Home Blog Page 36

Good Thoughts In Marathi | वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल

1
marathi suvichar - good thoughts - chhan vichar marathi- madat - good thoughts in marathi on life - मराठी सुविचार - सुंदर विचार -vb

Good Thoughts In Marathi |
वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल

marathi suvichar - good thoughts - chhan vichar marathi- madat - good thoughts in marathi on life - मराठी सुविचार - सुंदर विचार - suvichar images - suvichar in marathi
एका शाळेने ठरवले की चालू वर्षापासून शाळेत शिकत असलेल्या सर्वात गरजू मुलाला शाळेकडून
आर्थिक मदत द्यायची.
त्यासाठी शाळेतील शिक्षकांनी चांगली माहिती गोळा करून अचूक मुलगा निवडावा… तरच मदत
ही योग्य विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल…!
शिक्षकांसाठी शाळेत सर्वात गरजू विद्यार्थी शोधणे म्हणजेच खूप मोठी अडचण होती. कारण… आता
ही लहान मुले सुद्धा इतके छान आणि स्वच्छ राहतात की… मुलांजवळ जरी एकच जोडी कपडे असले
तरीही… त्यालाच दररोज धुवून आणि त्याची प्रेस केल्यासारखी घडी केल्यानंतरच त्याला वापरतात.
मग आता गरजू मुलगा शोधायचा तरी कसा…? आणि प्रत्येकाला विचारायचे तरी कसे कि,
तुमच्यात सर्वात गरजू कोणआहे…?
शिक्षकां समोर खूपच मोठी अडचण होती. चार – पांच दिवस नुसते अंदाज लावण्यातच निघून गेले.
मोठ्या वयाच्या माणसांमधे गरजू माणूस शोधणे जितके सोपे आहे, पण… लहान मुलांमधे तितकेच
अडचणीचे आहे. एका शिक्षकाने शेवटी जी मुले गाडीनेच शाळेत येत होती आणि गाडीनेच घरी जात
होती अशा तीन – चार मुलांना हाताशी घेतले…

Good Thoughts In Marathi |
वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल

 
जेवणाची सुट्टी झाली आणि शिक्षक ऑफिस कडे निघाले तर बाजूच्या वर्गात काही मुले फळ खातांना
दिसली… शिक्षक वर्गात गेले आणि फळ खाणाऱ्या मुलांना विचारले… ” मुलांनो एक मदत कराल का…? 
मला आपल्या वर्गातला सर्वात गरजू…?”
एका क्षणाचाही उशीर न लावता… त्या सर्व मुलांनी एकच नाव उच्चारले…” सर आपल्या वर्गातील तो 
अजय आहे ना…! तो सर्वात गरजू आहे.”
मुलांनी एका सेकंदात प्रश्न सोडवला होता. ” हे कशावरून म्हणता…? “
 
सर. त्याचा शर्ट दोन- तीन ठिकाणी तरी शिवलेला आहे… त्याच्या हाफपेन्टलाही मागून दोन
मोठे ठिगळं लावलेली आहेत… त्याच्या पायात चप्पल राहातच नाही… आता जेवणाच्या सुट्टीत
बघा तो कुठेतरी एकटा बसून प्लास्टिकच्या पन्नी मध्ये आणलेली फक्त अर्धी भाकरी खात
असेल… आणि सर, ती भाकरीही कालचीच राहते… भाजीही कुठली सर…? गुळाचा लहानसा
एक खडा असतो. आम्ही सांगतो… अजयच सर्वात गरजू आहे. शाळेने त्याच मुलाला
मदत द्यायला हवी. 
 
मुले अगदी एखाद्या वाहत्या पाण्यासारखी सतत पुढे बोलतच राहीली… पण त्या शिक्षकाला ते ऐकू येणे
शक्य नव्हते. कारण त्या शिक्षकांचा अजय आवडता विद्यार्थी होता…! ते अगदी विचारातच पडले… की
अजय एवढा गरजू असेल…? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत…? त्याचे अक्षर स्वच्छ
आणि मोकळे होते. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन त्या शिक्षकांना घडत होते…! एकदा तर
त्याची वही त्यांनी आपल्या घरी पत्नीला दाखवायला नेलेली होती आणि म्हणाले होते…
” बघितलेस…! हे सातव्या वर्गाच्या मुलाचे अक्षर आहेत…! असे सुंदर अक्षर असावे हे माझे 
स्वप्न होते. उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून 
लिहिलेली उत्तरे…” 
पेपर चे गठ्ठे आणायला अजय धावतच येत असे आणि त्यांच्या आधीच ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा
अजयचा उत्साह त्या शिक्षकाला थक्क करून टाकत असे…!
शिक्षक अगदी विचारमग्न… असा अजय परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा
मला येऊ नये… या गोष्टीचा मला खूपच दु:ख वाटत आहे… जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना समजते
आणि मला त्याची साधीसी कल्पनाही नाही… अरेरे…!
 अजय मागील सहलीला आला नव्हता. फक्त शंभर शंभर रुपयेच घेतले होते मुलांकडून… पण अजय
चे नाव लिस्टमध्ये नव्हतेच… मी साधा त्याला एक शब्द विचारला ही नाही…! मी खूप कमी पडत आहे…
सहलीला आलेल्या मुलांच्या किलबिलाटात नाही आलेल्या अजयची मला साधी आठवणही झाली नव्हती.
केवळ शंभर रूपये नसल्याने त्याचे रमण सायन्स बघण्याचे राहून गेले. एका चांगल्या अनुभवाला मुकला
होता तो. त्याचा हा आनंद मी हिरावला होता.यादीत अजयचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का
बोलावले नाही…? अजय स्वत:हून सांगणे तर शक्यच नव्हते… आणि माझ्या व्यस्त दिनक्रमात अजयसाठी
जणू वेळच शिल्लक नव्हता…!

Good Thoughts In Marathi |
वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल

शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो आहे… मुलांनी सुचवलेले नाव बरोबर आहे… आर्थिक मदत,
आणि ती पण भरघोस मदत अजयलाल मिळायलाच हवी. आता कसलीही शंका नाहीच…
त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. सर्व मुलांनी एका स्वरात सुचवलेले
नाव आणि अजयने सहलीला न येणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून… शिक्षकाने मुख्याध्यापकांना
नाव देउन टाकले…  अजय राणे… वर्ग सातवा (अ) अनुक्रमांक पंचेचाळीस….
आदरणीय मुख्याध्यापक नाव वाचून म्हणाले, ” चांगली खात्री केली आहे ना सर…? कारण 
लहानशी रक्कम नाही आहे… या विद्यार्थ्याची पूर्ण वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, 
गणवेश… इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे.”
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने ते म्हणाले… ” सर, त्याची काळजीच करू नका. 
वर्गातील सर्वात गरीब आणि हवे तर आदर्शही म्हणा तर… अजय राणेच आहे…!”
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन ते निघालो. अजयला मिळणारी मदत, त्यामुळे
त्याचे आर्थिकदृष्ट्या चांगले होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पना चित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते
त्यांना कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी शिक्षक शाळेत लवकरच गेले.. शाळेतील चांगल्या अक्षरांचे सर म्हणून प्रसिद्ध… भोयर
सरांनी खूपच चांगल्याप्रकारे फ़ळा सजवला होता. त्यावर ‘ गरजू असूनही आदर्श ‘ असे म्हणून
अजयचे नाव होते… शाळा भरली… आणि ते भोयर सर ऑफिसमध्ये बसलेले होते… अचानकपणे त्यांचे
लक्ष ऑफिसच्या दाराजवळ उभा असलेल्या अजय कडे जाते…
अजयच्या चेहऱ्यावर न समजणारे भाव…. राग आवरावा तसा चेहरा… ” सर, रागवू नका… पण आधी
त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका.” अरे, काय बोलतोयस तुला समजते का…?”
चुकतही असेन मी… वाट्टेल ती आपण मला शिक्षा करा… पण सर ते नाव…!
त्याच्या डोळ्यातलं पाणी… आवळलेल्या मुठी… घशातला आवंढा… सरांना काहीच समजत नव्हते…
मी ज्याचे अभिनंदन करायच्या तयारीत एवढा आनंदी आणि उत्सुक आहे… तो असा…?
” मला मदत कशासाठी सर…?
गरजू आहे म्हणून…? पण मी तर संपन्न आहे.”
चप्पल नसलेले त्याचे ते लहान पाय…  रफ़ू केलेला कालर सरांच्या नजरेतून सुटत नव्हताच…
शाळेच्या चौदा वर्षाच्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच भोयर सर कडे आली होती.
” अरे पण…? ”                                                  www.vijaybhagat.com
” सर… भरवसा ठेवा… मी संपन्न आहे… कदाचित सर्वातही संपन्न असेन..! सर… मी गरजू आहे हे
ठरवले कोणी…? मी बोलतांना चुकत आहे हे मला कळत आहे… पण सर… जर का ते नाव तसेच
राहिले तर मी आज नक्कीच आजारी पडेन…!
बोलता बोलता अजय सरांच्या जवळ आला आणि त्याने भोयर सरांचे पायच धरले. अजय ला उठवत…
सर म्हणाले… ” ठीक आहे. तुला ती मदत नको आहे ना…. बर… नको घेऊस… पण तू संपन्न 
आहेस… ते कसे काय…?”
” सर… आपण माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा… सगळ्याच विषयांच्या… त्या पूर्ण आहेत. हा.. 
हे खरे आहे की मी पुस्तके जुनी वापरतो…! पण सर नवीन पुस्तक आणि मागीलवर्षीच्या 
पुस्तकातील मजकूर तर तोच असतो ना…? मी आपल्या मनात काय उतरवतो ते महत्वाचे 
नाही का…? सर, माझे पाचवी पासूनची टक्केवारी बघा… नेहमी पहिल्या तीन मध्येच असतो. 
मागीलवर्षी खेळा पासून तर निबंधा पर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर…सर,सांगा ना… मी गरजू कसा…?”
अजय सरांनाच विचारत होता… आता तर सरांच्या दु:खाचे पाणी विरून त्यात… अजयच्या भविष्याचे
स्वप्न थरारत होते…!

