सुंदर सुविचार | प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका |
Good Thoughts In Marathi | @VijayBhagat
नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपल्यासाठी
Sunder Suvichar Marathi , प्रेरणादायी सुविचार कोट्स,
सुविचार मराठी, लहान सुविचार, तसेच सोपे सुविचार,
शालेय मराठी प्रेरणादायी सुविचार असा
मराठी सुविचार संग्रह आणला आहे.
हे मराठी सुविचार शांत मनाने, निवांतपणे वाचा.
तुम्हाला नक्की दिशा मिळेल. जीवन आनंदी होणार.
आयुष्य आनंदी होणार.
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे.
नकारात्मक विचार केला तर, प्रत्येक संधीमध्ये
आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक
विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल….!
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
हातोडी आणि छन्नी चे घाव सोसल्याशिवाय
दगडाला सुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही…
माणसाचे सुद्धा असेच आहे….!
Sunder Suvichar Marathi | प्रेरणादायी सुविचार कोट्स
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
भुकेल्याला अन्न देणे… आणि
दु:खी माणसाला हसवणे….
हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे…!
जखमा वेगवेगळ्या असल्या
तरी वेदना त्याच असतात…!
जगणे शिकावे लागत नाही
जगाकडे बघून शिकता
आले पाहिजे….!
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
जिवनात आज आलेल्या परिस्थितीशी
जो संघर्ष करील त्यालाच
ऊद्याचे सुख अनुभवयास मिळेल.
आयुष्यात सगळ्याचं इच्छा
पूर्ण होतील असे नसते…
काही अपूर्ण असलेल्या इच्छा
सुद्धा जगण्याची उमेद देतात…!
सुखासाठी कुणापुढे हात पसरु नका
वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी
दोन हात करा. चांगली वेळ येईल…!
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
चुका दिसायला लागल्या की
त्या स्वीकारायला हव्या.
दुरुस्त करायला हव्या…
ना की आपल्या दिसायला
लागल्या म्हणून….
दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात.
जीवनाप्रति ईच्छा आणि जिद्द असेल
तर आलेल्या परिस्थितीवर पर्याय
शोधायला वेळ लागत नाही.
देवासमोरून साखरेचा कण उचलून
नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास
आभाळापेक्षाही मोठा असतो…
समाधान पाहिजेच असेल तर ते
कसही मिळवता येते… दुःखाचे
काय… ते आपोआपच येत असते.
पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा
आयुष्याची पलटणारी पाने, ही
खूप काही शिकवून जात असतात.
परिश्रमाचे पावित्र्य राखणारी माणसे
बुद्धीच्या जोरावर जीवनातली
कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात.
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते
पण मीठ मात्र नक्की असते.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही…
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा
एकटे बसणे बरे आणि
एकटे बसण्यापेक्षा सज्जन
मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
प्रकाश सूर्या इतका प्रखर नाही म्हणून
चंद्राने कधी उगवणे सोडले नाही.
कारण चंद्राला माहीत आहे, सूर्य फक्त
दिवसाच उगवतो रात्र तर माझीच असते…
✨🌺✨ sunder suvichar ✨🌺✨
#suvichar_marathi |
तुम्हीच माणसातला देव व्हा |
Good Thoughts In Marathi
देव म्हणत नाही की
तुम्ही माझी पूजा कराच…
मला माना.
देव म्हणतो की, तुम्ही माणसाशी
माणसासारखे वागा, माणूसकीने राहा,
प्रेम द्या, प्रेम घ्या. नीतीने वागा आणि
तुम्हीच माणसातला “देव” व्हा…..
🌹🌹💐💐
👍👍शुभ सकाळ👍👍
जीवनातील प्रत्येक समस्या
ही वाहतुकीच्या
लाल दिव्याप्रमाणे असते…
आपण थोडा वेळ प्रतिक्षा केली
तर सिग्नल हिरवा बनतो
आणि मार्ग सापडतो….!
शुभ सकाळ
बाप | दो पैसे कमाकर, साहब, तुम बाप से जबान लड़ाते हो
#status_suvichar | #suvichar_hindi
🍃 दो पैसे कमाकर….
साहब…..
तुम बाप से जबान लड़ाते हो….🍃
🍃 याद रखना….
बाप जैसा बनने में….
तुम्हें जमाने लग जायेंगे….🍃
सुख | suvichar | #good_thoughts #shorts |
@VijayBhagat | suvichar status video | good morning
सुख पाने के लिए हम
इच्छाओं की “कतार” लगाएं
या
आशाओं के “अम्बार”
परंतु…..
सुख का ताला केवल
संतुष्टि की चाबी से ही खुलता है.
सुप्रभात
🍃 गुड़ मॉर्निंग🍃
सुंदर सुविचार | #suvichar_marathi |
Good Thoughts In Marathi | @VijayBhagat
| #shorts | suvichar
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
समजूतदारपणा....
ज्ञानापेक्षा खूप
महत्वपूर्ण असतो…..
खूप लोक आपल्याला
ओळखतात.... पण
त्यातील मोजकेच लोक
आपल्याला समजून घेतात ….
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
अर्धांगिनी | हे मला कधी कळलेच नाही |
बायकोवर सुंदर कविता |
good thoughts in marathi on wife | पत्नी
नमस्कार मित्रांनो,
पत्नी आपल्या घराचे मांगल्य असते.
आपल्या घराचे घरपण असते.
दिव्यातली वात असते….
आपल्या घरातील तुळस असते.
पत्नीला कितीही उपमा द्या कमीच आहेत.
तिच्यामुळे घर बोलत असते
तिच्यामुळे घर हसत असते
तिच्यामुळे घराला घरपण असते.
पण एक बोलू
खरंच समाजात अशी काही
माणसे आहेत….
मी जवळून बघतो की त्यांना
पत्नीचे महत्त्वच नाही….
किंमतच नाही.
