Good Thoughts In Marathi On Life | सुंदर मराठी सुविचार फोटो
नमस्कार मित्रांनो….
जसे चिकूचे बी फळाच्या आत राहते आणि जेव्हा फळ पिकले की फळातून
सहजच आणि स्वच्छ प्रकारे बाहेर पडते…! पिकलेल्या चिकूचा आतील गाभा स्वतःला चिकटूच देत नाही…!
तसेच आंब्याची कोय तर… पिकलेल्या आंब्याच्या रसात इतकी लपटून जाते की… फळ पिकल्यावारही… त्याच्या रसातून वेगळी होत नाही… परिणामतः लोक तिला पूर्णपणे चोखल्याशिवाय फेकतच नाही. म्हणूनच…. जीवनात चिकूच्या बी सारखे वागावे…. सगळ्या मोहजालात राहूनही… योग्य वेळ आल्यावर न चिकटता सहजपणे बाहेर निघून जावे…! आंब्याच्या कोयीसारखे माया रूपी रसात चिकटून रहाल तर…. लोक फक्त चोखून किंवा पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत…
म्हणूनच माणसाने पिळायच्या आधीच बाहेर पडून जावे…!
Good Thoughts In Marathi On Life | सुंदर मराठी सुविचार फोटो
Good Thoughts In Marathi on Life | आयुष्याचे एक कटू सत्य
दीड कोटीचा मोठा बंगला…!
त्या बंगल्यात चेहरा दिसतो… अशी फरशी…!
वरून त्या चकाकणाऱ्या फरशीवर मखमलचा गालीचा…!
डोळे दिपवून टाकणारे रंगीबेरंगी लाइट्स……!
आणि मोठमोठे झुंबर…!
बंगल्यात डोळ्याचे पारणे फिटेल असे फर्निचर लागलेले…!
जीवनभर भरपूर कष्ट करून उभारलेल्या याच घरातून मेल्यानंतर नातलगांची तासाभरातच उचलायला घाई करणे…!
या बंगल्यात झोपण्यासाठी एक मास्टर बेडरूम…! त्यावर नरम – लुसलुशीत अशी गादी…! त्याच गादीला मँचिंग असे चकचकीत बेडशीट…!
मृतदेह दवाखान्यातून बंगल्यात आणाल्यावर स्टोररूम मधले जुने गांजलेले लोखंडी पलंग…!
त्या जुन्या पलंगावर एक फाटलेले बेडशीट…! डोक्याकडे एक वरचा कव्हर फाटलेली…! गांजलेलीच उशी…!
बंगल्यातील देवघरात चांदीचे निरंजन…!
सुवासिक…!सुगंधीत…! असे धुप – अगरबत्ती…!
Good Thoughts In Marathi on Life | आयुष्याचे एक कटू सत्य
आणि मृतदेहाच्या जवळ शेवटी लावतात… पितळेचे जुने निरंजन…! व दहा रूपयांपेक्षा कमी ची अगरबत्ती…!
दीड कोटीच्या बंगल्यात… पाच – सहा लाखाचे बाथरूम…! त्या बाथरूममध्ये आंघोळीला टपबाथ असतो…! मोठा गिझर लागलेला ज्याने शाँवर मध्येही गरम पाणी येतो…!
अंगाला लावायला सुगंधीत साबण आणि शांपू असते…! बाथरूमच्या चारही बाजुला आरशे लागलेले असतात…! एवढी चांगली… आणि महाग बाथरूम बनवून ही शेवटच्या वेळी उपयोगी पडत नाही…!
आता शेवटचा कार्यक्रम बघूया…
तुमच्या आंघोळीसाठी आणलेल्यापाण्याला कुणीही ओलांडू नये असा नातेवाईकांचा स्पष्ट आदेश…!
तुमच्या अंघोळीसाठी जे पाणी गरम होत आहे ते बाहेर उघड्या जागेत…! आयुष्याचीशेवटची आंघोळही उघड्यावर…!
