Relationship Quotes On Marathi | नाती सुविचार |Nati Suvichar

2
395
Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना शुभ दिवस

मित्रांनो, ज्या दिवशी आपला जन्म होतो, त्याच दिवशी
आपल्या मृत्यूची तारीख ठरलेली असते.

Relationship Quotes On Marathi |
नाती सुविचार | Nati Suvichar

मधला काळ जो असतो तो कसा जगायचा…
कसा घालवायचा… ते ज्याचे त्याने ठरवायचे असते.

आपण इतरांवर टीका करायची… इतरांना दोष देत रहायचे….
का आपण आपल्या जीवनाच्या आनंद घ्यायच्या…
आपल्या जीवनाची प्रगती करायची… हे ज्याचे त्याने
ठरवायचे असते.

म्हणून मित्रांनो, जे काही होणार असते ते ठरलेले असते.
त्यात बदल होत नसतो.

मित्रांनो, मला वाटते आपण आपले आयुष्य मस्तपैकी जगायचे.
जग बदलण्याच्या भानगडीत पडायचे नाही.
आयुष्य जगण्याच्या भानगडीत पडायचे.

पुढचा माणूस असाच का वागतो….? तसाच का बोलतो….?
अशा फालतू प्रश्नांवर विचार करायचा नाही.
तो त्याच्या रोल आहे, त्याला दिलेला तो डायलॉग आहे,
तो त्यालाच बोलू द्या.

आपण आपला रोल करायचा… कुणालाही कमी लेखायचे नाही.
आयुष्य खूप सुंदर आहे. नेहमी आपण हसत राहायचे…
आनंदी राहायचे…. आणि इतरांना आनंदित करायचे.

चला मित्रांनो आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी…
ही मालिका घेऊन आलो आहे.

हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईक पर्यंत आपल्या
मित्र परीवारा पर्यंत शेयर करून आवर्जून पोहचवा.
चला करूया सुरूवात सुंदर विचारांना…
सुंदर सुविचारांना…

Relationship Quotes On Marathi |
नाती सुविचार | Nati Suvichar

बोलणारा सहज बोलून जातो
पण त्याला कुठे माहित असते
ऐकणाऱ्याच्या मनावर
तो शब्द कोरला जातो ते…!

Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar
Relationship Quotes On Marathi – नाती सुविचार

कुणाच्या गैरसमजुतीचा
काय कौतुक हो….
टीव्ही जरी बिघडला ना
तरी लोकं रिमोटच आपटतात….!

Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar

नात्यापेक्षा स्वतःचा मी पणा
जर मोठा असेल ना…
तर नाती बनवूच नका.

Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar

जर भिंतीत भेग पडली
तर भिंत पडते. पण
जर नात्यात भेग पडली
तर भिंत उभी राहते.

Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar
Relationship Quotes On Marathi – नाती सुविचार

आयुष्य हे आइस्क्रीम सारखे आहे
टेस्ट केले तरी वितळते… आणि
टेस्ट नाही केले तरी वितळते.
म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका
वेस्ट तर ते तसेही होतच आहे.

********

लोकांनी मला सहज विचारले
तू खूप बदललास रे….
मी सहज उत्तर दिलें
लोकांच्या आवडीनुसार जगणे
सोडले आता….

Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar

अंत आणि एकांत
यापैकी माणूस
एकांतालाच जास्त घाबरतो.

********

जेव्हा आपण लोकांना महत्त्व देतो
तेव्हा त्यांना वाटते की आपण नेहमीच
रिकामी असतो. पण त्यांना हे नाही
समजत की, आपण नेहमीच त्यांच्यासाठी
स्वतःला उपलब्ध ठेवत असतो. आणि
कधी कधी आपण काही लोकांना खूप
महत्त्व देतो.
जितकी त्यांची लायकी पण नसते.

********

Relationship Quotes On Marathi |
नाती सुविचार | Nati Suvichar

आपण जेव्हा प्रत्येकासाठी जास्तच उपलब्ध
झालों ना, तेव्हा कुणालाच आपली कदर
राहत नाही. म्हणून जरा भाव खात रहा.

********

जेव्हा आपल्याला आपल्या स्पेशल व्यक्तीशी
खूप बोलावेसे वाटते तेव्हा ती व्यक्ती
एक तर व्यस्त असते किंवा आपल्याला
टाळत असते… दुर्लक्ष करत असते.

********

जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण एखाद्या
व्यक्तीची काळजी करून सुद्धा ती व्यक्ती
आपल्याला अव्हाइड करते, तेव्हा त्या
व्यक्तीला पुन्हा डिस्टर्ब करू नका.

