Motivational Quotes Marathi,
100+ प्रेरणादायी सुविचार मराठी
नमस्कार मित्रांनो,
VB Good Thoughts या संकेटस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
आयुष्यात आशा खूप महत्वाची आहे. आशा, संयम, च्या आधाराने प्रेरणा घेऊन
आयुष्यात आपण यश संपादन करू शकतो. याउलट जर आयुष्यात निराशा आली तर
हा असा रोग आहे की एकदा का याने आयुष्यात प्रेवेश केला तर कुणालाही यातून
बाहेर निघणे खूप अवघड होते.
आपण बघतो की आपले काही मित्र मंडळी, नातेवाईक, एखादे नवीन कार्याची
सुरुवात खूप मोठ्या उत्साहाने करतात. पण जर आपणाला ठरवलेल्या
वेळात मनासारखे यश मिळाले नाही तर आपला उत्साह कमी कमी होत जाते.
आणि आपण निराश होतो…. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये
संयम आणि प्रेरणाची कमतरता असते.
आपल्याला आपल्या आयुष्यात प्रेरणा देणाऱ्यांची ची खूप आवश्यकता असते.
मग ते आपले आई वडील असोत, मित्र असोत अथवा नातेवाईक तसेच
चांगली पुस्तके, चांगले विचार.
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपल्यासाठी काही निवडक असे प्रेरणादायी सुविचार,
motivational Quotes In Marathi, सुंदर विचार,
Sunder Vichar, Good Thoughts In Marathi,
हे शक्तिशाली मराठी सकारात्मक सुविचार आपले आयुष्य बदलण्यात नक्कीच
उपयोगी ठरतील.
मित्रांनो, काम कोणतेही असो…. लहान असो, मोठे असो, मोटिवेशन ची खूप गरज असते….
आयुष्यात जरी कितीही कठीण परिस्थिति असेल, तरीपण हे प्रेरणादायी मराठी सुविचार ,
आपल्याला यशाचे शिखर गाठण्यात नक्कीच मदत करतील.
टर चला सुरुवात करूया Motivational Quotes In Marathi,
marathi suvichar, sunder vichar marathi,
Motivational Quotes Marathi ,
प्रेरणादायी सुविचार मराठी
पूर्वजांचा संदेश
माणुसकी – घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द – घरातील धन – दौलत आहे.
शांतता – घरातील लक्ष्मी आहे.
आत्मविश्वास – घरातील देवस्थान आहे.
दुजाभाव विसरणे – घरातील तेजस्वी समई आहे.
पैसा – घराचा पाहुणा आहे.
गर्विष्ठपणा – घराचा वैरी आहे.
अहंकार – घराचा सर्वनाश आहे.
आतिथ्य – घराचे वैभव आहे.
नम्रता – घराची प्रतिष्ठा आहे.
व्यवस्था – घराची शोभा आहे.
समाधान – घराचे सुख आहे.
सदाचार – हा घराचा सुगंध आहे.
चारित्र्यसंपन्नता – घराची कीर्ती आहे.
प्रभु चा वास – असाच घरात नेहमी आहे.
कर्ज – होईल असा खर्च करु नका.
पाप – होईल अशी कमाई करू नका.
दुःख – होईल असे बोलू नका.
चिंता – होईल असे जीवन जगू नका.
रोग – होईल असे खाऊ नका.
जगा इतके की आयुष्य कमी पडेल.
हसा इतके की आनंद कमी पडेल
काही नाही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.
Good Thoughts In Marathi On Life | कर्माचा सिद्धांत
पूर्वजांचा संदेश | Sunder Vichar ,
Good Thoughts In Marathi ,
मराठी प्रेरणादायक सुविचार
Motivational Quotes Marathi ,
प्रेरणादायी सुविचार मराठी
कठीण काळात सतत स्वतःला सांगा
अजून शर्यत संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी
समुद्रातील तुफाना पेक्षा
मनातील वादळे
अधिक भयानक असतात.
लक्षात ठेवा,
लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात,
मावळत्या सूर्याला नाही.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
Good Thoughts In Marathi On Life | कर्माचा सिद्धांत
माणसाच्या जीवनातील
संकटे… हे यशाचा आनंद
घेण्यासाठी आवश्यक आहेत.
Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह | सुंदर विचार
ज्या विषयाची तुम्हाला माहिती आहे
त्या विषयावर कमी बोला. आणि
ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.
******
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसे हवीत.
कारण…. ओळख ही
क्षणभरासाठी असते. तर
जपवणूक आयुष्यभरासाठी.
******
गोड मधं बनवणारी मधमाशी
चावायला विसरत नाही…
त्यासाठी सावधान रहा…
कारण… जास्त गोड बोलणारे पण
इजा पोहचवु शकतातं…
******
परीस्थिती प्रमाणे बदलणारे
मित्र सांभळण्या पेक्षा
परीस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा…
कधीही जीवनात अपयश
अनुभवायला मिळणार नाही.
