Home Blog Page 25

Mindset Good Thoughts Marathi – suvichar – sunder vichar

0
mindset-good-thoughts-in-marathi-suvichar-sunder-vichae
mindset-good-thoughts-in-marathi-suvichar-sunder-vichae

कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करत आहात…?

मग हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

 

नमस्कार,
माझ्या वाचनात आलेली माहिती मी तुमच्यासोबत शेयर करीत आहे…

या लेखाचा राजनीती किंवा कुणावर टिका अशा कोणताही विचार
माझ्या मनात नाही आहे. आणि आपणास ही आग्रहाची विनंती आहे की
आपण ही अशा अर्थ काढून घेऊ नये.

Mindset | Good Thought Marathi | sunder vichar

भारतात Computer आयात करण्यासाठी लागणारा Tax ( कर ) कमी करावा का…?
या विषयावर एकदा पंतप्रधान श्री राजीव गांधी आपल्या कार्यालयात काम करत
असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत बोलत होते.

बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने श्री राजीव गांधींना प्रश्न विचारला की…
तुम्ही ह्या विषयावर तुमच्या मंत्रिमंडळा सोबत का बोलत नाही…?

यावर राजीव गांधी म्हणाले की… माझ्या मंत्रिमंडळात सर्व म्हातारे आहेत.
त्यांना हे सगळे कळणार आहे का…?

एक व्यक्ती हे राजीव जी आणि अधिकारी यांच्यातील बोलणे ऐकत होते
ते व्यक्ती होते श्री पी. व्ही. नरसिम्हा राव.
त्यावेळी ते देशाचे रक्षा मंत्री होते आणि त्यांची वय ६४ वर्षं होती…!

थोडे विचार करा… समजा हे शब्द त्याच वयाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या कानावर
आले असते तर त्या व्यक्तीने काय केले असते…? किंवा दुसऱ्यांचे जाऊ द्या…
तुम्ही काय केले असते…?

नरसिम्हा रावांनी काय केले तर… त्यांनी त्यांच्या अमेरिकेत राहत असलेल्या
मुलाला फोन लावला. मुलाने फोन उचलताच पहिला प्रश्न विचारला की…
हे कॉम्पुटर म्हणजे नक्की काय आहे…?

नंतर त्यांनी अमेरिकेतून एक Computer मागवून घेतला. आणि काही स्वतः
Computer च्या काही भाषा शिकून घेतल्या. नरसिम्हा रावांनी नुसते शिकूनच
समाधान मानले नाही, तर….

FORTRAN ह्या प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरणात कसे सुधार करता येईल ह्यासाठी
त्यांनी IBN ह्या नावाजलेल्या कंपनीला पत्र पण लिहिले…!

नंतर श्री पी. व्ही. नरसिम्हा राव जेव्हा १९९२ मध्ये भारताचे पंतप्रधान झाले
तेव्हा त्यांनी Computer आयातीवरचा Tax मध्ये पूर्णपणे सुट दिली.

जे काम राजीव गांधींना चारसे पेक्षाही अधिक खासदार असतांना सुद्धा
जमले नाही… ते श्री पी. व्ही. नरसिम्हा राव ह्यांनी दोनशे पन्नास पेक्षाही
कमी खासदारांच्या जोरावर करून दाखविले…!

सॉफ्टवेयर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना 10 वर्षांसाठी Tax देण्यापासून पण सूट दिली.
वरील दोन घोषणांमुळे भारत सॉफ्टवेयर क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास आला.

सामान्य कुटुंबांच्या कर्तबगार मुला – मुलींचे नौकरीसाठी नेत्यांच्या आणि
अधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवणे बंद झाले आणि आत्मविश्वास असलेला
एक नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला.

इंफोसिस पासून तर विप्रो पर्यंत आणि फ्लिपकार्ट पासून तर OLA पर्यंत सर्वांचे
उगमस्थान हा एक नेता आणि त्यांची ती एक पॉलिसीच ठरली…!

आपल्या मनात विचार येत असेल कि हे मी सगळे तुम्हाला कशाला
सांगत आहे…?

Carol Dweck ( American Psychologist ) म्हणून एक लेखिका आहेत.
त्यांचे Mindset नावाचे एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी दोन प्रकारच्या लोकांचे
वर्णन केले आहे.

पहिला प्रकार :- Fixed Mindset या प्रकारच्या लोकांना नेहमी असे वाटत असते की…
माहिती… बुद्धी… आणि कौशल्य ( knowledge, talent, skill ) या सगळ्यांना वयाच्या…
जातीच्या… आणि लिंगाच्या मर्यादा असतात.
दुसरा प्रकार :- Growth Mindset या प्रकारच्या लोकांच्या तोंडून तुम्हाला कधीही…
मला ही अमुक गोष्ट येत नाही… समजत नाही… किंवा हे मला पटत नाही आहे…!
असे शब्द ऐकायला येणार नाही. जास्तीत जास्त सध्या मला हे अमुक समजत नाही…
येत नाही… किंवा पटत नाही… असे ऐकायला येईल…!

उदाहरणार्थ खालील वाक्य बघा पाहू…

माझ्या दुकानात जास्त वस्तूंची विक्री होत नाही आहे…
माझ्या दुकानात सध्या जास्त वस्तूंची विक्री होत नाही आहे…

मला नौकरीच मिळत नाही आहे…
सध्या मला नौकरी मिळत नाही आहे…

आता किंवा सध्या या एका शब्दामुळे किती फरक पडला जाणवत आहे ना…?
ह्या एका शब्दांमुळे हे अनुल्लेखित होते की आपण सध्या ज्या परिस्थितीत
आहोत ती परिस्थिती कायमस्वरूपी नाही आहे… तात्पुरती आहे.
बरोबर पाऊले उचलली तर ती बदलता येऊ शकते.

आता लॉकडाऊन सगळीकडे उघडलाच आहे… आता हा पूर्णपणे उघडल्यावर
जी वेळ आली आहे… ती कुणासाठी खूप कठीण होऊ शकते…

काहींच्या हाती कामच राहणार नाही… काहींच्या नौकऱ्या धोक्यात येऊ शकतात
आणि काहींना व्यापारात खूप मोठे नुकसान होऊ शकते…! आपण हे लक्षात ठेवणे
आवश्यक आहे की ही आलेली वेळ तात्पुरती आहे…. कायमस्वरूपी नाही.
आपणाला आपल्या मेहनत, जिद्द, अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर ही
बदलता येऊ शकते.

