Marathi Quotes On Love, प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
नमस्कार मित्रांनो,
या पोस्ट मध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहोत…
काही marathi quotes on love, love quotes in marathi, प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार, आणले आहेत.
हे Love Quotes In Marathi, आपल्याला भावना व्यक्त करायला
नक्कीच मदत करतील.
Marathi Quotes On Love, प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
प्रत्येकाच्या आयुष्यात
अशी एखादी तरी व्यक्ती
नक्की असावी….
जिच्याशी बोलून
सगळी टेन्शन दूर होतील.
प्रेम म्हणजे….
जर समजली तर भावना आहे.
केली तर मस्करी आहे.
मांडला तर खेळ आहे.
ठेवला तर विश्वास आहे.
घेतला तर श्वास आहे.
रचला तर संसार आहे
निभावले तर आयुष्य आहे.
लखलखत्या सूर्यप्रकाशात तर
कुणीही तुमच्यावर प्रेम करेल.
खरे प्रेम ते… जे वादळात देखील
तुमची काळजी घेतील.
तुमच्या नात्याला कधीही
पावसा सारखे बनवू नका…
जसा पाऊस येतो आणि जातो.
तर तुमच्या नात्याला
हवे सारखे बनवा…
जे नेहमी तुमच्या सोबत असेल.
जे कालपर्यंत जे अनोळखी होते….
आज त्यांचा हृदयाच्या
प्रत्येक ठोक्यावर आदेश चालतो.
काच आणि नाती
दोन्ही खूप नाजूक असतात.
दोघांमध्ये इतकाच
अंतर असतो की….
काच चुकीमुळे तुटतो….
तर नाती गैरसमजाने.
एकाच व्यक्तीच्या प्रेमात
अनेकदा पडणे. ही एका
यशस्वी नात्याची व्याख्या आहे.
एखादयाशी हसता हसता
तितक्याच हक्काने रुसता
आले पाहीजे.
समोरच्याच्या डोळ्यातले पाणी
अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसते….
आपल्याला केवळ समोरच्याच्या
ह्रदयात राहता आले पाहिजे.
Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
कोणासाठी जीवनभर थांबणे
म्हणजे प्रेम…
कोणीतरी सुखात असल्याचा
आनंद म्हणजे प्रेम….
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम….
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…..
प्रेम हे
अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला
जगायचे आहे…..!
प्रेम हे
अशा व्यक्तीचा शोध आहे…
ज्याच्या विना आपण
जगूच शकत नाही.
खऱ्या नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे…
कारण जर एखादी सर्वगुण संपन्न
व्यक्ती शोधायला गेलात तर मग
एकटेच राहाल.
तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की…
एखाद नाते तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“ हे नाते एवढा काळ का जपले….?
असे असावे प्रेम…
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम….
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम….
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे.
मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो. कारण….
ते वेड समजुन घेण्यासाठी
कधीतरी मनापासून
प्रेम करावे लागते…!
एखाद्या दिवशी तुम्हाला
एक अशी व्यक्ती मिळेल….
जिच्या मागील गोष्टींची
तुम्हाला काळजी नसेल.
कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत
भविष्यात जगायचे असेल.
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो…..
गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असते….
वाट पाहायला लावणे तेव्हा बरे नसते…
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचे बंधन नसते…
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असते…
एका चुकीमुळे संपते ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करते
ते खरे प्रेम.
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे….
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि
मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या
सुंदर गुलाबासारखे असते…
परंतु त्याचा सुगंध अनुभवायला
आधी त्याच्या काटयांशी
खेळावे लागते…..!
असे जगावे की मरणे कठीण होईल…
असे हसावे की रडणे कठीण होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे…
परंतु प्रेम टिकवावे असे की….
तोडणे कठीण होईल…..!
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा…
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट….
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो…
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
Marathi Quotes On Love | प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि
प्रेम म्हणजे काय असते.
तुम्ही प्रेम कोणावरही करा….
परंतु, ज्याच्यावर कराल
ते अगदी शेवटपर्यंत करा.
कारण प्रेम हे मौल्यवान असते.
कोणावरही इतकेच रागवा की…
त्यांना तुमची कमी जाणवेल.
पण इतकाही राग नका करू की….
ते तुम्हाला विसरून जगणे शिकतील.
नाते हे मनापासून असले पाहिजे….
केवळ शब्दाचे नाही….
रूसवा शब्दात असायला पाहिजे…
मनात नाही.
प्रेमामध्ये वाद नसावा….
संवाद असावा.
राग नसावा…..
अनुराग असावा.
जीव देणे नसावे….
जीव लावणे असावे.
तुमच्यासाठी काय पण नसावे…
तू तिथे मी असावे.
मला फक्त
तुला हसताना बघायचे आहे
जरी मी त्यामागचे….
कारण नसलो तरी चालेल.
ज्या व्यक्तीला
आपण आपले समजून जीव लावतो
ती आपल्या भावनांची कधीच
कदर करत नाही. आणि
जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.
जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि
भांडण नाही झाले तर…
मग ते नाते प्रेमाने नाही….
तर डोक्याने निभाव आहेत…
असे समजून जा.
जीवनात
नाते असणे आवश्यक आहे.
पण त्या नात्यातही जीव असणे
गरजेचे आहे. त्याशिवाय
लग्नाचे वाढदिवस आणि
शुभेच्छा चांगल्या वाटत नाहीत.
लोक म्हणतात की
प्रेम एकच वेळा होते…
परंतु मला तर एकाशीच
अनेक वेळा झाले आहे.
प्रत्येक नव्या गोष्टी
छान असतात. परंतु
तुझ्या जुन्या आठवणी
नेहमी मनाला छान वाटतात.
माझ्यात इतके कौशल्य नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन.
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल…
इतक्या अविस्मरणीय आठवणी
देऊन जाईन.
प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.
Love quotes in marathi
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून
प्रेम करावे.
खूप कठीण नसते
कुणाला तरी समजून घेणे.
समजून न घेता…
काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते….
कुणीतरी आवडणे.
पण खूप कठीण असते
कुणाच्या तरी आवडीचे होणे.
आपला अहंकार दाखवून
नाते तोडण्यापेक्षा….
क्षमा मागून…
नाते निभावणे चांगले आहे.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता…
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून..
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता…
पण ती तुम्हाला भेटत नाही.
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करत आहे..
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागत आहे.
कोणतेही नाते तोडण्याआधी
स्वतःला एकदा नक्की विचारा की….
आजपर्यंत हे नाते का निभावले होते….?
कोणतेही नाते बनवणे
अगदी मातीवर नाते लिहीता येईल
इतके सोपे आहे. परंतु निभावणे
अगदी पाण्यावर पाणी
लिहीण्याइतके कठीण आहे.
आयुष्य हे एकदाच असते….
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते.
आपण दुसऱ्याला आवडतो….
त्यालाच प्रेम समजायचे असते.
Love Quotes In Marathi
प्रेमावर हृदयस्पर्शी सुंदर सुविचार
प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.
एक सांगू….! काही आठवणी…
काही लोक आणि त्यांच्याशी
जोडलेली नाती…. कधी विसरता
येऊ शकत नाही.
जीवनाची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
जीवनातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
नुसत्याच कविता नाही सुचणार
त्या साठी एकदा तरी प्रेम करून बघा..
फुलांतून जसे सुगंध आणि
सूर्यातून जसा प्रकाश येतो
तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून
तुझे नाव येते.
आयुष्यात प्रेम करा….
परंतु प्रेमाचे
प्रदर्शन करू नका.
यदा-कदाचीत असे घडावे…
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावर तरी निस्वार्थी प्रेम करावे.
Moral Story In Marathi - Bodhkatha Marathi - तणाव - बोधकथा
Moral Story In Marathi | Bodhkatha Marathi तणाव | बोधकथा
नक्की वाचा
एक खूपच चांगला मेसेज तुमच्या सोबत शेयर करीत आहे.
बारही महिने कधीही वादळवारे आणि पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात
एका श्रीमंत शेतकऱ्याला घरकामासाठी, घोड्यांची निगा राखण्यासाठी
तसेच घोड्यांचा तबेला स्वच्छ करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मुलगा आला… जो दिसायला खुपच पातळ आणि कमजोर होता.
त्या मुलाने श्रीमंत शेतकऱ्याला नोकरी मागितली. शेतकरी थोडा वेळ मुलाकडे
बघत राहिला आणि म्हणाला… “अरे बाळा तू काय काम करू शकणार….?” असे
त्या मुलाला थोडे टाळण्याच्या सुरात शेतकऱ्याने विचारले.
त्यावर मुलगा म्हणाला, ” साहेब जरी मोठा वादळ वारा असो… वादळाच्या मोठ्या
गडगडाटी असोत… खूप जोरात पाऊस पडत असला तरीही मी रात्रीला
गाढ झोपू शकतो….!
शेतकऱ्याला त्या मुलाचे बोलणे थोडे वेगळेच वाटले…. शेतकऱ्याला तालुक्याला जायची
जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून शेतकरी
घरी आला. खूप थकला होता. लगेच झोपायला गेला.
Moral Story In Marathi | Bodhkatha Marathi तणाव | बोधकथा
मध्यरात्रीला जोराचा वारा… भयंकर अशी गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला.
त्याची झोप उघडली…. त्याला आठवले, घोड्यांसाठी तबेल्यात गवत भरलेले नव्हते.
दारासमोर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. पाणी पण ठेवलेले नव्हते.
शेतकऱ्याला खूप काळजी वाटायला लागली… तसेच त्याला नवीन नौकाराची आठवण झाली
आणि त्याने नोकराला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. परंतु काहीही प्रतिसाद
मिळाला नाही. घरात तो कुठेही दिसत नव्हता. शेवटी शिव्या घालीत स्वतः रेनकोट घातला…
आणि टॉर्च घेऊन तबेल्यात जायला निघाला…
तबेल्यात पोहचल्यावर शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला… तो बघतो तर काय….
सर्व गवत आवरून… त्याचे ढीग करून झाकून ठेवलेले होते. तबेल्यात आत गेला तर…
गव्हाणीत गवत आणि पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन
समाधानाने झोप घेत होते.
आता तो उत्सुकतेने मुलाला शोधायला लागला…. तर त्याला दिसले….
वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून तो नवा नोकर अगदी निवांतपणे
पाय लांब करून झोपला होता. आणि मोठ्याने घोरत होता… बाहेर निसर्गाचे एवढे तांडव
सुरु होते…. याची त्याला काहीही माहिती नव्हतीच…!
तो मुलगा निवांतपणे झोपू शकला. कारण त्याला कसलाही ताण नव्हता. का नव्हता….?
तर त्या मुलाने झोपायला जायच्या अगोदरच त्या दिवसाची आपली संपूर्ण कामे
व्यवस्थितपणे पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत येण्यासाठी एकही फट नव्हती….!
कोणतेही काम, प्रोजेक्ट, कोणतीही कंपनी, आणि कोणताही देशाचा अथवा देशाबाहेरचा
पक्षकार [ ग्राहक ] तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या जीवनासाठी कंपन्या आहेत,
नोकऱ्या आहेत, तुमचे जीवन त्यांच्यासाठी नाही. कृपा करून जितके जमेल, झेपेल इतकेच
काम हातात घ्या… त्यासाठी आग्रह धरा.
वाढत्या पगाराच्या नादाने, प्रतिष्ठा, पोस्ट, अथवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या
हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान
काहीही नाही…. याचे थोडे भान ठेवा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण
वातावरणाचा परिणाम ऑफिस मधल्या कामावर नक्कीच होतो आणि घरचे आनंदी
वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारे ठरते. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात
इत्यादी…. इत्यादी… घरी घेऊन न येता… तिथेच विसरून या.
स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे.
तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती
ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही,
याबद्दल खात्री बाळगा.
ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, आयुष्य भराच्या साथीची
अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावले
टाकायची आहेत. ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.
त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणे गरजेचे आहे.
तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादि चा उपयोग करा. हे सगळे सगळ्यांनाच माहिती असते.
तरीही आपण धावतो… ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
दोन तत्त्वं :
“एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका.” “दुसरे म्हणजे जीवनाच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात “
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
Status Suvichar In Marathi | Suvichar | मनापासून शांतपणे वाचा
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले
मनापासून स्वागत आहे.
good thoughts in marathi on life,
suvichar marathi, motivational quotes in
marathi on life, चांगले विचार, छान विचार मराठी,
मनापासून शांतपणे वाचा…. खरोखर छान वाटणार….
Marathi Status Suvichar | Marathi Quotes Motivational Quotes
चेक असो अथवा विश्वास….
जर तो गरजेच्या वेळी बाऊन्स झाला तर…
ना त्या व्यवहाराला किंमत राहते….
ना त्या नात्याला….
🥀💮🙋💛
उपकार कधीच विसरायचे नसतात हे मान्य आहे.
पण जर उद्या ती व्यक्ती त्याच्या फायदा घेत असेल….
तर मात्र अशावेळी समोरच्याची सन्मानाची टक्केवारी
आपणच ठरवायची हाच योग्य पर्याय असतो….!
🥀💮🙋💛
माणूस हा फळ लागेपर्यंत झाडा जवळ आणि
आपले काम होईपर्यंत देवाजवळ थांबतो…!
🥀💮🙋💛
प्रत्येक पक्षाच्या चोची साठी देव हा
घास निर्माण करीत असतो…
परंतु तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही.
🥀💮🙋💛
आजचा दिवस
हा माझ्या जीवनाने मला दिलेली
शेवटची संधी असू शकेल….
उद्याच्या सुर्योदय
मी बघणारच याची काय खात्री…?
🥀💮🙋💛
ज्या नात्यात तुलना केली जाते…
त्या नात्यात दुरावा निश्चित होतो.
🥀💮🙋💛
Status Suvichar In Marathi | Suvichar | मनापासून शांतपणे वाचा
जो धन कमवीत असतो, तो धनवान….
ज्याच्या अंगी चांगले गुण असतात, तो गुणवान…..
ज्याला चांगली बुद्धी लाभलेली असते, तो बुद्धिमान…..
ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व असते. तो कर्तुत्ववान…..
ज्याने नाती जोडली आणि जपत असतो, तो मौल्यवान….
🥀💮🙋💛
जर आपले मन शांत असेल…….
तर दुसऱ्याचे मन समजून घेणे
सोपे जाते.
🥀💮🙋💛
मनाला असे तयार करा की….
त्याला कधीच तडा जाणार नाही.
हास्य असे तयार करा की…..
त्याने मनाला त्रास होणार नाही.
स्पर्श असा करा की….
त्याने जखम होणार नाही.
🥀💮🙋💛
नाती अशी तयार करा की….
त्याचा शेवट कधीच होणार नाही.
🥀💮🙋💛
योग्य वेळेची वाट पाहत असाल
तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल.यो
ग्य वेळेची वाट पाहत बसू नका
तर योग्य वेळ निर्माण करा.
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
चहा सारखे उकळ आहे जीवन….
कडकपणा आणि गोडवा येईलच
फक्त प्रमाण जमायला हवे.
🥀💮🙋💛
दोन्ही दगडावर
हात ठेवणाऱ्या लोकांपासून
नेहमी सावध असलेले बरे.
