Home Blog

Birthday Wishes For Brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
Birthday Wishes For Brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो, आपला भाऊ आपल्या पेक्षा लहान असो किंवा मोठा असो…
भावाभावांचे नाते किंवा बहीण भावाचे नाते हे खूपच गोड असते. त्यांच्यामध्ये
लहान सहान भांडणे होतच असतात, पण माहीत दोघांनाही असते की…
आम्ही भावंडे एकमेकांवर खूप प्रेम करतो. हा हि गोष्ट वेगळी आहे कि…
आम्ही आपले एकमेकांवरचा प्रेम दाखवत नाही.

मित्रांनो, आयुष्यात काही प्रसंग येतात ज्या वेळी आपल्या प्रेमाचे पाझरे फुटतात
त्याच प्रसंगातून एक प्रसंग म्हणजे आपल्या भावाचा वाढदिवस.
या प्रसंगाला… वेळेला आणखी सुंदर बनविण्यासाठी…. आपल्या प्रेमाची अमीट
छाप सोडण्यासाठी… सुंदर अश्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहे.

या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी सुंदर, मनाला भिडतील अश्या भावाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. मग भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असो
किंवा लहान असो Birthday Wishes For Brother In Marathi या शुभेच्छा
तुमचे नाते आणखीन घट्ट बनवेल. भावा भावा मधील प्रेम वाढेल.
तर मग चला आपल्या लाडक्या भावाला सुंदर, प्रेमळ शुभेच्छा द्या.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या प्रिय व्यक्तींचा वाढदिवस म्हटल्यावर आपण आवर्जून शुभेच्छा देतोच.
मग बाबांसाठी वाढदिवस शुभेच्छा असो, आईसाठी वाढदिवस शुभेच्छा असो
अथवा त्यातही जर लाडक्या भावाचा वाढदिवस असेल तर शुभेच्छा रूपी प्रेमाचा
वर्षाव करावासा वाटतो नाही का. मग तुमच्या भावासाठी या वाढदिवसाच्या शुभेच्छा
(Birthday Wishes For Brother In Marathi)

Birthday Wishes For Brother in Marathi  भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Brother in Marathi भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी
तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची
नवी सुरूवात ठरो.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक
प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ
आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुला माहित आहे का आज मला काय वाटत आहे
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.

देवाने मला तुझ्यासारखा भाऊ दिल्याबद्दल
मी त्याची सदैव कृतज्ञ आहे. या संपूर्ण
जगातील सर्वोत्तम भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
हॅपी बर्थडे भावा…!

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड
आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

मी स्वतःला खूप भाग्यवान
व्यक्ती समजतो. कारण….
मला माझ्या भावामध्ये
एक चांगला मित्र मिळाला आहे.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
ज्याच्याशी मी मनातील
सर्व काही शेअर करू शकते,
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

तुझ्यासारख्या भाऊ असणे
ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा.
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला
असतोस. खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस
मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.

ईश्वर तुझ्यावर प्रेमाचा…..
आनंदाचा….. भरभरून वर्षाव
करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या प्रिय बंधूला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझे संपूर्ण आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणिसूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा…..!

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.

मला आनंद आहे की तुझ्या रूपात
मला एक अशी व्यक्ती मिळाली आहे
जिच्याशी मी जशी आहे तशी वागू शकते.
त्याच्यापुढे मला कोणताही मुखवटा
घालावा लागत नाही. ज्याला मी जशी आहे
तशीच आवडते. माझ्या प्रिय छोट्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)

मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्
तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,
तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस
आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

भाऊ म्हणजे मित्र, भाऊ म्हणजे पाठीराखा…..!
कधी तो मित्र बनून आपले आयुष्य सुंदर बनवतो
तर कधी वडिलांच्या मायेने काळजी घेतो.
कधी आईच्या मायेने जखमेवर फुंकर घालतो….
तर कधी आजोबांसारखा मोलाचा सल्ला देतो.
भाऊ असणे ही एक देवाने दिलेली सुंदर भेट आहे.
भाऊ आपल्यापेक्षा लहान… असो की मोठा…..
त्याच्या नुसत्या असण्यानेच आयुष्याला किती
आधार वाटतो…..!

अशा लाडक्या भावाचा वाढदिवस हा खास दिवस असतो.
मग आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मराठी संदेश (Birthday Wishes For Brother In Marathi)
पाठवून द्यायलाच हव्या. तुम्हाला वरीलपैकी काही शुभेच्छा
संदेश तुमच्या भावासाठी नक्कीच आवडले असतील.
मग वेळ न घालवता पाठवा भावाला वाढदिवसाच्या
मराठी हार्दिक शुभेच्छा
(Happy Birthday Wishes For Brother In Marathi).

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा,
तुम्ही आम्हाला जीवनात अनेक धडे
शिकवले आणि प्रत्येक संकटात
साथ दिली.

तुला आणखी एक वर्ष सहन केल्याबद्दल
माझा आभारी रहा. जस्ट जोकिंग….!
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा….!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)

तुझे जीवन गोड क्षणांनी,
आनंदी स्मितांनी आणि आनंदी
आठवणींनी भरले जावो.
हा दिवस तुझ्या आयुष्यात
कधी न आटणारा आनंदाचा
झरा घेऊन येवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.

आमच्या घरातील लाडोबाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी
तुला खूप खूप शुभेच्छा.

आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.

भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला
बेस्ट फ्रेंड असतो. माझ्याकडेही आहे
माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.

जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचे असेल
तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्रांनो, काहीजणांना साध्या सरळ शुभेच्छा द्यायला
आवडतात, तर काहींना कविता करायला आवडते.
मग तुमच्या भावाला कविता रुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा
संदेश (Birthday Messages For Brother In Marathi) द्या.

साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण, आज तुझा वाढदिवस आला
भाऊ आपणास वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा
भाऊ मिळणे हा देवाने मला दिलेला खूप
मोठा आशीर्वाद आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा…!

मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर
मनापासून प्रेम करतो. माझ्या प्रिय भावा…
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन
येवो. या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तू कायम नेहमी आनंदी व सुखात राहावे
हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा….!
हॅपी बर्थडे भावा….!

संपूर्ण जगात वेगळा आहे माझा भाऊ
संपूर्ण जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
मला माझ्या जिवापेक्षा प्रिय आहे माझा भाऊ.
प्रिय दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

बोलायचे तर खूप काही आहे….
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहू ही शकत
नाही. कधी अभ्यासासाठी दूर जावे
लागले, कधी होता कामाचा बहाणा…
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय
एक दिवसही नाही गेला….!
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या प्रिय भावा,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी
खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर
असते तुझे नाव…. दुसरे कोणी नाही
दादा तूच आहेस आमचा अभिमान…
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान….!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दादा….!

प्रिय दादा,
तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत राहो.
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.
तू नेहमी हसत राहा आणि तुला
कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये.
तूला उत्तुंग यश मिळो… आणि तुझे
माझ्यावर असलेले प्रेम असच टिकून राहो.
दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

आनंदाने होवो तुझ्या दिवसाची
सुरूवात तुझ्या आयुष्यात
कधी ना येवो दुःखाची सांज.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ
तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!
तुझी अजून पुढची शंभर वर्ष
खूप आनंदात आणि सुखात जावोत
हीच देवाकडे प्रार्थना…..!

येणारे वर्ष तुला आनंदाचे जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि
सुखाचा वर्षाव करो.
हॅपी बर्थडे दादा.

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
तुझ्या कर्तृत्वाची ख्याती
स्नेह आणि जिव्हाळ्याने
वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती.
तुझ्या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा दादा….!

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी
राहिल्याबद्दल. तुला उज्वल भविष्यासाठी
आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा…!

मी एकटा होतो या जगात,
पण सोबतीला तू आलास आणि
माझे आयुष्यच बदलून गेले…!
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिल्याबद्दल….!
हॅपी बर्थडे भावा.

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो
फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरे
करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसे असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा…!
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला आपुलकीच्या शुभेच्छा…!

जो माझ्यासाठी
एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे.
ज्याच्याजवळ माझ्या
सर्व इच्छा पूर्ण होतात अशा
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर
मला सर्वकाळ आनंद पाहायचा आहे अश्या
माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतलेस मला
रुसले कधी तर जवळ घेतलेस मला.
रडवले कधी तर कधी हसवलेस.
पुर्ण केल्या सर्व इच्छा माझ्या
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा…!

तुम्हाला दररोज आनंदी राहण्याची
आणखी कारणे मिळू दे…..!
जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लहानपणीची आपली भांडणे…
मोठेपणी तु मला दिलेला आधार….
आणि आजही मिळणारे तुझे
अमूल्य मार्गदर्शन….. हा माझ्या
आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.
तू जीवनात सदैव आनंदी असावा
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा दादा.

वर्षात 365 दिवस… महिन्यात 30 दिवस….
हफ्त्यात 7 दिवस…. आणि माझ्या आवडीचा
एकच दिवस…. तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎
वाढदिवस‬.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी
ओली असो वा सुकी असो… पार्टी तर ठरलेली
मग भावा कधी करायची पार्टी…?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!

दूर असलो म्हणून काय झाले…
आजचा दिवस कसा विसरणार…
तू नसलास जवळ तरी तुझी
आठवण सोबत आहे दादा.
आज तुझा वाढदिवस आहे
जणू काही आमच्यासाठी सण आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

हसत रहा तू प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी…..
तुझे आयुष्य असो समृद्ध
सुखांचा होवो वर्षाव असा
असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा

लाखात आहे एक माझा भाऊ
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या भावा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार.
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ
मिळाला. जीवनाच्या सुख-दुःखात साथ
देणारा भाऊ मिळाला.
भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ

माझ्या भावाच्या प्रेमाची
तुलना कोणत्याच गोष्टीशी
केली जाऊ शकत नाही,
लव्ह यु ब्रो.
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.

नवा गंध, नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

माझ्यावर येणाऱ्या दुःखाला, संकटाला
माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं
अशा माझ्या प्रेमळ, कर्तृत्ववान, हुशार,
समजूतदार भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ तू माझ्या मोठ्या भावासोबतच
माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस,
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे रहस्य आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात,
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची
सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

फुलांमध्ये गुलाब आहेस तू…
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू…
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू…
हॅपी बर्थडे भावा.

सुख – दुःखाचे आपले नाते आहे
कधी रूसणे… तर कधी मनवणे आहे.
चल एक गोड केक आणूया….
तुझा वाढदिवस साजरा करूया.
हॅपी बर्थडे भावा.

हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचे कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो.
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Birthday Wishes For Elder Brother In Marathi

मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला
आदर्श असतो. ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो.
जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि
ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या
भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास
वाढदिवसाच्या शुभेच्छा

(Birthday Wishes For Elder Brother In Marathi).

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा
भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती.
तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात
तू ढाल होऊन उभा राहिलास. थँक्यू दादा माझी
नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या
भावा कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली
तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत
सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड
सगळे काही आहेस. माझा बेस्ट भाऊ
होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी
तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा
मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे
उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हॅपी बर्थडे दादा… येणारे वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम.

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस
वाटते की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.

marathi language big brother birthday wishes for brother in marathi

हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील
आयुष्य हे तुम्हाला सुखाचे जावो. भाऊ आपणास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझे
साकार होवो. हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.

Happy Birthday Wishes Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Birthday Wishes For Younger Brother in Marathi

मित्रांनो, मोठा दादा जसा हक्काचा तसाच छोट्या भावावरही हक्क आपणच
गाजवतो, नाही का, भावा हे कर रे….. ते कर रे म्हणत…. त्याच्याकडून
सगळी काम करून घेतो. आपल्या छोट्या भावाला तुम्हीही नक्कीच तुमच्या
कामाला लावून हैराण करत असाल. पण त्याच्या वाढदिवशी मात्र प्रेमळ
संदेश (Birthday Wishes For Younger Brother in Marathi) करून तो
अविस्मरणीय करा.

लहान भाऊ असल्याचे कर्तव्य नेहमीच निभावलेस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलेस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवले ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नशीबाच्या भरोश्यावर राहायचे नाही हे सांगितलेस
कोणापुढेही झुकायचे नाही हे शिकवलेस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

हॅपी बर्थडे भावा…..
आज तुझा दिवस…..
सगळीकडे आनंद आहे
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन माझे कर्तव्य
पार पाडले आहे.

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला
तू सक्षम आहेस. छोट्या भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा
समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम…
हॅपी बर्थडे.

तुला हात पकडून चालायला शिकवले
प्रत्येक संकटात लढायला शिकवले
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितले.

परिस्थिती कोणतीही असो.
कोणी नसो माझ्या सोबतीला
पण एकजण नक्कीच असेल सोबत…
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुला कचरापेटीतून उचलेल म्हणून चिडवले…
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त
लाडका आहेस.

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे ब्रो.

भावाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा | Best Birthday Wishes For Brother In Marathi
भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस – Birthday Status For Brother In Marathi
Birthday Status For Brother In Marathi

आता भावाचा वाढदिवस म्हटल्यावर स्टेटस
(Birthday Status For Brother In Marathi)
रखना तो बनता है. मग तुमच्या भावाच्या
वाढदिवसासाठी खास सोशल मीडियावर
शेअर करण्याठी मराठमोळे बर्थडे मेसेजेस.

जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखे
बनू इच्छितो. जो मला दादा म्हणतो…..
तोच माझ्या मनात बसतो.
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पुन्हा तो दिवस आला आहे
आनंदाने नाचू गाऊ या.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देऊन त्याचा वाढदिवस साजरा करूया.

रोज सकाळ आणि संध्याकाळ….
ओठावर असते तुझे नाव.
भाऊ अजून कोणी नाही तूच आहेस
आमचा अभिमान. ज्याचा करतो आम्ही
मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचे प्रत्येक भांडण, बाबांकडून
ओरडा खाणे असो वा आईच्या हातचे
गोड खाणे असो. पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात
सुख… आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा…!

भांडणं आणि वाद पण आहेत
गरजेचे भेटणे आणि दूर जाणेही
आहे गरजेचे. पण आपण तर एकाच
घरात राहतो. त्यामुळे कशाला चिंता.
हॅपी बर्थडे माझ्या भावा.

वाद झाला तरी चालेल
पण नाद झालाच पाहिजे.
कारण आज दिवसच तसा आहे
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे.
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है.
हॅपी बर्थडे भाऊ.

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा
तुझे हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावे….!
भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

दादा आपणास वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा….!
आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो.

भावाला वाढदिवसाच्या मराठी हार्दिक शुभेच्छा |
Happy Birthday Wishes For Brother In Marathi |
Birthday Quotes For Brother In Marathi
तुमच्या लाडक्या भाईच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा
(Birthday Quotes For Brother In Marathi)
तर द्याच आणि त्यासोबत कोट्स सुद्धा शेअर करा.

मित्रांनो, जर आपल्या लाडक्या भावाच्या वाढदिवसाला
काय सरळ साध्या मुळमुळीत किंवा गंभीर शुभेच्छा
द्यायच्या, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला
आपल्या लाडक्या भावाला मजेदार….. गमतीदार….
शुभेच्छा द्यायच्या असतील… तर
भावाच्या बर्थडेला द्या मजेशीर शुभेच्छा |
Funny Birthday Wishes For Brother In Marathi

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला
ढगात घालवणारे…. पण मनाने दिलदार….
बोलणे दमदार…. आमचा लाडक्या भाऊरायांना
वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट
गाणे वाजवून नाचत – गाजत शुभेच्छा.

सोमवार – रविवार नसलेत
तरी चालतील. पण भाऊंचा
बर्थडे तर होणारच.
हॅपी बर्थडे भावा.

शहराशहरात चर्चा……
चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य
करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे…..
बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाने तुझ्या आजचा
दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी
मिळाली तर सर्वच होतील सुखी…
हॅपी बर्थडे भाऊराया.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सगळेजण…. तुमच्या
हरण्याची वाट पाहत असतात.
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

छोट्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Little Brother In Marathi

जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
तू कायम सुखी व आनंदी राहावे
हीच देवाकडे प्रार्थना…..!
(Birthday Wishes For Little Brother In Marathi)

जुळ्या भावांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा |
Birthday Wishes For Twins Brother In Marathi

मला हेवा वाटतो की
तुम्हा दोघांचा वाढदिवस
एकत्र आहे. आणि तुमचे
एकमेकांवर खूप प्रेम आहे.
माझ्या जुळ्या भावांनो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही दोघे फक्त जुळे नसून
देवाने दिलेला डबल आशीर्वाद
आहात. माझ्याकडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

या दिवशी दुप्पट धांदल उडवा….
दुप्पट मजा करा…. कारण
आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आहे.
माझ्या जुळ्या भावांना वाढदिवसाच्या
दुप्पट शुभेच्छा.