हाच Growth Mindset तुमच्यात नेहमीच राहो आणि येणारा काळ तुमच्यासाठी
भरभरून प्रगतीच्या संधी घेऊन येवो…!
धन्यवाद

 

 

 
 
 

मराठी बोधकथा – Marathi Moral Story – Be Positive – छान विचार

0
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb- marathi-bodhkatha-मराठी-बोधकथा
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi

मराठी बोधकथा – Marathi Moral Story – Be Positive – छान विचार

एका राजाचे त्याच्या हत्तीवर खूप प्रेम होते… तो हत्ती ही खूप चांगलाच स्वामीभक्त होता. 
तसेच चांगला योद्धा ही होता. त्या हत्तीवर बसून राजाने जेव्हाही युद्धकेले त्याला
विजयीच झाला.
 
काही वर्षात हत्ती म्हतारा व्हायला लागला… आता राजानेही आता त्याला युद्धात 
घेवून जाणे बंदच केले.
 
एक दिवस हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत असतांना अचानक त्याचा तोल गेला
आणि तो सरोवराच्या चिखलात फसला आता त्याला उभेच होता येत नव्हते.
हत्ती ने खूप प्रयत्न केले पण त्याच्या वृद्धावस्थेमुळे त्याला चिखलातून निघणे शक्य नव्हते… 
आता तो जोरजोरात ओरडू लागला. हत्तीचा आवाज माहूत ने ऐकल्यावर तो धावतच
हत्तीच्या जवळ आला.
परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला
भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो आपली पूर्ण शक्ती
लावून प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.
भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
ही बातमी राजापर्यंत गेली. 
राजाने लगेच त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले.
माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.
थोडा वेळ विचार करून माहूतने राजाला सल्ला दिला की….
महाराज…! आपण आत्ताच युद्धाचे नगारे वाजवा, या सरोवरा भोवती
सैन्य जमा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा. 
राजाने त्या जुन्या महुताचे विचार ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा आदेश दिला. 
राजाचे आदेश मिळताच नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या.  
आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. 
त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या चिखलातून बाहेर पडला.
त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले
आणि बक्षीस दिले.
Be Positive – छान विचार
लक्षात ठेवा….. 
निराशावादी विचार ठेवल्याने
कधीच यश मिळत नाही.
सकारात्मक विचारसरणी
असल्यास प्रगती होते.
छान विचार
जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते ..
आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल
तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते…!

त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi – Sunder vichar

0
त्रासाची खुंटी - Good Thought In Marathi - Sunder vichar
त्रासाची खुंटी - Good Thought In Marathi - Sunder vichar

त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi –
Sunder vichar

मामांच्या ऑफिसात त्यांच्याच लांबच्या नात्यातला एक भाचा कामाला होता.
त्यांचे नाते जरी दूरचे असले तरी कामात मात्र दोघे काम मिळून करायचे…
पूर्ण प्रामाणिकपणाने.

सध्या ऑफिसच्या कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप
वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग
हे रोजचेच झालेले.

मामांना परिस्थिती पाहून वाटायचे…
आता सहन होत नाही…! ऑफिसमध्येही
खूपच त्रास होत आहे आणि आणि घरीही
शांतता नाही….

असे स्वतःशीच बोलत मामा घरी
जायला निघाले.

त्यांचा भाचा ही घरी जायच्या तयारीत होता…
दोघेही ऑफिसच्या बाहेर सोबतच आले.
मामाने भाच्याला म्हटले… चाल माझ्यासोबत
आज मी घरी सोडतो तुला…
भाचा मामाच्या कार मध्ये बसला…

त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi –
Sunder vichar

भाच्याचे घर ऑफिस पासून थोड्याच अंतरावर होते
रस्ता दोघांचा एकाच होता… १० मिनिटांत भाच्याचे
घर हि आले, वेळ कसा गेला हे दोघांनाही कळले नाही.

 गाडीत दोघेही मौनच होते, पण विचारांचा गोंधळ
दोघांच्याही डोक्यात होताच. घरी पोहोचल्यावर
भाच्याने मामाला चहा घेऊन जा असे म्हटले.

तसा उशीर झालेला होता, तरीपण मामा गाडी बाहेर
आलेच कारण घराजवळ येऊनही आत न जाणे बरे
दिसले नसते म्हणून फक्त पाच मिनिटांकरिता येतो
असे मामा म्हणाले.

घराच्या दाराशी भिंतीवर एक खुंटी होती. भाच्याने त्या खुंटीवर
हात फिरवला… काहीतरी केले…. मामा बघत होते पण त्यांना
ते काही कळले नाही. नंतर त्याने दाराची बेल वाजवली.
दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले.

त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, पोहचलो एकदाचा.
किती छान वाटत आहे… आता तू मामांसाठी छान
चहा आण पाहू.

 समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली
व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले.
मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्चर्याचा धक्काच
बसला.

त्रासाची खुंटी – Good Thought In Marathi
Sunder vichar

ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक
एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला…?
गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती
की हे घरातले हसणे – खिदळणे आणि आनंद…?

मामांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन मामा निघाले.
भाचा मामांना सोडण्यासाठी गाडीपर्यंत आला.
गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले…
बेटा मला तुझ्या दोन गोष्टी कळल्या नाहीत…!
तू त्या भिंतीवरील खुंटीला काय केलेस…?
आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे…?

त्यावर भाचा म्हणाला, मामा मी दरदिवशी घरी आलो
की या खुंटीवर माझे सर्व त्रास टांगतो आणि नंतरच
घराच्या आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच
प्रसन्न होतो…!

दुसर्‍या दिवशी घरून निघतांना पुन्हा आपले त्रास
त्या खुंटीवरून उचलतो. पण मामा काल टांगलेले
काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी
त्रास खुंटीवर सापडतच नाहीत.

Also Read :-

125+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी

255+ Marathi Suvichar | आत्मविश्वास वाढविणारे मराठी सुविचार

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Anniversary

0
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Anniversary

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife

बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात…! 

म्हणजे बायको ही आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे… 
पण इंग्रजीत बायकोची ओळख करून देतांना  ” My Better Halfअसे म्हणतात. 
म्हणजे आपल्यापेक्षा बायको ही काकणभर सरसच आहे असे त्यातून सुचवतात.

आयुष्यातल्या चढउतारात, सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून मला साथ देणारी 
माझ्यापेक्षा सरसचं…!

