500+ Suvichar Status Marathi | Sunder Vichar Status |सुविचार

1
841
Suvichar Status Marathi | Sunder Vichar Status |सुविचार

500+ Suvichar Status Marathi |
Sunder Vichar Status | सुविचार

नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts या संकेतस्थळा वर आपले मनापासून स्वागत आहे.

मित्रांनो… या पोस्ट मध्ये मी आपल्यासाठी काही निवडक मराठी सुविचार, मराठी स्टेटस,
सुंदर विचार स्टेटस, मराठी स्टेटस सुविचार, चांगले विचार, छान विचार मराठी,
मराठी प्रेरणादायक सुविचार, सकारात्मक सुविचार, good thoughts in marathi,
status suvichar, sunder vichar status, marathi status,
marathi quotes in marathi on life, suvichar status,
असे जीवनाला बदलून टाकणारे स्टेटस सुविचार आणले आहेत.

यांना सुविचार म्हणा…. सुंदर विचार, मराठी सुविचार, अथवा स्टेटस जे तुम्हाला वाटेल ते म्हणा…
पण यांना जर आपण शुभ सकाळ, शुभ दिन. अथवा शुभ रात्री लावलात तर हेच मराठी सुविचार
सुप्रभात, शुभ सकाळ संदेश, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, शुभ रात्री संदेश,
good morning wishes marathi, good day wishes marathi, good night wishes,
marathi wishes, असे पण वापरू शकतो.

शेवटी आपण असे समजा की….. आपण हे मराठी सुविचार वाचून आनंदित व्हा…
आपल्या जीवनात…. आयुष्यात बदल करा आणि आपल्या मित्र-मैत्रींना, नातेवाईकांना
facbook, whatsapp, instagram अथवा इतर social media
वर पाठवून त्यांना ही आनंदित करा.

500+ Suvichar Status Marathi |
Sunder Vichar Status | सुविचार

आयुष्यात कधी कधी
इतके बेधुंद व्हावे लागते की…
दुःखाचे काटे टोचुनही
खळखळून हसावे लागते.
यालाच आयुष्य म्हणायचे असते.
आपल्याला दुःख असूनही
कुणालाही दाखवायचे नसते.
केवळ अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांना
पुसत पुन्हा हसायचे असते…

🥀💮🌹💞🌃

झोपेत बघितलेले स्वप्न
कधी पूर्ण होत नसतात.
परंतु ती स्वप्न नक्कीच
पूर्ण होतात…. ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देत असता.

🥀💮🌹💞🌃

नशिबा सोबत लढायला
नुसती गंमत वाटत आहे
मित्रांनो…!
नशीब मला जिंकू नाही देत आहे….
आणि मी आपली हार मानत नाही आहे.
🥀💮🌹💞🌃

जगा इतके की जीवन कमी पडेल….
हसा इतके की आनंद कमी पडेल….
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे….
परंतु प्रयत्न इतके करा की…
देवाला देणे भागच पडेल.

🥀💮🌹💞🌃

अशक्य
असे या जगात काहीच नाही….
फक्त शक्य तितके प्रयत्न करा…
🥀💮🌹💞🌃

कठीण वेळेत नेहमी
स्वतःला सांगत राहा की….
“ अजुन शर्यत संपलेली नाही…
कारण…..
मी अजुन जिंकलेलो नाही…”
🥀💮🌹💞🌃

जग हे गरजेच्या नियमानुसार
चालत असते.
ज्या सूर्याची थंडीत
आतुरतेने वाट बघितली जाते…
त्याच सूर्याचा उन्हाळ्यात
तिरस्कार केला जातो…!
तुमची किंमत तेव्हाच होईल…
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल….!
🥀💮🌹💞🌃

कोणताही व्यक्ती
हा वाईट स्वभावाचा नसतो.
केवळ आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला
तो वाईट वाटायला लागतो.
🥀💮🌹💞🌃

माणसाने जीवन
एकदम सुखाने जगावे.
आपल्याबरोबर काल काय घडले….
याचा विचार करण्यापेक्षा…
आपल्याला उद्या काय घडवायचे आहे
याचा विचार करा. कारण
आपण केवळ गेलेले दिवस
मोजण्यासाठी नाही तर…
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलो आहे.
🥀💮🌹💞🌃