🥀💮🙋💛
जे आहे तेच स्वीकारून
त्यात समाधान शोधले की
त्याच्याशी सोहळा करता येतो…!
सुख सगळ्यांजवळ आहे.
परंतु ते अनुभवायला वेळ नाही….!
इतरांकडे सोडा परंतु….
स्वतःकडे बघायलाही वेळ नाही…..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाही वेळ नाही…..
आणि सगळ्यांची नावे
मोबाईल मध्ये सेव आहेत…
परंतु चार शब्द बोलायला वेळ नाही….!
🥀💮🙋💛
पाण्याने भरलेल्या तलावात
मासे किड्यांना खातात आणि
जर तलाव कोरडा पडला तर
किडे माशांना खातात.
संधी सगळ्यांनाच मिळते
केवळ आपली वेळ येण्याची वाट पहा….
🥀💮🙋💛
जिथे आपण ठेच लागून पडतो…
तिथूनच सुरुवात होते
सांभाळून चालायची….
🥀💮🙋💛
जीवनाच्या वाटेवरचा प्रवास…
कधीच ठरवून होत नसतो.
जस जसी वळणे येतील…
तस तसे वळावेच लागते.
🥀💮🙋💛
पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त
श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही.
मोठा होण्याकरिता आधी त्याला
विचाराने श्रीमंत व्हावे लागेल….!
🥀💮🙋💛
स्वतःच्या स्वप्नांसाठी कष्ट करा….
नाहीतर एक दिवस दुसऱ्यांच्या
स्वप्नांसाठी कष्ट करावे लागतील….
🥀💮🙋💛
जेव्हा कठीण काळात
नियती आपल्याला
नाच नाचवित असते ना….
तेव्हा ढोल वाजविणारे काहीजण
आपल्या जवळचेच असतात.
🥀💮🙋💛
Marathi Status Suvichar | Marathi Quotes Motivational Quotes
चुकीचा व्यक्ती जरी कितीही गोड बोलला
तरी एक दिवस तो आपल्यासाठी
व्याधी बनून जाणार.
चांगला व्यक्ती जरी कितीही कडू वाटत असला
तरी एक दिवस तो आपल्यासाठी
औषधी बनून कामात येणार.
🥀💮🙋💛
आनंद मिळविण्याचा
असा कोणताच मार्ग नाही आहे….
त्यापेक्षा आनंदी राहणे
हाच एक मार्ग आहे.
🥀💮🙋💛
सुख म्हणजे काय….?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे
आणि उद्याची चिंता न करणे.
🥀💮🙋💛
स्वतःच्या मनावर
इतका संयम असायला हवा की
परिस्थिती कितीही वाईट असली…
तरी इतरांबद्दल नेहमी
चांगला विचार करता आला पाहिजे…!
🥀💮🙋💛
मानवी स्वभाव असा आहे की…
जर विश्वास असेल तर न बोलता ही
सर्व काही समजून घेता येते आणि
विश्वास नसेल तर बोललेल्या
प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो…
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
आपण किती आयुष्य जगलात….
ह्यापेक्षा आपण कसे आयुष्य जगलात
याला अधिक महत्त्व आहे.
🥀💮🙋💛
जे सत्याने मिळते….
तेच जीवनभर टिकते.
🥀💮🙋💛
नात्यांमध्ये जर काही
गैरसमज होत असतील….
तर ते लगेच एकमेकांना
सांगून टाका.
कारण नाते तुटण्यासाठी
हाच पाच अक्षरांचा शब्द
पुरेशा असतो…
🥀💮🙋💛
चुकीचे असून
स्वःताला बरोबर सिद्ध करणे
सोपे अससे. परंतु बरोबर
असून सुद्धा स्वतःला बरोबर
सिद्ध करने खूप कठीण असते.
🥀💮🙋💛
जर व्यवहारात आपल्याकडून
एखादी चूक झाली तर…
आपण तिथे वकिलाची भूमिका घेतो.
आणि तीच चूक जर दुसर्या कडून झाली तर…
आपण तिथे सरळ न्यायाधीश ची भूमिका घेतो…
🥀💮🙋💛
श्रीमंतीत आदराने झुकायला आणि
गरिबीत खंबीर राहायला ज्याला जमते…
तोच खरा माणूस होय…
🥀💮🙋💛
विस्कटलेल्या नात्यांना जोडण्यासाठी
प्रेमाची गरज भासते.
विखुरलेल्या माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते.
प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी
माणसे येतात…. परंतु जी पाहिजे
ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.
🥀💮🙋💛
चांगला गुरु
यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो…
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.
🥀💮🙋💛
सत्य की अशी एक श्रीमंती आहे की….
जी एकदाच खर्च करून त्याचा जीवनभर
आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे
एक प्रकारचे कर्ज आहे…. ज्यामुळे
तत्काळ सुख मिळते. परंतु जीवनभर
त्याची परतफेड करावी लागते.
🥀💮🙋💛
कधीही चांगल्या व्यक्तींची परीक्षा घेऊ नका.
त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच
दाखवणार नाहीत. ते तुमच्या आनंदासाठी
तुमच्या जीवनातून शांतपणे निघून गेलेले असतात…!
🥀💮🙋💛
जीवनात दुःख कितीही असले तरी….
त्यातून आनंद शोधता आला पाहिजे.
यालाच तर जीवन म्हणतात.
🥀💮🙋💛
मन “मानी” असावे….
“मनमानी” नसावे……!
🥀💮🙋💛
जरी खिसा रिकामा असला तरी
पैशाला कधीही नाही न म्हणणाऱ्या
वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात
असूच शकत नाही…
🥀💮🙋💛
जीवनात आनंदी क्षणांसाठी….
पैशाने कमावलेल्या वस्तू पेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे
जास्त सुख देतात….
🥀💮🙋💛
कधीकधी काही निर्णय हे
इतरांच्या आनंदासाठी पण
घ्यावे लागतात…
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
शब्दांमुळेच जुळतात
मनमानाच्या तारा…
आणि शब्दांमुळेच चढतो
एखाद्याचा पारा.
शब्दच जपून ठेवतात….
त्या गोड़ आठवणी. आणि
शब्दांमुळेच तरळते….
कधीतरी डोळ्यात पाणी.
म्हणूनच जो जीभ जिंकेल….
तो मन जिंकेल. आणि
जो मन जिंकेल…. तो जग जिंकेल.
आपला दिवस आनंदात जाओ….!
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
आयुष्यात खिशा रिकामा असतांना
येणारा अनुभव आणि वेळ आणि
त्या काळात साथ देणारी माणसे
हिच खरी कमाई.
प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ असते.
पण वेळेला थांबविण्याची हिंमत
कुणाच्याही मनगटात नसते.
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
परिश्रम करीत असतांना
कधीही घाबरायचे नसते….
कारण माणूस त्या काळात
एकटाच असतो…
यशस्वी झाल्यावर तर
पूर्ण जग बरोबर असते…
मग सर्व गाणी बरोबर वाजतात…!
🥀💮🙋💛
हवा…. दहशत….. दरारा….
ही सगळी मोहमाया आहे.
काम करा… परिश्रम करा….
पैसे कमवा…. आपोआपच
सगळी गाणी वाजतील.
🥀💮🙋💛
शब्द तर फुकट मिळत असतात….
परंतु तुम्ही ते ज्यानुसार वापरता
त्यानुसारच तुम्हांला त्यांची किंमत
चुकवावी लागते….!
🥀💮🙋💛
एका शब्दाचे अर्थ दोन असतात….
त्यामुळे जपून बोलावे.
🥀💮🙋💛
रागा मागचे प्रेम आणि
चेष्टेमागचा जिव्हाळा
ज्या नात्यात समजून घेतला जातो….
ते नाते सहसा तुटत नसतात.
🥀💮🙋💛
नजरेत तुम्ही बसा आम्ही तर
काळजात बसणार…
ते ही अगदी रुबाबात….!
🥀💮🙋💛
प्रत्येकाशी प्रेमाने वागा
आदर न मागताही मिळते….
यालाच तर रुबाब म्हणतात…!
🥀💮🙋💛
Status Suvichar In Marathi | Suvichar | मनापासून शांतपणे वाचा
डोक्यामध्ये विचारांचा ट्रैफिक
जीतका कमी असणार…..
आयुष्याचा प्रवास तितकाच
सोपा होणार.
🥀💮🙋💛
यशाचा एकमेव मार्ग संघर्ष आहे….
जर तुम्हाला जीवनामध्ये
अधिक संघर्ष करावा लागत असेल…
तर स्वतःला खूप नशिबवान समजा.
कारण संघर्ष करण्याची संधी
त्यांनाच मिळते…..
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
🥀💮🙋💛
सत्याला अपमान तेच मानतात…
ज्यांना असत्यापासुन काहीतरी
लाभ मिळत असतो.
🥀💮🙋💛
मनाची आणि शरीराची
प्रक्षुब्ध अवस्था म्हणजे भावना….!
भावनाच वर्तनाला मार्गदर्शन करते.
🥀💮🙋💛
जर नीतिचा आधार घेतला…
तर जीवन जगणे सरळ
आणि सोपे होते…
🥀💮🙋💛
निसर्गाच्या न्यायामध्ये ना
काहीही होत असते…
असे वाटते की जादू आहे…..
असेही चांगले लोक दया
करण्यास सक्षम असणे
हा आधीच एक आशीर्वाद असतो….!
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
स्वत:ला आपण कधीही
मिठीत घेऊ शकत नाही.
कधीही स्वत:च्या खांद्यावर
आपलेच डोके ठेऊन
रडू ही शकत नाही.
एकमेकांसाठी जगणे यालाच तर
“आयुष्य” म्हणतात. म्हणून…
त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात….!
🥀💮🙋💛
विचारांचे काहूर आणि भावनांचा कल्लोळ
यांचे एक दुष्टचक्र आपोआप काम करू लागते.
त्यावेळेस मरणोत्तर यातनेतून जावे लागते.
त्या वेगळे देखील आपणच परंतु जेव्हा आपण हसतो….!
🥀💮🙋💛
मोठा मोठा श्वास घेत
आपण आपलेच मन
ताब्यात ठेवायचे असते.
कारण की…
हे हळूहळू सौम्य होत जाते.
🥀💮🙋💛
इतरांसाठी खुले व्हायच्या ऐवजी…
स्वत: साठी खुले व्हायचे.
लोकांना संधी द्यायच्या ऐवजी….
स्वत:लाच संधी द्यायची.
स्वतःसाठी मोकळे व्हायचे….
स्वतःला एक संधी द्यायची.
🥀💮🙋💛
प्रत्येक भावना मागे भीती असते.
अनेकदा ती कुठल्याही
जाणीवपूर्वक गोष्टींनी किंवा
कारणांनी येते असे नाही..
सुप्त मनात दडलेल्या तणावांमुळे
अचानक येऊ शकते…
त्यामुळे त्याच्याकडे वेळीच लक्ष देणे
आणि उपाय करणे महत्त्वाचे आहे..
नाहीतर असेही जीवनाचे अश्व
पळायला कारणच लागते..
🥀💮🙋💛
आपला प्रवास प्रत्येकाला समजेलच असे नाही….
ठीक आहे…. आपण आपले जीवन जगण्यासाठी
येथे आहोत. प्रत्येकाला समजवण्यासाठी नाही.
🥀💮🙋💛
आपल्याला यातले काहीच माहित नाही…
असे म्हणणाऱ्यालाच आतले बरेच काही
माहिती असते….!
🥀💮🙋💛
कपड्यांना मॅचिंग करून…
केवळ शरीर सुंदर दिसेल.
कोणत्याही परिस्थितीतून
चांगले नाते…. चांगले लोक….
मॅचिंग करा.
संपूर्ण जीवन सुंदर होते.
🥀💮🙋💛
Status Suvichar In Marathi | Suvichar | मनापासून शांतपणे वाचा
प्रत्येकाच्या स्वभावात
काही चांगले गुण आणि
काही वाईट दोष असतातच.
तुमचे चांगले गुण लोकांना
दिसावेतच. कारण काही छोटे
दोष त्यामुळे झाकले जातात.
🥀💮🙋💛
संधी आणि सूर्योदय
दोन्हीत एक साम्य आहे…
उशिरा जागे होणाऱ्याच्या
नशिबी दोन्ही नसतात.
🥀💮🙋💛
पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यंत टिकतात.
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवितात.
🥀💮🙋💛
कल्पनेतील विचार
वास्तवात येत नाहित.
आणि वास्तव विचार
कुणाला पटत नाहीत.
🥀💮🙋💛
जे मिळालेले आहे
ते सांभाळून ठेवावे
आणि जे मिळवायचे आहे
त्यासाठी प्रयत्न करत राहावे.
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
दररोजच्या आयुष्यात फक्त
पैसेच कमवीत न बसावे….
आता किती श्वास शिल्लक
आहेत कधीतरी हे ही बघावे.
🥀💮🙋💛
गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही म्हणूनच
जीवन जगा.
🥀💮🙋💛
मन वाचता आले की….
शांततेला सुद्धा वाचा फुटते.
🥀💮🙋💛
आपल्या तुटल्याची वाट पाहणारी लोकं
परकी नसून आपलीच माणसे असतात.
🥀💮🙋💛
विचारांवर लक्ष ठेवा… त्यांचे शब्द होतात.
शब्दांवर लक्ष ठेवा…. ते कृतीत उतरतात.
कृती वर लक्ष ठेवा… त्या सवयी बनतात.
सवयींवर लक्ष ठेवा…. त्यातून चारित्र्य घडते.
चारित्र्यावर लक्ष ठेवा… ते आपले भविष्य घडविते.
🥀💮🙋💛
ज्यावेळी काहीच नसते…. त्यावेळी अभाव नडतो.
ज्यावेळी थोडेसे असते…. त्यावेळी भाव नडतो.
आयुष्यातील एक कटुसत्य आहे…. ज्यावेळी…..
सगळे काही असते… त्यावेळी स्वभाव नडतो….!
🥀💮🙋💛
केवळ एकच पर्याय कधीही नसतो.
पर्यायांची जगात कमी नाही आहे.
तुम्ही हार मानू नका आणि शिकत राहा.
🥀💮🙋💛
मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status Suvichar | Sunder Vichar
Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह | सुंदर विचार
Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह सुंदर विचार | छान विचार
नमस्कार मित्रांनो….
आज तुमच्यासाठी काही मराठी सुविचार, सुंदर विचार, छान विचार, चांगले विचार, मराठी प्रेरणादायक सुविचार, VB Good Thoughts या संकेतस्थळावर आणले आहेत.
आपण जर marathi status, suvichar, marathi quotes, motivational quotes, goos thoughts in marathi on life, quotes in marathi on life, happy thoughts,
या प्रकारचे सुविचार शोधत आहात तर हे Marathi Status Suvichar, वाचून नक्कीच आनंदी होणार
अशा मला पूर्ण विश्वास आहे.
Marathi Status Suvichar , Motivational Quotes Marathi | Sunder Vichar
कधीही परिस्थिती जुळवून घेत नाही….
तर परिस्थितीला जुळवून घ्यावे लागते…!
🙏💖💛
वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या…
वेळ तुमची आपोआपच साथ देईल…
🙏💖💛
काही लोक चुका दुसऱ्याच्या दाखवतात
आणि स्वतःच्या चुका लपविण्यात
फार तरबेज असतात.
