Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
आपल्या डोळ्यांना आपल्या मनाला
कोणत्याही क्षणी कोणतीही व्यक्ती
आवडायला लागते.
आपल्याला ती व्यक्ती इतकी आवडायला
लागते की त्या व्यक्ती शिवाय दुसरा विचार
पण नाही करत आपण. आणि खरा खेळ तर
तेव्हा सुरू होते जेव्हा आपण त्या व्यक्तीशी
बोलायला लागतो.
पण हे महत्वाचे नसतांना कि,
आपल्याला ती व्यक्ती जितकी
आवडते, तितकेच आपण त्या
व्यक्तीला आवडत असू.
कदाचित ती व्यक्ती आपल्याशी सहज
बोलत असेल, आपल्या मनामध्ये त्या
व्यक्तीबद्दल ज्या भावना आहेत त्या
भावना त्याच्या मनात नसतील.
किंवा कधीकधी काय होते की ती व्यक्ती
हि आपल्याशी तसेच वागते जसे आपल्याला
हवे असते. पण काही वेळानंतर काही
दिवसानंतर त्या व्यक्तीची गरज बदलायला
लागते.
त्या व्यक्तीला कोणीतरी दुसरेच आवडायला
लागते. कदाचित ती दुसरी व्यक्ती त्या
व्यक्तीला इतका महत्व देत पण नसेल….
पण तरीही या व्यक्तीला त्याच व्यक्तीच्या
मागे जायचे असते.
आपण कितीही काहीही केले तरीही
ती व्यक्ती त्याच व्यक्तीच्या मागे जाते.
आणि अश्या वेळी स्वतःला सांभाळणे
खूप कठीण होऊन जाते.
लोकांचे बदलून जाने आजकाल
हे खूप सामान्य होऊन गेले आहे.
कोणी आपल्या सोबत असते आणि
अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये
कोणी दुसरे आले ना…
ते लगेच आपल्याला टाळायला
लागतात. भलेही तो व्यक्ती
त्यांना इतका भाव देत
नसेल, जितका आपण देतो.
तो व्यक्ती त्यांच्यात तितका इंट्रेस
दाखवत नसेल, जितका आपण
दाखवतो. पण तरीही त्यांना त्याच
व्यक्तीच्या मागे जायचे असते.
पण खरे तर आपण आधीच कोणाशी
तरी जुळलेलो आहोत आणि अजून
दुसऱ्या सोबत जुळण्याचा प्रयत्न
करतो. हे कधीच शक्य नसते.
आपण धड ना याचे होऊ शकतो
ना त्याचे होऊ शकतो. आणि
ते लोक जे आधी आपल्याला
एवढा मोठा वेळ देवून… नंतर
आपल्याला टाळायला लागतात
पण नंतर आपल्यालाही त्यांच्याशिवाय
राहण्याची सवय होऊन जाते. आणि
पुन्हा येतात ते आणि पुन्हा सॉरी
म्हणतात. त्यांना त्यांची चूक समजते
पण अशा वेळी त्यांना माफ करणे
तर ठीक आहे. पण पुन्हा त्यांना
आपल्या आयुष्यामध्ये जागा देणे
हे खूप चुकीचे आहे.
कारण लोक आपल्या सवयी तर
बदलू शकतात. पण स्वभाव नाही
बदलू शकत. कशावरून पुन्हा ते
तसे वागणार नाहीत……?
म्हणून त्यांना माफ करा पण पुन्हा
त्यांना ती जागा देऊ नका.
जर तुम्हालाही असेच काहीतरी फेस
करावे लागत असेल ना तर आज
आपण त्याच विषयी बोलणार आहोत.
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला
वाटत असेल ना, हा व्यक्ती आधी
वेगळा होता. पण आता तो तसे
नाही वागत. आता तो तुम्हाला
टाळतो.
काही अडचण नसतांना सुद्धा
आपल्याला टाळतो. कारण
कधी कधी खरंच काहीतरी
अडचणी असतात… त्यामुळे
ते आपल्याला टाळत असतात.
त्यामुळे ती व्यक्ती आपल्याकडे
लक्ष देऊ शकत नाही. पण तसे
नसले…
सर्वकाही बरोबर असल्यावरही
आपल्याला टाळत असेल ना,
तर त्याच्यासमोर असे दाखवणे
बंद करून द्या की, तुम्हाला
त्याची किती गरज आहे.
कारण तुम्ही तसे दाखवले ना
तरी काहीच फरक पडणार नाही.
जर त्याला समजून जाईल कि
अरे मी काहीही केले तरी हे मला
सोडून नाही जाणार, आणि त्याचे
वागणे तो तसेच सुरु ठेवणार.