तुम्हाला जर जीवना मध्ये
खूप जास्त संघर्ष करावा
लागत असेल…. तर
स्वतःला खुप नशीबवान समजा.
कारण भगवंत संघर्ष करायची
संधी केवळ त्यांनाच देतो…
ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
🥀💮🌹💞🌃

आपण सगळेच जण
उद्याचा दिवस बघण्यासाठी झोपतो….
परंतु कुणीच हा विचार करत नाही की…..
ज्याचे मन आज आपल्यामुळे दुखावले गेले आहे…
त्याला झोप लागली असेल का…..?
 

भरवसा नावाचा पक्षी
एकदा उडाला की…
तो परत कधीच बसत नाही…..
🥀💮🌹💞🌃

आनंद हा एक ‘भास’ आहे…
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दुःख हा एक ‘अनुभव’ आहे…
जो प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा आयुष्यात तोच जिंकतो….
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.
🥀💮🌹💞🌃

जीवनात
कितीही चांगली कर्म करा….
परंतु कौतुक हे
स्मशानातच होत असते.
🥀💮🌹💞🌃

सगळ्यांजवळ सुख आहे.
परंतु ते अनुभवायला वेळ नाही….
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
🥀💮🌹💞🌃

सर्वात मोठे वास्तव…..
लोक तुमच्याविषयी
चांगले ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र….
लगेच विश्वास ठेवतात…
🥀💮🌹💞🌃

जीवनात समोर आलेली
आव्हाने जरूर स्वीकारा..
कारण त्यातुन तुम्हाला….
एक तर यश प्राप्त होणार
अथवा अपयशातून
अनुभव मिळणार…!
🥀💮🌹💞🌃

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
जे सूचना देतात ते सामान्य……!
आणि स्वतःचा जीव अडचणीत टाकुन
त्यांना जे वाचवितात ते असामान्य….!
🥀💮🌹💞🌃

धाडस केल्याशिवाय
जगात कोणालाच
यश मिळत नाही.
कारण ज्याच्यात हिंमत
त्यालाच किंमत.
🥀💮🌹💞🌃

पाऊस यावा…
परंतु महापूरा सारखा नको.
वारा यावा….
परंतु वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा….
परंतु अमावस्या – पोर्णिमा
सारखी नको.
🥀💮🌹💞🌃

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो….
तेव्हा त्यांना असे वाटते की….
आपण नेहमी रिकामेच असतो.
परंतु त्यांना हे कळत नाही की…
आपण केवळ त्यांच्या साठीच
वेळ काढत असतो.
🥀💮🌹💞🌃

500+ Suvichar Status Marathi |
Sunder Vichar Status | सुविचार

खोटे ऐकायला
तेव्हाच मजा येते….
जेव्हा सत्य पूर्वीपासूनच
माहित असते…!
🥀💮🌹💞🌃

कधी कधी वाटते की….
उगाचच आपण मोठे झालो.
कारण तुटलेली मने आणि
अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली
खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरोखरच खुप चांगला होता.

विजय निश्चित असल्यावर
भित्रा सुद्धा लढणार…..
पण खरा योद्धा तोच…..
जो पराभव होणार
हे माहित असूनही….
जिंकण्यासाठी लढेल…
🥀💮🌹💞🌃

नशीब नशीब म्हणतो आपण
पण तसे काहीही नसते…
कर्म करत राहीले की…
समाधान मिळत असते.
हातावरच्या रेषांचे काय…
तसेही काही विशेष नसते….
कारण….
भविष्य तर त्यांचेही असते…..
ज्यांना हात नसते.
🥀💮🌹💞🌃

आकाशातले तारे
कधीच मोजून होत नाहीत….
माणसाच्या गरजा
कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून
समाधानी रहावे…
जीवन अधिकच सुंदर वाटते….
🥀💮🌹💞🌃

जेव्हा कमवायला लागलो
तेव्हा समजले की….
वडिलांच्या पैशावर
मौज करता यायची….
स्वतःचा पैशामध्ये तर
गरज ही नीट पुर्ण होत नाही.
🥀💮🌹💞🌃

