Motivational Speech in Marathi | छान आणि स्मार्ट कसे रहायचे

0
657
Motivational Speech in Marathi - छान आणि स्मार्ट कसे रहायचे - सुविचार - vb thoughts
Motivational Speech in Marathi - छान आणि स्मार्ट कसे रहायचे - सुविचार - vb thoughts

Motivational Speech in Marathi |
छान आणि स्मार्ट कसे रहायचे

नमस्कार मित्रहो आपल्या VB Good Thoughts या
संकेतस्थळावर वर आपले मनापासून स्वागत आहे.

मित्रांनो, आज च्या ह्या प्रेरणादायी पोस्ट मधे आपल्याला
नवीन काहीतरी नक्किच शिकायला मिळेल. आणि तुम्हाला
आवडेल आणि हा एक जबरदस्त मोटिवेशनल पोस्ट आहे.
ज्यात सांगितले की तुम्ही स्वतःला लोकांमध्ये आकर्षित कसे
ठेवायचे. म्हणजे…. छान आणि स्मार्ट कसे रहायचे याच्या टिप्स
दिल्या आहेत. आणि खूपच छान माहिती सांगितली आहे.
तर पूर्ण पोस्ट नक्किच बघा.

अणि हो खूप लाईक करून शेयर करा आणि आपल्या
VB Good Thoughts ब्लॉग सहकार्य करा.
धन्यवाद

नमस्कार मित्रहो नीट लक्ष देवून वाचा

या पोस्ट ला मी तीन भागात वाटले आहे कृपया पूर्ण वाचा.

या पोस्ट मध्ये मी एक सुंदर विषय सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्यात
खूप काही बदल घडून येतील आणि तुमच्यापासून दूर
कुणी जाणार नाही.

Motivational Speech in Marathi |
छान आणि स्मार्ट कसे रहायचे

लोक तुम्हाला खूप ताकतवर आणि बुद्धिमान समजतील
आणि तुम्ही स्वतःला हिम्मत देवू शकणार.

जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील
आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या संपर्कात
असतील… जवळ असतील ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा,
आणि धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत.

अश्या तीन महत्वाच्या गोष्टी मी या पोस्ट मध्ये तुम्हाला
सांगणार आहे.

या तीन गोष्टी तुमच्यात आणि आपण सगळ्यात असतातच.
यामुळे तुम्ही खूप सुखी व्हाल…. स्मार्ट होणार आणि जीवनात
खूप आनंदी राहाल. तर चला सुरू करूया.

पहिले आहे हास्य

मित्रांनो तुमचे हास्य हे तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते.
जर तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल, हास्य असेल तर लोक तुम्हाला
आनंदी बघून खूप जळतात. आणि हेच खूप महत्वाचे आहे.

तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आले पाहिजे. तुम्ही हारलेले जरी
असता ना, पण जर तुम्ही चेहऱ्यावर आनंद आणत एक हास्य दिले,
तर ते लोक तुमचे हास्य बघून अधिक जळतात. लोकांचे कामच
आहे जळणे, आणि आपले काम आहे खुश राहणे.
तुम्ही खुश राहा बर… लोक लगेच विचारतात कि एवढा खुश
का आहेस…..?

लोकांची मानसिकता तसीच असते. कुणाचे चांगलं होत असेल
तर त्यात अडथळा निर्माण करतात. मग करू द्या त्यांना त्यांचे काम.
पण तुम्ही एक स्मित हास्य देऊन त्यांना अधिक जास्त जळवा आणि
त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावे लागेल.

तुम्हाला चांगले राहावे लागेल. मग तुम्ही जेव्हा ही हसाल
तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे
तुमच्या पासून कधीच दूर जाणार नाही. आणि स्माईल केल्याने
आपल्याला नेहमी फ्रेश वाटायला लागते. त्यामुळे आपले मन नेहमी
चांगले विचार करते त्यासाठी रोज तुम्ही हसत राहा. आनंदी राहा.

नंबर दोन फालतू बोलू नका.

जगाचा एक नियम आहे, ” टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट
तुम्ही लोकांना जेवढा मान देता तेवढेच ते पण तुम्हाला देतात.

आपण आपल्या बोलण्याने सगळे जग जिंकू शकतो परंतु
फालतू बोलण्यामुळे आपण फालतू बनून राहू. म्हणजे तुम्ही
बोला पण त्याला काही मर्यादा असतात.

