Good Thoughts In Marathi On Life - सुंदर विचार - जीवनाचे दही-aanand
आनंदापेक्षाही मोठा एक असा आनंद आहे…. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
Good Thoughts In Marathi On Life मराठी सुंदर विचार – जीवनाचे दही
नमस्कार मित्रांनो…..
जर जमलेले अगदी पांढरे शुभ्र दही पाहिले तर तोंडाला पाणी सुटतो…
आणि त्या दह्याला खाण्याची खूप प्रबळ इच्छा होते…!
परंतु… जर त्या दह्यात चमचा बुडवला तर ते दही मोडणार…
थोड्याच वेळात पूर्ण पाणी पाणी होणार…
हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असते…!
म्हणून दही मोडणार नाही या करिता जर दहित मी चमचा
बुडवलाच नाही तर…?
जर ते दही एक दोन दिवस तसेच राहिले तर ते आंबट होईल…!
आणखीन काही दिवस दह्याला तसेच ठेवले तर पूर्ण दही
खराब होऊन जाईल…
मग काय उपयोग त्या जमलेल्या दह्याचा…?
पांढऱ्या शुभ्र मस्त लागलेल्या दह्याचा…?
मग असाच विचार मनात आला….
जीवनाचेही काही असेच असते… नाही का…?
दह्यासारखेच मस्त जमलेले जीवन, जगण्यासाठी
नक्की आवडेलच…! परंतु जर ते जीवन तसेच जमलेले राहिले…
तर त्यातली गोडी निघून जाईल. पुर्णतः पानचट होईल.
पुर्णतः ते वायाच जाणार…!
त्यापेक्षा दर रोज जीवनाचे दही नव्याने विरजायचे…
जीवनाची गोडी चाखायला तर हवीच…!
जीवन जगायला तर हवेच…!
दिवसभर ते दही वेगवेगळ्या प्रकारे अनुभवायचे…!
कधी साखर मिसळावी….
तर कधी मीठ मिसळावे….
कधी दह्याला कोशिंबिरीत मिसळावे…
तर कधी बुंदीत मिसळावे..
तर कधी कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीत मिसळावे…!
कधी मनसोक्त जेवण झाल्यावर ताक म्हणून प्यावे…!
मला ताकाचा…. आपल्यात पाहिजे तितके पाणी सामावून
घेण्याचा गुणधर्म खुप खुप आवडतो.
म्हणजेच कोणताही अतिरेक झाला
तर आयुष्य पांचटच होतेच…!
प्रत्येक दिवसाच्या जगण्याची ची कला आपल्याला
वाढविता आली पाहिजे.
पण एक नियम अगदी काटेकोरपणे पाळायचा…!
तो म्हणजे दह्याला पूर्ण संपवायच्या आधी…
दररोज थोडेसे विरजण बाजूला काढून ठेवायचेच…!
उद्याचे दही लावायला…
झोपण्यापूर्वी… दिवसभरात जगलेल्या संपूर्ण क्षणांचे
परत नव्याने दही विरजायचे…
मला माहित आहे की… दररोज ही भट्टी जमेलच असे नाही…
परंतु, समजा कधी नासलेच… किंवा कधी कडवटपणा आलाच…
तर नाउमेद न होता… नव्याने सुरुवात करायचीच…
मग त्याकरिता जर दुसऱ्यां कडूनही विरजण मागावे लागले
तरी पण त्यात कमीपणा मानायचा नसतो…
मात्र दही दररोजच्या रोज ताजेच लावायचे हं…!
जीवन कसे चवीने जगायचे…!
Good Thoughts In Marathi On Life मराठी सुंदर विचार – जीवनाचे दही
जीवनात फक्त स्वप्न फुकट पडतात…
बाकी सगळ्यांसाठी किंमत मोजावी लागते…!
Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार – जीवनाचे दही
जीवनात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर
एक बहुमोल संपत्ती विकसित होते…
ती म्हणजे आत्मविश्वास.
Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार – जीवनाचे दही
जरी तुम्हाला यशस्वी होण्याची
खात्री नसेल…
तरीही संघर्ष करण्याची प्रेरणा
नक्कीच असली पाहिजे.
Good Thoughts In Marathi On Life – सुंदर विचार – जीवनाचे दही
मनाची अवस्था | जगातील सुंदर व्यक्ती | आनंदी व्यक्ती
एकदा एका श्रीमंत माणसाने एका संतश्रींना आपल्या घरी जेवण्याचे
निमंत्रण दिले. परंतु त्या दिवशी एकादशी असल्याने संतश्रींना उपवास होता.
त्यामुळे त्यांचे जाणे काही जमले नाही.
श्रीमंत माणसाच्या निमंत्रणाचे मान ठेवण्यासाठी संतश्रींनी आपल्या
दोन शिष्यांना त्या श्रीमंत माणसाकडे जेवण करण्यासाठी पाठवून दिले.
परंतु जेव्हा ते दोन शिष्य श्रीमंत माणसाकडून जेवण करून परत
आश्रमात आले… तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा
प्रसन्न होता.
संतश्रींनी त्यांना पहिले तर थोडे आश्चर्य वाटले म्हणून संतश्रींनी
एका शिष्याला विचारले, “बाळा इतका का दुःखी आहेस.
घरमालकाकडून काही चुकले का… की जेवणात काही
फरक केला का….?”
” नाही गुरुवर “
मग त्यांनी बसण्यात फरक केला का….?
” नाही गुरुवर “
घरमालकाने दक्षिणेमध्ये काही फरक केला का….?
“नाही गुरुवर…. दक्षिणा बरोबर पाच रुपये मला आणि
पाच रुपये दुसऱ्याला ” दिली
आता तर संतश्रींना आणखीनच आश्चर्य झाले आणि शिष्यांना विचारले….
मग काय कारण आहे….? जो तू इतका दुःखी आहेस….?
तेव्हा दुःखी शिष्य बोलला, ” गुरुवर… मी तर असा विचार करायचो की…
ते मान्यवर खूप श्रीमंत आहेत. कमीत कमी २१ रुपये दक्षिणा देतील.
परंतु त्यांनी पाच रुपये दिले… म्हणून मी दुःखी आहे.
संतश्रींनी दुसऱ्याला विचारले…. तू इतका का प्रसन्न आहेस….?
तेव्हा दुसरा म्हणाला…. गुरवर मला माहित होते की ते श्रीमंत माणूस
खुप कंजूष आहेत… एक रुपयापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाहीत….
परंतु त्यांनी पाच रुपये दिलेत…. म्हणून मी खूप प्रसन्न आहे.
मित्रांनो….
आपल्या मनाची हीच अवस्था आहे. संसारात घटना या समान रुपी
घडत असतात…. परंतु कुणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करीत असतो…!
तर कुणी दुःखी होत असतो….! परंतु खरेतर दुःख… अथवा सुख….
हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते….!
म्हणून इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख…. आणि इच्छा पूर्ण झाली
तर सुख…. परंतु जर कोणतीही इच्छाच नसेल तर आनंदच आनंद….!
लोक ज्या शरीराला सुंदर समजतात… मेल्या नंतर तेच शरीर सुंदर का
वाटत नाही…? त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात….?
ज्या शरीराला सुंदर मानतात….फक्त त्याची त्वचा काढून टाका. तेव्हा
वास्तव दिसेल की…. आत काय आहे….?
आत फक्त रक्त…. रोग…. मळ आणि कचरा भरलेला आहे….!
मग हे शरीर सुंदर कसे असेल….?
शरीरात कोणती ही सुंदरता नाही…. तर सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म….
त्याचे विचार…. त्याची वाणी… त्याची वागणूक…. त्याचे संस्कार आणि
त्याचे चारित्र्य….! ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तोच व्यक्ती जगातली
सर्वात सुंदर व्यक्ति आहे.
मेलेल्या माणसाला खांदा देणें… लोकं याला पुण्य समजतात. परंतु नियतीच्या समोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देतांना खूप वेळा विचार करतात…!
Good Thoughts In Marathi तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार
टायटॅनिक जहाज बुडत असतांना मदतीसाठी अगदी शेवटचा उपाय म्हणून
आकाशात प्रकाशाचा बार सोडला…
त्यावेळी तो प्रकाशाचा बार १० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका
जहाजाने पाहीले…. परंतु ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्या जहाज वरील लोकांनी विचार केला की… जर आपण मदतीला गेलो तर
आपले काम सगळ्यांन समोर उघडणार… आपला भांडा फुटणार….
तसेच आपला वेळही जाईल…. आणि नुकसानही होणार…
म्हणुन तो जहाज मदतीला गेला नाही.
Good Thoughts In Marathi तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार
एक कॅलीफोर्नीया नावाचा जहाज २० किलोमीटर अंतरावर होता…
त्या जहाजाने ही मदतीचा प्रकाश बार पाहीला… परंतु वेळ रात्रीची आहे…!