ती लोकं
खूप बलवान असतात
जे सर्वांपासून लपून…
एकट्यात रडतात.
🥀💮🌹💞🌃

कधीही कोणावर
जबरदस्ती करू नका की…
त्याने तुमच्या साठी वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला
खरोखरच तुमची काळजी असेल
तर तो स्वतःहून तुमच्यासाठी
वेळ काढणार….!
🥀💮🌹💞🌃

या जगात
सगळ्या गोष्टी सापडतात.
परंतु…. स्वतःची चूक
कधीच सापडत नाही…
🥀💮🌹💞🌃

 Sunder Vichar status | मराठी सुविचार

कोणतेही कार्य
अडथळ्यावाचून
पार पडत नाही.
जे शेवटपर्यंत प्रयत्न
करत राहतात….
त्यांनाच यश प्राप्त होते.
🥀💮🌹💞🌃

आपला वेळ
स्वतःला घडविण्यात खर्च करा…..
म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
🥀💮🌹💞🌃

आपल्याला कोणी फसवले आहे
या दुःखापेक्षा….
आपण आजपर्यंत
कोणालाच फसवले नाही….
याचा आनंद काही वेगळाच असतो.
🥀💮🌹💞🌃

स्वप्नं ती नाहीत….
जी आपल्याला
झोपल्यावर पडतात.
स्वप्नं ती आहेत की….
जी तुम्हाला झोपूच
देत नाहीत…!
🥀💮🌹💞🌃

कोणत्याही जहाजाला
समुद्रातले संपूर्ण पाणी
बुडवू शकत नाही.
परंतु जर त्या जहाजाने
ते पाणी आत येऊ दिले तर
ते जहाज बुडवल्याशिवाय
राहत नाही. अगदी तसेच
जगातले सर्व नकारात्मक
विचार तो पर्यंत तुम्हाला
हरवू शकत नाहीत…
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या
एकालाही तुमच्या मनात
प्रवेश करू देत नाहीत…!
🥀💮🌹💞🌃

संयम ठेवा…
संकटाचे हे ही दिवस निघून जातील..
जे तुम्हाला आज पाहून हसतात….
उद्या ते तुमच्याकडे पाहतच राहतील.
🥀💮🌹💞🌃

जेव्हा परिस्थिती विरोधात जाते…
तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची
तयारी करा. हे कलयुग आहे….
इथे खोट्याला स्वीकारले जाते….
आणि खऱ्याला लुटले जाते.
🥀💮🌹💞🌃

कोणी कौतुक करो
अथवा टीका लाभ तुमचाच आहे.
कारण कौतुक प्रेरणा देते….
तर टीका सुधरण्याची संधी देते…!
🥀💮🌹💞🌃

लहानसे आयुष्य आहे…
जास्त “लोड” घ्यायचा नाही
मस्त जगायचे आणि
“उशी” घेऊन झोपायचे.
🥀💮🌹💞🌃

खोट्या वचनांपेक्षा
स्पष्ट नकार देणे
कधीही चांगला असतो…
🥀💮🌹💞🌃

दुःखाच्या रात्री
कुणालाच झोप लागत नाही.
आणि सुखाच्या आनंदात
कुणीही झोपत नाही.
यालाच आयुष्य म्हणतात..
🥀💮🌹💞🌃

सत्य आणि स्पष्ट
बोलणारा माणूस जरी….
कडू वाटत असला तरी…
तो धोकेबाज तर कधी नसतोच….!
🥀💮🌹💞🌃

जवळ इतक्या रहा की….
नात्यात विश्वास राहील.
दूर इतक्याही जाऊ नका की….
वाट बघावी लागेल….
नात्यात संबंध इतका असू द्या की….
जरी आशा संपली तरीही….
नाते मात्र कायम राहील.
🥀💮🌹💞🌃

प्रत्येक दिवश आयुष्यातला
शेवटचा दिवस म्हणून जगा.
आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची
नवीन सुरवात करा.
🥀💮🌹💞🌃

समजा जीवनात
एखाद्या गोष्टीत आपण हरलो.
तर ती भावना जितकी
उपेक्षित आणि दुःखदायक असते….
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत…..
जिंकण्याची इच्छा नसणे….
ही भावना जास्त भयंकर असते.
सतत प्रयत्न करत रहा.
🥀💮🌹💞🌃

