Home Blog Page 35

Husband Wife Quotes In Marathi – नवरा बायकोचे अनोखे प्रेम

18
navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status-नवरा-बायको

नवरा बायकोचे प्रेम | नवरा बायको मराठी स्टेटस | Husband wife Quotes In Marathi

एका झोपडपट्टी भागात एक लहानसे झोपडे करून नवरा बायको राहत असत.
नवरा कामाला जात असे आणि बायको घरीच राहत असे.
तो माणूस खूप गरीब होता तरी अगदी सुखाने दोघेही आपला संसार चालवत होते.

एक दिवस
त्याच्या बायको ने आपल्यासाठी नवऱ्याकडे एका कंगव्याची मागणी केली
कंगवाच्या सहाय्याने तिला आपल्या लांब केसांची काळजी घ्यायची होती. आणि
केसांची देखरेख करायची होती. पण… तिच्या या मागणीने नवरा खुप दुःखी झाला
आणि दुखी अंतकरणाने म्हणाला की, अग या महिन्यात तर माझा हात खुप तंगीत
आहे. माझ्याकडे एवढेही पैसे नाहित की मी माझ्या घड्याळाचा तुटलेला पट्टा दुरूस्त
करू शकेल…

हे एकूण बायको शांतच राहिली आणि बायकोने आपल्या गोष्टीवर काही जास्त 

जोर दिला नाही.

Nawra bayko emotional thoughts

संध्याकाळी नवरा कामावरून घरी परत येत होता तेव्हा त्याची नजर एका
घड्याळाच्या दुकानावर पडली. नवरा काही क्षण तिथेच थांबून विचार करू
लागला. शेवटी त्याने ठरवले की आपण आपली घड्याळ या दुकान विकून टाकू
आणि त्या पैसाने बायको साठी एक चांगला कंगवा विकत घेऊ आणि नवऱ्याने
आपली घड्याळ कमी किमतीला विकून तसेच केले. आणि घराकडे खूप आनंदाने
निघाला की, बायकोला आपण नवीन कंगवा देत आहो.
पण नवरा घरात येताच आपल्या बायकोचे लहान – लहान केस पाहून एकदम
चकित झाला. त्याची बायको आपले केस विकून नवऱ्याच्या घड्याळासाठी
एक नविन पट्टा हातात घेऊन उभी होती…
 
दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले… दोघांच्या डोळ्यात पाणी आले होते…!
 नवरा बायकोचे रडणे याकरिता नव्हतेच कि आपण आपल्या प्रयत्नात अपयशी
झालो…

ते रडणे दोघांच्या निश्चल प्रेमाची साक्ष देत होते…

Also Read :-  मराठी बोधकथा | नवरा बायको चे भांडण 

Navra Bayko Suvichar 

navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स

 नाती खूप असतात
पण कुणी कुणाचे नसते…
खरे फक्त एकच नाते असते
नवरा बायकोचे.
 
navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स
 
संसार ही अशी गोष्ट आहे की…
ज्यात पगाराला कितीनेही गुणले
तरी भागत नाही…!
गुणाने राहिले तरच भागते.

Navra Bayko Love Message In Marathi

navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स
 
आपल्या बरोबर भांडते
आणि रागावतेही… पण
जर का आपल्याला यायला
उशीर झाला तर….
रस्त्याला डोळे लावून बसते
ती म्हणजेच बायको असते…
 
navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स
 
नवऱ्यासमोर ती
इतर नात्याला पण
महत्व द्यायला विसरते…
आणि मित्र-मैत्रिणींना वाटते
लग्नानंतर ती बदलली…!
 
navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status-फ़क्त तुझ्यासाठी
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स
 
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी…
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील
मनापासून
फक्त तुझ्यासाठी

navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स

नशीब आणि बायको
जरी त्रास देत राहते… 
पण जेव्हा हे सोबत असतात
तेव्हा आयुष्य बदलून टाकतात.
navara-bayko-prem-marathi-status-suvichar-नवरा-बायको-प्रेम-सुविचार-good-thoughts-in-marathi-status
नवरा बायकोचे प्रेम – नवरा बायको मराठी स्टेट्स
 
बायको अशीच वाट पाहत असते…
जेव्हा तुम्ही दहा मिनिटात येतो
असे सांगून दोन तासांनी घरी जाता…!

Bayko Quotes In Marathi | बायको म्हणजे बायकोच |बायको सुविचार

2
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही-बेधुंद
bayko-sathi-suvichar-bayko

Bayko Quotes In Marathi.
बायको म्हणजे बायकोच | बायको सुविचार

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
बायको म्हणजे बायकोच…!
एकदा आम्ही सहपरिवार बाहेरून घरी आलो…
मला बायकोने मोबाईलचा लाईट दाखवा म्हणत
स्वत:गेट चा कुलुप उघडायचा प्रयत्न करू लागली.
बायको ने खुप प्रयत्न करुनही 
कुलुप उघडायचे नाव घेत नव्हता.
बायकोचा पारा चढलेला होता…!
मग बायकोने मोबाईल स्वत: घेत 
मला कुलुप उघडायला सांगितले… 
( आता तुम्ही प्रयत्न करा )
मी प्रयत्न केला आणि लवकरच कुलूप उघडले…
आता मात्र बायको माझ्यावर चिडली आणि म्हणाली…
आता कळले… लाईट कसा दाखवतात ते…?

Wife Quotes In Marathi

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
माझे नाते तुझ्या कुंकवाशी
जन्मोजन्मी असावे
तू मंगळसूत्र गळ्यात घालतांना…
माझ्या डोळ्यात पाहून हसावे…
जरी कितीही संकटे आली तरी
तुझ्या हात माझ्या हातीच असावा
आणि मृत्यूलाही जवळ करतांना
देह माझा तुझ्या मिठीत असावा…
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar

तुमच्या सोबत 
फेसबुकव्हॅट्सऍप वर
chattingकरणारी
प्रेमिकातर मिळेलपण
प्रत्येक क्षणालातुमची काळजी करणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!