आज आपला वाढदिवस आहे
पण मी तुला सांगू इच्छितो की
तू माझा जुळा भाऊ आहेस म्हणून
मी भाग्यवान आहे. माझ्या जुळ्या
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(Birthday Wishes For Twins Brother In Marathi)

जुळे असण्याबद्दल आपण दोघे
भाग्यवान आहोत. आणि ही
दुर्मिळ भावना अनुभवणार्‍या
मोजक्या लोकांपैकी एक आहोत.
माझ्या जुळ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू फक्त माझा जुळा भाऊ नाहीस,
तर ती व्यक्तीही आहेस जिच्यासोबत
मी माझा पहिला श्वास आणि हृदयाचे
ठोके शेअर केले आहेत. माझ्या
पार्टनरला, माझ्या लाडक्या जुळ्या
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

दादा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहे.
माझ्या धेयाच्या वाटेवरचा किनारा आहे.
जीवनाचा कोणताही प्रवास असा नसावा
ज्यामधे तुझी सोबत नाही.
हॅप्पी बर्थडे भावा

भावासाठी त्याच्या जुळ्या भावापेक्षा
जवळचा व चांगला मित्र दुसरा कोणीच
नसतो आणि आपण दोघेही भाग्यवान
आहोत की आपल्या दोघांना जन्माच्या
आधीपासूनच एक मित्र मिळाला आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर.

तुझ्यापेक्षा मला इतर कोणीही चांगले
समजून घेऊ शकत नाही. माझ्या
प्रिय जुळ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes For Twins Brother In Marathi

खूप कमी भाग्यवान लोक असतात
ज्यांना आयुष्यभर मित्राची साथ मिळते.
पण आपण दोघे खूप भाग्यवान आहोत
की माझा मित्र माझा जुळा भाऊच आहे.
आपल्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जुळे भाऊ असण्याबद्दल सर्वात महत्वाची
गोष्ट म्हणजे तुम्हाला कधीही एकटे वाटत
नाही. कारण देवाने तुमच्यासोबत तुमचा
सर्वात चांगला मित्र पाठवला आहे.
हॅपी बर्थडे भावा.

भावाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर भावाने तर शुभेच्छा दिल्याच पाहिजेत.
कितीही पटत नसले तरी या दिवशी सगळे विसरून नक्की तुमच्या
भावाला बर्थडे विश करा.

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार
व्यक्तीमत्त्वाचा….
जन्मदिवस लाडक्या दादाचा.
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा

वादळाला त्याचा परिचय द्यायची
गरज नसते. त्याची चर्चा ही होतच
असते. लेका…. भावड्या….
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

रूबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही. या जन्मदिनी
दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

तुझे व्यक्तिमत्त्व असे दिवसेंदिवस
खुलणारे… प्रत्येकवर्षी वाढदिवस
नवे क्षितीज शोधणार… अशा
उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wishes For Brother in Marathi |
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दादा माझा आधार आहेस तू ….
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात
माझ्या पाठीशी आहेस तू….
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा,
दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मित्रांनो, आपल्या भावांवर असलेले प्रेम लपवू नका. तुमच्या शुभेच्छा संदेश मधून
ते व्यक्त करा. तुम्ही गप्प राहिलात तर तेही व्यक्त होणार नाहीत. कारण…..
नात्यात कितीही चढउतार आले तरी एक भाऊच असतो. जो आपल्याला साथ देतो.
प्रत्येक सुखदुःखात आणि संकटात आपल्यासोबत उभा राहतो. मग तुमच्या भावाच्या
वाढदिवसाला हे शुभेच्छा संदेश नक्की शेअर करा. आणि त्यांना कसे वाटले….
ते आम्हाला नक्की कळवा.

Thank You For Birthday In Marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश

Superb 250+ चांगले विचार मराठी – marathi motivational quotes

12
चांगले विचार मराठी - marathi motivational quotes - shorts marathi suvichar
चांगले विचार मराठी - marathi motivational quotes - shorts marathi suvichar

Superb 250+ चांगले विचार मराठी
marathi motivational quotes

नमस्कार मित्रांनो, marathi motivational quotes – चांगले विचार – short suvichar marathi
या पोस्ट मध्ये आणि vijaybhagat.com या संकेत स्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
vb good thoughts ब्लॉगवरील या पोस्ट मध्ये छोटे सुविचार, मराठी प्रेरणादायी सुविचार,
सुविचार संग्रह मराठी, मराठी सुविचार संग्रह, मनाला स्पर्श करणारे प्रेरणादायी मराठी सुविचार,
सुंदर सुविचार, सुंदर विचार मराठी, छोटे सुविचार मराठी, लहान सुविचार, मराठी सुविचार छोटे,
मराठी सुविचार लहान मराठी सुविचार, sunder vichar in marathi, तसेच one line quotes in marathi,
positive thoughts in marathi, marathi thoughts on success, shorts marathi suvichar,
असा सुविचारांचा संग्रह आपल्यासाठी आणला आहे.

हे प्रेरणादायी सुविचार शांत मनाने नक्की वाचा. तुमचे ध्येय पूर्ण करण्यात नक्कीच उपयोगी पडलील. आणि
तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलून टाकतील. तुम्हाला आनंदित करतील. मन प्रफुल्लित करतील.

मित्रांनो….. मानवाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
त्यासाठीच मनुष्य हा शिक्षण घेत असतो. शिक्षण घेत असतांना अनेक
प्रकारचे विचार हे आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच विचारातील एखादा
विचार आपल्याला जगण्याचा नवीन मार्ग दाखवतो… त्यालाच आपण सुविचार
असे म्हणतो. तो एक विचार माणसामध्ये परिवर्तन घडवून आणतो.

ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात… त्याचे मन ही सुंदर असते. यश
मिळविण्यासाठी आपले मन आणि विचार दोन्हीही शुद्ध असले पाहिजेत.

आज या पोस्ट मध्ये आपण असेच काही मराठी सुविचार येथे पाहणार आहोत.
चला तर मग पाहूया निवडक मराठी सुविचार, sunder suvichar,
sunder vichar,good morning msg in marathi,
good morning quotes marathi, good morning
small quotes marathi, Good morning school
quotes marathi, marathi thoughts on success,
inspirational quotes on life,marathi motivational
thoughts,

चांगले विचार मराठी –
marathi motivational quotes

आईवडिलांना मान देणे
हे आपले परम कर्तव्य आहे.

वाचाल तर वाचाल.

मन मोकळे असावे…..
पण जीभ मोकळी असू नये.

उद्याचे काम आज करा.
आजचे काम आत्ताच करा.

विज्ञान हे जीवनातील
मीठ आहे.

कोणत्याही विजयासाठी
नम्रता हवीच…..!

अभ्यासाव्दारे मिळणारे यश
दैवी नसते… ते कष्टाचे असते.

अज्ञान हा अधोगतीचा
पाया आहे.

short suvichar marathi 

साहस हा यशाचा आत्मा आहे.

माणसाला माणसाप्रमाणे
वागवणे ह्याचेच नाव
माणुसकी.

चांगले विचार मनात फार
काळ टिकत नाहीत म्हणून
ते त्वरित कृतीत आणावे.

नेहमी तीन गोष्टी देत राहा.
मान…. ज्ञान… आणि दान…

shorts suvichar marathi

चांगले विचार मराठी - marathi motivational quotes
चांगले विचार मराठी – marathi motivational quotes

सुखासाठी कधी हसावे लागते….
तर कधी रडावे लागते… कारण
सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही
उंचावरून पडावे लागते…. !

नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा
आणि हे करूनही लोक तुमची
कदर करत नसतील तर तो त्यांचा
दोष आहे…… तुमचा नाही…..!

परिश्रम इतक्या शांततेने करा
की…… तुमचे यशच आवाज
करेल……!

पराभव आणि विजय तुमच्या
मानण्यावर असते. मानले तर..
पराभव आहे आणि ठरवले तर
विजय आहे.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा तुम्ही हरण्याची वाट
बघता.

हजारो माणसे मिळतील
आयुष्यात…. पण हजारो
चुका माफ करणारे……
आई वडील मात्र पुन्हा
मिळणार नाहीत.

गरज संपली की विसरणारे
फार असतात. गरज नसतांना
पण आपली आठवण काढणारे
फारच कमी असतात.

भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा
वर्तमानकाळात लढण्यात आणि
भविष्याची शिखरे चढण्यातच
खरा पराक्रम आहे.

आयुष्यात काही नसले तरी
चालेल…. पण तुमच्यासारख्या
प्रेमळ माणसांची साथ मात्र
असू द्या.

नजरेत भरणारी सर्वच असतात
पण तुमच्यासारखी हृदयात
राहणारी फारच कमी असतात.

महत्त्व त्याला नाही की कोण
आपल्या सोबत आहे. महत्त्व
त्याला आहे की गरज पडल्यास
कोण आपल्यासोबत आहे.

आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात.

shorts suvichar marathi

चांगले विचार मराठी - marathi motivational quotes
चांगले विचार मराठी – marathi motivational quotes

सगळी दुःख दूर झाल्यावर
मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर
करा. मन प्रसन्न करा सगळी
दुःख आपोआप दूर होतील

दुःखाच्या रात्री झोप कोणालाच
लागत नाही आणि सुखाच्या
आनंदात कोणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात.

कधी कधी चांगले घडण्यासाठी
तुम्हाला वाईट परिस्थितीतून
जावेच लागते

पैज लावायची तर स्वतःबरोबरच
लावा. कारण जिंकलात तर
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वतःचा
अहंकार हराल.

आपल्याला अनंत शक्ती…..
असीम उत्साह….. अपार साहस…..
आणि धीर पाहिजे….. तरच
आपल्याकडून महान कार्ये होतील.

तारुण्याचा जोम अंगी आहे
तोवरच कोणतीही गोष्ट शक्य
होईल कार्याला लागण्याची
अत्यंत उचित अशी हीच वेळ
आहे.

कोणतीही गोष्ट फुकट मिळाली
की माणसाला तिची किंमत
वाटत नाही.

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

संपत्तीचा अमर्यादित संचय
करू नका.

जो स्वतःच्या आणि इतरांच्या
कल्याणासाठी झटतो तो सर्वात
उत्तम पुरुष समजावा.

खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात
असतो. घेण्यात किंवा
मागण्यात नसतो.

वेळेवर घातलेला एक टाका
नंतरचे दहा टाके वाचवितो.

विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची
प्रगती अवलंबून असते.

कुणालाही जिंकायचे असेल
तर…. प्रेमाने जिंका.

विझलो जरी आज मि
अंत माझा नाही.
पेटेन पुन्हा नव्याने…
सामर्थ्य नाशवंत नाही.

अनुभव हा आपला सर्वोत्तम
शिक्षक आहे. जो पर्यंत जीवन
आहे तो पर्यंत शिकत राहा.

सत्यासाठी काही सोडून
द्यावे. पण कोणासाठीही
सत्य सोडू नये.

जी लोकं नशीबावर विश्वास
ठेवतात ती लोकं भित्री
असतात. जे स्वतःचे भविष्य
स्वतः घडवतात तेच खरे
कणखर असतात.

मन आणि मेंदूच्या युद्धात
नेहमी मनाचेच ऐका.

जो मनुष्य मरायला तयार होतो
तो कधीच मरत नाही. आणि
जो मरायला भितो…
तो आधीच मेलेला असतो.

माणसाला आपल्या दारिद्र्याची
लाज वाटता कामा नये. लाज
वाटायला पाहिजे
ती दुर्गुणांची…..!

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा
छोट्या गोष्टीने आरंभ करणे
अधीक श्रेयस्कर ठरते.

शाळा हे सभ्य नागरिक
तयार करण्याचे पवित्र
क्षेत्र आहे.

यशाचा मनसोक्त आनंद
घेण्यासाठी अपयश
आणि कठीण परिस्थिती
यांची अत्यंत गरज असते.

आयुष्य हा खूप अवघड
खेळ आहे. तुम्हाला ते
माणुसकीच्या जन्मसिद्ध
हक्कानेच जिंकता येईल.

चांगले विचार मराठी –
marathi motivational quotes

तुमच्या सहभागा शिवाय
तुम्ही यशस्वी होणार नाही.
आणि तुमच्या सहभागा सोबत
तुम्ही कधी अपयशी होणार नाही.

तुम्ही जर चांगले बनवू शकत
नसाल….. तर कमीत कमी
असे बनवा की ते चांगले दिसेल.

चांगले विचार मराठी - marathi motivational quotes - vb thoughts
चांगले विचार मराठी – marathi motivational quotes

कधी कधी आयुष्य तुमच्या
डोक्यावर जोरदार प्रहार
करेल तरीही…. स्वतः वरचा
विश्वास ढळू देऊ नका.

मोठ्या विजया साठी
मोठे रिक्स घ्यावे
लागतील.

चांगल्या पुस्तकाविना घर
म्हणजे दुसरे स्मशानच
होय.

तुमच्या कामात यशस्वी
होण्यासाठी तुम्हाला एका
मनाने ध्येया कडे समर्पित
असायला हवे.

चिंतेसारखे स्वतःला जाळणारे
दुसरें काहीही नाही. देवावर
पूर्ण विश्वास असेल तर
कशाबद्दलही आपण चिंता
का करतो याचीच लाज
वाटली पाहिजे.

‘एकी हेच बळ’ हे
सुभाषित नाही. तर
तो जीवनाचा सिद्धांत आहे.

पुस्तकांची किंमत
रत्नांपेक्षाही
अधिक असते

प्रयत्नांची पराकाष्ठा
करणाऱ्याला जीवनात
अशक्य असे काहीच
नाही.

ऋण फेडण्यापेक्षा
ऋण स्मरणे
अधिक चांगले.

माणूस स्वतःच स्वतःचा
भाग्यविधाता असतो.

केलेल्या प्रयत्नांना यश
आले नाही तरी आपला
पराजय नक्कीच होत नाही.

shorts suvichar marathi

short suvichar marathi - sunder vichar in marathi - vb
short suvichar marathi – sunder vichar in marathi

आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी
हार मानू नका. कारण त्या
शून्यासमोर किती आकडे
लिहायचे त्याची ताकद ही
तुमच्याकडे आहे.

स्वतःचा विकास करा.
लक्षात ठेवा की….
गती आणि वाढ हेच
जिवंतपणाचे लक्षण आहे.

चांगली माणसे आणि
चांगली पुस्तके लगेच
लक्षात येत नाहीत.
त्यांना वाचावे लागते.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच सुरू करायची
जिथे हरण्याची
भीती वाटते.

संकटावर अशा रितीने तुटून
पडा की…. जिंकलो तरी इतिहास
आणि हरलो तरी इतिहासच….

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे
असेल तर एकट्यानेच लढायला
शिका.

जगाच्या रंगमंचावर असे वावरा
की तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत

हसत राहिलात तर पूर्ण जग
आपल्यासह आहे. नाहीतर
डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये
जागा मिळत नाही.

एका मिनिटात आयुष्य बदलू
शकत नाही. पण एक मिनिट
विचार करून घेतलेला निर्णय
नक्कीच आयुष्य बदलू शकतो

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा
आणि छोट्यांनी मोठेपणा
दाखवला तर नात्यांमधला
आदर वाढतो

कुणीतरी येऊन बदल घडवतील
याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच
होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर
अशक्य असे काहीच राहत नाही

लोकं नावं ठेवतच राहणार….
पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड
बनवता आला पाहिजे.

आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे
जास्त सुख देतात

सकारात्मक विचार केला की
नकारात्मक काही उरत नाही

माणसाच्या आयुष्यातील संकटे
ही यशाचा आनंद घेण्यासाठी
आवश्यक आहे.

ध्येय साध्य करणे कितीही कठीण
असो जर आत्मविश्वास असेल तर
अशक्य असे काहीच नाही.

नशिबाचे दार आपणहून कधीच
उघडत नसते मेहनत करूनच
उघडावे लागते.

जो कर्तव्य पार पाडतो
तो सुखाचा अधिकारी होतो.