🙏💖💛
शब्दावर विश्वास ठेवू नका.
काही माणसांच्या जिभेवर तर
साखर पेरलेली असते आणि
मनात विष साठवलेला असतो.
🙏💖💛
जर कुणी विचारले की….
जीवनात काय गेले
आणि काय मिळाले….
तर सरळ सांगा की…
जे गेले ते कधीच माझे नव्हते.
आणि जे मला मिळाले….
ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते.
🙏💖💛
मनुष्याच्या शरीरातील
सर्वात घातक अवयव म्हणजे…
कान.
त्यामध्ये जे काही शिरते
तेच महाभारत घडविते.
🙏💖💛
खरेतर असा पाऊस पडावा की….
त्यात गर्व बुडून जावा…
मतभेद वाहून जावे….
अभिमान भिजावा….
रागाचा पर्वत नष्ट व्हावा…
द्वेष भेदभावांची नदी नाहीशी व्हावी
आणि मी ऐवजी आम्ही सदा बरसत राहावे.
🙏💖💛
चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या
अंतकरणातल्या विचारावर अवलंबून असते.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवित असतात.
🙏💖💛
कळत – नकळतपणे जर कधी चुकलात
तर माफी मागून मोकळे व्हावे.
त्याने तुम्ही कमी होत नाही आणि
समोरचा मोठा होत नसतो.
🙏💖💛
विचारांछ तोल सांभाळला….
तर पावले व्यवस्थितच पडतात.
🙏💖💛
Marathi Status Suvichar , Motivational Quotes Marathi | Sunder Vichar
सन्मानाच्या दरवाजा इतका लहान असतो की….
जिथे थोडे वाकल्या शिवाय प्रवेश मिळत नसतो…
🙏💖💛
स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेले
कधीही चांगले असते…!
🙏💖💛
वळून कोणी पाहिले नाही म्हणून
माळ्यावरच्या चाफ्याचे अडले नाही.
शेवटी पानांनीही साथ सोडली…
पण पठ्ठ्याने बहरने सोडले नाही.
🙏💖💛
भले ही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल…
पण आपल्या पासून कोणाचे नुकसान नको
ही भावना त्याच्याजवळ असते….
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो…!
🙏💖💛
सोबत किती लोक असू द्या….
शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात.
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतःलाच भक्कम बनवा.
🙏💖💛
विश्वासा हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चूकी बरोबर
तो कमी कमी होत जातो…!
🙏💖💛
डाग चांगले सुद्धा असतात.
व्यक्तिमत्त्वाला प्रतिष्ठेचे आदराचे
आणि सन्मानाचे डाग लागावे…..
जे धुतले नाही तरी चालतात.
🙏💖💛
आपण प्रत्येकालाच आवडले पाहिजे
हा अट्टाहास सोडा. आपल्याला तरी
कुठे प्रत्येकजण आवडतो…?
🙏💖💛
ज्या लोकांना आपल्या वेळेची किंमत नाही
आणि भावनांची कदर नाही ना…
त्यांच्याशी संबंध ठेवला की फक्त चिडचिड
आणि पश्चाताप वाट्याला येतो.
असे वाटते की आपण अशा लोकांसाठी
वेळ वाया घालवतो ज्यांना आपल्या
सोबतीची गरज नाही…
🙏💖💛
आपली इतरांशी बरोबरी करणे योग्य नाही
कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगळा असतो…!
🙏💖💛
Marathi Status Suvichar, Motivational Quotes Marathi, Sunder Vichar ,
अडथळा प्रत्येक वेळेस वाईट नसतो.
तुम्ही चुकत असाल तर तुमच्या
हितचिंतकांनी केलेला अडथळा
चांगलाच असतो.
🙏💖💛
शरिर जितके फिरत राहील
तितके ते स्वस्थ राहते आणि
मन जितके स्थिर राहणार
तितके ते शांत राहते.
🙏💖💛
जेव्हा तुम्ही आतून तुटलेले असाल आणि
ते तुम्ही कुणालाही कळू सुद्धा देत नसाल…
तेव्हा समजून जा की…. तुम्ही
खरोखरच Mature झाला आहात…
🙏💖💛
जेव्हा आपण कोणावर शंका करतो….
पूर्णपणे विश्वास ठेवतो… तेव्हा
आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते.
एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती
किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा….
🙏💖💛
कटू पण सत्य
जर वेळ चांगली असेल तर परके आपलेसे होतात
आणि जर वेळ वाईट असेल तर आपले परके होतात…!
हे आयुष्याचे सत्य आहे. स्वार्थी जग आहे.
नाती फक्त दिखाव्या पुरतीच असतात.
खऱ्याचा कान आणि नालायकांना मान दिला जातो.
त्यामुळे चार पुस्तक कमी वाचा पण माणसे वाचायला शिका.
🙏💖💛
समजूतदारपणा यायला प्रत्येक वेळी
वयानेच मोठे व्हावे असे नसते.
परिस्थितीचें गांभीर्य जाणिवेत उतरले की
समजूतदारपणा जन्माला येतो…!
🙏💖💛
प्रतिबिंब कितीही
स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी
मनात काय आहे हे आपण
कधीच ओळखू शकत नाही….!
🙏💖💛
जेव्हा जीवनात वादळ येते
तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभे राहायचे असते.
प्रश्न वादळाचा नसतो… वादळ जेवढ्या वेगाने येते….
तेवढ्याच वेगाने निघूनही जाते.
आपण किती सावरलो आहे हे फक्त महत्त्वाचे असते..!
🙏💖💛
ज्याच्या विषयी गैरसमज झाला आहे…
त्याच्याशी या विषयावर बोलावे लागते.
जर इतर कुणाशी त्याच्याविषयी बोलले…
तर गैरसमज तर वाढतोच त्या बरोबर
संशयही जन्मतो…
🙏💖💛 Marathi Status Suvichar, Motivational Quotes Marathi | Sunder Vichar
सुंदरतेचा कमीपणा
चांगला स्वभाव पूर्ण करू शकतो.
परंतु स्वभावाचा कमीपणा
सुंदरतेने पूर्ण करू शकत नाही.
🙏💖💛
आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्यावे
तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नये.
स्वतःच्या सुखाकरिता इतरांना
कधी ही दुखवू नये.
🙏💖💛
काही गोष्टी वेळेतच सांगायला पाहिजे
नाहीतर त्या मनातच राहून जातात…!
🙏💖💛
प्रेम म्हणजे
जर समजली तर भावना आहे….
जर केली तर मस्करी आहे….
जर मांडला तर खेळ आहे….
जर ठेवला तर विश्वास आहे….
जर घेतला तर श्वास आहे…..
जर रचला तर संसार आहे….
जर निभावले तर जीवन आहे…!
🙏💖💛
तुम्ही ज्या साठी तयार आहात
त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात.
हा निसर्गाचा नियम आहे.
म्हणूनच तुम्हास जे पाहिजे आहे
त्याची फक्त तयारी करा….
एकदा का तुम्ही तयार झालात….
की त्या गोष्टींना तुमच्या जीवनात
यावेच लागते….
🙏💖💛
कोणीही परिपूर्ण नसतो….
म्हणूनच पेन्सिल बरोबर खोडरबर असतो.
🙏💖💛
फक्त पुस्तक वाचल्याने कुणी ज्ञानी होत नाही.
वाचलेल्या माहितीची साधना करावी लागते…
तेव्हा त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होते.
पुस्तक वाचल्याने फक्त माहिती मिळते…
नवे ज्ञान हे मिळालेल्या माहितीची
साधना केल्याने मिळते.
🙏💖💛
बोलून दाखवने खूप सोपे असते.
करून दाखवणे त्याहूनही कठीण…
🙏💖💛
वरच्या देवा सोबत
जर आपले संबंध चांगले असतील
तर ही खालची माकड
आपले काय वाईट करणार…
🙏💖💛
जीवनात हसणे शिकावे लागते….
रडणे तर जन्म झाल्यापासून सुरू होते….!
🙏💖💛
नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार
तुमच्या सोबत असतील तर जीवनात
तुम्ही एकटे राहू शकत नाही…!
🙏💖💛
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे
हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट
आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न
मात्र आपल्या हातात असतात.
🙏💖💛
देवा आता लवकरात लवकर
तो दिवस दाखव….
ज्या दिवशी आम्ही मास्क शिवाय
मोकळ्या हवेत श्वास घेऊ…
🙏💖💛
अपयश अनाथ असते….
यशाला हजार नातेवाईक असतात….!
🙏💖💛
ज्यांना भावना कळतात तेच रडतात
नाहीतर खोट्यांचे चेहरे हसरेच असतात…..
🙏💖💛
पैशाचा माज दाखवणाऱ्यांना
स्वतःच्या कर्माची लाज अजिबात नसते.
🙏💖💛
एखाद्याला अडचणीत मदत केली म्हणून
त्याच्या आयुष्यात डोकेदुखी करणारे नग
आजकाल वाढत आहेत.
म्हणून काही वेळेस
भीक नको पण कुत्रे आवर
असे म्हणण्याची वेळ येते.
🙏💖💛
वेड सगळ्यावर येते आणि
वेळ सगळ्यांची येते.
🙏💖💛
परिस्थिती कशीही असो हिम्मत कायम ठेवा.
वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात
रूपांतरित होते.
🙏💖💛
प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही
कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि
आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो.
कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म चांगले असतील….
तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते…
🙏💖💛
काही लोक किंवा गोष्टी म्हणजे सर्वोच्च आनंदाचे भांडार
किंवा आनंद सरोवर असतात. याची पुष्टी जिवंतपणे जगलेले
क्षण नक्की देतातच…
आपली सगळ्यांची निर्मिती हे भोगासाठी झाली आहे
मग ते कोणतेही असोत…..
जर आपण शाश्वत आनंद मध्ये सहभागी झालो
तरच आपण आनंदी होऊ शकतो या खेरीज
आपण आनंदी होऊ शकत नाही…
ज्याप्रमाणे शरीराचा कोणताही अवयव उदराशी
सहकार्य केल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे कोणीच आनंद प्राप्ती करू शकत नाही.
मत्स्य जगामध्ये मनुष्याच्या विशिष्ट काळ आणि परिस्थिती
प्रमाणे विशिष्ट आनंदमयीच म्हणुया… त्या लीला दाखवण्यासाठी
काही क्षण अवतार घेत असतात…
प्रत्येक जीव हे चेतना युक्त तर नक्कीच आहे आणि
आनंदाच्या शोधातही आहे….
मग ते नित्य आनंदाचे स्रोत आहेत आणि जर त्या जीवांनी
त्यांच्या संग केला तर प्रत्येक जीव सुद्धा नक्की आनंदी होईलच….
🙏
Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह | सुंदर विचार
दुसऱ्याच्या विषयी बोलतांना
शब्द आठवावे लागत नाही….
आणि स्वतःच्या विषयी बोलतांना
तर शब्दच सुचत नाही.
🙏💖💛
जीवनात प्रत्येकाने खूप व्यस्त असावे….
जे पैशाने नाही मिळणार ते करून बघावे.
🙏💖💛
अपेक्षा…. गैरसमज…. अहंकार….. तुलना…..
यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात.
ते होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा.
हे तत्व केव्हाही चांगले.
🙏💖💛
प्रीतीचे दरवाजे मनाच्या आत उघडे ठेवावे.
जेव्हा वाटले तेव्हा आत जाता यावे.
🙏💖💛
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो…
चुकतात ते फक्त आपले निर्णय….!
🙏💖💛
Best Marathi Status Suvichar | सुविचार संग्रह | सुंदर विचार
काही क्षण आपल्याला
स्वप्नासाठी आमंत्रित करतात…..
आपल्याला आपण
जिवंत असल्याचे सांगतात.
स्वत:शी प्रामाणिक राहण्याद्वारे
आणि त्यातील सर्व त्रुटींसह
आपले व्यक्तीमत्व आणि शारिरिक
वैशिष्टे स्वीकारल्यास
सकारात्मक भावना नक्कीच येतात.
स्पष्टपणे आपले विचार
आपल्याकडे प्रतिबिंबित करत
आणि हे स्पष्ट आहे की
इतके स्पष्ट मार्ग नाहीत.
समतोल जीवन जगण्यासाठीच्या हेतूने….
उत्कटतेने जीवनाचा आनंद घेत
राहण्यासाठी…. निगडीत गोष्टी
सोप्याच कराव्या लागतात.
मी जर स्वत: लाच ओळखत नसेल तर…..
मी गमावू शकेन.
स्वत:चे हृदय स्वत:ला माहीत असल्यास
त्याला आपण हरवू शकत नाही..
भावनांना उत्तेजन देणाऱ्या
सुंदर गोष्टी पाहिल्या किंवा
स्पर्शही केल्या जावू शकत नाहीत….
तर त्या मनापासून जाणवल्याच पाहीजेत.
विचार भावनांची सावली असते.
बोलतांना….. ती नेहमीच गडद….
सामर्थ्यवान आणि सोपी असते.
तो पर्यंत जाणीवपुर्वक
मोठा मोठा श्वास घेत….
हृदयाचा ठोका देऊन
वेळ मोजला पाहीजे….
🙏💖💛
Best Status Suvichar In Marathi With Images, Sunder Vichar, मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स फोटो , सुविचार संग्रह
नमस्कार मित्रांनो VB Good Thoughts या संकेतस्थळावर
आपले मनापासून स्वागत आहे.
आयुष्यात खूप गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये प्रेरणा ही खूप महत्वाची असते.
आयुष्यात ती प्रेरणा एखाद्या व्यक्तीकडून…. अथवा विचारांतून मिळत असते.
आयुष्यात खुपदा आपण निरास होतो, एखादे अपयश आले तर आपण तुटून जातो.
अशा वेळी आपल्याया एक मायेचा हात आणि प्रेरणादाय सुविचार पाहिजे असते.
हे सुविचार आयुष्यात उत्साह निर्माण करतात आणि अपयशाचा सामना करायला
शिकवितात… तसेच नव्या शक्तीने पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात.
या पोस्ट मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचार, मराठी स्टेट्स, रॉयल मराठी स्टेटस,
जीवनावर मराठी स्टेटस, Marathi whatsapp status,
Marathi status on life,
मराठी सुविचार, लहान सुविचार, सुविचार संग्रह, Motivational Quotes,
Positive Quotes, असा भरपूर सुविचारांचा संग्रह आणला आहे.
जो आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला मदत करतील आणि तुम्हाला प्रेरणा देतील
तसेच चांगले विचार, छान विचार मराठी, अशा प्रकारचे सुविचार संग्रह ही आहे.
ज्यामध्ये आपल्यासाठी marathi status, suvichar, status suvichar, good thoughts in Marathi on life, sunder vichar, Marathi quotes, quotes on life in Marathi, आणि बरेच काही
या पोस्ट मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल.
हे suvichar marathi status, suvichar Marathi, suvichar with photo, suvichar image in Marathi,
तुम्हाला नक्कीच आवडतील,
हे सुविचार तुम्हाला Video रुपात आणि सुविचार फोटो, [Image] हि
बघायला मिळेल. तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्र मंडळी,
नातेवाइक, इत्यादी सोबत शेयर करायला विसरू नका.