तसेच वाटेत खुप आईस बर्ग आहेत. आपण उजेड झाल्यावर जाऊ असा
विचार केला आणि ते उजेडात सकाळी गेले.. तो पर्यंत जहाज पूर्ण बुडुन
जवळपास चार – पाच तास झाले होते.
७० किलोमीटर अंतरावर एक कैथरीन नावाचे जहाज होते…
त्या जहाजानेही हा मदतीचा प्रकाश बार पाहीला…
मदतीचा प्रकाश पाहताच तो जहाज लगेच
मदतीसाठी निघाला…
७० किलोमीटर प्रवास करून जो पर्यंत तो जहाज पोहचला…
तो पर्यंत खूप उशीर झाला होता…! तरीही त्यांनी जहाजातील
बुडत असलेल्या चारशे पाचशे लोकांना वाचविले होते…
हे सांगायचे म्हणजे…
Good Thoughts In Marathi तीन प्रकारची माणसे – सुंदर विचार
आपल्याला जीवनात तीन प्रकारची माणसे भेटतात…
पहिले असे असतात की ते त्यांच्या स्वार्थानुसार वागतात…
तुमचा अजिबात विचार ना करणारे….!
दुसऱ्या प्रकारचे लोकं त्यांच्या वेळे नुसार.. तसेच त्यांच्या मनात
आले तर मदत करणारे…!
आणि तिसऱ्या प्रकारचे लोकं ते असतात जे कोणताही विचार न करता…
सरळ तुमच्या मदतीसाठी बेधडक धावत येऊन मदतीचा हात देणारे…!
तुम्हालाही जीवनात नेहमीच तिसऱ्या प्रकारची लोकं
जीवनाचा प्रकाश होऊन भेटो
हीच या प्रकाशाच्या सणाला प्रार्थना.
Makar Sankranti in Marathi - मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
आकाशात उंचच उंच लहरू दे पतंग. आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग आणि आयुष्यात पसरू दे आनंदाची तरंग
“ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ” मकरसंक्रांत च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती Makar Sankranti in Marathi
मित्रांनो,
आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र हे सण
जसे महत्वाचे मानले जाते आणि खूप थाटात साजरे हि केले जाते… तसाच
मकरसंक्रांती हा एक महत्वाचा सण आपण साजरा करतो.
जेव्हा सूर्य हा दक्षिणायनातून उत्तरायणात जाण्यासाठी आपला मार्ग बदलतो
त्याच तिथीला संपूर्ण देशात मकरसंक्रांती हा सण साजर केला जातो.
याच दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.
या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता…
सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
सुर्य मकर राशीत पौष महिन्यात प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतो.
या उत्तरायणामुळे भारताच्या उत्तर गोलार्धात खूप जास्त उष्णता आणि प्रकाश मिळतो.
तसेच दिवस मोठा आणि रात्र हि लहान होत जाते…!
या भागात राहणाऱ्या आपण भारतीयांना हा बदल खूप आवडतो… म्हणून हा सण ही
आपण सर्वांना खूपच आवडतो. आणखीन एक महत्वाचे म्हणजे या उत्तरायणामुळे
थंडी ही हळूहळू कमी – कमी व्हायला सुरुवात होते.
संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान खूप पुण्यदायक मानले आहे.
म्हणूनच या दिवशी कुठेतरी बाहेर नदी किवा धार्मिक ठिकाणी स्नान करतात.
या वेळी खूप थंडी असते, मकरसंक्रांती नंतर सूर्य तापायला सुरुवात करतो…
म्हणून खूप प्रेमाने या सणाचा सगळे स्वागत करतात.
हा सण पूर्ण देशात साजरा केला जातो, भारत सरकारने या सणाला
राष्ट्रीय सण घोषित केले आहे, पण देशातील विविध राज्यात हा सण विविध
पद्धतीने साजरा करतात तसेच विविध नावाने हि साजरा करतात.
Makar Sankranti in Marathi मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
मकरसंक्रांती makar sankrati ( महाराष्ट्र )
संक्रांति sankranti ( बिहार,केरळ,आंध्रप्रदेश, कर्नाटक )
भोगाली बिहुं Bhihu ( आसाम )
पोंगल Pongal ( तामिळनाडू )
उत्तरायण Utarayan ( राजस्थान, गुजरात )
माघ मेला Magh Mela ( ओडिसा )
लोहरी Lohri ( पंजाब )
जरी प्रत्येक धर्म…. प्रत्येक राज्य…. आपआपल्या प्रथे प्रमाणे…. आपआपल्या पद्धतीने…
साजरा करतात पण उत्साह आणि आनंद हा सगळीकडे सारखाच असतो.
पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र साजरा
करण्याची परंपरा आहे.
या सणाची एक छान गंमत ही आहे. हा सण दरवर्षी जानेवारी महिन्याच्या
14 तारखेलाच येतो. ( एखाद्या वर्षी हा सण 13 जानेवारी किवा 15 जानेवारीला ही येतो.
हा एक अपवाद आहे. )
आपल्या देशातील मकरसंक्रांत हा एक शेतीसंबंधित सण आहे.
हा आपला आवडता भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधीत असून
अतिशय महत्वाचा सण आहे.
या सणाचा शेतीशी देखील एक महत्वाचा संबंध आहेच.
Makar Sankranti in Marathi मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
मकरसंक्रांती पासुन दिवस हा हळुहळु मोठा – मोठा होत जातो आणि
रात्र ही लहान लहान होत जाते. त्याच प्रमाणे सुर्य ही हळूहळू तेज होत जातो…
आणि जस जसा सुर्य पुढे – पुढे सरकत जातो तस तसा त्याची दाहकता ही वाढत जाते.
समोर 15 ते 20 दिवसाच्या मधात रथसप्तमी असते. सुवासिनी स्त्रिया मकरसंक्राती
पासुन रथसप्तमी पर्यंत वान वाटतात. ( हळदी कुंकवाचे आयोजन करतात. )
मकरसंक्रांती या सणाचे आहार च्या दृष्टिकोनातून ही विशेष महत्व आहे…!
मकरसंक्रांती सणाला सुवासिनी बाया ह्या एकमेकिंना सुगड्याचे वाण देतात.
सुवासिनी बाया या वाणात हरभरे…. मटर…. बोरं… उस… गहु… तीळ…. नाणे…. देतात…
हे आपल्याही पाहण्यात येतेच… ( हरभरे… मटर…. बोरं…. गव्हाच्या ओंब्या हे सगळे
फक्त याच दिवसात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते… म्हणूनच या वस्तूंचा समावेश
बाया वाणात करतात…! )
ऊस… हरभरे…. बोरं… गव्हाच्या ओंब्या… तीळ ह्या सर्वांना सुगडयात भरून…
ज्यापध्दतीने सुवासिनी बाया एकमेकिंना हे वाण म्हणून देतात…
अगदी त्याचप्रमाणे पंढरपुरला रूक्मिणी आईला देखील सुवासिनी महिला
आजच्या दिवशीच हे वाण देण्यासाठी पंढरपूर ला महिलांची चांगलीच गर्दी राहते…!
मकरसंक्रांती या सणाला महाराष्ट्रात असा साजरा करतात…!
महाराष्ट्रात मकरसंक्रांती या सणाला काळे कपडे घालण्याची आणि
एकमेकांना काळे कपडे देण्याची देखील प्रथा आहे. पण ही प्रथा
काही ठिकाणीच पाहायला मिळते…!
महाराष्ट्र – तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला
“ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ” या वाक्याने पूर्ण महाराष्ट्र गुंजते…
तसेच हे वाक्य म्हणण्याची संधी महाराष्ट्र वासियांना फक्त आणि फक्त
मकरसंक्रांती या सणालाच मिळते…!
तिळ आणि गुळ हे स्वभावाने उष्ण असते आणि या थंडीच्या काळात
आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज हे तिळगुळ पुर्ण करत असते…
आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा
सुरू झाली असेल…!
मकरसंक्रातीला तीळ…. गुळ…. गुळाची पोळी… तिळाचे लाडू…. मुऱ्याचे लाडू…
यांचे विशेष महत्व असते.
Makar Sankranti in Marathi – मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
मकरसंक्रांत आणि पतंग
या दिवसांमध्ये सुवासिनी बाया हळदी कुंकवाचे आपापल्यापरीने घरी आयोजन
करतात आणि आपल्या ओळखीच्या सुवासिनी महिलांना बोलवितात….
तसेच आपली पुरुष मंडळी…. बाल मंडळी… मित्र…. वडीलधारी… माणसांसोबत
पतंग उडविण्यात मस्त असतात…!
या दिवसात भरपुर ठिकाणी पंतग महोत्सवाचे आयोजन देखील आयोजित केले जातात….
तसेच पतंग बनविणे ही शिकविले जाते…!