******
Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी
लाख रूपयातून जरी
एक रूपया कमी झाला…
तरी ते लाख रूपये होत नाही.
तसेच तुम्ही आहात…………
मला लाख माणसे भेटतील
पण ते लाख माणसे
तुमची जागा घेऊ शकत नाही…!
******
एक पेन चुक करू शकतो…
पण…… एक पेन्सील कधीच
चुक करत नाही. कारण……
तीचा partner ( खोडरबर)
तीच्या सोबत असतो. तो तिच्या
सर्व चुका सुधारतो…… म्हणुनच
आयुष्यात आपला एक तरी
विश्वासु मित्र असावा……
जो आपल्या चुका सुधारेल…!
******
जर गरुडा सारखे
उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत
सोडावी लागेल.
आयुष्यात अशा लोकांना जवळ करा
जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत
मजबूतपणे उभे राहतील. कारण….!
Relations मध्ये विश्वास
आणि मोबाइल मध्ये Network
नसेल तर लोक Game खेळायला
सुरुवात करतात…!
******
माणुस स्वत:च्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो.
परंतु… दुसऱ्यांच्या चुकांसाठी
सरळ न्यायाधीश च बनतो…!
******
दगडाने डोके ही फुटतात
परंतु जर त्याच दगडाची मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.
******
जवळच्या माणसाचा स्वभाव
जरी कितीही पुरेपूर माहित असला
तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
******
motivational quotes in marathi | सुविचार संग्रह
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना
तुम्ही बाळगलेला संयम आणि
तुमच्या जवळ सर्वकाही असतांना
तुम्ही दाखवलेला रुबाब.
******
जर तुम्ही प्रत्येक वेळेस
नविन चूक करत असाल
तर नक्किच समजा
तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
******
मराठी प्रेरणादायक सुविचार | सुंदर विचार मराठी
जर जीवनात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे.
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या
निराशे नंतरच मिळत असते.
Good Thoughts In Marathi | सुंदर विचार स्टेटस मराठी
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
जीवनातील सर्वात कठीण खेळ होता.
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआपच
पसरत जातो.
घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन
आपण आपल्यालाच त्रास देतो.
गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा
पुढील मार्ग पहावा.. कदाचित परमेश्वराने
आपल्याला यासाठीच.. डोळे मागे न देता
पुढे दिले आहेत..!
******
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची
जास्त भीती वाटते.
******
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर
मरणारे कमी… जळणारे
जास्त निर्माण होतील.
******
प्रेमळ माणसे ही
इंजेक्शन सारखी असतात.
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही……
पण त्यांचा उद्देश
तुमची काळजी घेणे हाच असतो.
******
मनुष्य कितीही गोरा असला
तरी त्याची सावली मात्र
काळीच असते.
मी श्रेष्ठ आहे
हा आत्मविश्वास आहे.
पण. फक्त मीच श्रेष्ठ आहे
हा अहंकार आहे.
******
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर
जर लोक हसत नसतील…
तर तुमची ध्येये खूपच
लहान आहेत. हे लक्षात घ्या.
******
जर शर्यत लावायचीच असेल,
तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि जर हरलात
तर स्वत:चाच अहंकार हराल.
Motivational Quotes Marathi ,
प्रेरणादायी सुविचार मराठी
शुन्यालाही किंमत देता येते
फक्त त्याच्यापुढे
एक होऊन उभे रहा.
समुद्रातील संपूर्ण पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही.
परंतु जर त्या जहाजाने ते पाणी आत येऊ दिले
तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही.
अगदी तसेच जगातील सर्व नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही
त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
सगळेच संपून गेले आहे….
जेव्हा असे आपल्याला वाटते….
तेव्हा तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु करण्याची….!
जर मोठे आणि यशस्वी व्हायचे आहे
तर अपमान गिळायला शिका.
जेव्हा उद्या मोठे व्हाल
तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायला
तुमची ओळख सांगतील….!
जीवनात तुम्ही काय कमावले
याच्यावर कधीच गर्व करू नका.
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि
सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
जीवनातील सगळ्याच समस्या
देवाच्या भरवशावर सोडून चालत नाही,
कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता
देव तुमच्या भरवशावर बसला असेल……!
******
अडचणीत असतांना
अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत
जाण्यासारखेच आहे.
******
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी
बिस्कीट जवळ बाळगा आणि
पुढे चालत रहा.
******
जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नसते.
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच
जिंकणे होय.
******
आपला कोणी व्देष करत असेल
तर त्याला तीन पैकी एक कारण असते.
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखे व्हायचे असते.
******
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही.
म्हणूनच जीवनात कुणालाच छोटे समजू नका…
कारण ते जे करू शकते, कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
******
विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार
केलाच पाहिजे.
विश्वास हा
खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो.
आजचा संघर्ष
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो….
विचार बदला जीवन बदलेल.