🙏
Best Status Suvichar In Marathi With Images | Sunder Vichar
👉 जीवनात एक तरी व्यक्ति
अशी असली पाहिजे….
जरी आपण कितीही दुःखात असलो…
तरी त्या व्यक्तीच्या एका फोन ने
आपल्या चेहऱ्यावर हसू येईल.
काही जण एवढे स्पेशल असतात की…
साधे त्यांना आठवले तरी….
आपल्या चेहऱ्यावर गोड हसू येते.
💚💛💜🙏
best-status-suvichar-in-marathi-with-images
आयुष्याच्या रस्त्यावर
भरपूर वाटसरू भेटतात.
परंतु काही डोक्यात असतात…
तर काही काळजात असतात….!
👉 जुन्या फोटोंची अल्बम
सदैव सांभाळून ठेवायची असतात.
कारण नविन फोटो काढण्यासाठी
आपली जुनी माणसे
पुन्हा सोबतच असतील असे नाही.
माणसे… वेळ…. काळ… जीवन…
सगळेच क्षणिक असते.
💚💛💜🙏
जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार
👉चांगलेच होणार आहे
हे मनात धरून चला.
बाकीचे देव बघून घेईल
हा विश्वास मनात असला की…
येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाचा आणि
सकारात्मकतेचा असेल.
💚💛💜🙏
👉 प्रत्येकाच्या अंगणातील पावसाच्या सरी
जरी सारख्या असल्या…. तरी काहींचे केवळ
अंगण भिजवतात तर काहींच्या डोळ्यांसोबत
मनाला भिजवितात….!
💚💛💜🙏
👉 जीवनात कधीच
हा विचार करत बसू नका कि….
कोण… कसा…. कधी…. कुठे….
आणि का म्हणून बदलला.
केवळ हे बघा की….
तो तुम्हाला काय शिकवून गेला.
💚💛💜🙏
👉 जन्माला आलो म्हणून जीवन रेटायचे….
की एकच जन्म आहे म्हणून
जीवन सुंदरपणाने जगायचे…
हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.
💚💛💜🙏
best-status-suvichar-in-marathi-with-images
👉 स्वतःची किंमत तुम्ही स्वतःच ओळखा.
ती जगाला ठरवू देऊ नका.
जर त्यांच्या मनासारखे घडले नाही…
तर ते तुम्हाला पालापाचोळा समजायला
लागतात.
💚💛💜🙏
👉 चांगल्या लोकांची परमेश्वर खूप परीक्षा घेतो.
परंतु साथ कधीच सोडत नाही. परंतु
वाईट लोकांना परमेश्वर खुप काही देतो.
परंतु साथ कधीच देत नाही.
💚💛💜🙏
Best Status Suvichar In Marathi With Images | Sunder Vichar
👉 शंभर सल्लांच्या शब्दांपेक्षा
अनुभवाची ठेच माणसाला
अधिक मजबूत बनविते.
💚💛💜🙏
👉 राहणारे घर अथवा घराचा दरवाजा
कितीही छोटा असला तरी चालेल.
परंतु हृदय आणि हृदयाचा दरवाजा
मोठा असावा कारण तिथेच नाती
आश्रय घेतात.
💚💛💜🙏
👉 आमचा स्वभाव आणि मन
दोन्ही सारखेच आहेत.
आम्ही कोणतेही नाते हे
स्वार्थासाठी नाही…
तर मन आणि माणुसकी
जपण्यासाठी जोडतो…!
💚💛💜🙏
👉 जे आपल्या घामाच्या शाईने
स्वप्न लिहितात…
त्यांच्या नशिबाची पाने
कधीच कोरी नसतात.
💚💛💜🙏
best-status-suvichar-in-marathi-with-images
आयुष्यातील चांगले विचार
लाखो क्षण अपूरे पडतात….
आयुष्याला दिशा देण्यासाठी.
मात्र एक चूक कारणीभूत ठरते
दिशाहीन होण्यासाठी.
तुम्ही स्वतःला कितीही मोठे समजा….
परंतु दुसऱ्याला कमी समजण्याची
चूक कधीच करू नका…!
लोकांचे काय घेऊन बसायचे….
जाणारे गेलेत…
थांबणारे आहेत…..
येणारे येतील…
Just Move And
Go Ahead
आयुष्य खूप सुंदर आहे.
जिवंत असतांना
मिळालेला एक खांदा
मेल्यानंतर मिळणाऱ्या
चार खांद्या पेक्षा
सर्वश्रेष्ठ असतो.
जबाबदारीची
जाणीव झाली की….
बऱ्याचदा स्वप्नही
बदलावी लागतात.
जीवन फार थोडे आहे…
त्यामुळे प्रत्येक क्षणाचा
आनंद घेत चला.
खरे बोलण्याची किंमत
काहीच मोठी नसते…!
फक्त एकटे राहण्याची
तयारी ठेवावी लागते…!
पुस्तकां शिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे जीवन…! आणि
जीवनात आलेले अनुभव म्हणजे
पुस्तक…!
best-status-suvichar-in-marathi-with-images
जेव्हा एखाद्या गरिबाचे काम
स्वतःच्या हातून होते….
तेव्हा त्याच्या चेहर्यावर
जे समाधान असते…
तोच आपल्या जीवनातील
सर्वात मोठा
सन्मान आणि सत्कार असतो…!
Best Status Suvichar In Marathi With Images | Sunder Vichar
काही काही नाती ही अगदी
रांगोळी सारखीच असतात….
प्रदर्शन संपले की लगेच
पुसली जातात.
आपण मान खाली घालून मोबाईल मध्ये
अनोळखी जगात नाते तयार करीत असतो.
मग खऱ्याखुऱ्या नात्यात थोडी मान खाली
घालण्यास हरकत का असावी…
कारण नसतांना
गोड बोलण्याचे सोंग
करणारी माणसे म्हणजे
सावधानतेचा इशारा.
मदत करायची जिद्द असली पाहिजे…
मग अडचणीत आपले असो अथवा परके…!
रक्तात माणुसकी पाहिजे.
वर जातांना आपण
काय घेऊन जाणार आहोत…
असे म्हणणारा माणूस मात्र
खाली असतांना काही सोडत नाही…!
यशस्वी होण्यासाठी शिकणे
आणि चुकणे दोन्ही महत्त्वाचे आहे…!
यशस्वी माणसाच्या सात सवयी….
१] इतरांना मदत करणे.
२] कृती करणे.
३] जबाबदारी स्वीकारणे.
४] मदत मागणे.
५] नकार देणे.
६] ध्यान करणे.
७] खरे बोलणें
best-status-suvichar-in-marathi-with-images
शब्द खोटे बोलू शकतात…
परंतु कृती नेहमीच सत्य बोलते…!
संकटात रडण्याने
मन फक्त हलके होते….
संकटातून सुटका होण्यासाठी
झगडावे लागते.
सुख तुम्ही कोणा सोबतही वाटावे…..
परंतु दुःख केवळ विश्वासाच्या
माणसालाच सांगावे…
सुखी जीवन जगायचे असेल तर
वेडे होऊन राहा… कारण
आजचे सत्य असे आहे की….
जो जवाबदारी स्वीकारतो
त्याच माणसाचे मरण होते… आणि
त्याच माणसाला परत लोक प्रश्न
करतात की…
तू केले तरी काय आमच्यासाठी….!
Best Status Suvichar In Marathi With Images – Sunder Vichar
नजरेचा चांगुलपणा
असल्याशिवाय समोरच्याचा
आंतरिक सौंदर्य बघता येत नाही.
आपण एकटेच बळकावून बसतो ते कळेनासे होते.
खरा आनंद इतका सोपा नाही….! तो अतिशय सखोल जागेतून उगम पावतो.
आपल्या जिवाभावाच्या माणसांच्या आनंदासाठी… शांततेसाठी….. आणि
न्यायासाठी जेव्हा आपण भांडतो तेव्हा आनंद आपल्याला सापडतो.
आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांत स्वप्नं असने आणि ती स्वप्न पूर्ण करायची
आस असणे यांतच खरा आनंद असतो.
मी खुप सुखी आहे…. आनंदी आहे….. समाधानी आहे….
असे आपण म्हणत असतो….
परंतु हे सुख… समाधान…. आनंद…. येते तरी कुठून….?
जेव्हा आपलीच माणसे हे सुख…. समाधान….. आनंद….
देतात तेव्हाच ते आपल्या जवळ येते. हे नेहमी लक्षात ठेवावे…!
आपला सुख…. समाधान आनंद…. हे एकट्याचे नसते… किंवा
उपजत आलेले नसते…. तर हे कुणीतरी आपल्याला दिलेले असते…!
जीवनात आलेल्या जिवाभावाच्या माणसाकडून कुठल्या तरी प्रसंगातून….
लहान मोठ्या गोष्टीतून…. एखाद्या अनमोल घटनेतून…. निसर्गाच्या सान्निध्यात
राहून….. आपल्याला मिळालेले असते….!
आनंदाची देवाण घेवाण असते… आनंद निर्माण करावा लागतो…
तो कुणा जिवाभावाच्या माणसाला द्यावा लागतो….. कधी त्याच्या कडून
घ्यावा लागतो… आनंद कधी कधी कुठल्याही साध्या गोष्टीत….
शब्दात सुद्धा मिळू शकतो…!
जर आनंद नसेल तर ते जीवन जीवनच नाही…!
Motivational Suvichar Status with Images
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी…
तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला
विरोधक असतातच…!
ठाम राहायला शिकावे…
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की….
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
Best Status Suvichar In Marathi With Images – Sunder Vichar
चमत्कार हे रोज होत असतात.
गरज आहे फक्त आपल्या
प्रामाणिक प्रयत्नांची आणि
अतूट विश्वासाची.
प्रत्येक चांगल्या विचारांची
प्रथम चेष्टा होते.
मग त्याला विरोध होतो.
शेवटी त्याच विचारांचा
स्वीकार होतो.
समजूतदारपणा आणि शांतता
हे वयावर नाही….
तर आयुष्यात आलेल्या
अनुभवावर अवलंबून असतात.
नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा
करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे
यशस्वी होण्याचे पहिले पाऊल….!
Marathi Suvichar Status With Images
यशस्वी जीवनाची चार सूत्र
मेहनत केली तर धन मिळते.
संयम ठेवला तर काम होते.
गोड बोलले तर ओळख होते.
आदर केला तर नाव होते.
मोठेपणा हा तो गुण आहे….
जो एखाद्या पदाने नाही
तर संस्काराने प्राप्त होतो…!
मानसिक शांती असेल तरच
सर्व काही गोड गोड वाटते.
नाहीतर धनाच्या राशीवर
लोळून सुद्धा ती टोचायला लागते….!
Best Status Suvichar In Marathi With Images – Sunder Vichar
माणसाची माणुसकी
तेव्हाच नष्ट होते
जेव्हा तो
दुसऱ्याच्या दुःखावर
हसत असतो….
जरी चांगल्या वागणुकीचे
आर्थिक मूल्य नसले…
तरी चांगल्या वागणुकीत
कोट्यावधींची मने जिंकण्याची
शक्ती असते.
समजणे आणि समजून घेणे
यात खूप फरक आहे.
समजण्यासाठी बुद्धी लागते
आणि समजून घेण्यासाठी मन.
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली
तरी चालेल… परंतु माझ्यामुळे
कुणाचे नुकसान व्हायला नको.
जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची
फिलॉसॉफी ही वेगळी असते.
कोणी वागायचे कसे शिकविते
टर कोणी जगायचे कसे शिकविते.
कितीही कमावून ठेवले तरीही
बाकी शून्यच राहते…. आणि
संकटाच्या वेळी कामात,
आपल्या कर्माने साठवलेले
पुण्यच येते.
सुख आणि दुःख हे जीवनाची ऋतू आहेत…
केवळ अंतर इतकेच आहे की… यांच्या
येण्याजाण्याच्या काल निश्चित नाही.
सुंदर चेहऱ्यामागे पडण्यापेक्षा
सुंदर विचारां सोबत चालून पहा.
सुख जरी नाही मिळाले तरी
समाधान मात्र नक्कीच मिळेल…!
जगातील सर्वात मोठी
प्रॉपर्टी म्हणजे….
आपले शरीर आहे.
जर ते चांगले असेल
तर आपण जगातील
कोणतीही प्रॉपर्टी
खरेदी करू शकतो.
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसे
महत्त्वाची असतात कारण….
चांगल्या माणसामुळे चांगली वेळ
येऊ शकते.
कधीकधी आपली चुकी नसतांनाही
आपण Sorry बोलतो. कारण….
मनात भीती असते…
आपल्या आवडत्या माणसाला गमावण्याची.
आयुष्य असा एक रंगमंच आहे…
जिथे आपल्यालाच माहीत नसते की
आपली पुढील भूमिका काय आहे.
प्रत्येकात गुण आणि दोष असतातच
तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता….
हे महत्त्वाचे.
नवरा हा खूप खोटारडा असतो | नवरा बायको सुंदर विचार
नवरा नेहमी बायकोला बोलतो…..
एक दिवस तुला सोडून जाईल…
परंतु खरेतर नवरा
आपल्या बायको शिवाय
एक क्षण ही राहू शकत नाही.
नवरा हा खूप खोटारडा असतो…!
तू दिवसभर फोन चालवतेस म्हणून
साधा डब्बा फोन घेऊन देईन….
असे बोलतो परंतु गुपचूप
स्मार्टफोन आणून बायकोला
आनंदित करतो.
नवरा हा खूप खोटारडा असतो…!
बायकोने बनविलेल्या जेवणात
किती पण चुका काढणार…
परंतु जर बाहेर जेवणाचे आमंत्रण आले
तर ते सोडून घरीच जेवण करत असतो.
नवरा हा खूप खोटारडा असतो…!
बायकोच्या हौसाबद्दल आणि खर्चाबद्दल
नेहमी बोलेल…. परंतु जो पर्यंत
बायकोचे हौस पूर्ण करत नाही
तो पर्यंत शांत बसत नाही.
नवरा हा खूप खोटारडा असतो…!
माझ्या ऑफिसमध्ये खूप सुंदर सुंदर मुली आहेत.
असे बोलून बायकोला जळवतो… परंतु
त्याच्या डोळ्यात आणि मनात बायकोच असते.
नवरा हा खूप खोटारडा असतो…!
मी खूप कठोर आहे.
असे बायकोला दाखवतो….
परंतु नेहमी बायकोच्या आनंदासाठी
बायको पुढे हारत असतो. काहीही म्हणा…
नवरा खूप खोटारडा असतो….!
नवरा हा खूप खोटारडा असतो…!
अगं तु तर घरीच असते ना….! | स्त्री | सुंदर विचार
अगं ऐकतेय का…….?
यामिनी – अश्विनी ची बस
आज येणार नाही आहे…
मला लवकरात लवकर
ऑफिस साठी निघायचे आहे…
आज या दोघींना तुच शाळेत सोडून दे
आणि शाळा संपल्यावर तूच घरी आण
अगं तु तर घरीच असते ना….!
अगं ऐकतेय का….?
माझा मोबाईल चार्जर मिळत नाही आहे….
फोन ची बैटरी पण लो आहे….
तू अस कर…
आपला फोन नंतर चार्जिंग ला लाव.
