motivational thoughts in marathi आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा
१) सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त
काळ शोक करत बसू नका. तुमच्या
जवळ जे आहेत त्यांची काळजी घ्या..
तुमच्या शोक करण्याने तुमच्या
आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही
परत येत नाही. म्हणून आपल्याजवळ
जे आहे ते जपायला शिका.
२) कधीच कोणाला जामीन राहू नका.
पोलिस स्टेशन ची पायरी आपल्याला
चढायला लागू नये याची काळजी घ्या.
आणि आपले आजूबाजूचे लोक हे
नेहमी सज्जन आणि सदवर्तन करणारे
असावेत…. याची काळजी घ्या.
३) सतत तक्रार करणे रडणे बंद करा.
ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या
अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक
आहात हे दिसते आणि तुमच्या
आजूबाजूचे वातावरण देखील तुम्ही
नकारात्मक करता.
४) सोशल मीडिया टीव्हीवरील
मालिका चित्रपट. यामध्ये
दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या
नसतात. वास्तवातल्या नसतात.
त्या आभासी असतात. हे कायम
लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका.
५) उधार दिलेले पैसे मागण्यास
लाज बाळगू नका. तुम्ही पैसे
उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला
संकोच वाटला तर तुमचे पैसे
बुडाले म्हणून समजा.
६) नेहमी कुणाच्यातरी धाकात राहणे
सांगकाम्या सारखे काम करणे सोडून
द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
७) स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व
दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि
अहंकाराने दुर्गती सुरू होते.
८) रागात उचललेले पाऊल हे
नेहमीच चुकीच्या दिशेने घेऊन जाते.
म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा
आणि मन स्थिर असू द्या.
९) तुमच्या पगाराचा आकडा कधीच
कोणाला सांगू नका. तुमच्या
पगाराच्या आकड्या वरून लोक
तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला
मानसन्मान किती द्यायचा आहे…
हे ठरवतात.
१०) नीट पारख केल्याशिवाय कोणालाही
जवळ करू नका. आपला कोणावर
ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला
अडचणीत आणू शकतो. आपल्या
आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून
घ्या.
११) वायफळ खर्च करून नका.
नको असलेल्या गोष्टी खरेदी
करून पैसा वाया घालू नका..
१२) घरातल्या खाजगी गोष्टी कधीही
कोणाला सांगू नका. लोक पाठीमागे
मस्करी करतात. आणि कधीकधी
गैरफायदा देखील घेतात.
१३) तुमच्याकडे असणारे स्किल्स
कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट
वाटू नका. त्याचा योग्य तो मोबदला
घ्या… आजकाल फुकट मिळालेल्या
गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते.
१४) तारुण्य परतून येत नाही
तारुण्यात बेछूट वर्तन करू नका.
सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. परंतु
आपण कुठल्याही चुकीच्या कामात
किंवा अडचणीत सापडून आपले
आयुष्य दुःखमय करू नका.
motivational thoughts in marathi
१५) तुमच्या आणि तुमच्या
जोडीदाराच्या आयुष्यात येणारी
माणसे नीट पारखा. पारखन्यात
चूक झाली तर आयुष्य दुःखमय
आणि वाया गेलेच म्हणून समजा.
१६) स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून
बाहेर पडा. काहीतरी नवीन
शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन
काम करा. रिस्क घेतल्याशिवाय
तुम्हाला यश मिळणार नाही.
१७) आळसामुळे आपले व्यक्तिमत्व…
कर्तुत्व….. आणि बुद्धी नेहमीच मागे
राहते. आळस झटकून कामाला लागा
तर आयुष्यात पुढे जाल.
१८) तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू
नका. स्वतःला कमी लेखण्याने
स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो.
आणि आत्मविश्वास कमी झाला तर
तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये
वावरू शकत नाही.
१९) तुमच्या भावनांना योग्य वेळी
वाट मोकळी करून द्या. नाहीतर
भावनांचा विस्फोट होतो किंवा मग
मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने
तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते
आणि तुम्हाला अधिक अडचणींचा
सामना करावा लागू शकतो.
२०) देवावर विश्वास ठेवा अथवा….
ठेवू नका. पण माणुसकी कधीही
सोडू नका…. आपण जपलेली
माणुसकी यातच आपले देव देव
करणे आले. माणुसकीने वागलात
तर कुठल्याही देवाला जाण्याची
गरज नाही.
२१) मूर्ख लोकांच्या नादी लागू नका
आणि आपला वेळ वाया घालू नका.
मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा
शहाण्या लोकांचा नोकर होणे कधीही
चांगले..
२२) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू
नका. ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत…!’ मग ते
कुठल्याही बाबतीत असो. आपले
खान पिन असो…. आपली वागणूक
असो.. आपला समाजातील वर्तन असो.
२३) कोणावरही लगेच विश्वास ठेऊ
नका. विश्वासघात होऊ शकतो.
कलियुग आहे…. इथे कोणी स्वार्थ
शिवाय तुमच्याजवळ येणार नाही
२४) विनाकारण स्तुती करणारे
जवळीक सांगणारे यांचे सुप्त हेतू
ओळखा. ते वेळेत ओळखले नाही
तर तुमचे नुकसान होऊ शकते.
२५) व्यसन माणसाची शारीरिक…
मानसिक…. आर्थिक…. आणि
सामाजिक…. हानी करते. आणि
ती कधीही भरून न निघणारी असते.
२६) सतत चिंता आणि काळजी करू
नका. आयुष्य खूप सुंदर आहे. ते
आनंदाने जगा. सततची चिंता आणि
काळजी करून तुम्ही आजारपण मागे
लावून घेतात. विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन
आणि चिंता यामुळे आजार वाढतात.
२७) आर्थिकरित्या साक्षर बना….
नाहीतर कितीही पैसा आला तरी
त्याची बचत आणि गुंतवणूक न
होता परिस्थिती आहे तशीच राहते.
२८) काम….. क्रोध…. लोभ…. मद…
मत्सर…. मोह…. हे माणसाचे शत्रू
आहेत. यापासून स्वतः ला कसे
वाचवता येईल ते बघा.
३०) विवाहबाह्य संबंध ठेऊ नका.
आणि नको त्या आजारांना ओढून
घेऊ नका. आणि महत्त्वाचे म्हणजे
आपले सांसारिक आयुष्य उधळून
लावू नका.
३१) वाईट सवयींचे सगळ्यात मोठे
कारण म्हणजे आपली वाईट संगत
म्हणून आपली संगती नेहमी चांगली
ठेवा. आपल्या आजूबाजूला चांगले
लोक असू द्या.
नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये वेगवेगळे sunder vichar in marathi, चांगले विचार, good thoughts in marathi, best line in marathi, true line in marathi, तसेच मराठी प्रेरणादायी सुविचार, सुविचार मराठी, सुंदर सुविचार, असे marathi suvichar, आणले आहेत.
101 sunder vichar in marathi | चांगले विचार #marathi
हे सुविचार जरी वेगवेगळे विषय घेऊन दिले आहेत तरी तुमचे आयुष्य बदलून टाकणारे सुविचार ठरतील.. असा माझा विश्वास आहे. तर मग चला मित्रांनो सुरुवात करूया सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना.
१) दुसऱ्याने वापरलेली वस्तू वापरू नये.
उपयोगात आणलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू
तर चुकून सुद्धा वापरू नये.
२) दुसऱ्याने वापरलेले कपडे आणि
दुसऱ्याचे अंथरून वापरू नये.
३) रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा दूध, दही
आणि मुळा दान करू नये.
४) केशर, हळद, रुमाल दुसऱ्याला देऊ नये.
५) सगळ्यांच्या घरी निमंत्रण भोजनाला जाऊ नये.
जर ती व्यक्ती चोर चरित्रहिन किंवा अपराधी
प्रवृत्तीची असेल तर त्याच्या घरी जेवण करू नये.
नाहीतर… तुम्ही पण त्याचे भागीदार होऊ शकता.
६) घरातील खराब वस्तू विकू नये. फुकट द्यावी…
नाहीतर घरातील दरिद्रता कधी कमी होणार नाही.
७) कधी कुणाच्या हातात मीठ, मिरची, चामडं,
कोळसा, लोखंड देऊ नये. नाही तर त्याची सगळी
संकटे आपल्यावर येऊ शकतात.
sunder vichar in marathi | कर्म बिघडण्याची कारणे | चांगले विचार | Good Thoughts In Marathi #marathi
आपली किंमत वाढवण्यासाठी १८ गुप्त नियम – sunder vichar in marathi vastu gyan – चांगले विचार
१८ गुप्त नियम जे आपली किंमत वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील…!
1) फालतू लोकांसाठी फुकट
वेळ वाया घालवू नका नाहीतर
तुमची किंमत कमी होईल.
२) जे तुम्हाला वेळ देतात
त्यांनाच तुम्ही वेळ द्या.
३) प्रत्येक वेळी टाइमपास
करणे बंद करा. नाहीतर लोक
तुम्हाला चुकीचे समजतील
आणि तुमच्याकडे लक्ष देणे
बंद करतील.
४) सर्व गोष्टी इतरांशी
शेअर करू नका.
५) दुसऱ्यांच्या चांगल्या
कामाची प्रशंसा जरूर करा.
६) तुमचे प्रॉब्लेम दुसऱ्यांना
सांगू नका दुसऱ्यांना तुमच्या
प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट असेलच
असे नाही.
७) आपल्या आवाजात
थोडा गोडवा आणा.
विनाकारण बोलू नका.
गरज असेल तरच बोला
असे केल्याने लोक
आपल्याला इज्जत देतील.
८) स्वतःला एकमेव समजा
लोक तर देवामध्ये पण दोष
काढतात. आपण तर माणूस
म्हणून जन्माला आलो आहोत.
९) चालताना नेहमी सरळ
आणि खांदे उंच करून
चालणे. बोलताना लोकांच्या
डोळ्यात डोळे घालून
बोलणे.
sunder vichar in marathi | चांगले विचार
१०) आपल्या भावना
कंट्रोलमध्ये ठेवा.
जेणेकरून लोकांच्या
हसण्याला कारणीभूत
होऊ नका.
११) स्वतःला नेहमी कार्यात
मग्न करून घ्या. काम न
करणाऱ्या व्यक्तींना नेहमी
समाजा कडून नाकारले जाते.