भिक्षा मागून न्याय मिळत नसतो.

सहानुभूतीच्या हजार शब्दापेक्षा
मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ
असतो.

शहाणा माणूस चूक विसरतो
पण त्याची कारणे मात्र कधीच
विसरत नाही.

युवकांना एक चांगले वातावरण
द्या. त्यांना प्रेरित करा. त्यांच्यात
एक आपार उर्जा चे श्रोत आहे.
ते करून दाखवतीलच.

आपल्या सर्वांमध्ये एकसमान
प्रतिभा नसते. पण आपल्या
सर्वांना प्रतिभेचा विकास
करण्याची संधी समान मिळत
असते.

आकाशा कडे बघा आपण एकटे
अजिबात नाही. सर्व ब्रम्हांड तुमचे
मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच
देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर
काम करतो.

shorts suvichar marathi

तुमच्या नौकरी वर प्रेम करा.
पण… कंपनी वर करू नका.
कारण तुम्हाला कधीच कळणार
नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम
करणे सोडून देईल.

बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही.
बलवान माणूसच क्षमा करू
शकतो.

यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या
गोष्टी वाचू नका. त्यात तुम्हाला
फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या
गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन
यशाच्या नवीन आयडिया मिळतील.

देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये
महान अशी शक्ती आणि क्षमता
दिलेली असते. आणि प्रार्थना
त्या शक्ती क्षमता ना बाहेर
आणायला मदत करत असते.

कोणाचीही निंदा करू नका.
जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी
हात पुढे करू शकत असाल
तर नक्की करा. जर ते शक्य
नसेल तर हात जोडा आणि
त्यांना आशिर्वाद द्या आणि
त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

हार मानणे ही आपली सर्वात
मोठी कमजोरी आहे. यश
मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग
म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत
राहणे.

लोकांना सुंदर विचार नाही
तर सुंदर चेहरे आवडतात.

या जगात माणसाची नाही
तर त्याच्या पैशाची किंमत असते.

खरे बोलून कोणाला दुखावले
तरी चालेल पण खोटे बोलून
कोणाला सुख देऊ नका.

अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि…. अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात.

तुम्ही कितीही चांगले काम करा…
चांगले वागा… इमानदार राहा….
ही दुनिया फक्त तुमच्या एका
चुकीची वाट बघत असते.

दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे
हा सुद्धा एक अनुभवच असतो.

जेव्हा माहित पडते की आयुष्य
काय आहे. तो पर्यंत ते अर्धे
संपून गेलेले असते.

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा
नसतो. आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट
वाटायला लागतो.

आयुष्य जगण्यासाठी नुसत्या
विचारांची नाही सुविचारांची
गरज असते.

खोटे बोलणाऱ्या मित्रापेक्षा
एक प्रामाणिक शत्रू नेहमीच
चांगला असतो.

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील
तरीही चालेल…. पण ह्रदय हवे.
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र
नकोत.

जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची
पर्वा करत नाही. स्वत:बद्दल
अभिमान बाळगण्याआधी
काहीतरी करुन दाखवा.
स्वतःला सिध्द करा.

भरलेला खिशा माणसाला जग
दाखवतो. रिकामा खिशा मात्र
जगातील माणसे दाखवतो.

मोठा माणूस तोच जो आपल्या
सोबतच्यांना छोटा समजत नाही.

स्वतःची तुलना जगात कोना
सोबत करू नका. जर तुम्ही
असे केलेत…. तर तुम्ही स्वतःचा
अपमान करत आहात.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थने साठी
जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक
उपयुक्त आहे.

देशातील दारिद्र व अज्ञान
घालविणे म्हणजेच ईश्वराची
सेवा होय.

धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या
विकासाचे फळ आहे. धर्माचा
प्रमाणभूत आधार पुस्तक नसून
मानवी अंत:करण आहे.

स्वतःला कमकुवत समजणे
हे सर्वात मोठे पाप आहे.

जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे
विचलित होत नाही….
त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त
झाले आहे.

सामर्थ्य म्हणजे जीवन…. दुर्बलता
म्हणजे मृत्यू…. विस्तार जीवन आहे….
आकुंचन मृत्यू आहे….. प्रेम म्हणजे
जीवन….. शत्रुत्व म्हणजे मृत्यू…..!

चांगले विचार मराठी –
marathi motivational quotes

आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल
तर खर्चावर आणि माहिती
जास्त नसेल तर शब्दावर
नियंत्रण पाहिजे.

जगातील सर्वात सुदंर जोडी
तुम्हाला माहिती आहे का…..?
अश्रू आणि हास्य कारण हे
तुम्हाला फारसे एकत्र दिसत
नाही. पण ते जेव्हा दिसतात
तो आयुष्यातला
अत्यंत सूंदर क्षण असतो.

आयुष्य हे सरळ नाही…
त्याची सवय करून घ्या.

टीव्ही वरचे जीवन काही खरे
नसते आणि खरे आयुष्य
म्हणजे टीव्ही वरची सीरियल
नसते. खऱ्या आयुष्यात आराम
नसतो. असते ते फक्त काम
आणि काम.

shorts suvichar marathi

यशाचे रहस्य काय…?
योग्य निर्णय घेणे.
योग्य निर्णय कशे घ्यावें….?
अनुभवाने….. अनुभव कशे
घ्यावें…..? चुकीचे निर्णय घेऊन.

एखाद्याच्या ढगात इंद्रधनुष्य
होण्याचा प्रयत्न करा.

विचार करा आणि
आश्चर्यचकित व्हा.
आश्चर्यचकित व्हा
आणि विचार करा.

आयुष्य बदलण्यासाठी वेळ
सर्वांना मिळते पण वेळ
बदलण्यासाठी आयुष्य
पुन्हा मिळत नाही.

शांततेच्या काळात जर
जास्त घाम गाळला तर
युद्धाच्या काळात कमी
रक्त सांडावे लागते.

एखाद्या गोष्टीचा आरंभ
केव्हा करावा हे समजायला
हवे आणि शेवट केव्हा करावा
हे ही समजायला हवे.

कठीण परिस्तिथी मध्ये
देखील…ध्येयाला चिकटून
राहा. अडचणींना संधी
मध्ये रूपांतर करा.

आपल्या यशाची व्याख्या
जर का भक्कम असेल
तर आपण सदैव अपयशाच्या
दोन पाऊले पुढे असू.

फायदा कमण्यासाठी तुम्हाला
कोणत्या निमंत्रण पत्रिकेची
गरज नाही.

तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच
तुम्हाला सर्वात जास्त शिकायला
मिळते.

लग्न हा करार नसून
संस्कार आहे.

जर तुम्ही सत्यापासून
ढळला नाही तर
भविष्यकाळ तुमचाच आहे.

घाम गाळल्याशिवाय
दामाची खरी किंमत
कळत नाही.

माणसाने थोडा तरी
परोपकार करावा.

गुरूपेक्षा शिष्याने
अधिक काहीतरी
केले पाहिजे.

विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे.
तो न्यायाची चढ व अन्यायाची
चीड बाळगणारा हवा.

तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे.
पण मुलांना जर एकत्र काम
करायला शिकवायचे असेल…
आणि त्यांना प्रेरणा द्यायची
असेल तर शिक्षक हा हवाच.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते.
ज्यांना स्वप्न साकार करायची
असतात….. त्यांना दिवस मोठा
हवा असतो.

इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये
तुमचा आतला आवाज दबू
देऊ नका.

मोठे विचार करा… जलद विचार
करा…. सर्वांचा पुढे जाऊन विचार
करा. विचारांवर कोणाचेच
एकाधिकार नाहीये.

आपण आपल्या शासकांना
बदलू शकत नाही. पण
आपण ज्या प्रकारे ते शासन
करतात ते बदलू शकतो.

जर तुमचे निर्धार पक्के असतील
आणि सोबत परिपूर्णता असेल
तर यश तुमच्या मागे येईल.

काही वादळे विचलित
करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी
येत असतात.

shorts suvichar marathi

मागे आपला विषय निघाला की
समजायचे आपण पुढे चाललो
आहोत.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
काही सोडून दिले की आपोआप
सुटतात.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नसते, एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली
करणे म्हणजेच जिंकणे होय.

आयुष्य कठीण आहे पण
तक्रारी करून ते सोपे
होणार नाही…म्हणून प्रयत्न
करत राहा.

प्रयत्न सोडू नका….
सुरूवात नेहमी
कठीणच असते.

न हरता….. न थांबता…..
न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर
नशिबही हरते आणि हमखास
यश मिळते….!

माणसे जन्माला येतात
पण माणुसकी
निर्माण करावी लागते.

चुकीवर पांघरून
घालण्यासारखी
घोडचूक नाही.

कपटी मित्रापेक्षा
दिलदार शत्रू बरा.

आळस ही एक प्रकारची
आत्महत्या होय.

अहंकार आणि लोभ हे
माणसाच्या दुःखाचे
सर्वात मोठे कारण आहे.

शिका…..! संघटीत व्हा…..!
आणि संघर्ष करा…..!

अग्नीतून गेल्याशिवाय
माणसाची शुद्धी होत नाही.

काम लवकर करावयाचे
असेल तर मुहूर्त पाहण्यात
वेळ घालवू नका.

देशातील सर्वोत्तम डोके हे
सर्वात शेवटच्या बाकावर
सापडतात.

विचार हे भांडवल…
उदयोग हे मार्ग…
तर कठीण परिश्रम….
हे उत्तर आहे.

तुमच्याकडे वेळ फार कमी
आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे
आयुष्य जगणे सोडून दया.

जर शांती हवी असेल
तर प्रसिद्धी पासुन दूर रहा.

पैसे तुमचे आहेत पण
संसाधने हे समाजाचे
आहेत.

सेवा जवळून…. आदर
दुरून…. आणि ज्ञान
आतून असावे.

shorts suvichar marathi

नेहमी लक्षात ठेवा….. तुमचे
यशस्वी होण्याचे संकल्प
हे कोणत्याही इतर संकल्पापेक्षा
अधिक महत्वपुर्ण आहे.

प्रेमाची शिकवण लहान
मुलांकडून फार छान
शिकता येते.

धीर म्हणजे स्वतःचीच
परिक्षा पाहणे.

भलेही यशाची खात्री नसेल पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असायला हवी

प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत
राहायला हवेत. यश मिळेल
अथवा अनुभव दोन्ही गोष्टी
अत्यंत तुरळक आहेत.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त
संघर्ष करावा लागत असेल तर
स्वतःला खूप नशीबवान समजा.
कारण देव त्यांनाच आयुष्यात
संघर्ष करायची संधी देतो….
ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता
आहे.

जर कोणी तुमचे मन तोडले
तर निराश होऊ नका. कारण
हा निसर्गाचा नियमच आहे…..
ज्या झाडावर गोड फळ असतात
त्याच झाडावर जास्त दगड मारले
जातात.

इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत
येते.

चांगले विचार मराठी –
marathi motivational quotes

नियती जेव्हा तुमच्या हातून
काही हिरावून घेत असते….
तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी
देण्यासाठी तुमच्या हाताची
ओंजळ रिकामी करत असते.

दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख सहन
करायला काय हरकत आहे.

निंदेला घाबरून आपले ध्येय
सोडू नका. कारण आपले ध्येय
सध्या होताच निंदा करणाऱ्यांची
मते बदलतात.

अक्कल वाढली की
बडबड कमी होते.

एकाग्रतेने कोणतीही गोष्ट
साध्य करता येते.

कीर्ती हा चांगल्या
कर्माचा सुगंध आहे.

ज्यावेळी अहंकार नष्ट होतो
त्यावेळी आत्मा जागृत होतो.

यशाचे शिखर गाठण्यासाठी
वेळेचे नियोजन हवेच.

एक वेळ पेहराव जुनाच ठेवा.
पण पुस्तके मात्र नवीन विकत घ्या.

प्रेम करणे ही एक कला आहे
पण ते टिकवणे ही एक साधना आहे.

लढाई केलीच तर ते
शांतते साठी करावी.

short suvichar marathi

समाज म्हणजे लोकांचा जमाव
नव्हे… तर लोकांचा एकोपा….!

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ होय.

काम केल्याने माणूस मरत
नाही तर तो आळसाने मरतो.

मनाला कितीही धावू द्या….
पण जिभेला मात्र आवर घाला.

कारणाशिवाय काहीही घडत नाही.

shorts suvichar marathi

छोट्या छोट्या गोष्टीचा महत्व
ज्याला समजले तो शहाणा
माणूस असतो….!

नको त्या ठिकाणी पडलेल्या
वस्तू म्हणजे कचरा.

अभ्यासाने अभ्यास वाढतो
आळसाने आळस वाढतो.

आत्मविश्वास हा माणसाचा
महान मित्र आहे.

जे दुसऱ्यासाठी जगतात
त्यानांच खऱ्या आनंदाचा
आस्वाद घेता येतो.

इच्छा असली म्हणजे मार्ग
सापडतो.

समजावण्यापेक्षा समजून
घेण्यामध्ये खरी परीक्षा असते.
कारण समजण्याासाठी अनुभवाचा
कस लागतो, तर समजून
घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त
चांगल्या विचारांनी जगता आले
पाहिजे. माणसाला माणूस जोडत
गेले पाहिजे.

नवीन विचार तर दररोज येत
असतात पण त्यांना सत्यात
उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

200+ नवीन मराठी सोपे प्रेरणादायी सुविचार |
True line in marathi #marathi #motivation

255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी 

100+ Love Quotes In Marathi – प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

18
Love Quotes In Marathi - प्रेमावर मराठी सुंदर सुविचार
Love Quotes In Marathi - प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आपल्यासाठी love quotes in marathi,
प्रेमावर सुंदर असे हृदयस्पर्शी मराठी सुविचार , प्रेमावर सुंदर सुविचार चा संग्रह आणला आहे.
हे love quotes in marathi with image आहेत.

मित्रांनो, या पोस्ट मधील love quotes in marathi शांत मनाने वाचा. आनंद घ्या.
तुमच्या आयुष्यातील जी ही प्रेमळ व्यक्ति आहे…. त्यांच्यासोबत हे प्रेमावर सुंदर सुविचार शेयर करा.

या १००+ प्रेमावर सुंदर असे हृदयस्पर्शी मराठी सुविचार ( love quotes in marathi )
या मधून कोणता हृदयस्पर्शी मराठी सुविचारतुम्हाला आवडला ते कॉमेंट करून नक्की कळवा.

प्रेमावर सुंदर सुविचार – हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
love motivational quotes in marathi

Love Quotes In Marathi - प्रेमावर मराठी सुंदर सुविचार - प्रेम - वेळ जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात
एक वेळ आणि दुसरे प्रेम. वेळ हे
कोणाचे नसते…. आणि प्रेम हे प्रत्येकाने
होत नसते……!

Love Quotes In Marathi - प्रेमावर मराठी सुंदर सुविचार
Love Quotes In Marathi – प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

प्रेम मिळण्याच्या प्रयत्नात कधी कधी
आयुष्याची खेळणी बनून जाते.
आपण ज्याला हृदयात ठेवण्याच्या
प्रयत्न करतो….. ते चेहरे फक्त
आठवण बनून राहतात…..!

  love quotes in marathi - प्रेमावर सुंदर सुविचार

प्रेम करायचे तर असे करायचे
कि ती व्यक्ती आपल्याला मिळो
अथवा ना मिळो… पण कधी
त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला
तरी आपली आठवण आली पाहिजे…

जगावे असे की मरणे अवघड होईल….
हसावे असे की रडणे अवघड होईल….
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे….
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे
अवघड होईल…. !

एखादयाशी हसता हसता
तितक्याच हक्काने रुसता आले पाहीजे.
समोरच्याच्या डोळ्यातले
पाणी अलगद पुसता आले पाहीजे.
मान अपमान प्रेमात काहीच नसते….
आपल्याला फक्त समोरच्याच्या
ह्रदयात राहता आले पाहिजे.

Love Quotes In Marathi

प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर
प्रेम करेल. स्वतः पेक्षा जास्त….
तूमच्यावर विश्वास ठेवेल. तुम्ही फक्त
त्याला सांगा कि दोन क्षण थांब…
आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर
थांबेल…

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत राहा. कारण…
काही लोक हृदय तोडतील तेव्हा
सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…

कुणी नाही रडत कुणासाठी….
वेळेनुसार अश्रूही कधी मरून
जातात…. तर कधी बदलून
जातात…. प्रेमासारखे…..!