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की….
जर जिंकलात तर इतिहास….
आणि जर हरलात तरीही इतिहासच…!
🥀💮🌹💞🌃

जीवनात तुम्ही काय कमावले
याच्यावर कधीही गर्व करू नका….
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की
सगळे मोहरे आणि राजा एकाच
डब्ब्यात ठेवले जातात.
🥀💮🌹💞🌃

पावसाला छत्री जरी थांबवू शकत नाही…
परंतु पावसात थांबण्याचे धाडस
नक्कीच देऊ शकते. तसेच
यशस्वी होण्याची आत्मविश्वास
खात्री देऊ शकत नाही… परंतु
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
देऊ शकतो.
🥀💮🌹💞🌃

या जगात अशक्य असे
काहीच नाही…. त्यासाठी
फक्त तुमच्या मध्ये जबरदस्त
इच्छाशक्ती असायला पाहिजे
🥀💮🌹💞🌃

हसत हसत तोंड द्या जीवनाला…..
तरच तुम्ही घडवू शकाल भविष्याला….
केव्हा निघुन जाईल
“जीवन” कळणार नाही….
आताचा हा हसरा क्षण
पुन्हा मिळणार नाही.
🥀💮🌹💞🌃

हरण्याची कधी पर्वा केली नाही…
जिकंण्याचा कधी मोह ही केला नाही….
जे नशिबात असेल ते मिळेलच…
परंतु प्रयत्न करणे मी कधी सोडणार नाही.
🥀💮🌹💞🌃

नशीब जर काही
“चांगले” देणार असेल….
तर सुरुवात त्याची “कठीण”
गोष्टीने होते. आणि नशीब जर
काही “अप्रतिम” देणार असेल….
तर त्याची सुरुवात “अशक्य”
गोष्टीने होते…!
🥀💮🌹💞🌃

जर स्वत:ला
मोठे व्हायचे असेल
तर दुसऱ्यांच्या
मोठेपणाचा स्वीकार करा..
🥀💮🌹💞🌃

जर तुम्हाला जीवनात
आनंदाने जगायचे असेल…
तर या दोन गोष्टी विसराच
तुम्ही जे दुसऱ्यांसाठी चांगले केले
ते…. आणि दुसऱ्यांनी तुमच्याशी
जे वाईट केले ते.
🥀💮🌹💞🌃

आपल्याबरोबर काल काय घडले….
याचा विचार करत बसण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे….
याचा विचार करा.
🥀💮🌹💞🌃

देवाला दुःखात आठवण्याचा हक्क…
त्यांनाच असतो. सुखात ज्यांनी
त्याचे आभार मानलेले असतात….!
🥀💮🌹💞🌃

कुणावरही इतका विश्वास
ठेऊ नका की….
स्वतःचा आत्मविश्वास….
कमी पडेल.
🥀💮🌹💞🌃

जीवनातल्या असंख्य समस्यांची
केवळ दोनच कारणे असतात…
एकतर आपण विचार न करता
कृती करतो अथवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करीत बसतो.
🥀💮🌹💞🌃

जगातील प्रत्येक गोष्ट
ठेच लागल्यावर तुटते….
पण यश ही एकमेव अशी गोष्ट आहे…
जी खूप वेळा ठेच खाल्ल्यावर मिळते…!
🥀💮🌹💞🌃

ठेच तर लागतच राहणार….
ती सहन करायची हिंमत ठेवा.
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा.
🥀💮🌹💞🌃

500+ Suvichar Status Marathi |
Sunder Vichar Status | सुविचार

जो पर्यंत झाडू
एकञ बांधलेला असतो….
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
परंतु जेव्हा तोच झाडू विखुरला जातो…
तेव्हा तो स्वतःच “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा.
🥀💮🌹💞🌃

जीवनात कधीही कुणासमोर
स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका.
कारण तुम्ही ज्यांना आवडता….
त्यांना तुमच्या स्पष्टीकरणाची
अजिबात गरज नसते. आणि
तुम्ही ज्यांना आवडत नाही ते
कधीच तुमच्या स्पष्टीकरणावर
विश्वास ठेवायला तयार होत नाहीत.
🥀💮🌹💞🌃