खूप लोकं पतंग उडविण्याचा आनंद घेण्यासाठी आणि आयोजित महोत्सवाचे उत्सव
पाहाण्याकरता गुजरात राज्यात जातात… कारण गुजरात राज्यात या मकरसंक्रांतच्या
दिवसांमध्ये आकाशात विविध रंगाची… आकाराची…. पतंगे उडत असल्याचे आपल्याला
दिसत असते…!
या दिवसांत पतंग उडविण्याचे जर आपण शास्त्रीय कारण पहिले तर आपल्याला सहजच
लक्षात येईल की…. या थंडीच्या दिवसांमध्ये सुर्याची उन अंगावर घेण्यासाठी पतंग
उडविण्याच्या शिवाय दुसरे असे चांगले कारण असुच शकत नाही. आणि म्हणुनच
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी असे वाटते.
सण कोणतेही असोत… हे आपल्याला आनंद… उत्साह…. नवचैतन्य…
देण्याकरीताच येत असतात…! रोजच्या दैनंदिन जीवनातल्या कामातून काही क्षण
काढुन, आपण निवांतपणे ह्या सणानिमित्ताने वेगळेपणाने जीवन जगतो…
त्यात रमून जातो… आणि आयुष्यात एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो…!
Makar Sankranti in Marathi मकरसंक्रांती च्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
सणांच्या निमित्ताने मित्र – मंडळी… नातेवाइकांशी भेट होते आणि जीवनात एक नवीन
उर्जा तयार होते आणि हि उर्जा समोर कित्येक दिवस आपल्याला जीवनात आनंद देत असते…!
ही उर्जा संपायला लागली की समोर दुसरे सण आलेले असते.. आणि म्हणुनच
प्रत्येक सणाला आपण अगदी भरपूर उत्साहाने साजरा करायला हवा…!
हो की नाही….!
तीळ आणि गुळाच्या स्नेह गुणांचा सण म्हणजे मकरसंक्रांती…
आजच्या दिवशी कटुताला बाजूला सारून…
आपल्या जुन्या नात्यांना उजाळा देऊया… आणि
आपल्या नवीन नात्यांतील गोडवा वाढवू या…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला…
अपनी सोच को
भले ही नयी रखो…
लेकिन संस्कार तो पुराने ही
अच्छे है…!
गुणवाला इंसान और
फल वाला पेड़ ही झुकता है…
मूर्ख इंसान और सूखा पेड़
कभी नहीं झुकता…!
मान तो चरित्र का होता है…
वरना परछाई भी
इंसान से बड़ी होती है…!
आप जैसे हो वैसे ही रहिए…
क्योंकि हमेशा फोटोकॉपी से
ओरिजिनल का मूल्य
अधिक ही होता है…!
सारे संसार को
जीत सकते हैं…
संस्कार से…!
और जीता हुआ भी
हार जाते अहंकार से…!
क्यों बढ़ाते हो
महत्व किसी का…
तुम घृणा करके…!
क्षमा करके
लज्जित करने का
तरीका भी तो
कुछ बुरा नहीं…!
कोई सुंदरता नहीं होती है
शरीर में…
व्यक्ति के विचार…
कर्म… वाणी… चरित्र…
व्यवहार… और व्यक्ति के
संस्कार… यह सब जिसके
जीवन में है…
वही व्यक्ति संसार का
सबसे सुंदर व्यक्ति है.
अगर आस्था है… तो बंद दरवाजा भी रास्ता है…!
जो इंसान आपका हैं…
वो कभी आपको देखकर
व्यस्त नही हो सकता…
और जो इंसान आपको देखकर
व्यस्त हो जाता है…
वो आपका हो ही नही सकता…!
सहीं में…
ये बचपना भी अनूठा ही है…
दिलो में अँधेरा है… और
दिया मंदिरो में जलाते है…!
अगर हवाएं मौसम की गर्मी को
समाप्त कर सकती हैं…
तो यकीन किजिए कि…
प्रार्थना भी कठिनाई के पलों को
खत्म कर सकती हैं…!
मत उलझिए – हिंदी फोटो सुविचार Good Thoughts In Hindi On Life
जैसी जिसकी नियत रहती है…
वैसी ही वो अपनी कहानी रचता है…!
पक्षियों के लिए कोई बंदूक रखता है…!
तो कोई पक्षियों के लिए पानी रखता है…!
मत उलझिए इस खोज में की…
ईश्वर है या नहीं है…
अपनी खोज यह रखिये की…
हम स्वयं इंसान है या नहीं है…
प्रतिदिन स्मरण करने योग्य शुभ सुंदर मंत्र – संग्रह
🌞 सूर्यनमस्कार 🌞
ॐ सूर्य आत्मा जगतस्तस्युषश्च आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । दीर्घमायुर्बलं वीर्यं व्याधि शोक विनाशनम् सूर्य पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम् ॥
वेळ मिळाल्यावर बोलणारे नाही….
तर मन झाले म्हणून बोलणारे
कुणी तरी जीवनात असावे…!
🙏
Suvichar Status Marathi | Sunder Vichar | सुविचार मराठी
जर तुम्हाला माणसे ओळखायचीच असतील…
तर त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागून बघा…
लगेच कळतील…!
🙏
कचऱ्यात फेकलेले जेवण
हेच दर्शविते की…
माणसाचे पोट भरले की….
माणूस आपली लायकी विसरतो…!
🙏
इतके ही आम्ही त्रासदायक नव्हतोच
जितके आमच्यावर दोषारोपण केले गेले…
वेळ थोडी वाईटच होती…
आणि राहिलेली अग्नी पेटवणारे…
आपल्यातलेच होते….!
🙏
आग लावणाऱ्यांना काय माहित…
जर हवेची दिशा बदलली…
तर राख त्यांची पण होऊ शकते…!
🙏
जीवनात फक्त…
दुसऱ्यांचे चांगले बघायची सवय ठेवा…
तुम्हाला देव, काहीच कमी पडू देणार नाही….!
🙏
तोच माणूस मोठा असतो….
जो आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना
लहान असल्याची जाणीवच होऊ देत नाही…!
🙏
Suvichar Status Marathi | Sunder Vichar | सुविचार मराठी
असे नेतृत्व करा की….
जरी सत्ता तुमची नसली…
तरी लोकांनी मात्र…
राजा तुम्हालाच म्हटले पाहिजे…!
🙏
जर काळजी करत रहाल…
तर स्वतः च जळाल…!
जर काळजी न करताच रहाल…
तर जग तुमच्यावर जळेल…!
🙏
जरी वेळ दिसत नसली…
तरीही खूप काही दाखविते…!
भरपूर जण आपलेपणाही दाखवितात…
परंतु आपले कोण आहेत…
हे आपल्याला वेळच दाखविते…!
🙏
लहान लहान चुकांना
नेहमी सुधारण्याचा प्रयत्न करा…
कारण माणसाला ठेच डोंगराने नाही…
तर लहान दगडानेच लागते…!
🙏
आपल्या कामात इतके व्यस्त रहा की…
अपयशाला ही तुमच्या जीवनात यायला
तुमची परवानगी घ्यावी लागणार…!
🙏
समोर चालत असतांना….
मागुन हाक मारणारे कुणी तरी असावे…!
स्वप्नांच्या मागे धावत असतांना….
साथ देणारे कुणी तरी असावे…!
डाव मांडत असतांना…
त्या डावाला कुणी तरी मोडणारे असावे…!
डाव विस्कटलेला असतांना….
परत सावरणारे कुणी तरी असावे…!
डोळे भरून आले असतांना…
डोळ्यांना पुसणारे कुणी तरी असावे…!
मरणाच्या वाटेवर असतांना….
जगण्याची आस लावणारे आणि
आपल्या प्रेमात पाडणारे…..
कुणी तरी नक्कीच असावे…!
🙏
Suvichar Status Marathi | Sunder Vichar | सुविचार मराठी
जी व्यक्ती वेळेच्या नुसार बदलते
ती व्यक्ती कधीच आपली नसते…!
परंतु जी व्यक्ती वाईट वेळेतही…
आपल्या बरोबर सावली सारखी
उभी असते, तीच व्यक्ती…
खरोखर आपली हक्काची असते…!
🙏
आपला हक्क एखाद्यावर तितकाच दाखवा…
त्याला जितका सहन होईल…!
जर जास्तीच आपलेपणा दाखविले…
तर तुम्ही चुकीचे सुध्दा ठरु शकता…!
🙏
नेहमीच असे म्हटले जाते की…
स्त्री ही आपली खरी वय कधीच सांगत नाही…!
परंतु खरे असे आहे कि तिला आपल्या वयाचा
हिशोब हा लावताच येत नाही…!
कारण स्त्री ही स्वतःसाठी खूपच
कमी जगलेली असते…!