********

कधी कधी आपण त्या व्यक्तीला मिस करत
नसतो. आपण मिस करत असतो त्या क्षणांना
आणि त्या फीलिंग्स ला ज्या त्या व्यक्तीबरोबर
जोडल्या गेल्या आहेत.

********

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची
बंद होते. किंवा तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम
तिच्यावर होत नाही, तेव्हा समजुन जा तुम्ही त्यांच्या
आयुष्यातून सर्वात महत्वाची जागा गमावली आहे.

********

हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची
कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे.
तेव्हा त्या हक्कांना किंमत राहते.

********

जेव्हा काही खास लोक आपल्याकडे दुर्लक्ष
करत असतील तेव्हा समजून जा की त्यांच्या
सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.

********

माणूस स्वतःच्या चुकांसाठी नेहमीच एक
वकील असतो. पण इतरांच्या चुकांसाठी
मात्र तो न्यायाधीश बनतो.

********

कोणाला किती ही द्या….
कोणावर कितीही जीव लावा….
कुठेतरी काहीतरी कमी पडतेच…!

********

कधी कधी आपले गप्प राहणे पण
समोरच्याला सांगण्यासारखे असतें की
त्याने आपल्या सोबत चांगले नाही केले…

Relationship Quotes On Marathi - नाती सुविचार - Nati Suvichar
Relationship Quotes On Marathi – नाती सुविचार

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त
करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेमही
व्यक्त करा.

********

नाते तोडने सोपे आहे हो ते पुन्हा जोडणे
खूप अवघड आहे.
माणूस गमावणे हे सर्वात मोठे नुकसान
आणि त्यापेक्षाही मोठे नुकसान म्हणजे
त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणे…

********

संपतात नाती त्या लोकांबरोबर ची सुद्धा
ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे लोक
आयुष्यभर साथ देतील….!

********

हृदयस्पर्शी सुविचार | Marathi Suvichar |
Heart Touching Quotes in Marathi |
हे विचार शांत मनाने ऐका

Relationship Quotes On Marathi |
नाती सुविचार | Nati Suvichar

नाते तेच टिकते ज्यात शब्द कमी
आणि समज जास्त… तक्रार कमी
आणि प्रेम जास्त…. अपेक्षा कमी
आणि विश्वास जास्त असतो.

********

नाती जिवंतपणीच सांभाळा
नंतर कावळ्याला खायला
घालून माणूस परत येत नाही.

********

जर प्रत्येकाने आपला विचार करताना
दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा
विचार केला, तर नात्यात किंवा मैत्रीत
कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.

********

जितक्या अपेक्षा कमी तितकी
मनःशांती अधिक मिळत असते.

********

गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण
खूप धोकादायक ठरू शकतो.
कारण काही मिनिटांमध्येच
आपण एकत्र घालवलेल्या शंभर
सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो.
म्हणून गैरसमज टाळा.

********

चांगल्या माणसांची संगत आणि
यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन
आपल्या जीवनात निश्‍चितच
प्रेरणादायी बदल घडवू शकते…!
म्हणूनच जीवनात जर चांगली
आणि यशस्वी माणसे भेटली…
तर त्यांच्याशी जरूर मैत्री करा.

********

आपल्या मधील पूर्ण विश्वास
पर्वतालाही हलवू शकतो. परंतु
आपल्या मधील शंका आपल्यासमोर
पर्वत उभा करू शकतो….!

********

आपण शब्दांना स्पर्श करू शकत
नाही. मात्र मनाला स्पर्श करण्याची
ताकद शब्दात असते.

********

शरीरात कोणतीही सुंदरता नाही.
तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म
त्याचे विचार… त्याची वाणी…
त्याची वागणूक…. त्याचे संस्कार
आणि त्याचे चारित्र्य….! ज्याच्या
जीवनात हे सर्व आहे, तीच व्यक्ती
जगातली सर्वात सुंदर व्यक्ती असते.

********

जेथे व्यवहार आणि मोजमापाचा
खेळ सुरू होतो. तेथे मैत्रीचे नाते
कोलमडून पडलेले असते.

********

नेहमीच आत्मसन्मानाने जगा
कुणाच्याही आयुष्यात पर्याय म्हणून
राहू नका. कारण उद्या अधिक चांगला
पर्याय प्राप्त झाला तर तुम्ही त्यांच्या
आयुष्यातून कधीही हद्दपार होऊ शकता.