बारकाईने विचार करा
तिने आपल्यासाठी
तिचे घर सोडलेले असते.
आपल्यासाठी……
आपण तिच्यासाठी
एक दिवस घर सोडून बघा
कळेल…..
काय अवस्था असेल…
आणि ती चार दिवस
आपल्या घरी नसेल
तर बघा तुमच्या घराची
अवस्था काय असेल…
घर शांत राहील…..
शांत असेल….
घर बोलणार नाही
चिडीचूप असेल
साधे तुमचे एखादे
छोटसे काम जरी बघितले
तरी ते तुम्हाला होत नाही.
जे रोजचे दिवस व्यवस्थित
चाललेले असतात तिच्यामुळे….
म्हणून एकदा अर्धांगिनी साठी
जरूर ऐका आणि तिच्यासाठी
एक विचार करा…
आजची कविता ही अर्धांगिनी….
कविता कोणी लिहिली माहित नाही
पण ज्याची असेल…. त्याला
नमस्कार आहे.
माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली
तीचे घर सोडून ती या घरची झाली
माझे घर तीचे म्हणून सहज तीने सावरले
पण माहेरच्या आठवणींचे किती हुंदके
तीने आवरले……..
हे मला कधी कळलेच नाही
स्वत:ची आवड, स्वत:ची स्वप्ने बाजूला ठेवली
माझी स्वप्ने, माझी आवड मात्र जपत गेली
तीचीही काही स्वप्ने असतील
तीच्याही काही आवडी असतील…….
हे मी कधी विचारलेच नाही…..!
नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले
कौतुकाचे बोल मात्र मी हातचे राखले
क्वचित काही करपले तर लगेच नाव ठेवले
पण ते करताना तीने कीती चटके सोसले…
हे मला कधी जाणवलेच नाही…..!
मी चार पैसे कमावले, तीने दोन वाचवले
माझ्या नकळत भविष्यासाठी साठवले
मी घर चालवतो, ती सांभाळते….
चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते……..
हे मला कधी समजलेच नाही…..!
मी म्हणालो, मुले मोठी झाली, मार्गी लागली
ती म्हणाली, हो चांगली निघाली बापावर गेली
आपल्या संस्कारांमुळे चांगली वागु लागली
पण त्यांना घडविताना ती किती रात्र जागली
हे कधी मला उमजलेच नाही…..!
अशीच वर्षे सरत गेली
कोणाला काय हवे, नको सारे बघत गेली
अर्धांगीनी म्हणून आयुष्यभर सोबत ती
अशीच रहावी…. पण तीच्या ऋणांची
परतफेड कशी करावी…….
हे मला कधी जमलेच नाही…..!
मित्रांनो,
एकदा आठवा आपली पत्नी
एकदा आठवा तिचे कष्ट
एकदा आठवा तिला……
डोळ्यासमोर आणा मग बघा…..
मित्रांनो ती आपलीच असते
आपल्यासाठीच आलेली असते
म्हणून तिचे थोडे तरी कौतुक करा.
तिला समजून घ्या….
आधार द्या…. प्रेम द्या…
बघा मग घर कसा हसेल….
घर कसे फुलेल….
प्रत्येक दिवस कसा
आनंदात जाईल
Sunder Suvichar Marathi | प्रेरणादायी सुविचार कोट्स
जीवन म्हणजे एक खेळाचे मैदान आहे |
Good Thoughts In Marathi | #suvichar_marathi
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
आयुष्य, जीवन म्हणजे
एक खेळाचं मैदान आहे.
या मैदानात प्रामुख्याने
खेळला जाणारा खेळ
म्हणजे कबड्डी….
तुम्ही यशाच्या रेषेला
हात लावताच…
लोक तुमचे पाय पकडायला
सुरुवात करतात.
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
#suvichar_marathi | Good Thoughts In Marathi |
सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
सल्ला हे असे सत्य आहे
जे आपण कधी गांभीऱ्याने ऐकत नाही
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो…!
जिथे इतरांना समजावणे
कठीण असते….
तिथे स्वत:च समजून जाणे
चांगले असते…!
#suvichar_marathi |
तीच माणसे खऱ्या जीवनाचा सन्मान करतात |
motivational quotes marathi
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
काही माणसे श्रीमंतीला
सलाम करतात.
काही माणसे गरिबीला
गुलाम करतात.
माञ जी माणसे
माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणसे खऱ्या जीवनाचा
सन्मान करतात..…!
#suvichar_marathi |
आनंद पैशांवर नाही तर परिस्थितीवर
अवलंबून असतो | motivational quotes marathi
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
आनंद पैशांवर नाही तर
परिस्थितीवर अवलंबून असतो.
एक मुलगा फुगा घेऊन खूश होतो.
तर दुसरा तो विकून आणि
तिसरा तो फोडून खूश होतो.
#sunder_vichar,
काही रस्ते ध्येयापर्यंत जात नसले
good thoughts in marathi, sunder suvichar
✨🌺✨ सुंदर सुविचार ✨🌺✨
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
कारण ती व्यक्ती स्वता:पेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
काही रस्ते ध्येयापर्यंत जात नसले
तरी त्या रस्त्यांवर आपल्या
जोडीदारासोबत चालायचा
थकवा कधीच येत नाही…
कुछ लोग मेरे शब्दो से, मेरे अंदर देखना चाहते है |
#suvichar | #shorts @VijayBhagat | hindi quotes
🍃 कुछ लोग….
मेरे शब्दोसे….
मेरे अंदर
देखना चाहते है….!🍃
🍃 वो नादान है….
साहब….
जो किनारे पर बैठकर….
समंदर देखना चाहते है..🍃
🍃 गुड़ मॉर्निंग🍃
शब्दों को ओंठो पर रखकर साहब |
good thoughts in hindi | shayri |
#shayri_status
🍃 शब्दों को आठोंपर रखकर…
साहब….