🙏
स्त्री ही आपल्या
पूर्ण जवाबदारी सकट घेते भरारी…
कसलीही तक्रार नाही…
कसलाही थकवा नाही….
🙏
किती दिवसांचे हे जीवन असते,
आज असलेले अस्तित्व उदयाला नसते
म्हणूनच या जीवनाला जगावे हसून-खेळून
कारण जगात उदयाला काय घडेल
हे तर कुणालाच माहीत नसते….!
🙏
परिस्थितीने आपले चटके बसविल्या शिवाय
आपल्या मनस्थितीत बदल येत नाही…!
🙏
Suvichar Status Marathi | Sunder Vichar | सुविचार मराठी
मैत्री इतकी घट्ट असावी की…
जरी एका मित्राची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली…
तरी बाकीच्या मित्रांना टेस्ट करायची
गरज पडलीच नाही पाहिजे…
🤯😕
मुकाट्याने एम्बुलेंसच्या आत जाऊन बसायचे…!
😂😂😂🙏
आपले ध्येय इतके मोठे ठेवा की…
त्याला गाठतांना वाटेत येणाऱ्या अडचणी
नुसत्या फिक्या वाटतील….!
🙏
मृत्यू कडून एक दिवस तर हरायचे आहेच…
तो पर्यंत जीवनाला
जिंकूनही घेता आलेच पाहिजे…!
🙏
मोठेपणा दाखवून काहीच मिळत नाही…
माणसे कमवायला माणुसकीच लागते…!
🙏
स्वतःसोबत लढण्यासाठी तैयार हो…
कारण जगाला तेव्हाच जिंकता येते..
जेव्हा तू स्वतःला ओळखशील…!
🙏
जीवनात केवळ
दुसऱ्याचे चांगले बघायची सवय ठेवा…
ईश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही…!
🙏
गरीबाच्या सोबत बसलात म्हणून…
आपले विचार काही गरीब होणार नाही…!
तसेच श्रीमंताच्या सोबत बसलात म्हणून…
आपले विचार श्रीमंत होणार नाही…!
आपले विचार आणि आपली नियत
यांची घट्ट मित्रता असते…!
🙏
Suvichar Status Marathi | Sunder Vichar | सुविचार मराठी
सुविचार-जीवन-सुंदर-विचार-vb-marathi-suvichar
आपण स्वभावाने नम्र असणे…
हे खुपचं चांगली गोष्ट आहे.
परंतु जिथे प्रश्न आपल्या
स्वाभीमानाचा असेल…
तिथे कधीच नरम पडायचे नसते.
😊😊😊
जेव्हा प्रश्न हा स्वाभिमानाचा असेल ना…
तेव्हा नाते आणि मैत्री सोडुन देणेच चांगले.
😊😊😊
मी आता अपेक्षा ठेवणे बंद केले आहे…
जेव्हा तुम्हाला बोलायला वाटेलच
तेव्हा बोला…!
😊😊😊
आपले जीवन
इतके आनंदी आणि सुंदर बनवा…
की एखाद्या निराश झालेल्या माणसाला
तुम्हाला बघुन जगण्याचा त्याला
नविन उत्साह मिळाले पाहिजे…!
😊😊😊
आपली सकारात्मक दृष्टी ही
आपले जीवन घडवण्याची शक्ती ठेवते.
त्या बरोबरच जर प्रबळ इच्छाशक्ती असेल
तर मग काहीच अशक्य नाही…!
😊😊😊
नेहमी दृष्टी आणि दृष्टीकोन
चांगला असायला पाहिजे…!
😊😊😊
जर कुणाचे
चांगले करायचे जमत नसेल…
तर कुणाचे वाईटही करू नका.
कारण वेळ ही सगळ्यांचीच येते…
कारणे फक्त वेगवेगळे असतात…!
😊😊😊
नेहमी आपले मन चांगले ठेवा
कारण हिशोब हा कर्माचा होतो…
कमाईचा नाही…!
मनमोकळे आणि मनासारखे जगता आले तर
चार दिवस जगलेले जीवन
शंभर वर्षे जगल्याची अनुभुती देते…!
😊😊😊
सुविचार [ जीवन ] सुंदर विचार – Good Thoughts In Marathi On Life
या संकेत स्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी काही गणित सुविचार मराठीत,
तसेच एका वाक्यात पूर्ण होणारे पण जीवनाचा अर्थ सांगणारे
मराठी प्रेरणादायक सुविचार, लहान सुविचार मराठी,
छोटे सुविचार मराठी, घेऊन आलो आहे.
हे एका वाक्यात मराठी प्रेरणादायक सुविचार
आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी पडतील
आणि प्रेरणादायक ठरतील.
मित्रांनो या सुविचारांना नेहमी नेहमी वाचत राहा….
हे मराठी सुविचार आयुष्य जगायला खूप मदत करतील
आणि आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवतील.
चला मित्रांनो वाचायला सुरुवात करूया
लहान मराठी सुविचारांना
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
एकदा का नात्यांचे गणित
भावनेत अडकले…
नंतर ते शब्दातून सोडवणे
कठीण असते….
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा
प्रयत्न करा.
गरज ही
ज्ञानाची जननी आहे.
जीवनातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.
जर आयुष्याचा पुढचा प्रवास
सुखकर करायचा असेल तर…
काही गोष्टी अगदी हसत मुखाने
मागे सोडून दिलेल्या चांगल्या असतात.
कधी स्वतःसाठी तर कधी दुसऱ्यांसाठी…
स्वतःची तुलना कोणाशीही करू नका
तसे करणे म्हणजे स्वतःचे अवमूल्यन
करणे होय.
एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी
त्याच्या समोर नाही तर त्याच्या जागी
उभे राहावे लागते.
लोकांचे बोलणे कधी मनावर घेऊ नका.
लोकं पेरु विकत घेतांना
गोड आहे का विचारतात आणि
खातांना मीठ लावून खातात.
हसता हसता सामोरे जा आयुष्याला….
तरच घडवू शकाल भविष्याला…..
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही….
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही……!
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
माणूस मना पर्यंत पोहोचला…
तरच नाते निर्माण होते. नाहीतर
ती फक्त ओळखच ठरते….!
असे जगा की आपली उपस्थिती
जाणवली नाही तरी चालेल…..
पण आपल्या अनुपस्थितीची उणीव
नक्कीच जाणवली पाहिजे…!
मोडतोड करायला काही लागत नाही….
परंतु तडजोड करायला मात्र
खूप मोठे मन लागते….!
आयुष्यात सगळेच निर्णय
हे आपले नसतात…..
काही निर्णय हे वेळेचे सुद्धा असतात…!
कामाचा खूप व्याप असतांनाही
आवर्जून काढली जाणारी आठवण
म्हणजेच खरी मैत्री
.
साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे….
क्षमा ही चांगली शक्ती आहे….
विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे…..
आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे.
झाडांची मुळे पाणी मिळेल याची
वाट पाहत बसत नाही.
ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात
वाट मिळेल तिकडे धाव घेतात.
माणसालाही नुसत्या संयमाने
यश मिळत नाही. तर त्या
यशापर्यंत पोहोचण्यासाठी
सतत प्रयत्न करत रहावेच लागतात….
आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो
महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची
आपल्याकडून असणारी गरज…
गरज संपली नाते संपले.
नात्यात नेहमी तीच लोक एकटी पडतात
जी मनापासून नाते जपतात.
चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की
माणसे गमावण्याची वेळ येत नाही.
प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात
निश्चित नाही… पण प्रत्येकाबरोबर
आनंदी राहणे हे मात्र निश्चितच
आपल्या हातात आहे.
खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही
पण मनाने श्रीमंत नक्की बना.
कारण कळस जरी सोन्याच्या असला तरी
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात.
माणसाचे मन उदास झाले की
मग आपल्या हृदयाच्या जवळच्या
माणसांची आठवण येऊ लागते. आणि
त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला
उदासीनपणा कमी होत नाही… म्हणून
जवळची माणसे असणे गरजेचे असते
मग ती नात्यातील असो मैत्रीतील असो
किंवा प्रेमातील असो.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात
आपण चंद्राच गमावला.
मराठी सुविचार | sunder vichar status | आयुष्यात सगळेच निर्णय हे आपले नसतात ,
Good Thought In Marathi
कठीण रस्तेच तुम्हाला
सुंदर ठिकाणी
पोहचवत असतात.
सांगावे कसे कळत नाही…..
गणित काही जुळत नाही…..
वीतभर पोट…..
टीचभर मन….
काही केल्या भरत नाही.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
जीवनाचा गणित सोडवतांना
सांगा काय करायचे….!
चिन्ह तर सगळेच दिसतात
नेमके गुणायचे की भागायचे….
काही वेळा खर्चाचे गणित असे
अवघड येते….
आपण करतो बेरीज आणि सर्व काही
वजा होऊन जाते….!