पत्नी,आई,सुन,बहिण,मावशी काकी अशा कित्येक नात्यात वावरताना ती नेहमीच माझ्यापेक्षाही 
उत्कृष्टच ठरली आहे. 
अशीच कायम आनंदी रहा. माझ्या आयुष्यात आनंद पसरवत रहा.

उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस…
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो. खरेतर बायकोही एक मैत्रीण असते… प्रेयसी असते…
ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात…
अशीच माझी बायको समजूतदार…. नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी…घरसंसारात रमणारी….

जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको… मैत्रीण आणि बरीच काही…!

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या वैवाहिक जीवनाला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत….
मागे वळून पाहतांना या वर्षात तुझ जराही प्रेम कमी झाले नाही.
आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात संघर्षात माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहणारी
बायको मिळाल्याबद्दल नक्कीच आजच्या प्रसंगी तुझे मनापासून आभार मानले पाहिजेत.

नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे.
तु आहेस म्हणून मी आहे बस्…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

पुन्हा एकदा तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आज आपल्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली… नाती चारामिचा मंत्र जपत…
मी तुझा हात हातात घेतला…!
आई-वडिलांच्या उंबेरठ्याची चौकट ओलांडून तू माझ्या जीवनात आलीश आणि वर्तुळ पूर्ण झाले.
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभले.
नेहमी सकारात्मक… नकारात्मकता च्या निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी….
तुझ्या येण्याने मला लौकीकाचे भान दिले…
यु मला काय दिलेस…! याचा हिशोब करणे सोडून दिले आहे मी…!
तसेही तारे मोजणे मला कधीही जमलेच नाही…!
मान्य आहे मला पूर्णपणे… अगदी तु ही स्वयंभू नाही आहेस ते…
पण तुझ्या असण्याने मला असण्याचा अस्तीत्व दिला आहे…!
खरे सांगू अगदी मना पासून… लोक भलेही तुला माझी अर्धांगीनी म्हणोत…
पण माझ्यासाठी मात्र तू माझे पूर्णत्व आहेस…!

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - to wife wishes

हे बंध रेशमाचे 
एका नात्यात गुंफलेले 
लग्न…. संसार…. आणि
जवाबदारीने फुललेले
आनंदात नांदो संसार तुमचा

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - to wife wishes

झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू…
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलीस तू.
 
मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगली निभावलीस तू…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू…
 
अशीच राहा हसत खेळत 
हेच एक सांगणे आहे….
अशीच प्रगती होऊ दे तुझी 
हेच देवाकडे मांगने आहे.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - to wife wishes
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा – Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस 
            कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
           कधी चिडलो… कधी भांडलो… कधी झाले भरपूर वाद… 
    पण दुसर्‍याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साथ…

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - to wife wishes

तू आहे म्हणून तर… 
सगळे काही माझे आज आहे…
हे जरी नसले तरी
तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - to wife wishes

             या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे… 
          सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे…
आली गेली कित्येक संकटे तरीही…
           न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट नक्की बघा

Bayko Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या 

आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…? | सुंदर विचार | छान विचार मराठी

0
मराठी-सुविचार-फोटो-सुंदर-विचार-चांगले-विचार-marathi-suvichar-with-images-man-life-aayushya
मराठी-सुविचार-फोटो-सुंदर-विचार-चांगले

आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…? |

सुंदर विचार | छान विचार मराठी

आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…?

एकदा एकाभौतिकशात्राच्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थीयांना
प्रश्न विचारला….
तुम्ही जे पण वाहन चालविता… सायकल, मोटारसायकल किंवा
कारयामध्ये ब्रेक्स का लावलेले असतात?
 
या प्रश्नावर विद्यार्थ्यांन कडून खूप वेगवेगळी उत्तरेआलीत..
जसे… वाहन थांबण्यासाठी
वाहनाचा वेग कमी करण्यासाठी
होणारे अपघात टाळण्यासाठी
परंतू सर्वात चांगले उत्तर होते
आपल्याला त्या वाहनाने खूपजास्त वेगाने जाता येण्यासाठी…!
 
 
आता असे कसेथोडा विचार करा.
तुमच्या वाहनामध्येजर ब्रेकच नसते तर तुम्ही जास्तीत जास्त
किती वेगाने आपला वाहन चालवाल?

आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…?

तुमच्या वाहनाला ब्रेक आहेत म्हणूनच तुम्ही वेगाने वाहन
चालवण्याचे साहस करू शकता… हिंमत करू शकता…
तुम्हाला जिथेही जायचे असेल तिथे पोहोचू शकता…
 
याच प्रमाणे तुम्हाला आयुष्यातही आईवडील, सासुसासरेकुटुंब
इत्यादी रूपात ब्रेक्स मिळतात. ते तुम्हाला नेहमी टोकत असतात…
वेळेवर अडवतात… काही शंकाकुशंका उभ्या करतात… नेहमी तुमच्या 
रस्त्यात नेहमी अडथळे आणण्याचे काम करतात. असे लोक तुम्हाला 
खूप राग आणतात. 
 
परंतु लक्षात ठेवाआयुष्यात वेळोवेळी आलेल्या अशा ब्रेक्समुळेच
तुम्ही आज आहे ते स्थान मिळवू शकला आहात.
जर असे ब्रेक्स नसते तर तुम्ही कुठतरी भटकले असता.
अपघातात किंवा कोणत्यातरी संकटात सापडला असता.
म्हणूनच आपल्या आयुष्यात कधी-कधीयेणाऱ्या अशा ब्रेक्सची
जाण ठेवा.

मित्रांनो आता कळले…. आपल्या वाहनाला ब्रेक्स का असतात…?

मन ओळखणारयांपेक्षा…
मनाला जपणारी माणसे हवीत.
कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात…
तर जपणारी ही आयुष्यभरासाठी असतात…!