त्यांनाच आठवण येते….
जे तुम्हाला आपले समजतात…!
🥀💮🌹💞🌃

नावाला तर फक्त
सरडा बदनाम आहे….
खरे रंग तर माणसेच बदलतात….!
🥀💮🌹💞🌃

कोणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा
प्रयत्न करा…
ती म्हणजे
“नाव” आणि “इज्जत”…
🥀💮🌹💞🌃

यश हे…. एका दिवसात तर
मिळत नाही. परंतु
एक दिवस तर नक्कीच मिळते…
🥀💮🌹💞🌃

तुम्हाला ज्यादिवशी वाटेल की…
संपुर्ण जग तुमच्या समोर
तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा
आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
🥀💮🌹💞🌃

पाण्यापेक्षा तहान किती आहे…
याला जास्त किंमत असते…!
🥀💮🌹💞🌃

स्वप्न असे बघा……
जे तुमची झोप उडवून टाकणार.
आणि इतके यश मिळवण्याचा
प्रयत्न करा की…
टीका करणाऱ्यांची झोप उडाली
पाहिजे.
🥀💮🌹💞🌃

 Sunder Vichar status | मराठी सुविचार

मृत्यूपेक्षा
श्वासाला जास्त किंमत असते….
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
परंतु नात्यापेक्षा विश्वासाला जास्त
किंमत असते….
🥀💮🌹💞🌃

करोडो लोक जगात आहेत…
तरी पण तुम्ही जन्माला आलात
कारण… “ भगवंत तुमच्या कडून
काही अपेक्षा करत आहे.
जी करोडो लोकांकडून
पूर्ण होण्याची शक्यता नाही ”
स्वतःची किंमत करा……
तुम्ही खूप मौल्यवान आहात…!
🥀💮🌹💞🌃

गर्व करून कुठल्याही
नात्याला तोडण्यापेक्षा…..
क्षमा मागून ती नाती जपा.
कारण वेळ आल्यावर पैसा नाही
तर…. माणसेच साथ देत असतात.
🥀💮🌹💞🌃

एकवेळ शरीराने कमजोर असाल
तरी चालेल…
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये…..
🥀💮🌹💞🌃

विरोधक हा एक असा गुरु आहे….
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो….!
🥀💮🌹💞🌃

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नसते…..
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
अधिक चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.
🥀💮🌹💞🌃

कोणाच्याही सावली खाली
उभा राहिल्यावर स्वतःची
सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
🥀💮🌹💞🌃

आयुष्यातील
सर्वात मोठा आनंद म्हणजे….
जे तुम्हाला जमणार नाही,
असे लोकांना वाटते….
ते साध्य करून दाखवणे…!
🥀💮🌹💞🌃

मायेची आणि प्रेमाची माणसे
जेव्हा आपल्या जवळ असतात…..
तेव्हा दुःख कितीही मोठे असले
तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत….
🥀💮🌹💞🌃

स्वतःचे मायनस पॉईंट
माहित असणे…
हा तुमचा सगळ्यात मोठा
प्लस पॉईंट ठरू शकतो…..!
🥀💮🌹💞🌃

वेळ जेव्हा आपल्यासाठी
थांबत नाही…. मग आपण
योग्य वेळेची वाट का बघत
बसायचे….? प्रत्येक क्षण हा
योग्यच असतो.
चुकतो तो फक्त आपला निर्णय……
🥀💮🌹💞🌃

आपले दुःख मोजक्या एक टक्के
माणसांजवळच व्यक्त करा.
कारण पन्नास टक्के लोकांना
तुमची काहीच पर्वा नसते.
आणि एकोणपन्नास टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा
आनंदचं होत असतो.
🥀💮🌹💞🌃

आपली खरी स्वप्न तीच आहेत…
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत
जगण्यास आणि सकाळी लवकर
उठण्यास भाग पाडत असतात.
🥀💮🌹💞🌃

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका….
कारण साखर आणि मीठ दोघांना
रंगतर एकच आहे…!
🥀💮🌹💞🌃

तुमच्या आनंदासाठी
जो हार मानत असतो….
त्याच्याशी तुम्ही कधीच
जिंकू शकत नाही…..!
🥀💮🌹💞🌃