मन का भेद मत खोलो.🍃
🍃 मैं आँखो से सुन सकता हुं.
तुम आँखोसे बोलो…🍃
🍃 शुभ दिन 🍃
जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात |
suvichar marathi | सुंदर सुविचार @VijayBhagat
नमस्कार मित्रांनो,
आपल्या सगळ्यांना
शुभ दिवस
मित्रांनो,
आयुष्य सुंदर आहेच….
फक्त कुठे आणायचे
आणि कुठे सोडायचे
हे समजायला पाहिजे.
आयुष्य सुंदर आहेच….
फक्त कुठे बोलायचे
आणि कुठे थांबायचे
हे समजायला पाहिजे.
आयुष्य सुंदर आहेच….
फक्त कुठे हसायचे….
कुठे रुसायचे हे
समजायला पाहिजे.
आयुष्य सुंदर आहेच….
फक्त किती सांगायचे
आणि किती ऐकायचे
हे समजायला पाहिजे.
आयुष्य सुंदर आहेच….
फक्त किती आठवायचे
आणि किती विसरायचे
हे समजायला पाहिजे.
मित्रांनो,
आयुष्य सुंदर आहेच….
फक्त किती करायचे
आणि कुणासाठी करायचे
हे समजायला पाहिजे.
Sunder Suvichar Marathi | प्रेरणादायी सुविचार कोट्स
मित्रांनो,
यासाठीच या post मध्ये मी
आपल्यासाठीच सुंदर सुविचारांची….
सुंदर विचारांची…. सुविचाररुपी
शिदोरी घेऊन आलो आहे.
ही जीवनाची….. आयुष्याची….
संस्काराची ही शिदोरी
आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
चला मित्रांनो सोडूया ही
सुंदर विचारांची शिदोरी
सुंदर संस्कारांची शिदोरी
जे साधे सोपे असते तेच
छान असते. मग ते जगणे
असो की वागणे असो
कुणाच्या चांगलेपणाचा इतका
फायदा घेऊ नका की त्याला
वाईट बनायला भाग पडेल.
लक्षात ठेवा की वाईट नेहमी
तोच बनतो जो पहिले चांगला
बनून तुटलेला असतो.
थोडे फार सहन करायला शिकले
पाहिजे. कारण आपल्यातही बऱ्याच
अशा कमतरता असतात. ज्यांना
समोरची माणसे सहन करत असतात.
खरे प्रेम करणारा तुमच्याकडे
पैसा संपत्ती मागत नाही….
त्याला तुमचा वेळ हवा असतो.
नाते हे जगाला दाखवण्यासाठी नसते
मनापासून जे सांभाळले जाते ते खरे
नाते असते.
जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असे नाही,
हृदयापासून जो जवळचा असतो
तोच आपला असतो.
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो तो देव माणूस.
एकमेकाविषयी आदर आणि कदर
असेल तर आणि तरच सगळी
वचने आपोआप निभावली जातात.
आपल्याकडे समस्या मुळापासून संपवली
जात नाही. तात्पुरते उपाय केले जातात
परिणामी समस्या पुन्हा वर डोकं काढते
म्हणून समस्येच्या बेबुड करा….
तेच हितकारक होईल.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला
महत्त्व देत चला. कारण प्रत्येक व्यक्ती
आपल्याला काही ना काही शिकवून
जात असते.
ज्याला आपल्या आई वडिलांच्या
कष्टाची जाणीव असते तो कधीच
वाईट मार्गाने जात नसतो.
अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी
माणसाला त्याच्या मित्र आणि
आपत्तिष्ठापासून दूर करतात.
गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही
आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही.
स्वतःचे दुःख स्वतः जवळच ठेवा
दुनिया फक्त सुखातच सोबती असते.
राहणारे घर किंवा घराचा दरवाजा
कितीही छोटा असला तरी चालेल
पण हृदय आणि हृदयाचा दरवाजा
मोठा असावा कारण तिथेच नाती
आश्रय घेतात.
आपल्या व्यक्तींसाठी थोडी माघार घ्यावी
लागली तर हरकत नाही. पण त्यांच्याशी
असलेले नाते कधी तोडू नका. कारण…
नाती जोडायला वर्ष लागतात आणि
तोडायला काही क्षण लागतात.
नुसता आपला विचार करू नका
ही दुनिया फक्त आपलीच नाही
दुसऱ्यांची पण तितकीच आहे
मनापासून खळखळून
हसणाऱ्या चेहऱ्याला
फक्त सौंदर्य असते वय नसते.
तुमच्या नशिबात आहे ते कुठूनही
तुमच्याकडेच येणार आणि जे तुमच्या
नशिबातच नाही ते तुम्हाला मिळूनही
तुमच्याकडे राहणार नाही.
परिस्थिती मारक नको असेल
तर माणसाची पारख ठेवाच
कारण वाटीत खीर देऊन
पाठीत खंजीर खुपसणारे
भरपूर आहेत.
जी माणसे मनाने साफ
असतात… त्यांच्याच मागे
दुनिया भराचे ताप असतात
फक्त नीतिमत्ता साफ ठेवा
दिवस सगळ्यांचे बदलत
असतात.
कामापुरती नाती आणि
थंडी घालवण्यासाठी
केलेली शेकोटी जास्त
काळ टिकत नसते.
माणसाने श्रीमंतीचे कौतुक
जरूर करावे. पण साधेपणाला
“दारिद्र्य” कधीच समजू नये.
माणसे बदलत नसतात
कालांतराने ती कशी
असतात… हे कळत असते.
जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही
वाईट वागतात. आणि चांगली वेळ आली की
सगळे चांगले वागतात. दोष लोकांचा नाही….
तर वेळेचा आणि परिस्थितीचा आहे.
त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा माणसे बदलण्यात
वेळ घालवू नका त्यापेक्षा आपली परिस्थिती
बदला म्हणजे बाकी सगळे आपोआप बदलेल
मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो.