लोकांना तेवढेच सांगा जेवढी सांगण्याची गरज असते आणि
आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात.

तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल की लोकांना तुम्ही जेवढी
व्हॅल्यू देता… रिस्पेक्ट देता तेवढेच ते लोक तुम्हालापण देतात.
त्यासाठी आपले फालतू बोलणे बंद करा कारण आपल्या फालतू
बोलण्याने आपले महत्व नेहमी कमी होते. आणि नेहमी आपल्या
बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तेवढेच बोला… जेवढे कामाचे आहे.

नंबर तीन एटीट्यूड

मित्रांनो इथपर्यंत वाचत आलात तर शेवटपर्यंत वाचा.
खूप छान छान टीप या पोस्ट मध्ये सांगितली आहे ती तुम्हाला खूप
उपयोगात आणता येईल.

मित्रांनो एटीट्यूड बद्दल बरेच लोक विचारतात.
एटीट्यूड म्हणजे स्वभाव हा कसा पाहिजे.
ज्याने आपल्या एटीट्यूड मध्ये आपला चांगला
प्रभाव पडेल आणि ओळख निर्माण होईल.

लोक चारचौघात आपल्याला चांगला मान सन्मान देतील
आणि आपले मित्र नातेवाईक बाहेरचे घरचे आणि बाकीचे लोक
आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत.

तर त्याचसाठी नीट ऐका. माझा ही पोस्ट बनवण्याच्या
हाच एक उद्देश आहे. आपला स्वभाव ज्याला आपण दृष्टीकोन
म्हणतो तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी
आणि कमजोर समजणार नाही.

त्यासाठी तुमचे विचार सकारात्मक झाले पाहिजे.
नेहमी आपल्या विचारांनी सकारात्मक रहा.

जेव्हापण तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता तर पूर्णतः
सकारात्मक बोला आणि बघा ती व्यक्ती आपोआप
आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करून देते.

जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि
तोच निर्णय घ्या… जो आपल्या कामासाठी स्वप्नांसाठी
योग्य आहे. नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास
ठेवायला शिका.

Motivational Speech in Marathi |
छान आणि स्मार्ट कसे रहायचे

जर समजा तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर
तुम्हाला चिखलातून जावे लागते आणि चालता चालता तुमचा
पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडलात…
तर तुम्ही तिथेच पडून राहता का…?
हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा… नाही ना…. तुम्ही उठता आणि
आपल्या मार्गाने चालायला लागता.

मग हेच होते आपल्या सोबत. लोकांचे तर कामच आहे तुम्हाला
पाय खेचून मागे पाडणे. पण तुमचे काम आहे उठून पुढे जाणे.

विचार | आयुष्य आनंदाने जगायचे आहे का..? |
Good Thoughts In Marathi| | Sunder Vichar |
Happy Thoughts

मित्रांनो नमस्कार,
आज मी तुमच्यासाठी एक सुंदर विचार घेऊन आलो आहे
माणसाच्या जीवनामध्ये दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो
जगण्याला त्याची ऊर्जा किती महत्त्वाची असते याच्या आपण
कधी विचार केला आहे का..?

आपण नेहमी नकारात्मक विचार करतो पण
त्याही पलीकडे कधी आपण डोकावले पाहिजे
त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला सांगतो….

जर आपण नाटक पाहायला गेलो
तर पुढची सीट मागतो आणि
जर सिनेमा पाहायला गेलो
तर मागची सीट मागतो….!

तुमचे जगातले स्थान
असे सापेक्ष असते
ते अविचल कधीच नसते.

मित्रांनो, साबण बनवायला तेल हा घटक
आवश्यक असतो. आणि तेलाचा डाग
काढायला साबणच लागतो. हा अटळ
विरोधाभास आहे.

जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात
एक तर वेडी माणसे आणि दुसरी लहान मुले

चांगल्या कामासाठी ध्येय वेडे व्हा आणि
ध्येय साध्य झाले कि लहान मुलासारखा
त्याच्या आनंद घ्या. जगण्याच्या आनंद घ्या.

यावरती आपण कधी विचार करत नाही
म्हणून या वरती तुम्ही विचार करा.

मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे
फक्त तसे जगायला हवे.
त्यातला आनंद घ्यायला हवा

Motivational Speech in Marathi |
छान आणि स्मार्ट कसे रहायचे

बघा काचेला पारा लावला की
आरशा तयार होतो. पण लोकांना
आरसा दाखवला की त्यांच्या पारा
चढतो.

आरसा तोच असतो फक्त त्यात हसत
पाहिले की आपण आनंदी दिसत असतो
आणि रडत पाहिले की आपण दुःखी
दिसत असतो.

तसेच आयुष्य हे तेच असते, फक्त
त्याच्याकडे आपल्या आपल्या
पाहण्याच्या दृष्टिकोन आपल्याला
आनंदी किंवा दुःखी बनवतोय….
म्हणून मित्रांनो
दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.

चला आजपासून आपण दृष्टिकोन बदलू या
थोडे सकारात्मक राहूया, आनंदी राहूया आणि
या सुंदर आयुष्याचा खूप आनंद घेऊ या
हस्ते खेळते राहूया.

Motivational Speech in Marathi – छान आणि स्मार्ट कसे रहायचे – सुविचार 

नमस्कार मित्रहो
आपल्या आयुष्यामध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा
असतो. विश्वासावरती जग जिंकता येते. आणि
एकाने म्हटले आहे, जर आपण विश्वास कमावला
तर आयुष्यात सर्व काही कमावले.

मी आज आपल्यासाठी हे खूप सुंदर विचार घेऊन
आलो आहे. आपल्या आयुष्यात विश्वास किती महत्त्वाचा
आहे, विश्वास किती गरजेचे आहे. हे आपल्याला खूप
चांगल्या प्रकारे समजून जाईल.

विश्वास इतरांवर इतका दृढ करा की
तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी
समजतील. आणि प्रेम इतरांवर इतके
करा की, त्यांना तुम्हाला गमावण्याची
भीती राहील.

चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे जिवंतपणी मिळालेला
स्वर्ग आहे.

कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात
राहू नका. जबाबदारीने धाडसाने पाऊल
उचलायला मागेपुढे पाहू नका. आपल्या
स्वतःच्या निर्णयाला परिश्रमाची साथ द्यायला
कधी विसरू नका. आत्मविश्वासाने सर्वकाही
कमावता येते.

विश्वास अवघा साडे तीन अक्षरी शब्द
लिहायला सेकंद, वाचायला सेकंद पण
मिळवायला जन्म लागतो.

जो मैदानात हरला आहे तो परत
जिंकू शकतो. परंतु जो मनात
हरला आहे, तो कधीच जिंकू
शकणार नाही.
आपला आत्मविश्वास हाच
विश्वास. मनाने हारू नका.

आत्मविश्वासाने केलेल्या कर्माला
कोणत्याही संकटाची भीती नसते.
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची
परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात.
या परीक्षेत जो उत्तीर्ण तो जीवनात यशस्वी होतो.

जीवनात मोठे बनण्यासाठी श्रीमंताच्याच घरी
जन्माला येणे गरजेचे नसते.
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज
नसते. ते आपल्या हिमतीच्या जोरावर प्रवास
करत असतात. मोठा तोच होतो ज्याचा
स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो.

विश्वास ठेवा आपण जेव्हा कुणासाठी
काही चांगले करत असतो, तेव्हा
आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही
चांगले घडत असते.
इतकेच की ते आपल्याला दिसत नाही.

Motivational Speech in Marathi |
छान आणि स्मार्ट कसे रहायचे

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे अधिक
प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात
जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात….!
आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही.

महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत
करत नाही. आणि मेहनत केल्याशिवाय
महत्वकांक्षा पूर्ण होत नाही.

पाण्यापेक्षा तहान किती आहे
याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते.
या जगात नाते तर सर्वच जोडतात
नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

मित्रांनो हे सुविचार आपल्याला आवडले असतील तर
विनंती आपण हे सुविचार शेअर करा. कॉमेंट देऊन कळवा
कसे वाटले आणि हा विजय भगत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब
करा. धन्यवाद

Good thoughts in marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार |
विश्वास अवघा साडे तीन अक्षरी शब्द | Marathi Quotes

50+ Motivational Quotes In Marathi

200+ Marathi Quotes Attitude | Attitude Status in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here