाडी थांबत नाही.
खूप वेळ जातो… आता मात्र स्त्री घाबरते आणि डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात.
तेवढयात धनपाल नावाचा माणूस तिच्या जवळ येतो . त्याला पाहून ती स्त्री प्रथम तर घाबरून जाते.
पण धनपाल म्हणतो घाबरू नका ताई… मी प्रयत्न करून पाहतो… आणि गाडी दुरूस्तीच्या
कामाकडे वळतो.

मदतीची साखळी – बोधकथा मराठी 

काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची गाडी सुरू होते. ती स्त्री धनपाल ला खूप खूप धन्यवाद देते.
आणि धनपाल ला म्हणते ” माझी खूप मोठी समस्या तुम्ही सोडविली आहे… सांगा, मी या बदल्यात
तुम्हाला किती रुपये देऊ…?
” तेंव्हा धनपाल म्हणतो…. काही नको…. खरेतर हे माझे काम नव्हतेच मी तर तुम्हाला मदत केली.

मलाही एका माणसाने मदत केली होती आणि त्याचा कोणताही मोबदला त्यांनी न घेता आपणही
इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणि मी ही आपणास मदत केली.
तुम्हीही अशीच मदत करा. हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रिला खुप छान वाटले
आणि तिनेही हसत मी ही अशीच मदत नक्की करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन
निघून गेली.

तसा खूप वेळ प्रवास व थकव्यामुळे तिला भूक लागली होती. तिने एका हॉटेल जवळ जेवण्यासाठी कार
थांबविली आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली.

जेवण टेबलवरती येण्यास थोडा वेळ लागणार होता. ती स्त्री आता जरा निश्चिंत झाली होती आणि सहजच
हॉटेल मधील शो पीस , सुंदर टेबल, स्वच्छतेकडे व उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू
लागली . तेवढयात तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेले.

ती हसतमुखाने त्या स्त्री सेवा देत होती. ती वेटर ७ महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्री ने समजून घेतले
आणि लगेच तिच्या मनात विचार आला आपण हिला मदत करायलाच हवी.

हिला सध्या पैश्याची खूप गरज असणार म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने आपल्या
पर्समधून काही नोटा व एक चिठ्ठी लिहून पॉकेट मध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बील रक्कम व टिप
म्हणून एक पॉकेट त्या स्त्री ने त्या वेटरच्या हातात दिले. काउंटरला तिने बिल दिले व पॉकेट उघडून
पाहिले तर… त्यात एक चिठ्ठी व काही नोटा होत्या, तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहीले होते…
तु खूप उत्साही आहेस, गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते.

बोधकथा मराठी – मदतीची साखळी

तुला खरे तर आराम करायला हवा पण तुला पैश्याची खूप गरज असल्याने तू काम करत आहेस .
मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तु ही अशीच मदत कर.
मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या तर त्यात चक्क दहा हजार रुपये
निघाले. एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या
स्त्री ला धन्यवाद दिले.

तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन
काळजी करत होता. ती नवऱ्याजवळ त्याच्या मिठीत गेली व म्हणाली आता माझ्या डिलेव्हरीची
काळजी करू नका… आज मला एका स्त्री ने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला…
दोघांनाही खूप आनंद झाला.

तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो धनपाल…!
ह्यालाच म्हणतात ‘ क्रिया तशी प्रतिक्रिया ‘

मित्रांनो,
नैसर्गिक न्याय तत्व असतेच… आपण जे इतरांना दयाल तेच आपल्याला परत मिळते.
आपणच जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्या ला दुःख आणि त्रासच मिळणार.

मदतीची साखळी – बोधकथा मराठी

आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले आनंद दिला तर आपल्यालाही
आनंद आणि सुख मिळणारच. आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार.

कितीही संकटे जिवनात आली तरी मदतीला अगणित हात धावून येणार हे मी छातीठाकपणे सांगतो.
म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख, आनंद देऊया मदत करु या… आपल्यालाही तेच मिळेल जे
आपण दुसऱ्याला देऊ….

सुख , आनंद, मदत दया आणि सुख, आनंद, मदत मिळवा हेच तर आहे नैसर्गिक न्याय तत्व अर्थातच
क्रिया तशी प्रतिक्रिया

मदतीची साखळी

बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबलेला एक हात ….
प्रार्थनेसाठी जोडलेल्या
दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया

नेहमी कुणाची तरी मदत करत जा
कदाचित तुम्ही असे एकच आहात….
जे मदत करू शकतात….!

बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया

कुणाची मदत करत असतांना
त्याच्या डोळ्यात बघू नका…
कारण त्याचे झुकलेले डोळे
तुमच्या मनात
गर्व निर्माण करू शकतो.

बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया

आपल्याला मदत करणाऱ्या
माणसांशी
नेहमी कृतज्ञ रहा.

बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया
बोधकथा-मराठी-Marathi-Bodhkatha-मदतीची -साखळी-क्रिया-तशी-प्रतिक्रिया

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे
“सल्ला”
एका कडे मांगा हजार जन देतील.
जगातील सर्वात महाग वस्तु म्हणजे
“मदत”
हजार जणांकडे मागा
कदाचित एखादाच करेल….