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
किती क्षणांचे जिवंत असते….
आज असते तर उद्या नसते….
म्हणूनच ते हसत हसत जगायचे असते.
कारण इथे कुणी कुणाचे नसते.
जाणारे दिवस जात असतात….
येणारे दिवस येतच असतात.
जाणार्यांना जपायचे असते….
येणार्यांना घडवायचे असते. आणि
आयुष्याचे गणित सोडवायचे असते.
गणित सुविचार मराठी | प्रेरणादायी सुविचार मराठी | सुंदर विचार
जर आवड आणि आत्मविश्वास असेल
तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
जर अचूकता पाहिजे आहे
तर सराव खूप महत्वाचा असतो.
सुंदर विचार –
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन होण्यासाठी..
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
कितीतरी उत्तरे अपूर्ण राहतात जीवनाचं गणित सोडवतांना..
कधी आळसही कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरतांना..
मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिक्रिया [ Comment ] आमचा उत्साह वाढवतात.
आणि आम्ही केलेले परिश्रमाला यश आले, असे आम्हाला वाटते.
तुम्हाला हे गणित सुविचार मराठी , प्रेरणादायी सुविचार मराठी , सुंदर विचार ,
जीवनावर आधारित सुविचार , कसे वाटले हे आम्हाला comment करून
नक्कीच कळवा.
Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – व्यंग कहाणी – कथा – Marathi Story
कसलीही चेष्टा करावी. परंतु…. ती फक्त गंमत किंवा मस्करी म्हणूनच…
एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे किंवा त्या व्यंगाचा उल्लेख करून
चारचौघांत त्याचा अपमान करणे हे चुकीचे असते…
ते सभ्यतेचे लक्षण तर नाहीच.
तरीपण जर एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर
उलटूही शकते…! याचे नेहमी भान ठेवावे.
आपला विशाल एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता,
तेवढ्यातच समोरून रजनी येतांना दिसली. ती थोडीशी
एका डोळ्याने तिरळी होती.
विशालचा स्वभाव मुळातच कडू होता… त्यात थोडे तिरळे बघणारी
रजनी समोरून आलेली पाहून विशाल म्हणाला… काय रजनी…!
कसे काय… सगळे ठीक आहे ना…? कुठे चालली आहेस…?
आणि हो… तुला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात असे म्हणतात….
खरे आहे का…?
रजनीच्या लक्षात आले की… विशाल आपली चेष्टा करीत आहे…!
हा आपल्याला हिणवत आहे…! सगळे लक्षात येताच रजनी म्हणाली….
हो खरे आहे हे…! आता तू हेच बघ ना… तुला तर दोनच पाय आहेत ना….?
परंतु मला ना… तुला चार पाय असल्याचे दिसत आहे…!
तात्पर्य : कधीही दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. तसेच त्याचा उपहासही करू नये.
Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – मोठेपण – Good Thoughts In Marathi On Life
Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – व्यंग
जगप्रसिद्ध विद्वान… तत्त्ववेत्ता…. म्हणून मैक्स मूलर यांना ओळखले जाते.
ही कथा त्यांच्याच जीवनातील आहे.
ज्या महाविद्यालयातून मैक्स मूलर यांनी शिक्षण घेतले होते…
त्याच महाविद्यालयात नंतर त्यांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली.
आपण ज्या महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेतले… त्याच ठिकाणी
आपल्याला शिकविण्याचे महान कार्य करायला मिळणार आहे याचा त्यांना
खूप खूप आनंद झाला होता. आणि त्या आनंदाच्या भरातच त्या दिवशी
ते आपले पदभार सांभाळायला गेले.
ते महाविद्यालयात आले आणि आपल्या खुर्ची समोर येऊन उभे राहिले.
काहीवेळ त्या खुर्चीकडे पाहत राहिले… आणि नंतर तिथल्या शिपाई कडून
दुसरी खुर्ची मागविली… व त्या खुर्चीच्या जवळच ठेवली…! आणि त्या
दुसऱ्या खर्चीवर ते बसले. कारण त्यांनी विचार केला की…
आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना या खुर्चीवर आपले
प्राचार्य बसत होते. आणि आजही आपण तितके मोठे झालो नाहीत…
आणखीन आपणाला भरपूर शिकायचे आहे.
तात्पर्य : आपण कितीही मोठे झालो… तरीही आपले पाय जमिनीवरच असू द्या. त्यामुळे आपली विद्वत्ता… यश… आणखीन खुलते…!
ईश्वर कसा आहे….? याचे खूपच सुंदर वर्णन आचार्य विनोबांनी केले आहे.
आचार्य म्हणतात की… भगवंत हा अगदी आपल्या मोठ्या प्रतिष्ठीत
पाहुण्यासारखा आहे.
जसा एखादा आपला पाहुणा दारात उभा राहतो… दारावर टकटक करतो….
परंतु जो पर्यंत आपण दार उघडून आत या म्हणत नाही…
तो पर्यंत पाहुणा आत येत नाही….! तसाच ईश्वर सगळीकडे आहे…!
फक्त ईश्वर हा तुमच्याच दारात उभा आहे… असे मुळीच नाही….
ज्या प्रमाणे सूर्याची किरणे तर सगळीकडे पसरलेली असतात…
परंतु बंद दारातून आत येऊ शकत नाहीत. त्यासाठी जरी दाराला
केवळ लहान का होईना फट असेल… थोडेसे दार उकूळ असेल…
तरी त्यातून प्रकाशाचे दूत घरात प्रवेश करतात.
या सारखेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजेच…
मनाचे दार उकूळ करणे आहे. त्या दिनानाथ ला आव्हान करून
बोलवण्यासारखेच आहे…!
ईश्वर… गुरु…. प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यांत एवढी शक्ती असतेच
आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतोच. परंतु भगवंत
न बोलवीता आलेल्या पाहुण्यासारखा दारात उभा असतोच.
असे भगवंताचे स्वरूप मांडून आचार्य विनोबां यांनी प्रार्थनेचे
महत्व समजवून सांगितले आहे.
तात्पर्य :
या चराचरतील दिव्य शक्तीसाठी आपल्या मनाची दारे
उघडी ठेवल्याशिवाय दैवी स्पर्धांचा अनुभव घेणे अवघडच आहे.
बोधकथा – मातृभाषा आणि संस्कार – Moral Story In Marathi
आज एक विचार माझ्या वाचनात आला… आपल्या पाल्यांना
मातृभाषेतूनच शिक्षण द्या. हे शिक्षण अखेरपर्यंत टिकेल.
तसा हा विचार अनेक विचारवंतांनी
सांगितलेला आहे असे त्या लेखात लिहलेले होते…!
जरी असे असले तरीही आपण आपल्या अहंकारापायी
आपल्या मुलांना परभाषेतूनच शिक्षण देतो.
एक बहुभाषिक माणूस एकदा नाना फडणवीस यांच्याकडे गेला…
आणि म्हणाला की… साहेब मला सोळा भाषा अगदी उत्तम प्रकारे येतात.
माझी खरी मातृभाषा कोणती आहे… हे आपण ओळखून दाखवाल काय…?
यावर नाना फडणवीस म्हणाले, मी आपली मातृभाषा नक्कीच
ओळखणार…. परंतु आता दरबारात महत्वाचे काम आहे…
त्यामुळे आज तर शक्य नाही, पण मी उद्याला नक्की सांगतो.
मी तुमचे भाषा ओळखण्याचे आव्हान स्वीकारत आहे.
रात्रीला नानांनी त्या बहुभाषिक व्यक्तीला पोटभर जेवायला दिले…
जास्त जेवण केल्याने त्या व्यक्तीला गाढ झोपी आली.
मध्यरात्रीला तो गाढ झोपेत असतांना नाना त्याच्या जवळ गेले…
आणि मटकाभर थंडे पाणी त्याच्या अंगावर टाकले….
यावर तो व्यक्ती मोठ्याने कानडी भाषेत ओरडत उठला….!
अहो नाना… हे आपण काय केले…?
यावर नाना फडणवीस त्याला म्हणाले… महोदय…
आपली मातृभाषा कानडी आहे…
तो बहुभाषिक व्यक्ती एकदमच आश्चर्य चकीत झाला.
तात्पर्य :- मातृभाषा आणि तिचे संस्कार आपणाला अखेरपर्यंत सोबत असतात…!
मराठी बोधकथा – आपण उपकार कुणावर करावे…? | Moral Story In Marathi
goat – मराठी बोधकथा – आपण उपकार कुणावर करावे – Moral Story In Marathi
एका जंगलात एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या गुहेतच
पिल्लांना ठेवून स्वतः शिकार करण्यासाठी जंगलात
लांब निघून जातात.
ते वाघ आणि वाघीण तीन दिवस आपल्या गुहेत परत येतच नाही.
गुहेतील पिल्लांना खूप जोराची भूक लागलेली असते….