Bayko Quotes In Marathi | बायको म्हणजे बायकोच |बायको सुविचार

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्या सोबतहॉटेलात जेवण 
करणारीप्रेमिकातरतुम्हाला भेटेल 
पण… तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी 
वाट बघणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्याकडूनभेटस्वीकारणारी
प्रेमिका तुम्हालातर मिळेलपण
तुमच्या वाढदिवसाला
गुलाबाचे फुल देणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!

बायको शायरी 

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्यादुचाकीवरवर मागे बसून फिरणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण
तुम्ही प्रवासात असताना 
जेवले का म्हणून विचारणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमचे हातपाय दुखेल 
एवढी बेधुंद होऊन
तुमच्या सोबत नाचणारी 
प्रेमिका तुम्हालामिळेलपण
कामावरून थकून आल्यावर 
तुमचे हातपाय दाबून देणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्याबरोबररसपिणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण
तुम्ही उन्हातून आल्यावर 
माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
तुमच्या पैशाने खरेदी करणारी
प्रेमिका तुम्हालातरभेटेल  पण
पैशाला पैसा जोडून 
काटकसरीचा संसार करणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!

Love Quotes In Marathi For Wife

bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
बराहोशील ना लवकरअसे म्हणणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण
तुम्हाला ठेच लागली म्हणून 
डोळे भरून येणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही…!
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar-बायको-सुविचार-बायको-सारखी-प्रेयशी-नाही
bayko-sathi-suvichar-bayko-marathi-suvichar-bayko-status-nawara-bayko-suvichar
भेटायला यायला
तुला किती वेळ लागेल
असेविचारणारी
प्रेमिकातरतुम्हालामिळेलपण
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून
दारातउभी राहून वाट पाहणारी
बायको सारखी प्रेयसीमिळणारनाही.

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…! Happy Birthday Wishes

4
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-premal-shubhechha
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…! Happy Birthday Wishes

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!
माझा बोलका आरसा…!

जो माझ्या यशाच्या वलयाने झळाळत नाही…

आणि अपयशाने झाकोळत नाही.
जे आहे ते आहे आणि नाही ते नाही हे ठामपणे
सांगण्याची कला असणारा…!

दोन्ही हातांनी माझे घरटे सांभाळून…
मला भरारीची उमेद देणारा…!
प्रत्येक धाडसी निर्णयात… बिनधास्त लढ…
मी आहे… असा विश्वास देणारा…!
हरलो तर कवेत घेणारा आणि जिंकलो तर
अभिमानाने माझ्याचकडे पाहणारा…!
स्वतःला पारखण्याची संधी देणारा आणि

माझ्यात मिसळूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारा…!

तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे…
तुला वजा केले तर… माझे सारे जगणे व्यर्थ आहे…!

बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-aayushyachi wat
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या अवघड वाटेवर तु मला साथ दिलीस.
कोणत्याही क्षणी… तु माझ्या हातातला हात 
सोडला नाहीस.
मी कधी तुझ्यावर चिडलो… कधी भांडलो…
कधी भरपूर वादही झालेत…
पण दुसऱ्याच क्षणी…
तुझ्या कडून आली प्रेमळ साद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-तू-कधी-रुसलीस-कधी-हसलीस
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
 
कधी तु रूसलीस, कधी तु हसलीस
कधी माझा राग आलाच तर…
तु उपाशीपोटी झोपलीस…!
पण कधीही आपल्या मनातील दुःख
समजू दिले नाहीस. तरीही
जीवनात मला तु खुप सुख दिलेत…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes

आठवणींत राहणारा दिवश म्हणजे
तुझा वाढदिवस
वाढदिवसाचा सुखदायक क्षण
तुला आनंद देत राहो…
या दिवसाचा अनमोल क्षण
तुझ्या ह्रदयात कायम राहो.
 
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-birthday-wishes-with-images
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
 
तुझ्या समृद्धीच्या सागराला
किनारा नसावा…!
तुझ्या आनंदाची फुले
सदैव बहरलेली असावीत…!
आणि एकंदरीत तुझे जीवनच
एक अनमोल आदर्श बनावे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-birthday-wishes-with-images
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
 
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते…
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट असते

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-birthday-wishes-with-images
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
या अनमोल आयुष्यात तुझी सा हवी आहे
शेवट पर्यंत सोबतीला तुझा हात हवा आहे
कितीही संकटे आली आणि गेली, तरीही
ना डगमगणारा तुझा विश्वास फक्त मला हवा आहे.
 
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-birthday-wishes-with-images
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
 
तुझे माझे नाते खास आहे
कारण तुझे माझ्यावर प्रेम आहे.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील
पण त्या शुभेच्छामध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील 
तुझे रुसवे – फुगवे मला आवडते…!
त्यातूनच तुझे माझे नाते फुलते…! 
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा

माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-birthday-wishes-with-images
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
 
तू नव्हतीस तेव्हा मी जगतच होतो
नाहीच असे नाही पण तुझ्या येण्याने
जीवनाची बाग खऱ्या अर्थाने भरून आली.
पूर्वीचे क्षण तुझ्या सहवासात…
नव्या आनंदाने बहरून आले.
पुर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे…
नव्या चैतन्याने सजून गेले.
आता आणखी कांहीच नको…
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचे अनमोल नाते…!
आणखी दुसरे आता काही नको.
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!
 
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes-in-marathi-happy-bykola-vadhdivas-subhechha-happy-birthday-wife-bayko-patni-birthday-wishes-with-images
बायकोला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-Happy-Birthday-Wishes
 
तू माझ्यासाठी फक्त माझी पत्नी नाहीस तर
तू माझी सर्वात चांगली मित्र आहेस.
मी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो…
कारण, जसे तू मला समजून घेतेस
तसे इतर कोणीही मला समजून घेत नाही.
अशा सुंदर व्यक्तीबद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

वाढदिवसाच्या शुभेच्छाचा आभार प्रकट संदेश

अहंकार म्हणजे नक्की काय ? | Good Thoughts In Marathi on Ego

2
अहंकार-म्हणजे-नक्की-काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत
अहंकार-म्हणजे-नक्की-काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar

अहंकार म्हणजे नक्की काय…? |
Good Thoughts In Marathi on Ego

एकदा एका कावळ्याने आपल्या पायात चांगला मोठा मासाचा तुकडा घेतला 
आणि उडायला लागला. उडता-उडता तो विचार करत होता की एखाद्या शांत
ठिकाणी थांबून मस्त या मासाचा आनंद घ्यावा.