हा माझा…. तो माझा… माझ्या जवळची माझी.
खरे तर तुमची फक्त वेळ आहे… ती जर चांगली
असेल तर सर्व तुमचे….! नाहीतर सर्व जवळचे
असून सुद्धा दूरचे…. हेच जीवनाचे सत्य आहे….!
जीवन तर जगायचे आहे
मग टेन्शन कशाला घ्यायचे….?
आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला
त्रास होतो त्यांच्याकडे लक्ष का द्यायचे….?
मित्रांनो… आजचे सुविचार कसे वाटले
ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की
कळवा. या संकेतस्थळावर नवीन असाल तर
www.vijaybhagat.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद…..
आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल |
Good Thoughts In Marathi,#suvichar_marath
🌺
आपल्या व्यथा तिथे मांडा
जिथे समाधान मिळेल आणि
आपला माथा तिथे टेकवा
जिथे स्वाभिमान मिळेल
नाही तर…
तुमच्या व्यथा तुडवण्यात
आणि माथा बुडवण्यात
लोकं खूप सराईत आहेत….!
Dontt worry हो जाएगा
🌹🌹शुभ सकाळ💕
हम ऐसे समाज में रहते हैं | #suvichar |
#सुविचार | suvichar status
हम ऐसे “समाज” में रहते हैं
जहां “सुंदरता” को “रंग” से
देखा जाता है.
“शिक्षा“को “नंबरों” से
देखा जाता है. और
“सन्मान” पैसा देखकर
दिया जाता है….!
🙏सुप्रभात🙏
suvichar marathi | good thoughts marathi
suvichar marathi | गृहीत धरणे सोडा
बरोबर असणारे सर्व लोक
तुम्हाला पाठिंबा देतीलच
असे गृहीत धरू नका….
कारण तुम्ही पुढे जात आहेत
याची भीती बरोबरच्या काही
लोकांच्या मनात आहे….
म्हणून परीक्षण करा….
गृहीत धरणे सोडा.
काळजी घ्या आनंदी राहा.
🙏
सुविचार | positive thoughts |
suvichar status | suvichar
हर किसी को…
Serious
मत लिया करो…
साहब….!
क्योंकी….
कुछ लोगों का…
ब्लड ग्रुप के अलावा…
कुछ भी Positive
नही होता….
🍃 गुड़ मॉर्निंग🍃
Sunder Suvichar Marathi | प्रेरणादायी सुविचार कोट्स
रंगच तो.. | सगळ्या सुंदर रंगांनी तुमचे
आयुष्य रंगुन जावो अशा रंगीत शुभेच्छा
पसरला की
लाजलेला समजतो…
सांडला की
रागवयाला लावतो…
उडाला तर
अपमान कळवतो…
फिकट झाला तर
खिन्नता पसरवतो…
आकाशी उडाला तर
आनंद पसरवतो…
विखुरला तर
नाराजी पसरवतो…
खुलला तर
हिरवाई पसरवतो…
उधळला तर
उन्मत्तत्ता पसरवतो…
रंगच तो
माणसाचं आयुष्य रंगवतो,
सुख दुःखाच्या भावना खुलवतो…
म्हणून रंगा आणि रंगवा….
सगळ्या सुंदर रंगांनी तुमचे
आयुष्य रंगुन जावो
अशा रंगीत शुभेच्छा...
🙏🙏💐🌹🌷🧋🥛🥤
suvichar marathi | जीवनात श्वास आणि
विश्वासाची एक समान गरज असते |
Good Thoughts In Marathi | vichar
नमस्कार मित्रांनो,
सर्वांना शुभ दिवस
मित्रांनो, जीवनाचा प्रवास करीत असतांना
दिवसाची वाटचाल करीत असतांना
आपल्याला अनेक कटू अनुभवांना
सामोरे जावे लागते,
मित्रांनो बऱ्याच गोष्टींचा अनुभव
आपल्याला त्यामध्ये येत असतो
आणि कधी कधी आपला पूर्ण दिवस
तणावा मध्येच जात असतो.
एक गोष्ट लक्षात ठेवायची…..
किती जरी कटू अनुभव आले…
किती जरी वाईट गोष्टी घडल्या…
तरी देखील आपण आनंदात
राहण्याचा प्रयत्न करायचा.
पुढच्याला असे वाटले पाहिजे….
याच्याकडे काही नसताना सुद्धा
हा इतका कसा आनंदात राहतोय
म्हणून दुसऱ्याला टेन्शन आले पाहिजे.
मित्रांनो यासाठीच तुमच्यासाठी
सुंदर सुविचार घेऊन येत असतो.
मित्रांनो ते सुविचार आपल्याला
खूप काही शिकवून जातात.
मित्रांनो जर का हा युट्युब चॅनेल
आपण सबस्क्राईब केला नसेल
तर चांगल्या गोष्टीला सहकार्य म्हणून
हा यूट्यूब चैनल आपण सबस्क्राईब करा.
मित्रांनो हे चांगले विचार आपल्या
मित्रपरिवारापर्यंत, नातेवाईकापर्यंत
शेअर करून आवर्जून पोहचवा.
हे विचार तुम्हाला कसे वाटले ते
लाईक आणि कमेंट्स च्या माध्यमातून
आवर्जून कळवा. मित्रांनो करूया सुरुवात
सुंदर सुविचारांना…. सुंदर विचारांना….
suvichar marathi | जीवनात श्वास आणि
विश्वासाची एक समान गरज असते |
Good Thoughts In Marathi | vichar
जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्ने लिहितात… त्यांच्या
नशिबाची पानें कधीच
कोरी नसतात.
आपल्याला नेहमी तोंडावर खरे
बोलण्याची सवय असते म्हणून
आपण लोकांच्या नजरेत वाईट
असतो. परंतु तरीदेखील आपण
खरेच बोलले पाहिजे.