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही
भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम
करतो…. त्याने ही आपल्यावर प्रेम
करणे म्हणजे…. “नशीब“….!

प्रेमावर मराठी सुंदर सुविचार
  love quotes in marathi - प्रेमावर सुंदर सुविचार
love quotes in marathi – प्रेमावर सुंदर सुविचार

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त
न केल्यास त्याची किमत शून्य असते.

मनात प्रेम असेल ना तर सगळ्या
गोष्टी समजून घेता येतात……!

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते
दोघांनाही हवे असते….! मग ते
टिकवण्यासाठी दोघे भांडतातही
आणि समजूनही घेतात.

स्वभावतील गोडीने आणि
जिभेवरील माधुर्याने माणसे
जोडली जातात

नाते मोत्या प्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली
जरी पडला तरी त्याला खाली
वाकून उचलायला हवे.

प्रेम पण किती विचीत्र असते ना……
ज्याच्यावर पण होते ना…
त्याच्यासोबत भांडण तर खुप होते
पण त्याच्यासोबत जर एक तास पण
बोलणे नाही ना झाले… तर जीव
शरीराला सोडून गेल्यासारखे होते.

Love Quotes In Marathi - प्रेमावर मराठी सुंदर सुविचार
Love Quotes In Marathi – प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत
असते…. ती त्याला गरज आहे म्हणून
नाही… तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता म्हणून……!

प्रेम म्हणजे गवताचे
एक नाजूक पाते असते….
हृदयाला हृदयाशी जोडणारे
एक पवित्र नाते असते….!

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे
प्रेम…..! जी सहसा मिळत नाही.

प्रेमात शंका आणि राग तेच लोक
करतात…. ज्यांना तुम्हाला
गमावण्याची भीती असते.

प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

आयुष्यात काही लोक असे असतात
आपण फक्त त्यांच्यावर प्रेम करू
शकतो. त्यांना मिळवू शकत नाही….!

मन गुंतायला वेळ लागत नाही…..
मन तुटायला ही वेळ लागत नाही…..
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला
आवरायला….. आणि तुटलेल्या
मनाला सावरायला……!

कुणासाठी जळतांना स्वतः
व्हायचे अंधार. आंधळ्याला
वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार

आजकाल कोणाशी जास्त पटत नाहीं
बोललेले कोणाला आवडत नाही.
जवळ असलेलेच मग दूर होतांना
क्षणाचाही विचार करत नाही.

प्रेमात पडणे खूप सोपे असते. पण
जन्मभर प्रेम करून कोणत्याही
परिस्थितीत साथ देणे म्हणजे खरे प्रेम…

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य
लागते… जी तुम्हाला हसायचे नसते…
तेव्हा पण ती…. हसवण्याचा प्रयत्न करते.

प्रेमा मध्ये वाद नसावा संवाद असावा.
राग नसावा अनुराग असावा….!
जीव देणे नसावे जीव लावणे असावे.
तुमच्यासाठी काय पण नसावे….
तू तिथे मी असावे.

रुसवने आणि मनवने हा जीवनाचा
एकच भाग आहे. फक्त एका गोष्टीची
काळजी घ्या. तात्पुरते रुसा… पण
मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा.

अगदीच कठीण नसते कुणाला तरी
समजून घेणे… समजून न घेता काय
ते प्रेम करणे…. खूप सोपे असते
कुणीतरी आवडने…… पण खूप
कठीण असते…. कुणाचे तरी
आवडीचे होणे…….!

हे ही वाचा :- नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship

प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून
केली… तर त्याच्याशिवाया…..
एक मिनिट पण राहू शकत नाही.

जीवन नुसते जगायचे नसते… त्याला
सजवायचे असते. सजवितांना
कोणीतरी…. हवे असते. प्रेम नुसते
करायचे नसते… तर ते टिकवायचे
असते. ते टिकवायला दोघांचे प्रेम
महत्वावे असते.

प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

Love Quotes In Marathi - प्रेमावर मराठी सुंदर सुविचार - प्रेम करावे
Love Quotes In Marathi – प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

जे कठीण आहे ते सोपे करावे….
जे सोपे आहे ते सहज करावे….
जे सहज आहे ते सुंदर करावे….
आणि जे सुंदर आहे त्यावर
मनापासून प्रेम करावे…..!

आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते
आपण दुसऱ्याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं….?”

प्रेमावर मराठी सुंदर सुविचार

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी
प्रेम करू नका…… जीजगासाठी
सुंदर असु शकेल. परंतु अशा
व्यक्तीशी करा…. जी तुमचे
जग सुंदर करून टाकेल.

किती छान वाटते ना…
जेव्हा कोणी तरी म्हणते….
स्वतःची काळजी घे….
Please माझ्यासाठी…!

कुणाच्याही आयुष्यात आपली एक
जागा असावी. हक्काची किवा
महत्त्वाची नसली तरी चालेल पण
ती कधीही बदलणारी नसावी….!

आपला Life Partner सुंदर नसला
तरी चालेल… पण प्रेमाची कदर
करणारा असला पाहिजे……!

प्रेमावर सुंदर सुविचार | हृदयस्पर्शी सुंदर सुविचार |
motivational love quotes in marathi #love

हे ही प्रेमावरील सुंदर सुविचार नक्की वाचा :- प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार

Your queries and we have tried our best to provide at our level

Love status in marathi , love quotes in marathi ,
love in marathi quotes , love message in marathi text ,
Love shayri in marathi , love status in marathi text ,
love status in marathi for wife , love status in marathi video ,
love status in marathi attitude , premache status marathi,
प्रेमावर सुंदर सुविचार, motivational love quotes in marathi, प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार मराठी,
प्रेमावर सुविचार संग्रह, sunder vichar in marathi, etc. So, just enjoy it and
don’t forget to share and bookmark our collection…?

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम – changle vichar

1
जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम - changle vichar
जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम - changle vichar

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम पालक म्हणून
वाचायलाच हवे – changle vichar marathi

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये मुलांसाठी changle vichar सांगितले आहेत.
हे चांगले विचार तुम्ही पालक म्हणून वाचा. तसेच हे changle vichar वाचून
मुलं नक्की शहाणे होतील.

तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात त्यांना ज्या सवयी आहेत किंवा चार
लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमच्या मुलांचे
संस्कार ठरवतात. तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवला आहे ते ठरवतात.
मुलांच्या वागण्यामुळे कोणी तुम्हाला ऐकवले तर तुम्हाला खजील झाल्यासारखे
वाटते.

मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे तर काय करायचे….? या पोस्ट मध्ये
आपण असे काही नियम बघणार आहोत जे मुलांना योग्य संस्कार देतील आणि
बिघडवण्यापासून वाचवतील. पोस्ट ला शेवट पर्यंत नक्की वाचा. अर्ध्यात सोडू नका.
शेवटचा नियम तर खूप जास्त खास आहे.

changle vichar

1) मुलांना शिस्त लावण्याची त्यांच्यावर संस्कार करण्याची योग्य वेळ म्हणजे
त्यांच्या लहानपणापासून असते. तसे तर जन्माला येण्याच्या अगोदर पासून
आपल्याकडे संस्कार देण्याची रीत आहे. ज्याला की आपण गर्भसंस्कार म्हणतो.
मुलं पोटात असतांनाही नऊ महिने आईने चांगली पुस्तके वाचणे, चांगले विचार
ऐकणे, चांगले विचार ग्रहण करणे, यावर आपल्याकडे भर असतो. यालाच आपण
गर्भसंस्कार म्हणतो.

पण बरेच पालक लोक चूक करतात असे म्हणून की अजून तर तो लहान
आहे. त्याचे लाड करण्याचे दिवस आहेत. असे म्हणून आपण लहान
वयात त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो. आणि मोठे झाल्यानंतर मुलांवर
संस्कार करायचे म्हटले…. त्यांना शिस्त लावायची म्हटले तर ते हातातून निघून
गेलेले असतात.

त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो ना मुलांकडे वेळ असतो. जसे ओली
काठी वाकवली तर ती वागते पण सुकलेली काठी ही वाकवायचा प्रयत्न
केला तर ती वाकत नाही ती थेट मोडते तिचे दोन तुकडे होतात. अगदी तसेच
आहे.

लहान मुलांवर संस्कार करायचे हे त्यांच्या कोवळ्या वयापासून सुरुवात
होतात. एक ते पाच वर्ष हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा
आणि शिकण्याचा काळ असतो. या वयात सुरू केलेली शिकवण ही
हळूहळू रुजवली जात असते. आणि ती कायमस्वरूपी राहू शकते.

changle vichar

2) वयात यायच्या अगोदरच म्हणजेच नको त्या वयात तुम्ही मुलांचे मित्र बनू
नका. मुलांचे आई-वडील म्हणूनच त्यांना संस्कार द्या. मुलांच्या वयाची वर्गवारी
आपण अशा पद्धतीने करू शकतो. 0 – 5 जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत
प्रेमाने लाडाने वाढवायचे. 5 – 15 पुढची दहा वर्ष शिक्षण घेत असतांना
कठोर शिस्तीने. आणि 15 ते 25. अनुशासन आणि नियमात वाढवायला
हवे आणि 25 या वयात आई-वडिलांनी मुलांचे मित्र व्हायला हरकत नाही.

जर तुम्ही मुलांचे प्रमाणपेक्षा जास्त लाडच करत राहिलात तर मुलं
बिघडतात आणि वय वर्ष 25 च्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या
गोष्टी घडतात तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरतात की
योग्य वयात आम्हाला तुम्ही थांबवले का नाही म्हणून…. मुलं वाया जाण्याचा
दोष त्यांची वाया जाण्याची जबाबदारी ही मुलं पूर्णपणे तुमच्यावर ढकलतात.
म्हणून लाड करायच्या वयात लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवे
त्या वयात मैत्रीपूर्ण रहा.

changle vichar वाचण्यासाठी खाली क्लिक करा. 

best lines – quotes in Marathi चांगले संस्कार, changle vichar

3) मुलं तुमची योग्यता पारखत असतात तुमचे अनुकरण करत असतात आणि
त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात. जर तुम्ही मुलांचे फक्त आई वडील
आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा… आदर द्यायला हवा… असे
तुम्ही समजत असाल….. तर तुम्ही चुकीचे आहात.

मुलांच्या काळानुसार त्यांच्या जनरेशन नुसार तुम्हाला स्वतःला काही नवीन
गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांच्या शंकांचे निरसन
जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला काही येत नाही. असे मुलं समजतात
आणि तुमचा आदर कमी व्हायला लागतो. बरेचसे पालक मुलं ऐकत नाहीत
अशी तक्रार करतात..

पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणे सोडून देत
असाल… त्यांच्यासमोर नमतं घेत असाल… तर तुम्ही चूक करत आहात.

4) मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याच्या किंवा आपल्या
पद्धतीनें त्यांना वागायला सांगण्याच्या चार पद्धती आहेत. सगळ्यात अगोदर
हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवे आहे. नंबर दोन ते कशा पद्धतीने हवा
आहे. तिसरी गोष्ट नाही केले किंवा नाही ऐकले तर काय होईल… त्यांची परिणाम
काय असतील आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ती गोष्ट मुलांना करून दाखवा
जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे…..! या चार पद्धतीने तुम्ही मुलांना गोष्टी
शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दा बाहेर असणार नाहीत..

मुलांना आरडा ओरडा आदळ आपट करून जर सांगायल गेलात तर मुले
रडतील… घाबरतील… आणि तुमचेऐकणार नाही. या उलट वरील चार
पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितले तर मुलं तुमचे म्हणणे ऐकतील.

मुलांना शिक्षा करायची तर त्यांना मारू नका… ओरडू नका….
त्याऐवजी त्यांचे टीव्ही बघणे बंद करा… मोबाईल बंद करा…. त्यांना
खाण्यामध्ये मेथी… पालक… जमतील तेवढ्या पालेभाज्या खायला द्या.
या शिक्षेचे चार फायदे होतील… एक तर मुलांची बॉडी डिटॉक्स होईल.
शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्यांच्या शरीराला मिळतील.
कुठलेही आढेवेढे न घेता…मुलांची बुद्धी… मुलांचे डोके डिटॉक्स होईल.
काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल.
चुका कमी करतील.. अशी शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची
वेळ येणार नाही.

Good Thoughts In Marathi – changle vichar  

5) आई वडील नोकरी करत असतील किंवा दोघेही काही ना काही काम करत
असतील तरीही आपल्या व्यस्त वेळेतून महिन्यातून कमीत कमी 30 तास तरी
फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा. मुलांसाठी असलेल्या वेळात तुम्ही तुमचे
कुठलेच काम करणार नाही तो वेळ फक्तत्यांच्यासाठी असेल याची काळजी घ्या.
मग तो वेळ तुम्ही प्रत्येक दिवसातून थोडा वेळ काढा किंवा एक दिवसाआड किंवा
हप्त्यातून एक पूर्ण दिवस असा काढा काही हरकत नाही. हा वेळ जेवणाच्या
व्यतिरिक्त चा वेळ असायला हवा आणि हा वेळ दोघांनी द्यायला हवा फक्त आईने
किंवा फक्त वडिलांनी नाहीतर दोघांचाही वेळ हवा. तुमच्याकडे वेळ नाही म्हणून
तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तूमध्ये…. त्यांच्या खेळण्यांमध्ये….
त्यांचा आनंद शोधायला लावत असाल तर न वस्तूंची किंमत राहणार आहे….
न तुमच्या भावनांची किंमत राहणार आहे…. मुलं असंवेदनशील होत जातील…!

जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी…
तुमचे नियम…. तुमची व्हॅल्यू…. तुमचे संस्कार…. तुमची नितीमत्ता….
तुमचे गुण… हे त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि पुन्हा तीच वेळ
फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुले पैसे कमवायला लागतील तेव्हा
ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला
देण्यासाठी वेळ नसेल.

मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात. आपण त्यांची काळजी
करणे त्यांचे आपल्यावर अवलंबून असणे…. निस्वार्थ प्रेम आपल्याकडून
मिळणारे गायडन्स… आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. या
सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणे जरुरी
आहे.

6) मुलांना शिस्त लावत असतांना त्यांच्यावर संस्कार करत असतांना
घरातल्या मोठा माणसांचा म्हणजे त्यांच्या आजी- आजोबांचाही
त्यामध्ये सहभाग असू द्या. काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना
नाही समजावू शकत ते मुलं आपल्या आजी आजोबांकडून समजून घेऊ
शकतात..

हे changle vichar ही वाचा नक्की आवडतील आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील.

life changing motivational quotes in Marathi | changle vichar

7) सगळ्याच गोष्टी लाडात होत नाही काही गोष्टींसाठी मुलांना रागावणे
गरजेचे आहे. आणि मुलांना रागवतांना हे लक्षात घ्या. तुम्ही रागावला त्यांना
शिक्षा केली तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला… त्यांच्याशी गोड बोलायला
जाऊ नका. तुमच्या रागाचा तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर
होऊ द्या..

मुलांना कधी रागावलेच नाही…. नुसता लाड केला तर मुलांना मेंटल प्रेशर
घेण्याची क्षमता येणार नाही. बाहेरचे जग हे आपल्यापेक्षाही खूप कठोर आहे
आणि ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात आणायची असेल तर फक्त लाड
करून जमणार नाहीत. आणि या उलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागवून
काम होणार नाही. अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमचा राग
आणि तुमचा लाड यात तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवे.

Good Thoughts In Marathi – changle vichar

8) मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळे तुम्ही एकदाच देऊ शकत
नाही. यासाठी तुम्हाला साधा… सोपा… आणि सरळ मार्ग म्हणजे…. तुम्ही त्यांना या सात
गोष्टी शिकवा. शरीर (व्यायामाचे महत्व) विनम्रता…. प्रतिष्ठा…. कला…. धन….परिश्रम….
आणि दुनियादारी…..

तुम्ही मुलाना या सात गोष्टींबद्दल शिकवले तर यात बऱ्याचशा गोष्टी
मुलं शिकतील आणि तुमच्याकडून आवश्यक गोष्टी सुटणारही नाहीत.
आणि मुलांना हे सगळे शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात
कराव्या लागतील. कारण मुलं ते करत नाही जे तुम्ही त्यांना सांगता… मुलं ते
करतात जे तुम्ही करत असतात. म्हणून… मुलांना जे काही शिकवायचा आहे ते
स्वतः मध्ये आणा. मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप शिकतील… या सात
गोष्टींना विस्ताराने जाणून घ्यायचे म्हटले तर पोस्ट खूप मोठी होईल म्हणून या
पोस्ट मध्ये इतकेच. तुम्हाला जर हे विचार आवडले असतील आणि शेवटच्या
मुद्यातील या 7 विषयाबद्दल विस्ताराने वाचायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये
तसे कळवा. मी त्यावर अजून एक व्हिडियो बनवणार पोस्ट लिहणार आणि पोस्ट ला लाईक
शेअर आणि ब्लॉग ला तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू
नका.

