Home Blog Page 27

Jai Shree Ram | प्रभु श्री राम दर्शन | सुंदर विचार

0
Jai Shree Ram | प्रभु श्री राम दर्शन | सुंदर विचार
ramayana-jai shree ram -tulsidas

Jai Shree Ram | प्रभु श्री राम दर्शन | सुंदर विचार

तुलसीदास जी से एक बार एक भक्त ने पूछा की
आप इतना राम का गुणगान करते हो. 
क्या कभी आपको प्रभु श्री राम दर्शन हुआ है…?
तुलसीदासजी ने कहा… हाँ मुझे हुआ है.
भक्त ने पूछा…
क्या आप मुझे भी प्रभु श्री राम के दर्शन करवा सकते है…?
तुलसीदास जी ने कहा… हाँ, हाँ, क्यो नही…?
 
 फिर तुलसीदासजी ने भक्त जो बताया वो सुनकर 
कोई बड़ा गणितज्ञ भी सोच में पड़ जाएगा.
 
तुलसीदासजी ने बोले ये तो बहुत ही आसान है. 
प्रभु श्री राम के दर्शन तो किसी के भी नाम मे हो सकते है. 
 
मै तुम्हे एक श्लोक बताता हू. उसमे बताएं अनुसार 
किसी के भी नाम को वह सूत्र लगाकर देखना.
राम के दर्शन हो जायेंगे.

Jai Shree Ram | प्रभु श्री राम दर्शन | सुंदर विचार

 
|| नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||
|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम ||
 
१. किसी का भी नाम लिजिए..
उस नाम में उसमे कितने अक्षर है यह गिने.
 
२. उसे चौगुना कीजिए.
 
३. उसमे ५ मिलाए.
 
४. आयी हुयी संख्या को दुगना करे.
 
५. अब उसे ८ से विभागे.
 
पूरी तरह विभाग नही सकते. 
 
हर बार २ बाकी रहते है. वो दो यानी
 राम यह अक्षर है.
किसी का भी नाम ले और इसे कर के देखें.
 

|| जय श्रीराम ||

 
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे !!
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे !!

Good Thoughts in Hindi | प्रेरणादायक सुविचार स्टेटस

500+ Motivational Quotes In Hindi

सहानभूती | सुविचार | Suvichar Good Thoughts In Marathi

0
सहानभूती | सुविचार | Suvichar Good Thoughts In Marathi
marathi - suvichar-with images - सहानभूती - Good Thoughts In Marathi

सहानभूती | सुविचार |
Suvichar |
Good Thoughts In Marathi

एकदा मी आणि मित्र एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो. 

त्या हॉटेल मध्ये तिथलाच एक वेटर आम्हाला आम्ही केलेले आर्डर

टेबलवर ठेवतांना चुकून त्याच्या कडून भाजी चा रस्सा मित्राच्या

हातावर उडतो, हाताला चटका लागतो आणि त्याचा शर्ट ही खराब होतो.

थोडा वेळ तर आम्ही घाबरून जातो पण… लवकरच सावरत हात आणि

रस्याच्या त्या शर्ट वरील डागाकडे बघत राहतो…!

त्यातच वेटर एकदम घाबरून म्हणाला, माफ करा साहेब मला…

वाॅशरूम मध्ये चला साहेब, मी हा डाग साफ करून देतो…!

त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता…

यावर माझा मित्र सहज आणि अगदी हसत हसत त्या वेटर ला म्हणाला

“ठीक आहे काका… ( वेटर वयस्कार होता ) होते कधी कधी असे. 

सहानभूती | सुविचार |
Suvichar | Good Thoughts In Marathi

काका तुम्ही मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते सांगा.
हा डाग मी स्वतः साफ करतो,
तुम्ही कसलीही काळजी करू नका आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या.

बरेच दिवस झाले तरीही लॉड्री वाल्याने दिलेले कपडे आणुन दिले नाहीत

म्हणून आम्ही, त्याच्या दुकानात गेलो… दुकानात घाबरत घाबरत… 

साहेब तुमचा एक शर्ट प्रेस करीत असतांना जळला,
असे सांगत तो जळलेला शर्ट दाखविला.

मित्र त्या वयस्कार लॉड्री वाल्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला,

काका काहीच हरकत नाही. तुम्ही या निमिताने मला एक नवीन शर्ट घेण्याचे 

कारण दिलेले आहे. आणि मित्राने हसत हसत लॉड्री वाल्याचा खांद्यावर 

हाथ ठेवून धीर दिला.

खूप दिवसा पासून माझा मित्र ज्या कंपनीत जॉब करीत होता त्या

कंपनीतील फाईल इकडे – तिकडे करणारे काका आले नव्हते. 

म्हणून माझा मित्र त्यांच्या घरी गेला. तिथे गेल्यावर मित्राला कळले की ते
काका तर आजारी आहेत आणि काही दिवसातच त्यांच्या मुलीचे लग्नही आहे…!

मित्र पूर्ण दिवस तिथेच थांबला, आणि त्यांच्या मुलाला लग्नाच्या तयारीसाठी

त्याने मदत केली. तसेच लग्नाच्या दिवशीसुद्धा पाहुण्यांची आवभगत आणि 

मानपान करण्यासाठी मित्र तयारीत होता.