आनंद ही अशी एक वस्तू आहे
जी आपल्याकडे नसतानाही
आपण दुसऱ्याला देऊ शकतो.
वाईट वेळ आज ना उद्या
निघून जाईल. पण बदललेले
लोक कायम लक्षात राहतील.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
जर सगळेच आपले होत गेले
असते…. तर जगण्याची गंमत
आणि देवाची किंमत कधीच
समजली नसती.
रागात कधीच कुणाला वाईट बोलू नका
कारण राग थोड्या वेळाने शांत होतो
पण बोलणे कायम मनात घर करून राहते.
काळजी हृदयात असावी शब्दात नाही
आणि राग शब्दात असावा हृदयात नाही
गरजेपुरती माणसे जोडावी ती सवय नसावी.
एकदा नाते जोडले तर ती शेवटपर्यंत….
शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय असावी
जिव्हाळा हा समाधानी
लोकांच्या जीवनातील
ऋतू असतो.
तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश
मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू
नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्षांपेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते.
suvichar marathi | जीवनात श्वास आणि
विश्वासाची एक समान गरज असते |
Good Thoughts In Marathi | vichar
यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब
आणि मित्रांची गरज असते. पण
यशाचे शिखर गाठायचे असेल तर
शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते.
यशस्वी व्यक्ती म्हणजे, जो सकाळी
लवकर उठतो आणि आज कोणते
काम करायचे आहे ते ठरवतो आणि
रात्रीपर्यंत ती सर्व कामे कितीही
त्रासानंतर पूर्ण करतो तोच व्यक्ती
जे सुरू केले आहे त्याचा अंत नीट
झालाच पाहिजे. वाईट माणसे जिंकली
तरी चालतील पण चांगला माणूस
हारला नाही पाहिजे.
स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेले
कधीही चांगले.
परिस्थिती कशीही असो
सत्य आणि सातत्य आपल्या
सोबत असले की आपल्याला
कोणीच रोखू शकत नाही.
जीवनात श्वास आणि विश्वासाची
एक समान गरज असते.
श्वास संपला तर जीवन संपते.
विश्वास संपला तर संबंध संपतात.
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या
वेळेस साथ देणार नाही. पण माणुसकी…
प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही.
सुख तुम्ही कोणालाही वाटावे
पण दुःख फक्त विश्वासाच्या
माणसालाच सांगावे.
कधी कधी आपण फार मजेशीर वागतो.
देवाकडे पाठ करून उभे राहायचे नाही
म्हणतो. आणि मग देवालाच आपल्या
पाठीशी उभे राहायला सांगतो.
मदत खूप महाग गोष्ट आहे
याची प्रत्येकाकडून अपेक्षा
करू नका. कारण खूप कमी
लोक मनाने श्रीमंत असतात.
जेव्हा आपण दुसऱ्याला
मदतीचा हात देतो तेव्हा
तोच हात आपल्या मदतीसाठी
उभा राहतो.
वाईट परिस्थिती, कठीण काळ
हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो.
त्या काळात एवढे शिकायला मिळते….
की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते….!
suvichar marathi | जीवनात श्वास आणि
विश्वासाची एक समान गरज असते |
Good Thoughts In Marathi | vichar
श्रद्धा ज्ञान देते,
नम्रता मान देते
आणि योग्यता स्थान देते.
पण तिन्ही मिळाले तर
त्या व्यक्तीला जग सन्मान देते.
अनेक अपयशाची कारणीभूत
बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.
ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा
आपण यशाच्या किती जवळ
आहोत, याची त्यांना कल्पना नसते.
आरशासमोर कधीच मनातली
प्रतिमा प्रकट होत नाही. त्यासाठी
स्वतःशी प्रामाणिक असावे लागते.
जेव्हा व्यवहार आणि मोजमापाचा
खेळ सुरू होतो, तिथेच मैत्रीचे नाते
कोलमडून पडलेले असतात.
बाप कसाही असला ना… तरी
त्याचे असणे गरजेचे असते.
त्याच्याशिवाय जगणे खूप कठीण असते.
मनापासून जीव लावला की रानातले
पाखरू सुद्धा आवडीने जवळ येते.
आपण तर माणूस आहोत. लोक म्हणतात
रिकाम्या हाती आलो आहे रिकाम्या हाताने
जाणार. असे कसे…? एक हृदय घेऊन आलोय
आणि जातांना लाखो हृदयात जागा करून जाणार
Sunder Suvichar Marathi – प्रेरणादायी सुविचार कोट्स
आजकालची माणसे
वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत.
आजकालची माणसे
अगदी सहजपणे बदलणारी आहेत.
आजकालची माणसे हसत हसत
पाठीवर वार करणारी आहेत.
आजकालची माणसे जिंकत आलेला
डाव उधळून लावणारी आहेत.
आजकालची माणसे तुम्ही लावलेला जीव
अगदी सहजपणे विसरणारी आहेत.
आजकालची माणसे मुखात एक आणि
पोटात एक दाखवणारी आहेत.
आजकालची माणसे
किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत.
प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा.
आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.
नाती जिवंतपणीच सांभाळा
नंतर कावळ्याला खायला घालून
माणूस परत येत नसतो.
अशी व्यक्ती शोधू नका की जी
तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल
अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला
कितीही अडचणी असतांना……
एकटे सोडणार नाही.
Most motivational quotes |
शेवटी बायकोच असते आयुष्याची सोबतीन |
सुंदर सुविचार
नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वांना शुभ दिवस
मित्रांनो सौंदर्य, सुस्वभाव यांची
बेरीज आपण केली पाहिजे.
मैत्रीतून मत्सर वजा केला पाहिजे
आणि प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने
गुणले पाहिजे तरच परिणितीचा
लघुत्तम काढता येत असतो.
सुविचारांचे वर्ग करता येत असतात.