Good Thoughts In Marathi |
वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल

 
” खरे आहे अजय.. पण तुला या पैशाने मदतच… “
” मदत कसली सर…? उलट माझी कष्ट करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. 
शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर… 
मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाने बंद करेन…! “
” म्हणजे…? “
वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. ठेकेदार बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला
त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी जमा करतो… सर, संचयिका आहे ना शाळेची,
त्यातले माझे पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात…
मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले वाटते… म्हणूनच तुम्ही मला निवडलेले वाटते. पण सर…
मीच नाही तर आमचे घरचेही सर्व संपन्न आहे. घरातले सगळे काम करतात. काम म्हणजे कष्ट…!
जेव्हा रंगाचे काम नसते  तेव्हा बाबा बस वर हमालीही करतात. आई धुणे – भांडी करते.
मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो, दिवस कसा संपतो ते कळतच
नाही… शाळेतल्या वाचनलयातली पुस्तके मीच सर्वात जास्त वाचली आहेत.
तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही मी पत्र पाठवतो . सर, माझ्या घरी याच तुम्ही,
माझ्याकडे व.पु. काळे यांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे…
सर, आहे ना मी संपन्न…? “
 
आता तर तो हास्य रेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही
शिकलो. रात्री देवळात होणाऱ्या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात…!
ऐकतांना भान हरपून जाते…
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता. आश्चर्यकारकपणे सरांनी विचारले…
” व्यायामशाळेतही जातोस…? “
” सर… तेवढा रिकामपण कुठला…? घरातच रोज बारा सूर्यनमस्कार आणि तीस बैठका काढतो. “
सरांच्या अंगावर एक थरार उमटला… कौतुकाचा.
” अजय मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा… “
” म्हणूनच म्हणतो सर…! “
” हे नाव ज्या कारणासाठी आहे… त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली, पण…
याचे रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून…
हे पारितोषीक तरी…”
” सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचले,
हेलन केलरचे, महात्मा फुले यांचे चरित्र वाचले. सर, हे वाचले की कळते की ही माणसे केवढे कष्ट
करून मोठी झाली.
माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा, पण सर, नको त्या वयात
असा पैसा पुरवत गेलात तर घडायचे राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन
जाईल… सर…..प्लीज…..!”
वाचनाने… स्पर्धांतल्या सहभागाने… कलेच्या स्पर्शाने… कष्टाने… त्याच्या वाणीला व्यावहारिकतेची
खोली होती… संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा अजय राणे स्पष्ट दिसतही
नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात संपन्न मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू
पाडणारा…! संपन्न…!
धन्यवाद…..

Good Thoughts In Marathi |
वाचून नक्कीच तुमचे मन भरुन येईल

Thank You For Birthday In Marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश

6
Thank You For Birthday In Marathi | वाढदिवस धन्यवाद संदेश
वाढदिवस जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश

Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश

    

वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश - Thank You - vb good thoughts - with images - धन्यवाद - विजय भगत
वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश – Thank You
 

 

वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश – Thank You

आभार 

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 
आपण सर्वांनी आठवणीने प्रेमपूर्वक
शुभेच्छा दिल्या आहेत…
त्यासाठी मी आपला सगळ्यांचा 
खूपच आभारी आहे.
    धन्यवाद…!
💙💛🥀🌹💛💙

आभार 

 💌 माझा वाढदिवस हे फक्त निमित्त…! 
खरेतर या निमित्ताने काही अमुल्य क्षण आठवतात
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि 
सर्वांत महत्वाचे म्हणजे… या जगण्याच्या लढाईला
खूप शक्ती मिळते…..
धन्यवाद
💙💛🥀🌹💛💙

आभार 

💖माझा जन्मदिवस अविस्मरणीय केला…. 
त्यासाठी आपले मनःपूर्वक आभार…
माझ्या आजवरच्या वाटचालीत 
आपल्या सारख्या हितचिंतकांच्या 
शुभेच्छा आणि प्रेम…
आपुलकी यांचा बहुमोल वाटा आहे. 
धन्यवाद

💙💛🥀🌹💛💙

Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश

 

💖आपल्या दिलेल्या शुभेच्छा 

मी हातात घेतलेल्या कार्यात 
मला निश्चितच माझे मनोबल
वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत.
यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो!
धन्यवाद…!

💙💛🥀🌹💛💙

💖सर्वांचे मनपुर्वक खूप खूप धन्यवाद…

खरेतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे 

त्यांना अनोळखी म्हणा
किंवा परके केल्यासारखे वाटते…!

पण कधी- कधी आपल्या भावना 
व्यक्त झाल्या शिवाय दुसरा पर्याय नसतोच…!

तसे बघायला गेले तर आज माझा वाढदिवस नव्हताच….
ते होते… तुमच्या शुभेच्छा… तुमचे प्रेम… तुमची काळजी… 
तुमचे आशिर्वाद… आणि आज पर्यंत तुमची मिळालेली 
खंबीर आणि अतुट साथ.
अशा तुम्ही सगळ्यांचा पवित्र भावनांचा 
तो ” उत्सव  होता माझ्यासाठी.
 💙💛🥀🌹💛💙

💖माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझे सर्वच 
लहान – मोठ्यांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा
आणि आपले दीर्घायुष्याचे आशिर्वादांचा 
मी मनापासुन स्विकार करतो आणि सोबतच
या वर्षभरात माझ्या कडून कळत- नकळत 
काही चुका झाल्या असतील किंवा
कुणाचे मन दुखावले असेल तर…. 
त्याबद्दल मी हाथ जोडून क्षमा मागतो…!

असेच आपले प्रेम स्नेह आणि आशिर्वाद 
माझ्यावर सतत राहु द्या.
पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद…!
💙💛🥀🌹💛💙

वाढदिवस / जन्मादिवासांच्या शुभेच्छांचा आभार प्रकट संदेश – Thank You

💖माझा कालचा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या 
अपरिमित शुभेच्छांच्यामुळे अविस्मरणीय झाला.

आपण असेच माझ्यावर प्रेम करीत रहा… 
आणि आपला आशिर्वाद देत रहा.
तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी शक्ती आहे.

मी व्यक्तीश: प्रत्येकाला 
धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला आहे…
तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर 
क्षमा करा.
💙💛🥀🌹💛💙

💖प्रथम सर्वांचे मनापासून आभार
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 
विविध क्षेत्रातील, त्यात राजकीय शैक्षणिक
सामाजिक वडीलधारी आणि माझा मित्र परिवार 
तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी
शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो.

शुभेच्छांचा वर्षाव इतका होता की 
कुणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो…!

कुणी विचारले काय कमावले 
तर मी गर्वाने सांगू शकेल की 
तुमच्या सारखी जिवा भावांची 
माणसे कमावली…!
सगळ्यांचा मनापासून आभार…!
💙💛🥀🌹💛💙

Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश

💖आजच्या या धावपळीच्या जगात 
आपण मला आठवणीने
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपले प्रेम आपुलकी… स्नेह… आशिर्वाद
असेच सदैव सोबत राहु द्या
आपल्या सर्वाचे मनापासून आभार
💙💛🥀🌹💛💙

आभार

💖आपन सर्वांनी माझ्या वाढदिवसा निमित्त 

शुभेच्छा दिल्याआपले स्नेह… प्रेम… 
आपुलकी आणि आशीर्वाद दिला…
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद…
💙💛🥀🌹💛💙

आभार

💖काल माझा वाढदिवस झाला…! 

अनेकांनी प्रत्यक्ष भेटून फोन 
एसएमएस… व्हॉट्सअप… फेसबुक… 
सोशल मिडीया प्रिंट मिडिया द्वारे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या… 
तसेच आशिर्वाद ही दिला…
त्या सर्वांचा मी आभारी आहे…!
💙💛🥀🌹💛💙

असेच सर्वांचे प्रेम सहकार्य… स्नेह… 

आशिर्वाद शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना

पुनः एकदा धन्यवाद…

💙💛🥀🌹💛💙
💖आपला मी खुप खुप आभारी आहे
आपण कितीही व्यस्त असलात 
तरी पण वेळात वेळ काढून
आपण मला शुभेच्छा संदेश पाठविले.
त्याने मी खूपच आनंदलो…! सुखावलो!
💙💛🥀🌹💛💙

💖तुमचे प्रेमाचे बंध असेच घट्ट राहू दया...!
आपला मैत्रीप्रेम आणि विश्वास 
असाच कायम राहु द्या!
ज्याने मला माझी नवी वाट शोधतांना 

मुळीच एकटेपणा जाणवणार नाही.

तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे!
धन्यवाद…

💙💛🥀🌹💛💙

Thank You For Birthday In Marathi |
वाढदिवस धन्यवाद संदेश

 

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार...!

💖माणूसच्या आयुष्यात 

पैसा आणि मेहनतीची 
जेवढी किंमत आहे… 
तेवढीच किंमत ही 
वेळेची ही आहे 
असे मला वाटते.
 
आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील 
अमुल्य असा वेळ काढून मला फोन… संदेश… 
व्हाट्सअप फेसबुक… इतर सोशल मिडीयाच्या 
माध्यमातून तसेच आपण स्वतः भेटून दिवसभर 
माझ्या वाढदिवसा निमित्त ज्या शुभेच्छा दिल्या आहेत…
त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे...!

त्याच प्रमाणे बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या 
शुभेच्छांचाही मी स्वीकार करतो…. तसेच
इच्छा असतांनाही वेळेच्या अभावी 
शुभेच्छा देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेही जणांचाही
मी आभारी आहे...!

आपण दिलेल्या हया शुभेच्छांच्या जोरावर 
मी माझ्या पुढील आयुष्यात गरूड झेप घेईल
यात शंका नाही...
💙💛🥀🌹💛💙

💖आपले हे प्रेमच आयुष्याचा मूळ भाग असलेल्या 
देव देश धर्म… अर्थात थ्री डी च्या संकल्पना 
माझ्या आयुष्यात दृढवत करतील...
या पुढील आयुष्यातील प्रवासात आपले प्रेम आणि सोबत 
अशीच कायम रहावी
अशी भगवंताकडे प्रार्थना करतो...

धन्यवाद…!

💙💛🥀🌹💛💙
 

 

Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो | नवरा बायको स्टेटस

1
नवरा तो नवराच असतो - good thoughts in marathi - marathi suvichar with images - vb - marathi suvichar - sunder vichar - chhan vichar marathi
नवरा तो नवराच असतो - good thoughts in marathi

Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो |
नवरा बायको स्टेटस

नवरा तो नवराच असतो - good thoughts in marathi - marathi suvichar with images - vb - marathi suvichar - sunder vichar - chhan vichar marathi - नवरा बायको सुविचार - नवरा कविता
नवरा असतो म्हणून जीवन झकास वाटते, नाहीतर त्याच्या शिवाय श्रुंगार ही भकास वाटते 

 

तो रागवला कितीही तरी प्रेमाने शेवटी जवळ तोच घेतो… 
रागाने कधी बाहेर गेलाही तरी…
त्याचे घराकडे पाय आपोआपच वळतात… 
आपल्या मनातील भाव डोळ्यातूनच त्याला कळतात… 
जरी दुःखी असला कितीही तरी, सारे पचवून घेतो…  
आपल्या शिवाय तिला कोण आहे, असे म्हणून एक गजरा घेऊन येतो …
नवरा तो नवराच असतो…!
का करतेस काळजी…  आहे ना मी…  म्हणून किती धीर देतो. 
अडचणी सगळ्या आपल्या मनात ठेऊन
बायको कडे हासऱ्या नजरेने बघतो…!
नवरा तो नवराच असतो…!
जसी छत असते आपल्या घरावर… 
तसेच डोक्यावर आपल्या नव-याचे झाकण असते. 
त्यांच्या या झाकण रुपी सावलीत आपण पुर्णतः सुरक्षित असतो.
चटके ऊन्हाचे स्वतः खातो… पण सावली आपल्या डोक्यावर देतो…
नवरा तो नवराच असतो…
आपण चार दागिने घालून म्हणतो… 
मान माझी पण, मंगळ सुत्र तुझ्या नावाचे…. 
कपाळ माझे पण टिकली तुझ्या नावाची…
परंतू नवरा कधी तरी म्हणतो का की…
परिश्रम माझे पण, पगार तुझा…
शरीर माझे पण, माझे जीवन तुझे…
जन्म माझा,आईच्या उदरात, पडलो मी तुझ्या पदरात…
तूच जिवन संगिनी म्हणून जीवनाचे मंजुळ मानत असतो…
शेवटी नवरा तो नवराच असतो…

Navra Bayko Status | नवरा तो नवराच असतो |
नवरा बायको स्टेटस

ही संसाराची गाडी दोन चाकांवर चालते
त्यासाठी दोघांनाही प्रमाणशीर सांभाळावा लागतो…
जरी एक चाक डगमगले तरी…
एका चाकावर रथ चालविणे फार कठीण होते…
जसे बायको शिवाय घराला घरपण राहत नाही…
तसेच नव-या शिवाय बायको ही पूर्ण नाही…

नवरा घराचा कळस आहे आणि कुटुंबाची सावली आहे…
दुःखाचे चटके नवरा खातो… आम्हाला मात्र सावलीत ठेवतो…
नवरा तो नवराच असतो…

या जीवनातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण… 
नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही….
म्हणून एकमेकांना आपुलकीची हाक द्या…
एकमेकांना प्रेमाची साथ द्या… 
हे जिवन क्षणभंगूर आहे…
म्हणून जगण्याचा भरपूर आनंद घ्या…

Happy Birthday Wishes Images | लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
happy-birthday-wishes-in-marathi-for-daughter-marathi-shubheccha-mulila-shubhecha-vijay-bhagat-vb-happy-birthday-lekila-shubhechha
happy-birthday-wishes-in-marathi

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – 
Happy Birthday Wishes with
Images in Marathi

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images-vb-vijay bhagat
वडील होण्याच्या आनंदा सारखा जगात
दुसरा कोणताच प्रचंड आनंद नाही आणि
जर मुलगी झाली तर मग त्याहून बेधुंद कोणतेच सुख नाही!
जेव्हा तू पोरी मुठ आवळून माझा बोट धरतेस
तेव्हा तो माझा प्रत्येक क्षण विशेष होतो. आणि
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जणू
पूर्ण जग जिंकल्याचा भास होतो.
माझ्या गाण्यापेक्षा जरी बेडकाचे किंचाळणे मधूर आहे
तरी माझ्या अंगाईने माझे पिल्लू झोपते हे समाधान भरपूर आहे.
पुण्यवान असावे लागते आणि त्यापेक्षा ही खूप भाग्यवान
ज्या बापाच्या हात उरकती सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान…!
मुला-मुलीत भेदभावाचा तो तर मी प्रश्न उगारत नाही
मुलीवर प्रेम जास्त असते बापाचे, हे सत्यही मी झुगारत नाही.
संसारात रमण्या पेक्षा मी आपल्या मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर नंबर येतो.
पप्पा जी… पप्पा जी म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
तसेच समाधानाची इवली इवली फुले
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.
तू नेहमी आनंदाने राहावीस
देवाकडे एवढेच मागणे आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणे आणि जागणे आहे.
आनंदाचे अगणित क्षण
तिच्या नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसते ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
नसीब ज्याला म्हणतात
ते माझ्या मुलीतच सापडले आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडले आहे.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणे
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.
आकाशा एवढे सुख काय आहे,
ते मुलगी झाल्यावर कळते…
एक वेगळच आपलेपण
तिचे प्रत्येक हास्य उधळत जाते.
इतरांचे नशीब घेऊन येण्याच्या बाबतीत
मुली खूप माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसे जग जाहीर आहेच.
मुलींचे एक मात्र छान असते…
मुलगी असण्याचा अभिमान असतो

त्यांचा अभिमान वडीलांसाठी.

मान, शान व सन्मान असतो.

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – 
Happy Birthday Wishes with
Images in Marathi

 

happy birth weshes with images - vijay bhagat - vb- wadhdivas subhecha - happy birthday wishes in marathi - janma divas - shubhecha
आज आपला वाढदिवस
वाढणाऱ्या प्रत्येक दिवशा गणिक
  आपले यश, आपले ज्ञान आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो… आणि सुख समृद्धी ची
बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…
आपणास उदंड आयुष्य लाभो… ह्याच
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
happy birth weshes with images - vijay bhagat - vb- wadhdivas subhecha - happy birthday wishes in marathi

 

happy birth weshes with images - vijay bhagat - vb- wadhdivas subhecha - happy birthday wishes in marathi
आजची तारीख शतदा यावी…
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृद्ध व्हावा…
सुखाचा ठेवा, मनोमनी साठवावा.