एखादी शांत जागा शोधत असतांना त्याच्या लक्षात आले की, काही गिधाडे 
आपल्या मागे लागली आहेत. 
त्या गिधाडी पाहुन कावळा खूपच घाबरला. कावळ्याला वाटू लागले की, ही 
माझ्या मागे असलेली गिधाडे मला मारण्यासाठीच माझ्या मागे लागलेली 
आहेत. 

त्या गिधाडां पासून आपला जीव वाचविण्यासाठी सुटण्यासाठी आता कावळा 
खूप जोरात आणि खूप उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण… 
कावळ्याने त्याच्या पायात दाबून ठेवलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे 
काही शक्य होईना. 

कावळ्याला चांगलाच दम भरला… मासाच्या तुकड्यामुळे त्याला काही जोरात 
आणि उंचीवर उडता येईना. ही सगळी गंमत एक गरुड बघत होता. शेवटी 
तो गरूड पक्षी उडत कावळ्याच्या जवळ आला आणि म्हणाला… 
का रे बाबा…! ही काय भानगड आहे…? तु एवढा का घाबरला आहे…? आणि 
एवढा का दमला आहे की… तू एवढ्या जोरात श्वास घेत आहे…?

तो कावळा म्हणालाहे गरूडा…! ही गिधाडे खूप वेळा पासुन माझ्या मागे 
लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. या गिधाडी पासुन बचाव करण्यासाठी मी आणखीन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.

कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला,  अरे ती गिधाडे तुझ्यामागे 
नाहीत, तर तुझ्या या पायात दाबलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे 
लागली आहेत. तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून 
उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते…!

कावळ्याने गरुडाच्या सांगण्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या
पायामधून सोडुन दिला. कावळ्याच्या मागे लागलेली सगळी गिधाडे त्या 
मांसाच्या तुकड्याकडे गेली. 
मांसाच्या तुकड्याचे कमी झाल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले
आणि त्याने आकाशात आणखीन उंच भरारी घेतली.
आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक मांसाचा जड तुकडा 
आयुष्यभर आपल्या पायात पकडुन आपण जगत असतो. या मांसाच्या 
तुकड्याचे नाव आहे… अहंकार म्हणजेच मी पणा किंवा स्वतःविषयीच्या 
काही भ्रामक कल्पना.
प्रत्येकाला अहंकार हा असतोच. आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे 
अनेक जण भेटत असतात आणि आपण पण अगदी आनंदाने हरभ-याच्या  
झाडावर चढत असतो. मी एक खास व्यक्ती आहे…! मी खूप हुषार किंवा 
बुद्धीमान आहे…! मला सगळे काही कळते किंवा समजते…! 
माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असते. 

माझी अब्रू…. माझी प्रतिष्ठा… घराची अब्रू अशा नावाखाली अनेक जण या 
भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. मग या साठी शत्रुत्व आले तरी 
चालते, माणसे तुटली तरी चालतात, नातेसंबंध संपुष्टात आले तरी त्याची त्यांना 
पर्वा नसते. त्यांना त्यांचा अहंकार नावाचा मांसाचा तुकडाच प्राणप्रिय असतो. 

मग कितीही गिधाडे मागे लागली तरी त्याची यांना पर्वा नसते. 
गिधाडे उंच उडुन जातात पण हे मात्र मागेच राहतात. पण ज्यांना 
अहंकार नावाचा मांसाचा तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी 
घेऊ शकतात.  
एकदा तरी आपला अहंकार बाजुला ठेऊन बघा. विसरून बघा. 
अहंकारा पासुन सुटका करून बघा…! बघा काय चमत्कार होतो ते…!

Quotes On Attitude 

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-नाते
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

ज्या नात्यात अहंकार नसतो… 
तेच नाते शेवटपर्यंत टिकून राहते.

Ghamand Quotes in Marathi

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

फक्त अहंकारामुळे 
आपल्या आवडत्या व्यक्तीला
सोडण्यापेक्षा 
आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी 
आपला अहंकार सोडणे
कधीही चांगले.
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-wel-time-suvichar

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

सर्व काही पालटून टाकते…! 
जेव्हा वेळ पालटते ना तेव्हा 
म्हणुन चांगल्या वेळात
अहंकार ठेवू नका 
आणि वाईट वेळात संयम बाळगा.
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-sharyat-marathi-suvichar

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

शर्यत लावायचीच आहे तर… 
स्वतः सोबतच लावा, कारण… 
जर का जिंकलात तर…
स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल…
आणि जर का हरलात तर… 
स्वत:चाच अहंकार हराल…!

swabhaw quotes in marathi  

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-relationship-suvichar-status
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार
EGO
हा फक्त तीन अक्षरांचा शब्द आहे
पण तो… 
बारा अक्षराच्या शब्दाला तोडु शकतो…!
RELATIONSHIP

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-ahankar-status-in-marathi
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

माणसे उगाच
अहंकार  बाळगतात
खरी सत्ता तर वेळेची आहे.

अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार-vb-विजय-भगत-swarth-mothepana-ahankar-bhagwant-suvichar
अहंकार-म्हणजे-नक्की काय-Good-Thoughts-In-Marathi-ego-ahankar-marathi-suvichar-अहंकार-मराठी-सुविचार

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की… 
आनंद घेता येतो आणि देता येतो.
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, 
आणि तुलना यामुळे एकमेकांतील 
नाती बिघडू शकतात… 
असे होऊ नये म्हणून… 
विसरा आणि माफ करा. 
हे तत्व केव्हाही चांगले.
 ग्रंथ समजल्याशिवाय 
संत समजणार नाही आणि 
संत समजल्याशिवाय 
भगवंत समजणार नाही.