जीवन कठीण अजिबात नसते..! – सुंदर मराठी कविता | Sunder Vichar

0
जीवन कठिन अजिबात नसते-sunder-vichar-marathi-suvichar-jiwan-good-thoughts-in-marathi-on-life-vb-vijay-bhagat
sunder-vichar-marathi-suvichar

जीवन कठीण अजिबात नसते..! – सुंदर मराठी कविता | Sunder Vichar

 

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी नळाला पाणी नसते…
तर कधी पाणी असून सूद्धा….
एक घुट देणारे कुणीही नसते…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी पगार झालेला नसतो…
तर कधी झालेला पगार उरलेला नसतो…!
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा…?
हा प्रश्न सुटलेला नसतो…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी जागा नसते…
तर कधी जागा असली तर पोकळी नसते…!
कधी तर जागा आणि पोकळी दोन्ही असली….
तरी त्यात नात्याची उब नसते…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी डब्यात आवडती भाजी नसते…
तर कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते…!
आणि कधी दोन्ही ही मनासारख्या असल्या
तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग च्या वासात
आपली इच्छा अडकलेली असते…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी कोणी सोबत असून सूद्धा एकटेपणा असतो…
कधी कोणी सोबत नसतांनाही उगाच
भरल्या – भारावल्या सारखे वाटते…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी काही शब्द कानावर पडतात…
तर कधी नको ते शब्द कानावर आदळतात…!
कधी हव्या असलेल्या माणसांकडून
नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून
अनपेक्षित अनुभव येतात…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी आपण कसे वागायचे हेच समजत नाही…
कधी समोरचा असा का वागत आहे…
याचे उत्तर मिळत नाही…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही…
कधी तर कुणाचे आभार मानायचे हेच उमजत नाही…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी डोके टेकायला जागा सापडत नाही…
कधी जर जागा सापडलीच तर
नमस्कार करायची इच्छा होत नाही…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी कुठे कठोर आणि कुठे नरम वागायचे
हेच समजत होत नाही…
कधी समोरचा / ची आपल्याला अकारण
हक्काचा / ची वाटू लागते…!
कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क
आपल्याला नकोसा वाटू लागतो…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

कधी पैसा असला की नात्यांच्या मोह होतो
आणि नाती असली की… त्यांच्या गरजा… मौज…
पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो…!

जीवन कठीण अजिबात नसते..!

मित्रांनो जर यात अजून जर ५-६ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा….
याहून वेगळे आपण काय जगतो…?
ताण घेतला तर तणाव…
आजचे भागले म्हणून आनंद आणि उद्याचे काय म्हणून चिंता
हेच आयुष्य कठीण करते…

जीवन कठीण अजिबात नसते..!

आपण नदी सारखे जगावे… सतत वाहत राहावे….
Life is living… For Happily..

Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी

1
Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी
Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी

Sunder Vichar Status | Marathi Suvichar | छान विचार मराठी

नमस्कार मित्रांनो….

या पोस्ट मध्ये आपल्यासाठी छान विचार, सुंदर मराठी सुविचार, प्रेरणादायक सुविचार, सकारात्मक सुविचार, सुविचार स्टेटस, suvichar status, marathi quotes, motivational suvichar, sunder vichar marathi, असे वेगवेगळे सुविचार वाचायला मिळतील.

खास सुविचारांचे…. सुविचार फोटो, suvichar with image, सुविचार फोटोसह ही असणार. हे सुविचार वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल…. सकारात्मक शक्ती मिळेल, नक्की वाचा आणि आपल्या मित्र, नातेवाईकांना facebook, wahatsapp, instagram, वर शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद

देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता…?
यापेक्षा देवाकडे पाठ असतांना तुम्ही कसे वागता
यावरच खूप काही गोष्टी अवलंबून असतात…!

💐💞🕉️🌈💯

Sunder-Vichar-Status-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-VB-Thoughts-मराठी-सुविचार -dev

marathi-suvichar-मराठी-प्रेरणादायक-सुविचार

जीवनात संगतीला खूप महत्व आहे…!
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते.
आणि विचार सोबतच्या व्यक्तीं मधुन येतात.

💐💞🕉️🌈💯

Sunder-Vichar-Status-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-VB-Thoughts-मराठी-सुविचार -dev
जीवनात संगतीला खूप महत्व आहे.

भावनांच्या तव्यावर
स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसे
आपली कधीच नसतात.
कारण नात्यांचे पाणवठे त्यांना फक्त
तहान लागल्यावरच दिसतात…!

💐💞🕉️🌈💯

Sunder Vichar Status - Marathi Suvichar-छान विचार मराठी -

 

कमाईचा अर्थ केवळ
धन मोजणेच असा नाही…..
तर अनुभव…. नाती….
मान….. सन्मान…. संस्कार….
आणि वागणूक….. हे सुद्धा
कमाईतच मोजले जाते.

💐💞🕉️🌈💯

Sunder Vichar Status - Marathi Suvichar-छान विचार मराठी -

केवळ संशयावरून
कोणालाही आरोपी समजू नये.
कारण चित्र स्पष्ट झाल्यावर
कदाचीत पश्चाताप करायची
संधी मिळणे कठीण होऊ शकते.

💐💞🕉️🌈💯

Sunder-Vichar-Status-मराठी-प्रेरणादायक-सुविचार-VB-Thoughts-मराठी-सुविचार -संशय
मराठी-प्रेरणादायक-सुविचार-VB-Thoughts-मराठी-सुविचार -संशय

सुख – समाधान सत्यात असते…
मिथ्यात नसते. आजपर्यंत
आपण विषय उपभोगले परंतु
त्यात आपल्याला सुख झाले नाही….
मग विषय मिथ्या आहेत याची
भगवंताने तुम्हाला प्रचीती नाही का दिली….?
तरी सुद्धा तुम्ही या विषयांतच
प्रपंच कसा सुधारेल असे
सद्गुरूंना विचारात असतो.
याला काय म्हणावे…?

💐💞🕉️🌈💯

Sunder Vichar Status - Marathi Suvichar-छान विचार मराठी -

लागलेली भुक…. नसलेले पैसे…..
तुटलेले मन….. आणि मिळालेली वागणुक….
जे आपल्याला शिकवते…. ते जीवनात
कोणतीही डिग्री घेतली…. तरी शिकता
येत नाही. म्हणुन देवाने जे दिले आहे
त्यातले थोडसे इतरांना देऊन पहा…
आणि देव होता आले नाही तरी
माणूस होऊन पहा…..!

💐💞🕉️🌈💯

वाळू मध्ये पडलेली साखर
मूंगी सहजपणे खावू शकते.
परंतु हत्ती साठी ते अशक्य आहे…
म्हणून छोट्या माणसांना कधी
छोटे समजू नका.
कधी कधी छोटी माणसे सुध्दा
मोठ मोठी कामे करून जातात.

💐💞🕉️🌈💯

कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका.
जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुध्दा
मान वाकवूनच घेत असतात……

💐💞🕉️🌈💯

भगवान श्री कृष्णाने
खूप मोठी गोष्ट सांगितली आहे….
जर तुम्ही धर्म कराल…
तर देवाकडून तुम्हाला मागावे लागेल…
आणि जर तुम्ही कर्म कराल…
तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल….!