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम पालक म्हणून
वाचायलाच हवे – changle vichar marathi

अतिशय महत्त्वाच्याआई वडिलांसाठी २१ सुचना

आपली मुले जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक
आई-वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवे.

changle vichar 

१) मूल हि गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची
काठी म्हणून मुलांकडे पाहू नका.

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम - changle vichar
जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम – changle vichar

२) आपल्या मुलांची गरज समजून घ्या.

३) रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा.

४) घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका. त्याचा वाईट परिणाम
मुलांवर होऊ शकतो.

५) आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे.

६) मुलांदेखत कुठलेही व्यसन करू नका.

७) ऑफिस मध्ये जातांना बॉस म्हणून जा. पण घरी येताना वडील म्हणून या.

८) मुलांना कधीही नकारात्मक बोलायचे नाही. नालायका…. गधडा….
वगैर सारखे शब्द वापरणे टाळावे.

९) मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई….
मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा. यामुळे मुलांच्या मनातील
भीती दूर होण्यास मदत होईल. जसे की झाडावर चढणे.

changle vichar

१०) कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून
घ्या. मूल कितीही लहान असेल तरी….! Process समजावून सांगा. यावरून
मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल.

११) मुलांच्या Progress बुक कडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला हवा.

१२) समाजात घडणाऱ्या तरुण मुले हत्या… आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची
मूळ लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात…. यासाठी घरातील ‘बाबां’नी
ऑफिस मध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान… लॉस…. घरी कुटुंबाशी शेयर करा.
मूल कितीही वयाचे असेल तरीही…! यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास
लढा देण्यास मदत होईल.

Good Thoughts In Marathi – changle vichar  

१३) आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता. वयाच्या कोणत्याही
टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले
गुरू व्हा.

१४) मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा.

१५) रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला.

१६) मुलाना घालून पाडून बालू नका…मूल तुम्हाला हळूहळू Avoide करतील.

१७) मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा.
चांगले काम केलेले असेल तर कौतुक करावे.

changle vichar

१८) मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना
लहानपणीचे बाबा आठवणार आहेत…पैसे नाही.

१९) मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत….
मूल खोट बोलायला शिकतात .

१८) तू जर असे केलस तर मी सोडून जाईन. तुला एकटे सोडून देईल
असे मुलांशी कधीही बोलू नये.

१९) मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावे.

२०) यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते.

२१) आपल्या मुलांचे आदर्श बना.

जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 8 नियम – changle vichar

हे ही changle vichar वाचायला नक्की आवडतील.
best lines | quotes in Marathi, चांगले संस्कार, changle vichar

Good Thoughts In Marathi – changle vichar 

sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

10
sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

नमस्कार मित्रांनो, जीवन आहे तर सुख दुःख लागले आहे.
जीवनात जर दुःख आले तर त्यातून लवकर बाहेर पाडण्यासाठी
या पोस्ट मध्ये हे sunder suvichar in marathi
तसेच ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

sunder suvichar in marathi –
ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

दुःखातून लवकर बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

दुःखी असतांना व्यक्तीने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करू नये.

मनाविरुद्ध किंवा एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की…
माणसाला दुःख होणे स्वाभाविक आहे. पण त्याच्या मुळात जाऊन
कारण शोधल्यास त्या अवस्थेतून बाहेर यायला नक्कीच मदत होऊ शकते.

दुःखी असतांना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात… किंवा आपल्याकडून
केल्या जातात.पण काही गोष्टी अश्या आहेत… ज्या दुःखात असतांना
कधीच करू नयेत.

१ ) दुःखात, त्रासात असतांना कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेवू नये…
तर शांत राहून… विचार करूनच मग योग्य तो पर्याय निवडावा

२ ) जेंव्हा मन दुःखी असेल तेंव्हा जास्त रडू नये. यामुळे
तुमच्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो.

३ ) कितीही दुःख झाले तरीही व्यसनाच्या किंवा
कोणत्याही नशेच्या आधीन होऊ नये.

४ ) आपले दुःख पटकन कोणाला सांगू नये. याला कारणही तसेच आहे…
ज्या व्यक्तीजवळ आपण आपले दुःख व्यक्त करतोय ती आपल्याला
समजून घेतेय की नाही हे त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते.
कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात… कोणी कोणाचे दुःख समजून
घेऊ शकत नाही. हेच अंतिम सत्य आहे. त्या दुःखातून फक्त आणि फक्त
तुम्ही स्वतःच खंबीरपणे बाहेर येऊ शकता.

५ ) दुःखात असतांना सकारात्मकतेसाठी स्वेच्छेने आपल्या आवडत्या
देवाचा जिथे आपली श्रद्धा मनापासून असेल त्या देवाचा जप करावा.
नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे. ज्या गोष्टींमुळे आपल्या आरोग्यावर
परिणाम होईल असे काही करू नये. जितका जास्त सकारात्मक
विचार करता येईल तितका करावा.

sunder suvichar in marathi –
ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

आता आपण दुःखात असतांना काय करावे..?

१ ) दु :खी असतांना अश्या आठवणींना उजाळा द्या… ज्या तुम्हांला आनंद देतील

२) दुःखात असतांना कधीही देवाला किंवा नशिबाला दोष देऊ नये. देव त्याचे कर्तव्य
अगदी चोखपणे पार पाडत असतो. आपल्याला नक्की काय करायला हवे… आपण
कुठे चुकत आहो का याचा विचार करून… आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे…..!

३) शक्य असल्यास आनंदी संगीत ऐकावे. संगीत ही अशी गोष्ट आहे… त्यामुळे
आपण आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतो.

४ ) दुःखात असतांना आपल्या मनात येणारे विचार इतरांना सांगण्यापेक्षा
आपल्या डायरीत लिहून ठेवावे. शांत राहावे…. चिडचिड करू नये

५ ) दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घ्या.
त्याने तुमचे मन फ्रेश राहील.

दुःखातून लवकर बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा |
sunder vichar in marathi #marathi
#marathiknowledge

सुंदर विचार मराठी | सुविचार | suvichar marathi

sunder suvichar in marathi –
चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा… –
सोपे सुविचार मराठी

sunder suvichar in marathi -चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा... - सोपे सुविचार मराठी
sunder suvichar in marathi – चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा… – सोपे सुविचार मराठी

नेहमी अश्या व्यक्तींबरोबर राहात जा….
जी तुमच्यामधून Best गोष्टी बाहेर काढेल…..
Stress नाही…..!

sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

तुम्ही जे काही ऐकता त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण
खोटे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते.

sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

नाते टिकवण्यासाठी कधीही भीक मागू नका. ज्याला तुमच्या
सोबत राहायचे आहे… त्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करा.
जे तुमच्यासोबत असण्याचे ढोंग करतात…. त्यांना बाजूला सारा.

sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

अश्या लोकांपासून नेहमी लांब राहा. जे कधीही स्वत:ची चूक
कबूल करत नाही. आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार
धरतात.

सतत लोकांना खुश करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे
आहात तसेच राहा. स्वत:वर काम करत राहा. कठोर
परिश्रम करा… कष्ट करा…

जी योग्य लोक आहेत… ती स्वत:हून तुमच्या आयुष्यात
येतील आणि कायमस्वरूपी राहतील.

ज्या लोकांना फक्त गरज असतांना तुमची आठवण
येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला भाग्यवान
समजा. कारण तुम्ही त्या मेणबत्ती सारखे आहात जी
कितीही गडद अंधार असला तरी…. पूर्ण परिसर प्रकाशमय
करून टाकते.

ह्या जगात कोणालाही तुम्हाला judge करायचा अधिकार नाही.
कारण तुम्ही किती संकटे पार करत इथे पोहोचला आहात….
हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे लोकांच्या मताला
जास्त महत्व देऊ नका.

तुम्ही आयुष्यात जे काही कराल… चांगले किंवा
वाईट…. लोकं काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल
Negative बोलतीलच. आणि ह्यालाच आयुष्य म्हणतात.

sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

तुम्ही एखाद्यासाठी ९९ चांगल्या गोष्टी करा. आणि त्यांना फक्त
एक गोष्ट आठवेल…. जी तुम्ही त्यांच्यासाठी केली नाही.

आयुष्याचे तीन सोपे नियम

१. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही…
तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही.

2. तुम्ही जर विचारलेच नाही….
तर उत्तर नेहमी नाही असणार आहे.

३. जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही…
तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल.

ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही….
त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका.

ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही. त्याचा द्वेष करू नका. जी
गोष्ट तुम्ही करू शकत नाही.. ती बोलू नका. तुम्हाला
माहित नसलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नका.

sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा
Singal राहिलेले कधीही चांगले.

कधीही कोणाला जास्त प्रेम…. आपुलकी…. किंवा
मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका. कारण….
माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली….
की त्याची त्याला किंमत राहत नाही.

मानसशास्त्र सांगते की….. लोकांना माफ करायला शिका.
ह्याचा अर्थ असा नाही कि समोरचा माफी साठी पात्र आहे.
ह्याचा अर्थ तुमच्यासाठी मन:शांती महत्वाची आहे.

sunder suvichar in marathi - ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
sunder suvichar in marathi – ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

तुमचे हृदय म्हणजे टेंशन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही.
ते तर आनंद आणि गोड आठवणींचे गुलाब ठेवण्यासाठी
सोन्याची पेटी आहे.

sunder suvichar in marathi
चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा…
सोपे सुविचार मराठी

मित्रांनो या मधून तुम्हाला कोणता विचार आवडला हे मला कॉमेंट
मध्ये नक्की कळवा. पूर्ण पोस्ट बघण्यासाठी खूप खूप आभार
परत भेटूया नवीन सुंदर विचारांच्या पोस्ट सोबत.

sunder suvichar in marathi - सोपे सुविचार मराठी
sunder suvichar in marathi – सोपे सुविचार मराठी

ओझे आणि मन अशा ठिकाणी हलके करावे.
ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील….!

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - sunder suvichar in marathi
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार – sunder suvichar in marathi

संधीची वाट बघण्यात वेळ वाया घालवू नका.
ती निर्माण करण्याची धमक तुमच्यात आहे
हे स्वतःला सांगा.

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - sunder suvichar in marathi - vb
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार

ज्याच्या जवळ निस्वार्थ असे मानुसकीचे धन असते
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कुठल्याही पद… प्रतिष्ठा…
अथवा पैशाची गरज भासत नाही.

संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे
दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची
खरी ओळख होतच नाही..

सोपे सुविचार मराठी - good thoughts in marathi
सोपे सुविचार मराठी – good thoughts in marathi

शिक्षणातून व कुटुंबातून घेतलेले ज्ञान मनुष्य कदाचित विसरेलही….
परंतु जीवनातील अनुभवातून घेतलेले धडे तो कधीच विसरत नाही.

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - suvichar marathi
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार – suvichar marathi

जी माणसे आपली चौकशी करतात ती माणसे आपली
जवळची असतात. आणि जी माणसे आपल्या
चौकश्या करतात ती माणसे कधीच आपली नसतात.

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - inspirational quotes in mrathi
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार – inspirational quotes in mrathi

विश्वास हा चौकशी करुनचं ठेवा…..! मात्र विश्वास ठेवल्यावर
चौकशी करू नका…! कारण विश्वास हा श्वास असतो…

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - positive thoughts in marathi - विश्वास
विश्वास हा चौकशी करूनच ठेवा. सुंदर sunder vichar in marathi

जीवनातले गणित फार सोपे होऊन जाते राव…!
फक्त आपल्या वागण्यात गरजा कमी ठेवता
आल्या की जगण्यात आनंद भरपूर वाढतोचं

सोपे सुविचार मराठी - good thoughts in marathi
सोपे सुविचार मराठी – good thoughts in marathi

शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा
माणूस जेव्हा मनाने खचून जातो… तेव्हा जगातली
कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही.

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - positive thoughts in marathi
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार – positive thoughts in marathi
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - positive thoughts in marathi - vb
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार – positive thoughts in marathi

आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे आपल्या आतच असतात.
आणि आपण त्याला जगभर शोधत असतो….!

मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार - marathi suvichar
मनाला प्रेरणा देणारे सुंदर मराठी सुविचार – marathi suvichar

आयुष्यात एकच गोष्ट करा… स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी
दुसऱ्याचे नाव बदनाम करू नका.

चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो.
याचे परिणाम त्याला वाईट काळात दिसतात….!

थोडा वेळ लागेल पण आपण चांगल्या भावनेने पेरलेले
चांगलेच उगवते. मग ते आपले कर्म असो किंवा आणखी
काही.

दुखा:चा विचार करत बसले की समोर उभे
असलेले सुख पण डोळ्यांना दिसत नाही….!

सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा
माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते.

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे. कारण यश
नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात…!

जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन
उभे रहा. त्यामुळे संकटांची उंची कमी होते. आणि
तिच संकट पार पण करता येतात…!

आयुष्यात एकच गोष्ट करा – नवीन मराठी सोपे प्रेरणादायी सुविचार
sunder vichar in marathi @VijayBhagat

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम – शांत मनाने वाचा

0
झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम - शांत मनाने वाचा
झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम - शांत मनाने वाचा

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम

सध्या भौतिक व्यस्ततेमुळे लोकं रात्री उशीरा झोपतात. आणि
सकाळी उशिरा उठतात. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
व्यवहारात असंतुलनामुळे सामाजिक वातावरण देखील कुप्रभावित होते.
चांगली झोप आमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक
आहे. आणि योग्य जागरण आमच्या चेतनेचा विकास आणि जीवनात यश
गाठण्यासाठी आवश्यक आहे. नियमाने चालणे आवश्यक आहे. तर जाणून
घ्या 23 झोपेसंबंधी धर्मशास्त्रातील नियम – झोप आणि जागरण याचे नियम
जाणून घेणे आवश्यक आहे. #marathi

झोपेचे नियम

नियम 1 :-
झोपण्यापूर्वी दररोज पाच-दहा मिनिटे ध्यान करून मग झोपावे.
योग निद्रेत झोपू शकत असाल तर योग्य ठरेल.

नियम 2 :-
रात्री प्रथम प्रहरी झोपून जावे.

नियम 3 :-
ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास
लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.

नियम 4 :-
पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये.
( पदमपुराण )

नियम 5 :- पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. शिक्षणात प्रगती होते.

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम

नियम 6 :-
पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते.

नियम 7 :-
उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्युभय राहते.

नियम 8 :-
दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते.

नियम 9 :-
देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये.

नियम 10 :-
नग्न अवस्थेत झोपू नये. (धर्मसूत्र)

नियम 11 -:
विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ
झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. (चाणक्य नीती)

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम

नियम 12 :-
झोपलेल्या व्यक्तीस
अचानक उठवू नये.

नियम 13 :-
निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे
3:40 ते 4:28 च्या दरम्यान उठले पाहिजे ( देवी भागवत )

नियम 14 :-
सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये.

नियम 15 :-
तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये. (महाभारत)

नियम 16 :-
दिवसा कधीही झोपू नये. परंतु ज्येष्ठ महिन्यात 1 तास 48 मिनटे झोपू शकता.
( दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. )

नियम 17 :-
सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असाह्य होतो. (ब्राह्मवैवर्त पुराण)

नियम 18 :-
सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे.

नियम 19 :-
डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

नियम 20 :-
यम आणि दृष्ट देवतांचे निवास्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे
पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि त्यामुळे
मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरण शक्ती कमी होते. शिवाय
बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते.

नियम 21 :-
हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये.

नियम 22 :-
पलंगावर बसून खाणे तसेच पिणे अयोग्य तसेच अशुभ मानले जाते.

नियम 23 :-
झोपतांना वाचन करु नये.आणि असे केल्याने नजरदोष निर्माण होतो.