आयुष्याच्या शेवटच्या आंघोळीची साबण म्हणजे…
दहा रूपयाचीच साधी साबण… कोणताही नातेवाईक किंवा मित्र असे कधीही म्हणत नाही कि
याची शेवटची आंघोळ
बंगल्यातील बाथरूम मध्ये शाँवर खालीकरूया…
पूर्ण जीवनभर ब्रँडेड कपडेवापरणारा…
आयुष्याचा शेवटचा ड्रेस म्हणजे साधा कापड… ज्या ड्रेस ला खिशा हि नाही असा…!
उगाच जास्त महाग ड्रेस नका आणू अशी स्पष्ट सूचना…!
तीन बटन असलेला मांजरपाटचा शर्ट…! नाडा असलेला पायजमा…!
जीवनभर हँट घातली… आयुष्याच्या शेवटी साधी कापडाचीच टोपी…!
कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकाला असे वाटत नाही कि
जीवनभर याने ब्रँडेडच कपडे घातले आहेत…
शेवटच्या वेळीही ब्रँडेडच आणा…! हा सगळा त्याचाच कमावलेला आहे…!
पन्नास लाखाची गाडी दारातउभी राहते…! आणि त्या गाडीचा ड्रायव्हर हि खास ड्रेस घातलेला…! ज्या गाडीत जिवंत असतांना आरमात बसलात…! त्या पन्नास लाखाच्या गाडीचाशेवटी तुम्हाला
उपयोग काहीही नाही…!
स्मशानात जाण्यासाठी गाडी नगरपालिकाची…!
आणि ड्रायव्हर हि नगरपालिकेचाच…! मी असे कधीही ऐकलेले नाही कि…
हा माणूस आयुष्यभर पन्नास लाखाच्या गाडीत फिरला आहे… याला स्मशानातत्या गाडीनेच घेऊन जा…! मग तो राजा असो अथवा रंक असो… गरीब असो अथवा श्रीमंत असो… वारी सगळ्यांची एक सारखीच…! खांदेकरी असतात चारच…! आणिमडके धरी असे एकच…!
वाट्याला येई कुणाच्याचंदनाची लाकडे…! तर कुणाला मिळे बाभळाची लाकडे…! एखाद्याच्यानशीबी तुपाचाच मारा तर कुणावर पडे फक्त डीझेलचाचफवारा…!
स्मशानातलेठरलेले वाक्य… काय ठेवलेआहे या आयुष्यात…! यायचेही मोकळेच… आणि जायचेही मोकळेच…!
आयुष्यभर पैसे कमावले… परंतु सोबत काय नेले…?
मित्रांनो… मी एवढ्यासाठी हे मांडत आहे…! माणसाने नक्कीच कमवावे… माणसाने नक्कीच मोठमोठ्या बंगल्यात राहावे… माणसाने आपले संपूर्ण आयुष्य आरामदायक जगावे…! जीवनातील सुखांचा पुरेपुर आनंद घ्यावा…
Motivational Quotes in Marathi | मराठी सुविचार | सुंदर विचार
नमस्कार मित्रांनो…
मानवी जीवनात चांगल्या विचारांचा भक्कम पाया असणे महत्वाचे असते… म्हणून मी काही खूप छान… प्रेरणादायक…. चांगले विचार…. सुंदर विचार… सुविचार… तुमच्यासाठीच आणले आहेत…
अगदी निवांतपणे… शांत मनाने वाचा… नक्की आवडतील आणि जीवनात प्रेरणादायी ठरतील…एक सकारात्मक शक्ती निर्माण करतील…
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
नेहमी स्वतः सोबत शर्यत लावा…
जर जिंकलात….
तर तुमचा आत्मविश्वास जिंकणार
आणि जर हरलात…
तर तुमचा अहंकार हरणार…
Motivational Quotes in Marathi | मराठी सुविचार | सुंदर विचार
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
नाती जपनारे
नेहमीच सगळ्यांपासून
दुरावली जातात…
हे या जगातील
एक कटु सत्य हे आहे…!
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
ज्या ठिकाणी
आपले मान नाही..
त्या ठिकाणी
कधींच जायचे नाही.
ज्यांना खरे सांगितल्यावर
राग येतो….
त्यांची कधींच
मनधरणी करत बसायचे नाही.