Good Thoughts In Marathi | Sunder Vichar | वास्तव आणि विस्तव

0
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-wastav ani vishtav
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi

वास्तव आणि विस्तव  
Good Thoughts In Marathi 
Sunder Vichar 

वास्तवाच्या जवळ आणि 
  विस्तवाच्या दूर राहिले की 
चटका बसत नाही…!
वास्तव आणि विस्तव - Good Thoughts In Marathi - Sunder Vichar - wastav
वास्तव आणि विस्तव – Good Thoughts In Marathi – Sunder Vichar
 
माझ्या नोकरीच्या ठिकाणी एक गोडावून आणि ऑफिस चे काम सुरु झाले… सिमेंट, रेती, विटा
लोखंड येऊन पडत होता.

ठेकेदाराने मजूर बोलविले, एक दिवस एक मजूर बाई, तिचा नवरा आणि तिच्या हातात जवळपास
सहा महिन्याचे बाळ यांच्यासह आली. तिच्या मागे एक बारीक से कमजोर चार वर्षाचे पोर ओढल्या
सारखे चालत होते.

गाडीतून समान उतरवून लगेच त्या बाईने बांधकाम होत असलेल्या कंपनीच्या आवारात दोन लाकडी
खांबांना एक जुनी साडी बांधली आणि त्या झोळीत ते पोर झोपवले. मोठ्या पोराच्या हातात वाळलेल्या
भाकरीचा तुकडा दिला. बाई कामाला लागली. जागा साफ करून तिने नवऱ्याच्या मदतीने लाकडी
खांबावर पत्रे टाकून झोपडी तयार केली. नवीन ऑफिस इमारतीचे काम जोमात सुरु झाले.
दोघे नवरा-बायको इतर मजुरांसह दिवसभर काम करत.
कंपनीतील काही सामान वापरण्याची परवानगी घेण्यासाठी ते माझ्याशी बोलत असत…!

बघता-बघता गोडाऊन उभा राहिला. तिचे फाटक्या कपड्याच्या झोळीत झोपणारे पोरही आता
दगड-वाळूत खेळू लागले. पावसाळा सुरू झाला तशी तिची रवानगी अर्धवट बांधलेल्या गोडाऊनमध्ये
झाली.

मी तिला कधी आरामात बसलेले बघितले नाही. बंगला बांधणारा ठेकेदार सकाळी यायचा आणि
संध्याकाळी निघू जायचा… आमचे मालक तर महिन्या-दोन महिन्यांनी एखाद्या वेळी यायचे.
एरव्ही ही दोघे दिवसरात्र मेहनत करत. दिवसभर ती मुंगीसारखी सतत काम करत असे.
आमच्या बोलण्यात ती मोठ्या हौशीने घराच्या बांधकामाविषयी, झालेल्या कामाविषयी सांगायची.
हळुहळू गोडाऊन आणि ऑफिसची इमारत पूर्ण झाली… मग प्लास्टर. लवकरच ऑफिसच्या
आतबाहेर छान पांढरा रंग दिला गेला.

Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar | वास्तव आणि विस्तव

एक दिवस एका लहान गाडीत ठेकेदाराचे सामान पावडा, कुदळ,घमेल, आणि इतर लहान सामान
ठेवतांना दिसले. गाडीचा ड्रायव्हर त्या बाईशी बोलला. तिने लगेच टोपलीत मुलाला ठेवले, मोठ्या
मुलाला गाडीमध्ये उभे केले आणि दोघेही नवरा बायको त्या गाडीत बसले…
गाडी निघाली…!
गाडी फिरून माझ्याकडेच आली… ड्रायव्हर ने मला गाडीतील सामान दाखविला, आणि म्हणाला
साहेब.. मी ठेकेदाराचेच समान गाडीत टाकले आहे, तुमच्या कंपनीचा कोणताच सामान मी
गाडीत टाकला नाही…!
मी एक नजर गाडीतील सामानाकडे फिरवली… तसेच ते दोघेही मला म्हणाले…
साहेब, आमचा येथील मुक्काम संपलेला आहे आम्ही जात आहोत….!
मला बरे नाही वाटले…. मी म्हटले… का असे अचानकपणे जात आहात…?
काम तर खुप बाकी आहे…
ती बाई म्हणाली… ठेकेदाराचे नवीन साईटीवर काम सुरू होणार आहे…
गाडी सुरु झाली आणि निघू गेली.

मी आपल्या खुर्चीवर येवून बसलो आणि मला विचार पडला की… एखाद्या चिमणीने गवताची एकेक
काडी जमा करून घरटे बांधावे… तसे तिने जीव ओतून काम केले त्यांनी. कधी आपलेही असे घर
असावे असे त्यांना वाटत नसेल का…?  कसे यांचे जीवन…? यांनी राबराबून दुसऱ्यांचे इमारती

उभारायचे. ते पूर्ण झाल्यावर सारे सोडून निघून जायचे…!

जवळजवळ पूर्ण वर्षभर ते नवरा-बायको ज्या घरात राहिले… त्यांचा संसार फुलला,
जे इमारत त्यांनी इतक्या कष्टाने उभे केले, ते सगळे किती सहज सोडून ते चालले होते.
कसला मोह नाही…. कसला लोभ नाही…. कसलीच तक्रारही नाही.
अगदी आनंदी चेहऱ्याने निरलसपणे तो साधाभोळा जीव निघाला. कुठल्यातरी अज्ञात साईटीवर
पुन्हा कुणा दुसऱ्याचे घर बांधायला….