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images-vb-vijay bhagat

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images -vb -vijay bhagat
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – 
Happy Birthday Wishes with
Images in Marathi

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

 

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Happy Birthday Wishes with Images in Marathi- happy birthday wishesh with images

 

Poem on Wife In Marathi | बायकोवर मनभावन कविता | bayko kavita

1
Poem on Wife In Marathi | बायकोवर मनभावन कविता | bayko kavita

Poem on Wife In Marathi |
बायकोवर मनभावन कविता | bayko kavita

 

baykowar marathi kavita- baykowar suvichar- marathi suvichar-navara bayko prem - सुविचार - पती - पत्नी प्रेम - विजय भगत - vb

 

प्रत्येक विवाहित पुरुषाच्या जीवनात
एक बायको नावाचे व्यसन असतेच…!
ह्या व्यसनाला दर दिवशीच
नव्याने थोडे थोडे घ्यायचे असते…!
कधी हे व्यसन साखरे सारखे गोड असते…!
तर कधी कारल्या पेक्षा ही अधिक कडू असते…!
कधी ते सुता सारखे सरळ असते…!
तर कधी वाकड्या पेक्षाही  वाकडे असते…!
कधी ते हसते तर कधी खूपच चिडते…!
कधी फुगते तर कधी ते रुसते…!
कधी ते खूपच गोड-गोड बोलणार…!
आणि कधी तर शाब्दिक टोचणीही देणार…!
कधी ते पैशाची खूप उधळण करते,
खूप काही अनावश्यक खरेदीही करते…!
पण… एक – एक पैसा जोडून ते
भिशीचा पहाडही उभा करते…!
ह्या व्यसनाचे आणि वेळेचे काही फारसे जमत नसते
आपणच जमेल तसे आपले निभवायचे असते…!
या व्यसनाला कधीच नाही म्हणायचे नसते
फक्त त्याच्या हो ला आपले हो च म्हणायचे असते…!
हे व्यसन कधी गोड, कडू, आंबट कसेही असले तरी…
यालाच दर दिवशी नव्याने घ्यायचे असते…!
थोड थोड करून काटकसरीने वापरून ते
जीवनभर पुरवायचे असते…!
हे एक बायको नावाचे व्यसन असते…

ह्या व्यसनातून कधी सुटायचे नसते…!

1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती

1
1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती - maharastra din - जागतिक कामगार दिन

1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती

1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती - maharastra din - जागतिक कामगार दिन - labour day - जागतिक श्रमिक दिन - vb - इतिहास - विजय भगत
1 मे – महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन – माहिती 

कणखर देशा… 

पवित्र देशा….

प्रणाम घ्यावा…

माझा हा श्री महाराष्ट्रदेशा…!

 

आपणसर्वाना
१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन 

आणि कामगार दिन 

यांच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

आपल्या राज्याचा वाढदिवस म्हणजे १ मे.
60वर्षापूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजीआपल्या
महाराष्ट्र राज्याचीनिर्मित्तीम्हणा किंवा 
एक स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली.
मागील60वर्षात महाराष्ट्र राज्यानेअशीप्रगतीची
काश धरली कीआज महाराष्ट्र राज्य 
देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. 
व्यापार उद्योग म्हणातसेचकलासाहित्य,क्रीडा
शिक्षण,आरोग्य सुविधा आणि सगळ्यात 
महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेकक्षेत्रात आपले
महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र 
आपणास पाहायला मिळते.

इतिहास

१ मेतसी आपलीम्हणजे हक्काची सुट्टी
महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिवस
( आंतरराष्ट्रीय श्रमिक दिन / Labour Day ) 
या दिवशी साजरा केला जातो.
चला आताहे जाणूनघेऊ कि या दिवशी हे दिवस 
का साजरे केले जातात आणि काय या 
मागचाइतिहास आहे…!आपण थोडक्यात समजू या.

महाराष्ट्र दिनाचा इतिहास

21नोव्हेंबर1955 यादिवशी फ्लोरा 
फाउंटनच्या परिसरातखूपतणावाचे वातावरण होते.
कारण महाराष्ट्राला मुंबई देण्याचे राज्य पुनर्रचना 
आयोगाने नाकारलेहोते.त्यामुळे 
मराठी माणसेखूपचिडली होती.

सगळीकडेलहानमोठ्या सभांमधून या निर्णयाचा 
निषेध होत होता.शेवटी सगळ्या लहान 
मोठ्या संघटना मिळूनएकविशाल 
मोर्चा सरकारचाविरोधकरण्यासाठी 
फ्लोरा फाऊंटना समोरील 
चौकात येण्याचेठरले. तसेच एकाबाजूनेप्रचंड 
जनसमुदाय एका चर्चगेट स्थानका कडूनआणि
दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडूनमोठ मोठयाघोषणादेत
फ्लोरा फाउंटनकडे जमले.
सरकारने हा मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज 
करण्यात आला.पणअढळ सत्याग्रहीं 
मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि 
पोलिसांना गोळीबाराचा आदेश, मुंबई 
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई 
यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि 
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात105आंदोलकशहीदझाले.

याशहिदांच्याबलिदानापुढे व मराठी 
माणसाच्या आंदोलनामुळे सरकारनेविचार करूनशेवटी
1मे1960रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
त्यानंतर इ.स.1965मध्ये त्या जागी
हुतात्मा स्मारकाची (शहीद स्मारक )उभारणी 
करण्यात आली.
1 मे - महाराष्ट्र दिन आणि जागतीक कामगार दिन - माहिती - labour day - maharastra day - history - विजय भगत - vb good thoughts

1 मे कामगार दिवस

तसे पहिले असता 1मेहा दिवस
जागतिक कामगार दिन
इतिहासाची उजळणी केल्यावर 
आपल्या असे लक्षातयेत किजागतिकऔद्योगिक 
क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्यगात
रोजगार खूप मोठ्याप्रमाणावर उपलब्धहोऊ 
लागले. कामगारांकडे काम होते,मात्र कामगारांचे 
खूप शोषण होत असे. तसेच ते आपल्या 
कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या त्या 
कामगारांना 12 ते16तास सतत काम करावे 
लागत असे. 
कामाच्या ठिकाणी अपघात हि व्हायचे. 
मृत्यू चे हि प्रमाण वाढलेले होते.
 म्हणून या विरोधात कामगार 
एकजूट झालेआणित्यांनीआंदोलनकेला.
जवळपास जगाच्या 80 देशात याचा
तीव्र पडसादउमटूलागला. 
आणि शेवटीकामगाराची कामाची वेळ8तास 
निश्चित करण्यात आली.
यानंतर कामगारांच्या हक्का संदर्भात दोन अंतराष्ट्रीय 
परिषदा झाल्या. नंतर१ मे 1811
पासून कामगार दिन( Labour Day )साजरा केला 
जाऊ लागला. 
महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार 
दिनाला संयुक्तमहाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे.
संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्यापातळीवरलढलागेला.
या लढ्यातकामगारांनी घेतलेला सहभाग
अत्यंत महात्वाचाहोता.त्याच्या सहभागामुळेच 
हा लढाखऱ्याअर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला
याच कारणामुळे1मे1960रोजी 
मराठी भाषिकासाठी स्वतंत्रमहाराष्ट्राची निर्मिती 
झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन 
बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहातसाजरा 
केला जाऊ लागला.

जय महाराष्ट्र 

75+ Best Motivational Quotes In Marathi |प्रेरणादायी सुविचार

Suvichar | मराठी सुविचार सोपे | शालेय सुविचार संग्रह मराठी

Some Unique Words Used In Villages language – गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ

1
बैल - पोळा - बैल पोळा - bullock- village india - vb good thoughts - विजय भगत - vijay bhagat

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

Bullock cart - rural india -bull vehical - vb good thoughts -विजय भगत - ग्रामीण बोली भाषांतील शब्द - गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ - Some Unique Words Used In Villages language - बैलगाड़ी - बंडी
Bullock cart – rural india -bull vehical – vb good thoughts -विजय भगत – बैलगाड़ी – बंडी 
आज आपल्या ग्रामीण भाषेत कित्येक शब्द लोप पावलेले आहेत अणि काही शब्दांचे आपल्याला
अर्थ ही माहित नाही…!
 मला माहित असलेले काही शब्द, माझ्या वाचनात आलेले आणि काही इंटरनेट च्या मदतीने
ही माहिती गोळा करून तुमच्या सोबत शेयर करीत आहे.
आपण ही माहिती वाचून घ्या तसेच आप आपल्या मुलानाही वाचायला द्या.
समजावून सांगा हि ग्रामीण भाषा आणि ग्रामीण शब्द.
तिवडा :- जुन्या काळी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसे टाकून, नंतर त्यावर 
बैल, गाय,म्हैस अशी जनावरे फिरवली जायची. सगळे एकाला एक बांधले राहत ( दावन ) व त्यांना गोल 
फिरता यावे म्हणून  खळ्याच्या ( खरयान )  मध्ये मधोमध एक उभे लाकूड रोवले जायचे त्याला
तिवडा म्हणत. किंवा तिपयी म्हणत.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

बैलगाडी :- बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे. बैलगाडी 
ओढण्यासाठी साधारणपणे दोन बैलांची आवश्यकता असते. बैलांच्या मानेवर जे लांब, आडवे, 
गुळगुळीत केलेले लाकूड असते त्याला जू म्हणतात. जुवाच्या दोन्ही टोकांला भोके पाडून टिपर्‍यासारखी 
दोन लाकडी दांडकी बसवतात, त्यांना शिवळा म्हणतात. शिवळा व बैलाची मान यांना बांधून ठेवणार्‍या 
सुती मफलर सारख्या पट्ट्याला जोते म्हणतात. जू हे लिंबाच्या झाडापासून बनवले जाते. लिंबाचे लाकूड 
उन्हामध्ये व घर्षणाने गरम होत नाही, फाटळत नाही व टिकाऊ असते.