जे आपल्या नजरेतून उतरले…
त्यांच्या कधींच
त्रास करून घायचा नाही.
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
एखाद्या व्यक्ती जवळ
आपल्या अशा आठवणी ठेवा की…
नंतर कधीही त्याच्याजवळ
जर आपले साधे विषय जरी निघाला…
तर त्याच्या ओठांवर थोडेसं हसू आणि
डोळ्यात थोडेसे पाणी नक्कीच आले पाहिजे…!
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
जर आपल्या हातून एखादयाचे काम होत असेल
तर ते निःस्वार्थी आणि निःसंकोचपणे करा.
नेहमीच मदत करा परंतु दुसऱ्याला त्रास होईल….
असे कदापीही वागू नका.
Motivational Quotes in Marathi | मराठी सुविचार | सुंदर विचार
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
विश्र्वातील कोणतीही बाब
परिपुर्ण नाही.
ईश्वराने सोने निर्माण केले….
ईश्वराने चाफ़्याची फ़ुले सुद्धा
निर्माण केली.
मग ईश्वराला चाफ़्याचा वास
सोन्याला देता आला नसता का…?
अपुर्णतेतही काही आनंद आहेच की…
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
जेव्हा खूप वेगाने वादळे येतात…
तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट
असे धरून राहायचे असते...!
हि वादळे जितक्या वेगाने येतात…
तितक्याच वेगाने निघूनही जातात.
महत्त्वाचीवादळे नसतात….
प्रश्न हा असतो कि
आपण त्या वादळां सोबत
कश्याप्रकारे लढा देतो
आणि आपण त्यातून
किती चांगल्याप्रकारे
बाहेर आलो याचा…
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
मुर्ती ही दगडातही असतेच…!
फक्त त्यातील नको असलेला
भाग काढून टाकायचा असतो.
आणि आता ह्याच भावनेने
माणसांकडे पहा.
त्यांच्यातील ही
नको असलेला भाग
विसरून जायला शिका.
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
पाणी भरून असलेल्या तलावात…
मासे हे किड्यांना खातात… आणि
जर त्याच तलावाचे पाणी आटले…
कोरडा झाला तर… तिथले किडे
मास्यांना खातात…
संधी सगळ्यांनाच मिळते…
केवळ आपली वेळ
येण्याची वाट पहा…!
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहात…
त्यावेळी अगदी प्रामाणिक रहा.
ज्यावेळी तुमची आर्थिक
परिस्थती बरी असेल…
त्यावेळी अगदी साधे रहा.
ज्यावेळी तुमच्याकडे एखादे
पद किंवा अधिकार असतील…
त्यावेळी विवेकशील रहा.
ज्यावेळी तुम्ही खूप रागात असाल…
तर त्यावेळी अगदी शांत रहा.
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर
आपले डोके टेकवून
रडूच शकत नाही आणि
स्वत: स्वत:लाच आनंदाने
मिठीही मारू शकत नाही…!
जीवन म्हणजे दुस-यांसाठी
जगायची गोष्ट आहे…!
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
विश्र्वातील सगळ्यात सुंदर रोप
हे विश्वासाचे असते
आणि ते कुठे जमिनीवर नाहीं
तर आपल्या मनात लावावेलागते…
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
फक्त एक संधी
सोन्याची साधण्यापेक्षा
प्रत्येक संधीचेच सोने करा.
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
सगळ्यांसाठी समुद्र हा
सारखाच असतो…!
परंतु त्या समुद्रातून
काहीजण मोती काढतात…!
काहीजण मासे काढतात…
आणि काहीजण तर
केवळ आपले पायच
ओले करतात…!
त्याचप्रमाणे हे जग ही
सगळ्यांसाठी सारखाच आहे.
मात्र आपण यातून काय घेतो
हे महत्वाचे आहे…!
Motivational Quotes in Marathi | मराठी सुविचार | सुंदर विचार
मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life
तुम्ही कोणासाठी कितीही केले…
तरी हीते कुठेतरी कमीच पडते.