१२) प्रत्येक दिवशी असे
काम करण्यास घ्या जे
काम करण्यासाठी तुम्ही
घाबरता.
१३) प्रत्येक वेळी असे
काम करा जी इतर
लोकं करू शकत नाहीत.
१४) एखादी गोष्ट आपल्याला
समजत नसेल तर लाज
सोडून पुन्हा समजून घ्या.
१५) जर तुम्हाला विश्वास
असेल तुम्ही हे काम करू
शकता. तर ते जरूर पूर्ण
करा. कारण ज्या गोष्टी
लोकांना सहजपणे मिळतात
त्याची किंमत केली जात नाही.
१६) आपल्या चेहऱ्यावरील
हसू कधीही कमी होऊ
देऊ नका. नाहीतर लोक
तुमच्याकडे लक्ष देणे
सोडून देतील.
१७) आपल्या शब्दावर कायम
राहा. तुमची पर्सनॅलिटी
वाढवण्याचा प्रयत्न करा.
१८) आपल्या कार्यात नेहमी
पुढे राहा. आपल्या कार्यात
नेहमी एक्सपर्ट राहा.
१८ गुप्त नियम जे आपली किंमत वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील #marathiknowledge | good thoughts in marathi
जर स्वतःची किंमत लोकांमध्ये वाढवायची असेल तर या गोष्टी शिकायलाच पाहिजे. improve your personality
ज्या लोकांना आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पाडायची आहे…
ज्यांना असे वाटते की…. लोकांनी आपल्याला नोटीस केले पाहिजे त्यांच्यासाठी
ही पोस्ट नक्कीच महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आज मी तुम्हाला ज्या 6 गोष्टी सांगणार आहे
त्या निवांतपणे ऐका…. लक्षात ठेवा….. आणि जर तुम्हाला त्या पटल्या तर त्याचे
अनुकरण नक्की करा.
आपल्या Blog वर नवीन असाल तर ब्लॉग ला सबस्क्राईब करा व
पोस्ट आवडल्यास लाईक नक्की करा. चला तर मग त्या 6 गोष्टी जाणून घेऊया.
• कधीही कोणत्याही गोष्टींबाबत
लोकांवर अवलंबून राहू नका
जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती
स्वतःच्या हिमतीवर मिळवा.
कोणाकडून कधीही अपेक्षा ठेवू
नका. कारण जर आपला अपेक्षा
भंग झाला तर आपल्यालाच
त्याचा जास्त त्रास होतो.
• लोकांसोबत बोलताना कधीही
आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल
आपल्याकडील पैशाबद्दल तसेच
आपल्या अडचणी…. आपल्या
कमजोरी बद्दल… तसेच आपल्या
भविष्यातील नियोजनाबद्दल…..
कधीही चर्चा करू नये.
• कधीही अति प्रामाणिक राहू
नका. कारण लोक कधी तुमच्या
प्रामाणिकपणाचा फायदा घेतील
सांगता येत नाही.
• कधीही विना आमंत्रण कुठेही
जाऊ नये त्यामुळे समोरच्या
व्यक्तीच्या नजरेत आपली इज्जत
कमी होते. किंवा जर तुम्हाला
सर्वात शेवटी आमंत्रण दिले असेल
तरीही अशा ठिकाणी जाऊ नये.
कारण अशा वेळेस समोरच्या
व्यक्तीला आपण तेवढे महत्त्वाचे
वाटत नसतो.
जर लोकांसमोर एखादी गोष्ट
बोलून दाखवली असेल तर
ती साध्य करण्यावर लक्ष द्या.
जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी
तुम्ही प्रयत्न केले नाही किंवा ती
गोष्ट साध्य केली नाही….. तर
लोकांचा तुमच्यावरील विश्वास
उडून जाईल.
लोकांशी बोलताना कधीही
अति बडबड करू नका.
कोणी काही विचारल्या
शिवाय बोलू नका. कधीही
कोणाच्याही बोलण्यात
किंवा चर्चा चालू असताना
मध्ये मध्ये बोलू नका.
अशाने आपल्या बोलण्याकडे
कोणीही लक्ष देणार नाही व
आपल्याला महत्त्व देखील
देणार नाही.
✓ त्यामुळे समाजात वावरताना
शांत राहायचे… जास्त ऐकायचे…
कमी बोलायचे…. व जास्त ज्ञान
संपादन करायचे व स्वतःची
किंमत वाढवायची ✓ कारण
जर तुम्हाला लोकांच्या नजरेत
स्वतःची किंमत वाढलेली
पाहायची असेल तर आधी
आपल्याला स्वतःची किंमत
वाढवावी लागेल.
पोस्ट आवडल्यास पोस्टला लाईक करा
व आपल्या ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद
जर स्वतःची किंमत लोकांमध्ये वाढवायची असेल तर या गोष्टी शिकायलाच पाहिजे | improve your personality
10 benifits of talkless | कमी बोलण्याचे १० फायदे | marathi motivational speech | good thoughts in marathi
१) तुम्ही कमी बोलणारे
आहात असे इतरांना
समजले तर लोक जेव्हा
तुम्ही बोलता तेव्हा
गांभीऱ्याने तुमचे बोलणे
ऐकतील. तुमच्या प्रत्येक
शब्दाला किंमत देतील.
२) कमी बोलल्याने तुम्ही
जिथे जाल तिथे तुमची
किंमत राहिल.
३) कमी कसे बोलायचे
याचे एक सूत्र आपणास
मी येथे सांगत आहे.
जेव्हा कोणी आपणास
प्रश्न विचारेल अथवा
बोलेल त्यावेळेस तुम्ही
त्यांना शब्दात उत्तर द्या…
समोरील व्यक्तीचे समाधान
न झाल्यास वाक्यात उत्तर
द्या. त्यानंतरही समाधान
नाही झाल्यास तुम्ही
थोडक्यात पण सविस्तर
उत्तर द्या.
४) समोरच्याला फक्त
विचारलेल्या प्रश्नांची उत्तर
द्या. गरज नसताना
अनावश्यक कोणतीही गोष्ट
लोकांना शेअर करू नका.
५) परिस्थिती पाहून संवाद
थांबवणे आवश्यक असते.
जिथे तुमचे मत काय आहे
विचारले जात नाही तिथे
तुम्ही बोलू नका.
६) लोक तुमच्याकडून
जे ऐकू इच्छित आहेत
तेच त्यांना सांगा.
वायफळ बडबड करू नये.
७) तुम्हाला माहीत नसलेल्या
विषयावर चर्चा चालली असेल
तर तिथे तुम्ही शांत रहा.
काहीच बोलू नका.
८) कोणत्याही गोष्टीचे विषयांतर
करता कामा नये. वेळीच मूळ
विषयावर लक्ष केंद्रित करा.
९) एखादी गोष्ट एकदम सोप्या
भाषेत करून समोरची व्यक्ती
कशी आहे हे पाहून व्यक्त करा.
१०) असे केल्याने समोरच्याच्या
हृदयात स्थान मिळवू शकतो.
लोकांना तुमचे व्यक्तिमत्व आवडू
लागते.
10 benifits of talkless | कमी बोलण्याचे १० फायदे | marathi motivational speech | good thoughts in marathi
हे सुंदर विचार नक्कीच तुम्हाला आवडले असतील.
मित्रांनो पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल तुमचे मनापासून
धन्यवाद….
असेच सुंदर सुविचार , सुंदर विचार , चांगले विचार
वाचत राहा आणि आपले आयुष्य सुखमय करा.
Marathi Inspirational thoughts – या गोष्टी पुरुषांनी नेहमी लक्षात ठेवा
नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये आपल्यासाठी पुरुषांनी काही गोष्टी लक्षात ठेवावी आणि आनंदी राहावे असे सुंदर सुविचार, marathi inspirational thoughts, good thoughts in marathi, sunder suvichar, changale vichar
आणले आहेत. शांत मनाने वाचा. प्रतिक्रिया कळवा आनंदी राहा.
पुरुषांसाठी आवश्यक नियम
१. तुमच्या जवळच्या व्यक्तीवर
राग काढण्याआधी विचार करा.
त्यांच्यावर विनाकारण राग
काढू नका.
२. विनाकारण अशा लोकांवर
राग काडू नका… ज्यांना
तुमच्या रागवण्याने काहीच
फरक पडत नाही.
३. ज्यावेळी तुम्ही कोणाशी
तरी बोलत असाल त्यावेळी
समोरच्याकडे बघा. त्यांना
प्रतिसाद द्या.
४. तुमच्या कुटुंबाचा….
पत्नीचा आदर करा.
५. तुमच्या मुलांना
तुमच्या कुटुंबाला
वेळ द्या.
६. तुमच्या पत्नीचे नेहमी
कौतुक करा. काही चुकले
असेल तर समजून घ्या…
आणि समजून सांगा.
७. पुरुषाने घराबाहेर झालेल्या
वादाच्या रागात आपली
मर्दानगी घरातल्या स्त्रीवर
कधीच गाजवू नये.
८. पुरुषाने चार भिंती बांधल्या
म्हणजे घर बनत नाही. जेव्हा
एक स्त्री त्या घरात रोज स्वतःला
गाडून घेऊन काम करते तेव्हाच
त्या घराला घरपण येते. ही गोष्ट
पुरुषांनी नेहमी लक्षात ठेवावी.
९. तुम्ही जिथे कुठे जात असाल
तेव्हा स्वतःला चांगले\ प्रेसेंट करा
चांगले कपडे घाला.
१०. स्वतःची कामे स्वतः करा.
कुणावरही अवलंबून राहू नका.
११. काही गोष्टी कधीच विसरायच्या
नसतात. त्या लक्षात ठेवायच्या
असतात. योग्य वेळ आल्यानंतरच
त्याचा हिशोब करायचा असतो.
१३. तुम्ही बाहेर जात असताना
खिशामध्ये नेहमी काही पैसे
असू द्या.
१४. तुम्ही जर एखादे काम
करायला हाती घेतले असेल
आणि ते काम जर तुम्ही
एकट्याने करत नसेल
तुमच्या सोबत अजून कोणी
असेल तर त्याचे क्रेडिट
एकट्याने घेऊ नका. बाकी
सर्वांना सुद्धा त्याचे क्रेडिट द्या.
१५. तुमच्या घरातील जेवणाला
कधी नाव ठेवू नका. तिखटच
आहे…. खारटच आहे….
नेहमीच अशा चुका काढू नका.