या उदाहरणा वरून आपल्या लक्षात आले असेल की याला सहानभूती म्हणतात.

म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनांची जाणीव होऊन त्यात एकरूप होत…

त्यांना आनंद देण्याची कला आहे.

कुणाचा तरी दिवस चांगला बनवण्याचा तो एक प्रयत्न आहे.
अत्यंत महत्त्वाची… पण… तरीही कमी लेखली जाणारी एकमेव

गोष्ट म्हणजेच सहानुभूती…!

स्वतःचे व्यक्तिमत्व खुलून दाखवणारा असा हा गुण अंगी बाळगणे

सहज शक्य आहे. त्यासाठी पैसाही लागत नाही आणि श्रमही लागत नाही.
बघा तर मग…! आजपासून कुठे सहानुभूतीने वागण्याची संधी मिळते का ते…?

All Post – VijayBhagat.com

स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

0
स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

 

श्रीखंड घेण्यासाठी एक डेयरी च्या दुकानात उभा होतो.

दुकानात एकाच ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, तूप

ठेवलेले होते.

ते बघून असे वाटले की…

अरे… ह्या तर सर्वच एका स्त्री च्या आयुष्याच्या अवस्था आहेत…!

पाहूया कसे ते..?

दूध

दूध म्हणजे एका स्त्री चे लग्नाच्या पूर्वीचे आयुष्य…

कुमारिका….

दूध म्हणजे मुलीचे माहेर…

दूध म्हणजे आईवडिलांशी नाते…

एकदम शुभ्र… सकस… निर्भेळ…

स्वार्थाचे पाणी टाकून वाढवता येत नाही… ते लगेच बेचव होते.

त्यावेळी मुलीला आपल्यासारखे हे जग सुद्धा स्वच्छ, सुंदर, निरागस दिसते.

दही

लग्नात दुधाला कन्यादानाचे विरजण लागले की… कुमारिकेची वधू  होते.

आणि या दुधाचे नाव आता बदलून दही असे होते…!

दही म्हणजे त्याच अवस्थेत एकदम थिजून घट्ट होणे…!

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे

त्याच भूमिकेत थिजून राहते.

दही म्हणजे मुलीचे आपल्या लग्नाशी असलेले अगदी घट्ट नाते. या नात्यात कितीही

मारहाण करणारा… व्यसनीव्यभिचारीमनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी

असलेला नवरा असला तरीही… स्त्री त्याच्या प्रती  एवढी निष्ठा का दाखवते…?

नवरा हा पती परमेश्वर म्हणून…? नव्हे तर याचे उत्तर म्हणजे तिचे आपल्याच

लग्नाशी असलेले घट्ट नाते…!

ताक

सर्वसामान्य स्त्रिया लग्न झाल्यावर दही होतात आणि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या

रवीने घुसळल्या जातात…! ही स्त्री आता  त्यांची सून होते…!

म्हणजेच ताक होते.

जसे दूध सकस तसे ताक ही बहुगुणी.

मग ती बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो

 (पित्त प्रकृती)

ताक दोघांनाही शांत करते… यांवर उत्तम उपाय असे आयुर्वेद म्हणतो.

ताक म्हणजे सुनेचे सासरशी नाते. सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी

लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच…!

दुधात पाणी घातल्यावर ते बेचव होते… परंतु ताकात मात्र पाणी घातल्यावर

ते वाढतच राहते… आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येते.

स्त्रियांच्या सुंदर छटा | स्त्रीचे जीवन दूध ते तूप | Sunder Vichar

लोणी

खूप वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरते. आणि

जेव्हा २० वर्षांनी जेव्हा माझे फलित काय…? असा प्रश्न ताक विचारते…

तेव्हा… नकळत मऊ, रेशमी, मुलायम, नितळ असा लोण्याचा गोळा वर

आलेला दिसतो .

हे लोणी म्हणजे आजपर्यंतचे नवऱ्या सोबतचे नाते. रवीच्या प्रत्येक घुसळणीत

ह्या नात्याचे कण कण लोणी होऊन हळूच बाजूला जमा होत असतात…

हे तिच्या लक्षातच येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरे तर…

दररोज आरशात लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा

कळतच नाही .

तरुण दिसण्यासाठी ती त्याचे तोंड काळे करते.

ताकाला पुन्हा दूध व्हायचे असते… हा वेडेपणा नाही का…?

तूप

स्त्री ची लोणी ही शेवटची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून

ठेवता येत नाही. ते आपले रूप बदलते… नव-याच्या नात्याचे प्रेम कढवून

स्त्री आता आपल्या घरासाठी… आपल्या नातवांसाठी… आजी म्हणून…

एक नवीन रूप घेते…! आणि त्याच लोण्याचे आता कढवलेले साजूक तूप होते.

 वरणभात असो… शिरा असो… किंवा बेसन लाडू असो… घरातल्या प्रत्येक गोष्टीत

आता आजी नावाचे पळीभर साजूक तूप पडते आणि जादू घडते.

 देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात

खोचलेली वात  बघितली की… मला घरासाठी येता जाता हात जोडणारी

चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे तूप संपून जाते…!

हीच ती स्त्री ची अंतिम उच्च अवस्था होय.

दूध ते तूप

हा असा अनोखा स्त्री च्या आयुष्याचा प्रवास.

 स्री आहे तर श्री आहे हे म्हटलेले वावगे ठरूं नये.

 असा हा स्री चा संपूर्ण प्रवास ना थांबणारा…

सतत धावणारा… ना कावणारा…

ना घाबरणारा… कुटूंबासाठी झिजणारा…

कुटूंबाची काळजी घेणारा…

ह्या प्रवासास तथा स्री जातीस मानाचा मुजरा…!

Good Thoughts In Marathi | जबरदस्त प्रेरणादायक विचार मराठी

राम नाम महिमा | Good Thoughts In Marathi | Sunder Vichar

0
राम नाम महिमा | Good Thoughts In Marathi | Sunder Vichar

राम नाम महिमा | Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar

एकदा एका भक्तांने तुलसीदासांना विचारले की…
महाराज आपण श्री रामाचे इतके गुणगान गाता…!
तर प्रभु श्री रामाने स्वतः तुम्हाला कधी तरी दर्शन दिले आहे का…?
त्यावर तुलसीदास म्हणाले हो… दर्शन दिले आहे.
भक्त :- मला ही प्रभु श्री रामाचे दर्शन घडवाल का…?
तुलसीदास :- हो नक्कीच असे म्हणुन त्या भक्ताला
तुलसीदासांनी खुपच समर्पक उत्तर दिले…!
ते उत्तर एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवनारे होते.
बघा…
 तुलसीदास म्हणाले, हे तर खुप सोपे आहे. आपण  प्रभु श्री रामाचे दर्शन
स्वतः मध्येच घेऊ शकतो. तुमच्या नावात काय प्रत्येकाच्या नावांतही
शेवटी आपल्याला प्रभू श्री रामाचे दर्शन नक्कीच घेता
येईल…!
मी तुम्हाला एक सुत्रश्लाेक सांगतो. या सुत्रश्लाेका प्रमाणे कोणाच्याही नावाला
ते सुत्र लागु होईल… भक्त :-कोणते सुत्र…?

तुलसीदासांचे राम नाम गणित | राम नाम महिमा  
Good Thoughts In Marathi

|| नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||
|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम ||
वरील सुत्राप्रमाणे…
आता कुणाचेही नांव घ्या…
त्या नावाची अक्षरे माेजा…
1] त्याला ( चतुर्गुण ) 4 ने गुणा…
2] त्यात ( पंच तत्व मिलन ) 5 मिळवा…
3]  त्याची ( द्विगुण प्रमाण ) दुप्पट करा…
4] आलेल्या संख्येला ( अष्ट सो भागे ) 8 ने भागा….
पुर्ण भाग जात नाही….
दरवेळेस बाकी 2 शिल्लक राहतेच…
ते दोन म्हणजेच राम ही दोन अक्षर आहेत.
बसत नाही ना विश्वास…!  चला एक उदाहरण  घेऊ या…!
उदाहरण… माझे नाव आहे –   विजय
 अक्षरे आहेत 3
1]  4 ने गुणा 3 × 4 = 12
2] 5 मिळवा 12 +5 = 17
3] दुप्पट करा 17 × 2 = 34
4] 8 ने भागा 34 ÷ 8 = 4 पुर्णांक… बाकी मात्र 2…
 नेहमी बाकी दोनच अक्षरे उरतील ती दोन अक्षरे म्हणजे….
राम

राम नाम महिमा | Good Thoughts In Marathi | Sunder Vichar

 जय श्री राम…
तुलसीदासजीची जय हो…!
सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिले आहे…
हेही एक विशेष आहे.
चतुर्गुण… म्हणजेच ४ पुरुषार्थ..
पंच तत्व… म्हणजेच पंचमहाभौतिक…
द्विगुण प्रमाण म्हणजेच माया आणि ब्रह्म असे दोन
अष्ट सो भागे म्ह. आठ दिशांनी… आठ प्रकारची सौभाग्ये…
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासुन पहा….
आपल्यालानक्की विस्मयकारक वाटेल
पण बाकी नेहमी…
2 च येईल

तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची ओळख पटते….

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे !!
हरे राम हरे राम, राम राम हरे हरे !!