पिल्लांची भुकेची कलकल जवळच चरत असलेल्या शेळीला
ऐकायला येते.
शेळीला पिल्लांची खूप दया येते…! आणि शेळी वाघिणीच्या पिलांना
आपले दूध दुध पाजते…! दुध पिऊन गुहेतील पिल्लांच्या जीवात जीव येते…!
शेळी आता दरदिवशी येऊन त्या पिल्लांना दूध पाजते…! तिसऱ्या दिवशी
पिल्ले पोट भर दुध पिऊन मस्ती करत असतात… तेवढ्यातच
वाघ आणि वाघीण आपल्या गुहेकडे परत येतात तर त्यांची नजर
समोर असलेल्या शेळीवर जाते…
शेळीला पाहताच दोघेही खूप आनंदी होतात… आणि आयती शिकार मिळाली
ह्या आनंदात शेळीवर वाघ हल्ला करणार…. इतक्यातच वाघाची पिल्ले
सांगतात…
आपल्या दोघांच्या गैरहजरीत या शेळीने आपले दुध पाजून आम्हाला
जिवंत ठेवले…! जर ही नसती तर आम्ही तुम्हाला जिवंत मिळालेच नसते…!
आई – बाबा या शेळीचे आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहे…!
कृपया आपण तिला मारू नका.
पिल्लांचे म्हणणे एकूण वाघ – वाघीण खूप आनंदी झाले आणि शेळीला म्हणाले…
आम्ही तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही… आता तू अगदी निर्भिकपणे…
मजेत या जंगलात एकटी वावरू शकतेस…! आता तुला कुणाचीही तुला त्रास
देणार नाही. हे मी तुला वचन देतो…! वाघाचे असे वचन दिल्यावर
ती शेळी आता जंगलात हिमतीने कुठेही फिरायला लागली….!
एकदा तर त्या शेळीला वाघाच्या पाठीवर उभी होऊन उंच झाडांची
पाने खातांना एका कबुतराने बघितले आणि अगदी आश्चर्याने कबुतर
शेळीला या चमत्कारा बद्दल विचारतो…
शेळी कबुतराला घडलेली सर्व गोष्ट सांगते… उपकाराचे महत्व कबुतराला
समजले… आणि आपण ही कुणावर तरी उपकार नक्की करणार
असे त्याला त्याने आपल्या मनात ठरवले.
एकदा कबुतर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले चिखलात
फसलेली दिसली…
ती चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती… परंतु त्यांना
यश येत नव्हते… आणि ते चिखलात आणखीन फसत होते…
हे कबुतराच्या लक्षात येताच त्याने उंदराच्या
पिल्ल्यांना चिखलातून बाहेर काढले…
उंदराची पिले चिखलाने भरलेली होती आणि थंडीने कुळकुळत होती…
कबुतराने त्यांना आपल्या पंखात घेऊन काही वेळ ऊब दिली.
नंतर आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुतराने उंदराच्या पिल्लांचा
निरोप घेतला आणि आकाशात उडण्याचा प्रयत्न केला…
परंतु कबुतराला काही उडता येईना…. तो अस्वस्थ झाला आणि त्याने
त्याचे कारण शोधले तर… त्याच्या लक्षात आले की…
उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडले होते.
कबुतर तिथून कसा बसा फडफडत शेळी जवळ
गेला आणि त्याने शेळीला सर्व सांगत विचारले की…
शेळी, तू ही उपकारच केलेस आणि मी ही उपकारच केले…
परंतु आम्हा दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले…?
शेळी मंद मंद हसली आणि गंभीरपणे म्हणाली…
आयुष्यात कधीही उपकार हा वाघा सारख्या मोठ्या स्वभावाच्या
व्यक्तीवरच करावेत…. उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण…
नेहमी आपल्या स्वार्थासाठी… स्वार्थी लोक दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असतात…!
त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधला कि… ते खऱ्याखुऱ्या आणि प्रमाणिक माणसाला सुद्धा
विसरण्यात स्वतःची महानता समजतात….! फक्त मोठ्या स्वभावाचेच…
निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्याऱ्याला लक्षात ठेवतात…!
बोधकथा –व्यर्थचा अभिमान नको…! – Moral Story In Marathi
बोधकथा-व्यर्थचा-अभिमान-नको-Moral-Story-In-Marathi
एका गावात एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीला नेहमीच
असे वाटत असे कि तिच्या जवळ असलेला कोंबडा दररोज सकाळी
आरवतो म्हणूनच या गावात सूर्य उगवतो आणि इथे सकाळ होते.
ही गोष्ट ती गावात ही मोठया अभिमानाने सांगत असे आणि गावकरी
तिला वेडी समजत…!
जे सज्जन व्यक्ती होते ते म्हातारीला वेडी समजून दुर्लक्ष करीत….
पण काही कारटे तिला त्रास देत असत… हळूहळू त्रास देणाऱ्यांची
संख्या वाढत गेली आणि आता ते म्हातारीला सहन होत नव्हतेच…
म्हणून तिने आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
म्हातारीने रात्रीच्या वेळी गावं सोडला आणि आपला कोंबडा सोबतच घेतला
आणि म्हातारी दुसऱ्या गावी जायला निघाली….
तिने विचार केला की… मी या गावातून दुसऱ्या गावी रात्रीला निघतो…
ज्यामुळे कोंबडा या गावात आरवणार नाही… त्यामुळे या गावात
सूर्य निघणारच नाही… मग सगळे गावकरी बोंबलायला लागतील…
तेव्हाच त्यांना समजेल की म्हातारीला त्रास देण्याचे काय परिणाम होतात…!
मग मला शोधत फिरतील… आणि रडत बसतील…!
म्हातारी दुसऱ्या गावात गेली. जाता जाता दुसरा दिवस ही उजाडला…
तिचा कोंबडा ही आरवला. ती ज्या गावात गेली होती… त्या गावात सूर्य ही
उगवला होता.
त्या सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली… हा इथे सूर्य उगवला आहे…
आता माझ्या जुन्या गावात कुठला सूर्य उगवणार…?
सारे गावकरी रडत बसले असतील…
मला छळता काय…? आता भोगा आता आपल्या कर्माची फळे…!
आणि म्हातारी जोरात हसायला लागली…
आपण त्या गावकऱ्यांची कशी जीरवली याचा तिला अभिमान
वाटायला लागला…
परंतु… तिला माहीतच नव्हते की त्या तीच्या जुन्या गावात
आज सूर्य उगवला होता.
तात्पर्य :- हे जग आपल्यामुळेच चालते…. असा व्यर्थचा अभिमान कधीही बाळगू नये.
बोधकथा – असत्य…! – Marathi Moral Story
बोधकथा – असत्य – Marathi Moral Story
एक गरीब शेतकरी आपली केस घेऊन एका नामवंत वकिलाकडे गेला. त्या शेतकऱ्याची
केस तशी साधीच होती. त्यातून त्याला सुटका पाहिजे होती… परंतु… पुरावे… साक्षीदार…
उलट – पुलट तपासणीत शेतकऱ्याला बोलताच आले नसते.
शेतकरी हा गरीब… आणि अशिक्षित होता. वकिलाने यावर एक उपाय काढला.
वकील शेतकऱ्याला म्हणाला… काका…! तुम्ही काही काळजी करू नका…
आणि घाबरूही नका. फक्त तुम्ही मी जसे सांगतो… अगदी तसेच करा.
मी तुम्हाला यातून बाहेर काढतो…
शेतकऱ्याला थोडे बरे वाटले… तो आनंदी झाला…. वकील शेतकऱ्याला सांगायला
लागला की…कोर्टात कोणत्याही प्रश्नांचे उत्तर अजिबात द्यायचे नाही…
तर तुम्ही केवळ आ…आ… असेच बोलायचे…
कोर्टात साक्ष देतांना… शेतकऱ्याने अगदी तसेच केले. त्यावर वकिलाने कोर्टात
स्पष्ट केले की….
हा शेतकरी पूर्णतः अशिक्षित आहे आणि थोडा फार वेडाही आहे…!
अशा तऱ्हेने युक्तिवाद करून शेतकऱ्याच्या वकिलाने केस जिंकली.
शेतकरी आनंदित होऊन आपल्या घरी जायला निघाला… तेव्हा वकील शेतकऱ्याला
आवाज देत म्हणाला… काका थांबा आणि जवळ येवून म्हणाला…
काका….! आपण केस जिंकली आहात… तसेच आपल्याला नुकसाभरपाई ही
मिळालेली आहे…. काका… आपण आता माझी फीस द्या.
शेतकऱ्याने वकिलांकडे अगदी वेड्यासारखे पाहत उत्तर दिले. आ…. आ….
वकील चकित झाला… त्याच्या लक्षात आले की…. आपला खोटेपणा आपल्यावरच
उलटलेला आहे…!