१६. बसल्या बसल्या कुणाशी
हात मिळवणे करू नका.
कोणाचा स्वागत करायचे
असेल तर उभे राहूनच करा.
१७. तुमच्या आई-वडिलांची
काळजी घ्या. ते तुम्हाला
काय सांगतात ते ऐकून घ्या.
त्यांचे म्हणणे समजून घ्या.
Marathi Inspirational thoughts – या गोष्टी पुरुषांनी नेहमी लक्षात ठेवा
मित्रांनो जर आयुष्यभर बिना आजाराचे आणि निरोगी जगायचे असेल
तर पांच मिनिटे वेळ काढून ही माहिती नक्की वाचा. माहिती आवडल्यास
पोस्ट ला लाईक… कमेंट…. शेअर आणि ब्लॉगला सबस्क्राईब करायला
विसरू नका.
धन्यवाद.
१. कोणतीही आंबट वस्तू
खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने
पोटात सूज येऊ शकते.
२. वेगाने पायी चालल्याने गॅसची समस्या नाहीशी होते.
३. चिंच आणि आलू बुखार चे
पाणी वापरा यामुळे तुमचा
चेहरा साफ होऊन मुरमाच्या
समस्या पासून सुटका मिळते
४. तोंडात आंब्याची पाने
चावून बारीक करा आणि
नंतर ती पेस्ट दातांवर घासा
काही वेळाने दात चमकू
लागतील. केमिकलने दात
साफ करू नका. नाहीतर
दात खराब होतील.
५. खूप गरम कॉफी किंवा
चहा पिल्याने पोटातील
नसा आकुंचन पावतात.
६. कांद्यासोबत दुधाचे सेवन
कधीही करू नका. हे शरीरात
विष या सारखे काम करते दूध
आणि कांदा एकत्र खाल्ल्याने
त्वचेचे अनेक आजार होऊ
शकतात.
७. दुधासोबत आंबट किंवा
लिंबू खाऊ नये ते खूप
हानिकारक असते. दोन्ही
एकत्र सेवन केल्याने
ऍसिडिटी व्हायची शक्यता
असते.
८. दिवसा कधीही बसताना
पाठीचा पोस्टर बरोबर
ठेवावा… यामुळे पाठदुखीची
समस्या होणार नाही.
९. खाण्यापिण्याच्या कोणत्याही
गोष्टी जास्त गरम असल्यास
प्लास्टिकच्या कोणत्याही
भांड्यात ठेवू नका. त्यामुळे
कॅन्सर होण्याचा धोका वाढतो
कारण गरम वस्तू टाकल्याने
प्लास्टिक वितळू लागते जे
आपल्या आरोग्यासाठी
हानिकारक ठरू शकते.
१०. जास्त टेन्शन घेतल्यामुळे
रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या
गुठळ्या तयार होतात. यामुळेच
जास्त टेन्शन घेतल्यामुळे
हृदयविकाराचा झटका येतो.
११. कांदा नियमित खाण्याची
सवय लावा यामुळे चेहऱ्यावर
सुरकुत्या पडणे बंद होतात.
१२. रात्री झोपण्यापूर्वी
अंड्यातील पिवळा भाग
चेहऱ्यावर लावल्यास
काही दिवसात चेहरा
गोरा होतो.
१३. पांढऱ्या कांद्याचा रस
केसांना लावल्याने केस
गळती थांबते.
१४. पाय दुखणे किंवा
न्यू कोरिया पासून
कायमची सुटका
मिळवण्यासाठी रोज
सकाळी सात ते आठ
बदाम काही दिवस सतत
खावे.
१५. मोहरीचे तेल केस
लवकर पांढरे होण्यास
प्रतिबंध करते ते केस
लवकर पांढरे होऊ देत
नाही.
१६. दुधात मध मिसळून
पिल्याने दृष्टी सुधारते.
१७. अश्रू रोखून ठेवल्याने
डोकेदुखी, राग आणि
रक्तदाबाचा त्रास होतो.
१८. कोणताही रस जास्त
वेळ ठेवल्यानंतर त्याचा
वापर करू नये कारण
रसाची चव कडू होऊन
शरीराला हानिकारक
असतो.
१९. तुम्ही जर कोणत्याही
आजाराने त्रस्त असाल
तर शक्यतो कमी जेवा
आणि ताजी फळे जास्त
खावी.
२०. शरीरात आळस निर्माण
होत असेल तर मोहरीच्या
तेलाने अंगावर मसाज करावा.
२१. जे लोक रोज सकाळी
लवकर उठतात त्यांचे सर्व
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त
राहते.
२२. ज्यांना पचनाचा त्रास
आहे त्यांनी उसाचा रस
रोज प्यावा.
२३. व्हेजिटेबल सूप जास्त
खावे शरीराचे सौंदर्य वाढेल
आणि टिकून सुद्धा राहील.
२४. जो रोज सकाळी एक
टोमॅटो खातो त्याचे केस
कधीही पांढरे होत नाही.
२५. पाठ दुखी दूर
करण्यासाठी
आंबा थंड न करता
खावा.
२६. बीट रूट आणि नारळ
खाल्ल्याने हाडे आणि
हाडांचे जॉईंट मजबूत
होतात.
२७. केस लवकर वाढवण्यासाठी
आणि पांढरे न होण्यासाठी
केसांना भोपळ्याची उकडलेले
पाणी लावावे.
२८. शरीरावरील चरबी लवकर
कमी करायची असेल तर रोज
व्यायाम करावा आणि रात्री
झोपताना नाभीमध्ये मोहरीचे
तेल टाकून झोपावे त्याने खूप
फायदा होईल.
२९. शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये
ठेवून खूप दिवस वापरू नये
त्यामुळे जुलाब होऊ शकतात.
३०. एक गावरान अंड
मुलतानी मातीमध्ये
मिसळा आणि अर्धा तास
चेहऱ्यावर लावून ठेवा
आणि नंतर चेहरा धुवा
यामुळे काही दिवसात
सुरकुत्या नाहीशा होतील.
३१. चिमूटभर हळद आणि
चिमूटभर मीठ पाण्यासोबत
घ्या त्यामुळे पोटात होणारी
गॅस ची समस्या दूर होईल.
३२. कारल्याचा रस रोज
पिल्याने चेहऱ्यावर डाग
आणि पिंपल्स कधीच
वाढणार नाही आणि
चेहरा स्वच्छ होईल.
३३. ग्रीन टी हिरड्या
मजबूत करते.
३४. छातीत दुखण्याची समस्या
असल्यास ओव्याची धुणी
घ्यावी यामुळे छातीत
दुखण्यास आराम मिळतो.
३५. थंड पाणी पिल्याने
माणूस लवकर
आजारांना बळी पडतो.
३६. रोज बसून झाडू
मारल्याने महिलांना
पाठदुखीचा त्रास होत
नाही.
३७. कडुलिंबाच्या पानांचा
रस पिल्याने पोट साफ राहते
आणि ऍलर्जीची समस्या
होत नाही.
३८. तांब्याच्या भांड्यात
कधीही दूध किंवा तूप
ठेवू नये.
३९. तुटलेल्या भांड्यांमध्ये
कधीच जेवण करू नये
कारण यामुळे घरात
समृद्धी राहत नाही.
४०. ज्या घरांमध्ये लिंबाचे
झाड आहे तेथे डास येत
नाहीत.
४१. मनुका खाल्ल्यामुळे
चेहऱ्यावर चांगलीच चमक
येते.
४२. अपचन होत असेल तर
कच्चे सलगम खावे. हे
खाल्ल्याने रोगप्रतिकारक
शक्ती मजबूत होते.
४३. रात्री लवकर झोपून
सकाळी लवकर उठावे
यामुळे तुमच्या शरीराची
ताकद कायम टिकून राहील.
४४. मुळव्याधाची समस्या असेल
तर रात्री झोपण्यापूर्वी अकरा
मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या
पोटी मनुके खा आणि पाणी सुद्धा
प्या. असे काही दिवस सतत
केल्याने तुमची मूळव्याधाची
समस्या दूर होईल.
४५. काळ्या मनुकांमध्ये भरपूर
लोह असते ते खाल्ल्याने केस
गळती थांबते आणि आतडे शुद्ध
होतात.
४६. बदामाचे तेल
लावल्याने
मेंदू मजबूत होतो.
निरोगी आरोग्यासाठी या खास ४६ गोष्टी कायम लक्षात असू द्या #marathi #life #knowledge
पोस्ट आवडल्यास लाईक आणि ब्लॉग ला सबस्क्राईब
करायला विसरू नका . तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला
ही माहिती नक्की शेअर करा.
24) समोरच्या माणसातील
चांगल्या गोष्टी दाखवून
त्याला प्रोत्साहित करा.
स्वत:बद्दल कमी बोला.
समोरच्या बद्दल अधिक
बोला.
25) चांगल्या विचारांचे
एखादे छोटेसे पुस्तक
स्वत:जवळ बाळगा आणि
त्यातील एखादा विचार घेऊन
त्यावर मनन – चिंतन करा.
26) चालण्याची गती थोडी
वाढवा व ताठ मनाने स्मित
व्यक्त करत आवडत्या
पेहरावात समाजात वावरा
27) विनोदी सिरीयल पाहतांना
खळखळुन हसा व शरीराची
हालचाल होऊ द्या.
28) दुसरे आपल्याबद्दल
काय विचार करतात
हा विचार करणे थांबवा.
29) दुसऱ्यांची तुलना
करणे थांबवा
30) भविष्याचा अतिविचार
करणे थांबवा.
31) आपल्या आवडत्या
व्यक्तींचा विचार करा.
32) तणावापासून दूर रहा.
sunder vichar in marathi या ३८ गोष्टी करून नेहमी आनंदी राहा.
33) दररोज २० ते २५
मिनीटे उन्हात फिरा.
यामुळे शरीराला विटामिन डी मिळते. काही वेळेला
विटामिनच्या कमतरते
मुळे ही तणाव वाढतो.
34) घरामध्ये कुत्रा किंवा
मांजर पाळल्यामुळे
आपला आनंद निश्चतीतच
वाढतो. कारण की, आपण
आपले काम संपूण घरी
आलो तर त्यांच्यासोबत वेळ
घातल्यामुळे संपूर्ण तणाव
नाहीसा होतो.
35) समोरच्याला माफ
करायला शिका. आणि
माफी मागायलाही शिका.