 

साठी :-एक वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी असते या साठीचा उपयोग
शेतातील माल, डबा, धान्याची पोती, शेणखत, बाजारचा भाजीपाला वाहण्यासाठी केला जातो. त्याची
रचना अशी असते, खाली – वर बावकाडे असतात. खालच्या वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडे
ताशीव नक्षीदार उभी केली जातात. त्याला करूळ म्हणतात.
करूळाच्या वर एक बावकाड असते, त्यामध्ये करूळी फिट केली जातात. ज्यामुळे साठीची उंची
वाढते व शेतीचा जास्त माल बसतो. साठीला खाली आडवी लाकडे टाकली जातात.
त्याला तरसे म्हणतात. त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक
करताना खाली पडत नाही. तसेच दुसऱ्या शब्दात याला साटा ही म्हणतात.

Some Unique Words Used In Villages language 

जू ( जुआडी ) :- बैलगाडी, औत, कुळव, नांगर,वखार, इ. ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवे
लाकूड ठेवले जायचे  त्याला जू ( जुआडी ) म्हणतात.
आरपाटा :- बैलगाडी ओढण्यासाठी दोन चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या
खाली एक बूट असते. त्यावर लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू
असते, त्याला मणी म्हणतात.
त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो. मण्याला ( गड्डा ) लहान-लहान छिद्र असतात. त्यामध्ये वर्तुळाकार
आरी ( लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या ) बसवल्या जातात. त्या आर्‍यामध्ये बसवतात. आर झिजू नयेत
म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतात.
लाकडी चाकाचा मधला गोल भाग, गड्डा, चाकाची पाती, आरी, चाक घट्ट रहावे म्हणून त्यावर लावलेली
लोखंडी पट्टी धाव, दोन चाकाना जोडणारा लोखंडी एक्सल, आक. ( आस्कुड ) आकामधून चाक बाहेर
पडू नये म्हणून आकाच्या दोन्ही बाजूला छिद्रे पाडून त्यात लोखंडी खिळा बसविण्यात येतो याला उन्नी
(खिल्ली ) म्हणतात. या उन्नी वर ठेवलेला लाकडी चौकोनी भाग म्हणजे पेटी. पेटीवर ठेवलेला भाग
म्हणजे साटा, पेटीला वाय आकाराची लाकडे घट्ट बसविलेली असतात त्या दाड्यां, ( धुर ). दाड्यांवर
पुढील टोकावर ठेवतात तो जू, जू दांड्याला व पेटीला ज्या दोरीने बांधतात तो दांड, बैले जू ला जखडून
ठेवण्यासाठी सापती  वापरतात. ती  बैलाना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याच्या नाकातून दोरी घालतात
ती वेसण, बैलावर ऊगारला जातो तो चाबूक, चाबकाच्या टोकाशी लावली जाते ती सापती, ( तुतारी )
ढकली :- बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवे लांब लाकूड लावले जाते त्याला ढकली
म्हणतात. या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे
थांबतो.
दांडी :- बैलगाडीसाठी चाके तयार झाली की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्या खाली जो चौकोनी
लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन छिद्र पाडली जातात, त्यामध्ये तीन साठीपेक्षा पांचते सहा फूट
लांबीची लाकडे बसवली जातात. त्यावर जू ठेवले जाते. जू आणि बूट याला यटक घातले जाते.
त्यात बैल जोडून गाडी ओढली जाते.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

आळदांडी :- गाडीला ज्या तीन दांड्या बसवल्या जातात. त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात.
तिसरी दांडी ज्वापेक्षा कमी लांबीची, पण ज्वा पर्यंतच्या लांबीची असते. या आळदांडीमुळे जू मागे
सरकत नाही आणि यटकामुळे पुढे सरकत नाही.
पिळकावणं :- गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातले जाते ते ढिले राहू नये म्हणून
दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळले जाते, जेणेकरून यटाक ढिल होत नाही.
त्याला पिळकावणं म्हणतात.
जूपणी, खिळ ( शिवर ) :- जूला दोन्ही बाजूला शेवटच्या टोकाला दोन छिद्रे पाडलेली असतात. त्यात
दोन – तीन फूट लांबीचा लाकडी दांडा घालून वरच्या बाजूला थोडा जाड ठेवला जातो.
जुपणीला बारीक रस्सीने विणलेला तीन ते चार फुटाचा पट्टा बांधलेला असतो. जेव्हा बैल गाडीला जुंपतात,
तेव्हा जू उचले जाते.
बैल जू खाली घेतात, ज्वाच्या छिद्रात दोन्ही बाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत
अडकवला जातो. जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडे – तिकडे हलत नाहीत.
बैल सरळ चालतात. त्यामुळे इकडे – तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून जुपणी, शिवर, किंवा खिळ
म्हणतात.
बूट :- बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी त्यावर कणा ठेवला जायचा.
असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन दांड्या जोडल्या जायच्या त्याला
बूट म्हणायचे.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

गंज :- ज्वारी किंवा मका यांचे पिक काढून झाल्यावर त्यांची कणसे काढून झाली की, लांब देठाच्या पेंढ्या
बांधल्या जातात. त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी होतो म्हणून त्या पेंढ्या एकत्रित करून एका
ठिकाणी गोल किंवा आयताकार रचल्या जातात. वर काही उंच गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो.
त्यामुळे त्याचे वारा आणि पाऊस पासून संरक्षण होते. त्याला गंज म्हणतात.
पुंजना :- धान कापून झाल्यावर पूर्ण शेतातील कापलेला धान एका ठिकाणी गोळा करून त्याला
गोलाकार ठेवणे जेणेकरून त्याचे पावसा पासून रक्षण व्हावे त्याला पुंजना म्हणतात.
तिफण आणि चौपण :- पूर्वी शेतात धान्य पेरण्यासाठी कुरीचा ( पाबर ) वापर करत. पिकामध्ये जास्त
अंतर ठेवायचे असेल तर तिपणीचा वापर करत, अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणीचा वापर करत.
कुळव आणि फरांदी :- शेतात पेरणी करण्यापूर्वी शेती स्वच्छ करण्यासाठी गवत, कचरा काढण्यासाठी
कुळवाचा वापर केला जात असे. आणि जर का जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर
फरांदीचा वापर करत.
माती उकरून गवत काढण्यासाठी कुळवाला जी लोखंडी पट्टी असते त्यास फास म्हणतात.
यटाक :- कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ किंवा जू याचा वापर करत असताना  ते जोडण्यासाठी
ज्या सोलाचा वापर करत त्याला यटाक म्हणतात किंवा येटाळं असे हि म्हणतात.
 शिवाळ, शिवर, शिवळ :- पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी, लोखंडी नांगराचा वापर केला जायचा.
नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे, ते ओढण्यासाठी बैल शिवाळी ला जोडली जायची.
दूसरा शब्द शिवळ किंवा शिवर
रहाटगाडगे :-  शेतीला पाणी देण्यासाठी पूर्वी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला
जात असे. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी काढले
जात असे.त्याला रहाटगाडगं म्हणतात.
रहाट :- पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जायचा. बादलीला
कासरा बांधला जायचा. ती राहाटावरून खाली सोडली जायची. पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची
व जवळ आली की हाताने बाहेर काढून घ्यायचे.
चाड :- शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून एक सारखेच बी पडावे म्हणून चाड्याचा वापर केला
जायचा.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

ठेपा/ डेर/ मेडकं  :-  जनावरांना बांधण्यासाठी पूर्वी लाकडी मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड ) वापर
करून छप्पर तयार केले जात असे. पावसाळ्यात छप्पर एका बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून
लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला ठेपा म्हणत.
तुराटी :- तुरी बडवून ( तोडून ) जी काटके राहायची त्याला तुराटी म्हणतात. याचा उपयोग घर
शेकारण्यासाठी केला तसेच पावसाच्या दिवसात चूल पेटवण्यासाठी केला जायचा.
काड :- गहू बडवून जी काटके राहायची त्याला काड म्हणतात. काडाचाही उपयोग
शेकरण्यासाठी केला जात असे.
भुसकाट :- धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा ( भुसा ) राहतो त्याला भुसकाट म्हणतात.
याला जनावरे खातात.
वैरण :- ज्वारी, बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण
म्हणतात.
कावळे :- गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे
कावळे तसेच दुसऱ्या शब्दात डाव ही म्हणतात.
कालवण , कोरड्यास :- पातळ भाजी
आदण, अंदन :– घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणतात, दुसऱ्या शब्दात उकळते पाणी.
कढाण :- मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात, दुसऱ्या शब्दात कढण, शेरवा
घाटा :- हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात. दुसऱ्या शब्दात
ढाळा, डहाळा
हावळा :- हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या किंवा वारलेला कचरा गोळा करुन त्यात
हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात. दुसऱ्या शब्दात हुळा, हुडा.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