तुमच्या भावना त्याच्याजवळ दाखवू
नका, कि बघ मी तुझी आताही वाट
बघत आहे. बघ तू मला किती आवडतोस
असे दाखवू नका. कारण कोणतीही वस्तू
एखाद्या व्यक्तीच्या समोर पुन्हा पुन्हा
आली ना तर तो त्या गोष्टीला टाळत असतो.
म्हणून पहिले पहिले एक दोन वेळा
त्या व्यक्तीला दाखवा की तुम्हाला
त्याची गरज आहे. त्यांना सांगा हे
असे तुझे वागणे बरोबर नाही.
पण तरीही त्याने टाळले ना,
मग काही गरज नाही आहे…
काहीच गरज नाही आहे…
त्यांच्याजवळ आपल्या भावना
व्यक्त करण्याची.
जे आहे ना, जे तुम्हाला होतेय ना
ते आपल्या मनात ठेवा. कारण
खरच सांगून काहीच फायदा
नाही होणार.
इथूनच तुम्ही स्वतःला बदलायला
सुरुवात करा.
यानंतर जी व्यक्ती
आपल्याला आवडते ना ती व्यक्ती
घडी घडी ऑनलाईन आहे की नाही
हे तपासत असतो.
पुन्हा पुन्हा पाहणे, त्याचे लास्ट सीन
तपासून बघणे… पण हि गोष्ट ना
आपल्याला सगळ्यात जास्त कमजोर
बनवून टाकते.
आणि जर तो व्यक्ती ऑनलाईन असला
पण तुम्हाला मेसेज करत नसला… तर
हि गोष्ट आपल्याला खूप वाईट वाटते
या गोष्टीने आपल्याला खूप त्रास होतो.
पण जर तुम्ही ठरवले ना एकदाचे कि
नाही दाखवायचे याला माझ्या भावना
आणि मनातूनही असा प्रयत्न करा कि
त्याला विसरून जाण्याचा प्रयत्न करा.
आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित करा.
पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीचे मेसेजेस…
ती च्याट वाचत बसू नका. तुमच्याकडे
त्या व्यक्तीचे फोटो असतील तर तेही
डीलीट करून टाका.
तुम्ही स्वतः जो पर्यंत त्या पासून वेगळे
होत नाही ना तो पर्यंत त्या आठवणी
तुमच्यापासून वेगळ्या नाही होऊ शकत.
आणि या नंतर समजा तुम्ही सगळे शिकून
गेलात.
तुम्ही शिकलात त्या व्यक्ती शिवाय
राहणे आणि अचानक त्याचा मेसेज
आला… फोन आला.. तुम्हाला ती
व्यक्ती भेटली… तर अतिशय
सामान्य वागा त्याच्यासोबत.
समजा त्याच्यासोबत बोलणे झाले
तर अति उत्साहित होऊन बोलू नका.
त्याला असे समजायलाच नको कि
तुम्ही त्याला किती मिस केले आहे.
स्वतः कडून जास्त काही बोलू नका.
जे विचारेल तेच बोला. कारण त्याला
वाटायला हवे कि तुम्ही आपल्या दमावर
आपले आयुष्य जगू शकता.
तुम्हाला गरज नाही आहे कोणाची
आणि जो तुम्हाला टाळतोय त्याची
तर अजिबातच नाही. आणि या नंतर
स्वतःला व्यस्त ठेवणे सुरु करून द्या.
सतत काही ना काही काम करत राहा.
कारण आपण रिकामे असतो ना तेव्हाच
आपल्याला अश्या आठवणी येत असतात.
जर आपले मन एखाद्या कामात गुंतवले ना
तर मग असे नाही होत. म्हणून स्वतःला
कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवा.
कारण जास्त आठवणी आपल्याला रात्री येतात.
कारण त्या वेळी आपल्याकडे कोणताच
काम नसतो. तर अशा वेळी एखादे पुस्तक
वाचायला लागा. बरोबर झोप लागेल तुम्हाला.
तुमचे लक्षही दुसरीकडे जाईल, तुम्हाला
विचार हि नाही येणार. फक्त काहीही
करून तुम्हाला ही टाळायला शिकायचे
आहे, त्याच्या आठवणींना…
तर या गोष्टी नक्की करा.
आणि जर कोणी तुम्हाला टाळत
असेल ना तर तुम्ही त्याला टाळायला
सुरुवात करा. टाळायला शिका.
कधीच कोणासाठी स्वतःचा
आत्म सम्मान गमावू नका.
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
Motivational Thoughts In Marathi
कोणी कसेही वागू द्या.
वेळ बरोबर उत्तर देते
आपल्या मागे कोण काय बोलते
याकडे दुर्लक्ष करायचे असते.