यामुळे आपल्याला त्रास होत
नाही. क्षमा करणे आणि क्षमा
मागणे यावर विश्वास ठेवा.
36) तुमच्या इच्छेनुसार
तुमच्या आवडीचे काम
करा. किंवा मनापासून
काम करा.
३७) ध्येय निश्चित करा
आणि त्यांच्या दिशेने
कार्य करा.
३८) मनात येणाऱ्या
प्रत्येक गोष्टींकडे
लक्ष देऊ नका.
या गोष्टी करा आणि पुर्णतः आनंदी राहा | changle vichar | sunder vichar in marathi #marathiknowledge
एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा.
थोडेसे गंगाजल मिसळा. मूठभर गुलाबाच्या
पाकळ्या त्यात टाका . हा ग्लास घराच्या
एखाद्या कोपऱ्यात ठेवा.
24 तासानंतर ग्लास मधील पाण्याकडे निरखून पहा….
जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल
तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका
गडद असेल तितकी निगेटिव्हटी एनर्जी जास्त
आहे. आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात.
निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय
१). घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरशी
पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा
खडे मीठ म्हणजे मोठे मीठ मात्र गुरुवारी हा उपाय करू
नये.
२). निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान
मोहरीचे दाणे, लाल मिर्ची आणि मिठाने नजर उतरवा.
या तिन्ही वस्तू आपल्या घरातएकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा.
३). किचन मध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा.
ही मिठाची फुरसुंडी प्रत्येक व्यक्तीला दिसणार नाही अशी
ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन
मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात… तलावा मध्ये टाकून
द्या. प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेट मध्ये प्लश करावे.
४). दर सायंकाळी अंगणातील तुळशी जवळ तुपाचा किंवा
तेलाचा दिवा न चुकता लावा .
Super Marathi Motivational Story | Sunder Katha | श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा | तुमच्या भाग्यात जे लिहिले आहे ते कुठूनही तुमच्या पर्यंत पोहोचणारच
एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावातून जात होते.
तेथून जातांना त्यांना एक गरीब माणूस भीक मागतांना दिसतो.
अर्जुनाने त्याला आपल्या जवळची सोन्याच्या मोहरांनी
भरलेली थैली दिली आणि परत भीक मागू नकोस असे
सांगितले. थैलीभर मोहरांमुळे त्याचे आयुष्य नक्कीच
सावरणार होते.
तो आनंदाने घरी निघाला. मात्र एका चोराने ते पाहिले
आणि त्याचा पाठलाग करत मोहरांची थैली लंपास केली.
गरीब माणूस स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला.
पोटापाण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो परत भीक मागू लागला.
अर्जुनाने विचारले काल तर तुला मोठी भिक्षा दिली परत तु
आज भीक मागू लागलास…? त्याने आपबिती सांगितली.
अर्जुनाला वाईट वाटले. त्याने जवळचा बहुमूल्य मोती त्याला दिला. तो मोती घेऊन आनंदाने घरी
आला. पण घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे तो मोती
ठेवावा कुठे असा त्याला प्रश्न पडला.
एका मडक्यात त्याने तो मोती ठेवला आणि तो
निवांत झोपला. बायको घरी आली तिने नवऱ्याला
अनेक दिवसानंतर शांत झोपताना पाहिले.
आवाज न करता ती गाडगी मडकी घेऊन
नदीवर पाणी भरण्यासाठी गेली. परत येऊन पाहते
तर नवरा शोधा शोध करत होता. तिच्या हातात मडके
पाहून तो म्हणाला….. “हे तू काय केलेस मी यात बहुमूल्य
मोती ठेवला होता”.
Super Marathi Motivational Story | श्रीकृष्ण आणि अर्जुन कथा
आपले नशीबच खराब जाऊ दे. असे म्हणून तो
माणूस परत नेहमीच्या ठिकाणी भीक मागायला
जात होता. अर्जुनाने त्याला पाहिले आणि त्याला राग
आला. तो कृष्णाला म्हणाला आता तूच काय ते बघ.
कृष्णाने त्याला दोन सिक्के दिले तो काहीही न बोलता
ते घेऊन निघाला. वाटेत त्याला एक कोळी दिसला.
त्याच्याकडे एक मासळी जाळ्यात अडकलेली दिसली.
तिची तरफड पाहून त्याला दया आली. त्याने कोळ्याला
दोन शिक्के देले आणि मासोळी विकत घेऊन
एका कटोरीत घालून घरी घेऊन आला.
पाहतो तर काय मासोळी पाण्यात टाकताच तिने
घिळालेला मोती बाहेर टाकला. तो मोती पाहून
गरीब माणूस दिसला दिसला म्हणून ओरडू लागला.
झोपडी बाहेरून जाणाऱ्या भुरट्या चोरांना वाटले….
सोन्याच्या मोहरांची थैली नेताना कोणी आपल्याला
पाहिले. कोणी आपल्याला शिक्षा देण्यापूर्वी इथून निसटून
गेलेले चांगले. असे म्हणत त्याने सोन्याच्या मोहरांची
थैली गरिबाला सुपूर्त केली. तो तिथून पळून गेला.
गरिबाला आश्चर्याचा धक्का बसला, “मोहरांची थैली पण
मिळाली आणि मोती पण मिळाला”.
दुसऱ्या दिवशी त्याने आठवणीने जाऊन
श्रीकृष्णाचे आभार मानले.
तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने कृष्णाला
विचारले आधी मी त्याला मोहरा दिल्या… मोती दिला
त्याला लाभल्या नाहीत. मात्र तू दिलेले दोन शिक्के
कसे काय लाभले….? कृष्णाने सांगितले… आधी
मिळालेल्या लाभाचा विचार तो स्वतःपुरता करत होता.
दोन शिक्के मिळाले तर त्याने स्वतःचा विचार सोडून
दुसऱ्याचा विचार केला.
शांत मनाने ऐका आणि कायम लक्षात ठेवा हे motivational thoughts in marathi , sunder vichar in marathi ,
प्रेरणादायी मराठी सुंदर सुविचार , good thoughts in marathi,
best motivational thoughts in marathi | चांगल्यापेक्षा वाईट काय ते आगोदर शिकायला हवे
रागात असतांना सुद्धा शब्दांची निवड अशी असायला
हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये
खजील व्हायला लागू नये.
शब्द फुकट मिळतात पण त्यांच्या निवडीवर ठरते की
त्याची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार.
काय सुंदर म्हटले आहे कोणी तरी श्वासांसोबत चालत होतो
तेंव्हा एकटा होतो. जसा श्वास थांबला… तसे सगळे सोबत
चालू लागले.
विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटू लागतील.
नियत चांगली ठेवा काम आपो आप ठीक होत जातील.
तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा.
वरचा त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करुन घेतो.
यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार
हे नेहमी चांगल्या संबंधातून…. चांगल्या नात्यांमधून येतात.
म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा.
पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण
मर्यादा सोडतात…. तेव्हा विनाशच होतो.
आरसा – कधी खोटे बोलत नाही. ज्ञान कधी भित्रेपणा
येऊ देत नाही. अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही.
सत्य कधी कमजोर होऊ देत नाही प्रेम कधी ईर्षा होऊ देत नाही.
विश्वास कधी दुःखी होऊ देत नाही. कर्म कधी अयशस्वी होऊ
देत नाही.
best motivational thoughts in marathi | सुंदर सुविचार मराठी
अहंकाराची करवत… स्वार्थाची तलवार…. आणि कपट
भावनेची कुऱ्हाड…. चांगल्या संबंधांना कापून टाकते.
माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो. पण झाडाची फळे मात्र
ठराविक कालावधीतच येतात. म्हणून संयम ठेवा प्रत्येक गोष्ट ही
वेळेवर होते. प्रत्येक दिवशी चांगले काम करत रहा….
फळ नक्कीच मिळेल.
जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे. मग ते प्रेम असो…..
विश्वास असो…. अथवा कोणाची साथ असो….!
पक्षी कधीच त्यांच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटे बांधून देत
नाही. ते तर फक्त त्यांना आकाशातउंच उडायला शिकवतात.
देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की
आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका. कारण हे जग
तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही तिथे…. माणसाची
काय लायकी..
जीवनात सहन करायला शिकायला हवे. कारण…. आपल्यातही
अशा बऱ्याच कमतरता आहेत आणि तरीही इतर लोक
आपल्याला सहन करत असतात.
सौभाग्य म्हणजे ते जे सात पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचे
ओरबाडून जे मिळते ते सात पिढ्या भोगतात.
महत्वकांक्षा राजालाही गुलाम बनवतात.
संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतो.
आपल्या आयुष्यातील कुठल्याही दिवसाला दोष देऊ नका.
चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस
अनुभव घेऊन येतो.
दोन गोष्टी मोजणे सोडून द्या. स्वतःचे दुःख
आणि दुसऱ्याचे सुख एवढे केले तर
आयुष्य सोपे होईल..
भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला
जास्त वेळ लागतो. आणि भाकरी
बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त
वेळ लागतो. आणि भाकरी कमवण्यापेक्षा
ती उगवण्याला जास्त वेळ लागतो म्हणून
ती खातांना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे
आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ रहा…!
म्हाताऱ्या आई वडिलांना माहीत आहे की ते मुलांच्या
घरी राहतात. पण तसे राहत नाहीत जसे मुलं त्यांच्या
घरी राहत होते….!
best motivational thoughts in marathi | सुंदर सुविचार मराठी
चांगल्या लोकांची संगत हे नेहमी आपल्यासाठी चांगलेच
भविष्य करते. कारण हवा जेव्हा फुलांना स्पर्श करून
जाते तेव्हा ती सुद्धा सुगंधित होते.
सवयी आणि संस्कार ठरवतात की माणसाची किंमत
कवडीमोल आहे की माणूस मौल्यवान आहे.
कर्म नेहमी विचार करून करा कोणाचा आशीर्वाद ही रिकामा
जात नाही आणि कोणाचा तळतळाटही रिकामा जात नाही.
नेहमी संपर्कात राहायला हवे. अनोळखी लोकांच्या
गोंधळापेक्षा आपल्या माणसांचे मौन त्रासदायक असते….!
जेव्हा विचारांना कीड लागते तेव्हा नाते संपायला सुरुवात होते.