मित्रांनो सुखी आयुष्याचा गणित
आपल्याला सोडवता येत असतो.
आणि मित्रांनो हे सगळे करता करता
माणसाने घडघड बोलले पाहिजे
खड खडकवून हसले पाहिजे.
दिलखुलास विनोद केले पाहिजे
मनसोक्त रडले पाहिजे…..
थोडक्यात काय मित्रांनो
स्वतःच्या व्यक्तिमत्वला खुलवले पाहिजे
म्हणून आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा
आपल्याला आनंद घेता आला पाहिजे
आणि तो घ्यायचाच असतो…..
कारण मित्रांनो आयुष्याच्या चित्रपटाला
वन्स मोर नाही हे आपल्या सर्वांना
माहीत आहे. म्हणून मित्रांनो नक्की
एकदा विचार करा….
आयुष्य खूप सुंदर आहे
त्या आयुष्याचा आपण नक्कीच
आनंद घेऊ या.. चला मित्रांनो
आजही आपल्यासाठी….
सुंदर विचारांची शिदोरी
घेऊन आलो आहे.
चला मित्रांनो करूया सुरुवात
सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना
Most motivational quotes in marathi |
प्रत्येक वेळेस आपणच समजून घेत जात असतो |
suvichar marathi by vb good thoughts
आयुष्यात पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका
कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे
लिहायची ताकद तुमच्यात आहे….
पण मन जर शून्यात गेले तर मात्र
जीवन संपायला वेळ लागत नाही.
जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते
तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी
सुरू होत असते.
ज्यांना भावना कळत असतात
तेच रडत असतात. नाहीतर
खोट्यांचे चेहरे हे हसरेच असतात.
आपल्या स्वभावामध्ये नेहमी चांगलेपणा
आणि तिखटपणा ठेवा. चांगल्या लोकांना
त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा
ठसका हा लागलाच पाहिजे….!
वागण्यात आणि बोलण्यात
हा फरक पडायला लागला
की जगण्यात फरक पडायला
सुरुवात होत असते.
Most motivational quotes |
शेवटी बायकोच असते आयुष्याची सोबतीन |
सुंदर सुविचार
बायकोवर कितीही जोक बनवले
मजाक केला. तरी सत्य हेच असते
की तिच्या एवढी आयुष्याची
साथ सोबत या दुनियेत कोणीच
देत नाही…..!
आदर हा खूप छोटा शब्द आहे
पण तो दुसऱ्यांना देण्यासाठी
मन खूप मोठे असावे लागत असते.
काळजाला झालेल्या जखमा
वरून जरी भरलेल्या दिसत
असल्या… तरी त्याच्या वेदना
कधीच कमी होत नाहीत…..!
आपण कितीही बोलके असलो
तरी मन मोकळे करायला
आपल्याच माणसांची सोबत
लागत असते.
पोटाच्या भुकेने माणूस मरत असतो
आणि पैशाच्या भुकेने माणुसकी
मरत असते.
जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही
तोपर्यंत सर्व गोष्टींची किंमत…
ही शून्य असते….!
जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते
आणि समजावूनही सांगते…
ती व्यक्ती योगायोगाने नाही…
तर नशिबाने भेटत असते.
प्रत्येक वेळेस आपणच समजून घेत
जात असतो. म्हणून आपलेच आपल्याला
समजून घेणे बंद करत असतात…!
तोंडावर बोलणारी लोक धोका कधीच
देत नाहीत. आणि धोका देणारी कधीच
बोलून दाखवत नाहीत. म्हणून जीवनात
अगोदर माणसे ओळखायला शिकले
पाहिजे…..!
Most motivational quotes in marathi |
प्रत्येक वेळेस आपणच समजून घेत जात असतो |
suvichar marathi by vb good thoughts
मोठ्या मोठ्या शब्दांनी नाते टिकट नसते
तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या
तरच नाते घट्ट होत असते. आरशाची किंमत
भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाख
भराचे हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असेल
तर शंभर रुपयाचा आरसाच हा लागत असतो.
आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर
फोडण्यापेक्षा आधी आपले कुठे
चुकले आहे ते तपासून बघायचे.
कदाचित आपलीच चूक आहे…
हे लक्षात येईल….!
एखाद्या व्यक्तीला आपण कितीही जवळून
ओळखत असलो तरीही सध्या त्याच्या
मनात काय चालत आहे हे आपण कधीच
ओळखू शकत नाही…!
मधावर पहिला हक्क हा फुलांचा असतो
मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या
मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते.
समाजात असेच असते कष्ट करणारी
उपेक्षित राहतात आणि चोरून श्रेय घेणारे
प्रसिद्ध होतात.
प्रत्येक नात्याचे स्ट्रगल हे वेगळे असते
तुम्हाला तुमच्या नात्याचे वेगळेपण
शोधता आणि जगता यायला पाहिजे…!
माणूस एकाच वेळी दोन आयुष्य जगत असतो
एक जे जगाला दिसत असते ते आणि दुसरे
जे त्याच्या अंतर्मनात चालू असते ते….!
काही गोष्टींचा अर्थ खूप उशिरा कळत असतो
आणि जेव्हा तो कळत असतो तेव्हा त्या गोष्टीला
काहीच अर्थ उरलेला नसतो……!
आपल्यासाठी कोणीही नसले
तरी आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट फुलांकडून शिकावी
फुलांसाठी कुणीही नसते…
पण फुले ही सर्वांसाठी असतात.
नात्यांची वीण | नाते असे सांभाळा |
Motivational Story In Marathi On Relationship |
नाती सुंदर विचार
एका सोनाराच्या मृत्यूनंतर
त्याच्या कुटुंबावर दु:खाचे
आभाळ कोसळले होते.
त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी
सुद्धा पैसे नव्हते.