कंदुरी :- पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरे कापले जायचे, व ते खाण्यासाठी
गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली
भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणत.
हुरडा :- ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसे भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते
खायला गोड असतात. त्यास हुरडा म्हणतात.
आगटी :- हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसे भाजली जातात
त्याला आगटी म्हणतात.
कासूटा, काष्टा :- पूर्वी माणसे सर्रास धोतर नेसत असत, धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर
राहिलेल्या धोतराच्या निर्‍या ( चिन्या ) घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला कासूटा म्हणतात.
आणि हाच प्रकार जर स्त्रियांनी केला तर त्याला काष्टा म्हणतात.
घोषा :- पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांध्ये ज्या स्त्रिया लग्न होऊन यायच्या त्यांना
घोषा पद्धत असायची. म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर साडीच्या वरून शेळकट
गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे.
शेळकट पातळ असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे. परंतु चेहरा दिसायचा नाही.
शेळकट नसेल तर पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही.
दंड :- एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड करते तो वेगळा. येथे दंड म्हणजे पूर्वी
कपड्यांची कमतरता असायची. अशा वेळी स्त्रीया, एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला
भाग कापून काढायचा आणि दुसर्‍या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग
शिवून एक साड़ी तयार करायची. याला दंड घातला म्हणायचे.
धडपा :- साडीचा जो भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड लावायला दुसरी साडी नसेल तर
साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व नऊवारी साडीची सहावारी साडी करून नेसली
जाते. त्याला धडपा म्हणतात.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

कंबाळ / कयाळ :- पूर्वी स्त्रीयांच्या  नऊवारी साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर
साडीच्या निर्‍या पोटावर खोचायच्या त्याचा आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा
केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात त्याला कंबाळ तर काही भागात त्याला
क्याळ म्हणायचे.
दंडकी :- म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट. दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरले जायचे.
त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे खिसे, आतल्या बाजूला एक मोठा खिसा. तसेच त्याला गळ्याजवळ
एक चोरखिसा असायचा. दुसऱ्या शब्दात खमीस.
बाराबंदी :- पूर्वी ग्रामीण भागात शर्ट नसायचा, जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू
शर्टसारखा आकार असायचा, त्याला बटण नसायची, बटणा ऐवजी बांधण्यासाठी बंधांचा वापर
केला जायचा. तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला बाराबंदी म्हणत.
शेकरण ( सावन ) :- पूर्वी घरे कौलारू होती. तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये म्हणून
दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची अणि जे कौलं फुटलेले आहे त्या ठिकाणी नविन कौलं लावायचे,
त्याला शेकरण म्हणत.
हिसकी :- खाली वाय आकार असलेली परंतु लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू
दाबून धरण्यासाठी केला जातो त्याला हिसकी म्हणतात.

 

कोळप :- पिकाची आंतर मशागत करण्यासाठी व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा
उपयोग केला जातो त्याला कोळप म्हणतात.

Some Unique Words Used In Villages language 

फड :- फड तीन प्रकारचे असतात…! जेथे तमाशा असतो तो तमाशाचा फड, जेथे कुस्त्या चालतात
त्याला कुस्त्यांचा फड, जेथे ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात.
पास :- पूर्वी शेतातील तण, गवत काढण्यासाठी कुळव किंवा फरांदीचा वापर केला जायचा त्याला दोन
जानावळी असायची त्याला पास जोडलेली असायची त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत, तण
मरून जाते.
वसाण :- शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची
जे अडकलेले गवत असायचे त्याला वसाण म्हणत.
उंडकी :- पूर्वी पेरतांना तीन किंवा चार नळ असायचे. पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर
त्याला उंडकी म्हणायचे.
आडणा :- वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवे लाकूड लावले जायचे, जेणेकरून दरवाज्याचे
दार जोरात ढकलले तरीही उघडू नये.
फण :- कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी छिद्र असतात त्यात फण बसवला जातो. फणाला मध्येच
एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून
बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडते. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर
लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.
भूयट्या ( वखर ) :- जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभे न राहता
मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचे. त्याला भूयट्या म्हणतात.
रूमण :- औत भूयट्या चालवतांना दिंडाला मधोमध एक छिद्र असते. त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो
व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवे लाकूड लावले जाते. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.
त्याला रूमण म्हणतात.
उभाट्या :- जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवले
जाते त्याला उभाट्या म्हणतात.
खांदमळणी :- बैलांचा महत्त्वाचा सण ( पोळा ) बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामे खरीपाची पेरणी ही
का उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट
केलेले मेअसतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला
असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.
कंडा :- पोळाबेंदरा ) च्या दिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या
गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.
चाळ :- बैलाच्या माने एवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला

चाळ म्हणतात.

Some Unique Words Used In Villages language 

ग्रामीण बोली भाषांतील शब्द - गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ - Some Unique Words Used In Villages language - बैल - पोळा - बैल पोळा - bullock- village india - vb good thoughts - विजय भगत - vijay bhagat
ग्रामीण बोली भाषांतील शब्द – गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – Some Unique Words Used In Villages language 

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

शेंट्या :- बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून
शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.
झूल :- बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते.
त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.
आंबवणी, चिंबवणी ( ओलीत ) :- शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस,
लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते.
रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते
म्हणून दुसऱ्या दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते
त्याला चिंबवणी म्हणतात.
वाफा, सारा :- कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे तयार करतात. वाफा किंवा सारा
म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.
जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहान आकाराचा असतो त्याला वाफा
म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.
मोट :- पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर
करत असत. मोट म्हणजे जाड पत्र्याचे एक चौकोनी साधारण पन्नास लीटर पाणी बसेल असे भांडे तयार
करायचे, त्याला खाली तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा. त्यावर आत मोटे मध्ये उघडझाप होईल
असे झाकण असायचे.
विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवे लाकूड कायम केलेले असायचे. त्याच बाजूला
जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत. जे आडवे लाकूड असायचे त्याला
एक चाक बसवलेले असायचे. मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी असायची त्याला नाडा बांधायचा.
(नाडा म्हणजे चांगलाच जाड पन्नास ते ६० फूट लांबीचा कसारा (रस्सा ).
मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट विहिरीत सोडायची.
त्याला दोन बैल जोडलेले असायचे. बैल धावे वरून मागे सरत आले की मोट पाण्यात बुडायची.
मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते ते उघडायचे. मोट पाण्याने
भरली की नाडा, सोल यांना ताण यायचा. मोट भरली की बैल धावेवरून पुढे हाणायचे.
मोट विहिरीच्या वर आली की पाणी थारोळ्यात पडायचे.
( थारोळं – दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद ) ते पाणी पाटात, शेतात जायचे. पुन्हा मोट मागे बैल
सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिले जायचे.

Some Unique Words Used In Villages language 

पांद ( पांदन ) :- शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता.
व्हाण :- पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते जमिनीत
रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो. खोलगट असून ते बारीक करण्यासाठी
लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.
मांदान :- स्वयंपाक करताना खरकटे पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला जायचा.
त्याला पांढर्‍या मातीचे प्लॅस्टर केले जायचे, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नव्हते.
त्या मांदानात खरकटे पाणी टाकले जायचे त्याला मांदान म्हणत.
दुपाकी घर :- मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात. त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा किंवा
कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते दुपाकी.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 

पडचीटी :- दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो.
वळचण :- घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला
असतो त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. या वळचणीला जनावरे, लोक निवार्‍याला उभी राहतात.
गुंडगी :- गाडग्याचा सर्वात छोटा अवतार
उतरंड :- घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला ठेवायच्या.
उतरंडीची रचना सर्वात मोठे गाडगे तळात, नंतर लहान, लहान असे ठेवत दहा,अकरा गाडगी
एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा.
पाभरी :- पितांबराच्या वर नेसण्याचे वस्त्र असते.
कणींग :- कळकाच्या कांब्यापासून पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते त्याला
आतून बाहेरून शेणाने सारवले जायचे.
कणगूले :- कणगीचा छोटा आकार परंतु जाडीने जास्त टोपले, पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी
कळकाच्या कांब्यापासून घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

चुलवाण :- उसापासून गूळ तयार करण्यासाठी गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो
त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी दरवाजा ठेवलेला असतो.
काहिल :- काहिल चुलवाणावर ठेवली जाते. ऊसाचा रस तयार झाला की, तो काहिली मध्ये टाकला जातो.
नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो. पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते. वाफा – गूळ तयार
होत आला की, काहिलीला दोन लांब लाकडे अडकवली जातात आणि सात – आठ लोकांनी ती काहिल
ओढत आणून तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो.
ढेपाळ :- गोलाकार पत्र्यापासून तयार केलेले असते. एक किलो, पाच किलो, दहा किलो अशा वेगवेगळ्या
आकाराची असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात.
ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.
बलुतं :- पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या.
सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी
आपल्या शेतात जे पिकेल ते थोडे  थोडे प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.
तरवा :- कोणत्याही रोपाची लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा, वांगी, फ्लॉवर, गोबी जे
पाहिजे त्याचे बी पेरले जाते. पाणी दिल्यानंतर १०/१२ दिवसांनी ते दिसायला लागते. त्याला तरवा म्हणतात.
लोंबी :- गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.
सुगी :- ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो काढणींचा काळ होता त्याला
सूगी म्हणत.
खळं :- कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध
एक लाकूड रोवले जायचे. त्याला तिवडा म्हणत.
माती काढल्यावर तिवड्या भोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची. नंतर त्यावर कणसे
टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर उभे राहून वाढवायची.
माचवा ( मचान ) :- पूर्वी ज्वारीच्या शेताची कणसे आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी
बांधलेला माळा.
वगळ :- ओढ्याचा छोटा आकार.
शिंकाळं :- मांजर, उंदीर यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही, दूध, तूप हे तुळईला अडकवून
ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेले असते.
गोफण :- शेतात ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड – माती
मारण्यासाठी रश्शीपासून तयार केलेली असायची.