एकदा कर्तृत्व सिद्ध झाले कि….
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदराने झुकतात.
प्रेरणादायी सुविचार मराठी
यशस्वी होण्यासाठी
तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा
अधिक प्रबळ असली पाहिजे.
जर एखाद्याला फसवण्यात
तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे
असे समजू नका.
त्या माणसाच्या विश्वासाला
तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
खूप कमी लोक आपल्या जीवनात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात.
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
जर दुसऱ्यांच्या चुका शोधायला
मेंदू लागतो….
तर आपल्या चुका मान्य करायला
काळीज असावे लागते….!
नेहमी एक “Special”
म्हणून रहावे, पण कोणाच्या
जीवनात “Option” म्हणून
राहू नये…
माझ्यामागे कोण काय बोलते
याने मला काहीच फरक पडत नाही.
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
******
ठाम राहायला शिकावे
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
******
जबरदस्त मराठी प्रेरणादायक सुविचार ,
Motivational Quotes In Marathi
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणे असतात………
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
******
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या
त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचे
सामर्थ्य ठेवतात.
******
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल
सांगता येत नाही.
******
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून
आणतोच.
******
कोणत्याही संकटाशिवाय
मिळणारे यश हा ” विजय ” ठरतो
पण अनेक संकटांशी सामना करून
मिळालेला विजय ” हा इतिहास घडवतो…!
Motivational Quotes Marathi
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकते.
आयुष्यातील प्रत्येक क्षण
हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा
आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.
******
ज्याने पावलोपावली
जीवनात दुःख भोगले आहे……
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो.
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच माहीत नसते.
*******
आपल्या आयुष्यात येणारी माणसे ही
झाडांच्या अवयवासारखीच असतात.
काही फांदीसारखी – जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी – अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी – सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी – न दिसताही सुरुवातीपासुन
शेवटपर्यंत साथ देणारी…!
******
जर तुम्ही पाहिलेले स्वप्न
पूर्ण होत नसतील तर
तुमच्या कामाची पद्धत बदला,
तुमचे तत्व नाही, कारण झाड
नेहमी आपली पान बदलतात
मुळ नाही…!
******
आयुष्य हे हार्मोनियम सारखे असते.
सुखाच्या पट्टया पांढऱ्या
दु:खाच्या पट्टया काळ्या.
पण गमंत म्हणजे
दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय
सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही..!
******
जर आवडत्या व्यक्ति पासुन
मन दु:खी झाले…………
तर हे वाक्य लक्षात ठेवा.
दु:ख महत्वाचे असेल
तर त्या व्यक्तिला विसरा,
आणि व्यक्ति महत्वाची असेल
तर दु:ख विसरा.
******
आयुष्याचा पट हा
बुद्धिबळासारखा असतो…
इथे प्रत्येक जण, अगोदर
तुम्हाला खेळ शिकवतो..
आणि एकदा तुम्ही या खेळात
पारंगत झालात की……
प्रत्येकजण तुम्हाला
हरविण्यासाठी खेळतो.
******
स्वर्गात सर्व काही आहे,
परंतु मृत्यू नाही.
गीतामध्ये सर्व काही आहे
परंतु खोटे नाही.
जगात सर्व काही आहे
परंतु समाधान नाही.
आणि आज माणसांमध्ये
सर्व काही आहे परंतु
धीर नाही.
******
आयुष्याच्या प्रवासात
सर्व काही शिकलो,
आधार कुणी देत नाही….
परंतु धक्का द्यायला
प्रत्येक जण तयार असतो….
******
माझे म्हणून नाही.
आपले म्हणून जगता आले पाहिजे…
जग खुप चांगले आहे. फक्त……
चांगले वागता आले पाहिजे….!
******
चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो….
पण त्यांची कधी साथ सोडत नाही.
आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो….
पण त्यांना साथ कधी देत नाही.
******
ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने
कधीच यश मिळत नाही. सकारात्मक
विचारसारणी असल्यास प्रगती होते.
******
जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते.
आणि नशीब जर काही अप्रतिम
देणार असेल तर त्याची सुरुवात
अशक्य गोष्टीने होते..!
******
Also Read
Friendship Quotes in Marathi | 100+ मैत्रीवर सुंदर सुविचार
Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
Best Marathi Status Suvichar With Images | सुविचार संग्रह
[…] […]
[…] Best Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी […]
[…] Motivational Quotes Marathi […]
[…] motivational speech in marathi […]
[…] Marathi Suvichar | १०००+ सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Quotes Motivational Quotes Marathi […]
[…] Motivational Quotes Marathi | 100+ प्रेरणादायी सुविचार मरा… […]
[…] तुम्ही good thoughts in marathi, sunder vichar, motivational quotes in marathi, suvichar marathi, happy thoughts, best line, changale vichar, changale sanskar, positive thoughts, […]
[…] Motivational Quotes Marathi | 100+ प्रेरणादायी सुविचार मरा… […]