नाते जोडायचे तर कौतुक करायला शिका आणि
नाते तोडायचे तर खरे बोलायला शिका.
नातेवाईकांची तुमच्या सोबतची वागणूक ही कधी कधी
तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टी वर देखील ठरते.
जेंव्हा वेळ चांगली असते तेंव्हा तिरस्कार करणारेही जवळ येतात.
आणि जेंव्हा वेळ खराब असते तेंव्हा प्रेम करणारेही दुर जातात.
अंधारात आपली सावली देखील साथ देत नाही.
म्हातारपणात आपले शरीर साथ देत नाही.
सगळे आयुष्य मागे पळत राहिलो ज्याच्या…
शेवटी ते धनही सोबत येत नाही….!
सुख सुविधा आणि समस्या दोन्हीं
प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर
घातक ठरतात.
चलाखपणा…. खोटेपणा…. आणि निरलज्ज असणे….
यालाच आजकाल समजदारी म्हणतात.
आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत
असते…. एक तर परमात्म्याला आणि दुसरे आपल्या अंतरात्म्याला…..!
कोणाची नियत तुम्ही कधी बदलू शकत नाही.
कांदा कितीही प्रेमाने चिरला तरी डोळ्यात
पाणी हे येतेच.
डोळे बंद केले तर येणारे संकट थांबत नाही
आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत
नाहीत.
कोणी तुमच्या रस्त्यात खड्डे करत असेल तर घाबरु नका.
हे तेच लोक आहेत जे तुम्हाला मोठी उडी घ्यायला मदत
करतात.
तुमचे ध्येय तुमच्यासाठी सर्वात प्रिय असेल
तर तुमच्यावर होणारी टिका…. कौतुक….
तिरस्कार या कुठल्याच गोष्टी महत्त्वाच्या
राहत नाहीत…!
जखम लपवणे ही देखील एक कला आहे.
कारण… इथे पावला पावलावर लोक
मीठ घेऊन आहेत….!
घरे वेग वेगळी झाली आणि सगळी लहानपणी एकत्र
खेळणारे भाऊ – बहिण एकमेकांचे पाहुणे झाले.
जिथे हे जाणवेल की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे…
तिथुननिघून गेलेले कधीही चांगले.
आयुष्याने एक गोष्ट शिकवली…. जर आपल्याला माणसांच्या जवळ
राहायचे असेल तर मौन राहायला शिकायचे आणि आपल्या माणसांना
जर जवळ आणायचे असेल तर गोष्टी मनावर घेणे सोडून द्यायला हवे.
चाल खेळायला बुद्धिबळाच्या खेळात चांगली वाटते…..
नात्यांमध्ये नाही.
best motivational thoughts in marathi | सुंदर सुविचार मराठी
फुल कितीही सुंदर असले तरी त्याचे कौतुक हे त्याच्या
सुगंधामुळे होते. आणि माणूस कितीही मोठा असला
तरी त्याला आदर हा त्याच्या गुणांमुळे मिळतो….!
तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी पोस्ट
लिहण्यासाठी प्रेरित करतो. विचार आवडले असतील तर
लाईक करा. आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करून ठेवा.
पुन्हा भेटू नवीन विचारां सोबत..
नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आपल्यासाठी छान असे motivational thoughts in marathi,
चांगले विचार, good thoughts in marathi, sunder vichar in marathi, तसेच आपल्यावर
जळणाऱ्या लोकांना कसे उत्तर द्यावे…! असे खूपच सुंदर सुविचार दिले आहेत. एकदा पूर्ण पोस्ट नक्की वाचा.
motivational thoughts in marathi – चांगले विचार आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कसे उत्तर द्यावे…!
असे म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी
होतो. किंवा त्याला यश मिळत जाते तेवढ्या
लवकर त्याच्या शत्रू मध्ये वाढ होत जाते.
त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमधे वाढ होत जाते.
याचा कोणाला दोष देणे हे चुकीचे ठरेल.कारण
हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी. म्हणून आपण
अश्या सहा गोष्टी बघणार अहोत ज्या करून
तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचे न पटणाऱ्या लोकांना
भांडण न करता हरवू शकता. त्यांना नेस्तानाबूत करू
शकता. म्हणून पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो…
हे कलियुग आहे आणि इथे आपल्या यशावर खुश होणाऱ्या
लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील.
आणि या इर्षा करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन
बसतो. आणि कुल्याही परिस्थितीत तो आपल्याला पडायला,
खाली खेचायला बघत असतो. आणि अश्या कारण नसतांना
इर्षा करणाऱ्या लोकांनपासून कसे दुर राहायचे… त्यांना कसे
टाळायचे हा आपला सतत प्रयत्न असतो. अश्या लोकांना
न भांडता अद्दल घडवायची तर या काही गोष्टी लक्षात ठेवा.
motivational thoughts in marathi – चांगले विचार
1) आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल…
सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही.
समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही
खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्या सारखे
वागायला जायचे नाही. शेवटी गीतेमधील शिकवणं लक्षात
ठेवायची. नेहमी धर्माचा…. सत्याचा विजय होतो आणि अधर्म
आणि असत्याचा नाश होतो. जसे पाच पांडवांचा विजय झाला… शंभर कौरवांन समोर अगदी तसे…
म्हणून नेहमी लक्षात ठेवा…. समोरच्याला खाली पाडण्यासाठी
आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही. आपले यश
पुरेसे आहे समोरच्याला उत्तर द्यायला.
2) प्रत्येक व्यक्तिला दुसऱ्या व्यक्ती मध्ये दोष बघण्याची सवय असते. माणूस स्वतः मध्ये काय दोष आहेत ते
कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो
आपण स्वतः काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही.
काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगले
काम केले तरी त्याला नाव ठेवायचे. त्यातले दोष काढायचे.
म्हणून अश्या दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचे नाही.
त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही..
3) शत्रूला कधीही कमी समजायचे नाही. आपण यश मिळवले आहे…
म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर
देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका. आणि सगळे
एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील
तर अश्या वेळेस घाबरून जाऊ नका. स्वतः वर विश्वास कायम असू
द्या. कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा.
कधीच कोणासमोर हार मानू नका. आपल्या शत्रुची सगळी
माहिती असू द्या. यातच आपण आपली 80% लढाई जिंकलेली
असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा… स्वतः हून पहिला
वार करायला जाऊ नका.
4) आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा. स्वतःवर संयम ठेवा. माणूस
रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अश्या काही गोष्टी
करतो ज्या करायला नकोत. ज्या गोष्टीमुळे तो स्वतः अडचणीत
सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे.
समोरचा आपल्यावर जळतो आहे. इर्षा करतो आहे.
म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका.
रागात येऊन भांडणे करायला जाल तर….. स्वतःच्या
कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचे
नुकसान होणार.
तेव्हां स्वतः च्या रागाला कंट्रोल मध्ये ठेवा. रागात माणूस
आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचे काही तरी करतो
म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी
लढाई जिंकली.
motivational thoughts in marathi – चांगले विचार
5) बुद्धिहीन व्यक्तिपासून कायम दुर राहायचे. बुद्धिहीन व्यक्ती
या पिषाच्या समान असतात. बुद्धिमान व्यक्ती अश्या लोकांपासून
कायम दुर राहते. कारण त्याला माहित असते बुद्धिहीन व्यक्ती
दुष्ट लोकांना…. हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न
करतात. दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरी. ज्यांची
नियत साफ नसते अश्या लोकांपासून कायम दुर राहावे.
6) स्वभावात कठोरपणा असू द्या.
कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना
सभ्यतेची भाषा कळत नाही. जशास तसे उत्तर कळून येते
म्हणून समोरच्या व्यक्ती समोर आपण कमजोर आहोत…
असे कधीही दिसून येता कामा नये.
आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा
आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा.
जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही. आपल्या स्वभावात
कडवटपणा असू द्या. आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा.
कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देतांना आपला सत्याचा
मार्ग सुटता कामा नये. कितीही अडचणी आल्या तरी आपली
लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी.
6 Motivational thoughts In Marathi आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कसे उत्तर द्यावे | changle vichar
motivational thoughts in marathi या पाच गोष्टी अडचणीच्या काळात लक्षात ठेवा Sunder Vichar in Marathi
प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या आयुष्यात येतात तेंव्हा आपल्याकडे दोनच पर्याय असतात.
एक तर त्यांचा सामना करायचा किंवा त्यापासून दूर पळायचे.आता हे आपल्यावर
अवलंबून आहे की आपण त्या परिस्थितीत काय करतो.
आपण न घाबरता त्याचा सामना केला तर आपण त्या समस्येतून बाहेर पडतो.
आणि त्यापासून पळालो तर आयुष्यभर त्या समस्या पासून पळत राहतो.
मग या समस्यांचा सामना करून एक यशस्वी आयुष्य जगूया.
या पोस्ट मध्ये अशा काही गोष्टी बघूया ज्या अडचणीच्या वेळेस
म्हणजेच तुम्ही समस्या मध्ये….. प्रॉब्लेम्स मध्ये असतांना….
तुम्हाला कामाला येतील. आणि तुमचे आयुष्य बदलून जाईल.
1) आपले प्रॉब्लेम्स आपल्या समस्या प्रत्येकाला सांगायच्या नाहीत.
कुठल्याही समस्येमुळे आपण खचलो किंवा कमजोर पडलो तरी समोरच्याला
तसे दाखवता कामा नये. आपण त्या समस्येचा सामना करायला हवा.
लोकांसमोर प्रत्येक वेळेस आपल्या कमजोर बाजू बोलून दाखवायच्या
नाही. समोरच्याला या गोष्टी कळता कामा नये की… आपण समस्ये मध्ये
आहोत. रोज रोज आपले प्रॉब्लेम्स आपल्या समस्या सांगणाऱ्या
लोकांपासून इतर लोक हे कायम दूर राहतात.
ते विचार करतात की आता हा आलाआणि त्याचे रोजचे रडगाणे रडणार आहे.
या व्यतिरिक्त तुमचे एक मोठे नुकसान असे होईल की तुमच्या शत्रूंना कळेल की
तुमच्या नेमक्या कमजोर बाजू कुठल्या आहेत आणि ते याचाफायदा उचलू शकतात.
आणि तुम्ही आणखीन मोठ्या समस्या मध्ये अडकू शकता.