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

सपार / छप्पर :- जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात लाकडे आणि पालापाचोळ्यापासून तयार केलेले घर.
बाटूक :- ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं येत नाहीत त्याला बाटूक म्हणतात.
पिशी :- ज्वारीच्या कणसाचा हुरडा काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला पिशी म्हणतात.
झापा :- शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी जे सपार तयार केलेले असते, त्याला लावायचे दार
म्हणजे झापा.
माळवं :- शेतात केलेला भाजीपाला

ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 

पावशा :- जरपूर्वी एखाद्या वर्षी पाऊस कमी झाले असेल तर खेडेगावात सर्व मुले एकत्र जमत.
गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला नग्न करायचे. त्याच्या कमरे भोवती लिंबाचा पाला बांधायचा. डोक्यावर
पाट ठेवायचा. पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे ‘पावशा ये रे तू नारायणा’ हे
गाणे म्हणायचे, मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी पायावर ओतणार
आणि भाकरी चटणी देणार. सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या.
कोठी घर :- वाड्यातले धान्याचे कोठार.
परस :– वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची,
त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची.
पडवी :- वाड्यात मधल्या चौकासभोवार जो वाड्याचा भाग असायचा त्याला पडवी म्हणत.
भंडारी :- घराच्या भिंतीत, खूप रुंद असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा
त्याला छोटी दार – कडीकोयंडा असायचा. यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या.
आगवळ :- लहान मुलींचे केस लोकरीच्या धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा.
वज्री :- आंघोळ करताना अंग घासायची घासणी.
कथळी, केटली  :- चहाची किटली.
चौपाळे :- सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.
बारनी :- खिडकीचा छोटा प्रकार असायचा त्याला बारनी म्हणत.
शेजर :- पूर्वी ज्वारी, बाजरी, आरगड, गिडगाप अशी धान्याची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची.
ती एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन तयार केला
जायचा त्याला शेजर म्हणायचे.
बुचाड :- पूर्वी पीक काढल्यानंतर वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा,
तो लावताना कडब्याच्या पेंढ्या खाली कणसे, आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली
रुंद आणि वर निमुळते असे त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे
याला बुचाड म्हणतात.
ग्रामीण बोली भाषांतील शब्द – 
गाव बोलीतील शब्द आणि त्यांचे अर्थ – 
Some Unique Words Used In Villages language 
तलंग :- कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात.
कालवड ( वासरू ) :- गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर कालवड ( घोरी ) म्हणतात.
आणि जर पुल्लिंगी असेल तर खोंड ( गोरा ) म्हणतात.
रेडकू :- म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.
दुरडी ( टोपली ) :- दुरडी कळकाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते. धान्यात माती, 
कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची 
त्यामुळे माती केर – कचरा निघून जातो.
हारा :- कळकाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपले म्हणतात, 
मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.
बाचकं :- धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटे पोते असते त्याला बाचकं म्हणतात.
झोळणा :- पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या जाताना लाह्या, 
फुटाणे, शेंगदाणे एकत्र करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडे थोडे खायला द्यायचे. 
झोळणा म्हणजे झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.

 

मोतीचूर :- हा एका ज्वारीचाच प्रकार आहे. परंतु हा मोतीचूर तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढऱ्या
लाह्या तयार होतात. लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो. त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत 
म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.

 

वटकावण, सोबणी :- भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या 
बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा 
असायचा. त्यालाच वटकावण किंवा सोबणी म्हणत.

 

खंडी :- 20 मणाची खंडी.

 

मण :- ४० शेराचा मण.

 

पायली :- दोन आडबसीर्या म्हणजे पायली.

 

मापटे :- एक शेर म्हणजे मापटे

 

चिपटे :- दोन चीपटे म्हणजे एक मापटे.

 

कोळव (कुळो ) :- दोन कोळवी म्हणजे एक चीपट.

www.vijaybhagat.com

 

संग्रहित ठेवून संस्कृती जपूया.

 

Best Suvichar Images | Good Thoughts In Hindi on life | Hindi Suvichar

1
suvichar image - good thoughts in hindi - suvichar - suvichar in hindi - hindi suvichar - vb good thoughts on bhagwan - god

Best Suvichar Images,
Good Thoughts In Hindi on life,
Hindi Suvichar – हिंदी सुविचार   

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - vb good thoughts

 

        सुरज रोशनी दे सकता है…! पर छाँव नहीं.
 समय भाग सकता है…! पर पाँव नहीं.
           फिक्र क्यों करता है… जो, कुछ तेरे पास नहीं

           तैर तो वो भी जाते हैं, जिनके पास नाव नहीं.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -suvichar-vb-vijay bhagat

 

 

एक अनगिनत जख्मों की मैं मिसाल हूँ.

फिर भी हँस लेता हूँ….! मैं कमाल हूँ.
Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -barf - vb - vijay bhagat

 

 

बर्फ से किसी ने पुछा की…

आप इतने ठंडे क्युं हो…?
बर्फ ने बडा अच्छा जवाब दिया…
अतीत भी मेरा पानी…
भविष्य भी मेरा पानी…
फिर किस बात पे गरमी रखु…?
Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -vb-vijay bhagat- suvichar hindi

 

 

अगर परिस्थिति ना बदले तो… 

अपनी मनस्थिति’ बदल लो.
        बस…! दुख सुख में बदल जायेगा.
दुख सुख आख़िर दोनों
मन के ही तो समीकरण हैं.
क्योंकि… उम्मीद एक ऐसी ऊर्जा हैं,
जिससे जिंदगी का कोई भी अंधेरा हिस्सा 
रोशन किया जा सकता हैं.
अच्छा सोचे अच्छा होगा. 

Best Suvichar Images,
Good Thoughts In Hindi on life,
Hindi Suvichar – हिंदी सुविचार 

कुछ खूबसूरत बाते…. धीरे धीरे पढना… खूब पसंद आएगा…

 

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - suvichar - musibat

 

अगर मुसीबत में मदद मांगो तो… 
जरा सोच करही मांगना…  
क्योकि मुसीबत थोड़ी देर की होती है, 
और एहसान पूरी जिंदगी भर का.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - salah -vb - vijay bhagat

 

 

सलाह तो खूब देते हो की…

खुश रहा करो.
कभी कभी वजह भी दे दिया करो…!
Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -vb - vijay bhagat - suvichar

 

कल एक आदमी रोटी मांगकर ले गया 
और करोड़ों का आशीर्वाद दे गया, 
पता ही नहीँ चला की, 
मै गरीब था… या वो…!

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -suvichar in hindi - vb

 

गठरी बाँध बैठा है अनाड़ी…
अरे साथ जो ले जाना था… 
वो तो तुने कमाया ही नहीं.
 
Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - vb- suvichar hindi me - vijay bhagat

 

   मैं उस किस्मत का सबसे पसंदीदा खिलौना हूँ… 
जो रोज़ जोड़ती है मुझे फिर से तोड़ने के लिए.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - nate suvichar-vb-vijay bhagat

 

 

जिस घाव से खून नहीं निकलता… 
समझ लेना वह घाव 
किसी अपने ने ही दिया है.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -bachpan - vb-vijay bhagat

 

 

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - bachpan - suvichar hindi me

 

बचपन भी कमाल का था

खेलते खेलते चाहें… 
छत पर सोयें या ज़मीन पर, 
आँख तो बिस्तर पर ही खुलती थी.
 
Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - god-vb-vijay bhagat- suvichar hindi me

 

खोए हुए हम खुद हैं…
और ढूंढते भगवान को हैं…


Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - suvichar in hindi - riste suvichar
Best Suvichar Images – Good Thoughts In Hindi on life – Hindi Suvichar – हिंदी सुविचार 

 

 

अहंकार दिखाकर… 

किसी रिश्ते को तोड़ने से अच्छा है की
माफ़ी मांगकर वो रिश्ता निभाया जाए.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -vb-vijay bhagat - suvichar in hindi

 

 

जिन्दगी तेरी भी 

अजब ही परिभाषा है…!
सँवर गई तो स्वर्ग…! 
नहीं तो सिर्फ तमाशा है…!

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - kismat suvichar - vb - vijay bhagat

 

 

खुशीयाँ तकदीर में होनी चाहिये… 

तस्वीर मे तो हर कोई मुस्कुराता है.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - level - suvichar hindi me

 

ज़िंदगी भी विडियो गेम सी हो गयी है… 

एक लैवल क्रॉस करो तो 

अगला लैवल और मुश्किल आ जाता हैं.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - bachpan suvichar - vb - vijay bhagat

 

इतनी चाहत तो… 

लाखो रु. पाने की भी नही होती… 
जितनी बचपन की तस्वीर देखकर 
बचपन में जाने की होती है.