तात्पर्य : असत्य हे माणसावर कोणत्या ना कोणत्या रूपाने उलटतेच…
म्हणूनच जीवनात नेहमी सत्याने वागावे….!
बोधकथा – बुद्धी – Good Thoughts In Marathi – Marathi Moral Story
बोधकथा-बुद्धी Marathi Moral Story- beach-evening-sun-rise
एक योगी श्री रामकृष्ण परामहंस यांना भेटला आणि म्हणाला….
महाराज… मी पाण्यावरून चालत जाऊ शकतो… समोर जी नदी आहे…
या नदीच्या पाण्यावर चालत जाऊन… मी त्या काठावर सहजच पोहचू
शकतो…!
रामकृष्ण परमहंस म्हणाले…. हो का…? तो सिद्ध योगी म्हणाला…..
हो महाराज… परंतु हे साध्य करण्यासाठी मी पूर्ण
चौदा वर्षा पर्यंत कठोर तप आणि साधना केली आहे…!
त्या योगी ने असे सागितल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले….
हा पाण्यावर चालण्याचा चमत्कार तर फक्त आठ आण्यांत हि
होऊ शकतो.
योगी आश्चर्याने विचारतो… कोण करतो….?
रामकृष्ण जी म्हणाले…. या नदीवर एक नाव चालविणारा नाविक आहे.
तो फक्त आठ आण्यांत कोणालाही या पाण्यावरून दुसऱ्या काठावर
पोहोचवितो.
बोधकथा–एकी – Sunder Vichar- Moral Story In Marathi
बोधकथा – एकी – Sunder Vichar- Moral Story In Marathi
एक दोन तोंडाचा पक्षी, एका तळ्यात राहत होता…
एकदा त्याला एक रामफळासारखे गोड फळ खायला मिळाले.
तो फळ त्या पक्ष्याच्या एका तोंडाला खायला मिळाला तर…
पक्ष्याच्या दुसऱ्या तोंडाला त्याचा खूपच हेवा वाटला… आणि
त्याने पहिल्या तोंडाला अर्ध्या फळाची मागणी केली…
त्यावर पहिला तोंड त्याला म्हणाला… अरे… या फळाला
तू खाल्लेस काय…. आणि मी खाल्ले काय… शेवटी
आपला पोट तर एकच आहे…!
तेव्हा हे अर्धे फळ… मी आपल्या बायकोला देतो.
त्या पहिल्या तोंडचे हे असे बोलणे ऐकून दुसऱ्या तोंडाला
खूपच वाईट वाटले…! आणि त्या दिवसापासून तो तोंड
निराशही राहायला लागला…
असाच एक दिवश, एक खूपच विषारी फळ दुसऱ्या तोंडाला मिळाले.
ते बघितल्यावर पहिल्या तोंडाने ते नाही खाण्याचा सल्ला दिला…
परंतु…. मागील वेळच्या रागामुळे दुसऱ्या तोंडाने त्याचा सल्ला
ऐकलाच नाही…. आणि त्याने ते फळ खाल्ले…
शेवटी जे व्हायचे तेच झाले. तो दोन तोंडी पक्ष्याचा मृत्यू झालाच.
तात्पर्य :- एकीने राहण्यातच गोडी असते…! त्यात विरोध…. भांडण मुळीच होऊ देऊ नये.
बोधकथा – स्वभाव आणि छंद – moral story in marathi
बोधकथा – स्वभाव आणि छंद – Moral Story In Marathi
अनेकदा आपल्याला समानशीले व्यसनेषु सख्यम् म्हण ऐकायला मिळते…!
व याची कृती ही आपल्याला समाजात वावरतांना दिसून येते.
याच म्हणीचा दाखला देणारी ही एक बोधकथा.
अगदी एका साध्या संवादातून हा बोध आपल्याला मिळेल.
एकदा मोठ्या प्रलयकारी पुरात नदीच्या वाहत्या पाण्यातून दोन भांडी वाहत जात होतो…
त्या दोन भांड्यात एक भांडे पितळेचे होते… आणि दुसरे मातीचे होते मातीचे.
त्या मोठ्या पुरातुन वाहता – वाहता ते दोघेही आपसात बोलत चालले होते…
पितळीचे भांडे, मातीच्या भांड्याला म्हणाले… अरे… इतका लांबून का जात आहेस….?
माझ्याजवळ ये ना…! आपण दोघेही हातात हात घालून जाऊया…
बघ मग, कशा छान आनंद होतो ते… मस्त आनंद येईल जवळ ये तरी…!
मला ही तुला जवळून डोळे भरून पाहता येईल…
तसेच या प्रलयकारी मोठा वेग असलेल्या पाण्यापासून तुझा बचाव ही करता येईल.
पितळेच्या भांड्याचे कृतज्ञता व्यक्त करीत मातीच्या भांड्याने म्हटले की…
मी तुला विनंती करून सांगत आहे की… तू माझ्याजवळ नको येऊ….
मला सगळ्यात जास्त तुझीच भीती आहे…. कारण,
जर तुझा थोडासही मला धक्का लागला…. तर माझे तुकडे – तुकडे होतील…
तुझ्या आणि माझ्या शरीराचा भाव वेगवेगळा आहे….!
तात्पर्य : वेगवेगळ्या स्वभावाचे… आणि छंदाचे लोक एकत्र कसे काय येणार…?
Moral Story In Marathi – मराठी बोधकथा – कहाणी संग्रह
बोधकथा – कर्तृत्वाचा गर्व – Moral Story In Marathi
एकदा सहदेव महाराजांना, आपल्या बुधाजी ने घरी आणले.
त्यांची आपल्या शेतावरच्या बंगल्यात राहण्याची व्यवस्था करून दिली…
शेतावरील बंगल्यात महाराजांची पूजा – अर्चना ध्यान – धारणा सगळे
एकदमच चांगले चालत होते.
एक दिवश सकाळी – सकाळी बुधाजी, सहदेव महाराजांसोबत…
आपल्या शेताच्या बांधावरून चालले होते… बुधाजी महाराजांना
आपली स्वतःच्या कष्टाने बनवलेली शेती दाखवित होता.
एवढा मोठा शेत मी एकट्यानेच उभा केला आहे…
तसेच खूप चांगल्याप्रकारे हा संपुर्ण शेत मी एकटाच सांभाळत आहे….!
हे थोड्या अभिमानाने महाराजांना दाखवित होता.
हे महाराजांच्या लक्षातही आले होते…
महाराज शांतपणे म्हणाले…
बुधाजी तुझा एवढा मोठा शेत मला बघणे शक्य नाही….
तू असे कर… हा संपूर्ण शेत मला नकाशावर दाखव ना.
बुधाजी नकाशावर दाखवायला तयार झाला…
आणि घरी आल्यावर संपूर्ण शेताचा नकाशा काढला…
तसेच नकाशात माप ही टाकले… आणि संपुर्ण शेताचा नकाशा
तयार केला… त्यात आपले शेत दाखविले…
सहदेव महाराजांनी नकाशा बघितला व आपल्या हातात एका सुईला
घेत म्हणाले… बुधाजी या जगाचा जो अफाट पसारा आहे…
त्यात आपली पृथ्वी ह्या सुईच्या टोका एवढी आहे…!
त्यातच आपला देश… राज्य… जिल्हा… तालुका…. आणि शेवटी तुझे हे गाव….
आता बुधाजी या गावातील तुझी शेती मला दाखव तर…
हे महराजांचे बोलणे ऐकल्यावर बुधाजी लज्जित झाला….
क्षणातच त्याचा गर्वाचा नायनाट झाला…!
तात्पर्य : जर कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच असतो… आणि नम्रता बाळगली तर… उन्नती निश्चित असते…!
Hindi Story - बाज और कौवा - हिंदी प्रेरणादायक कहानी
Hindi Story | बाज और कौवा हिंदी प्रेरणादायक कहानी
किसी को निचा दिखाने का… बाज के स्वभाव में नहीं है…! वो तो हिंमत रखता है…. ऊँची उड़ान को भरने का…!
सिर्फ एक कौवा ऐसा पक्षी जो है…. जो आसमान में उड़ते हुए बाज की पीठ पे बैठकर अपनी चोच से बाज की गर्दन को
काट सकता है…!
ये और बात है की…. इसका बाज बिलकुल भी जवाब नहीं देता
और नाही उस कौवे से लड़ता है….!
बाज कौवे के साथ लड़ाई करने में अपना समय और अपनी
शक्ति को नष्ट नहीं करता….! बाज केवल अपने पंखो को
पूरा खोलता है… और आकाश में और ऊँची उडान भरता है…!
Hindi Story
अपनी शक्ति को बाज कौवे से लड़ाई करने में ना लगाते हुवे…
उस शक्ति को आकाश में ऊँची से ऊँची उड़ान भरने में लगाता है….!
बाज की उड़ान जैसे – जैसे ऊँची – ऊँची होती जाती है….