एके दिवशी सोनाराच्या पत्नीने
आपल्या मुलाला नीलमणीचा
एक हार दिला आणि म्हणाली…
“बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकांच्या
दुकानात जा आणि त्यांना सांग की हा
हार विका व आम्हाला काही पैसे द्या.”
मुलगा तो हार घेऊन काकांच्या
दुकानात गेला. काकांनी त्या
हाराकडे बारकाईने पाहिले
आणि म्हणाले…..
“बेटा, आईला सांग की सध्या
बाजारात खूप मंदी आहे.
थोडे दिवस थांबून नंतर तो
विकल्यास…..
तुम्हाला चांगला भाव मिळेल.
” त्याला थोडे पैसे देत
त्याचे काका म्हणाले…
“तू उद्यापासून माझ्याबरोबर
दुकानात बसत जा.”
दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा
रोज दुकानात जाऊ लागला
आणि तिथे बसून हिऱ्यांची आणि
रत्नांची पारख कशी करायची…
ते शिकू लागला.
थोड्याच दिवसात, तो हिऱ्यांचा
मोठा पारखी झाला. आपल्या
हिऱ्यांची पारख करवून घेण्यासाठी
दूर -दूरवरून लोकं त्याच्याकडे
येऊ लागले.
एके दिवशी त्याचे काका
त्याला म्हणाले, “बेटा…
तुझ्या आईकडून तो हार
घेऊन ये आणि तिला सांग की
आता बाजारात खूप तेजी आहे
त्याला चांगला भाव मिळेल.”
आईकडून तो हार घेऊन
त्याने स्वत:च त्याची पारख
केली असता तो हार नकली
असल्याचे त्याला आढळून आले.
त्याला आश्चर्य वाटले…
की काका स्वत: हिऱ्याचे व रत्नांचे
मोठे पारखी आहेत… मग त्यांनी
आम्हाला हे का सांगितले नाही…..?
मुलगा तो हार घरीच ठेवून
तसाच दुकानात परत आला.
काकांनी विचारले….
“अरे तू हार का आणला नाहीस….?
” तो म्हणाला, “काका, तो हार तर
नकली आहे… परंतु तुम्ही
माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत…..?”
तेव्हा काका म्हणाले….
“जेव्हा तू पहिल्यांदा हार आणला
होतास, तेव्हा जर मी तो हार
नकली आहे असे सांगितले असते
तर तुला असे वाटले असते की
आज आमच्यावर वाईट वेळ
आली आहे, म्हणून काका
असे सांगत आहेत.
पण आज जेव्हा तुला
खरे काय आणि खोटे काय
हे पारखण्याचे ज्ञान झाले आहे
तेव्हा तुला समजलेच असेल की
तो हार खरोखरीच नकली आहे.
त्यावेळी खरे बोलण्यापेक्षा
नातं सांभाळणे हे माझ्यासाठी
जास्त महत्त्वाचे होते.”
सत्य हे आहे की या जगात
खऱ्या ज्ञानाशिवाय आपण
जो काही विचार करतो…
पाहतो…. आणि जाणतो….
ते चुकीचे आहे.
आणि म्हणूनच अशा गैरसमजुतींना
बळी पडून आपल्या नात्यात दुरावा
निर्माण होतो आणि आपले
आयुष्य भरकटायला लागते.
ज्या अदृश्य धाग्याने नाते
विणले जाते त्याचे पोषण
हे प्रेम आणि विश्वासावर
होत असते.
“नात्यात निर्माण झालेल्या
थोड्याशा दुराव्यामुळे,
कोणाचीही साथ सोडू नका…
नाहीतर लोकांना आपलेसे
करण्यात आयुष्य खर्ची करावे
लागते.”
सत्य अशा प्रकारे सांगण्याचा
प्रयत्न करा, की ज्यामुळे
इतरांमध्ये प्रेम निर्माण होईल.
मानसिक आजार पळवुन लावणार्या चौदा कृती |
Good Thoughts In Marathi | Happy Thoughts |
sunder vichar
मानसिक आजार
पळवुन लावणार्या
चौदा कृती……!
कसल्याही प्रकारच्या
निराशेला नाहीशी
करणारी चौदा सुत्रे :-
१) सतत पॉझीटीव्ह रहा
कितीही वाईट घडो
नेहमी पॉझीटीव्हच रहायचे…!
उदा. “एक डोळा गमावला
पण दुसरा डोळा शाबुत आहे,”
ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु
शकतो, देवाची किती कृपा आहे.
प्रत्येक अपयश मला
एक संधी देऊन जात आहे.
उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात
आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात…
तेव्हा तर अधिकाधिक आकर्षक
दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.
आपली मस्करी उडवली की
आपला कोणी कळत नकळत
अपमान केला की, आपल्यातल्या
महत्वकांक्षा जागृत होतात.
२) प्रेमात पडा
आयुष्यात पोकळी आणि निराशा
आली की एक असे पॅशन शोधावे
ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला
लावावे.
पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट
जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने
महिन्याचे तीस दिवस…. दिवसातल्या
दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु
शकतो, ह्याला म्हणतात पॅशन….!
त्या गोष्टीसाठी अक्षरशः
आयुष्य झोकुन द्यावे.
अगदी स्वतःला विसरायला
लावते तेच खरे पॅशन….!
कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल
कोणासाठी खेळ हे पॅशन असेल
कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.
त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही
आणि मग एके दिवशी जगही आपल्याला
त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागते.
मोदी – नेतृत्व, पटनायक – वाळुची शिल्पे
सचिन – क्रिकेट, धीरुभाई – रिलायन्स
अमिताभ – एक्टींग, लता मंगेशकर – गायन
श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग
प्रकाश आमटे – आनंदवन, स्टीव्ह जॉब्ज – गॅझेट्स
ह्या यादीत आपलेही नाव येऊ शकते
आपणही आपल्या पॅशनसाठी
वेडे बनलो तर……!