आई | छान विचार मराठी | Good Thoughts Marathi | Suvichar

1
आई | छान विचार मराठी | Good Thoughts Marathi | Suvichar

आई | छान विचार मराठी |
Good Thoughts Marathi | Suvichar

एकदा मुलगा आणि सून घरात आपल्या बेडरूम मध्ये बोलत राहतात…
समोर हॉल मध्ये बसलेल्या आईचे लक्ष त्यांच्या बोलण्याकडे जाते.
मुलगा – आपण दोघेही नौकरी करतो…  आपल्या नौकरी  मुळे आईकडे
लक्ष देता येणार नाही. आईचे वय होत आहें… या वयात तिला काही
आजार हि झाले आहेत… आता तिच्या आजारपणाची खबरदारी आणि
काळजी कोण करेल…?
मी आज ऑफिस मध्ये हाच विचार करीत होतो, शेवटी मी विचार केला कि,
आपण आईला वृद्धाश्रमात ठेवले तर…! ते लोक आईकडे लक्ष सुद्धा देतील
आणि तिची काळजीही घेतील.
सून -अहो नौकरी करून पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे,
पण… आईंचा आशीर्वाद जितका कमावला तितका कमीच आहे.
आज आईला पैश्यापेक्षाही आमच्या सोबतीची गरज आहे.
मी जास्तीत जास्त वेळ आई सोबत घालविण्याचा प्रयत्न करते.
मी जर का नौकरी नाही केली तरीही काहीच बिगडणार नाही.
मी थांबेन आईंजवळ…! जमलेच तर घरीच क्लासेस घेईन…
त्यामुळे मला आईं जवळही राहता येईल.
मला शेजाऱ्यांकडून कळले आहे कि… तुम्हाला लहानपणी वडील नसूनही
घरकाम करून आईने लहानाचे मोठे केले आहे. त्यावेळी तुमच्याकडे व्यवस्थित
लक्ष देणार कुणी नाहीत म्हणून तुम्हाला कधी आईने शेजाऱ्यां कडे सुद्धा ठेवला नाही…!
आणि आज हे तुम्ही असे बोलता…? तुम्ही किती ही म्हणा पण…..
आई नेहमी आपल्या जवळच राहील. अगदी शेवटपर्यंत…!

आई | छान विचार मराठी |
Good Thoughts Marathi | Suvichar

हॉल मध्ये बसलेली आई आपल्या सूनेचे उत्तर ऐकून खूप रडते आणि
सरळ देवघरात जाऊन देवा जवळ उभी राहते.
आई देवाऱ्यापुढे उभी राहून देवाचे खूप खूप आभार मानते…!
मला मुलगी नव्हती म्हणून खूप भांडली देवा मी तुझ्याशी पण…
हि भाग्यलक्ष्मी, सुन म्हणून दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी…?
प्रत्येक स्त्री हि प्रथम मुलगी, मैत्रीण, पत्नी, सुन, आई, सासू अशा
विविध नाते बंधनातुन जाते, म्हणजे प्रत्येक नात्यातुन तिला जावेच लागते.
परंतू स्त्रीयांनी प्रत्येक भुमिकेतुन जाताना जर सामंजस्य व स्वत:च स्त्रीयांचा
आदर केल्यास… या पुरुष प्रधान संस्कृतीच्या कचाट्यातुन नक्कीच
सुटका होऊन या समाजात स्त्री अबला नक्कीच राहणार नाही.
घरातील व नात्यातील तसेच मैत्रीण, शेजारी आणि समाजातील
इतर सर्वच महिलांचा आदर करा. कारण आपल्याला सुध्दा
या संसाराच्या चक्रव्यूव्हा मधुन जायचेच आहे.
आवडल तर शेअर करायला विसरु नका.

भगवंताची भेट | Good Thoughts Marathi | सुंदर विचार |Suvichar

0
भगवंताची भेट | Good Thoughts Marathi | सुंदर विचार |Suvichar

भगवंताची भेट | Good Thoughts Marathi |
सुंदर विचार |Suvichar

एका लहान मुलाच्या मनात आले कि आपण भगवंताची भेट घ्यायची

एक दिवस मन पक्के करून मुलगा कोणालाही काहीही न सांगता

एक लहानसी पिशवी त्यात एक पुरणपोळी आणि आंब्याचे रस

घेऊन घराबाहेर निघाला.

थोडा लांब गेल्यावर त्याला रस्त्याच्या बाजूला एक बाग दिसली,

त्या बागेत तो गेला, इकडे तिकडे बघितल्यावर त्याला एक म्हातारा माणुस

बागेच्या कोपऱ्यात बनलेल्या छोट्याश्या देऊळ कडे सतत बघतांना दिसला.

मुलगा ही त्याच्या शेजारी जाऊन बसला आणि दोघे हि त्या छोट्याश्या

देवळाला बघायला लागले, काही वेळाने मुलाला भूक लागली म्हणुन

त्याने पुरणपोळी खाण्यासाठी बाहेर काढली.

पुरणपोळी  हातात घेतल्यावर त्याच्या लक्षात आले कि म्हातारा माणुस त्याच्याकडे

बघत आहे, मुलाला वाटले की यांनाही भूक लागली आहे म्हणून त्याने आपल्या

जवळील अर्धी पुरणपोळी म्हाताऱ्याला देण्यासाठी हसत हसत आपला हाथ पुढे केला

म्हाताऱ्यानेही हसत हसत घेतला.

भगवंताची भेट | Good Thoughts Marathi |
सुंदर विचार |Suvichar

पण म्हाताऱ्याचे हसणे मुलाला खूप पवित्र वाटले आणि त्याला एक वेगळाच

आनंद झाला. मुलाला वाटायला लागले हे बाबा पुन्हा हसावेत म्हणुन त्याने

आपल्या जवळील रस देऊ केला, म्हातारा पुन्हा हसला…!