यापासून वाचायचे असेल तर एक गोष्ट करायची, सापा सारखे राहायचे
सापाच विष काढून घेतले तरी साप फणा काढायचे सोडत नाही.
तो त्याच्या रक्षणासाठी किंवा समोरच्या प्राण्याला भीती दाखवण्यासाठी
त्याचा फणा काढणे बंद करत नाही..
फणा काढल्यामुळे तो विषारी आहे की बिनविषारी हे कोणाला ओळखायला
येत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या कमजोर बाजू इतरांना सांगितल्या नाही
त्यांच्यासमोर तुम्ही स्ट्राँग आहात हे दाखवले तर समोरचे तुम्हाला नुकसान
करण्या अगोदर दहा वेळेस विचार करतील.
म्हणून आपल्या समस्या बद्दल सांगतांना त्या अशाच व्यक्तीला सांगा जो तुमचा
खरंच जवळचा आहे. आणि तो तुमची अडचण समजून घेऊ शकतो. आणि त्यातून
बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत देखील करू शकेल. आणि मदत नाही करू
शकला तरी तुमच्या प्रत्येक सुख दुःखात तुमच्या सोबत असेल.
motivational thoughts in marathi – चांगले विचार
2) Have Patience :- संयम ठेवायला शिका. माणसाची ओळख ही त्याच्या
वाईट काळामध्ये होत असते. वेळ चांगली चालू असेल तेव्हा प्रत्येक जणहा योग्य निर्णय घेत असतो.
पण जेव्हा वेळ खराब चालू असते तेव्हाच त्या माणसाची खरी ओळख होते.
वाईट काळातच त्यांची कुशलता त्यांची योग्यता सिद्ध होत असते. वाईट काळात जो व्यक्ती योग्य
निर्णय घेतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. आणि योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो संयम ठेवू
शकतो. याच गोष्टीला थोडे विस्ताराने समजून घेऊ.
कुठलीही समस्या किंवा अडचण आली तर माणूस अगोदर काय करतो माणूस
अगोदर घाबरतो. आणि घाबरलेला असतांना डोक्यात नको ते विचार सुरू होतात.
विचारांची गर्दी व्हायला सुरुवात होते. आणि माणूस बऱ्याच वेळेस नको असलेले निर्णय
अशा वेळेस घेऊन मोकळा होतो.
उदाहरण द्यायचे झाले तर शाळेत किंवा कॉलेजमध्ये असतांना परीक्षेच्या वेळेस
आपला होणारा गोंधळ. परीक्षेची तारीख जस जशी जवळ येते तसे तसे आपल्या
मनात भीती निर्माण व्हायला सुरुवात होते आणि भीतीपोटी आपण सगळा
syllabus वाचायला सुरुवात करतो.
आणि जे आपल्याला चांगल्या प्रकारे येत असते त्यातही आपल्याला संशय
निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हेसगळे होते फक्त संयम गमावल्याने
आणि परिणामी आपण परीक्षेत नापास होतो.
जगातले कुठल्याही वैज्ञानिकांची उदाहरणे घेतली तर असे लक्षात येईल की…
त्यांना शोध लावायला काही तास…. काही दिवस…. काही महिने लागले नाहीत
तर वर्ष लागलेत…. शोध लावतांना बऱ्याच वेळेस ते अयशस्वी ही झाले पण तरीही
त्यांनी त्यांचा संयम ठेवला म्हणून ते यशस्वी होऊ शकले. म्हणून समस्येच्या काळात
ठेवलेला संयम तुम्हाला यशस्वी बनवू शकतो.
motivational thoughts in marathi – चांगले विचार
3) Positivity ( सकारात्मकता ) :-
प्रत्येकजण म्हणतो सकारात्मक विचार करा नकारात्मक नाही. कुठली समस्या आली तरी…
सकारात्मक राहून त्यावर उपाय शोधा. पण सगळ्यात अगोदर हे माहीत असायला हवे की
सकारात्मक विचार करणे म्हणजे नक्की काय करणे.
सकारात्मक विचार काय आहे ते सांगण्या अगोदर सकारात्मक विचार म्हणजे
कोणते विचार नाही हे अगोदर समजून घेऊ.. 1) मी काही विचार करतोय आणि त्या विचारानुसार सगळे काही घडुन यायला हवे हा सकारात्मक विचार नाही.
2) सकारात्मक विचार हा देखील नाही की एखादी गोष्ट मला हवी आहे आणि ती मला मिळायलाच हवी आणि त्याबद्दल विचार केला तर ती मला मिळणारच आहे.
3) माझ्या आयुष्यात सगळे चांगले होत आहे. आणि मी चांगला विचार केला तर चांगलेच घडणार आहे. वाईट काहीचघडणार नाही हा देखील सकारात्मक विचारनाही. या तीनही गोष्टी या तुमच्या इच्छा आहेत तुमचा सकारात्मक विचार नाही.
तुमच्या इच्छा तुमच्या आशेचा एक भाग आहे. पण त्याचा वास्तविक आयुष्यासोबत काहीही संबंध नाही.
जर कोणी म्हणत असेल सकारात्मक रहा तर त्याचा हा अर्थ होत नाही की तुम्ही फक्त विचारांमध्ये
सकारात्मक आहात आणि कृती काहीही
करणार नाही.
सकारात्मक विचार म्हणजे तुम्ही समस्या बद्दल विचार करत आहात. त्यावर सोल्युशन
काढण्याचा प्रयत्न करत आहात. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात. आणि
ते करत असतांना हा विचार ठेवून की माझ्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. आणि मी
माझ्या प्रयत्नांमधून या समस्येतून बाहेर निघणार आहे. याला म्हणतात सकारात्मक
विचार असणे.
तुम्ही समस्या मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न देखील करत आहात आणि तो
प्रयत्न करतांना तुमच्या विचारांमध्ये देखील सकारात्मकता ठेवत आहात. म्हणून
कुठलीही समस्या आल्यानंतर आपल्या प्रयत्नांसोबत आपल्या विचारांमध्ये देखील
सकारात्मकता ठेवा. तुम्ही नक्कीच त्या समस्यातून बाहेर पडणार.
4) control your fear :- ( आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवा. )
जेव्हा कधी समस्या येते. आणि सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असते अशा
वेळेस तुम्हाला तुमच्या भीतीवर कंट्रोल ठेवता यायला हवा. एक घाबरलेला आणि
कमजोर असलेल्या व्यक्ती कधीच समस्यांचा सामना करू शकत नाही.
कारण त्याला त्यावेळेस हा विचार करायला हवा असतो की आपण या
समस्येतून बाहेर कसे निघणार पण तो हा विचार न करता तो त्याच्या
भीतीचा विचार करतो. आता माझे कसे होणार मी काय करणार घरच्यांच्या
सामोर कसा जाऊ. आता माझे भविष्य कसे असणार ह्या सगळ्या गोष्टींचा तो
विचार करत असतो.
कारण तो घाबरलेला असतो. म्हणून आत्मविश्वासा सोबतच आपल्या
भीतीवर आपला कंट्रोल असायला हवा. आत्मविश्वास असणारा व्यक्ती न घाबरता
कुठल्याही समस्येतून बाहेर निघण्यासाठी मार्ग हा शोधून काढतो.
5) don’t regret :- ते लोक कधी खुश राहू शकत नाहीत जे आपल्या भूतकाळातील
वाईट अनुभवांचा विचार करून पश्चातापकरत राहतात. हे खरे आहे की अपयशाचाकाळ हा माणसासाठी
कठीण असतो. पणआपण नेहमी आपला भूतकाळाचा विचार करत राहणार तर आपण कधीच आपल्या
भविष्यासाठी चांगले करू शकणार नाही. म्हणून नेहमी वर्तमान काळात जगायला शिका. भूतकाळाचा
विचार करून भूतकाळामध्ये जगून कोणाच्या हाती काहीही लागत नाही.
हे होते ते पाच मुद्दे जे तुम्हाला तुमच्या समस्येच्या काळामध्ये
लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर लाईक शेअर
करायला विसरू नका.
धन्यवाद
या पाच गोष्टी अडचणीच्या काळात लक्षात ठेवा | Sunder Vichar Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये
मी एक pouranik katha तुम्हाला सांगणार आहे.
या कथेत प्रभू श्री राम यांना नारद मुनींचा शाप
कसा भोगावा लागला आणि श्री हरी विष्णू यांनी
नारद मुनीच्या शापाचा कसा मान ठेवला हे माहीत
करूया. जय श्री राम
नारद मुनींच्या शापामुळेच.. श्री रामाला वनवास भोगावा लागला
नारद मुनी हे भगवान विष्णूंचे
परमभक्त म्हणुन ओळखले
जातात. चालता बोलता सतत
“नारायण नारायण” जप
करणारे नारद मुनी यांना देवर्षी सुद्धा म्हटले जाते.
नारद मुनी एकदा तपश्चर्येला
बसले. त्यांनी अनेक वर्ष कठोर
तप केले. आणि कोणी तपाला
बसला रे बसला कि नेहमीप्रमाणे
देवराज इंद्राला भीती वाटू लागली.
कोणीही तप केले कि इंद्राला तप
करणारा वर मागतांना मोठी शक्ती
मागून स्वर्गातली आपली सत्ता
हिरावून घेईल असे वाटायचे. मग
तो ते तप भंग करून… पूर्ण होऊ
नये म्हणून प्रयत्न करायचे.
या वेळी इंद्राने कामदेवाला
नारदाचे तप भंग करायला
पाठवले. कामदेवाने अनेक
प्रयत्न केले… नारदाजवळ सुंदर
स्त्रीला पाठवले. पण नारदाने
आपली तपश्चर्या भंग होऊ दिली
नाही. आपले लक्ष विचलित न
होऊ देता तपावरच केंद्रित केले.
शेवटी कामदेवाने हार मानली
आणि नारदासमोर हात जोडले.
तो म्हणाला ” हे मुनीवर तुम्ही
धन्य आहात. माझ्या कुठल्याही
प्रयत्नाला तुम्ही यश लाभु दिले
नाहीत. आपल्या ध्यानात इतके
मग्न मी आजवर केवळ
महादेवांनाच पाहिले आहे. की
ज्यांचे ध्यान कोणीही भंग करू
शकत नाही. नारद हे ऐकून
प्रसन्न झाले. आणि स्वतः बद्दल
त्यांना अभिमान वाटला. त्यांनी
कामदेवाला उत्तर दिले…..