तुझा मोबाईल चार्जर मला दे.
अगं तु तर घरीच असते ना….!
अगं आज मला ऑफिस ला
थोडा लवकर जायचे आहे …
पेपर आधी मला वाचू दे.
तु मग नंतर कधीही वाच.
अगं तु तर घरीच असते ना….!
ऑफिस मध्ये उद्याला माझा मालक येणार आहे.
यामिनीची टेस्ट परीक्षा आहे. तिचा अभ्यास तुच घे.
अगं तु तर घरीच असते ना….!
तीन – चार दिवस मी खुप व्यस्त आहे .
महिन्याचा शेवट आहे…
ऑफिस मध्ये कामं आहेत…
आईची औषधी तुच आणुन घे…
अगं तु तर घरीच असते ना….!
यामिनी – अश्विनी ची आंघोळ
त्यांचा – माझा नाश्ता…
टिफिन ची तयारी तू आधी करत जा.
मधेच तुझी घाई कशाला…?
अगं तु तर घरीच असते ना….!
ऑफिस मध्ये खूप काम आहे….
बुधवारच्या मुलांच्या शाळेतील
पालक मीटिंगमध्ये मला जायला
जमणार नाही.
त्या मिटींगला तूच जा….
अगं तु तर घरीच असते ना….!
ए आई…. रिमोट दे ना.
मला थोडा टीव्ही बघायचा आहे.
नंतर मला ट्युसन ला जायचे आहे…
तु नंतर बघ ना….
तुझ्या सिरियल्स पुन्हा दाखवितातच…..
अगं तु तर घरीच असते ना….!
आज ऑफिसवाल्यां सोबत
जेवायला बाहेर जात आहे.
आज तूच मुलींना फिरायला घेवून जा….
अगं तु तर घरीच असते ना….!
गावाकडील पाहुणे येत आहेत
नागपूर फिरायला….!
मी तर ऑफिस मध्ये असतो….
परंतु त्यांना म्हटले आहे…
आमच्या कडे यायला…
अगं तु तर घरीच असते ना….!
मुली शाळेतुन आल्यावर
आज मस्तपैकी मसाला भात कर…
आज अश्विनी चा वाढदिवस आहे ना….!
आराम तर रात्री ही होईल.
आणि हो जमलेच तर केक पण करुन घे….
अगं तु तर घरीच असते ना….!
अग ऐकतेय का…? आज खुप थकलो आहे…
आले टाकून कडक एक कप चहा दे
आणि जेवायलाही लवकरच वाढ.
होईल न स्वयंपाक पटकन….?
अगं तु तर घरीच असते ना….!
घराबाहेर पडणाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला प्रथम स्थान…..!
तिच्या प्रत्येक इच्छेला…. प्रत्येक आवडीनिवडीला
दुय्यम स्थान….!
कारण ती घरीच असते ना….!
खरोखर का इतके सोपे असते….? घरी राहणे…???
मनाला भावलेली…. उमजलेली…. ही एक गोष्ट सगळ्यांसाठीच….
कृपया समजून घ्या… उमजुन घ्या…..!
स्त्रियांचा आदर करायला शिका….
कारण ती घरी असते…. म्हणूनच तर आपले घर हे घर असते….!
Suvichar With Images In Marathi मराठी स्टेट्स सुविचार | Sunder Vichar Marathi
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेत स्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
आज या पोस्ट मध्ये मराठी स्टेट्स सुविचार, नातीवर सुविचार, जीवनात संयम
आवश्यक आहे. म्हणून काही संयम वर सुविचार, तसेच आयुष्यावर सुविचार,
आणले आहेत.
मित्रांनो…
जीवनात चांगल्या विचारांची सोबत आवश्यक आहे. चांगले विचार,
आयुष्य जगणे सोपे करतात. या संकेत स्थळावर आपल्याला भरपूर
जीवनावर आधारित सुविचार संग्रह मिळणार. जो आयुष्याच्या प्रत्येक
पावलांवर तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Search Preference :-
marathi suvichar, suvichar marathi, good thoughts in marathi on life, quotes in marathi on life, motivational quotes in marathi on life, good thoughts in marathi on relationship, good thoughts in marathi on restraint, life quotes, sunder vichar, marathi suvichar images,
मित्रांनो,
ज्याच्या जवळ सुंदर विचार, सुविचार, चांगले विचार, छान विचार,
प्रेरणादायक सुविचार, सकारात्मक सुविचार असतात तो कधीच
आयुष्यात / जीवनात एकटा नसतो. इथे काही निवडक सुविचार
फोटो सोबत दिले आहेत.
विश्वास आहे नक्कीच तुम्हाला आवडतील. आवडल्यास आपल्या मित्रमंडळी…..
नातेवाईक…. Facebook, whatsapp, Instagram,
या सारख्या social media वर शेयर करायला विसरू नका.
किंवा facebook status, story, whatsapp status ठेवा.
Marathi suvichar on Relationship Status Suvichar On Relationship with images
मित्रांनो,
कधीही यश मोठा नसतो…
तर यश मिळवणारा मोठा असतो.
कधीही नाती मोठी नसतात….
नाती निभावणारे मोठे असतात.
🙋🙏😊
नाते हे कोणत्याही
एका बेस वर उभे असते.
मग ते मैत्रीचे असो….
अथवा मग ते प्रेमाचे असो.
🙋🙏😊
जर नात्यातील तडजोडीत
प्रेमा ऐवजी कुठेतरी
पश्चात्ताप जाणवत असेल….
तर समजून जायचे की….
त्या नात्याला एक अदृश्य असा
तडा नक्कीच गेला असावा…!
🙋🙏😊
प्रत्येकालाच नाती निभावणे
जमत नाही. कारण….
नाती जपतांना दुसऱ्याच्या
आनंदासाठी स्वतःचे मन सुद्धा
दुखवावे लागते…!
🙋🙏😊
Marathi Suvichar With Images – मराठी स्टेट्स सुविचार
हक्क गाजवण्या अगोदर त्यांना
नात्याची कर्तव्य पार पाडायला
शिकले पाहिजे. तेव्हा त्या हक्काला
किंमत राहते.
🙋🙏😊
जेव्हा न बोलताही भावना
मनापर्यंत पोहोचतात.
तेव्हा ते नाते असते आपले…
आपलेपणाचे….!
🙋🙏😊
Marathi suvichar on Restraint Status Suvichar On Restraint with images
संयम ही आयुष्यातील खरी परीक्षा आहे.
जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल
तेवढे तुमचे यश मोठे असेल.
🙋🙏😊
लोक क्षणभराच्या रागासाठी
जीवनभर प्रेम देणाऱ्या माणसाला
गमावतात.
🙋🙏😊
दिखावा आणि देखावा
यातला फरक कळला की…
जीवन आणि माणसे समजायला
सोपे जातात.
🙋🙏😊
संयम राखणे
हा जीवनातला
खूप मोठा गुण आहे.
🙋🙏😊
परमेश्वराने जेव्हा माणसाची निर्मिती केली….
तेव्हा त्यांनी माणसाला तीन पाने दिलीत….
पहिल्या पानावर परमेश्वराने जन्म लिहून दिले.
तिसर्या पानावर परमेश्वराने मृत्यू लिहून दिले.
आणि दुसरे पान परमेश्वराने कोरेच ठेवून दिले.
दुसऱ्या पानावर काय लिहायचे हे परमेश्वराने
माणसावर सोडले.
माणूस जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते.
या दुसऱ्या पानालाच आयुष्य म्हणतात…!
🙋🙏😊
आयुष्यात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्याला महत्त्व असते.
कारण मागितलेला स्वार्थ असते….
आणि दिलेले प्रेम असते.
🙋🙏😊
आपल्या आयुष्याशी
कधीच नाराज होऊ नका.
कारण तुमच्या सारखे आयुष्य
काही लोकांचे स्वप्न असेल…!
🙋🙏😊
शरीर सर्वांचा सारखाच असतो.
अंतर फक्त विचारांचा असतो.
या लहानश्या जीवनात इतके
नाम कमवा की लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर
एकमेव उपाय म्हणून पाहतील…!
🙋🙏😊
जीवन आनंदात जगणे
ही एक कला आहे आणि
प्रत्येकजण हा कलाकार नसतो.
🙋🙏😊
जरी दुःख कितीही असले
तरी पण जीवन नेहमी
हसत – हसत जगावे.
कारण एक छोटीशी स्माईल
खूप काही करण्याचे बळ देते…
स्वतःलाही आणि इतरांना सुद्धा.
🙋🙏😊
ज्याप्रमाणे प्रवास करीत असतांना
गावे सोडून जात असतात….
त्याचप्रमाणे आयुष्याचा प्रवास
करीत असतांना
माणसे सोडून जात असतात…!
🙋🙏😊
सतत यश मिळाल्यास
आपल्या आयुष्याची
एकच बाजू कळणार…
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची गरज असते…!
🙋🙏😊
Marathi Suvichar With Images – मराठी स्टेट्स सुविचार
प्रशंसा ही चेहऱ्याची नाही
तर चरित्राची व्हायला पाहिजे.
कारण चांगला चेहरा बनवायला
काहीशी मिनिटे लागतात.
परंतु चांगले चरित्र बनवायला
संपूर्ण जीवन लागते.
🙋🙏😊
जीवनात सगळेच काही
मनासारखे घडत नाही….
जेवढा मिळत आहे…
तेवढा आनंद घ्यावा लागतो.
जे मिळाले नाही त्यासाठी
दुःखी न होता सोडावे लागते.
🙋🙏😊
काही गोष्टी हक्काने मिळवाव्या लागतात.
आणि ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत…
त्यांना समाधानाने परत द्यावे लागतात.
हेच जीवन आहे…
इथे आठवणी सोडून जाव्या लागतात.
🙋🙏😊
माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार…
शक्तीनुसार…. आयुष्य जगत असला…
तरी नियतीने ठरवलेला शेवट आणि
नियतीने मांडलेला डाव हा त्याला
स्वीकारावाच लागतो.
🙋🙏😊
marathi status suvichar | Sunder vichar on relationship in marathi
मराठी प्रेरणादायक सुविचार स्टेट्स Good Thoughts In Marathi On life Sunder Vichar
स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसेच माणसाच्या मनाचा तळ समजला की
त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
💮🥀⏳
जर जीवनात दोन नियम लक्षात ठेवलेत
तर नाती अतूट राहतील आणि जपता ही येतील….!
१. समजून घेतल्याशिवाय नाती जोडू नका.
२. गैरसमज करून कधीही नाती तोडू नका.
सूर्य बोलत नाही त्याच्या प्रकाशाच
त्याच्या परिचय देतो. त्याचप्रमाणे…
तुम्ही स्वतः विषयी काही बोलू नका.
चांगले कर्म करत राहा.
लोकंच तुमचा परिचय देतील…!
💮🥀⏳
यशस्वी कथा वाचू नका. त्यांनी
केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या
कथा वाचा. त्याने यशस्वी
होण्यासाठी कल्पना मिळतात.
💮🥀⏳
पहिले यश मिळाल्या नंतर स्वस्थ बसू नका.
कारण… दुसऱ्या प्रयत्नात जर अपयश आले…
तर संपूर्ण जग म्हणेल की पहिले यश केवळ
नशिबाने मिळाले होते.
💮🥀⏳
आळस आणि अति झोप
हे दारिद्र्याला जन्म देतात.
💮🥀⏳
Best Marathi Quotes On Life | चांगले विचार
विचारांची तल्लफ भागल्या शिवाय
मेंदूची नशा पूर्ण होत नाही. त्यासाठी
विचारवंताच्या ठेल्यावर जावे लागते.
💮🥀⏳
शब्दाचेही तापमान असते बरं का…
शब्द चंद्राच्या शीतल ते सारखा गारवा ही देतात
आणि आगीच्या ज्वालां सारखे तप्त ही असतात…!
💮🥀⏳
आपल्या मनाला साजेल असा माणूस
आवडू लागला की सहवासाची ओढ
हवीहवीशी वाटते.
कारण त्या एकमेव प्रिय व्यक्तीशी मन
मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो.
💮🥀⏳
जर आपण नाटक बघायला गेलो….
तर पुढची सीट मागतो. आणि….
जर सिनेमा बघायला गेलो तर
मागची सीट मागतो.
तुमचे जगातले स्थान असेच सापेक्ष असते.
ते कधीच अविचल नसते.
💮🥀⏳
Marathi Suvichar With Images मराठी स्टेट्स सुविचार | Sunder Vichar Marathi
कोणत्याही माणसाला
अडचणीत जपा.
तो तुम्हाला जीवनभर जपेल.
गेलेले दिवस कधीही
परत येत नाहीत
आणि परत येणारे दिवस
कसे येणार….
हे सांगताही येत नाहीत
म्हणूनच जीवन
हसत हसत जगा.
💮🥀⏳इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचार आणि
संस्काराने बना. कारण माणसाचे
चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची
साथ सोडत असतात. मात्र माणसाचे
विचार आणि संस्कार शेवटपर्यंत
साथ सोडत नसतात.
💮🥀⏳
जोपर्यंत तुमची गरज असते….
तोपर्यंत तुमच्या
“कौतुकाचा सोहळा ”
साजरा केला जातो.
एकदा का तुमची गरज संपली….
त्यानंतर तुमच्या
“निंदेची खिरापत ”
घरोघरी वाटली जाते…!
💮🥀⏳
संपर्कातल्या माणसांना
पारखतांना
स्वतःच्या नजरेने पारखावे.
दुसर्यांनी दिलेला चष्मा घालून
पारखल्यास बऱ्याचदा त्यांची
खरी ओळख आपल्याला
होतच नाही.
💮🥀⏳
कुठे व्यक्त व्हायचे आणि कधी समजून घ्यायचे….
जर हे कळले तर आयुष्य “भावगीत” आहे.
किती ताणायचे आणि कधी नमते घ्यायचे…
जर हे समजले तर जीवन “निसर्ग” आहे.
किती आठवायचे आणि काय विसरायचे….
जर हे समजले तर जीवन “इंद्रधनुष्य” आहे.
किती रुसायचे आणि केव्हा हसायचे…
जर हे ओळखले तर जीवन “तारांगण” आहे.
कसे सतर्क राहायचे आणि कुठे समर्पित व्हायचे….
जर हे जाणवले तर जीवन “नंदनवन” आहे.
कुठे….? कधी…? किती….? काय….?
केव्हा…. कसे….? जर याचा समतोल
साधता आला तर
जीवन खूप सुंदर आहे.
💮🥀⏳
जीवनात भेटलेल्या माणसांची
आठवण तर येतेच.
परंतु काही माणसे इतकी खास
असतात की त्यांना मन कधीच
विसरू शकत नाही.
माणूस कधीच परक्यांनी दिलेला मान…
आणि आपल्यांनी केलेला अपमान
विसरत नाही….!
जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल…
तेव्हा विनयशील राहा. आणि जेव्हा खूप
रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा.
तुम्हाला कोणत्याही मुखवट्या शिवाय…
तुम्ही जसे आहात तसेच स्वीकारणारी
माणसे खूप कमी असतात.
कुणी कौतुक करो अथवा टीका….
लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते.
तर टीका सुधारण्याची संधी देते.