💐💞🕉️🌈💯

प्रेम आणि आनंद देणारे व्यक्ती
आपल्या सहवासात असणे….
ही निसर्गाची एक देणगी असते.
अशी व्यक्ती लाभणे….
हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल
परतफेड होय….!

💐💞🕉️🌈💯

चुकणे हि ‘प्रकृती’….
मान्य करणे ही ‘संस्कृती’…..
आणि सुधारणा करणे ही
प्रगती’….. आहे.

💐💞🕉️🌈💯

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो…. तर समजून
घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

💐💞🕉️🌈💯

एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही
गमावण्याची जास्त भीती वाटते….
कारण हरवलेले एकवेळ शोधता तरी येते
परंतु गमावलेले पुन्हा कधीच सापडत नाही.

                                                        💐💞🕉️🌈💯

केवळ संशयावरून कोणालाही आरोपी समजू नये | Sunder Vichar Status | Marathi Suvichar | सुविचार स्टेटस

आपल्या स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय
स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा
उत्पन्न होत नाही.

स्वाभिमान-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status-vb-good-thoughts
स्वाभिमान-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo

जर प्रेम असेल तर राग हा येतोच
आणि राग हा केवळ हक्काच्या
माणसावरच येतो.

जर-प्रेम-असेल-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status-vb-good-thoughts
जर-प्रेम-असेल-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo

जीवन म्हणजे नुसता पत्त्यांचा खेळ आहे.
चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसतेच.
परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे
यावरच आपले यश अवलंबून असते.

जीवन-म्हणजे-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status
जीवन-म्हणजे-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी

दवाखाना जरी कितीही मोठा असला
तरी आपल्या लोकांनी मनाला दिलेले घाव
कोणत्याच रिपोर्ट मध्ये कळत नाही.

दवाखाना-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status
दवाखाना-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी

एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा.
कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते
पण सुंदर व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जिवंत राहते.

व्यक्तिमत्व-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status
व्यक्तिमत्व-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी

जर प्रत्येकाने आपला विचार करतांना
दुसऱ्याच्या मनाचा विचार केला…
तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच
दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.

नाती-मैत्री-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status-vb-good-thoughts
नाती-मैत्री-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar

जीवन चहा बनवण्यासारखे आहे….
अहंकाराला उकळू द्या…..
चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या…
दुःखांना विरघळून जाऊ द्या….
चुकांना गळून द्या… आणि
सुखाचा आनंद हसत हसत घ्या.

जीवन-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status
जीवन-suvichar-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo

प्रेम असलेल्या व्यक्तीला
आपण जाऊन भेटतो….
जरी ती सातासमुद्रापलीकडे असली
प्रेम नसलेल्या व्यक्तीला आपण
नेहमी टाळतो जरी ती रस्त्यापलीकडे दिसली….!

प्रेम-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status-vb-good-thoughts
प्रेम-suvichar-with-image-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status

जीवनात प्रत्येक गोष्टी
हव्या त्या वेळेवर मिळत नाही.
पण आपल्या जवळ जे आहे….
त्या गोष्टीत समाधान मानले
तर प्रत्येक दिवस आनंदाचा जातो.

समाधान-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status-vb-good-thoughts
समाधान-sunder-vichar-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status

आपण पाहिलेले स्वप्न
साकार करण्यासाठी किती वेळ लागेल
हे महत्त्वाचे नसून स्वप्नांची सुरुवात आणि
आपला विश्वास सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.

स्वप्न-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status-vb-good-thoughts
स्वप्न-suvichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status

कर्तबगार माणसे आपल्या निर्णयांनी
जगाला बदलतात तर निष्क्रिय माणसे
जगाच्या भीतीने आपले स्वतःचे निर्णय
बदलतात.

निर्णय-sunder-vichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी-suvichar-photo-status
निर्णय-suvichar-status-marathi-suvichar-छान-विचार-मराठी

Sunder Vichar Status | जर प्रेम असेल तर राग हा येतोच | सुंदर विचार मराठी | प्रेरणादायक सुविचार

देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्या सारखे दिले आहे.
फक्त एक अट घातली आहे की…
तो झिजेल तोच चमकेल.

देवाने-सर्वांना-आयुष्य-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar
देवाने-सर्वांना-आयुष्य

संघर्ष करण्याचीसंधी
त्यांनाच मिळते….
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

संघर्ष-संधी-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
संघर्ष-संधी-सुंदर-विचार

रिकाम्या भांड्यावर झाकण आणि
चुकीच्या विचारांची पाठराखण
काही उपयोगाची नसते…

उपयोगाची-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
उपयोगाची

जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नाही…
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजे
जिंकणे होय.

जिंकणे-म्हणजे-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
जिंकणे-म्हणजे

बोलताना जरा जपून बोलावे
कधी शब्द ही अर्थ बदलतात.

चालतांना जरा जपुन चालावे….
कधी रस्तेही घात करतात.

वाकतांना जरा जपुन वाकावे…..
कधी आपलेच खंजीर खुपसतात.

पाउल टाकतांना जरा जपुन टाकावे….
कधी फुलेही काटे बनतात.

मागतांना जरा जपुन मागावे….
कधी आपलेच भावं खातात.

आणि नाते जोडताना जपुन जोडावे…..
कधी नकळत धागेही तुटुन जातात.

आदर-टीका-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
आदर-टीका-सुंदर-विचार

आपल्यावर टीका करणाऱ्यांचा
नेहमी आदर करत जा. कारण
आपले दोष शोधण्यासाठी ते
जीवाचा खूप आटापिटा करत असतात.

नाते-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
नाते

काहीं नात्यात सुरुंग लावणारे
नातेवाईकच असतात…..
हे नाते उध्वस्त झाल्यावरच कळते.

त्रास-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
त्रास-सुंदर-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts

कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला
तरी त्रास करुन घ्यायचा की नाही….
हे आपल्या हातात असते.

माणूस-वेळ-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts

माणूस किती आपला आहे आणि
किती आतला आहे याचे उत्तर फक्त
वेळे जवळ असते. कारण गरज संपली की…
विपरीत वागणे हीच जगाची रीत आहे.

माणूस-वेळ-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
माणूस-वेळ-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar

आपल्याला जीव लावणारे आपल्याला
मोठ्या नशिबाने मिळाले आहेत.
हे समजायला काहींना वेळही लागत नाही
आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही.

पाठीसी-कृष्ण-हवा-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार-marathi-suvichar-vb-good-thoughts
पाठीसी-कृष्ण-हवा-सुंदर-विचार-स्टेटस-सुविचार-चांगले-विचार

सीता होऊन “मौनाचं” रामायण
सहन करता येते पण….
शब्दांचे “महाभारत” सोसायला
पाठीशी कृष्ण हवा असतो….!

 देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्या सारखे दिले आहे | सुंदर विचार | मराठी सुविचार

कधी नवऱ्याने झुकावे… कधी बायकोने झुकावे | नवरा बायको सुंदर विचार | Sunder Vichar Marathi

कधी नवऱ्याने झुकावे….
कधी बायकोने झुकावे…
एकमेकांच्या समजूतदारीतूनच
प्रत्येक घर टिकावे.
बायकोच्या कष्टांची दखल घेणारा तो नवरा
आणि नवर्याकच्या छोट्या-मोठ्या कर्तृत्वाचा
अभिमान बाळगणारी ती बायको.
हे गणित छान जमले की….
भलेभले संसार सुखी होतात….!

बोधकथा | प्रेम, शांती, आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नांदते

0
बोधकथा इन मराठी - ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते...!-jai laxmi mata
ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते.

बोधकथा | ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते

 

एका माणसावर एकदा लक्ष्मीमाता रुसली आणि त्याच्या घरून जाता जाता
त्या माणसाला म्हणाली…
माझ्या गेल्यावर आता माझ्या ऐवजी तुझ्या घरात गरिबी येणार आहे.
पण तुला मी एक वरदान मागण्याची संधी देत आहे… तुझी जे इच्छा असेल ते मागून घे.
तो माणूस चांगला हुशार आणि समजूतदारही होता, तो म्हणाला.. माते जर माझ्या घरी गरिबी
येतच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही…! फक्त एक विनंती आहे की, गरिबीला
सांगावे माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा कायम असू दे.
लक्ष्मीमाता तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.
काही दिवसानंतर त्या माणसाची लहान सून पूर्ण परिवारासाठी जेवण बनवत होती…
तिने भाजीत मीठमसाला टाकला आणि घरातील दुसरे काम करायला निघून गेली.
त्यानंतर जेवणाच्या जवळ त्या माणसाची सगळ्यात मोठी सून आली… तिने शिजत असलेल्या
भाजी ची चव न चाखताच भाजीत मीठ टाकले आणि ती पण कामाला निघून गेली.
अशाच प्रकारे त्या माणसाच्या आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकून दिले.
आणि तिथून निघून गेल्या.
जेव्हा तो माणूस आला आणि जेवायला बसला तर त्याला भाजी खूपच खारट वाटली,
त्याच्या लक्षात आले की गरिबी आपल्या घरी आलेली आहे. त्याने काहीच न बोलता गुपचूप
जेवण केले आणि निघून गेला.
त्याच्या नंतर त्याचा मोठा मुलगा जेवायला आला.. जेवतांना त्यालाही भजी खारट लागल्यावर
त्याने विचारले की…  बाबूजीचे जेवण झाले का…? तेव्हा बायकोने हो झाले म्हटल्यावर त्याने
विचार केला की… जेव्हा आपले वडीलच काही बोलले नाही तर मी कशाला बोलू…?
त्याचप्रमाणे कुटुंबातील सगळ्या लोकांनी जेवण करतांना भाजी खारट वाटल्यावर एकमेकांविषयी
विचारले आणि काहीच न बोलता सर्वांनी वडिलांसारखे गुपचूप जेवण करून आपापल्या कामाला
लागले.
संध्याकाळी गरिबी त्या माणसासमोर आले आणि म्हणाली मी निघून चाललो आहे.
माणूस म्हणाला कां…? गरिबी म्हणाली… पूर्ण कुटुंबाने जवळपास अर्धा किलो मीठ खाल्ले…
तरीही भांडण केले नाही.
ज्या घरात इतक्या खारटपणा नंतरही तुमची गोडी कमी झाली नाही
त्या घरात माझे राहणे शक्यच नाही आहे.
लक्ष्यात ठेवा
 भांडण आणि ईर्ष्या यामुळे आपले नुकसानच होते.
ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथेच लक्ष्मी नेहमी नांदते…!

सकाळी लवकर उठण्याचे फायदे | पहाटेची अमर्याद ताकद | Morning

0
पहाटेची-अमर्याद-ताकद-सकाळी-लवकर-उठण्याचे फायदे-sakali-uthnyache-fayde-marathi-mahiti
पहाटेची-अमर्याद-ताकद-सकाळी-लवकर-उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठण्याचे फायदे | पहाटेची अमर्याद ताकद | Early Morning 

सकाळी तुम्ही किती वाजता झोपून उठता…? जरी रात्री झोपायला कितीही उशीर झाला असेल

तरीही दररोज सकाळी लवकर उठायला पाहिजे…!

वडीलधारी माणसे सांगायची….
लवकर निजे… लवकर उठे… त्यास आयु-आरोग्य लाभे…!
आणि ते खरेही आहेच.

एक हेल एरॉल्ड नावाचे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते एक खूप मोठे यशस्वी व्यावसायीक होते.
एका अपघातात त्यांना शाररीक विकलांगता आली, पण त्यांनी मोठ्या जिद्दीने त्या विकलांगतेवर
मात केली होती.

समोर २००८ च्या जागतिक महामंदीत त्यांचा व्यापार बुडाला… त्यांना त्यांच्या व्यवसायात खूप
मोठे नुकसान सहन करावे लागले. अब्जोपती हेल एरॉल्ड आता कर्जबाजारी झाले होते.

हेल एरॉल्ड हे हार मानणारे व्यक्तिमत्व नव्हते…! त्यांनी हार मानली नाही आणि या अडचणीतून
कसे बाहेर येता येईल म्हणून ते आपल्या एका यशस्वी मित्राकडे सल्ला घ्यायला गेले.

हेल च्या मित्राने हेल ला जो सल्ला दिला… ते त्यांच्यासाठी अनपेक्षित होते…

सकाळी लवकर उठण्याचे फायदे  


हेल चे मित्र हेल ला म्हणाले… हेल तु दररोज सकाळी लवकर उठत जा…!
बाकी सगळे आपोआपच होईल…!
मित्राच्या या चमत्कारिक सल्ल्याने हेल खूप निराश झाले. त्यांना आपल्या मित्राकडून
व्यवसायाबद्दल काही उपाय अपेक्षित होते…! ते तिथुन थोडे निरास होऊन निघून गेले.