नेहमी लक्षात ठेवा की
तुम्ही पुढे आहात आणि
ते मागे म्हणूनच
ते मागे बोलतात पुढे नाही
*******
हिम्मत करा आणि पुढे जात राहा
कारण टोमणे तर देवाला सुद्धा
सहन करावे लागले होते.
आपण तर साधी माणसे आहोत
*******
प्रत्येक माणसाच्या सहन करण्याला
मर्यादा असते. एखादी व्यक्ती
आपल्याला उलटून बोलत नाही. याचा
अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे. किंवा
तिला बोलता येत नाही असे होत नाही.
*******
दुनिया नाव ठेवण्यात
व्यस्त असते
तुम्ही नाव कमावण्यात
व्यस्त रहा.
*******
चर्चा आणि आरोप हे फक्त
यशस्वी माणसाच्याच
नशीबी असतात.
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे
प्रयत्न करतात. त्यांचे निकाल
लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
*******
प्रयत्न करून चुकलात
तरी चालेल. पण प्रयत्न
सोडू नका. कारण
हिम्मत…. नाही तर
किंमत…. नाही आणि
विरोधक असल्याशिवाय
प्रगती नाही
*******
कोणी तुमचा सन्मान करो
अथवा ना करो, तुम्ही तुमचे
कर्तव्य करत रहा. कारण
जग झोपेत असले तरी
सूर्य उगवायचा थांबत नाही.
*******
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात
कष्टाला पर्याय नाही आणि
कष्ट प्रामाणिक असले की
यशालाही पर्याय नाही.
Motivational Thoughts In Marathi
कोणत्याही परिस्थितीत
माघार न घेणे, हाच आपल्या
यशाचा पासवर्ड आहे.
*******
पैसा नसलेल्या माणसापेक्षाही
ध्येय नसलेला माणूस हा
जास्त गरीब असतो.
*******
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे
हे आपल्या हातात नाही. पण तीच
गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे
प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात.
*******
दुनिया कशी का वागेना आपल्याशी
आपण छानच वागायचे सगळ्यांशी
इतके छान की विश्वासघात करणारा ही
तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी
*******
आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी
कधीही निराश होऊ नका. कारण
सूर्यकिरणे कितीही चटके देत असली
तरी समुद्र कधीही कोरडे होत नाही.
*******
कधी स्वभाव कधी संस्कार
तर कधी वैचारिक फरक
आड येतो.
*******
काही व्यक्ती अशाही असतात
ज्या एकतर परिस्थितीशी
तडजोड करत जुळून घेतात
किंवा शांत राहतात.
*******
शांत राहणे म्हणजे दुबळेपणाचे
लक्षण असते असा खूप लोकांचा
समज असतो. पण संयम सोडून
मनाला लागेल असे बोलण्यापेक्षा
शांत राहून काहीच न बोलणे
कधीही चांगले. त्याने ना मनात
आडी राहते ना नात्यात कटूता येते
म्हणून शांत आणि संयमी राहा. वेळ
बरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतेच.
कोणी कसेही वागू द्या, वेळ बरोबर उत्तर देते |
Marathi Suvichar | Good Thoughts In Marathi |
Quotes In Marathi
नमस्कार मित्रांनो
जेव्हा आपल्याला आपली जवळची व्यक्ती
आपल्याला खूप त्रास देते, आपले मन
दुःखावते तेव्हा त्या व्यक्तीबरोबर कसे
वागावे या विषयावर आपण वरती वाचले आहात.
आणि आता आपण समोर याच विषया
संदर्भात एक वेगळा दृष्टिकोन
बघणार आहोत.
मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती आपले
मन दुःखावते तेव्हा त्या व्यक्तीचे शब्द
आपल्या मनाला लागतात. किंवा
एखादी व्यक्ती आपली चुगली करते
आपले नाव बदनाम करते तेव्हा अशा
व्यक्ती बरोबर कसे वागावे….?
मित्रांनो, सगळ्यात पहिले एक गोष्ट
समजून घ्या. समोरच्या व्यक्तीचा त्रास
आपल्याला तेव्हाच होतो तेव्हा आपण
समोरच्या व्यक्तीला त्याच्या वागण्या
बद्दल प्रतिसाद देतो.
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
आपण प्रतिसादच दिला नाही तर
आपल्याला त्रास होणार नाही
मग या प्रतिसादाची तीव्रता कमी
करण्यासाठी तीन गोष्टी मी
तुम्हाला सांगणार आहे.
या तीन गोष्टी जर तुम्ही
नीट समजून घेतल्या तर
तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या
वागण्याच्या त्रासच होणार नाही
फक्त तुम्हाला विनंती करेल
हि पोस्ट शेवटपर्यंत वाचा
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
पहिली गोष्ट [ कर्म ]
मित्रांनो एक लक्षात ठेवा
आपल्या आयुष्यात जे काही
आपल्या वाट्याला येते….