जीवनात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच | Marathi Status Suvichar Sunder vichar | Good Thoughts In Marathi On Life marathi quotes | मराठी प्रेरणादायक सुविचार
धडा तर लहान मुलांकडून
घेतला पाहिजे की…
जे आपलाच मार खाऊन
परत आपल्यालाच बिलगतात.
नाती जपत चला.
कारण माणूस आज
एकटा पडत चालला आहे….
कोणी फोटो काढणाराही नाही….
सेल्फी काढावी लागते….
ज्याला लोक फॅशन समजतात….!
जीवन मनसोक्त जागून घ्या.
बाकी नशिबावर सोडून द्या.
रात्री फुलांना सुद्धा माहित
नसते की… सकाळी मंदिरात
जायचे आहे की स्मशानात.
तरूनपणात वाढदिवस
आणि म्हातारपणात
काढदिवास हे आजचे
समीकरण आहे.
नाती जपता चला | मराठी स्टेटस सुविचार | Good Thoughts In Marathi Sunder vichar | Suvichar | happy thoughts
आयुष्यातले चार मौल्यवान रत्न
क्षमाभाव
कुणाला कसेही वागू द्या,
समोरचा चुकला तर आपण
माफ करावे.
हेच मनःशांतीसाठी उत्तम आहे.
निस्वार्थ भावना
केलेली मदत, सहकार्य इत्यादींचा
वारंवार उल्लेख टाळावा.
सततच्या उल्लेखाने मदतीचे महत्व
मातीमोल ठरते.
विश्वास
जगातल्या सर्वात अवघड कामापैकी
एक म्हणजे विश्वास ठेवणे.
स्वकर्मावर, ईश्वरावर विश्वास ठेवा.
विश्वास असेल तर भक्ती म्हणजे सोने.
विश्वास नसेल तर मुर्तीही मातीची.
स्वीकृती
जो जीव जन्म घेतो, त्याला मरण अटळ आहे.
हे सत्य स्वीकारा. भूतकाळ म्हणजे हातून
निसटलेली वाळू. भविष्यकाळ म्हणजे मृगजळ,
परंतु वर्तमानकाळ म्हणजे पदरी पडलेले
आयुष्य आनंदाने जगण्याची संधी…!
आयुष्यातले चार मौल्यवान रत्न | Marathi Suvichar status | Good Thought | सुंदर विचार | चांगले विचार | छान विचार मराठी | motivational quotes | happy thoughts
नमस्कार मित्रांनो,
माझ्या वाचनात आलेला सुंदर विचार ,
खूप छान वाटला म्हणून आपल्यासाठी
शेअर करत आहे.
Good Thoughts In Marathi | Sunder Vichar मोकळे व्हा….
लाखो जीव घेणार्या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली…..!
खूपच सुंदर सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात
करुन घेतात.
मनाला धीट करण्याचे…. आत्मविश्वास वाढविण्याचे शिक्षण देणारे….
लोणावळ्याचे मनशक्ती नावाचे स्वामी श्री विज्ञानानंद जी
मंत्रालयावरुन उडी मारुन आपला जीवन संपवतात.
कित्येकांना आधार देणारे आणि आध्यात्मिक गुरु अशी ओळख
निर्माण केलेले भैय्युजी महाराज आपले जीवन आपल्याच
हाताने संपवतात.
सकारात्मक संदेश आणि प्रेरणादायी विचार देणारा
चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतने नैराश्यातून
आत्महत्या केली.
आणि एक बातमी पुन्हा आठवत आहे… नैराश्याशी
लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल आमटे करजगी
आपले जीवन संपवतात.
अंदाजे सहा महिन्या अगोदर ची नागपूर ची बातमी….
उच्च विद्याविभूषित…. दिवंगत कुलगुरू च्या पत्नी
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या
रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी
नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या
करतात.
अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात…
सेलिब्रिटींच्या बातम्या सगळ्यांना माहित होतात म्हणून
हे उदाहरण दिले आहेत.
आता आपल्याला या सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचे…?
अगदी शांतपणाने पाण्यात पोहोणारे बदक जरीही आपल्याला
वरुन शांत दिसत असले तरी पाण्याखाली त्याचे पाय खूप वेगाने
हलत असतात.
फक्त शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी
बदकाचे कष्ट बदकालाच माहित असतात.
वर वर जितका माणुस खंबीर… आत्मविश्वासी दिसतो….
तितका तो आतून खंबीर…. आत्मविश्वासी असेलच असे नाही.
त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते….
जी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी
आणि सुखी चेहर्याच्या आड लपवत असतो….!
किंवा लपवण्याचा प्रयत्न करत असतो…! परंतु
शेवटी काय…?
जरी वर खूप सुंदर असा ताजमहाल असला…..
तरी खाली पायात तर कबरच आहे….
हे विसरुन चालत नाही.
Outlet [ बाहेर जाण्याची वाट , भावना व्यक्त करण्याचा मार्ग ]
ABP माझा या न्यूज चँनलने भय्यूजी महाराजांनी आत्महत्या
केल्या नंतर एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलत असतांना भय्यूजी महाराजांचे जवळचे मित्र….
श्री अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला
पैलू सांगितला.
भैय्यूजी महाराज स्वतः एक “अध्यात्मीक” गूरू होते….
परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील “स्ट्रेस”
बाहेर काढायला त्याच्या जवळ “outlet” नव्हता.
डॉ. शितल आमटे ( बाबा आमटे यांची नात – त्याचे ही अगदी
भैयु महाराजासारखे झाले )
हे Outlet इतके महत्वाचे असते का….?
होय….!
समजा पाण्यासाठी एक विशाल धरण… जे कोट्यावधी रूपये
खर्च करून बांधले. आणि त्याला जर Outlet च दिले नाही…
तर काय होईल….?
निश्चितच धरण फूटेल. इतके महत्वाचे असते हे Waste Weir…
मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेले
एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात
झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील…?
मुंबई का तुंबते…..? पुरेसे Outlets राहिले नाहीत.
म्हणून आपले Outlet नेहमी सरळ उघडे ठेवा. आपल्या तोंडाचे Outlet
वापरून आपल्या समस्या… आपल्या जवळच्या माणसांना सांगा.
आपल्या अंर्तमनाचं Outlet Open करण्यासाठी विपश्यना….
ध्यान साधनेचा अवलंबन करा आणि शक्य झाल्यास जगातील
सगळ्यात मोठे Outlet म्हणजे आपले डोळे…. यांना उघडा.
फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध… वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस…. दूःख…. उपेक्षा…..
इमारतीवर चढून उडी घेण्यापेक्षा…. बंदुकाच्या गोळीने डोक्याला
छिद्र पाडण्यापेक्षा…. पंख्याला लटकण्यापेक्षा……
केव्हाही हे सोप्प नाही का….?
म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. त्याच्या जवळ
मन मोकळे करा. आपले आई… वडील…. भाऊ…. बहिण…
परिवार… आणि मित्र… हे बेस्ट आउटलेट….!
हसा…! बोला….! रडा….! भांडा…!
व्यक्त व्हा….! मुक्त व्हा….!
काळजी घ्या….!
मन मोकळे करा…. प्रेरणा घ्या…. आणि प्रेरणा द्या…
Good Thoughts In Marathi | Sunder Vichar | मोकळे व्हा….
good thoughts in marathi | मोकळे व्हा
मित्रांनो….
मोठ्या हत्तीला माहूत ट्रकवर ढकलून देऊ शकत होता
असे नाही. परंतु माहूत ने हत्तीच्या पाठीमागून हात ठेवल्यामुळे….
हत्तीला विश्वास वाटत होता की…. आपला मालक आपल्याला
मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर
चढवून घेत होता.
आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत…..
ज्यांना पाठिंबा किंवा प्रेरणा देणारे
कोणी नसल्यामुळे ते मागे पडले आहेत.
कधीकधी काहींना तर असे वाटत असते….
जर आम्ही जागरूक…. अपडेट…. असतो….
जर कोणी आम्हाला आधार आणि प्रेरणा दिली असती
तर आम्ही फार काही करू शकलो असतो…
आपण हे सर्वाणसाठी करू शकत नाही….
परंतु काहींसाठी…. काही कठीण वेळी
आपण ते करू शकतो.
प्रेमाचा एक साधा शब्द…. सकारात्मकता किंवा शक्ती
आणि समर्थनाचे काही प्रेरक शब्द एखाद्याचे जीवन
कायमचे बदलू शकतात. म्हणून प्रेरणा द्या…. आणि
जीवन बदलवा.
मित्रांनो,
🙏😊🙏सोडून गेल्यावर “ᴍɪss ʏᴏᴜ” म्हणण्यापेक्षा
सोबत आहे तोपर्यंत “ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ” म्हणा.
आपुलकीची माणस मिळायला खुप मोठे नशीब लागते.
Best 51+ Marathi Status Suvichar With Images सुविचार संग्रह | Good Thoughts In Marathi
नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळा वर
आपले मनापासून स्वागत आहे.
या पोस्ट मध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे…. Best Marathi Status Suvichar With Images,
अशा छानसा मराठी सुविचार संग्रह
मला विश्वास आहे हा सुविचार संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल
आणि हे सुंदर विचार [ sunder vichar marathi ]
तुम्हाला प्रेरणादायी सुविचार ठरतील. आणि जीवनात प्रोत्साहित करतील.
आपण हरण्याच्या…
जो पर्यंत विचार करत नाही
तो पर्यंत कुणीही
आपल्याला हरवू शकत नाही…!
😉💞🙋
best-marathi-status-suvichar-with-images-सुविचार
त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात…
जे वाट पाहतात.
त्यांना आणखीन चांगल्या गोष्टी मिळतात….
जे प्रयत्न करतात. परंतु…
त्यांना सर्वोत्तम गोष्टी मिळतात…
जे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात…!
जीवन अवघड आहे परंतु अशक्य नाही.
😉💞🙋
स्वःताला कधीही कमी नाही समजायचे….
काम करायचे आणि रुबाबात जगायचे.
😉💞🙋
आयुष्याच्या प्रवासात साथ देणारी माणसे
प्रेमळ आणि जिवलग असली की…
मग वाट कशीही असो प्रवास हा
सुखदायकच होतो….!
😉💞🙋
तेव्हा जीवन खूप सुंदर होईल….
जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी कडे
दुर्लक्ष करायचे हे समजेल.
😉💞🙋
विरोध आणि समर्थन
विचारांचा असावा…..
माणसाचा नसावा.
😉💞🙋
जितका वेळ तुम्ही नात्याला द्याल….
तितके प्रेम वाढत जाते….
जितका अधिक प्रेम तुम्ही कोणावर कराल….
तितका त्याचा तुमच्यावरच प्रेम कमी होत जातो.
😉💞🙋
दोनच लोक अनुभवाच्या गोष्टी
सांगू शकतात…
एक जे वयाने जास्त आहेत.
आणि एक ते….
ज्यांनी लहान वयातच
वाईट दिवस बघितलेले आहेत.
😉💞🙋
पिंजऱ्यातील पाखरे आणि
बंधनात ठेवलेली माणसे
जीवनात कधीच आपली होत नाही.
😉💞🙋
श्रद्धा ही सामर्थ्यवान असते…
कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय
माणूस जिवंत असूच शकत नाही.
😉💞🙋
बाहेरून शांत दिसण्यासाठी
आतून अनेक लढाया
जिंकाव्या लागतात.
आयुष्य म्हणजे झुला आहे….
तो जेवढा मागे जातो….
तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो.
त्यामुळे आयुष्यात घाबरू नका.
दुःख जेवढी येतात तेवढे सुखही
येणार असतात.
😉💞🙋
संवाद संपले की…
नाते संपायला वेळ लागत नाही.
😉💞🙋
जर स्वतःशी प्रामाणिक असले…
तर इतरांना स्पष्टीकरण देण्याची
गरज भासत नाही.
😉💞🙋
रेस गाड्यांची असो
अथवा जिवणाची…
जिंकतात तीच माणसे
जी योग्य वेळेवर
गियर बदलतात…!
😉💞🙋
जर तुम्हाला क्षणिक सुख
पाहिजे असेल तर गाणे ऐका.
जर एका दिवसाचा सुख
पाहिजे असेल तर पिकनिकला जा.
जर एका आठवड्याचा सुख
पाहिजे असेल तर प्रवास करा.
जर एक दोन महिन्यांचे सुख
पाहिजे असेल तर लग्न करा.
जर काही वर्षाचे सुख
पाहिजे असेल तर पैसे कमवा
परंतु जीवनभरचा सुख
पाहिजे असेल तर आपल्या
कामावर प्रेम करा.
😉💞🙋
आज काल लोक आपली चूक
मान्य करण्यासाठी
सॉरी बोलत नाही…
तर फक्त त्यांना विषय
संपवायचा असतो….!
😉💞🙋
ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने
हत्तीवर काही परिणाम होत नाही.
त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष आपल्यावर
कितीही संकटे आली….. तरी
आपल्या ध्येयापासून तो जराही
भटकत नाही.
😉💞🙋
दुसऱ्यांना चिमटा घेऊन बारीक हसणारयांना
एक कळत नाही… जेव्हा त्यांचे कर्म त्यांच्या
जीवनाला चिमटा घेते ना…. तेव्हा सहन करायला
ते एकटेच असतात आणि हसायला मात्र संपूर्ण जग असते…!
😉💞🙋
जिवंतपणीच मरण काय असते…
हे त्या व्यक्तीला विचारा ज्याने
कसलीही चुक नसतांना देखील
आपल्या माणसाचा विश्वास आणि
स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला असतो…!
😉💞🙋
नेहमी संपर्क क्षेत्रात असणारी माणसे
संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाऊ लागली की
समजून जायचे की त्यांनी आता नेटवर्क
बदललेला आहे.
😉💞🙋
तेच लोकं लहान लहान गोष्टीचे
टेन्शन घेतात….
जे प्रामाणिक असतात.
बेईमान लोकांना तर
काहीच फरक पडत नाही.
कारण ते बेशरम असतात.
😉💞🙋
माणसा जवळ धन नसले तरी चालेल…
परंतु प्रेमाने काठोकाठ भरलेले
एक मन मात्र नक्कीच असावे.
😉💞🙋
कुणीतरी मस्त लिहिले आहे.
कधीही माझ्या सहवासाला महत्व देऊ नका…
कारण तो काही क्षणांचा असणार आहे.
कधीही माझ्या देहाला महत्व देऊ नका….
कारण एक दिवस त्याची राख होणार आहे.
जर महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या…
कारण जर का त्या तुम्हाला समजल्या तर…
मी नेहमीच तुमच्या सोबत असणार आहे…!
😉💞🙋
जगातील सर्वात मौल्यवान
रत्न म्हणजे मेहनत आणि
जीवनातील सर्वोत्तम
साथिदार म्हणजे आपला
आत्मविश्वास.
😉💞🙋
गरुडा सारखे
उंच उड़ता येत नाही…
म्हणून चिमणी कधी
उडण्याचे सोडत नाही.
😉💞🙋
जर परक्या माणसांमुळे
आपल्या माणसाला दुखावले….
तर आपले माणूस परके व्हायला
वेळ लागत नाही….!
😉💞🙋
सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा
मिळालेल्या क्षणाला सुंदर करा.