कामदेवा… आता तुमच्या
लक्षात आलेच असेल कि
एवढी एकाग्रता असलेले काही
एकटे महादेवच नाहीत. जाऊन
सांगा तुमच्या देवराज इंद्रांना….
की नारदाचे तप कोणीही भंग
करू शकत नाही. देवर्षी
असल्यामुळे त्यांना मनात येईल
त्या ठिकाणी प्रकट होणाची
सिद्धी प्राप्त होती. महादेवासारखी
पातळी गाठल्या बद्दल त्यांना लगेच
महादेवांसमोर जाऊनच सांगावे
वाटले.
ते ताबडतोड कैलासावर जावून
महादेवांना भेटले. आनंदाने त्यांनी
घडलेली घटना महादेवांना सांगितली.
महादेवांना नारदाला थोडा गर्व
झाल्याचे लक्षात आले. पण त्यांनी तसे
काही न दाखवता नारदाचे अभिनंदन
केले. “वाह देवर्षी… खूप छान. तुम्ही
कमाल केलीत.” ” धन्यवाद प्रभू, आता
मला कधी एकदा माझ्या प्रभू विष्णूंना
हे सांगतोय असे झालेय” ” त्यांना सर्व
समजलेच असेल. तुम्ही जाऊन
सांगण्याची आवश्यकता नाही.” असे
महादेवाने त्यांना सांगितले.
महादेवाचे म्हणणे नारदाला समजले
नाही. आपण भक्तीची एवढी परिसीमा
गाठली असतांना आपल्याच प्रभूंना का
सांगू नये असे त्यांना वाटले. त्यांना
अपेक्षा होती कि हा वृत्तांत ऐकून
भगवान विष्णू तर अत्यंत प्रसन्न होतील.
ते तिथून तडक वैकुंठात गेले. आणि
अभिमानाने विष्णूदेवा समोर ही त्या
घटनेबद्दल सांगितले.
महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णूंना
त्रिकालदर्शी असल्यामुळे सर्व काही
माहीतच होते. आणि आता नारद बढाई
मारण्यासाठी आपल्यासमोर आले
आहेत हे ही त्यांना समजले. त्यांनी
एक स्मित हास्य केले आणि नारदांना
सांगितले…. “वाह मुनिवर….! या पुढे
ही असेच सावध राहा.”
नारद मुनींना हवी तेवढी प्रतिक्रिया न
मिळाल्यामुळे ते थोडे नाराज झाले.
भगवंतांना नमस्कार करून ते निघाले.
त्यांचा जगात सर्वत्र संचार असे. ते
फिरता फिरता एका राज्यात गेले.
तिथल्या राजकन्या श्रीमतीचे स्वयंवर
होऊ घातले होते. राजाने नारदाला
आदराने बोलावले. पाहुणचार केला.
राजपरिवारातल्या सर्वांनी नारदाचा
आशीर्वाद घेतला.
श्रीमती अत्यंत सुंदर होती. तिला
पाहुन नारदाला साक्षात देवी
लक्ष्मी पाहिल्याचा भास झाला.
नारदाला तिच्या स्वयंवराबद्दल
ऐकुन त्यात भाग घेऊन तिच्याशी
लग्न करण्याची इच्छा झाली. पण
त्यांना वाटायला लागले कि देवी
लक्ष्मी सारखी सुंदर असणारी
राजकन्या आपला वरही
नारायणा इतकाच सुंदर निवडेल.
ते पुन्हा वैकुंठात गेले आणि त्यांनी
भगवंतांना आपल्यास हरिरूप
देण्याची विनंती केली. हरी
म्हणजेच विष्णु. भगवंतांनी
तथास्तु म्हटले. नारद स्वयंवरात
पोहोचले. त्यांच्याकडे पाहुन
सर्व जण गालातल्या गालात
हसत होते. नारदांना आश्चर्य
वाटले पण त्यांनी दुर्लक्ष केले.
स्वयंवर सुरु झाले. राजकन्या
सर्व हातात हार घेऊन एक एक
इच्छुकाकडे बघत सभेतुन फिरत
होती. नारदाकडे आल्यावर तिला
एकदम हसु आले, आणि ती
तशीच पुढे गेली. आता मात्र
नारदाला काही कळेना. साक्षात
भगवंता कडून हरी रूप मिळूनही
आपले हसू व्हावे याचे त्यांना वाईट
वाटले. त्यांनी जवळ एका जलपत्रात
स्वतःचे रूप पाहिले… आणि ते
चमकले. त्यांचे रूप माकडाचे
दिसत होते. हरी या शब्दाचा एक
अर्थ माकड असाही होतो.
भगवंतांनी त्यांना हरीरूप
मागितल्यावर सर्वकाही
माहित असूनही त्या शब्दाचा
हा अर्थ काढुन माकडाचे रूप
देऊन भर सभेत आपला
अपमान केल्याबद्दल त्यांना राग
आला. तेवढ्यात सभागृहातुन
जल्लोषाचा आवाज झाला. त्यांचे
तिकडे लक्ष गेले. श्रीमतीने ज्याच्या
गळ्यात माळ घातली ते स्वतः
भगवान विष्णूच होते. आपली
अशी फसवणुक पाहुन नारद
अत्यंत संतापले.
त्यांनी साक्षात भगवंताला शाप
दिला. “प्रभु, तुमचे तप करता करता
मी प्रत्यक्ष कामदेव समोर येऊनही
त्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही.
मी नेहमी तुमचे नाव घेत राहतो.
तरीही तुम्ही माझी एक इच्छा
पूर्ण करण्याऐवजी माझा असा
अपमान केलात. माझ्या मनात
भरलेल्या स्त्रीशी स्वतःच लग्न
केलेत. माझा तुम्हाला शाप आहे
कि एक दिवस तुम्हाला तुमच्या
पत्नीचा विरह सहन करावा लागेल
आणि ज्या प्राण्याचे रूप देऊन
तुम्ही माझा अपमान केलात….
त्या माकडालाच मदत मागावी
लागेल आणि त्याशिवाय तुमचे
कार्य पुर्ण होणार नाही. ” ते हे
बोलत असतानांच आजूबाजूचा
राजमहाल, सर्व लोक गायब झाले.
नारद, भगवान विष्णू आणि देवी
लक्ष्मी आता वैकुंठात होती. आता
पर्यंतची सगळी माया होती. हे
नारदाच्या लक्षात आले.
भगवंत म्हणाले… “हे नारदा…
तुझ्या भक्तीचा मी नेहमीच आदर
करतो. आणि माझ्या मनात
तुझ्याविषयी प्रेमच आहे. तू केलेल्या
तपाचे कौतुकही आहे. पण कामदेवाने
थोडीशी स्तुती करताच तुझ्या मनात
अहंकार उत्पन्न झाला.
तुला हे चांगलेच माहित आहे
कि मी काय आणि महादेव
काय आम्ही त्रिकालदर्शी
आहोत. आम्हाला सर्व काही
समजते. पण याचा तुला तुझ्या
अहंकारामुळे विसर पडला.
आणि तु स्वतःला महादेवांशी
तुलना झाल्यामुळे त्यांच्या
बरोबरीचा समजुन त्यांच्यासमोर
आपली प्रशंसा करण्यासाठी
गेलास.
त्यांनी मोठ्या मनाने तुझे
कौतुक केले आणि मला
हे सर्व सांगण्याची गरज
नाही हे ही सांगितले.
तरीही तु माझ्यासमोर येऊन
स्वतःची कथा सांगितलीस.
मी सुद्धा तुला यापुढे
सावधान रहा असा इशारा दिला.
पण तिथुन निघाल्यावर तु मोहात
पडलासच. कामदेवाच्या पाशात
न अडकल्याचा अभिमान बाळगलास
पण आपले ब्रह्मचर्याचे व्रत विसरून
राजकुमारीच्या मोहात पडलास आणि
मला माझ्यासारखे रूप मागण्यास
आला. एरवी मी तुला मोठ्या आनंदाने
ते बहाल केले असते, पण मला तुझ्या
मोहासाठी तुझे सहाय्य्य करून तुझे
व्रत तोडायचे नव्हते.
हि सगळी माझीच माया होती.
मी तुझी परीक्षा पाहत होतो.
पण तु मोहात पडुन या परीक्षेत
अपयशी ठरलास. ” नारदाला
आता आपली चुक समजली
आणि आपण मोहाच्या रागाच्या
भरात आपल्याच प्रभुला शाप
देऊन बसलो याची जाणीव झाली.
त्याने लोटांगण घालत भगवंतांची
क्षमा मागितली. भगवंतांनी
नारदाला क्षमा केली आणि
स्वतःवर संयम ठेवण्यास सांगितले.
ते आपल्या भक्तांचा नेहमी मान
राखतात. शापाच्या रूपात का
असेना पण नारदाचे शब्द भगवंतांनी
खरे केले. राम अवतारात त्यांना
सीतेचा विरह सहन करावा लागला.
तिला शोधताना त्यांना हनुमान,
सुग्रीव, अंगद आणि समस्त
वानरसेनेची फार मदत झाली.
मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी
वाटली ते कॉमेंट करून नक्की
कळवा. आवडल्यास लाईक
करायला विसरू नका.
धन्यवाद
जय हरी विष्णू
सुंदर कथा | नारद मुनींनी श्री रामाला शाप का दिला | pouranik katha | पौराणिक कथा मराठी | राम कथा
या पोस्ट मध्ये २१ असे आयुष्य बदलून टाकणारे, Motivational quotes in marathi, सुंदर सुविचार, चांगले विचार, life changing motivational quotes in marathi, best line in marathi, आणले आहेत. थोडा वेळ काढून हे विचार नक्की वाचा.
नमस्कार मित्रांनो… बोलण्याची कला
ही एखाद्या जादू पेक्षा कमी नाही.
बोलण्याने जग जिंकता येते. ज्ञानाने नाही.
शब्दांचा जादुगार असणारा माणूस हा ज्ञानी
व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो.
आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती
आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो.
असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले
काम काढून घेतात. आणि स्वार्थ साधून
मोकळे होतात.
आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला चलाखी चे
एकवीस नियम सांगणार आहे. जे तुमच्या
अत्यंत उपयोगी पडणार आहेत.
तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त सहाव्या
नियमा पर्यंत वाचा…. माझी खात्री आहे
त्यानंतर तुम्ही या पोस्ट ला अर्ध्यात नाही
सोडणार. चला तर मग वाचायला सुरू करूया.