आता जाणून घ्या… उठण्याचे नियम :-

1. ब्रह्म मुहूर्तात उठणे सर्वात योग्य आहे. सूर्योदयाहून किमान
दीड तासापूर्वीची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त असते.

2. अती विचार… कल्पना… करणे हे अर्धजाग्रत अवस्थेचा भाग आहे.
हे जागरणाच्या विरुद्ध आहे.

3. दिवास्वप्न बघू नये. दिवास्वप्न बघितल्याने मनाची दृढता संपते.

4. मन भटकत असल्यास ध्यान रूपात मनोरंजन करता येऊ
शकते. याने जागरणाची रक्षा होईल.

5. नशा आणि तामसिक भोजन यामुळे जागरण खंडित होते.
हे शास्त्र विरुद्ध कर्म आहे.

6. ध्यान किंवा साक्षी भाव यात राहिल्याने जागरण वाढते.

या सर्व नियमांचे अनुसरण केल्याने कीर्ती वाढते. तसेच निरोगी
व दीर्घायुष्य लाभते.

23 झोपे संबंधी धर्म शास्त्रातील नियम –
झोप आणि जागरण याचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
#marathi #धर्मशास्त्र #अध्यात्म

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

असे वागा… जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच तुमची आस धरतील

2
असे वागा- जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात - तेच तुमची आस धरतील
असे वागा- जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात - तेच तुमची आस धरतील

नमस्कार मित्रांनो, त्यांच्यासोबत असे वागा..  जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
एक वेळ अशी येईल तेच तुमची आस धरतील. Act like this
only those who ignore you will crave for you.
Heart touching motivational and inspirational
speech for breakup.

एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करते. तुमच्याकडे
लक्ष देत नाही. तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच
फरक पडत नाही…! तर नेमके काय करायचे.

त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो… याचे त्या व्यक्तीला
काहीच पडलेले नसते. त्यावेळेस त्या व्यक्तीसोबत कशा पद्धतीने वागायचे….?
आपण कसे वर्तन ठेवायचे.

असे वागा…
जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील

जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्याला भाव देत
असाल किंवा तुम्ही त्याला सतत विचारताय काय झाले…? तू माझ्याशी
का बोलत नाही….? माझे काय चुकले…? जर असे पुन्हा पुन्हा विचारत
जाल तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल…. म्हणजेच…. माझ्याशिवाय याच्या
आयुष्यात काहीच नाही. मी कसाही वागलो… तरी हा माझ्याकडे येणार…
असे त्याला वाटत राहते. आणि तो जास्त भाव खातो. म्हणून तुम्ही त्याला
जास्त भाव देणे प्रथम बंद करा. तुम्ही बिझी व्हा… स्वतःला कामांमध्ये गुंतवून
ठेवा. तेव्हा ती व्यक्ती तुमचा विचार नक्कीच करू लागेल.

हा आपल्याला काहीच विचारत नाही विसरून गेला का…? असे केल्याने
तीच व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल. आपली
किंमत आपणच वाढवायची आहे. त्या व्यक्तीला दाखवून द्या की….
मी ही खूप कामात असतो तुझ्यामुळे माझे काही अडत नाही.

Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी

अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे आपल्याला शक्य होत नाही.
पण आपल्या भल्यासाठी करावाच लागेल. तुम्हाला किंमत देत नसेल….
तर स्वतःमध्ये बदल हा घडवावाच लागेल. आणि हा बदल तुमच्या
नेहमी हिताचाच असतो.

हे सगळे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल. तुम्ही
तुमची किंमत कमी करून घेऊ नका. तू कुठे होतास…..? मला का
सांगितले नाही…? मला विचारले का नाही…? असे प्रश्न विचारून तुम्ही
त्याला जास्त भाव अजिबात देवू नका.

त्याच्या वैयक्तिक जीवनात जास्त ढवळाढवळ करू नका. यामुळेही
ते तुम्हाला इग्नोर करत असतात. जर एखादी गोष्ट त्याला आवडत
नसेल तर करू नका. तुम्ही परिस्थिती नुसार तुमचे वर्तन ठेवा.
तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही… तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात
काही अर्थ नाही. असे बोलणे प्रथम बंद करा.

असे वागा…
जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील

यासाठी तुम्ही तुमच्या मध्ये बदल करा. स्वतःला महत्त्व द्या. तेव्हाच
समोरची व्यक्ती तुम्हाला ही महत्व देईल. स्वतःमध्ये बदल घडवा.
आपण कुठे चुकतो… आपण काय केले पाहिजे… यावर काम करा
आणि तुमच्या चुका दुरुस्त करा. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा.

ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो… त्या गोष्टी नक्की करा.
आणि आनंदी राहा. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा. त्यामध्ये
तुमचा वेळ घालवा. तुमचा व्यक्तिमत्व भारदस्त बनवण्याचा
प्रयत्न करा.

तुम्ही दुसऱ्याचे नाही…. तर तुमचे दुसऱ्यांनी आचरण केले पाहिजे…
एवढे परफेक्ट स्वतःला बनवा. आणि महत्त्वाचे म्हणजे एटीट्यूड
मध्ये जगायला शिका.

नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका. असे जगा की…
समोरच्याला आपल्याकडे बघून जगायची इच्छा झाली पाहिजे.
तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा. तुमच्याकडे बघून वाटले
पाहिजे. याला कशाचा एवढा सुख आहे… की तो तेवढा आनंदी आहे….!
एवढे स्वतःला आनंदी आणि खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.

Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी

यासाठी स्वभावामध्ये बदल करणे मात्र फार महत्त्वाचे आहे.
ज्या वेळेस तुम्ही तुमच्या वर्तन आणि विचारात बदल कराल
त्यावेळेस समोरची व्यक्ती आपोआप बदलेल.आणि तुमच्या
मध्ये झालेला बदल तो व्यक्ती नक्की स्वीकारेल. आणि त्याच्याकडून
झालेल्या चुका तो नक्की दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल.

जर त्याला गरज असेल तर तो त्याच्या कडून तुमच्या सोबत
असलेले नाते टिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल.

असे वागा…
जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील

sunder vichar in marathi –
अशी वाढवा स्वतःची किंमत….. तरच लोकं तुमचा
मानसन्मान करतील…

असे वागा - जे तुमच्याकडे दुर्लक्ष करताततेच तुमची आस धरतील - vb
असे वागा – जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच तुमची आस धरतील
१. दिलेला शब्द मोडू नका.

आजच्या जगात खूप कमी लोकं असे आहेत जे स्वतः दिलेला
शब्द पूर्ण करतात. जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल
तर स्वतःला असे बनवा की लोकं लगेच तुमच्यावर विश्वास ठेवायला
तयार होतील. म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला शब्द नेहमी पूर्ण करा.

तुम्ही जर एखाद्याला शब्द दिला असेल तर ती गोष्ट तुम्ही पूर्ण केलीच
पाहिजे. अशा व्यक्तींना लोकं खुपच महत्त्व देतात. व त्यांचा आदर करतात.

२. गबाळ्यासारखे राहाणाऱ्या व्यक्तीचा लोकं कधीच आदर करीत नाही.

जे लोकं स्वतः ला स्वच्छ आणि फिट ठेवतात त्यांच्याकडे लोकं
वेगळ्याच नजरेने बघतात. म्हणून सगळ्यात आधी आपल्या
व्यक्तीमत्वात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करा.

नेहमी चांगले कपडे घालून स्वतः ला प्रेझेंट ठेवा. तुम्ही कितीही ज्ञानी असले
तरीही सगळ्यात आधी लोकं तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत बघत असतात.
आणि जर आपला पेहरावच चांगला नसेल तर लोकं दुर्लक्षच करतात. आणि
मग कोणीच तुमची रिस्पेक्ट करत नाही.

३. आपली कमजोरी कोणालाच सांगू नका.

एक मजबूत माणूस तोच असतो जो आपल्या आयुष्यात आलेले
दुःख एकटाच सहन करत असतो. पण आपल्या आयुष्यातले सुख
तो इतरांसोबत वाटून त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतो.
अशी व्यक्ती खरोखरच मान सन्मान देण्याच्या लायक असते. कारण
हा एक खास गुण आहे जो सगळ्यांमध्येच नसतो. आजकालचे लोकं
दुसऱ्यांमध्ये फक्त एखादी कमजोरी शोधत असतात. की आपण त्याची
कमजोरी पकडू आणि सगळ्यांसमोर त्याला बेइज्जत करू. त्याची खिल्ली
उडवू आपल्या आजूबाजूला असेच लोकं असतात. त्यामुळे आपण हे
लक्षात ठेवले पाहिजे…. की आपली जी काही कमजोरी आहे ती कधीच
कोणालाच कळता कामा नये. नाहीतर लोकं तुमच्या त्याच कमजोरीचा
फायदा घेतील.

४. कोणालाच घाबरू नका.

जर तुम्हाला लोकांमध्ये स्वतःचा मान वाढवून घ्यायचा असेल
लोकांनी आदर द्यावा असे वाटत असेल तर कधीच कोणाला
घाबरू नका. अशा वेळी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये
सांगितलेले शब्द लक्षात ठेवायचे आहेत. की कोणीच तुम्हाला मारू
शकत नाही. कोणीच तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. फक्त
तुम्ही कधीच चुकीच्या मागनि जाऊ नका. व चुकीचे कार्य करू नका.

हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून द्यायचे की तुमच्या मनात
कोणत्याच गोष्टीविषयी भीती नाही आहे. व तुम्ही नेहमीच सत्य
आणि न्यायासाठी आणि खरे बोलण्यासाठी तयार आहात.

स्वतः ला मजबूत दाखवताल तरच लोकं तुम्हांला मान देतील.
निडर लोकांना समाजात नेहमीच आदर दिला जातो.

५. सगळ्यांसोबत प्रेमाने राहा.

मानसन्मान त्याच व्यक्तीला मिळतो… जी व्यक्ती इतरांना
मानसन्मान देते. जर तुम्ही सगळ्यांबरोबरच भांडण.. तंटे…
करत बसलात तर समाजात तुमची प्रतिमा खराब होईल. आणि
कोणीच तुम्हाला मानसन्मान देणार नाही. ही एक खूप मोठी गोष्ट
आहे जी एका अज्ञानी किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा सगळ्याकडून
आदर मिळतो. जरी कोणी लहान असेल किंवा मोठे सगळ्यांसोबत
प्रेमाने राहा.

असे वागा…जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील

सगळ्यांशी बोलताना हसत हसतमुखाने आणि मनमिळाऊपणे बोला.
त्यामुळे सगळ्याच्या मनावर तुमचा सकारात्मक प्रभाव पडेल. व प्रत्येक
जण तुम्हाला चांगल्या हेतूने लक्षात ठेवेल. व त्यांच्या मनात तुमच्याविषयी
खूपच इज्जत वाढेल.

६. प्रत्येक वेळी सर्वांसाठी उपलब्ध राहू नका.

तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल की एकाच ठिकाणी सारखे सारखे
गेल्यामुळे आणि दुसऱ्यासाठी लगेच हजर राहिल्यामुळे माणूस
स्वतःचा मान कमी करून घेतो.

असे असल्यावर लोकं तुम्हांलाकाहीच महत्त्व देत नाहीत. तेअसे समजतात
कि याला पाहिजेतेव्हा बोलवून घ्या. नाहीतर त्यालाबोलवायची गरज नाही आहे.
तो तर कायमच येतो. म्हणजे तुम्हाला कोणीच सिरीयसली घेत नाही.

आजच्या जमान्यात लोकांना थोडी वाट बघायला लावणे गरजेचे आहे.
तरच ते तुमची किंमत समजतात. आणि तुम्हाला मानसन्मान देतात.

७. सडेतोड उत्तर द्यायला शिका.

आज काल चे जग असे आहे की कमजोर व्यक्तीला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला
जातो. आणि एकदा का आपण समोरच्याला घाबरून राहिलो… तर ती व्यक्ती मुद्दाम
तुम्हाला नेहमीच दाबून टाकण्याचा प्रयत्नकरते. आणि मग त्यांना बघूनलोकं पण तुमची
मजा घ्यायलालागतात. असे झाल्यास आपणलगेच याला विरोध केला पाहिजे.

जर कोणी भांडण्याच्या आवेशामध्ये तुमच्याशी बोलत असेल तर तुम्ही
पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे.
त्यामुळे आपल्या वाट्याला कोणी जात नाही. आणि लोकांमध्ये आपल्याविषयी
भीतीयुक्त दरारा आणि इज्जत राहाते.

८. वेळेचा सदुपयोग करा.

जर तुम्हाला एक अप्रतिम व्यक्तिमत्व बनायचे असेल तर वेळ वाया घालवणे
बंद करा. आपण आपल्या आजूबाजूला अनेक असे लोकं बघतो की जे खूपच
कडक शिस्तीचे जीवन जगत असतात.

त्यांची बरोबरी करणे कठीण आहे.पण तुम्ही तुमचा वेळ कशातही वाया
घालवत असाल तर कोणीच तुम्हालापसंत करणार नाही. सगळेजण
तुम्हाला टोमणेच मारतील. म्हणूनरिकाम्या वेळेत असे काहीतरी काम
करा की ज्यामुळे निदान दुसऱ्याला तरी काहीतरी फायदा होईल.

९.यशस्वी बना.

जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रगती केली तर लोकं स्वतःहूनच तुमचा
आदर करतील. मग तुम्हालाकोणाकडूनच जाणून घ्यायची गरज
नाही की आपला मानसन्मान कशा वाढवायचा. कारण आजच्या जगात
लोकं फक्त सक्सेसफुल लोकांचाच आदर करतात.

तुम्ही आयुष्यात कितीही शिकलेले असले… तरीही जोपर्यंत तुमच्याकडे
एखादी चांगली नोकरी नाही… किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाहीं..
तुम्ही यशस्वी होत नाही. तोपर्यंत लोकं तुम्हाला विचारणार पण नाही. त्यामुळे
आजच्या तरुण पिढीने आपल्या करिअर कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तुम्ही जर यशस्वी असाल तरच लोकं तुम्हाला मानसन्मान देतील.

१०. आपले कौशल्य जगाला दाखवून द्या.

काही लोक नेहमी विचार करत असतात की काय केल्याने
सगळे जण माझे नाव काढतील. पण त्यासाठी योग्य ते प्रयत्न
कोणीच करत नाही. हो हे खरे आहे. लोक इज्जत करतात ते
फक्त माणसामध्ये असलेल्या प्रतिभेची… माणसाची नाही….!

ते जग कधीचेच गेले… ज्यावेळीमाणसांचा आदर केला जात होता.
आत्ताच्या जगात फक्त माणसामधल्या प्रतिभेचा आदर केला
जातो. आजच्या जगात लोकाकडून आदर मिळवायचा असेल तर
तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा तुम्ही लोकांना दाखवूनच दिली पाहिजे.
तरच लोकं तुम्हाला मानसन्मान देतील. त्यामुळे तुमच्या मध्ये जेवढे
पण चांगले गुण आहेत आणि काही करून दाखवण्याची क्षमता आहे
तर तुम्ही लोकांना दाखवून द्या. मगच लोकं तुमचा आदर करतील.

असे वागा…जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात
तेच तुमची आस धरतील

हे मराठी प्रेरणादायी सुविचार – सुंदर विचार आणि पन्नासपेक्षा जास्त मराठी कोटस एकदा नक्की वाचा.

50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी | Sunder vichar

काही लोकांना ओळखण्यात चूक होते – sunder suvichar in marathi

0
सुंदर सुविचार , sunder vichar in marathi
सुंदर सुविचार , sunder vichar in marathi

काही लोकांना ओळखण्यात चूक होते.
sunder suvichar in marathi

सुंदर सुविचार

नमस्कार मित्रांनो… आपल्या सर्वांना शुभ दिवस

मित्रांनो… जीवनाची वाटचाल करत असतांना आपल्या जीवनाचा प्रवास
करीत असतांना आपल्या हातून अनेक चुका होत जात असतात.
त्या आपण सुधारत जायचे. आपल्याला वेगवेगळ्या वाटा सापडत जातील
त्याचाही शोध घ्यायचा.माणसे बदलत जातील त्याचाही स्वीकार करायचा.

परिस्थिती शिकवत जाईल… आपण शिकत जायचे. येणारे दिवस ही निघून जातील
त्यातील क्षण जपत जायचे. विश्वास तोडून अनेक लोकं जातील आपण स्वतःला
सावरत जायचे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग परीक्षा घेत जातील आपण आपली
क्षमता दाखवत जायचे.