या हसण्याने मुलाला एक वेगळाच आनंद मिळाला, ते दोघेही एकमेकाशी

काहीही न बोलता तसेच त्या दोघांनी हसत हसत सोबत जेवन केला.

हळू हळू दिवस मावळायला लागला, मुलाचाही विचार बदलला.आता त्याने ठरवले की

पुढे कुठेही न जाता आपण आपल्या घरी जावुया.

आपली रिकामी पिशवी घेऊन मुलगा निघायला लागला तोच म्हाताऱ्याने

त्याला गोड मिठी मारली. या वेळी तर मुलाला खुपच आनंद झाला.

तो आनंद घेऊन मुलगा घरी पोहचला, मुलाची आई त्याचा हा रूप पाहून

दंग झाली, कारण तिने यापूर्वी आपल्या मुलाला एवढे आनंदी कधीच

बघितले नव्हते.

भगवंताची भेट | Good Thoughts Marathi |
सुंदर विचार |Suvichar

आई काही विचारच्या अगोदरच मुलगा सांगायला लागला. म्हणाला…

आई मी आज भगवंताच्या सोबत जेवण केला.” तुला माहित आहे का आई…!

भगवंताचे हसणे जगात सगळ्यात सुंदर आहे.

तसेच ते म्हातारे ही आनंदात आपल्या घरी पोहचले, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच

तेज चमकत होता आणि चेहरा अगदी शांत होता, चेहऱ्यावरील शांतता पाहून

म्हाताऱ्याच्या मुलाने विचारले…. बाबा… आज काय झाले… खूप आनंदी दिसता…!

एवढे आनंदी तर मी तुम्हाला कधीही बघितलेला नाही.

म्हातारा म्हणाला…  आज मी भगवंताच्या सोबत पुरण पोळी खाल्ली,

आणि तुला माहित आहे का…! भगवंत वयाने खूपच लहान आहे.

हे ही वाचा :-

Marathi Suvichar | १००+ सुंदर मराठी सुविचार | Marathi Quotes

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…? | Sunder Vichar | Bayko

1
बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय...? | Sunder Vichar | Bayko
nawara-bayko-prem-sandesh-suvichar

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
Sunder Vichar | Bayko

बायकोच्या घाई गडबडीत मदत म्हणून
सकाळी सकाळी नवरा स्वतः डब्यातल्या
पोळ्या भरतांना
त्याच्या बोटाला लागलेला चटका  आणि बायकोने
त्यावर मारलेली फुंकर आणि हे बघून
हळवा झालेला नवरा…!
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
घरातील पाहुणे मंडळी गेल्यावर
नवरा सुद्धा थकला असूनही
बायकोला आवरा आवर करू लागणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
बायको आजारी असल्यावर…
आपण आज मस्त खिचडी भात खाऊया
म्हणणे आणि जेवल्यावर सर्व भांडे स्वतः उचलून
बेसीन मध्ये ठेवणे… पाण्याच्या बॉटला भरने
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
ऑफिस मध्ये
लंच झाल्यावर मित्रांमध्ये जेवतांना…
ती जेवली असेल का…?
म्हणून बायकोला फोन करूनच
नंतर नवऱ्याने जेवण करणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
ऑफिसमधून संध्याकाळी येतांना
गिरणीतले दळण घेऊन येणे
आणि काही भाजीचा आणू का…?
असे बायकोला फोन करून विचारणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
Sunder Vichar | Bayko

सुट्टीच्या दिवशी आज तुला सुट्टी म्हणत…
बायको उठायच्या अगोदर
दाराबाहेरचा सकाळचा पेपर…
दूध स्वतः घेणे आणि
बायकोसाठी चहा बनवणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
बाहेर पडल्यावर गर्दीत
बायकोचा हात नवऱ्याच्या हातात
अजूनच घट्ट – घट्ट होणे
म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
यायला उशीर झाल्यावर बायको जेवायला
थांबली असतांना… पहिला घास आपल्या
बायकोला भरवने म्हणजे सुद्धा
बायकोवरचे प्रेमच…!
ती धडपडल्यावर बायकोला ओरडून…
स्वतः हळवे होणे म्हणजे सुद्धा
बायकोवरचे प्रेमच…!
कधी बायको वैतागलेली असतांना शांत राहने…
आणि ती रडवेली झाली की… सगळा राग विसरून
तिला मिठीत घेणे म्हणजे सुद्धा बायकोवरचे प्रेमच…!
वयाच्या साठव्या वर्षी सुद्धा
बायकोच्या औषधांचा वेळ जपणे…
आणि बायको झोपल्यावर
तिचे पांघरून सावरून नंतरच
नवऱ्याने झोपणे म्हणजे सुद्धा
बायकोवरचे प्रेमच…!