1) आत्मसन्मान self respect :-
जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचे करत
आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात….
जिथे तुमचा अधिकार असेल…! म्हणून खड्ड्यात गेली जग दुनिया आणि सगळे लोक.
सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रीसपेक्ट, आत्मसन्मान. प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर
वागणे तुम्हाला गुलाम बनवू शकते.
motivational quotes in marathi
२ ) पायाला लागलेली ठेस सांभाळून चालायला शिकवते.
आणि मनाला लागलेली ठेस समजदारी ने जगायला शिकवते.
पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाहीत. एकदा लागलेली ठेस
त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवे.
३) मतलबी :-
या जगात मतलबी हा शब्द वजनदार आहे.
एकदा मतलब निघाला चांगल्यातले चांगले नाते तुटायला
सुरुवात होते. माणसे दूर व्हायला सुरुवात होते. मतलब
आहे…. तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या
चलाखीने लोकांना बांधून ठेवा.. लोकांना त्यांचा मतलब
दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. लोक तुमच्या
पासून दूर जाणार नाहीत.
motivational quotes in marathi – आयुष्य बदलून टाकणारे 21 नियम
एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की दहा दिवसानंतर
राणी मरणार आहे. आणि झाले ही तसेच. दहा दिवसानंतर राणी
मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट
खरी करण्यासाठी राणीला मारले असावे.
ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये…. म्हणून राजाने त्याला
मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला
विचारने… तू ज्योतिष आहे ना चल सांग… तुझा मृत्यू कधी आहे….?
ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिले की राजा तुमच्या मृत्यूच्या ठीक
दोन दिवसा अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला
मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझा ही मृत्यू होईल. राजांने
त्याला सोडून दिले. लोकांना आपल्यावर असे निर्भर ठेवायला शिका की
लोक आपल्या सोबत वाईट करणारच नाहीत.
४ ) स्वार्थी (selfish) :-
तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका
की या कलियुगात स्वार्था शिवाय कोणी तुमच्या जवळ असेल.
एक चलाख व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते.आणि याच
गोष्टीचा फायदा घेऊन आपले काम काढून घेतात. जेंव्हा पण
तुम्ही समोरच्या कडून काही कामकरवून घेता. त्याला काहीही
मोबदला देत नाही… तेंव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री
देता येत नाही. पण… तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात
काही देण्याचे आमिष दाखवले तर तुमचे काम लवकर होईल.
या जगात तुमच्या कुटुंबा शिवाय कोणीही तुमच्या जवळ
स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही… ही गोष्ट कायम
लक्षात ठेवा.
Motivational quotes in marathi
५ ) कमजोरी :-
मरून जा पण आपली कमजोरी कधी कोणाला
सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात….
ज्यांच्यावर आपण स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या
कमजोर बाजू, आपले सिक्रेट, सगळे सांगून बसतो. जर तुम्ही
असे करत असाल… तर तुम्ही अडचणीत सापडू शकता….
कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली.
तुमच्यात आणि त्या व्यक्ती मध्ये मतभेद निर्माण झाले.
तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल, तर तुमच्या या
सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते…
आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा.
त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची
शेवटची हद्द असते.
या जगात सगळ्यात शक्तीशाली
हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाही तर
तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत.. योग्यवेळी योग्य शब्द
वापरले तर तुमचे बरीचशी कामे सोपी होतील. योग्य शब्दांची
किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते ज्याला
कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात
बोलायला शिका. शब्दांप्रमाने तुमचे वाक्य देखील सोपे असायला
हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत.
बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे
दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला
समजत नाहीत. बोला राजा सारखे… काम करा गुलामा
सारखे…. मेहनत करा मजदुरा सारखी आणि आपला attitude ठेवा बादशहा सारखा.
कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत
असेल… नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिऍक्ट
करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे
त्या प्रश्नाचे उत्तर नाही… असा त्याचा अर्थ होतो.. चिडून तुम्ही
प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात… असा त्याचा अर्थ होतो.
थंड डोक्याने शांत विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावे
लागेल. कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर शंभर वेळेस
विचार करायला हवा.
८) कमी बोला (speak less) :-
या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच
पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे. प्रमाणापेक्षा जास्त
बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे..
९) eye contact :-
नजरेला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळेस
समोरचा बोलत असतांना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा
समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत
आहात तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून
कोणाशी ही बोलतांना.. त्या व्यक्तीच्या नजरेला नजर
देऊन बोलत जा.
motivational quotes in marathi
१०) तोंडाने कडू ते मनाने साफ
आणि तोंडाने गोड ते मनाने साफ.
तोंडाने गोड असणारे… तुम्हाला
गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून
घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त
गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास
ठेवू नका.
११) जलद आणि स्थिर विचार :-
एका राजाने आपल्या सगळ्या
सल्लागारांना एक हजार सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक
अट घातली की ही नाणी खर्च करतांना माझा चेहरा बघून खर्च
करायची. आणि दुसरी अट पुढचे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही.
सात दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी
आपल्या मंत्रिमंडळात चांगले पद आणि पाच हजार सोन्याची नाणी
देईल. सात दिवसानंतर सगळे सल्लागार राज्याला येऊन भेटले.
सगळ्यांनी हेच सांगितलं की राजा नाणी खर्च झाली नाहीत. कारण
तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही.
त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी माझी सगळी नाणी खर्च करून
आलो आहे. आणि ते ही तुमच्या अटीनुसार.
राजाने आश्चर्याने विचारले कसे….? सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणे खर्च
करतांना मी त्या नाण्याकडे बघत होतो. आणि मग ते खर्च करत होतो.
कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचे चित्र आहे. प्रश्न हा
नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की
तुम्ही किती कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता.
कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणे
कठीण आहे असे आपल्याला वाटते. आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो…
तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात.
motivational quotes in marathi – आयुष्य बदलून टाकणारे 21 नियम
१२) ज्यांना काही ध्येय नाही ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाहीत अशा
लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे
खरे आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही
असणार. त्याच प्रकारे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही ध्येय नाही… गोल
नाही… त्या व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत
नाही. अशा व्यक्तींसोबत रहा…. ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही
शिकत राहणार.
१३) patience (संयम) :-
ज्या माणसा जवळ petience नाही संयम नाही
त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावा लागतो. म्हणून
कुठलेही काम करतांना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार
करून उत्तर द्या..
बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर
निर्णय द्यावा. आणि तुम्ही प्रेशर मध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन
बसतात. आणि तुमचे नुकसान करून घेतात म्हणून संयम ठेवून
निर्णय घ्या.
१४) टॉपिक झोन :-
कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर
चर्चा करतांना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास
करा. कुठल्या मुद्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा
आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर
तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा तरच तुम्हाला
त्या मुद्याला धरून बोलता येईल..
जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने
बोलत असाल तर ते लोकांना खरे वाटते. आणि जर तुम्ही खरे बोलत
असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स…. आत्मविश्वास नसेल
तर ते लोकांना खोटे वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा…
तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील.
motivational quotes in marathi
१६) मनाने नाही डोक्याने विचार करून निर्णय घ्या.. जी व्यक्ती
डोक्याने नाही मनाने इमोशनल… भावनिक होऊन विचार करते
त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ
साधून घेतात.. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने
विचार करून घ्या.
१७) विश्वास (trust):-
खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष
तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता. आणि मान मिळवू शकता
पण जेव्हा ते खरे उघड केल्या जाते तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या
डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी
असणार. खऱ्याचा दगड त्यावर पडला… कि ती फुटणार. म्हणून
जे काही बोलायचे ते खरे बोला आणि खरे बोलण्यावरून लोकांचा
विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी सोबत राहणार.
१८) स्वतः लाच जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या
गोष्टींना लक्ष देऊन ऐका. कधीही हा गैरसमज ठेवू नका
की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात. इंटेलिजंट आहात.
स्वतःला इतकाही हुशार समजू नका की तुमच्या या हुषारीच्या
अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल.
१९) वेळ आणि मान :-
तुम्ही एखाद्याला प्रमानापेक्षा तुमचा
वेळ आणि मान देत असाल… तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही
रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची
किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि
मान द्या जेवढी त्याची लायकी आहे.
motivational quotes in marathi
२०) स्वतः ला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी
नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही आणि समोरच्याला
ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात
ठेवा कधीही इतके सरळ राहू नका. की कोणी येईल आणि
तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड
अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही
नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा.
२१) लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा.
एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राज्याला भेटायला जातो, तेव्हा त्या
व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की
आत मध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे… त्यातला अर्धा
हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आत मध्ये जातो आणि
राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा. त्याची ही विचित्र
मागणी ऐकून राजा त्याला विचारतो पण का..? तेव्हा तो व्यक्ती
सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवर आत मध्ये
सोडल आहे की… आत मध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला
अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला
आणि त्याने शंभर फटके हे शिपायाला दिले.
लक्षात ठेवा लोकांना चलाखीने त्यांच्याच जाळ्यात
अडकवायला शिका. कधी दुसऱ्यां सोबत वाईट करू नका.
आणि स्वतः सोबत कधी वाईट होऊ देऊ नका.
तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी सुंदर विचार, प्रेरणादायी विचार चांगले विचार तुमच्या पर्यंत आणण्यासाठी प्रेरित करतो. Motivational quotes in marathi
पोस्ट… हे good thoughts in marathi, आवडले असतील….
तर लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विचारां सोबत….
धन्यवाद
सुंदर विचार | आयुष्य बदलवून टाकणारे 21 नियम #motivational quotes marathi #knowledgemarathi
Your Queries
सुंदर विचार | आयुष्य बदलवून टाकणारे 21 नियम
#motivational quotes marathi #knowledgemarathi #suvichar
#suvichar_status #vijay_bhagat #विजय_भगत #sunder_vichar
#good_thoughts #motivation #bestlines #सुंदर_विचार #सुविचार
best line in marathi, sunder suvichar, good thoughts in marathi
inspirational thoughts in marathi, life quotes in marathi
मराठी कथा, मराठी कथा वाचन
मराठी कथाकथन, marathi katha, मराठी भावनिक कथा
marathigoshti, marathi chan chan goshti, marathi story