कौवे को उस ऊंचाई पे सांस लेने के लिए उतनी ही
मुश्किल होती जाती है…! और आखिर में ऑक्सीजन
की कमी होने की वजह से कौवा नीचें गिर जाता हैं…!
अतः जीवन में कभी कभी कुछ झगड़ों का… उनकी तर्कों का…
उनकी टिका – टिप्पनी… और उनके तिरस्कार का प्रतिउत्तर
देने की जरूरत नहीं होती है…!
सिर्फ आप अपनी सफलता की ऊँचाइयों को बढाइये….
आपके विरोधी स्वतः ही गिर जायेंगे….!
41+ Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
नमस्कार मित्रांनो
जशी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीला लढा देत आनंदी राहून जगणे
म्हणजेच जीवन…!
या जीवनरूपी वाटेवर आपण किती आणि कशा प्रकारे आपले जीवन जगलो….?
जेव्हा हा प्रश्न मी आपल्या जीवनाला विचारला तेव्हा तो केवळ अगदी निरागस
मनाने माझ्याकडे पाहतच राहीला…!
का कोण जाणे ते असे माझ्याकडे का पाहत आहे…?
कधी जीवन आपल्या मनासारखे जगताच आले नाही… हा काय म्हणेल…?
तो काय म्हणेल…? या प्रश्नावरच खुप जण आपले जीवन काढतात….!
याप्रमाणेच जीवन व्यतीत करावे लागते.
समाजात रहायचे आहे म्हणून समाज म्हणेल तसे वागावेच लागते…!
अन्यथा समजातून बाहेर काढून टाकायची धमकी…. त्या समाजाची…!
एकीकडे जीवनात खुप मोठे शिखर गाठायचे असते… आणि दुसरीकडे
या समाजाला हे आणि ते असे अनेक गोष्टीवर उत्तरे द्यावी लागतात….!
जेव्हा असे बोलले जाते की…. तुला हे जमणारच नाही….
यात तू आजिबात पडूच नको…
तेव्हा मन एकदम दुबळ्या अवस्थेत खचून पडते…
समाजाने पाठींबा द्यायचा सोडून… फक्त आणि फक्त मागे खेचायचेच बघतो…!
जमत तर सगळेच असते…. परंतु… या समजामुळे तो मागे पडून जाते…!
मग काय जीवनाच्या शेवटी प्रश्न उभा राहतो की….
या जीवनाच्या वाटेवर तू कसा जगला…? आणि किती जगाला…?
जेव्हा हा प्रश्न पडतो तेव्हा मन अगदी खिन्न नजरेने तसाच अवस्थेत
आपल्याकडे पाहत राहते…!
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
बुद्धिबळ-Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
आपण लोकांच्या जीवनात नाही… तर आठवणीत राहत असतो…! त्यामुळे जितके होईल तितके दुसऱ्यांना सुंदर क्षण देण्याचे प्रयत्न करा.
सुविचार-छान-विचार-मराठी-good-thoughts-in-marathi
नावापुरते नाते आणि गरजेपुरती माणसे जीवनात नसलेलीच बरी.
सुविचार-छान-विचार-मराठी-good-thoughts-in-marathi
पेन किलर खाऊन फक्त शरीराचे दुःख कमी होते.. मनाचे नाही…!
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
आपली चूक नसतांनाही…
फक्त वाद थांबावा…
या करिता घेतलेली माघार…
हे संयमाचे फार मोठे प्रतिक आहे….!
माणसाकडूनच चुका होत असतात
त्याला त्याच्या चुका दाखवून
सुधारण्याची संधी द्या…
जर माणसाच्या चुकीमुळेच
त्याला सोडून देता…
तर जीवनात तुम्ही एकही नाते
टिकवू शकणार नाही. तसेच
एक माणुसही कमावू शकणार नाही.
Best Marathi Quotes On Life || चांगले विचार || Sunder Vichar
Best Marathi Quotes On Life – Sunder Vichar
╭════════════╮
‼ चांगले विचार ‼
🌙💞शुभ सकाळ💞🌙
╰════════════╯
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
विश्वास ठेवा मित्रांनो…
जेव्हा आपण कुणासाठी
काहीतरी चांगले करीत असतो…
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगले घडत असते.
इतकेच की…
ते आपल्याला दिसत नसते.
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
✨ शुभ सकाळ ✨
🌴🌼🍀🌻🍀🌷🏵️🌺🌿🌺🌷
उडत्या पक्ष्यांना
परत यायची घाई नसावी
नेहमी डोळ्यात
नवीन दिशा असावी.
घरट्याचे काय आहे
केंव्हाही बांधता येइल
क्षितिजांच्या पलिकडेही
आकाशात झेप घेण्याची
जिद्द असावी.
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
याचे दु:ख कधीच नव्हते की…
खुप वेळा मला परक्यांनी खडसावले….
परंतु आजही दुःख याचेच वाटते की…
नात्यांनीच अनेक वेळा फटकारले…!
😔
याचे दु:ख कधीही वाटले नव्हते की….
खुप वेळा इतरांनी निंदा केली.
खंत इतकीच कुठेतरी वाटत राहिली की…
घरच्यांनीच आपली खुप शोभा केली…!
😔
याचे दु:ख कधीच वाटले नव्हते की…
खूप वेळा माझा विश्वासघात केला,
दु:ख फक्त याचे वाटले की…
कुणीतरी आपल्यानेच विश्वास घातकी ठरविला…!
😔
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
चूक झाल्यावर साथ सोडणारी माणसे
खूप असतात. परंतु…
चुक कशाला झाली आणि
ती कशा प्रकारे सुधारायची हे
सांगणारी खूप कमी माणसे असतात.
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
समोरील माणसा सोबत
सदैव चांगले वागा.
तो माणूस चांगला आहे म्हणून नाही
तर तुम्ही चांगले आहात म्हणून…!
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
मित्रांनो…
मास्क लावा… अथवा नका लावू….
तुमची मर्जी…
😷परंतु एवढे नेहमी लक्षात ठेवा….
सरकारसाठी तुम्ही फक्त एक
आकडा 1️⃣✅ आहात
पण घरातल्यांसाठी तुम्ही
काळजाचा तुकडा आहात….
🙏😷🌻 शुभ सकाळ – काळजी घ्या 🌻😷
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
एक अशी ओळ
जीला उलटी वाचा किंवा सरळ वाचा
दोन्ही ही खूप छान वाटतात…
आहे जीवन तर मित्र आहेत
😊
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
ताकद आणि पैसा हे आयुष्याचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मुळ आहे.
आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो
पण मुळाशिवाय उभे राहूच शकत नाही..
कारण जर मुळ कुजली…
तर मोठ मोठे झाड ही पडून जातात…
म्हणून नाती जपा….
कठीण प्रसंगी तेच कामी येतात….!
🌿 शुभ सकाळ 🌿
🌼🍀🌻🏵️🌿🌺🍀🌷🙏🌹
✍✍✍✍✍✍✍✍
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
वाईट दिवस आल्यावर
कधीही खचून जाऊ नका…
आणि चांगले दिवस आल्यावर
कधीही घमंड करु नका.
कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच
आलेले असतात.
🌹❣️🌹 शुभ सकाळ 🌹❣️🌹
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
काही वेळा आयुष्यात
संकटांचे इतके ढग दाटून येतात की…
जर ते ढग पडले तर आपल्याला ते
पेलावतील की नाही याची शंका येते…
परंतु तुमची वेळ ठरविते
की कोणते ढग पाडायचे आणि
कुठले पुढें पाठवायचे..!
टायमिंग वेळेचे टायमिंग जीवनाचे
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Good Morning Wishes In Marathi
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
आकृती नसली तर आकार बदलतो….
स्वभाव नसला तर व्यवहार बदलतो…
इच्छा पूर्ण नाही झाली तर इथे
“देव” ही बदलला जातो
माणसे चुका करण्यापूर्वी
इकडे तिकडे बघतात
पण…. वरती बघने मात्र विसरतात.
🌺🌺🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺🌺
༺♥༻❀༺♥༻💕
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
माणसाच्या मुखात गोडवा…
मनात प्रेम… वागण्यात नम्रता…
आणि हृदयात गरीबीची
जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी
आपोआप घडत जातात…!
😊👍❤ शुभ सकाळ ❤
💕༺♥༻❀༺♥
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार
रस्त्याचे अंतर ते कितीही असले…
तरी पण ते कसेही पार करता येते.
पण एक दुसऱ्या च्या मनात
पडलेल अंतर पार करने
फार कठीण असते.
सगळ्यांचे जीवन व्यस्त असते…
परंतु त्या जीवनात दोन क्षण तरी
प्रेमाने जगावे.
ते सगळ्यात स्वस्त असते…
🍃🍂🌺🌸🌸🍃
Good Morning
Have a Great Day
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