पैशाला किंमत कधीच नसते…..
किंमत पैसे कमावतांना
केलेल्या कष्टाला असते.
🥀💮🌹💞🌃

मनाने इतके चांगले राहा की….
तुमचा विश्वासघात करणारा
जीवनभर तुमच्या जवळ
येण्यासाठी रडला पाहिजे….
🥀💮🌹💞🌃

रात्र नाही स्वप्नं बदलते…..
दिवा नाही वात बदलते…..
नेहमी मनात जिंकण्याची
आशा असावी….. कारण
नशीब बदलो अथवा ना बदलो…
परंतु वेळ नक्कीच बदलते…
🥀💮🌹💞🌃

तुम्ही जर नेहमीच सर्वसाधारण
आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत
असाल तर… तुम्हाला कधीच हे
उमजणार नाही की…. तुम्ही
किती असामान्य आहात….
🥀💮🌹💞🌃

उंच शिखरावर तुम्ही
नक्कीच चढा…. परंतु
जगाने तुमच्याकडे पाहावे
म्हणून नाही तर…
त्या शिखरावरून तुम्हाला
जग पाहता यावे म्हणून.
🥀💮🌹💞🌃

जर कुणी विचारले
जीवनात काय गेले आणि
काय मिळाले….
तर सरळ सांगा की….
जे गेले ते कधीच माझे नव्हते.
आणि जे मिळाले ते भगवंताने
माझ्यासाठीच ठेवले होते….
🥀💮🌹💞🌃

ज्ञानाने आणि मनाने
इतके मोठे व्हा की….
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल…
🥀💮🌹💞🌃

ध्येय दूर आहे म्हणून…
रस्ता सोडू नका….
स्वप्नं मनात धरलेले
कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील
कठीण प्रसंग….
केवळ ध्येय पूर्ण होई पर्यंत…
हार मानू नका.
🥀💮🌹💞🌃

स्वतःच्या जीवावर जगायला शिका….
थोडीशी फाटेल परंतु अभिमान वाटेल….!
🥀💮🌹💞🌃

100 + Sunder Vichar status | मराठी सुविचार

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा….
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल….
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात.
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
🥀💮🌹💞🌃

फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती वाटत नाही…
कारण त्याला त्या फांदीवर
भरवसा नसतो तर आपल्या
पंखावर भरवसा असतो…!
🥀💮🌹💞🌃

माणूस तोच यशस्वी होतो
ज्याच्यावर शत्रूने
लिंबू जरी फेकले तरी तो
त्याचा निंबू पाणी करून पितो.
🥀💮🌹💞🌃

Good Thoughts In Marathi

विश्वास जर
भगवंतावर असेल ना….
तर जे नशिबात लिहलेय
ते नक्कीच मिळणार परंतु
जर स्वतःचा विश्वास
स्वतःवरच असेल ना….
तर भगवंत सुद्धा तेच लिहिणार….
जे तुम्हाला पाहिजे आहे…..
🥀💮🌹💞🌃

जरी वाघ जखमी झाला
तरी पण तो जीवनाला
कंटाळत नाही….
तो काही काळ थांबतो…
वेळ जाऊ देतो…. आणि
परत एकदा बाहेर पडतो….
तीच दहशत घेऊन…. आणि
तोच दरारा घेऊन…..!!!
पराभवाने माणुस संपत नसतो…
तेव्हा संपतो जेव्हा तो प्रयत्न
करणे सोडतो.
🥀💮🌹💞🌃

माझा प्रयत्न हा इतरांपेक्षा
श्रेष्ठ होणे नाही आहे तर
जो मी काल होतो…..
त्यापेक्षा आज आणखीन
चांगला होण्याचा आहे.
🥀💮🌹💞🌃

जीवनात कोणतीही गोष्ट
अवघड नसते….
फक्त विचार सकारात्मक पाहिजे.
🥀💮🌹💞🌃

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की….
तुमची भूमिका संपल्यानंतरही
टाळ्या वाजल्या पाहिजेत.
🥀💮🌹💞🌃
Sunder Vichar Status | जीवनात कधीही कुणासमोर स्वतःचे
स्पष्टीकरण देत बसू नका | प्रेरणादायक सुविचार

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here