Good Thoughts In Marathi |
Sunder Vichar | वास्तव आणि विस्तव

मनात विचार आला. जीवन यांना आपल्यापेक्षा जास्त चांगले कळलेले नाही का…?
तसे पाहिले तर आपल्या सगळ्यांना एक दिवस असेच जायचे नाही का…? जे मिळविले, निगुतीने सजविले,
ते तसेच सोडून जावे लागणार नाही का…? त्या ‘वरच्या मालकाचा’ निरोप आला की आपल्यालाही

दुसऱ्या साईटीवर नव्या कामाला जावे लागेल. कोण थांबू शकते…? अगदी एक क्षण, एक श्वासतरी
जास्त मिळतो
का कुणाला…? सर्वांना जावेच लागते की…! पण दुसऱ्याचे घर बांधून, सजवून त्यांचे विश्व अधिक सुंदर
करून इतके निरिच्छपणे, निरलसपणे, नि:संगपणे जाणे आपल्याला जमणार आहे का…?

25+ Best Marathi Suvichar | सुविचार मराठी | Suvichar Marathi

4
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास-suvichar-in-marathi-vb-vijay-bhagat-भुतकाल-वर्तमान
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास

25+ Best  Marathi Suvichar – सुविचार मराठी – Suvichar  Marathi – Good Thoughts In Marathi on life

सकारात्मक विचार, प्रेरणादायी विचार, सुंदर सुविचार हे आपल्या मानवी जीवनात
अत्यंत आवश्यक आहे, तसेच जीवनात कोणतेही निर्णय घेतांना या सुविचारांची खूप मदत होते…
सगळ्यात मोठी शक्ती सुविचार... म्हणून नेहमी जीवनात सुविचारांना स्थान द्या.
जर आपल्या जीवनरूपी घराला सुविचारांचा मजबुत पाया नाही आहे तर आपले
जीवनरूपी घर उभे राहूच शकत नाही…  आणि जर का समजा… ते घर उभे राहिलेच तर ते
सुरक्षित असेलच असे आपण प्रभावीपणे म्हणूच शकत नाही.
या जीवनात अनेक प्रसंग येतात… आशेचे प्रसंग… सुखाचे प्रसंग… अपयशाचे प्रसंग… यशाचे प्रसंग…
दुःखाचे प्रसंग… तर कधी निराशेचे प्रसंग….. आपल्या जीवनात येत – जात राहतात.
परंतु ज्या माणसाकडे सुविचारांचा मजबुत पाया असतो… त्या माणसाचा जीवनात कुठल्याही प्रसंग
आला तर ते आपल्या सुविचारांच्या बळावर चांगले निर्णय घेऊन, न घाबरता त्या प्रसंगाना तोंड देतात…
सुखात फसत नाहीत आणि दुःखात रडत बसत नाहीत…! 
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-धावपळीच्या-जीवनात-या धावपळीच्या आयुष्यातही आपला छंद जपण्यासाठी थोडा तरी वेळ नक्की द्यावा
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
या धावपळीच्या आयुष्यातही
आपला छंद जपण्यासाठी
थोडा तरी वेळ नक्की द्यावा.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb- आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
आपल्या कोणत्याही कामाची
सुरुवात कशी झाली आहे…
यावर बऱ्याच घटनांचा
शेवट अवलंबून असतो.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-जीवनात-नेहमी-भावनेपेक्षा-कर्तव्य-मोठे-असते
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
जीवनात नेहमी भावनेपेक्षा
कर्तव्यच मोठे असते.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-चांगल्या-परंपरा-निर्माण-करणे
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
चांगल्या परंपरा निर्माण करणे
फार कठीण असते…
म्हणून ज्या चांगल्या परंपरा आहेत
त्यांना परंपरा मोडू नका.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-प्रेमाने-जग-जिंकता-येते
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
प्रेमाने संपूर्ण जग जिंकता येते…
शत्रुत्वाने नाही.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-जर-यश-मिळवायचे-आहे
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
जर यश मिळवायचे असेल…
तर स्वत:च स्वत:वर काही बंधने घाला.
ज्याने स्वत:चे मन जिंकले
त्याने सर्व जग जिंकले.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-जो-वाहतो-तो-झरा
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
जो वाहतो तो झरा आणि जे थांबते ते डबके…!
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस…!
निर्णय तुमचा…

marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-आयुष्यात-तुम्ही-किती-माणसे-जोडलीत
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
आयुष्यात तुम्ही किती माणसे जोडली…
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-फक्त-स्वतःचे-स्वार्थ
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी…
कधीच दुसऱ्याचा वापर  करु नका.
आणि 
स्वत:चा वापर कुणालाही करु देऊ नका.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-खरे-तर-काय-चुकले
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images

खरेतर “काय चुकले” हे शोधायला पाहिजे
पण आपण मात्र “कुणाचे चुकले” हे
शोधण्यातच वेळ घालवत बसतो…!
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-स्वभावाच्या-प्रेमात-पडा
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
नेहमी जीवनात स्वभावाच्या प्रेमात पडा
चेहऱ्याच्या नाही…!
कारण परिस्थिती नुसार
चेहरे बदलतात…
स्वभाव नाही…!
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-जोखीम-risk-सुविचार
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
जीवनात सर्वात मोठी
जोखीम म्हणजे
कोणतीही जोखीम न घेणे…
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-विजय-भगत
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही गरीब
आहात तर चूक तुमची नाही आहे
पण वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, तुम्ही
स्वतःला गरीब म्हणत असाल तर
नक्की चूक तुमचीच आहे…!
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-जितक्या-हक्काने-हसता-तितक्याच
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
जितक्या हक्काने हसता तितक्याच
हक्काने रूसता आले पाहिजे…
समोरच्याच्या डोळ्यातले पाणी
अलगद पुसता आले पाहिजे.
मान-अपमान नात्यात काहीच नसते
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात
घुसता आले पाहिजे.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-कष्ट-प्रेरणा
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images

कष्ट ही प्रेरक शक्ती आहे…
जी माणसाची क्षमता तपासते आणि
त्याला विकासाच्या मार्गावर नेते…!
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-स्वतःवर-विश्वास
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास-suvichar-in-marathi-vb-vijay-bhagat-सुंदर-विचार
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास

स्वतःवर विश्वास ठेव….
हे दिवसही जातील
वादळही रोखता येईल जर…
तू त्यांच्या समोर पर्वत बनून उभा राहशील.
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-भुक
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
लागलेली भूक नसलेला पैसा…
तुटलेले मन… आणि
मिळालेली वागणूक जे शिकवते…
ते कुठलीही डिग्री शिकवत नाही…!
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-ज्याने-स्वताचे-मन-जिंकले-त्याने-जग-जिंकले
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
ज्याने स्वतःचे मन जिंकले
त्याने सर्व जग जिंकले.
 