 पहाटेची अमर्याद ताकद | Early Morning


समोर दिवसेंदिवस त्यांची निराशा वाढतच होती, शेवटी नाईलाजने हेल ने सकाळी चार
वाजता उठायला  सुरुवात केली. आणि हेल सांगतात या सकाळी उठण्याच्या सवयीने
त्यांचे पूर्ण आयुष्यचच बदलुन गेले…!

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का…?

इतक्या सकाळी उठुन काय करावे..? ह्या प्रश्नावर हेल ने एक पुस्तक लिहली आहे…
The Miracle Morning या मध्ये एक कोडवर्ड सांगितला आहे.

S-A-V-E-R-S

ह्या सहा सवयी आयुष्य बदलुन टाकणार्‍या आहेत.

1) Silence ( Meditation, मौन, ध्यान, )



 शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान…!

स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान…!

मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान…!

मन प्रफुल्लीत आणि ताजतवाने करण्यासाठी आवश्यक असते ध्यान…!

माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत

याची आत्मबोध म्हणजे ध्यान…!

अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि

स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान…!

2) Affirmations – (स्वतःला सकरात्मक सूचना देणे )

अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद…!

स्वतः स्वतःला सुचना देणे…!

Silence मध्ये आपण शांत बसलो कसलाही विचार मनात आणला नाही, या नंतर स्वतःशीच संवाद

करणे किंवा स्वतःला सूचना देणे. स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणे. प्रचंड शक्तिशाली असलेल्या
आपल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेले ध्येय कोरणे…!

मनातच आपण केलेल्या योजनांची उजळणी करणे. आणि त्यांची सूचना मनाला देवून मन
मजबूत करणे. स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात,
आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.

अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की
वाईट, खराच होतो.
एखादी गोष्ट खूप वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते…
मग अशुभ बोलायचेच कशाला…?

3) Visualize  ( मनात चांगल्या कल्पना करने. )

आपली स्वप्ने पूर्ण झाली आहेत… असी मनातून कल्पना करणे… स्वप्ने पूर्ण झाल्याचा आनंद
व्यक्त करणे…!  म्हणजेच Visualization…!

निसर्गाने माणसाला दिलेली ही कल्पनाशक्ती सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.

दररोज आपण ठरवलेले सगळे काम पूर्ण होत आहेत असी कल्पना मनात केली पाहिजे.

पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो… ज्यावेळी

मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे… ते मनातल्या मनात बघण्याचा
मी प्रयत्न करतो.
ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती… मागचे चार वर्ष मी एकच निकाल
डोळ्यापुढे आणत होते… ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि

माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.

मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो,
स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले…
यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात…!

4) Exercise – ( व्यायाम )

आपल्या शरीरातून कामचुकारला पळवून लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी
मनाने मजबूत आणि आनंदी राहण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो.

शरीर कामचुकार झाले की मन भ्रष्ट झालेच समजा…!

व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून शरीरातील उर्जेला वळण मिळते. असे न केल्यास
ती अतिरिक्त आकर्षणाकडे वळते आणि मग माणूस वासनांचा गुलाम बनतो.
मन कशातही लागत नाही, ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय,
तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा,
ट्रेडमिलवर घाम गाळा, प्राणायाम करा. शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

5) Reading  ( वाचन )

काही लोकांचे पूर्ण आयुष्याचे अनुभव एका पुस्तकात असतात आणि ते आपण वाचून काही
तासातच ते आत्मसात करू शकतो, काही पोसितीवे गोष्टी शिकू शकतो, प्रेरणा घेवू शकतो,

पुस्तके वाचणारी माणसे एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.

पुढच्याच ठेस… आणि मागचा शहाणा… ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने
शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

6) Scribling  ( लिहिणे )

माझे ठाम मत आहे की… जर मी माझ्या आयुष्यातल्या कठीण काळात लिहीत राहीलो नसतो
तर मी आज जिवंतच राहीलो नसतो.

लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.

लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

लिहणे… हे सुद्धा स्वसंवादाचेएक प्रभावी साधन आहे.

लिहिल्याने विचार पक्के होतात.

सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावे.

-एखादी अडचण छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.

मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे ती रूपरेखा आणि त्याचे नियोजनही लिहावे.

तसेच रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावे.

लिहिल्याने आपले मन मोकल होते. आणि चिंतांचे ओझेही हलके होते…!

अशाने अंतरंग फुलुन येतात… उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे.

वरील सहा सवयीं पैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत…?

मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .
तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील.

सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे…
तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही
एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच
ठरवायचे आहे…
कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान दिवसांचा सराव आवश्यक असतो…
आणि आपल्याकडे आता कदाचित  पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत…!

तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू….
अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये…..
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची…. स्वतःसाठी जगण्याची…..
आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा..

काळजी घ्यायची आहे… काळजी करायची नाही.
धन्यवाद…!

आपल्या माणसाची थाप वेळीच ऐका | Sunder Vichar | छान विचार

0
आपल्या माणसाची थाप वेळीच ऐका | Sunder Vichar | छान विचार
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-marathi

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही. 
         परंतु… एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय 
आयुष्य बदलू शकतो.

आपल्या माणसाची थाप वेळीच ऐका
Sunder Vichar | छान विचार

लहानपणी एक कावळा चिमणीची गोष्ट ऐकली होती…

आणि आज असे वाटत आहे की अर्धीच ऐकली

होती. तुम्ही पण ही गोष्ट नक्कीच ऐकले असेल.

ही गोष्ट म्हणजे जीवनाकडे  सकारात्मकतेने बघण्याचा

एक अप्रतिम उदाहरण आहे.

लहानपणी ऐकलेली गोष्ट…

Sunder Vichar Marathi | छान विचार

एक चिमणी होती आणि एक कावळा होता, दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते

आणि चांगले मित्रही होते.

चिमणीचे घर मेणाचे होते आणि कावळयाचे घर शेणाचे होते.

पावसाळा सुरु असतांना एक दिवस खूप जोरात हवा आणि पाऊस सुरु होते… या जोराच्या

हवा, पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. या पाण्यातच कावळ्याचे घर वाहून गेले.

कावळा घाबरला, आता कुठे जावे, काय करावे आणि काय नाही हे त्याला समजत नव्हते…

एवढयात त्याला चिमणीची आठवण आली, चिमणीचे घर जवळच आहे…

कावळा चिमणीच्या घरी गेला आणि चिमणीच्या घराच्या दारावर थाप दिली..

चिमणी ताई, चिमणी ताई म्हणून हाक मारायला लागला…

चिमणीने आतून सांगितले की…. थोडा थांब… मी आपल्या बाळाची

कंगी – पावडर करीत आहे….