कारण सत्य चप्पल घालून
तयार होई पर्यंत…
खोटे पूर्णगाव फिरून
आलेले असते.
Motivational Quotes in Marathi |
मराठी सुविचार | सुंदर विचार
दिवाळी सणाची माहिती आणि महत्व – Diwali Festival Information In Marathi
आपल्या भारत देशात हिंदू धर्माचा साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी…! तसे आपल्याला दिवाळी या सणा बद्दल… या पांच दिवसीय उत्सवाबद्दलमाहिती असेलच
परंतुदिवाळी विषयी आणखीन काही महत्वाची माहिती या लेखातून आपल्या नक्की होईल.
दिवाळी सणाबद्दल संपूर्ण माहिती आणि महत्त्व
दिवाळी हा सणम्हणजे दिव्याचा उत्सव. दीपावली किंवा दिवाळी हा एक खूप जुना
हजारों वर्षापासून चालत आलेला हिंदू उत्सव आहे.हा उत्सव शरद ऋतूमध्ये
प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.दिवाळी हासण भारतातील सर्वात मोठा आणि
उज्वल उत्सव आहे.दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.
दिवाळी हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. दिवाळी…दिव्यानंचा सण…. हा सण दरवर्षीकार्तिक अमावस्येच्या दिवशीच साजरा केला जातो. दिवाळी या सणाला दीपावली असेम्हणूनही
ओळखले जाते.
असे म्हणतात कि या दिवसाच्या रात्रीला दिवेंनी सजवलेल्या लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी
पृथ्वीवर बाहेर पडतात आणि आपल्या भक्तांसोबत आनंद साजरा करतात.
दिवाळी हा उत्सव साजरा करण्यामागचा मुख्य कारण म्हणजे भगवानश्री हरी विष्णूच्या
रूपाने जन्मलेले भगवान श्री राम यांच्याशी संबंधित आहे.
अयोध्येच्या जनतेसाठी भगवान श्रीरामांचे स्वागत याकरिता अधिक महत्वाचे होते की…
भगवान श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात परत आले होते.त्यावेळी
त्यांनी महामायावी दानव लंकापती रावण सोबत युद्ध करून त्याला मारले होते…
यामुळे प्रभू श्री राम यांचे स्वागत फार उत्साहाचे होते.
भारतात असे मानले जाते की जेव्हा भगवान श्री राम अयोध्येत पोहोचले, तेव्हा हजारो तेलाचे
दिवे जाळून पूर्ण अयोध्या प्रकाशाने उजळून गेली होती आणि या उजेळानेच श्री रामाचे स्वागत
केले गेले. संपूर्ण अयोध्या हि फुलांनी आणि सुंदर रांगोळीने सजली होती.
तेव्हापासून दिवाळीला दिवांचा उत्सवम्हणतात.
भगवान श्री राम यांच्या घरी त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण भारतातील लोकांनी तेलाचे
दिवे सजविले होते म्हणूनच या सणाला दीपावली असेही म्हणतात.
दिवे लाऊन उजेड करणे हि परंपरा म्हणजे वाईटच्यावर चांगल्याचीविजयाचे प्रतीक आहे.
सगळेलोकं आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी आणिलक्ष्मी पादुका काढून
देवी लक्ष्मीचे स्वागत करतात. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लोकं आपल्या मित्र…
नातेवाईक…. आणि शेजार्यांना मिठाई आणि फराळाचे वाटप करतात. काही बक्षीस देतात…
दिवाळीला आंब्याच्या पानांची तोरण आणि झेंडूच्या फुलांचे तोरण हि घराच्या मुख्यप्रवेशद्वारावर
लावली जाते. घरासमोर अंगणात वेगवेळ्या रंगांच्या छान – छानरांगोळ्या काढल्या जातात.
अशाप्रकारे घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात.
हिंदू धर्मातरांगोळीला खूपच शुभकारक मानले जाते.