😉💞🙋
दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणे…
हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.
😉💞🙋
माणुसकीला वाव देणारी
माणसे शोधावी….
जीवनात माणुसकीचा
आव आणणारी तर खूप भेटतात…
😉💞🙋
थकलेल्या शरीराला
कुठेही झोप लागते….
तर थकलेल्या मनाला कुठेच
झोप लागत नाही.
म्हणून शरीर थकले तर चालेल…
परंतु मनाला थकवू नका.
😉💞🙋
जगणे हे कुणाचेही सोपे नसते.
आपण सोडून बाकी सगळ्यांचे चांगले आहे
असे फक्त आपल्यालाच वाटत असते.
😉💞🙋
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्या जवळ असतात….
तेव्हा दुःख कितीही मोठे असले
तरी त्याच्या वेदना जाणवत नाही…!
😉💞🙋
साथ देणारी माणसे
कधी कारण सांगत नाही
आणि कारण सांगणारी माणसे
कधी साथ देत नाहीत.
😉💞🙋
Best Marathi Status Suvichar With Images | सुविचार संग्रह
जरी दवाखाना
कितीही मोठा असला…
तरी आपल्या लोकांनी
मनाला दिलेले घाव
कोणत्याच रिपोर्टमध्ये
कळत नाही.
😉💞🙋
माणसाचे मन एक अशी तिजोरी आहे…
ज्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी बिना
चाबिच्या लपवून ठेवल्या असतात.
😉💞🙋
चुकीचा माणूस कितीही गोड बोलला…
तरीही तुमच्यासाठी एक दिवस तो
व्याधी बनून जाणार…
चांगला माणूस कितीही कडू वाटत असला…
तरीही एक दिवस नक्कीच तो औषधी बनून
कामीं येईल.
😉💞🙋 जो माणूस कष्टाला लाजत नाही….
त्याला जगात यशस्वी होण्यापासून
कुणीही थांबवू शकत नाही.
😉💞🙋
marathi status suvichar |आपली माणसे | सुंदर विचार | good thoughts in marathi
प्रत्येकाला तितकेच महत्त्व द्या…
जितके महत्त्व ते तुम्हाला देतात.
जर जास्त महत्व द्यायला जाल…
तर तुम्ही स्वतःची किंमत कमी
करून बसाल.
😉💞🙋
Marathi Status Suvichar With Images -सुविचार संग्रह – sunder vichar
आवडणारी प्रत्येक गोष्ट
आपली असतेच असे नाही.
मनाला समाधान मानून
तिथेच सोडून द्यायची असते.
😉💞🙋
Marathi Status Suvichar With Images -सुविचार संग्रह – sunder vichar
स्तुती तो धोका आहे…
ज्याला आम्ही खूप लक्ष देऊन
ऐकत असतो.
😉💞🙋
Marathi Status Suvichar With Images -सुविचार संग्रह – sunder vichar
इतरांचे भले व्हावे
अशी मनात तळमळ
असावी. परंतु…
ज्यांचे भले झाले आहे…
त्यांच्याविषयी
मळमळ नसावी…
😉💞🙋
मित्रांनो,
जर आपला माणूस पुढे जात असेल…
तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका.
एकदा हात ओढून बघा.
तो पुढे जाईल परंतु…
कदाचित तुम्हालाही
चार पाऊल समोर घेऊन जाईल…
😉💞🙋
जळणारे आणि खेळणारे यांचे
कधीच भले होत नाही. कारण….
ते स्वतःचा बहुतांश वेळ लोकांचे
शाप मिळवण्यातच खर्च करतात.
😉💞🙋
इतके लहान बना की प्रत्येक जण
तुमच्या सोबत बसू शकेल. आणि
इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही
उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला
नसेल.
😉💞🙋
आयते पणाची सवय हे घातकच असते.
कारण…. स्वतःच्या सामर्थ्याची चुणूक
कधीच दाखवता येत नाही.
😉💞🙋
रात्री उशिरापर्यंत जागत राहणारे सर्वच लोक
प्रेमवीर किंवा प्रेमभंग झालेले नसतात.
कधी कधी खांद्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे
सुद्धा शांत झोप येत नाही.
😉💞🙋
कोणाचे लुबाडून खाण्यापेक्षा
कष्ट करून जो मानाने जगतो ना…
त्याला कुठलीही परिस्थिती लढायला
आणि खंबीर व्हायला शिकविते.
परंतु कुणापुढे हात पसरायला लावत नाही.
😉💞🙋
सोनं अंगावर घातले म्हणजे माणूस
मौल्यवान होतो असे नाही.
तेवढ्या कॅरेटची शुद्धता
तुमच्या विचारात असायला हवी…
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
नमस्कार मित्रांनो…. VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले मनापासून स्वागत आहे.
आजच्या या पोस्ट मध्ये आपण कर्मावर काही marathi quotes, sunder vichar, suvichar,
बघणार आहोत.
Motivational Story In Marathi कर्म म्हणजे काय…..? | Sunder Vichar
आपल्या राज्याचे निरीक्षण करण्यासाठी एक राजा एकदा
आपल्या हत्तीवर बसुन राज्यात फिरत होता.
फिरता फिरता तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलावले
आणि त्याला म्हणाला… प्रधान जी, पूर्वी कधीच हा दुकानदार माझ्या पाहण्यात
आला नाही. याला मी ओळखतही नाही…. तरीही माहित नाही का म्हणून
मला या दुकानदाराला फाशी द्यावे असे वाटते आहे.
प्रधान एकदम गोंधळला आणि… तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तिथुन
पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान ते दुकान पाहून ठेवले आणि तो
राजाच्या मागे जायला निघाला.
दुस-या दिवशी गावातल्या त्या दुकानात प्रधान साध्या वेशात पोहोचला.
त्यावेळी दुकानात दुकानदारा शिवाय दुसरे कोणीही नव्हते. दुकानात
जाण्यापूर्वी प्रधानाने आजूबाजूला विचारपूस केली होती. त्यात त्याला
कळले होते की, तो दुकानदार चंदनाचा व्यापारी आहे. आणि चांगल्या
प्रतीचे चंदन त्याच्याकडे मिळते.
प्रधान दुकानात जाताच लक्षात आले की खरोखर या दुकानात सुवर्णवर्णाचे
सुगंधी चंदन आहे. परंतु कोणी घेणारा नसल्यामुले दुकानदार खूपच वैतागला आहे.
चौकशी करता करता समजले की लोकं नुसते येतात…. चंदनाचा वास घेतात….
आणि साधा भाव ही विचारत नाहीत आणि निघून जातात.
रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला खूप वेळा वाटे की किमान राजा तरी मरावा.
जर राजा मेला तर त्या भागात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने
राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल.
माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले
याचा उलगडा झाला.
राजाविषयीच्या व्यापा-याच्या मनातील वाईट विचारांच्या तरंगलहरीनी
राजा या दुषीत वातावरणात आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला
फाशी देण्याचे विचार उद्भवले होते.
त्या दुकानदाराकडून प्रधान ने थोडे चंदन विकत घेतले आणि दुकानदाराला
खूप दिवसानंतर गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला.
प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून
चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने राजा एकदम मोहित झाला.
राजाने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन… ? प्रधानाने त्या व्यापाऱ्याचे नांव
सांगितले. राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले….!
राजाने त्या व्यापाऱ्याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला.
राजा अधूनमधून दुसर्यांना अनमोल भेटी देण्याकरिता चंदन विकत घेऊ लागला.
राजाच्या खरेदीने तो व्यापारी आता आनंदी राहू लागला..आणि आता त्याच्या मनात
आपला राजा मरावे हा विचार येणे बंद झाले.
आपल्या राज्यातील चांगल्या प्रतीचा चंदन व्यापारी म्हणून तो व्यापारी
राजाचा मित्र झाला.
दुसर्यांन विषयी आपल्या मनात जर चांगले विचार…. दयाळूपणा आणला तर
दुसऱ्यांच्या मनातूनही चांगले विचार…. चांगल्या भावना आपल्या पर्यंत येतील
आणि आपली समृद्धी होईल.
मग कर्म म्हणजे काय…..?
अनेकजण म्हणाले…. आपली भावना… आपले शब्द… आपली कृती…
परंतु हेच खरे ही आहे की…. आपल्या मनात येणारे विचार
हेच आपले खरे कर्म होय….!
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
कर्म हे रबरा सारखे असते
तुम्ही त्याला ताणवू शकता
आणि जसे ताणाल तसे ते
तुमच्या कडे परत येईल.
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल
तर तुम्हाला तुमच्या कर्माची
चिंता करावी लागेल…
फळाची नाही.
आपले कर्मच
आपली ओळख आहे….
नाहीतर एका नावाचे तर
करोडों माणसे आहेत.
उशिराच का होईना
कर्माचे फळ मिळतेच.
ज्याचा वर्तमानकाळ
प्रयत्नवादी आहे…
त्याचा भविष्यकाळ
उज्ज्वल आहे.
आयुष्य संपल्यावर
तुमचा धर्म काय आहे…
परमेश्वर बघणार नाही…
परमेश्वर फक्त तुमचे
कर्म बघेल.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
मनुष्य हा कर्माने
महान ठरतो
धर्माने नाही.
आपली चांगली वेळ
जगाला सांगते की
आपण काय आहोत…
परंतु आपली वाईट वेळ
आपल्याला सांगते की
जग काय आहे.
सत्कर्मी माणसाला जीवनात
अडचणी येतात. परंतु
त्या सुटणाऱ्या असतात…
याउलट जो दुसऱ्याला
अडचणीत आणतो…
त्याची अडचण
जीवनभर संपत नाही…
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
तुमची चुक नसतांनाही
जर तुमच्यावर अन्याय होत असेल
तर समजून घ्या कि….
अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस
काही वेळेपुरते मर्यादित आहेत. वाहत्या पाण्याप्रमाणे
चांगले कर्म करत राहा…
वाईट गोष्टी कचऱ्या प्रमाणे
स्वतःहून किनाऱ्याला लागतील.
“नेहमी देवावर निःसंकोच विश्वास ठेवा..
योग्य वेळी तो इतके देतो की…
मागायला काही उरतच नाही…!”
तुम्हाला तेच मिळणार
जे तुम्ही दुसऱ्यांना देणार.
जर तुम्ही धर्म कराल
तर देवाकडून तुम्हाला
मागावे लागेल. आणि
जर तुम्ही कर्म कराल
तर देवाला तुम्हाला
द्यावे लागेल.
परमेश्वरा पेक्षा कर्माची
भीती बाळगा…. एकवेळ
परमेश्वर माफ करेल…
परंतु कर्म नाही.
आपले चांगले कर्म
हे आपल्याला नेहमी
पाहिजे असलेल्या गोष्टी देतात.
चांगले केलेले काम
कधीही वायाला जात नाही.
जरी आज यश मिळाले नाही…
तरी ” क्रिया तशी प्रतिक्रिया ”
या निसर्ग नियमानुसार
ते न मिळालेले यश भविष्यात
माणसाला दामदुप्पटीने मिळते.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
दुसऱ्यांसाठी जगणारेच
खऱ्या अर्थाने जिवंत असतात.
बाकी सर्व जिवंत असूनही
मेल्यासारखे होत.
तुम्ही जे पेरणार…
तेच उगवणार….!
ज्याचे कर्म चांगले आहे
तो कधी संपत नसतो…
कर्माचे फळ मिळण्यासाठी
कोणतीही मुदत नसते.
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
मनुष्य जन्मतः
कधीच भाग्यवान नसतो….
त्याचे नशीब कर्माने घडते.
जे तुमच्यासोबत होऊ नये
असे वाटत असेल तर….
ते इतरांसोबत करू नका.
भगवंत ही त्यांनाच आधार देतो…
ज्यांच्याबरोबर त्यांचे
चांगले कर्म असतात.
या जन्मात केलेल्या
चुकीची शिक्षा….
याच जन्मात मिळते.
त्यालाच कर्म म्हणतात.
जीवनातील कर्मावर आधारित विचार Karma Quotes in Marathi
कर्माची परतफेड करावीच लागते
त्यासाठी कर्म करतांना नेहमी
सजग होऊन कर्म करा. कारण…
ब्रम्हांडातील कोणताही नियम
बदलू शकतो….. परंतु कर्माचा
सिद्धांत कधीही बदलत नाही…!
परमेश्वराने तर
पहिलेच सांगुन ठेवले आहे.
जर माझ्याकडे मागुन
मिळाले असते तर…
भिकाऱ्याला “भिक”
आणि शेतकऱ्याला
“पीक” कधीच
कमी पडू दिले नसते.
त्यासाठी माणसाने
कष्ट करणे हेच कर्म आहे.
जे द्याल तेच परत मिळेल
मग तो आदर असो की धोका.
मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात
उतरवतात…
जैसे ज्याचे कर्म
तैसे फळ देतो रे ईश्वर.
लोक तुमच्याशी कसे वागतात
हे त्यांचे कर्म. त्यावर तुम्ही
कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म.
चांगले करा किंवा वाईट….
जे द्याल तेच परत मिळेल….!
Karma Quotes in Marathi | कर्मावर आधारित सुंदर सुविचार
मित्रांनो, तर हे होते कर्मावर काही सुविचार, सुंदर विचार,Quotes,
आशा करतो आपल्याला हे Marathi Suvichar, नक्कीच आवडले
असतील. जर आपल्याला आवडले असतील तर हे सुविचार, सुंदर विचार, Good Thoughts In Marathi, आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
marathi-suvichar-status-image-मराठी-सुविचार-संग्रह-सुंदर विचार
नमस्कार मित्रांनो… VB Good Thoughts या संकेतस्थळावर
आपले खूप खूप स्वागत आहे.
या मध्ये तुम्हाला नाती सुविचार, नाती स्टेट्स,
relationship quotes in marathi, sunder vichar,
good thoughts in marathi on relationship,
motivational quotes in marathi, वाचायला मिळेल.
तसेच पोस्ट च्या शेवटी
विडीओ आहे तो हि तुम्हाला नक्कीच आवडेल.
marathi-suvichar-status-image-मराठी-सुविचार-संग्रह-सुंदर विचार
हात जोडणारा व्यक्ति
स्वार्थाशिवाय जवळ येत नाही.
आणि पाय ओढणारा व्यक्ति
तुमचे कधीही चांगले बघत नाही.
तेव्हा अशा व्यक्तिंना
दुरूनच नमस्कार केलेला बरा…!
🙋🌹🙏
Marathi Suvichar Status Image मराठी सुविचार संग्रह | सुंदर विचार
तुमच्या श्रीमंतीला पाहून
जवळ येणारे…
त्यांच्या गरजांसाठी…
तुमच्या श्रीमंतीचा वापर करून
घेणारे असतील.
परंतु गरिबी ला पाहून
जे जवळ आलेत….
ते पूर्ण रुपी माणुसकीने आलेत.
त्यांच्यावर कधी संशय घेऊ नका.
🙋🌹🙏
marathi-suvichar-status-image-मराठी-सुविचार-संग्रह-सुंदर विचार
आयुष्यात सत्य
नेहमी पडताळून पहा.
कारण कधीकधी
आपले डोळे सुद्धा धोका देतात.
🙋🌹🙏
हरलात तरी चालेल.