काहीवेळ थांबून पुन्हा कावळयाने चिमणीच्या घराच्या दारावर थाप दिली आणि

चिमणीताई, चिमणीताई दार उघड…! असा आवाज दिला.

चिमणी आतून म्हणाली, थोडा थांब, मी माझ्या बाळाला झोपवत आहे.

इकडे कावळयाला खूप भूकही लागलेली होती. पण चारही बाजूला पाणीच पाणी

झाले होते.

काय करणार बिचारा…! लहानसे तोंड करून कुडकुडत उभा राहिला,

परंतु चिमणीने काही केल्या दार उघडलेच नाही.

आता आजच्या परीस्थितीसी मिळत उरलेली गोष्ट…

चिमणीने आपले सगळे काम आटोपले आणि ती आता जरा निवांत झाली आणि

तसाच तिच्या लक्षात आले की…

अरेच्च्या…! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलेच नाही.

 तिला स्वतःला एक विचित्र अपराधी पण वाटले.

 लगेच ती दारावर गेली… दाराबाहेरील अंदाज घेतला पण बाहेर शांतता होती.

 ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर

कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिले, पण कावळा कुठेही नव्हता.

शेवटी आपल्या मनाची समजूत घालत चिमणी म्हणाली… गेला असेल…

लवकरच परत येईल… पण रात्र झाली तरीही कावळा काही परत आला नाही.

दोन दिवस झाले तरी कावळ्याचा काहीही पत्ता नव्हताच…

आता चिमणीचे मन कशातच लागत नव्हते… तसेच आपल्या बाळाकडेही तिचे

लक्ष नव्हते. तिला वेळोवेळी कावळ्याने दारावर दिलेली थापच ऐकायला येत होती.

तो आवाज असा काही तिच्या कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने

दारावर थाप झाली आहे, असे समजून दार उघडले होते. आणि बाहेर कोणी नाही हे

पाहून निराशेने बंद केले होते…!

Sunder Vichar Marathi | छान विचार मराठी 

जवळपास वर्ष झाला तरीही चिमणीच्या मनातून कावळा काही जाईना.

शेवटी तिने आपण कावळ्याचा शोध घ्यायचाच असे ठरवून निघाली.

इकडे – तिकडे शोधून थकल्यावर एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती

थांबली होती. अचानक त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून ओळखीचा आवाज

तिच्या कानावर पडला…

तो कावळ्याचा आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला खूप आनंद झाला.

चिमणीचा पूर्ण थकवा नाहीसा झाला. आणि मोठ्या उत्साहाने आवाजाच्या दिशेने

तिने मोठ्या  त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय…!

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता.

कावळ्याचे लक्ष चिमणीकडे गेले. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला.

तो आनंदाने म्हणाला,

या या चिमणाताई… तुमचे स्वागत आहे माझ्या घरट्यात.

तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू मी तुमच्यासाठी…?

कावळ्याचा हा व्यवहार पाहून चिमणी खूप लज्जित होऊन म्हणाली…

तुला माझा राग नाही आला…?

कावळा म्हणाला… का यावा…?

 तु तुझ्या विश्वात गुंग होते म्हणून…?

 छे छे…! प्रत्येकाचे आपले असे स्वतंत्र विश्व असते… जसे तुझे होते.

 तुला माझी गरज त्यात कधीच नव्हती

 माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो.

पण नंतर मला माझी चूक कळली.

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणे…

किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणे या दोनीही गोष्टी अतिक्रमणा सारख्याच

घडल्या असत्या नाही का…?

आणि कुणाच्याही वस्तूवर… अधिकारावर… भावविश्वावर…

अतिक्रमण करणे चूकच नाही का…?

म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचे ठरवले. आणि एकटाच निघालो…

तुझ्या विश्वापासून दूर.

 चिमणी म्हणाली… मला एकटे करून…?

अरे, मला आता सवय झाली आहे तुझी.

 चिमणाताई… या जगात कोणीच एकटे नसते.

जेव्हा आपण एकटे आहोत असे वाटते ना… तेव्हा तो एकांतच असतो…!

आपला सोबती आपल्याला दाखवत असतो वाट, आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची.

मलाही दाखवली त्याने आणि बघ… आज मी किती आनंदी आहे…

माझ्या घरट्यात…!

माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये…!

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढेच म्हणाला…

 चिमणाताई… माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो.

तुझी थाप ऐकून मी लगेच आपले दार उघडेल… क्षणाचाही विलंब न करता.

 चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली

आपल्या घरट्याकडे…

 पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिले नव्हते…!

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाताई

सारखी झाली आहे.

म्हणजे…?

 म्हणजे कुणीतरी आपले माणूस प्रेमाने आपल्याला बोलावीत आहे,

हे आपल्या लक्षात येतच नाही.

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा

पोटची मुलेही असू शकतात…

त्यांची प्रेमळ हाक आपल्याला ऐकूच येत नाही…!

म्हणजे ते मायाळू होऊन प्रेमाने हाक मारतात आणि आपण म्हणतो

थांब थोडे… मला आपले  करिअर करु दे… थांब थोडे… मला आता आपले घर

घ्यायचे आहे. थांब थोडे… मला आता कार घ्यायची आहे…

थांब थोडे… मला काम आहे… थांब मला विश्रांती घ्यायची आहे…

थांब थोडे… मला आता आणि मग ही यादी वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते… ते त्यांचे वेगळे विश्व तयार करतात…

त्या विश्वात आपल्याला स्थान नसते… आपल्या ते लक्षात नसते.

आणि जेव्हा येते तेव्हा… आपण फार एकटे झालेले असतो…. !

आणि जर का तुम्हाला वाटत असेल की असे होऊ नये तर…?

मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगु नका…

वेळीच थाप ऐकायला शिका.

वेळ प्रत्येकाची येते…!

आपल्या माणसाची थाप वेळीच ऐका | Sunder Vichar | छान विचार

marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-on-life-suvichar-marathi-vb-vijay-bhagat-suvichar-on-life-thinking
आपल्या माणसाची थाप वेळीच ऐका | Sunder Vichar | छान विचार

माणूस ज्या दिवशी समजेल की

समोरचा माणूस चुकीचा नाही आहे…

फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा

वेगळे आहेत…! त्या दिवशी

जीवनातील अनेक दुःख संपतील.

हे ही वाचायला आवडेल :-

85+ Best Marathi Suvichar | प्रेरणादायी सुविचार मराठी