 

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - thokar suvichar - suvichar hindi me - vb - vijay bhagat

 

हमेशा छोटी छोटी गलतियों से 
बचने की कोशिश किया करो, 
क्योंकि इन्सान पहाड़ो से नहीं 

पत्थरों से ठोकर खाता है.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - life suvichar - suvichar hindi me

 

 

मुझे पता नही
पाप और पुण्य क्या है…!
बस इतना पता है की…
जिस काम से किसी का
दिल दु:खे वो पाप, और
किसी के चेहरे पे हंसी आये, 
वो पुण्य. क्योंकि… आशीर्वाद…
एक ऐसी शक्ति है जो 
आपकी तरक्की के सारे रास्ते खोल देता है.
इसलिए आशीर्वाद लेते रहें.
चाहे अपनों से या चाहे परायों से…
और… देना पड़े तो देते रहें…! 
चाहे मांगने वाला अपना हो या पराया.

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - suvichar photo - good thoughts

 

जब ठोकरें खा कर भी ना गिरो

तो समझ लेना कि…
प्रार्थनाओं ने थाम रखा है…!

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार -सच्ची बात सुविचार - विजय भगत - सुविचार हिंदी में
सच्ची बात 
वक्त बीतने के साथ 
अक्सर ये अहसास होता है कि…
जो छुट गया, वो लम्हा बेहतर था…!

Best Suvichar Images - Good Thoughts In Hindi on life - Hindi Suvichar - हिंदी सुविचार - sukh dukh suvichar - vb - vijay bhagat

दुख या सुख किसी पर सदा ही नहीं रहते,

ये तो पहिये के घेरे के समान है… 
कभी निचे… तो कभी ऊपर होते रहते हैं.

Good Thoughts In Marathi | भावांमधील नाते | Sunder Vichar

1
Good Thoughts In Marathi | भावांमधील नाते | Sunder Vichar
भावांमधील नाते - Good Thoughts In Marathi

भावांमधील नाते – Good Thoughts In Marathi,
Sunder Vichar – Marathi Suvichar

भावांमधील नाते - Good Thoughts In Marathi - Sunder Vichar - सुंदर विचार -relationship -nate - suvichar-vb-vijay bhagat - marathi suvichar - chhan vichar marathi
भावांमधील नाते – Good Thoughts In Marathi – Sunder Vichar – सुंदर विचार -relationship -nate – suvichar-vb-vijay bhagat

 

नेहमी आई – बाबांना असे वाटतेय की भावाला एक भाऊ पाहिजेच… म्हणूनच खूप घरात दोन किंवा तीन
भाऊ राहायचे.
लहान असतांना बहिण, भाऊ, सगळ्यांचे एकमेकात जीव असतो, कोणतेही काम एकत्र करणे,खेळणे,
गंमत – जंमत करणे, सोबतच शाळेत जाने… एकमेकांची काळजी घेणे. एकाला काही त्रास झाला तर
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे…
कपडेही एकमेकांचे घालणे… काही आवडीची वस्तू, खाण्याचा पदार्थ किंवा काहीही असो जर का तो
दुसऱ्याला आवडतो तर पहिल्याने कमी घेणें…. आणि आपल्या भावाला जास्त देणे…. आपले मन मारून
बहिण किंवा भावाच्या गरजांना प्रथम प्राधान्य देणे…!
 आईही नेहमी म्हणायची… काहीही काही झाले तरीही एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही.
तेव्हा आईला वचन द्यायचे… आई आम्ही कधीही एकमेकांची  साथ सोडणार नाही… मग आमचे
कितीही मतभेद झाले तरी.
हे एकूण आई – वडिलांनाही खूप समाधानी वाटायचे. आम्ही भरून पावलो असे आई – वडिलांना
वाटायचे. एकमेकांसाठी नेहमी त्यागाची भावना रहायची.
अश्या प्रकारे एकदमच मजेत जीवन चालत असतांना मग भावा भावामध्ये काय झाले.
बहिण भावांचे लग्न झालेत आणि संबंधामध्ये तिथूनच दुरावा सुरू झाला.
हे जीवात जीव घालणारे भाऊ आई – वडिलाला जमिनीचे हिस्से मागू लागले.. तसेच हिस्सा पडतांना
एखाद्या भावाला थोडी जमीन जास्त गेल्यावर तुझी – माझी म्हणून भांडायला लागले…!
कोर्टकचेर्‍याना सुरुवात झाली.
एकमेकांना एकमेकांचे तोंड बघणे आता अपशकून वाटू लागले…!
घराच्या वाटणीवरून ही भांडणे सुरु झाली… मग आई – वडिलांचा सांभाळ कुणी करायचा…
आणि जो करेल त्याला जमीन, पैसा जास्त पाहिजे, तसेच बहिणीची हि वाटणी व्हायला लागली..
तिला दिवाळीच्या वेळी कोण साडी, चिवडा लाडू देणार..
आई एक भावाकडे तर दुसऱ्या भावाकडे वडील असी परिस्थिती दिसायला लागली…

Good Thoughts In Marathi | भावांमधील नाते | Sunder Vichar

खुपदा समाजात असे हि दिसते कि मुले असूनही आई – वडील मुलीकडे राहतात.
काही वेळा तर सगळे काही असूनही आई किंवा वडील वृद्धाश्रमात दिसतात.
वाटणीसाठी भाऊ भाऊ एकमेकांची हत्या सूद्धा करतात. आजच्या परिस्थितीत जर का समाजामध्ये
बघितले तर जवळपास ९०% भाऊ एकत्र दिसत नाही. काही भाऊ एकमेकांशी बोलत नाही,
काही तर एकमेकांच्या घरी हि जात नाही. काही काही तर एवढे कट्टर असतात की एका भावाचा
मृत्यू झाला तर दुसरा भाऊ त्याच्या अंतविधिलाही जात नाही. तसेच एकमेकांच्या लग्न कार्यालाही
जात नाही.
जर का दुर्दैवाने एखाद्या भावाला आजार झाला किंवा अपघात झाल्यावर दवाखान्यात भर्ती झाल्यावर
त्याला भेटायला न जाता, ‘ अजून भोगेल तो ‘ अशी शब्द वापरतात.
अरे एकाच आईच्या उदरात जन्म घेवून एवढा शत्रुत्वपणा कूठून आला देव जाणे.
आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत.
 जो कुणी ही माझी ही पोस्ट [ लेख ] वाचत असेल त्या भावाने  किंवा त्या बहिणीने विचार करावा की
आपण बहिण भाऊ खरेच एकमेकांशी बोलत नाहीत का. जर का असे असेल तर सगळे विसरून फोन
करा व क्षमा मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघेही नसणार.
परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती अडचण येवू न देता
आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा.
प्रेमाने दादा – ताई  म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी
म्हणेन.
माणुसकी हाच एक धर्म… मेल्यानंतर खांदा देऊन काय उपयोग…?

जिवंत असतांनाच एकमेकांना हात द्या…

www.vijaybhagat.com

माणुसकीचा धडा शिकवून गेला | Corona | marathi Kavita | सुंदर विचार

0
असेच जीवन जगावे म्हणत.. माणुसकीचा धडा शिकवून गेला. Corona - marathi Kavita - Good Thoughts

असेच जीवन जगावे म्हणत..
माणुसकीचा धडा शिकवून गेला.
Corona – marathi Kavita – Good Thoughts 

असेच जीवन जगावे म्हणत.. माणुसकीचा धडा शिकवून गेला. Corona - marathi Kavita - Good Thoughts -कोरोना -vb - marathi poem
असेच जीवन जगावे म्हणत.. माणुसकीचा धडा शिकवून गेला. Corona – marathi Kavita – Good Thoughts 

कोरोना

माझा माझा करता शेवटी
आयुष्य संपुन जातो.
अहंकाराच्या उन्मादाने माणूस
पार वेडा होऊन जातो.
आज कोरोनाने दाखवून दिले…
काहीच शेड्युल बिझी नसतो.
आपणच शोधतो आपले काम
अख्ख आयुष्य निघून जातो…!
आयुष्याचा अर्थ असतो कसा
आज मला कळतोय…!
काहीच गरजा नसतात जीवनात…
विनाकारणच जीव पळतोय
सर्व व्हीलर गाड्या आता
कशा धूळखात पडल्या…
ब्रॅण्डेड कपड्याच्या घड्या
पार घड्याच राहून गेल्या…!
शेवटी जवळचाच किरानावाला
लॉक डाऊन च्या वेळी कामी येतो…!
ब्रॅण्डेड ब्रॅण्डेड करता करता माणसा
कुठे ब्रॅण्डेड कामात येतो…?
कठीण समय येता नेहमी
आपलेच कामात येतात…
विदेशी कंपन्या मात्र…
नेहमी वाटून खातात.
पैसा, पद, प्रतिष्ठा फक्त
जीवनी क्षणापूरते असते…
साधे जीवन जगावे परी
तेच चिरकाल टिकते…
निसर्गाच्या साम्राज्यापुढे
कधी कुणाचे चालत नाही…
मीच माझा कर्माचा संगाती
फळ नेहमी तेच मिळत राही.
कमीत कमी का होईना
कोरोना खूप काही शिकवून गेला…
असेच जीवन जगावे म्हणत…..
माणुसकीचा धडा शिकवून गेला.
          ✍✍
श्री..एम. टी. जैतवार.
 कारंजा 9764091209