बायकोवरचे प्रेम म्हणजे नक्की काय…?
Sunder Vichar | Bayko

प्रत्येक वेळी बोलून दाखवल्यावरच
प्रेम सिद्ध होत असते असे नाही आहे…
प्रेमाच्याही पलीकडे असते
ती काळजी…. माया…!
बायको तर असतेच महान जी निःस्वार्थपणे
आयुष्यभर नवऱ्याची साथ देते.
पण नवरा म्हणजे तिच्या आयुष्यातला तो
ऑक्सिजन आहे जो तिच्या सोबत असतो
आयुष्याच्या शेवट पर्यंत…!

Sunder Vichar | बिनधास्त जियो | Good Thoughts In Hindi

0
Sunder Vichar | बिनधास्त जियो | Good Thoughts In Hindi
Sunder Vichar | बिनधास्त जियो | Good Thoughts In Hindi

Sunder Vichar | बिनधास्त जियो |
Good Thoughts In Hindi

good-thoughts-in-hindi-on-life-suvichar-vb-vijay-bhagat-samay-suvichar-in-hindi-हिंदी-सुविचार-सुंदर-विचार-selfie
good-thoughts-in-hindi-on-life-suvichar

बढ़ती उम्र को देखकर निराश ना हो.. क्योंकी अपने आप को बढ़ते हुए उम्र के
साथ स्वीकार करना आपको एक तनावमुक्त जीवन दे सकता है.

याद रखें आपकी उम्र जो भी हो लेकिन हर उम्र एक अलग तरह की खूबसूरती
लेकर आती है, उसका भरपूर आनंद लीजिये.

आप अपने बालों को रंग करवाना चाहते हैं… बेझिझक बाल रंगिये,
आपको लगता है की वज़न कम रखना है तो रखिये, आपका मन
तरह तरह के कपड़े पहने को कर रहा है तो बेझिझक पहनिए.

Sunder Vichar | बिनधास्त जियो

एक बच्चा बन जाइए… बच्चों की तरह खिलखिलाइये, बच्चे की तरह
साफ दिल से सोचिये, अच्छा माहौल रखिये, अपने आप को आईने में देखे,
आईने में जो सच्चाई दिखे उसे सकारात्मक सोच के साथ स्वीकार करे.

कोई भी कितना भी क्रीम- पावडर लगा लो, ये आपको गोरा नही बना सकते.
कोई भी शैम्पू बाल झड़ने से नही रोकता, कोई भी तेल बाल नही उगा सकता.
कोई भी साबुन आपको बच्चों जैसी स्किन नही दे सकती. चाहे वो किसी भी
कंपनी का प्रोडक्ट हो…

सब अपना-अपना सामान बेचने के लिए लुभावने विज्ञापनों द्वारा झूठ बोलते हैं.
ये सब नैसर्गिक होता है.

जैसे जैसे उम्र बढ़ेगी आपके सर के बाल से लेकर पांव के नाखून तक सब में
बदलाव आता है, आप पुरानी मशीन का अच्छा रखरखाव रखने से उसे बढ़िया
चला तो सकते हैं… लेकिन उसे नई तो नही कर सकते ना…!

कोई बात नही अगर आपका शरीर बेडौल हैं तो…
कोई बात नहीं आपकी नाक मोटी है तो…
कोई बात नही… आपकी आंखें छोटी हैं या भुरी हैं तो…
कोई बात नही अगर आप गोरे नही हैं… या बहुत ज्यादा गोरे हैं तो…
कोई बात नहीं अगर आपके होठ बड़े बड़े हो, या सही आकार में ना हो…
फिर भी हम सुंदर हैं, अपनी सुंदरता को पहचानिए.

दूसरों से कमेंट या वाह वाही लूटने के लिए सुंदर दिखने से ज्यादा ज़रूरी है,
आप अपनी सुंदरता को महसूस करें.

हर बच्चा सुंदर इसलिये दिखता है कि वो छल कपट से परे मासूम होता है
और बडे होने पर जब हम छल और कपट से जीवन जीने लगते है तो वो
मासूमियत खो देते हैं… और उसी सुंदरता को पैसे खर्च करके खरीदने की
कोशिश करते हैं.
मन की खूबसूरती पर ध्यान दो.

पेट निकल गया तो कोई बात नही उसके लिए क्या शर्माना, हमारा अपना शरीर हैं,
हमारी उम्र के साथ बदलता है, साथ ही वज़न भी उसी हिसाब से घटेगा बढेगा
इसे हमें ही समझना हैं. इसके लिए दुःख नहीं करना है.

सारा इंटरनेट और सोशल मीडिया तरह तरह के उपदेशों से भरा रहता है.
यह खाओ, वो मत खाओ, ठंडा खाओ, गर्म पीओ, कपाल भाती करो,
सवेरे नीम्बू पीओ, रात को दूध पीओ, ज़ोर से सांस लो, लंबी सांस लो,
दाहिने से सोइये ,बाहिने से उठिए, हरी सब्जी खाओ,
दाल में प्रोटीन है, दाल से क्रिएटिनिन बढ़ जायेगा…

अगर पूरे एक दिन सारे उपदेशों को पढ़ने लगें तो पता चलेगा, ये ज़िन्दगी बेकार है,
ना कुछ खाने को बचेगा… ना कुछ जीने को…! आप डिप्रेस्ड हो जायेंगे.