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images-vb-काळजी-आपले-मित्र
marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-suvichar-marathi-मराठी-सुविचार-सुविचार-मराठी-सुविचार-इमेजेस-suvichar-images
 
जे आपली सर्वात जास्त काळजी घेतात

आपण त्यांच्यावरचरडण्याची वेळ आणतो.

suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास-suvichar-in-marathi-vb-vijay-bhagat-तुम्हाला-जे आवडते-त्यातच
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi

जे आवडते तेच करू नका…

जे तुम्हाला करावे लागत आहे…
त्यातच आपली आवड निर्माण करा.
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास-suvichar-in-marathi-vb-vijay-bhagat-भविष्यकाल-वर्तमानकाल-भविष्यकाल
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi
 
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-on-life-मराठी-सुविचार-विश्वास-suvichar-in-marathi-vb-vijay-bhagat-भविष्यकाल-वर्तमानकाल-भविष्यकाल
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-विश्वास-suvichar-in-marathi
 
आयुष्या नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.
 
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-on-life-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi

सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा
मैत्रीतून मत्सर वजा करा 
प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा 
परमनिंदेचा लघुत्तम काढा 
सुविचारांचा वर्ग करा 
दया, क्षमा, शांती, परमार्थ 
यांचे समीकरण सोडवा…। 
हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-on-life-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi-सुंदर-विचार
suvichar-marathi-suvichar-good-thoughts-in-marathi-on-life-मराठी-सुविचार-suvichar-in-marathi

जीवन जगण्यासाठी केवळ
विचार असुन चालत नाही…
सुविचार असावे लागतात.
आणि केवळ सुविचार असुन
चालत नाही…

ते आचरणात आणावे लागतात.

25+ Best Marathi Suvichar - सुविचार मराठी - Suvichar Marathi - Good Thoughts In Marathi on life-aankhi-jiddhi-wha-apyash pachwa
25+ Best  Marathi Suvichar – सुविचार मराठी – Suvichar  Marathi – Good Thoughts In Marathi on life

अपयशाने खचु नका
आणखी जिद्दी व्हा…!

Marathi Kavita On Navra | नवऱ्यावर सुंदर मराठी कविता | नवरा

0
Marathi Kavita On Navra - नवऱ्यावर सुंदर मराठी कविता - नवरा
Marathi Kavita On Navra | नवऱ्यावर सुंदर मराठी कविता

Marathi Kavita On Navra |
नवऱ्यावर सुंदर मराठी कविता 

navra-marathi-suvichar-sunder-vichar-kalji-suvichar-nawara-bayko-good-thoughts-in-marathi-on-life-vb-vijay-bhagat
Marathi Kavita On Navra | नवऱ्यावर सुंदर मराठी कविता
जर घरी नसेल नवरा तर…
मोठा बंगला पण ओसाड आहे
आपल्या नवऱ्याला मान ना देणे
क्षमा न करणारा गुन्हा आहे…!
तसे पाहिले तर नवऱ्या शिवाय
घरातील कोणतेही पान हालत नाही…
घरातील कुठलाही आनंद
नवऱ्या शिवाय फुलतही नाही…!
फक्त नोकरी आणि पगारा शिवाय
असते तरी काय नवर्‍याजवळ…?
असे बोलणाऱ्यांना सांगावे तरी
आता कसे आणि काय…?
साफसफाईचे पवित्र घर मुळीच
नवऱ्यानेच घेतलेले असते. पण..
फक्त विलक्षण माणूस म्हणून…
बायको त्याला हसत बसते…!

husband poem marathi

संकुचित पगार असून सुद्धा
सर्वांना त्यास पुरवायचे असते…
म्हणूनच नवऱ्याचे वय नेहमी
बायको पेक्षा जास्तच असते…!
नवऱ्याचा गुन्हा काय तर…? म्हणतात
तो खूप काटकसर करायला लावतो…!
परिवाराच्या सुखासाठी बिचारा नवरा
रात्र आणि दिवस कष्ट करतो…!
अधून मधून चिडतही असेल
त्याची सहनशीलता संपल्यावर…
आता तुम्हीच सांगा काय होणार
घरचे आणि बाहेरचे ऐकल्यावर…?
आपल्याच नवऱ्याची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका…
नेहमीच त्याला मूर्ख ठरवून
प्रेमळ पत्नीचे आपले स्थान गमवू नका…!
नवरा म्हणजे अंगणा मागचा
बायको म्हणजे यात ठेवलेला
पवित्र अमृत घडा…!
आपला नवरा म्हणजे… सप्तरंगी
इंद्रधनुष्या मागचे निळेभोर आकाश…!
आपली सुंदरता खुलवणाऱ्या कुंकवा मागचे
भव्य आणि दिव्य निस्वार्थी कपाळ
बायको… कधी नवऱ्याकडे
 तो माणूस आहे म्हणूनही पाहा…
त्याचे मन जाणण्यासाठी
थोडे समजून – उमजून रहा…!
कधीतरी चार चौघात
त्याचे ही थोडे कौतुक करावे…
त्याच्या अबोल दुःखाचे
एक तरी गीत नक्की लिहावे…!
घरासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व नवऱ्यांना  मनापासून समर्पित….