सुख असो…. किंवा दुःख असो…
यश असो.. किंवा अपयश असो….
हे सगळे आपल्या कर्माची
फळे असतात.
ही जी समोरची व्यक्ती माझ्या
आयुष्यात आली, ती मला आता
दुःख देत आहे ती काही अशीच
चुकून आलेली नाही…. हे
माझ्या कर्माचे फळ आहे.
मित्रांनो ज्या वेळेस हे आपल्याला
समजते, जे काही माझ्या आयुष्यात
घडते ते माझ्याच कर्मांचे फळे आहेत
तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीशी
सामोरे जाण्याची शक्ती मिळते.
आपले 50 टक्के दुःख तिथेच कमी
होते. याचा अर्थ असा नाही की
तुम्ही समोरच्याचे वागणे सहन
करत राहिले पाहिजे.
तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल
तर समोरच्याला प्रतिकार
जरूर करा.
जे मी तुम्हाला वरील भागात
सांगितलेले आहे. पण जर तुम्हाला
कुणाचा पाठिंबा नसेल किंवा तुम्ही
प्रतिकार करू शकत नाही तेव्हा
स्वतःला समजावून सांगा…
.
हे माझ्याच कर्माची फळे आहेत
आणि मला ती भोगाविच लागणार.
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
दुसरी गोष्ट [ अपेक्षा ]
मित्रांनो आपण बऱ्याच वेळा दुःखी
अपेक्षा मुळे पण होतो. कारण….
आपण समोरच्याकडून अनावश्यक
अपेक्षा ठेवून असतो.
समोरच्याने हेच केले पाहिजे
समोरच्याने तेच केले पाहिजे
समोरचा असाच वागला पाहिजे
समोरचा तसाच वागला पाहिजे
आणि ज्या वेळेस आपली एखादी
अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा
आपण दुःखी होतो.
महाभारतामध्ये भीष्म पितामह
युधिष्ठिरला सांगतात अपेक्षा हे
सर्व दुःखांचे मूळ आहे.
जर आपण समोरच्यांकडून
अनावश्यक अपेक्षा ठेवल्या
तर आपल्याला दुःख हे होणारच
म्हणून स्वतःला प्रश्न विचारून बघा
मी समोरच्याकडून अनावश्यक
अपेक्षा तर ठेवत नाही ना….?
Motivational Thought |
नाते तुटल्यावर दुःखी न होता हे करा
तिसरी गोष्ट [ अहंकार ]
मित्रांनो,
तुम्हाला जर छोट्या छोट्या
गोष्टीमुळे त्रास होत असेल तर
समजून जा तुमच्या मध्ये खूप
अहंकार आहे.
मला माहिती आहे हे ऐकल्यावर
तुम्हाला थोडा त्रास होईल पण ही
वास्तविकता आहे.
जेवढा मोठा तुमचा अहंकार असेल….
तेवढ्या लवकर तुम्ही दुःखी व्हाल.
ज्या लोकांमध्ये अहंकार
जास्त असतो. ते खूप
संवेदनशील असतात
अशी लोकं छोट्या छोट्या
गोष्टी मनाला लगेच लावून
घेतात…..!
तुम्ही बघितले असेल जे साधू संत
असतात, त्यांना कोणत्याही गोष्टीचे
दुःख होत नाही. कारण त्यांच्याकडे
अहंकार नसतो.
कोणी त्यांना शिव्या दिल्या किंवा
कोणी त्यांना वाईट बोलले तरी
त्यांना काहीच फरक पडत नाही.
कारण त्यांचा अहंकार खूप पातळ
असतो किंवा त्यांच्यामध्ये अहंकारच
नसतो. तुमची जर कुणी साधी मस्करी
जरी केली आणि तुम्ही दुःखी होत
असाल, तर समजून जा तुमच्याकडे
खूप अहंकार आहे.
ह्या अहंकाराला बाजूला केले
पाहिजे. आणि तो कसा होईल
पूर्ण अध्यात्म हे या अहंकाराला
कमी करण्यासाठीच बनले आहे
सध्या तो विषय मी खोलात घेत
नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जेवढे जास्त ज्ञान तुम्ही
संपादन कराल तेवढा तुम्ही
तुमचा अहंकार कमी कमी
होत जाईल.
मित्रांनो मला पूर्ण खात्री
आहे की, ह्या तीन गोष्टी
तुम्हाला खूप मदत करतील
विचार | जवळची व्यक्ती तुम्हाला जेंव्हा त्रास देते
दुःखी करते तेव्हा या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Also Read :-
नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes On Relationship
Sunder Vichar Status Marathi | Suvichar | नाती सुविचार