ये सारा ऑर्गेनिक, एलोवेरा, करेला, मेथी, लवकी में फंसकर दिमाग का दही हो जाता है.
स्वस्थ होना तो दूर मानसिक तनाव हो जाता है, अरे…! हम मरने के लिये ही जन्म लेते हैं,
कभी ना कभी तो मरना है… अभी तक बाज़ार में अमृत बिकना शुरू नही हुआ है..
हर चीज़ सही मात्रा में खाइये, हर वो चीज़ थोड़ी थोड़ी जो आपको अच्छी लगती है,
भोजन का संबंध मन से होता है, और मन अच्छे भोजन से ही खुश रहता है.

मन को मारकर खुश नही रहा जा सकता, थोड़ा बहुत शारीरिक कार्य करते रहिए,
सुबह टहलने जाइये, हलकी फुलकी कसरत करीये, व्यस्त रहिये, मस्त रहिये,
शरीर से ज्यादा मन को सुंदर रखिये…!

सुंदर विचार – Hindi suvichar with images

सुंदर बोधकथा | Good Thoughts In Marathi | Marathi Kahani

0
सुंदर बोधकथा | Good Thoughts In Marathi | Marathi Kahani
सुंदर बोधकथा - Good Thoughts In Marathi - Marathi Kahani - Story - Marathi Suvichar

सुंदर बोधकथा – Good Thoughts In Marathi – Marathi Kahani – Story – Marathi Suvichar

भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे एकदा जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी रस्ता
नाही समजल्याने ते तिघेही रस्ता चुकले.

ते जंगल खुपच घनदाट होते, त्यांना जंगलातील ना पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला की,
आता आपण येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून समोर जायचे.

जंगलात वाट चुकुन चालता चालता तिघेही खुप दमलेले होते, पण…
जंगलात सुरक्षित रात्र काढण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.

पहिली पाळी सात्यकीची, दुसरी बलराम आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण असे ठरले.

सात्यकी ने पहारा देणे सुरू केले, काही वेळातच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की
एक माणूस पहारा देत आहे आणि दोन माणसे झोपलेली आहेत. तो पिशाच्च झाडावरून खाली उतरला
आणि सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान करू लागला.

पिशाच्चाने केलेले आव्हान पाहून सात्यकीला क्रोध आला आणि क्रोधाने जसा पिशाच्चावर धावून गेला…
तसाच पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत चांगलेच मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येत होता तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होत होता व ते
सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

सुंदर बोधकथा – Good Thoughts In Marathi – Marathi Kahani – Story – Marathi Suvichar

एका प्रहरा नंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने बलरामांना त्या
पिशाच्चाबदल काहीही सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास आव्हान दिले. बलरामही
क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार बलरामांना वाढलेला  दिसून आला.
ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितकाच त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे.
शेवटी तो ही प्रहर संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

त्या दोघां प्रमाणे पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना ही आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित
करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापला व जोर जोरात ओरडून श्रीकृष्णांना
बोलावू लागला पण श्रीकृष्ण मंदस्मित करत आपल्या मनाला शांत ठेवले. आणि तसेच
शांत भावात उभे राहिले.

तसेच एक आश्चर्य झाले…! जसे जसे पिशाच्चाला क्रोध यायचा तसतसा त्याचा आकार लहान होत जायचा.
अशीच रात्र संपत गेली आणि पहाट होता होता त्याचा आकार अगदी लहान झालेला होता.
आता तो एक लहानसा कीडा झाला.

भगवान श्रीकृष्णांनी त्या छोट्या कीड्याला उचलून आपल्या उपरणण्यात बांधुन ठेवला.
सकाळ झाल्यावर तिघेही पुढील प्रवाशाला निघाले. चालता चालता सात्यकी व बलरामांनी
रात्रीची कहाणी सांगितली, त्यावर श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला आणि म्हणाले…
तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हते कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला
जिंकण्यासाठी शांती हेच औषध आहे. क्रोधाने फक्त क्रोध वाढतो मात्र.
मी एकदम शांत राहिलो कसलाही प्रतिकार दिला नाही, म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता
या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

तात्पर्य : क्रोधावर फक्त संयमानेच विजय मिळविता येतो.क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत 
नाही, तर…शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते. क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे 
नसून,  आपल्या विचारातच वसत असते.

मराठी सुविचार – चांगले विचार – Good Thoughts In Marathi On Life

Hindi Story, Sunder Vichar, हिंदी कहानी | प्रेम की पराकाष्ठा

0
Hindi Story - Sunder Vichar हिंदी कहानी | प्रेम की पराकाष्ठा

Hindi Story – Sunder Vichar
हिंदी कहानी | प्रेम की पराकाष्ठा

एक जगह काफी दिनों से आने जाने वाले लोगों को कुछ समाजसेवी लोग खाना बाँट रहे थे…

आश्चर्यजनक बात ये थी की, वहां प्रतिदिन एक कुत्ता आता था और किसी ना किसी के हाथ

के खाने के पैकेट पर झपटी मारकर खाना ले जाता था. वो समाजसेवी लोग भी परेशांन थे की,

किसी दिन ये कुत्ता किसी को काट ना ले…

 

इसिलिये उन्होने एक आदमी को आज वहीं खड़ा कर दिया की, कुत्ता खाने पर झपटने के

चक्कर में उसके दात किसी को चुभ ना जाये…

लगभग बारह बजे का समय हो रहा था और वे लोग अपना खाना बाँटना शुरू कर चुके थे…

उसी वक्त वह कुत्ता वहां तेजी से आया और एक आदमी के हाथ की खाने की थैली छिनकर

भाग गया… आज जिसे उस कुत्ते को भगाने के लिए रखा था, वह लाठी लेकर उसके पीछें भागा.