३) महिन्याला दोन पुस्तके
माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट
आणि पडत्या काळामध्ये मला फक्त
आणि फक्त चांगल्या विचारांच्या
पुस्तकांनीच तारले…. नाहीतर कदाचित
मी आज हा लेख लिहायला शिल्लकच
राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर
अनंत उपकार आहेत.
महिन्याला कमीत कमी दोन तरी
चांगली पुस्तके वाचुनच काढेन
आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ
जीवनात आणेन, हा चंगच बांधावा….
आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते….
हा माझा स्व-अनुभव आहे.
४) डायरी लिहा
दररोज घडलेल्या बर्या वाईट घटना
आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन
जातात.त्यांना शब्दबद्ध करत गेले
की जगण्याची रंगत वाढत जाते.
माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर
काढण्यासाठी मला ह्या डायर्यांनी
खुप मदत केली. झालेले अपमान…
आलेले अपयश…. भविष्याच्या चिंता…
मनाचे रिकामपण…. सगळी मळमळ
मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम
डायर्यांमध्ये जपुन ठेवली, आणि
शहाण्या बाळांसारखे त्या सर्वांनीही
मला त्रास देणे बंदच करुन टाकले…!
आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच
लिहलेली शेकडो पत्रे आहेत, जी वाचुन मला
आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या
कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ
मिळते. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.
५) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा
हातात घेतलेले काम
पुर्ण करायचे म्हणजे करायचे…..!
मनावर विजय मिळवण्यासाठी
मनाचाच वापर करायचा.
काम सुरु होतानाच असे
भासवायचे की ते पुर्ण झालेले आहे.
आणि मन गोंधळुन जाते आणि
ते पुर्ण करुनच एका जागेवर
शांत बसते…..!
‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र
नेहमी लक्षात ठेवायचा….!
६) कंफर्ट झोन तोडा.
नवी आव्हाने स्वीकारा
तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी
कोणतीही एक गोष्ट केलीस का….
जे तुला येत नाही, जे करण्याची
तुला भिती वाटते….?
मी असा वेडेपणा खुपदा केलाय
मला पेंटींग येत नसताना मी माझ्या
ऑफीसला स्वतःच्या हातानी पेंट दिला.
मागच्या वर्षी, माझी खरी ओळख
लपवुन मी गावाबाहेरच्या एका
सुताराच्या हाताखाली मी एक
आठवडा रोज चार तास हेल्पर
म्हणुन काम केले.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी बॅग भरुन
घराबाहेर पडलो, पण मी कुठे जाणार
मलाच माहित नव्हते, त्या पाच दिवसात
मी अनेक गडकिल्ले भटकुन आलो.
अनेक थरारक अनुभव घेतले
स्वतःसोबत घालवलेले ते
पाच दिवस मी कधीही विसरणार
नाही.
नवरात्रीमध्ये उजनी-तुळजापुर हे सदतीस
किलोमीटर अंतर मी एका रात्रीत चालत
गेलो, तो ही एक आनंददायी आणि
अविस्मरणीय अनुभव होता.
७) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम
मनाला ताजेतवाणे ठेवण्याचा हुकुमी एक्का
आहे. शरीराला व्यायाम करायला भाग
पाडायचे. मन आपोआप ताळ्यावर येते….!
जगातल्या प्रत्येक यशस्वी
व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.
८) ध्यान, सर्व समस्यांवर
रामबाण उपाय
तुझे शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात
कधीही अडथळा बनु शकत नाही…
कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस……!
खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस
हे तुला ध्यान करायला लागले की
आपोआप उमगत जाईल.
आतापर्यंत केला नसशील तर एकदा
आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स
नक्की कर.
९) महिन्याला एक
वाईट सवय सोडा
आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात
मी एका महिन्याला एक वाईट सवय
सोडायची आहे. आणि एक चांगली सवय
जोडायची आहे. असे प्रत्येक महिन्याच्या
एक तारखेला अंतर्मनाला सांगतो.
महिनाभर त्याची कसोशीने
अंमलबजावणी करतो.
१०) आपल्या आजुबाजुला
प्रसन्नतेचा शिडकावा करा
घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा
आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो
की आज माझ्या संपर्कात येणार्या
प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि
प्रसन्नता वाटणार आहे.
प्रत्येकाच्या चेहर्यावर हसु
फुलवणार आहे.
कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर
खावु घालावे. कधी एखाद्या लहान
मुलाशी लहान बनुन खेळावे….!
कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट
द्यावी. कधी जोक्स सांगुन लोकांना
खळखळुन हसवावे.
११) जे मिळालयं
त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.
जो कृतज्ञ आहे….
त्यालाच ब्रम्हांड
अजुन जास्त
भरभरुन देते.
हेच सिक्रेट आहे.
आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल
रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास
आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप
नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव
घेतला आहे.
१२) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा
असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा
ह्या जगात उमटवला आहे….
त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी
कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या
संधी शोधाव्यात.
यश ही उत्साहासारखे
संसर्गजन्य असते…..!
१३) सुरक्षित अंतर ठेवा
जे लोक आपले मानसिक खच्चीकरण
करतात, आपली टर उडवतात….
अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे.
निगेटीव्ह लोकांना आपल्या
आयुष्यात आणि आपल्या
मनात कुठेही स्थान देऊ नये.
१४) तीस दिवसांचा प्लान
पुढच्या तीस दिवसात मी काय
करणार आहे, ह्याचा प्लान
महिन्याच्या सुरुवातीला तयार
करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.
एकेक लक्ष्य साध्य केले की
‘विजयी’ असं लिहुन त्याचं
अगदी उत्साहाने आणि
आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावे….!
Also Read :- बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
[…] वाचायला आवडतील असे सुंदर प्रेरणादायी मराठी सुविचार 1000+ Sunder Suvichar Marathi | प्रेरणादायी सुविचार कोट्… […]