Poem on Wife In Marathi | बायकोवर मनभावन कविता | bayko kavita

एक रोपटे | मराठी कविता | Marathi Poem | Marathi Kavita

0
एक रोपटे | मराठी कविता | Marathi Poem | Marathi Kavita

एक रोपटे | मराठी कविता | Marathi Poem | Marathi Kavita

मी एक लहानसे नुकतेच उगवलेले रोपटे

जर तू डोळे फिरविले तर मी मरून जाईन…!
फक्त आज एक ओंजळी पाणी दे मला
जीवनभर तुझ्या कामातच येईन…!
आज जर का तु मला जीवदान दिले… 
तर मी तुला जगायला प्राण वायू देईन…!
जर तु मला जागविलास…
तर तुझ्या देवांसाठी खूप फुले देईन…! 
जर तु मला फुलविले…
तर मी तुझ्या मुलाबाळांना फळे देईन…!
मी मोठा झाल्यावर लखलखत्या उन्हामध्ये 
तुझ्या परिवाराला सावली देईन…!
तुझ्या लहान बाळांना खेळण्यासाठी
मी माझ्या फांद्यांवर त्यांना झोका देईन…!
तुझ्या आवडत्या फुल पाखरांना 
आपल्या मायेचा मी घर देईन…! 
जर का कधी तु आजारी पडला तर… 
तुझ्या औषधाला कामी येईन…! 
जर का मी आपले वचन नाही पूर्ण करू शकलो…
किंवा झालो जरी मी अप्रामाणिक तरी….
मी तुझ्या शेवटी तुझ्या सरणाला कामी येईन…!

आप कैमरे की नजर में हो | Suvichar | Good Thoughts In Hindi

0
आप कैमरे की नजर में हो | Suvichar | Good Thoughts In Hindi
आप कैमरे की नजर में हो-सुंदर विचार-cctv-सुंदर-विचार-हिंदी-सुविचार-इमेज

आप कैमरे की नजर में हो | Suvichar |
Good Thoughts In Hindi

आप कैमरे की नजर में हो-सुंदर विचार-cctv-सुंदर-विचार-हिंदी-सुविचार-इमेज-vijay-bhagat-vb-good-thoughts-good-thoughts-in-hindi-with-images-suvichar-photo
आप कैमरे की नजर में हो-सुंदर विचार-cctv-सुंदर-विचार-हिंदी-सुविचार-इमेज-vijay-bhagat-vb-good-thoughts-good-thoughts-in-hindi-with-images
प्रभु हमारे द्वारा किये जाने वाले सभी प्रकार के कर्मों को देख रहा होता है…!
अब मन में सवाल यह आता है की… प्रभू का नजर रुपी कैमरा महत्वपूर्ण है या इस
आधुनिक युग का कैमरा? जो आज कल सभी जगह लगा होता है और सभी जगह
लिखा होता है, आप कैमरे की नज़र में है इसे पढते ही हर व्यक्ति चौकन्ना हो जाता है. 
और ग़लत काम करने का विचार त्याग देता है.
जब की ये मानव द्वारा बनाया सिर्फ एक यंत्र है. हम भूल जाते हैं की, हम हर समय प्रभू की 
नज़र में हैं, और वहाँ की नज़र ना ख़राब होती है, ना बंद होती है ना किसी के आधीन 
होती है, मतलब बचाव का कोई तरीका नहीं है…! इस लिये याद रहे… 
आप कोई भी अच्छा या बुरा काम करते हैं तो… आप हमेशा प्रभु की नजर रुपी कैमरे 
की निगरानी में बने हुए हैं.
फ़रक सिर्फ इतना है की… आधुनिक युग का कैमरा तो दिखाई दे जाता है, 
लेकीन प्रभु की नजर रुपी कैमरा दिखाई नहीं देता, परन्तु महसूस तो किया ही 
जा सकता है.

आप कैमरे की नजर में हो | Suvichar |
Good Thoughts In Hindi

सभी संघर्ष, लड़ाई, झगड़े, रागद्वेष, कलह इसी कारण से हैं की… अभिमान से ग्रस्त
इंसान अपने आपको सबसे आगे देखने का प्रयत्न करता है, और दूसरे को पीछे.
इस आगे – पीछे के संघर्ष से ही यह विषाक्त बातें फूट पड़ती हैं… लेकीन नम्रता इसका
समाधान करती है. नम्रता का नियम है, सारे जीवों के अन्त में अपनी गिनती करना,
पहले नहीं. अपनी गिनती पहले करना – यह तो अभिमानी का नियम है…!
जब मानव मात्र सबको आगे स्थान देकर अपने लिये पीछे गिनने लगेंगे तो यह सारे
संघर्ष ही समाप्त हो जायेंगे.
बड़प्पन का यही नियम भी है कि जो व्यक्ति बड़ा बनने की कोशिश करेगा,
वह सबसे छोटा बनता दिखाई देगा.
यह संसार तो दो क्षण का विराम है, शरीर यात्रा का एक ठहराव है,
जैसे मुसाफिर रुक जाये वॄक्ष के तले धूप से थका माँदा …फ़िर चल पड़ता है…!
यहाँ घर नही है ….यहाँ तो बस अतिथिशाला है. संत सद्गुरु का सारा संदेश इस छोटी
सी बात मे समा जाता है कि संसार अतिथिशाला है ….और जिसे ये बात समझ आ जाती
है की… संसार अतिथिशाला है, फ़िर वो इस संसार को संवारने में… सजाने में… 
लड़ने में… प्रतिस्पर्धा में… ईर्ष्या में… जलन में… अपना समय व्यर्थ नही करता.
फ़िर वह सारी शक्ति से पंख खोल कर उस अनंत यात्रा पर निकल जाता है,
जहाँ शाश्वत घर है , सदा रहने वाला जीवन है, जहाँ लेशमात्र भी दुःख नहीं है,
आवागमन के चक्कर से मुक्त…! अब ना कोई संगी है ना कोई साथी है कहा है परिजन…!
सब छूट गये पीछे… मृत्यु से पहले आत्म साक्षात्कार ना हो जाये तो जीवन व्यर्थ है.
मृत्यु से पहले जाग के जाना… आनंदित हो के जाना… आवागमन से छूट के जाना ही 
जीवन की शिक्षा है. जीवन वही सफल है जो आवागमन से छूट गया है.
मौत उनके लिये मौत नही बनी प्रभु का द्वार बनी…! मौत उनके लिये समाधि बनी…!
आनंद की अनुभूति बनी…!