 

कुत्ता भागते भागते एक झोपडी के अंदर चला गया… वह आदमी भी कुत्ते का पीछा करते करते

वहीं आ गया… तब तक कुत्ता खाने का पैकेट उस झोंपड़ी में रखकर बाहरआ चुका था…!

Hindi Story – Sunder Vichar
हिंदी कहानी | प्रेम की पराकाष्ठा

उस आदमी को बड़ा आश्चर्य हुवा… उसने झोंपड़ी कें अंदर जा कर देखा तो… गंदे कपडे पहने

हुए एक आदमी अंदर सोया है… उसके चेहरे पर बड़ी सी दाढ़ी है और वह एक पैर से पूरी तरह

अपंग भी नहीं है.

“ओ भाई साहब…! ये कुत्ता आपका है क्या…?”

“मेरा कोई कुत्ता नहीं है… शेरू तो मेरा बेटा है…

कृपया उसे कुत्ता मत कहो।” अपंग आदमी बोला…

 

इसपर वह आदमी बोला “अरे भाई…! यह कुत्ता हर दिन खाना छीनकर भागता है…

किसी को काट लिया या झपटते हुए इसका दात चुभ गया तो, ऐसे में कहाँ डॉक्टर मिलेगा…

 

कृपया आप इसे बांध के रखा करे. रही खाने की बात तो, आपकी हालत मुझसे नहीं देखी

जा रही है… मै ज्यादा कुछ तो नहीं कर सकता लेकिन… कल से प्रतिदिन आपके लिए मै

खाना लाऊंगा.

अपंग आदमी :- भाई बात खाने की नहीं है… और मैं उसे मना नहीं कर पाउँगा…!

वह भले ही मेरी भाषा को ना समझता हो, लेकिन मेरी भूख को समझता है…!

जब मैं घर छोड़ के आया था तब से यही मेरे साथ है…! मैं नहीं कह सकता कि मैंने उसे पाला है

या उसने मुझे पाला है…! लेकिन मेरे तो बेटे से भी बढ़कर है.

मैं तो फूटपाथ पर छोटी मोटी कोई भी वस्तु बेचकर अपना गुजारा करता हूँ…

लेकिन अभी सब बंद है…!

 

वह आदमी एकदम शांत हो गया…

उसे ये संबंध समझ ही नहीं आ रहा था…

फिर उस अपंग आदमी ने खाने का पैकेट खोला और आवाज लगाई, ” शेरू….

ओ बेटा शेरू… चल आ जा खाना खा ले…

कुत्ता दौड़ता हुआ अंदर आया और उस अपंग आदमी का मुँह चाटने लगा…

कुत्ते ने खाने को सूंघा भी नहीं… फिर उस आदमी ने खाने की थैली खोली

और पहले शेरू का हिस्सा निकाला, फिर अपने लिए खाना रख लिया

 

खाओ बेटा…! अपंग आदमी ने कुत्ते से कहा… लेकिन कुत्ता उस आदमी को ही देखता रहा…

तब वह अपने वाले हिस्से से खाना खाने लगा..  उसे खाते हुये देखकर कुत्ते ने भी खाना शुरू

कर दिया. दोनों खाने में व्यस्त हो गए. उस आदमी के हाथ से लाठी छूटकर नीचे गिर गई.

जब तक दोनों ने खा नहीं लिया तब तक वह उन्हें अपलक देखता रहा…!

 

भाई साहब…! आप भले बहुत गरीब हों , अपंग हों, मजबूर हो… लेकिन आपके जैसा बेटा

किसी के पास नहीं होगा… उसने जेब से पैसे निकाले और उस भिखारी के हाथ में रख दिये….

रहने दो भाई… किसी और को ज्यादा जरूरत होगी इनकी….

मुझे तो शेरू ला ही देता है… मेरे बेटे के रहते मुझे कोई चिंता नहीं हैं…

 

वह लड़काअचंभित था कि आज आदमी, आदमी से छीनने को बेचैनी है…

और ये कुत्ता… बिना अपने मालिक के खाये…. खाना भी नहीं खाता है.

उसने अपने सिर को ज़ोर से झटका और वापिस चला आया… अब उसके हाथ में कोई

लाठी नहीं थी.

प्रेम पर कोई वार कर भी कैसे सकता है…. और ये तो प्रेम की पराकाष्ठा थी.

Positive Story In Hindi | हिंदी कहानी | प्रेरणादायक कहानी

Best Good Thoughts In Hind | 100+ पॉजिटिव सुविचार हिंदी में