दिवाळीचे पाच दिवसांचे महत्व
धनत्रयोदशी ( धनतेरस )
दिवाळी ( दीपावली ) या पाच दिवसीय उत्सवरुपी सणाची सुरुवात धनतेरस(धनत्रयोदशी)
पासून होते. या दिवसापासूनसंपुर्ण घरे तेलाच्या दिव्यांनी तसेच आकाश कंदील…
रंगीबेरंगी लहान विजेचे दिवे… पूर्ण घर हे रंगीत लाईटाची सिरीज लावून सजवले जातात.
या दिवशी असे मानले जाते कि नवीन धातूची वस्तू घेणे शुभकारक असते आणि म्हणून या
दिवशी लोकं बाजारात जाऊन सोने…चांदी… आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करतात.
तसेच या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा हि केली जाते. अशी मान्यता आहे की…
ह्या दिवशी आपल्या शरीराला निरोगी ठेवणारी श्रीमंत देवीधनवंतरीयांचा जन्मदिवस होता.
या दिवशीची अशीहीमान्यता आहेकी या दिवशी आई लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि संपूर्ण
वाईटाचा नाश होतो.
नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी हा दिवस म्हणजे पाच दिवसांच्या उत्सवाचादुसरा दिवश. ह्या दिवसालाछोटी दिवाळीम्हणूनही ओळखले जाते. या दिवशी सगळेच आपले घर स्वच्छ करून पूर्ण घर
रंगांनी सजवितात आणि महिला मंडळी हातावर मेहंदी देखील लावतात.
या दिवसापासून लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागतात. या दिवशी लोक
त्यांच्या लाडक्या साठी… मित्रांसाठी… भेटवस्तू खरेदी करतात आणि त्यांना
त्या वस्तू भेट देऊन खूप आनंदित करतात… आणि स्वतःला ही आनंदी करतात…
लक्ष्मी पूजन/ दिवाळी
पाच दिवस चालणार्या या उत्सवातील तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजा. हा या सणाचा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे.या दिवशीच दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आई लक्ष्मी…. भगवान
श्री गणेश…आई सरस्वती….व भगवान कुबेर यांची खूप श्रद्धापूर्वक पूजा केली जाते.
असे म्हणतात की या दिवशी आई लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येतात आणि त्यांना त्यांच्या घरी
आमंत्रित करण्यासाठी आणि कायमस्वरुपी स्थायिक राहण्यासाठी, सर्व लोक घराच्या दारावर
दिवे लावतात आणि सर्व दारे… आणिखिडक्या उघडूनठेवतात. आणि नंतर पूजा झाल्यावर
मुले घराबाहेर फटाके फोडतात आणि आई लक्ष्मीचे स्वागत करतात.
या दिवशी सर्व व्यापारीजन आप आपल्या दुकानात भगवान कुबेर आणि आई लक्ष्मीची
या महाउत्सवाचा चौथा दिवस म्हणजेच हा वर्ष प्रतिपदा म्हणून मानला जातो. ह्याच दिवशी
महाराजा विक्रम सिंहासनावर बसले होते. ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या
कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन
पर्वत उचलला होता.
या दिवशी विवाहित जोडपे एकमेकांना चांगलेसे उपहार देवून आपल्या जोडीदाराला
आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन
पूजा करतात.
ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई… बैल… म्हशी… आणि बकरी यांना सजवून
त्यांना दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात.
भाऊबीज
पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा शेवटभाऊ-बहिणींमध्ये अमर्याद प्रेम आणि अतूट
बंधनातून होते. दिवाळी सणाचा पाचवा दिवस आपल्याला भाऊबीज नावाने माहित आहे,
भारतातील काही राज्यांमध्ये या दिवसाला टीका देखील म्हणतात. हा दिवस रक्षाबंधना सारखाच आहे पण याची प्रथा वेगळ्या आहेत.भाऊबीजच्यादिवशी कुटुंबातील सर्व सर्वं बहीण- भाऊ एकत्र येऊन काही वेळ घालवतात आणि काही संस्मरणीय क्षण तयार करतात. परंपरेनुसार या दिवशी बहीण आपल्या भावाची पूजा करते आणि भाऊ आपल्या बहिणीला त्याची आवडती भेटवस्तू देते.
या दिवशी…भाऊ आपल्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते आणि बहिण ही देखील