********

काल सरणातली राख म्हणाली
वळून बघ जरा कसा असतो अंत…
कालपर्यंत माझे माझे करणारा…
बघ आज कसा दिसतोय शांत…!

********

स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा
वापर कधी करू नका. आणि
स्वतःचा वापर कुणाला करु देऊ नका.

********

शरीर पाण्यामुळे… मन सत्यामुळे आणि
आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो.

********

ना कुणाशी स्पर्धा असावी
ना कुणाचा द्वेष असावा
ना कुणाच्या पुढे जाण्याची
आकांक्षा असावी, ना कुणाला
कमी लेखण्याची गुर्मी असावी
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
जिद्द असावी…!

********

Relationship Quotes On Marathi |
नाती सुविचार | Nati Suvichar

नेहमी आनंदित रहा. इतके आनंदी
रहा की… तुमच्या संपर्कात येणारी
प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी राहील.

********

सोबत कितीही लोक असू द्या. शेवटी
संघर्ष स्वतःलाच करावा लागत असतो.
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतःलाच भक्कम बनवत चला.

********

मी ही चुकू शकतो
हे एकदा मान्य केले की
पुष्कळसे वाद आणि विरोध
कमी होतात…!

********

जबाबदारीची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा
कंटाळा येत नसतो.

********

आरश्यासमोर मनातली प्रतिमा
कधीच प्रकट होत नाही.
त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक
असावे लागते.

********

मदत ही खूप महाग गोष्ट आहे
त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा
करू नका. कारण खूप कमी
लोक मनाने श्रीमंत असतात.

********

सुख तुम्ही कोणालाही वाटावे
पण दुःख फक्त विश्वासाच्या
माणसाला सांगावे.

********

विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण
विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने
प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो.

********

नेहमी त्यांचे ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा वेळ बघत नाहीत.

********

Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

अपेक्षा करून जे मिळत नाही…
ते सुख आणि न मागताही जे
मिळते… ते दुःख…!

********

वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम
करत राहा. वाईटाचा कचरा आपोआप
किनाऱ्याला लागत असतो.

********

मोडतोड करायला काही लागत
नाही. परंतु तडजोड करायला
खूप मोठे मन लागते.

********

नशिबाला एक सवय असते
ते नेहमी त्यालाच साथ देते
जे त्याच्यावर अवलंबून नसतात.

********

काळजी हृदयात असते
शब्दात नाही. आणि
राग शब्दात असतो
हृदयात नाही.

********

गरजेपुरती माणसे जोडायची
सवय नसावी. एकदा नाते जोडले
तर ते शेवटच्या क्षणापर्यंत
निभावण्याची सवय असावी.

********

ताऱ्यालाही चकवा देणारी आहेत,
आज कालची माणसे…
अगदी सहजपणे बदलणारी आहेत,
आज कालची माणसे…
हसत-हसत पाठीवर वार करणारी
आहेत, आजकालची माणसे…
तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे
विसरणारी आहेत, आजकालची माणसे….
मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी
आहेत, आज कालची माणसे….
किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत
आजकालची माणसे….
खरोखरच किती चित्रविचित्र आहेत
आज कालची माणसे….

********

Relationship Quotes On Marathi |
नाती सुविचार | Nati Suvichar

मनापासून जीव लावला की
रानातले पाखरू सुद्धा आवडीने
जवळ येते… आपण तर माणूस
आहोत…

********

लोक म्हणतात, रिकाम्या हाती
आलो आहोत… रिकाम्या हातानेच
जाणार. पण असे नसते…
एक हृदय घेऊन आलो आहोत
आणि जातांना लाखो हृदयात
जागा करून जाणार…

********

श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते,
आणि योग्यता स्थान देते. पण
तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला
जग सन्मान देते.

********

अनेक अपयशाची कारणीभूत
बाब म्हणजे माणसाचा स्वभाव
ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा
आपण यशाच्या किती जवळ आहोत
याची त्यांना कल्पना नसते.

********

जेव्हा आपण दुसऱ्याला मदतीचा
हात देतो, तेव्हा तोच हात आपल्या
मदतीसाठी उभा राहतो…

********

स्वाभिमान विकुन मोठे
होण्यापेक्षा, अभिमान बाळगून
लहान राहिलेले कधीही चांगले

********

नाती सुविचार | Marathi Suvichar |
Good Thoughts In Marathi On Relationship |
मी ही चुकू शकतो हे एकदा

Also Read

Good Thoughts In Marathi | Suvichar | नाती | सुंदर विचार

Sunder Vichar Status Marathi | Suvichar | नाती सुविचार

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here