आप कैमरे की नजर में हो | सुंदर विचार |
Good Thoughts In Hindi On Life 

सत्य है की लोहे से ही लोहे को काटा जा सकता है… और पत्थर से ही पत्थर को तोडा जा 
सकता है… परंतु ह्रदय चाहे कितना भी कठोर क्यों ना हो उसको पिघलने के लिए कभी
भी कठोर वाणी कारगर नहीं हो सकती क्योंकि वह केवल और केवल नरम वाणी से ही 
पिघल सकता है.
क्रोध को क्रोध से नहीं जीता जा सकता… बोध से जीता जा सकता है.
अग्नि अग्नि से नहीं बुझती जल से बुझती है…! समझदार व्यक्ति बड़ी से बड़ी बिगड़ती स्थितियों 
को दो शब्द प्रेम के बोलकर संभाल लेते हैं. हर स्थिति में संयम रखो…
संयम ही आपको क्लेशों से बचा सकता है.
आँखों में शर्म रहे और वाणी नरम रहे तो समझ लेना परम सुख आपसे दूर नहीं.

शब्द भी रूठते हैं…
अपने गलत इस्तेमाल होने पर…
हमने देखा है…
शब्दों को भी अकसर रूठते हुए.

आप कैमरे की नजर में हो | सुंदर विचार |
Good Thoughts In Hindi On Life 

बुद्धिमान व्यक्तियों का सहज स्वभाव होता है कि वे किसी की बुराई की अपेक्षा अच्छाई
पर अधिक नजर रखते हैं. संभव हो तो  बुराई को अनदेखा ही कर जाते हैं…
और अगर उसकी बात करने की जरूरत भी पड़ती है तो वह निंदा के रूप में नहीं… 
असावधानी के रूप में करते हैं…! वह भी इस ढंग से की सामनेवाले पर उसका 
प्रभाव प्रतिक्रियात्मक नहीं सृजनात्मक असर पड़े.

गुणों को आगे रखकर किसी के अवगुणों की गई चर्चा व्यक्ति को सुधार की ओर
प्रेरित करती है. इस प्रकार सुधरा हुआ व्यक्ति सब से पहले उस सज्जन व्यक्ति का ही
भक्त बन जाता है.

अपनी जीवन नीति में इस नियम का पालन करने वाले अपने व्यक्तित्व में
प्रभावशीलता का अर्जन करते हैं और अपने जीवन को प्रभावशाली बनाते है.
शब्द शब्द में हो… ब्रह्म

शब्द शब्द में हो… सार

आप कैमरे की नजर में हो-सुंदर विचार-cctv-सुंदर-विचार-हिंदी-सुविचार-इमेज-vijay-bhagat-vb-good-thoughts-good-thoughts-in-hindi-with-images-suvichar-photo
आप कैमरे की नजर में हो | Suvichar | Good Thoughts In Hindi
आप कैमरे की नजर में हो-सुंदर विचार-cctv-सुंदर-विचार-हिंदी-सुविचार-इमेज-vijay-bhagat-vb-good-thoughts-good-thoughts-in-hindi-with-images
धन्यवाद
  www.vijaybhagat.com
 
Mulgi Kavita | मुलीवर कविता | तरीही मुलगी जगतच राहिली

0
मुलगी कविता - तरीही मुलगी जगतच राहिली...! - Mulgi Kavita - marathi kavita - विजय भगत - मुलगी वाचवा - मुलगी सुविचार
मुलगी कविता | तरीही मुलगी जगतच राहिली | Mulgi Kavita | मुलगी

मुलगी कविता – तरीही मुलगी जगतच राहिली…! – 

Mulgi Kavita – marathi kavita 

मुलगी-कविता-तरीही-मुलगी-जगतच-राहिली-Mulgi-Kavita-marathi-kavita-विजय-भगत-मुलगी-वाचवा-मुलगी-सुविचार
मुलगी-कविता-तरीही-मुलगी-जगतच-राहिली-Mulgi-Kavita-marathi-kavita-विजय-भगत-मुलगी-वाचवा-मुलगी-सुविचार
आली मुलगी जन्माला आणि वडिलाने नाक मुरडले.
तरीही मुलीने वडिलांचे बोट धरले…!
मुलगी चालायला लागली तर… 
बाहेर जाऊन मातीत खेळायला लागली…
आईने घरात खेळायला सांगून बाहुली दिली.
तर मुलगी आनंदात बाहुली सोबत खेळू लागली.
मुलगी भावांसोबत खेळायला लागली तर…
घरच्यांनी मुलांमध्ये खेळू नको असे बजावले…
तरीही मुलगी भावांचे खेळ बघूनच आनंदी राहिली.
मुलगी शाळेत जाऊन अभ्यास करू लागली तर…
आजीने घरातील कामें सांगितली…
तरीही मुलगी सगळी कामे करून अभ्यास करू लागली.
मुलगी मोठी झाल्यावर…
आपल्या आवडीच्या वस्तू मागू लागली…
गरिबीने मुलीला परिस्थितीची चाहूल लागली…
तरीही मुलगी समाधानीच राहू लागली.
मुलगी मोठ्या शिक्षणाची स्वप्न पाहू लागली…
पण घरच्यांनी तिच्या लग्नाची घाई केली…
तरीही मुलगी आपले स्वप्न मागे टाकून पुढे गेली.
मुलगी लग्न करून सासरी गेली…
अनोळखी, परक्या लोकांसोबत राहिली
तरीही सोबत आठवणी घेऊन गेली.
मुलगी आपल्या बाळासोबत रमून गेली…
सासरच्यांनी त्रास दिला…
तरीही मुलगी आपल्या बाळासाठी जगतच राहिली.
मुलगी घरातच राहिली, नवऱ्याने तिचा उद्धार केला…
तरीही मुलगी आपले स्वप्न आणि अपेक्षा सोडून जगतच राहिली.
शेवट पर्यंत मुलगी मुलांसाठी झुरत राहिली, मुलांनी तिला लांब केले,
तरीही मुलगी आपल्या पिल्लांची काळजी करतच राहिली.
मुलगी शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांसाठीच जगत राहिली.