परंतु खेळतांना जिंकणार्याला
घाम फुटला पाहिजे असे खेळायचे.
🙋🌹🙏
marathi-suvichar-status-image-मराठी-सुविचार-संग्रह-सुंदर विचार
तुम्हाला धन्यवाद
म्हणणाऱ्या लोकांची संख्या
तुम्ही जितकी वाढवाल….
तितके तुम्ही जास्त
यशस्वी होत जाल…!
🙋🌹🙏
मदत करणाऱ्याला
कधीही धोका देऊ नका.
आणि धोका देणाऱ्याला
कधीही मदत करू नका.
🙋🌹🙏
Marathi Suvichar Status Image मराठी सुविचार संग्रह | सुंदर विचार
प्रति आव्हान द्यायला शिकले पाहिजे.
जो पर्यंत तुम्ही तो देत नाही….
तो पर्यंत तुम्ही सत्य असूनही
तुम्हाला अन्याय सहन करावा लागतो.
🙋🌹🙏
आयुष्यात काही माणसांना
आपण गमावणार तर काही माणसे
आपल्याला मिळणार…
आपण फक्त जगण्याचा
उत्साह गमवायचा नाही.
🙋🌹🙏
फळा खडू आणि डस्टर आपले
मार्गदर्शक आहेत.
फळा हा मोठ्या मनाचा प्रतिक आहे.
खडू मोठ्या विचारांचा प्रतीक आहे.
आणि डस्टर मोठ्या आचरणाचा प्रतीक
आहे. आपल्या वाट्याला जे काही आले…
ते मोठ्या मनाने स्वीकारा.
नेहमी चांगले विचार ठेवा.
आणि झालेल्या चुका पूसत
योग्य आचरण करा.
🙋🌹🙏
जीवनात खूप माणसे भेटतात…
वार्याच्या झुळके प्रमाणे येतात…
आणि जातात परंतु काही माणसे
अशी असतात… जी मनात जागा घेतात….
हीच गोड माणसे आयुष्याचा अर्थ सांगतात….
ओठांवर हास्य खुलवतात आणि अश्रू ही पुसतात.
कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात
तर कधी मध्येच भावनिक होतात.
परंतु तीच माणसे अशी असतात
जी या दुनियेत आपली असतात.
🙋🌹🙏
marathi-suvichar-status-image-मराठी-सुविचार-संग्रह-सुंदर विचार
शांत राहून
निरीक्षण करायला शिका.
प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे
गरजेचे नसते.
🙋🌹🙏
marathi-suvichar-status-image-मराठी-सुविचार-संग्रह-सुंदर विचार
काही वेळा आपली चूक नसतानाही
शांत बसणे योग्य असते. कारण
जो पर्यंत समोरच्याचा मन मोकळा होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
🙋🌹🙏
Marathi Suvichar Status Image | मराठी सुविचार संग्रह
विचार पॉझिटिव ठेवा.
रिपोर्ट पॉजिटिव आल्याने
जीवन संपत नसते.
🙋🌹🙏
जीवन जगण्याचे सोपे गणित….
जिथे आपला मान नाही तिथे
कधीही जायचे नाही.
जे आपल्याला पचत नाही
ते कधीही खायचे नाही.
ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो…
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही.
जे एकदा नजरेतुन उतरले…
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
वेळ पाहून बदलतो त्याला मित्र
बनवायचे नाही आणि कितीही
संकटे आली तरी कोणालाही
घाबरायचे नाही.
🙋🌹🙏
गैरसमजाचा एक क्षण
इतका विषारी असतो की
तो प्रेमाचे शंभर क्षण
एका क्षणात विसरतो.
🙋🌹🙏
आयुष्याच्या तराजूत
अनुभवाचे वजन नेहमी
जास्त असते.
🙋🌹🙏
आज-काल कोणत्याही ऋतूमध्ये
आभाळ भरून येऊ लागले
माणसावरचे संकट पाहून
जणू सृष्टीलाही गहिवरून येऊ लागले.
🙋🌹🙏
माणसाची समस्या त्या माणसाला जितका त्रास देत नाही…..
त्यापेक्षा जास्त माणसाचे मन त्या माणसाला त्रास देत असते.
नको ते विचार मनात आणून त्या माणसाच्या मनात भीतीचे
वातावरण निर्माण करून ठेवत असते. त्यामुळेच माणूस
दिवसेंदिवस खचत असतो. आणि त्या समस्येतून बाहेर
पडण्यासाठी मार्ग ही शोधत असतो.
परंतु त्या वेळेस त्या माणसाला त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गावर
नेत असते. आणि एका समस्येतून दुसऱ्या समस्येत अडविण्याचे
काम आपलेच मन करत असते.
त्यामुळे जेव्हा जीवनात अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा
आपल्या मनाने शोधून दिलेल्या मार्गावर चुकूनही जायचे नसते,
तर चांगल्या मार्गदर्शकाकडून सल्ला घ्यायचा असतो किंवा
काही काळ केवळ शांतच राहायचे असते.
सुख इथेच असतो….
जसजसे वय वाढत जाते
सुखाचा काळ ओसरत जातो.
🙋🌹🙏
Related Tags :- Relationship quotes in marathi, Relationship status in marathi for facebook,
Relationship status in marathi for whatsapp, Relationship status marathi image,
best Relationship status in marathi, marathi quotes Relationship,
SMS on Relationship in marathi, whatsapp status Relationship in marathi,
Relationship Suvichar in marathi, Relationship SMS in marathi,
नाती मराठी सुविचार, नाती स्टेटस, सुविचार मराठी,
नाती सुविचार | सुंदर विचार Good Thoughts in Marathi On Relationship
फक्त रक्ताच्या नात्यामुळे
कुटुंब बनत नसतो.
कठीण परिस्थितीत हात देणारे ही
कुटुंबाचाच भाग असतात.
🙏💞🙋
Marathi Suvichar Status Image – मराठी सुविचार संग्रह – नाती सुविचार
जर नाते निभावणारा
मजबूत असला तर….
रक्ताची काय…
मानलेले ही नाते
जीवनभर साथ देते…!
🙏💞🙋
Marathi Suvichar Status Image – मराठी सुविचार संग्रह – नाती सुविचार
प्रवासाचा मार्ग
किती ही खडतर असला…
तरी हि एखाद्या सुंदर वळणावर
थोडासी विश्रांती घेऊन…
प्रवासाची परत नव्याने
सुरवात करणे
म्हणजे जीवन….!
🙏💞🙋
Marathi Suvichar Status Image – मराठी सुविचार संग्रह – नाती सुविचार -कुटुंब
आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही,
जर असे वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छान हास्य द्या….
खरोखर ही भेट
इतर कोणत्याही वस्तू पेक्षा
खूपच मौल्यवान आहे.
🙏💞🙋
Marathi Suvichar Status Image – मराठी सुविचार संग्रह – नाती सुविचार -कुटुंब
मन फिरू नये अशी श्रद्धा असावी…
विश्वास ढळू नये अशी भक्ती असावी…
सामर्थ्य संपू नये अशी शक्ती असावी…
कधी विसरू नये अशी नाती असावी.
🙏💞🙋
Marathi Suvichar Status Image – मराठी सुविचार संग्रह – नाती सुविचार
जी माणसे
मनातून उतरली असतात.
ती माणसे नजरेला
जराही सहन होत नाहीत…!
🙏💞🙋
क्षणभर का होईना….
जगावे आणि मगच मरावे.
वेदनांवर का होईना….
परंतु एकदा तरी प्रेम करावे…
🙏💞🙋
चांगुलपणा – वाईटपणा माणसाच्या
आपल्याच हातात असते.
कुणी बांबू चा बाण बनवून कुणाला
जख्मी करीत असतो…
तर कुणी बासुरी बनवून
बांबू मध्ये संगीत भरत असतो…
जर वाईटपणा शोधायचा छंद आहेच तर…
आरशाचा उपयोग करा… दुर्बिण चा नाही…!
🙏💞🙋
काही माणसे दिसायला तर
खूपच साधी आणि सरळ दिसतात….
परंतु समजायला खूप वाकडी असतात
साहेब…!
🙏💞🙋
आनंदी चेहरा
आपला रुबाब वाढवितो…
परंतु आनंदाने केलेला काम
आपली ओळख वाढवितो…!
🙏💞🙋
मूर्ख लोक नेहमी स्वतःला
खूप बुद्धिमान समजतात.
परंतु बुद्धिमान लोक नेहमी
स्वतःला मूर्ख समजतात…!
🙏💞🙋
पुरुषांचा उंच आवाज
एखाद्या स्त्रीला गप्प करतो.
परंतु स्त्रीचे शांत राहणे
पुरुषाचे मनोबल खच्चीकरण करते.
🙏💞🙋
एक रस्ता निवडा,
त्यावर विचार करा.
त्या विचाराला
आपले जीवन बनवा.
त्याचेच स्वप्न बघा.
यशाचा हाच मार्ग आहे.
– स्वामी विवेकानंद
🙏💞🙋
हे जीवन
असेच जगायचे असते.
जे ही घडले,
त्याला सहन करायचे असते.
बदलत्या युगा बरोबर
बदलायचे असते.
कुठून सुरू झाले…
जरी हे माहीत नसले…
तरीही कुठेतरी
थांबायचे असते.
🙏💞🙋
कुणासाठी काहीतरी
निस्वार्थपणे करायचे असते
स्वतःच्या सुखापेक्षा
इतरांना सुखवायचे असते
दुःख आणि अश्रुंना
मनात कोंडूनच ठेवायचे असते.
जरी हसता नाही आले
तरीही हसवायचे असते.
🙏💞🙋
पंखामध्ये बळ आल्यावर
घरटे सोडायचे असते
आकाशात झेपावूनही
धरतीला विसरायचे नसते
जरी मृत्यू ने अगदी
समोर येउन आपला
जीव ही मागितला तरी…
मागुन मागुन काय मागितलेस
असेच म्हणायचे असते.
परंतु जग सोडतांना मात्र
समाधानाने जायचे असते.
🙏💞🙋
गरिबाच्या प्रेमळ स्वभावाला
झिडकारले जाते… आणि
श्रीमंताचा रागीट स्वभावाला
हसत हसत स्विकारले जाते.
🙏💞🙋
माणसाचे वेगळेपण
हे मरेपर्यंत असते.
जस जसे आपण एखाद्या
व्यक्तीच्या जवळ जाऊ
तसा तसे त्या व्यक्तीचे
अनेक रूप अनेक प्रसंगी
आपल्याला अनुभवायला
मिळतात.
काही मोहक असतात
तर काही कठोर…
आपल्याला सगळे स्वीकारणे
जमले की समजावे
आपल्या मनाने पूर्णतः
समर्पण केलेले आहे प्रेमात.
ज्याने प्रेमात समर्पण केले नसते
ते तिथून वाट बदलतात.
🙏💞🙋
माणूस उगाच शांत राहत नसतो….
काही दुःख माणसाचा आवाज
हिसकावून घेतात.
🙏💞🙋
मन आणि मनाच्या भावना
कितीही दाबून ठेवल्या
तरी पण त्याच्या हृदयात
जर खरंच आपण असतो
तर त्याला मात्र मन आणि
भावना दोन्ही ही अगदी
सहज समजतात.
🙏💞🙋
दुःखाला थोडेसे आपलेसे करा…
मग होणाऱ्या वेदना ही हळूहळू
ओळखीच्या होऊन जातील…!
🙏💞🙋
नशिबात नाही म्हणून
जीवनभर दुखी राहण्यापेक्षा
समाधानी कसे राहता येईल
हे ज्याला समजले ना
तो खरा जीवन जगायला शिकला…
🙏💞🙋
सुख – दुःखाची
मनाला होणारी जाणीव
म्हणजेच आठवण.
🙏💞🙋
कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती
असल्याशिवाय निष्कर्ष
लावत जाऊ नका
अशाने केवळ
गैरसमज वाढतात.
🙏💞🙋
जीवन जगत असतांना
कशाचे तरी वेड पाहिजेच…!
🙏💞🙋
ये माझ्या विचारांनो थांबा ना रे…
जरा एका दिवसाची सुट्टी घ्या….
उगाच येऊ नका आता
थोडा डोक्याला आराम द्या.
🙏💞🙋
तावातावाने येता नेहमी आणि
मनाचा संपूर्ण ताबा घेता.
मनाला विचलित करून
डोळ्यांमधून वाहूनही जाता.
🙏💞🙋
नाते टिकवण्याची सुंदर कला
कधी आनंदाने येता आणि
माझ्या मनाला लांब नेता.
आनंदित करून तनमन सारे
उंच उंच झोके घेता.
🙏💞🙋
असेच राहता थांबून….
नाव ही कधी घेत नसता जाण्याचे….
जप – तप… ध्यान… योगा….
काय काय म्हणून करायचे.
🙏💞🙋
खरे तर तुमच्याच मुळे
मी घडत असतो…. परंतु
एका दिवसाने तरी कुठे
बिघडतो…
होऊन निर्विचार कधी…
अशाच फिरुन शेवटी
मी मलाच सापडतो…!
🙏💞🙋
स्वभाव म्हणजे रंगाची पेटी….
स्वतःचे चित्र रंगवत असतांना
दुसऱ्यांची चित्र बिघडणार नाहीत…
याची काळजी घेतली तर…
आपले रंग सूद्धा छान फुलतात.
🙏💞🙋
निस्वार्थी जगायचे ठरवले की
जीवाला जीव देणारी माणसे ही
भेटत जातात.
🙏💞🙋
नाते टिकवण्याची सुंदर कला
स्वतःसाठी नाही…
तर दुसऱ्यांसाठी जगा.
कारण लोकं कमावण्यात
जो आनंद आहे…
तो कशातच नाही…!
🙏💞🙋
मला एक आजार झाला आहे
विसरण्याच्या….
कुणी कितीही टोचून बोलले तरी
काही वेळातच मला काहीच
आठवत नाही. आणि तसेच माझ्यात
एक दोष ही निर्माण झाला आहे…
जर कुणी आपुलकीने
दोन शब्द जरी बोलले तरी
लगेच छपाई प्रमाणे
काळजावर कोरले जातात.
त्यांना कितीही मिटवण्याचा
प्रयत्न केला तरी
मिटता मिटत नाही.
🙏💞🙋
जे जीवन आपल्या वाट्याला
आले आहे ते आनंदाने जगणे.
त्या जीवनातील
रस किंवा सुगंध शोधणे….
तो सर्वांना आनंदाने देणे… हा
सुखी होण्याचा
सर्वात सोपा मार्ग आहे.
🙏💞🙋
नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा
जास्त किंमती आणि मौल्यवान आहे.
हा गुण त्याच्या कडे आहे त्याच्या भोवती
किती बलाढ्य स्पर्धक असले तरी तो
जीवनात नक्कीच यशस्वी होतो.
🙏💞🙋
तेवढेच बोला जेवढे ऐकू शकता….
कारण लोकांना ही तोंड असतो.
🙏💞🙋
मित्रांनो हे नाती मराठी सुविचार [ good thoughts in marathi on relationship ]
सुविचार मराठी आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करायला विसरू नका.
आभार…. धन्यवाद 🙏
नाती सुविचार | सुंदर विचार Good Thoughts in Marathi On Relationship