मित्रांनो, हे सगळे केले तरच आपला हा प्रवास आनंदाई…. आणि चांगल्या गतीने…
चांगल्या पद्धतीने… होत राहील. या सगळ्यांना तोंड देण्यासाठी मी आपल्यासाठी
सुंदर सुविचार , sunder vichar in marathi ,
good thoughts in marathi ,sope suvichar ,
navin marathi suvichar , सुंदर विचार… दिशादर्शक….
मार्गदर्शक… विचार घेऊन येत असतो.

मित्रांनो आजही असेच sunder suvichar in marathi आपल्यासाठी घेऊन
आलोय. करूया सुरुवात सुंदर सुविचारांना…. सुंदर विचारांना…

सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो
पण सत्य कधीच हारत नाही.

sunder vichar in marathi - changle vichar
sunder suvichar in marathi – changle vichar

मनमोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय
आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात.

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस

फार साधे राहू नका…. लोकं तुमचा घात करतील

एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आले तरी ठीक आहे….
नका घेऊ…! पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात
ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगतही फिरू नका.

sunder suvichar in marathi

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच
करू नका. कारण ती व्यक्ती स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट
व्यक्ती समजून जळत असते.

दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते
त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही.

जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य
तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नये
बऱ्याचदा सत्य फार वेगळे असते.

अति विचारांमुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक
समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात.

जिथे चुकत नाही तिथे झुकत नाही… हा बाणा बाळगला
की तुमच्या नादाला कोणीच लागत नाही.

sunder vichar in marathi - changle vichar
काही लोकांना ओळखण्यात चूक होते.. सुंदर सुविचार – sunder suvichar in marathi

काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण
तीच चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते.

sunder vichar in marathi - changle vichar
sunder suvichar in marathi – changle vichar

कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही. त्या व्यक्तीशिवाय
कोणीच आवडत नाही हे प्रेम आहे.

चेहऱ्यावर कोणताही भाव
न दाखवणारी माणसे जास्तीत
जास्त डेंजरस असतात.

sunder vichar in marathi - changle vichar
sunder suvichar in marathi – मराठी सुविचार – changle vichar

या जगात चप्पलशिवाय दुसरे
कोणतेच परफेक्ट कपल नाही
कारण एक हरवली तर
दुसऱ्याचे जीवन तिथेच संपते.

sunder vichar in marathi - changle vichar - सुविचार
sunder suvichar in marathi – changle vichar – सुविचार

रुबाब तेव्हाच करा जेव्हा
बापाच्या कष्टाचे नाही तर
स्वतःच्या कष्टाचे पैसे खिशात
असतात.

sunder vichar in marathi - changle vichar
sunder suvichar in marathi – changle vichar

दहा वेळा पराभव झाला तरी
चालेल पण एक विजय असा
मिळवा की लोकं नेहमी लक्षात
ठेवतील

माणसाला स्वतःचा फोटो
काढायला वेळ लागत नाही
पण स्वतःची इमेज बनवायला
काळ लागतो.

शाररिक ताकदीपेक्षा
मानसिक ताकदच मानवाला
सशक्त बनवून लढण्यास प्रवृत्त
करते.

sunder vichar in marathi - changle vichar
sunder suvichar in marathi – changle vichar

आयुष्य हे one way सारखे आहे
मागे वळून पाहू शकतो. पण मागे
जाता येत नाही. म्हणून प्रत्येक
क्षण आनंदात जगा.

शांत स्वभावाचा माणूस कधीही
कमजोर नसतो. या जगात
पाण्यापेक्षा मऊ असे काहीच
नाही. परंतु जर त्याचे पुरात
रूपांतर झाले तर भले भले
डोंगरही फोडून निघतात.

मिळालेला जन्म सार्थकी
लावण्यासाठी प्रेरणादाई
माणसांची गरज असते
आणि तीच गरज आपल्या
आयुष्यात आलेल्या चांगल्या
माणसामुळे पूर्ण होत असते.

sunder suvichar in marathi

दोष लपवण्याचा प्रयत्न केला
तर तो मोठ्ठा होत जातो आणि
कबूल केला तर नाहीसा होतो

लोक म्हणतात नाते हे विश्वासावर
टिकते. पण हे खरे नाही. नाते हे
समोरच्याला टिकवायचे असेल
तरच टिकते.

निरागसता इतकी असावी
की….चेहऱ्याला सौंदर्याची
गरज नसावी.

वाईट, दृष्ट, कपटी, लबाड
अशा वाईट स्वभावाची
माणसेच तर आपले गुरु
असतात. कारण त्यांच्यामुळे
तर चांगले वाईट ह्यातील
फरक कळतो.

यशाकडे जाणारा मार्ग हा
एकट्याने चालायचा असतो
त्यामुळे लोकांचा विचार
करणे सोडून द्या.

जे आपली बदनामी करतात
त्यांना करू द्या. कारण
बदनामी तेच लोकं करतात
जे आपली बरोबरी करूच
शकत नाहीत.

जास्त इच्छा नाही फक्त
आयुष्यातील पुढचे पाऊल
मागच्यापेक्षा चांगले असावे.

हे ही वाचा..
Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

पदरी अपयश आले की
कोणीही फारसे संबंध ठेवत
नाही जर का यशस्वी झालात
तर नसलेली नाती सुद्धा बोलती
होतात आपल्यातील चांगल्या
गुणावर सगळे गप्प राहतात
पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली
की मुकेही बोलू लागतात.

दोन अक्षरांची “लक” अडीच
अक्षरांचे “भाग्य” तीन अक्षरांचे
“नशीब” उघडण्यासाठी चार
अक्षरांची मेहनत उपयोगाला
येत असते. पण एक अक्षराचा
“मीपणा” माणसाचे जीवन नष्ट
करतो

मनापासून केलेली काळजी
मनातील दुःखाचा बराचसा
भार हलका करून जात
असते

Sundar suvichar | Marathi quotes | सुविचार मराठी
good thoughts काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण..

sunder suvichar in marathi

स्वतःला इतके बदला की तुम्हाला नाव ठेवणारे ही
तुमच्याकडे पाहत राहतील | चांगले विचार | चांगले संस्कार

sunder vichar in marathi

१) एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका. कारण…
कोणीच नेहमीच तुमच्याबरोबर कायमच असणार
नाही….! त्यामुळे एकटे राहायला शिका.

sunder vichar in marathi
sunder vichar in marathi

२) तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे.
ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल… त्याला वेळ देताना थोडा
विचार करून द्या. नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही…
याची काळजी घ्या.

३) आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत
तो तोडून टाकतात…..!

sunder vichar in marathi - सोपे नवीन मराठी सुविचार
sunder vichar in marathi

४) समजूतदार माणसाचे डोके चालते आणि
असमंजस माणसाची जीभ जोरात चालते.

५) या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही.
कारण तुम्ही जेवढे दबताल… लोक तुम्हाला तेवढेच
दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील.

६) बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की… जो माणूस साधा….
सरळ…. इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही.
आणि जो खोटे बोलतो…. बेईमानी करतो…. तो सगळ्यांनाच
आवडत असतो.

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

७) जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही… तेव्हा समजून घ्या
की…. तो माणूस चलाख आहे. आणि तो कोणाचाच नाही.

८) तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे. त्यामुळे त्याला चांगले
बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका.
जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर नक्कीच नैराश्य पदरात पडेल.

९) काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो…
ते समोरच्याबरोबर हात मिळविण्याच्या आधीच हिशोब करतात
की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे.

sunder vichar in marathi - सोपे नवीन मराठी सुविचार
sunder vichar in marathi – सोपे नवीन मराठी सुविचार

१०) एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते
की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो.

११) दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात. पण वेळ
जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात.

१२) जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते…
त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते.

१३) पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यामध्ये. कारण…
पैसा सगळे काही आहे… या जमान्यामध्ये….!

१४) थोडा धीर धरा. कारण… प्रत्येक दुःखानंतर सुखाची
वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असते.

sunder suvichar in marathi

१५) जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. जे खोटे
आणि गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते. पण जे
खरे बोलतात त्यांचे नाते तुटते.

१६) जो सगळ्यांनाच हा माझा… तो माझा सांगत राहतो
तो कोणाचाच नसतो.

१७) जर वर्तमान काळात खुश राहायचे असेल तर भूतकाळाचा
पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे.

हे विचार नक्की वाचा –

Best Hindi Suvichar With Images | सुंदर विचार

१८) चुकीची माणसे तेव्हाच जिंकतात जेव्हा
बरोबर असणारी माणसे गप्प बसतात.

१९) तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असले तरीही प्रॅक्टिस
आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकारच असते.

२०) जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्याशी परक्यासारखे
वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच
वाटत नाही.

२१) कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही
फेडता येत नाही.

२२) लोक जिवंत माणसांबरोबर नीट बोलत नाहीत आणि त्यांच्या
मृत्यूनंतर त्यांना हलवून हलवून विचारतात अर तू बोलत का नाहीस.
बोल माझ्याशी.

२४) कुणासाठीही समर्पण करणे… त्याग करणे अवघड नाही.
अवघड तर हे आहे की अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या
समर्पणाची कदर असेल.

२४) ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना
त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही. म्हणून
आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या
आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी.

२५) कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले
हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा. जिथे तुम्ही असता.

२६) झोपेवर आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो
त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

२७) त्याच्याबरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ
दुश्मनी करतात पण अशा लोकांचे काय जे हसून कपट
कारस्थान करतात.

२८) आयुष्य काट्यांचा प्रवास आहे. धैर्य त्याची ओळख आहे.
रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तो खरा
माणूस आहे.

sunder suvichar in marathi

२९) जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या.
एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांचीच येत असते.

३०) जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही
तोपर्यंत गप्प राहणे चांगले असते.

३१) ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा
विचार करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.

३२) विश्वास एक अशी ट्रॉफी आहे…. जिला जिंकल्यानंतर
माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो.

३३) अशा लोकांपासून दूर राहणे ठीक आहे ज्यांना
तुम्ही जवळ असण्याची कदरच नाही.

३४) खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा….
जेवढा आपण औषधांवर ठेवतो.

Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

३५) पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या. कारण….
स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात.

३६) माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचे डोके असते ते
पकडून पकडून त्याच कडू आठवणी समोर आणते ज्या
तुम्हाला खूप त्रास देत असतात.

३७) प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि
माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो.

३८) बुद्धिमान फक्त तेच नसतातत्यांना फक्त बोलणे माहिती
असते.. खरे बुद्धीमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचे
हे माहिती असते.

३९) तुम्ही जेवढे साधे… सरळ…इमानदार…. प्रामाणिक….
असाल तेवढेच चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले
जाल.

४०) आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला
ती कधीच घाबरत नाही.

sunder suvichar in marathi
sunder suvichar in marathi

४१) बोलणे खराब असणे डोके खराब असल्याचं पहिले लक्षण
आहे. त्यामुळे आपल्या मेंदूमध्येविचारांमध्ये चांगल्या गोष्टी असणे
गरजेचे आहे.

४२) मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि
अडचणी समजून घेतो आणि त्यानुसार त्यांच्याशी वागतो.

४३) तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर
लोकांना विचार करावा लागेल.

४४) जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला
लागतो… बोलायला लागतो… तेव्हा समजून घ्या की तुमच्या
वागण्याची हद्दपार झालेली आहे.

sunder suvichar in marathi - मराठी सुविचार
sunder suvichar in marathi – मराठी सुविचार

४५) घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा
उघडतांना नेहमी चेहरा हसरा ठेवून उघडा.

४६) जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल
तर त्या वेळेला विसरून जा.

४७) आजच्या काळामध्ये स्वतः थोडे सांभाळून चला. कारण
जागा जागांवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात.

४८) मतलबी लोकांना फोन मधूनच नाही तर तुमच्या आयुष्यामधूनही
डिलीट करा. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.

४९) या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही
तर एका चांगल्या मनाचीही गरज असते.

marathi motivational quotes
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करत असतात
true line in marathi – sunder suvichar in marathi

दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी
ब्लॉग ला जरूर सबस्क्राईब करा.

धन्यवाद.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

0
Best Motivational Thoughts In Marathi - मराठी सुविचार
Best Motivational Thoughts In Marathi - मराठी सुविचार

Best Motivational Thoughts In Marathi –
मनाला आनंदीत करणारे सुंदर सुविचार –
प्रेरणादायी मराठी सुविचार

परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात.
शब्दांनाही कोडे पडावे अशी गोड माणसे असतात.
किती मोठे भाग्य असते जेव्हा ती आपली असतात…..!

आणि मित्रांनो तुम्ही आपली आहात… या परिवारातील आहात.
आजही मी तुमच्यासाठी खूप सुंदर असे नवीन सोपे मराठी सुविचार,
सुंदर सुविचार घेऊन आलो आहे. हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला
नक्की आवडतील.
या sunder suvichar in marathi मधून तुम्हाला कोणता
marathi suvichar आवडला हे मला कॉमेंट करून नक्की कळवा.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर “स्वाद” आणि “वाद”
या दोन्हीचा त्याग केला पाहिजे. “स्वाद” सोडला तर
“शरीराला” फायदा आणि “वाद” सोडला तर “नात्याला” फायदा.

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर – sunder suvichar in marathi

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल. पण माझ्यामुळे कोणाचे
नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस
योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.

आयुष्यात झालेल्या चुकांमुळे जर आपण प्रयत्न करणे थांबवले तर
ते मात्र चुकीचे आहे. त्या चुकांतून शिकणे आणि पुढे जाणे म्हणजे
आयुष्य आहे….!

स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा
पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची
इच्छा निर्माण झाली पाहिजे…..

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
सुंदर प्रेरणादायी सुविचार मराठी – सोपे सुविचार मराठी

बोलण्यापूर्वी “शब्द” आणि पेरण्यापूर्वी “बी” कोणते वापरणार याचा
जरूर विचार करा. नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही. कारण
परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात.

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला
दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.

जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरूवात करतात.

संत” आणि “वसंत” मध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो…
तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा “संत” येतात… तेव्हा “संस्कृती”
सुधारते.

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
motivational thoughts in marathi – मराठी सुविचार

ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते
तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो.

हिम्मतीने हारा.. पण हिम्मत हारू नका… प्रत्येकजण हिरा
बनवूनच जन्माला घातला जातो. पण चमकतो तोच जो
घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो.

खेळ शिकायचा असेल तर बुध्दिबळाचा शिका. कारण
त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या
माणसाचा पराभव करत नाही.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
sunder vichar in marathi – चांगले विचार

संयम ठेवा आणि कधीच हार मानू नका.
मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच.

सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही…
परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल…!

आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवे.
दुसऱ्याच्या खांद्यावर तर केवळ अंत्ययात्राच निघते.

सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसलात
तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवले
तर आयुष्यभर आपण सुखी राहू.

मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही. पण साखरेचा एक
कण जरी असला तरी मुंग्या लागतात. माणसाचे ही तसेच आहे.
गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील. पण मिठासारखा
खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही…! ” ज्याची वाणी
गोड त्याचे आयुष्य गोड असते “

जगणे खूप सुंदर आहे. त्यावर हिरमुसू नका… एक फूल उमलले नाही
म्हणून रोपाला तुडवू नका… सगळे मनासारखे होते असे नाही.
पण मनासारखे झालेले विसरू नका. सुटतो काही जणांचा हात
नकळत. पण धरलेले हात सोडू नका.

” हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा.
जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा.
आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा. कारण
संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा
हिरा ठरतो.

जे हक्काचे आहे ते झगडुन देखील मिळवावे. पण ज्यावर हक्क नाही
ते स्वीकारू नये.

जात हा अपघात आहे. त्याबद्दल “गर्व” कधीच करू नका.
कारण… “काळ” आणि “वेळ” आल्यावर जातीचे नाही तर
“माणुसकीचे” रक्त कामाला येते.

ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान विष आहे.
परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान अमृत आहे.

वाढत्या वयापेक्षा, वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात…
सुख आपल्या हातात नाही. परंतु सुखाने जगणे हे नक्की आपल्या
हातात आहे.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

motivational thoughts in marathi - मराठी सुविचार
good thoughts in marathi

एका मिनीटात तुमचे आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनीट
नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचे आयुष्य नक्की
बदलु शकतो.

आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे. की…..
भविष्याचा विचार करत बसायचे. की…आलेला क्षण जगायचे
हे आपण ठरवायचे

आपली चांगली वेळ जगाला सांगते की…आपण काय आहोत.
परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की…. जग काय आहे.

छोटसे आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून
आपले व्यक्तिमत्व सिद्ध होतं नसते….!

सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे.
आयुष्यात सावकाश चाला काही हरकत नाही. पण चालतांना असे चालायचे
की आपल्या कर्तृत्वाचीआणि मनमिळावू स्वभावाची… आत्मिक समाधान
लाभलेल्या मनाची…आणि दैदिप्यमान यशाची…. सोनपावले सदैव मागे
उमटली पाहिजे.

मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचे सौंदर्य
खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले
तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही.

सुविचार मराठी – चांगले विचार

Best Motivational Thoughts In Marathi –
मनाला आनंदीत करणारे सुंदर सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

हे सुविचार एकदा नक्की वाचून बघा

Relationship Quotes On Marathi | नाती सुविचार | Nati Suvichar
नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात | सुंदर कथा | marathi story
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात |
सुंदर कथा | marathi story
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात |
सुंदर कथा

एका राजा आपल्या राज्यात सुखाने राहत होता. त्याची प्रजा सुध्दा सुखी होती.
राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पहायला मिळत नव्हती.

असेच एक दिवसराजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता
त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या
दिवशी या जगात बाकी लोकांनी सुध्दा जन्म घेतलाच असेल. पण बाकीचे लोक
माझ्यासारखे राजा का बनले नाहीत. आणि तो या प्रश्नाचा विचार करायला लागला…

तो अस्वस्थ झाला होता. आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली.
राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच
हजर झाले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी भरली तेव्हा राजाने त्याच्या मनात आलेल्या
प्रश्नाला सभेत मांडले.

त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा
जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल. मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले
व्यक्ती राजा का बनले नाहीत. कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचे उत्तर नव्हते.

तेव्हा सभेतील एका वृध्द व्यक्तीने राजाला सांगितले की राजा आपल्या या प्रश्नाचे उत्तर
जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात. राजाने क्षणाचाही विलंब न करता
जंगलात धाव घेतली. आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला.

Best Motivational Thoughts In Marathi – मराठी सुविचार

बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले. ते बाबा कोळसे खात होते.
पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. म्हणून तो बाबा जवळ गेला आणि
त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला. तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की
माझ्याजवळ तूझ्या या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. हे ऐकून राजा निराश झाला
पण बाबाने त्याला सांगितले की याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात
त्यांना जाऊन विचार त्यांच्याजवळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटून जाईल.

राजा लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधू बाबाच्या शोधात निघाला. जंगलात
थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधू बाबा दिसला. तो साधू बाबा माती खात होता.
राजाला पाहून आश्चर्य वाटले पण त्याला त्याविषयी काही देणेघेणे नव्हते. त्याला
त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. तो बाबा जवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला
तेव्हा त्या बाबा ने सुध्दा त्याला सांगितले की या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही. पण
तुला जर उत्तर पाहिजे असेल तर शेजाराच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो…
जो सर्वकाही जाणतो. त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार. तो विद्वान त्याच्या जीवनाचे
शेवटचे काही क्षण जगत आहे. लवकर गेलास तर तुला प्रश्नाचे उत्तर मिळेल.

राजाला ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता. पण काय करणार त्याला त्याच्या
प्रश्नाचे उत्तर हवे होते. त्याने जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोहचला.
त्याने गावात त्या व्यक्तीविषयी विचारले तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहचवले.
राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला तेव्हा त्या व्यक्तीने राजाला
प्रश्नाचे उत्तर देतांना सांगितले की…

मागच्या जन्मात आपण चार भाऊ होतो आणि चौघे एकदा एका जंगलात रस्ता
भटकलो होतो. आणि आपल्या जवळील खायच्या वस्तू सुध्दा संपायला आल्या होत्या.
आपल्याजवळ थोडेशेच पीठ शिल्लक होते. ज्यामध्ये फक्त चार भाकरी झाल्या होत्या.
तेवढ्यात आपल्या जवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्याने आपल्याजवळ
अन्नाची मागणी केली होती. पण आपल्यापैकी मोठ्याने त्या व्यक्तीला असे म्हणत दूर
केले की… तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का….? तसेच दुसऱ्याने
म्हटले की तुला भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का…? मी सुध्दा त्याला नकार
दिला होता. पण तुम्ही त्याला तुमच्या हिश्याची भाकरी खायला दिली होती आणि त्याने
तुम्हांला आशीर्वाद देऊन तो तेथून निघून गेला होता.

आता राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याला कळले होते
की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज त्या ठिकाणी होता तर या
गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की कर्माचे फळ हे मिळतेच
ते चांगले असो की वाईट. म्हणून आपल्या हातून चांगले कर्म होतील असे
काम करा. कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस नक्की मिळतेच.

पाच मिनिटे वेळ काढून नक्की ऐका….
कसे कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात |
सुंदर कथा | marathi story

गोष्ट आवडल्यास Like, Share करा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी
चैनल ला subscribe करा.

51 marathi suvichar – मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

0
marathi suvichar - मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी
marathi suvichar - मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला 51 marathi suvichar, मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी,
सुंदर विचार, #motivationalquotes, असे मराठी सुविचार की जर आपण आपल्या आयुष्यात वापरलात
तर लोक थक्क होतील तुम्ही इतके कसे बदललात #marathi #मराठी #motivationalvideo
#life हे सोपे सुविचार मराठी नक्की उपयोगी पडतील. तुम्हाला प्रेरणादायी ठरतील. शांत मनाने नक्की वाचा.
आणि आपल्या मित्र मंडळी ला शेयर करायला विसरू नका. सुरुवात करूया सुंदर सुविचारांना, सुंदर विचारांना

51 marathi suvichar –
मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

केवळ आपण चांगले दिसत नाही म्हणून लोकांमध्ये मिसळायचे नाही
ही भावना मनामधून काढून टाका. स्वतःमध्ये आत्मविश्वास असू द्या..
संधी शोधा…. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा…. लोकांमध्ये मिसळायला शिका…

लोकांकडून कमी अपेक्षा ठेवा किंवा नाही ठेवल्या अपेक्षा तरीही चालेल.
त्यामुळे कसलेही दुःख होणार नाही. तुम्ही टेन्शन फ्री राहाल.

प्रार्थना कधीही वाया जात नाही. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही.
त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार असतात त्याही गोष्टी ते गमावून बसतात.

एखाद्या व्यक्तीपासून दूर राहिलात तर तुम्हाला याची जाणीव होईल की
तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे किंवा मग त्याच्याशिवाय तुमच्या
आयुष्यात खूप जास्त शांतता आहे हे तरी जाणवेल.

तुमच्या मूड प्रमाणे नाही तर समोरच्याच्या परिस्थितीप्रमाणे बोला.
तो कोणत्या परिस्थितीत आहे ते बघून बोला. बोलण्यापूर्वी
आपल्या मनामध्ये काय बोलायचे आहे. याची योजना करा…

हे ही वाचायला आवडेल 

life changing motivational quotes in Marathi | चांगले विचार

तुम्ही जे आहात ते स्वतः जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
कोणताही ढोंगीपणा करून दिखावा करून आपल्या अडचणींमध्ये
वाढ करू नका.

इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हाव भाव आपल्या चेहऱ्यावर असू द्या.
आणि आपली देहबोली योग्य असेल यावरही लक्ष द्या..

मोठ्या व्यक्ती तर त्या असतात ज्यांना भेटल्यानंतर आपण छोटे आहोत
याची जाणीव आपल्याला होत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला
ते जाणवू देत नाही.

जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खातात.
कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात.

माणसांना समजणे खूप अवघड आहे.
कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो.
एक वेळेस एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणाऱ्या
व्यक्ती वेळ आणि परिस्थिती बदलली की एकमेकांचा
जीव घ्यायला तयार होतात.

तुमचा खरा पगार कधीच कोणाला सांगू नका.
तुमच्या पगारावरून लोक तुमची लायकी ठरवतात
आणि तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा तेही तुमच्या
पगारावरून ठरवतात.

स्वतःबद्दलच्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या आणि तुम्हाला
असे वाटत असेल आपल्यामध्ये सकारात्मक नाही…
नकारात्मक गोष्टी जास्त आहेत…. तर त्या अगोदर दूर
करण्याचा प्रयत्न करा.

नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हान देण्याचा प्रयत्न करा.
स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा.

कधीही अपयशाची भीती बाळगू नका. अपयश येईल या भीतीने
रिस्क घेण्याचे टाळू नका. आयुष्यात आव्हान स्वीकारल्याशिवाय
तुम्ही मोठे होणार नाही.

हार न मानण्याची वृत्ती आत्मसात करा. त्यातच तुम्ही
अर्धी लढाई जिंकलेली असेल.

हा व्हिडीओ नक्की बघा 

Life lessons in marathi | आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर तो तोडून टाकतात | Good Thoughts marathi

कोणालाही कंटाळवाने… गंभीर…. आणि रडणारे लोक आवडत नाही
प्रत्येक जण नेहमी सकारात्मक असणारे आणि आनंदी असणाऱ्या
लोकांच्या संगतीत राहणे पसंत करतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा प्रसन्न राहा.

ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी
नको त्या गोष्टी खरेदी करून पैसा आणि वेळ वाया घालवणे थांबवा.

नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही
तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. मंदिरात जाऊन
तुम्ही देवाला कितीही फुले नारळ वाहिले तरीही जर तुमचा
स्वतःवर विश्वास नसेल तर देवही तुम्हाला साथ देणार नाही.

अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतील
तुमचे व्यक्तिमत्व जबरदस्ती बदलण्याचा प्रयत्न करतील..
आपण जसे आहोत तसे समोरचा आपल्याला स्वीकारत असेल
अशाच लोकांच्या संगतीत राहा.

या पोस्ट ला भेट द्या. आयुष्यावर सर्वश्रेष्ठ विचार

जगात अशी एकच व्यक्ती आहे जी कायम मरेपर्यंत तुमच्या सोबत असते
तुमच्या सुखदुःखात सोबत असते…. ती म्हणजे तुम्ही स्वतः म्हणून स्वतःची
काळजी घ्या. नेहमी आनंदी राहा… स्वतःसाठी वेळ द्या.

पैशाने पैसा वाढतो म्हणून पैशाचा वापर एक साधन म्हणून करा.

जेवढे जास्त तुम्ही खोटे वागत असाल तेवढे जास्त लोक तुमच्या
आजूबाजूला असतील. आणि जर तुम्ही खरे वागत असाल तर
मोजकेच लोक तुमच्या आजूबाजूला असतील.

तुमच्या कामाची लाज बाळगू नका लोक तुमच्या टेबलावर फुकट जेवण
आणून देणार नाहीत. आणि त्याचे बिलही भरणार नाहीत. तुम्ही जे करत
आहात त्या कामाचा अभिमान बाळगा.

पाच वर्षानंतर तुम्ही त्या गोष्टीवर हसाल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज रडत आहात
वेळ आणि काळ हे सगळ्या गोष्टींवर औषध आहे. त्यामुळे नेहमी आनंदी राहा….
प्रसन्न राहा…..!

तुमचा मार्ग तुमच्या मित्रांपेक्षा वेगळा असेल तरी हरकत नाही.
मित्रांनी जे केले किंवा मग इतरांनी जे केले तेच आपण
करायला हवे असे काहीही नाही.

लोकांना तुमची Emotions सांगणे…. तुमची गुपित उघडे करणे म्हणजे….
एखाद्या शार्क माशाला तुम्ही स्वतःचे रक्त दाखवून त्याला तुमची शिकार
करण्यासाठी बोलवण्यासारखा आहे…!

marathi suvichar – लोकं थक्क होतील….
तुम्ही इतके कसे बदललात

तुमचे प्रॉब्लेम्स कोणाला सांगत आहात याची काळजी घ्या.
कारण तुमच्यासमोर प्रत्येक जण हसून खेळून राहणारा
हा तुमचा मित्र किंवा जवळचा असेलच….असे नाही…!

काही लोक तुम्ही बदललात म्हणून तुम्हाला नाव ठेवतील
आणि काही लोक तुम्ही प्रगती केली म्हणून आनंदी होतील.
म्हणून आपले मित्र हे काळजीपूर्वक निवडा.

जर तुम्हाला वाटत असेल आयुष्यात तुम्ही नेहमी बरोबर आहात…
तर तुम्ही कधीही काहीही शिकू शकत नाही.

तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा नाहीतर जेव्हा तुम्ही ते गमवाल
त्यानंतर केलेले प्रेम तुम्हाला फक्त त्रास देऊन जाईल.

जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्या मनावर राज्य करणे कठीण आहे.

मूर्ख माणसाला कधीही त्याची चूकसांगू नका. कारण तो नेहमी तुमचा
द्वेषच करेल. शहाण्या माणसाला त्याची चूक सांगितली तर तो तुमचे
कौतुक करेल.

समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नका तो जसा आहे
तसा त्याला स्वीकारा. तुम्ही त्याला बदलायला जाल तर तुम्ही नाते
गमावून बसाल.

समोरच्याने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तरे द्या.
अनावश्यक बोलू नका. कमीत कमी बोला.

जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जाऊ नका.
विना आमंत्रण कुठेही जाऊ नका. आणि ऐन वेळेस
शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणी बोलवत असेल तरीही
जाणे टाळा. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटच्या क्षणी
बोलावले जाते…. त्या ठिकाणी कोणालाच तुम्हाला
बोलवण्याची इच्छा नसते. म्हणून अशा ठिकाणी जाऊन
तुमची स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका.

जोपर्यंत समोरचा स्वतःहून आपल्याला काही गोष्टी सांगत नाही
तोपर्यंत आपण त्याला त्याच्या खाजगी गोष्टी विचारू नयेत.

त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही
ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी कधीच काहीही प्रयत्न केले नाहीत.

आयुष्यात नशिबाला दोष देत बसू नका. उलट असे काहीतरी
करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना
त्यांच्या जाण्याचा पश्चाताप व्हायला हवा.

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत
नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते.

जीवनात कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला इतकेच म्हणा की…
माझी मदत करशील का…? त्याच्या प्रतिक्रियेवर आणि त्याच्या उत्तरावरून
तुम्हाला त्याचा स्वभाव नक्कीच कळून येईल.

उंच उडण्यासाठी पक्षांना पंखाची गरज असते. पण माणूस जेवढा
जमिनीवर राहील तेवढीच त्याची प्रगती जास्त होत असते.

संघर्ष करताना माणूस एकटाच असतो पण यश मिळवले की संपूर्ण जग
त्याच्या बाजूने होते. म्हणून संघर्षाच्या काळात तुम्ही एकटे असाल तर
अजिबात वाईट वाटून घेऊ नका.

आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत
पण खूप त्रासदायक असतात.

marathi suvichar – मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमचे जवळचे लोक तुमच्या पासून
दूर जायला लागतील तेव्हा तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा
पूर्ण झाल्या आहेत. बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिले असेल की लोक
तुमच्या जवळ येतात… तुमचे हालचाल विचारतात आणि त्यांची
गरज संपली की दूर निघून जातात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा.
कारण… लोक मतलबी आणि स्वार्थी असतात.

ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले जात नाही. त्या ठिकाणी जाऊ नका
आणि जी व्यक्ती तुमचा सतत अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या
आयुष्यात पुन्हा स्थान देऊ नका. पण काही लोक अगदी याच्या उलट
वागतात जिथे नेहमी अपमान होतो. किंवा जी व्यक्ती तुम्हाला घालून
पाडून बोलते अपमान करते तुम्ही सतत तिच्याकडे जाता.

आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा
आणि त्यानुसार लोकांसोबत वागा.

जीवनातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो.
तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा
फुगा खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगा विकून खुश होतो.
परिस्थिती तीच आहे फक्त दृष्टीकोन वेगळा आहे.

विचार आवडले असतील तर ब्लॉग ला सबस्क्राईब करून ठेवा.
आणि कोणता विचार तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते कॉमेंट
करून नक्की कळवा. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

धन्यवाद

51 marathi suvichar – मनाला फ्रेश करणारे सोपे सुविचार मराठी

हे सुविचार वाचायला आवडतील 

सुंदर विचार मराठी | सुविचार | suvichar marathi